तू तर माझी सावली भाग १

दैवी चमत्कार कोणालाच ठावूक नसतात.

ती काळोख अंधाराची रात्र रेशमा घरात एकटीच होती. राघव कंपनीच्या टूरवर काही दिवसांकरता नाईलाजस्तव गेला होता. रेशमावर पहिल्यांदाच एकटी राहण्याची वेळ आली होती. 

एरव्ही सासू-सासरे सोबतीला असायचे. ते नेमकी मित्रांसोबत देवदर्शनाला गेले होते.नणंद रेवाचे नुकतेच महिन्यापूर्वी लग्न झालेल.
प्रत्येक वेळी पाच तासांचा प्रवास करत माहेरी जाणे रेशमाला अवघड वाटत होते. तिने यावेळी एकटीने घरात राहण्याचा विचार केला.


राघव अधून-मधून फोन करत रेशमाची चौकशी करत असायचा. राघवचा मित्र विजय नेमकी दुस-या दिवशी राघव कडे फॅमिली सोबत राहायला येणार होता. राघवच्या लग्नात विजय परदेशी असल्याने लग्नला येवू शकला नव्हता.
नेमकी राघव घरी नव्हता. तरी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो असे विजयला सांगितले होते. दोघा मित्रांची खूप वर्षांनी भेट होणार होती.


त्या रात्री रेशमाच्या मनात भूतकाळातील घटनांनी डोके वर काढले. तिला राघवचा मित्र विजय या नावाने जीव कासावीस होवू लागला. कोण असेल हा विजय? आपल्या भूतकाळाशी याचा काही सबंध असेल का? असे एक ना अनेक प्रश्न रेशमा समोर उभे राहिले.


माझाच भूतकाळ माझ्या समोर उभा राहिला तर मी कसे याला सामोरे जावू. राघवला यातले काही कळले तर तो मला सोडून देईन.
असा विचार करताना रेशमाचा डोळा लागतो. दुसरा दिवस उजाडतो,विजय आणि त्याची फॅमिली घरी येणार होती. राघवला फोन करुन विचारताच तो अर्धा तासात घरी येणार होता. मनातली भिती काही केल्या जात नव्हती. आता जे होईल त्याला निर्भिडपणे सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
तसेही विजयची देखील फॅमिली आहे. तो ही भूतकाळ विसरला असणार. जरी तो समोर आला तरी मित्र-मैत्रिण असल्यासारखे नात पुढे नेवू शकतो असे रेशमाने मनोमन ठरवले.


हा विजय तोच असेल कशावरुन? विजय नावाची असंख्य लोक या जगात आहे? आपला असा रात्रभर विचार करणे देखील नि:ष्कारण होते असे रेशमाला क्षणिक वाटू लागले. रेशमा नव्या जोमाने पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करु लागली. विजय चार-पाच दिवसांकरता शहर फिरण्याकरता राहायला येणार होता. त्यांची रुम आवरुन त्यांना काही कमी पडायला नको म्हणून रेशमाने आधीच सगळी लिस्ट कामवाल्या मावशींकडून मागवून घेतली होती.
आजूबाजूचा, बागेचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता रामूला आधीच सांगून सक्त ताकीद दिली होती.


सगळे आपआपल्या कामात मग्न असताना राघवच्या गाडीचा हाॅर्न वाजतो. रेशमा बरोबर मावशी आणि रामू दाराजवळ येवून थांबतात.

राघव : झाली का तयारी सगळी. जेवणाचा काय बेत? काही गोड स्विटमार्ट मधून आणायचे का? विजय येईल इतक्यात.

रेशमा : काळजी नका करु. मी सगळी तयारी केली. पाहुणचार करायला आपण कुठे कमी पडणार नाही. टेन्शन नका घेवू



राघव : विजयला आणि त्याच्या बायकोला कपडे घ्यायची राहिली असतील ना? आपण आॅनलाईन आॅर्डर करु.

रेशमा : अहो, मी एक साडी आणली कालच थांबा दाखवते तुम्हांला. हे बघा.

राघव : छान आहे साडी. म्हणजे आता विजय करता आणि त्याच्या मुली करता ड्रेस घेवूया.

रेशमा : अरे वा. मुलगी पण आहे का त्यांना. तुम्ही बोलला नाही मला.


हो सांगतो सगळे काही. त्या मुलीची पण एक निराळीच गोष्ट आहे.काय आहे मुलीची गोष्ट जाणून घेवूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all