तू तर चाफेकळी - भाग 19 B

Love Story


तू तर चाफेकळी - भाग 19 B


अंजुच्या घरातून अबिरचा पाय निघत नव्हता. का कोण जाणे पण त्या घरात त्याला खूप छान वाटलं. तो घरी आला. पण त्याच्या डोळ्यांसमोर तिचं बक्षिसं फिरत होती. त्याच्याही घरी अशी अनेक बक्षिसं होती. पण त्यावर कोणाचा अभिमान कोरला नव्हता. त्याला त्याचे कॉलेजचे दिवस आठवले.


कॉलेजचे स्पोर्ट डेज चालू झाले नि सगळ्यांच्यात एक वेगळाच उत्साह आला. जो तो आपपल्या आवडीप्रमाणे खेळात सहभागी होत होता. चेस , कॅरम , कबड्डी , खो खो या सगळ्या स्पर्धा यंदा रंगतदार झाल्या. आता फक्त क्रिकेट आणि बास्केटबॉल दोनच मॅच राहिल्या होत्या. खूप उत्सुकतेने सगळेच मॅचची वाट पाहत होते. उद्या बास्केटबॉलची मॅच फिक्स झाली. सगळेच तयारीला लागले. या वेळी पण अबिरची टीम जिंकणार याची सर्वांनाच खात्री होती. टी वायच्या टीमच्या अबिर कॅप्टन होता. सलग तीन वर्षे त्याने आपल्या टीमला जिंकुन दिलं होतं. यंदा त्यांची मॅच सेमी फायनल जिंकलेल्या फस्ट इअरच्या मुलांसोबत होती. त्यांचीही मॅच खूप रोमांचक झाली होती. त्यामुळे यंदा दोन्ही प्रतिस्पर्धी तोडीस तोड होते. कोण जिंकतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.


थोड्याच वेळात मॅचला सुरवात होणार होती. दोन्ही संघ समोरासमोर आले. एफ वायच्या टीमचा कॅप्टन होता नचिकेत बर्वे. टॉस करण्यात आला. अबिरच्या टीमने टॉस जिंकला आणि त्यांना प्रथम संधी देण्यात आली. त्याने फक्त एक लूक नचिकेतकडे दिला नि तो पुन्हा आपल्या जागेवर आला. शिटी वाजली नि अबिरने बॉल टॅप करत आपल्या पार्टनर्सकडे पास केला. बाकीचे सगळे त्याला कॅच करून बॉल मिळवण्यासाठी फिरत होते. पण टी वायच्या टीमने त्यांचा काही निभाव लागू दिला नाही आणि एक बास्केट झाला. हळूहळू मॅचला रंगत येऊ लागली. नंतर मग एफ वायची टीम देखील जोराने खेळू लागली. त्यांनी ही पाठोपाठ चार पाच बास्केट केले. त्यामुळे आता दोन्ही टीमचे मार्क्स बरोबरीत येऊ लागले. आता शेवटची काही मिनिटं शिल्लक होती. एफ वायच्या टीमला जिंकण्यासाठी 1 मार्क हवा होता तर अबिरच्या टीमला 2 मार्कांची गरज होती. सगळे श्वास रोखुन बघत होते. नचिकेतने बॉल आपल्याकडे घेतला. बाकीच्यांना बाजूला करत तो बॉल टॅप करत बास्केटजवळ येऊ लागला... तोच अबिरने त्याला धक्का दिला आणि बॉल त्याच्याकडून काढुन घेऊन बास्केट केला. तसा सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मॅच टाय झाली होती. आता परीक्षक काय सांगतायत याकडे सर्वांचं लक्ष होतं. थोडा वेळ चर्चा केल्यानंतर त्यांनी अबिरच्या टीमला मगाशी केलेल्या बास्केट बद्दल एक गुण द्यायचा राहिला होता असं सांगुन निकाल जाहीर केला. त्यामुळे ही मॅच टी वायची टीम जिंकली होती.


लगेचच बक्षीस समारंभ होता. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विजेत्या टीमला ट्रॉफी देण्यात आली. सर्वांनी एकच जल्लोष केला. ट्रॉफी घेऊन अबिर खाली उतर असतानाच नचिकेत समोर आला.


" अभिनंदन.......... " त्याने अबिरकडे बघत हात पुढे केला.


" थँक्स...... " अबिरने त्याच्या हातात हात मिळवला. " चिटिंग करून का होईना... पण तू जिंकलास... " त्याने हाताची पकड घट्ट करत त्याला आपल्याकडे खेचलं.


" ए.... काय बोलतोयस कळतंय का....?? आमच्या मेहनतीने जिंकलोय आम्ही.... " अबिरने आपला हात सोडवून घेतला.


" Ohhh.... Really....?? एकदा जाऊन विचार परीक्षकांना.. तुझे डॅड या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. म्हणुन जिंकलायस तू आज... " नचिकेत रागाने बोलत होता.


" अजिबात नाही. ते कॉलेजच्या कोणत्याच गोष्टीत इंटरफेअर करत नाहीत... मी जिंकलोय माझ्या एफर्ट्समुळे... कळलं.... " अबिरने नचिकेतची कॉलरच पकडली.


