Mar 02, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 23

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 23

तू तर चाफेकळी - भाग 23अबिरचा तर आपल्या कानावर विश्वासच बसेना की अंजु काय बोलली म्हणून. तो अजूनही भारावल्यासारखा ती गेली त्या दिशेला पाहत तिथेच उभा होता.

" काय साहेब...काय चाललंय....." मागून येत निषादने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

" She looks very beautiful today....... " अबिर पटकन बोलून गेला.

" what......??? " निषादला तर 440 चा शॉकच लागला. कारण आजपर्यंत अबिरच्या अवतीभवती इतक्या मुली होत्या पण त्याने कधीच कोणाबद्दल अशी कॉम्प्लिमेंट दिली नव्हती. निषादच्या ओरडण्याने अबिर मात्र तंद्रीतून जागा झाला.

" अरे काय बरा आहेस ना....?? " निषादने त्याच्या कपाळाला हात लावुन पाहिलं. त्याचं वागणं बघून अबिरने स्वतःला सावरलं.

" मी..... मी ठीक आहे.. मला काय झालंय....?? " त्याने केसांवरून हात फिरवला. कॉलर नीट केली. निषाद त्याच्या हालचालींकडे बारकाईने बघत होता.

" काय....?? " अबिर

" काय....?? तेच विचारतोय मी काय चाललंय काय...?? " त्याने हसून म्हटलं

" काहीही नाही. " अबिरने इकडे तिकडे सहज नजर टाकली तर लॉन आता माणसांनी भरायला सुरवात झाली होती.

" तू कसा काय इकडे....?? " अबिर

" अरे तू नक्की याच कंपनीत आहेस ना जॉबला....??" निषादला आश्चर्य वाटलं

" हो......."

" मग तुला माहीत नाही. आपल्या कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट मिळालं सो आज पार्टी आहे. आपल्या कंपनीचे सगळे एम्प्लॉयी आले आहेत. शिवाय काव्याच्या कंपनीला देखील इंव्हिटेशन आहे..... " निषाद म्हणाला

" हो का. आम्हाला काहीच माहीत नाही...." अबिर

ते दोघे बोलत असतानाच मागुन काव्या आली आणि तिने निषादच्या पाठीवर टॅप केलं.

" हाय......... " काव्याने त्या दोघांना विश केलं.

" हाय...... " निषाद म्हणाला आणि अबिर फक्त तिच्याकडे बघुन हसला.

" मला उशीर तर नाही ना झाला....? पार्टी सुरू झाली का...?? " तिने इकडे तिकडे बघत विचारलं

" नाही अगदी वेळेत आहेस तू... I mean on time.... " निषाद

काव्याने नेव्ही ब्लु कलरचा नि साईज वन पीस घातला होता. त्यावर गळ्यात छोटंसं पेंडंट.. आणि त्यावरचे स्टड.. हातात ब्रेसलेट. निषाद तर तिला बघतच राहिला. पण काव्या काय त्याला भाव देण्यातली नव्हती. श्रीमंत असल्याने थोडा माज होताच. पण गरजेच्या वेळी एखाद्याला उपयोगी पडण्याचे संस्कार देखील तिच्यात होते.

..............................
थोड्याच वेळात पार्टीला सुरवात झाली. दोन्ही sp आणि nd या दोन्ही कंपनीजचे मॅनेजर स्टेजवरती आले.

" हॅलो गायज...... आजपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पण एकत्र एन्जॉय करायची संधी आपल्याला मिळाली नाही..... सो त्यासाठीच आज ही पार्टी ऑर्गनाईज केली आहे...... " ND चे मॅनेजर म्हणाले." येस... नक्कीच. आणि या पार्टीसाठी खास कारण आहे ते म्हणजे मेहता कंपनीच खूप मोठं प्रोजेक्ट आपल्या कंपन्यांना मिळालेलं आहे. तो सेलिब्रेशन तो बनता है ना...." एवढं बोलुन त्यांनी म्युझिक लावायला सांगितलं.

