तु तिथे असावे

This Is Love Story Of Rishabh And Rashi With Much More Family Drama
भाग - १       

         राशी तिच्या आई मेघा सोबत जेवण करत असते त्यांचे जेवण झाले त्या दोघी बोलत होत्या की अचानक मेघांना अस्वस्थ वाटू लागलं
 राशी घाबरली तिने पटकन लीनाला (जी की त्यांची सर्वेंट होती )हॉस्पिटल ला फोन करायला सांगितलं
लीना ने पटकन फोन केला तीसुद्धा घाबरली होती
 थोड्या वेळाने तिथे अँब्युलन्स आली ते थोड्याच वेळात हॉस्पिटल ला पोहचले तिथे मेघांना पटकन भरती केले गेले
तिथल्या नर्सने राशीला बाहेर थांबण्यासाठी सांगितले
ती अस्वस्थपणे तिथल्या बाकावर बसून राहिली पण अचानक काही गोंधळ कानावर आला तशी ती भानावर आली
ती घाबरली तिने पाहिले की काही लोक तिच्याकडे येत आहेत ते जवळ येताच लक्षात आले की ते पत्रकार आहेत
त्यांना पाहून ती आणखीनच घाबरली
त्यांनी आल्या आल्या आपल्या प्रश्नांनी तिला भंडावून सोडले
प्रश्न तर विचारणारच ना कारण ती होती श्रीकांत आणि मेघा सरपोतदार यांची एकुलती एक मुलगी
श्रीकांत सरपोतदार जे की खूप मोठे बिझनेसमन होते
काही महिन्यांपूर्वी त्यांचे एका कार अपघातात निधन झाले होते
ती आत्ता कुठे त्या धक्क्यातून सावरत होती की अचानक तिच्या आईचे असे झाले
राशीला तिच्या आई-बाबांनी नेहमी प्रसिद्धी पासून दूर ठेवले होते त्यामुळे आता तीचा पत्रकारांच्या प्रश्नांनी नुस्ता गोंधळ उडाला होता
इतक्यात तिथे हॉस्पिटल चे सिक्युरिटी आले त्यांनी त्या पत्रकारांना सांगितले की हॉस्पिटल मध्ये गोंधळ नका घालू त्यामुळे नाईलजास्तव ते बाहेर गेले
तिने सुटकेचा निःश्वास सोडला
तेवढ्यात डॉक्टर आले त्यांनी राशीला आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले
ते म्हणाले हे बघा मिस राशी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण आम्हाला पेशंट कडून हवा तसा प्रतिसाद नाही मिळत आहे
पुढचे अठ्ठेचाळीस तास खूप महत्वाचे आहेत त्यांना आपण निरीक्षणाखाली ठेवू जर काही प्रतिसाद नाही मिळाला तर माफ करा आम्ही काहीही नाही करू शकणार
हे सर्व ऐकून राशीच्या पायाखालची जमीनच सरकली
ती सुन्न झाली तिला आता कोणाच्यातरी मानसिक आधाराची गरज होती
पण सध्या तरी ह्या परिस्थितीला तिला एकटीलाच समोर जाव लागणार होत काहीही झाले तरी
ती त्या रूममधून जड पावलांनी बाहेर पडली आणि बाहेरच्या बाकड्यावर जाऊन बसली तिची नजर शून्यात गेली होती तिला आजुबाजुला काय घडतंय याची काही फिकीर नव्हती ती तशीच त्या बाकड्यावर बसून होती कितीतरी वेळ कदाचित कितीतरी तास तिला ना खाण्याचे भान होते ना पिण्याचे
तिच्यासाठी तिचे बाबा गेल्यावर आईच सर्वस्व होती आता तीही नसेल तर ती बिचारी काय करणार होती एकटी
तीच पूर्ण जगच संपून जाणार होते
इतक्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात तिला जाणवला तिने दचकून वर पाहिले एक तिच्याच वयाची मुलगी उभी होती तिच्या हातामध्ये चहा आणि बिस्कीट होते ती मुलगी म्हणाली थोडा चहा घ्या तुम्हाला बर वाटेल
राशी ने नको म्हंटले
मग ती मुलगीच म्हणाली हे बघा मी तुम्हाला खूप वेळ झाले बघतेय तुम्ही एकट्याच आहात इथे खूप वेळ झाला
आणि काही खाल्ले ही नसेल तुम्ही
अशाने तुम्ही आजारी पडाल
हे तुमच्या आई ला आवडेल का
हे ऐकून राशीने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
मग ती मुलगी तिच्या जवळ बसली आणि तिचे सांत्वन करू लागली राशीनेही तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली
आता तिला थोडे हलक वाटत होत
त्या मुलगी तिच्यासाठी पाणी घेऊन आली ते राशी ने घेतले
मग त्या दोघी बोलू लागल्या त्या मुलीने तिची ओळख करून दिली माझे नाव निशा तुमचे नाव काय
राशी तिने सांगितले तु मला तूच बोल तुम्ही नको
निशा हलकेच हसली आणि म्हणाली हो चालेल मी इथेच काम करते काही लागले तर सांग
कोणाला केलंय ऍडमिट
राशीने सांगितले आईला
निशाला वाईट वाटले ती म्हणाली अरे बापरे माफ कर मला नव्हते माहीत
त्यावर राशी म्हणाली काही हरकत नाही उलट तुझे खुप आभार मला आधार दिल्याबद्दल मला खरंच गरज होती
निशा म्हणाली काही हरकत नाही
तु बस मी दुसरा चहा घेऊन येते हा थंड झाला एवढं बोलून ती गेली
राशी आता थोडी रिलॅक्स होती मनावरची मरगळ थोडी कमी झाली होती तिच्या
पण तिथेच कोणीतरी असे होते जे तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते
तिला रिलॅक्स पाहून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील हलकंस हसु उमटले
आता ही व्यक्ती कोण होती ते तुम्हाला पुढच्या भागात कळेलच
माझी कथा कशी वाटली त्याची  प्रतिक्रिया नक्की द्या
धन्यवाद


🎭 Series Post

View all