तू तर माझी सावली भाग ३

दैवी चमत्कार कोणालाच ठावूक नसतो.

राघव आणि विजय एकमेकांना कडकडून मिठी मारतात. इकडे रेशमा आपली साडी सावरत मागून येत असते. आवाज ओळखीचा वाटल्याने रेशमा एकदम आवजाच्या दिशेने पाहते. तो आवाज विजयचाच होता.
होय रेशमाचा भूतकाळ आता समोर उभा होता. रेशमा दोन मिनिट स्तब्ध झाली.
आपल्याला फसवून विजयने आणखी एका राणी नावाच्या बाईला त्रास दिला. आणि खोटी कहाणी ऐकवून राघवकडून खोटी सहानभूति मिळवत असल्याची रेशमची खात्री पटते.
रेशमा विजयला नव्याने ओळख देत भेटते. भूतकाळ काहीच आठवत नसल्याचे दाखवत असते. राघव मात्र रेशमाच्या स्वभावातला बदल न्याहळत असतो.

त्याला थोड वेगळ वाटते. पण तो फारस त्याकडे लक्ष न देता विजय च्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. 

जेवण करुन सगळे घरी येतात. विजयलाही रेशमाला पाहून धक्का बसतो. रेशमा अजून त्या झटक्यातून बाहेर पडली नसल्याचे विजयला जाणवते. म्हणूनच आपल्या मुलीला तिन ओळखल नसाव.
रेशमा विचार करते जे आहे हे चांगले चालले उगाच स्वत:चा आणि विजयचा संसार का उध्वस्त करायचा. तसेही दहा वर्षांचा काळ लोटला आहे. विजय देखील त्याच्या आयुष्यात खूप पुढे आला आहे. त्याने तर., राणीशी देखील प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यांच नात इतक पुढे गेल की, मुलगी झाली. आणि आता नेहा. 


विजयला आपल्या मित्राचा संसार मोडायचा नव्हता. लग्न होवून नुकतेच दिड वर्ष झाले होते. रेशमाला मागचे काहीच आठवत नाही. उगाच डोक्यावर ताण दिला तर तिची प्रकृति खालावेल. पण तिच्या समोर यायला देखील नको वाटत. पटकन काही बोललो तर.. या विचाराने विजय नेहाला अर्जंट काम आल्याचे सांगतो. उद्या मला निघाव लागेल. तू आणि राघव ची फॅमिली मिळून इथले स्पाॅट पहा. मी येईन नंतर तेव्हा राघव बरोबर बघेल.


राघव : मिटिंग खरच अर्जंट आहे का? चार-पाच दिवस तर थांबणार आहेस. त्यात पण काम घेवून आलास का? सुट्टी नाही काढली का?

विजय : काढली ना. कामच असे आहे आमचे. अर्जंट म्हटले की आहे तिथून निघाव लागते.


नेहा : जावू द्या. नेहमीच आहे त्यांच. पण मी आहे आपण छान मजा करुया. आणि त्यांना फोटो पाठवत जावू.


विजय : मजा करा तुम्ही मस्त. चला येतो आता मी.

नेहा : सांभाळून जा.


विजय : हो ग. आपल्या श्वेता आणि तुझी काळजी घ्या. काम झाल की न्यायला येतो तुम्हांला.


विजय नजरे समोर दिसणार नाही एका अर्थाने रेशमा साठी बरेच झाले होते. आता घरात मनमोकळे पणाने वावरता येणार होते. नेहाला घेवून रेशमा जवळपासची सर्व ठिकाणी भेट देते. दोन दिवसांनी राघव दोघींना दूरवरच्या ठिकाणी स्पाॅट पाहण्याकरता घेवून जातो. नेहा आणि रेशमाच्या गप्पा म्हणजे लहानपणापासूनच मैत्री असल्यासारख्या वाटू लागल्या.


खूप दिवसांनी मैत्रिण भेटल्यासारख्या दोघी रात्रभर गप्पा मारू लागल्या. बोलता बोलता विषय निघतो. रेशमाला वाटले की नेहाला विजयने राणी आणि तिच्या मुलीबाबतचे सत्य लपवले असेल. पण नेहा सांगू लागते. विजय इतका जीव लावणारा नवरा मिळायला भाग्य लागत. बोलण्यातून रेशमाला खर सत्याची चाहूल लागते. तिचा गैरसमज दूर होतो. आणि भयानक सत्याशी रेशमाचा सामना होतो.

 ते सत्य काय आहे ते आपण पाहणार आहोत अंतिम भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all