सगळेच हळूहळू पार्टी एन्जॉय करू लागले. मधेच वेटर येऊन कोल्ड्रिंक्स , सॉफ्ट ड्रिंक्स सर्व्ह करत होता. सीमा राकेश , यश , मितू , अंजु सगळे मस्त नाचत होते. अबिर त्या सगळ्यांपासून थोडा दूर उभा राहून सॉफ्ट ड्रिंक पीत होता. तेव्हा काव्या त्याच्याजवळ आली." हे हाय अबिर..... लुकिंग सो कुल.... नेहमीसारखाच..... " तिने त्याला मिठीच मारली. त्याला पटकन कळलंच नाही. त्याने तिला बाजूला केलं." हा थँक्स... तू पण छान दिसतेयस.... " अबिर

" खरंच का ? तुझं लक्षच नाही माझ्याकडे आल्यापासून...." ती त्याच्या जरा जवळ जात म्हणाली.

इकडे अंजु आणि सगळी नाचत होती. तिचं लक्ष अबिरकडे गेलं. काव्या जरा जास्तच जवळ जातेय त्याच्या असं तिला वाटलं. तिला त्याचा राग यायला लागला. एरवी मुलींशी धड बोलायचं नसत आणि आज ती एवढी जवळ आहे तर काही नाही त्याचं. तरीही मनातले विचार बाजूला करून ती पार्टी एन्जॉय करू लागली." हे काय मँगो ज्यूस कधीपासून प्यायला लागलास....?? चल ना कुछ पेग मारते है.... " काव्या त्याला जबरदस्ती ड्रिंक्स कोऊंटर वरती घेऊन गेली." काव्या प्लिज... मी नाही घेत आता..... " तिने समोर केलेल्या व्हिस्कीच्या ग्लासला त्याने नकार दिला." What....?? Are you crazy.....?? " ती आश्चर्याने म्हणाली. तिच्यासाठी हे सगळं शॉकिंग होतं." हो.. प्लिज ..... " अबिर

" चल काही काय... माझ्यासाठी घे ना... इतक्या वर्षांनी भेटतोय आपण.... एक पेग तो बनता है..... " ती त्याला फोर्स करू लागली.

तेवढ्यात अबिर कुठे दिसेना म्हणून अंजु त्याला शोधत ड्रिंक्स काऊंटर जवळ आली. समोर पाहिलं तर काव्या अबिरला ड्रिंक्स घेण्यासाठी फोर्स करत होती. अंजुला त्याचा खूप राग आला. अंजु दोन मिनिटं तिथेच उभी होती. अबिरच पण एव्हाना तिच्याकडे लक्ष गेलं. तिचे डोळे त्याला सगळं काही सांगून गेले. ती तशीच तणतणत तिथून निघून गेली. तिच्यापाठोपाठ अबिर देखील गेला. ती जे समजत होती ते चुकीचं होत हेच त्याला सांगायचं होतं. तो अंजुच्या मागे गेला पण त्याला ती कुठे दिसलीच नाही. एका बाजूला सगळे डान्स करत होते. दुसरीकडे डिनरसाठी काउंटर मांडली जात होती. लॉनला लागूनच एक गार्डन होतं. काळोखातून कोणतरी चालत जातंय असं त्याला वाटलं. चालण्यावरून तरी ती अंजूचं वाटली त्याला. तोही ती होती त्या दिशेने निघाला. थोडा पुढे आला तर ती गायबच झाली. त्याने इकडे तिकडे पाहिलं. थोडा अंधार होता त्यामुळे तो तसाच चालत थोडा पुढे गेला. तेव्हा एका रोपट्यावर त्याला एक डावीकडे जाणारा ऍरो दिसला. तो त्या दिशेने गेला तेव्हा तिथे त्याला एक छोटंसं ग्रीटिंग मिळालं. त्यावर एक व्हाइट रोज ठेवलं होतं. त्याने ते उघडलं त्यावर लिहिलं होतं.

नकळता घडली चूक
कशी कळेना झाली भूल
उमजून ही तू घे ना
माझ्या मनाची तगमग....

कविता वाचूनच त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आलं. व्हाइट रोजला एक चिठी गुंडाळली होती. त्याने ती उघडली. त्यावर लिहिलं होतं राईट साईडला जा... त्याप्रमाणे त्याने केलं. तसाच तो चालत पुढे गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. समोरच वेगवेगळ्या बलुन्स वरती मोठ्या अक्षरात SORRY ही अक्षरे लिहिली होती आणि ते बलुन्स हवेत उडत होते. त्यांची एक दोरी झाडाला बांधली होती. समोर एक बेंच ठेवला होता. त्यावर एक बॉक्स होता. त्याने ते पाहिलं आणि तो बॉक्स उघडला..

क्रमशः....

आज इतकंच लिहून झालं आहे. पुढील भाग 4 तारखेला पोस्ट होईल. तुमच्या भरपूर प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत..!!

कडे अंजु आणि सगळी नाचत होती. तिचं लक्ष अबिरकडे गेलं. काव्या जरा जास्तच जवळ जातेय त्याच्या असं तिला वाटलं. तिला त्याचा राग यायला लागला.

कडे अंजु आणि सगळी नाचत होती. तिचं लक्ष अबिरकडे गेलं. काव्या जरा जास्तच जवळ जातेय त्याच्या असं तिला वाटलं. तिला त्याचा राग यायला लागला.

एरवी मुलींशी धड बोलायचं नसत आणि आज ती एवढी जवळ आहे तर काही नाही त्याचं. तरीही मनातले विचार बाजूला करून ती पार्टी एन्जॉय करू लागली." हे काय मँगो ज्यूस कधीपासून प्यायला लागलास....?? चल ना कुछ पेग मारते है.... " काव्या त्याला जबरदस्ती ड्रिंक्स कोऊंटर वरती घेऊन गेली." काव्या प्लिज... मी नाही घेत आता..... " तिने समोर केलेल्या व्हिस्कीच्या ग्लासला त्याने नकार दिला." What....?? Are you crazy.....?? " ती आश्चर्याने म्हणाली. तिच्यासाठी हे सगळं शॉकिंग होतं." हो.. प्लिज ..... " अबिर

" चल काही काय... माझ्यासाठी घे ना... इतक्या वर्षांनी भेटतोय आपण.... एक पेग तो बनता है..... " ती त्याला फोर्स करू लागली.

तेवढ्यात अबिर कुठे दिसेना म्हणून अंजु त्याला शोधत ड्रिंक्स काऊंटर जवळ आली. समोर पाहिलं तर काव्या अबिरला ड्रिंक्स घेण्यासाठी फोर्स करत होती. अंजुला त्याचा खूप राग आला. अंजु दोन मिनिटं तिथेच उभी होती. अबिरच पण एव्हाना तिच्याकडे लक्ष गेलं. तिचे डोळे त्याला सगळं काही सांगून गेले. ती तशीच तणतणत तिथून निघून गेली. तिच्यापाठोपाठ अबिर देखील गेला. ती जे समजत होती ते चुकीचं होत हेच त्याला सांगायचं होतं. तो अंजुच्या मागे गेला पण त्याला ती कुठे दिसलीच नाही. एका बाजूला सगळे डान्स करत होते. दुसरीकडे डिनरसाठी काउंटर मांडली जात होती. लॉनला लागूनच एक गार्डन होतं. काळोखातून कोणतरी चालत जातंय असं त्याला वाटलं. चालण्यावरून तरी ती अंजूचं वाटली त्याला. तोही ती होती त्या दिशेने निघाला. थोडा पुढे आला तर ती गायबच झाली. त्याने इकडे तिकडे पाहिलं. थोडा अंधार होता त्यामुळे तो तसाच चालत थोडा पुढे गेला. तेव्हा एका रोपट्यावर त्याला एक डावीकडे जाणारा ऍरो दिसला. तो त्या दिशेने गेला तेव्हा तिथे त्याला एक छोटंसं ग्रीटिंग मिळालं. त्यावर एक व्हाइट रोज ठेवलं होतं. त्याने ते उघडलं त्यावर लिहिलं होतं.

नकळता घडली चूक
कशी कळेना झाली भूल
उमजून ही तू घे ना
माझ्या मनाची तगमग....

कविता वाचूनच त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आलं. व्हाइट रोजला एक चिठी गुंडाळली होती. त्याने ती उघडली. त्यावर लिहिलं होतं राईट साईडला जा... त्याप्रमाणे त्याने केलं. तसाच तो चालत पुढे गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. समोरच वेगवेगळ्या बलुन्स वरती मोठ्या अक्षरात SORRY ही अक्षरे लिहिली होती आणि ते बलुन्स हवेत उडत होते. त्यांची एक दोरी झाडाला बांधली होती. समोर एक बेंच ठेवला होता. त्यावर एक बॉक्स होता. त्याने ते पाहिलं आणि तो बॉक्स उघडला..

क्रमशः....

आज इतकंच लिहून झालं आहे. पुढील भाग 4 तारखेला पोस्ट होईल. तुमच्या भरपूर प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत..!!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//