" आला मोठा एफर्ट्स सांगणारा. आजवर तू असाच जिंकत आला असणार. खरे कष्ट केलेस का आयुष्यात....?? माहीत तरी आहे का...?? " नचिकेत


" Aeee you...... " अबिर त्याला मारायला धावला.


तसे बाकीचे फ्रेंड्स त्यांना सोडवायला आले.


" अबिर.... अबिर तू शांत हो आधी..... " निषाद त्याला थोपवत होता.


" पैशाची मिजास आहे ना ती तिकडे घरी दाखवायची. इथे कॉलेजला नाही. रुबाब झाडत असतोस ना सगळ्यांवर.. बड्या बापाचा लेक.... खेळता येत नाही म्हणुन अशी partiality.. करता तुम्ही लोक.... " नचिकेत तावातावाने बोलत होता.


" ए तू गप.... हिंमत असेल तर परत खेळुन दाखव मॅच. बघु कोण जिंकतंय.....?? " अबिर चांगलाच चिडला होता.


" आता कशाला....?? चोराच्या उलट्या बोंबा. " नचिकेत देखील मागे हटणारा नव्हता.


" निषाद याला शांत राहायला सांग..... मी काय करीन माझं मलाच माहीत नाही...." अबिर


बाकीच्या मित्रांनी मग दोघांनाही बाजूला केले. निषाद अबिरला घेऊन एका बेंचवर बसला.


" अबिर शांत हो......तो काही बोलला असेल तर लक्ष देऊ नको.... " निषाद त्याला समजावत होता. पण इकडे अबिरच्या डोक्यात अंगार फुलला होता.


नचिकेत म्हणाला ते काही खोटं नव्हतं. अबिरच्या वागण्या बोलण्यात श्रीमंतीचा माज कायमच दिसायचा. बेफिकीर वागणं.... कॉलेजला नवीन आलेल्या मुलांचं रॅगिंग करणं... यातच तो त्याच्या टीम वेळ घालवत असायची. पण हे सगळं असलं तरी तो हुशार होता. त्याला परीक्षेत मार्क्स देखील चांगले मिळायचे. त्यामुळे त्याच्या बाकी गोष्टींकडे शिक्षक देखील दुर्लक्ष करायचे. खूप मुलं होती जी त्याच्या अशा दादागिरीला कंटाळलेली. पण बोलणार कोण...?? हा मोठा प्रश्न असायचा. त्यामुळे आज अबिरला जाब विचारणारा पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यासमोर आला होता नि त्याला ते सहन होत नव्हतं. रागाच्या भरातच तो उठला. निषादने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण त्याचं काहीच न ऐकता तो गाडी घेऊन निघुन गेला.

......................................

घरी आल्या आल्या त्याने ती ट्रॉफी जोरात सोफ्यावर फेकली.


" मॉम..... डॅड.... कुठे आहात तुम्ही....?? " तो रागाने हाक मारत होता.


तेव्हा त्याची मॉम बाहेर आली. सोबत तिने मिठाई आणली होती.

" आलास का तू.....?? घे मिठाई खा. जिंकून आलास ना...?? " मॉमने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला पण त्याने तो झिडकरला.


" तुला कसं माहीत मी जिंकलो ते.....?? मी तर काहीच बोललो नाही. " त्यावर मॉम गोंधळली.


" अरे... ही... ही ट्रॉफी दिसली. त्यावरून तू जिंकून आलायस ते कळलं...." तिने सावरलं.


" नक्की ना....?? की तुला आधीपासूनच माहीत होतं की मी जिंकणार आहे म्हणुन....?? " त्याने जरा संशयाने तिच्याकडे पाहिलं.


" छे.... रे.. मला कसं माहीत असेल..? " तिने त्याची नजर चुकवली.


" खोटं बोलतेय ती. " जिन्यावरून त्याचे डॅड खाली येत म्हणाले.


" आत्ताच मला प्रिन्सिपल सरांचा फोन येऊन गेला. तू फोन केला होतास ना त्यांना की आज काहीही झालं तरी अबिर ही मॅच जिंकायला हवा म्हणून.... " ते आपल्या कोटचं बटणं लावता लावता बोलले.


" what......??? मॉम का केलंस तू असं...?? तुझा विश्वास नव्हता का माझ्यावर....?? मी स्वतःच्या हिमतीवर जिंकू शकलो असतो.. "अबिर चांगलाच चिडला होता.


" Am sorry Abir. पण तू हरला असतास तर ते मला बघवलं नसतं. म्हणुन मी फोन केला प्रिन्सिपल सरांना. नि मला नाही वाटत त्यात माझं काय चुकलं आहे असं.. " ती रुबाबात म्हणाली.


" खरंच तुला वाटत नाही की तुझं काही चुकलंय...?? Starange...!!! दोन्ही मायलेकांना सवयच आहे. श्रीमंती दाखवत फिरायची.... " डॅड रागाने म्हणाले.



" काय चुकीचं आहे त्यात....??? आपण आपल्या स्टेटस प्रमाणे राहावं.. असल्या कॉलेजच्या फालतू मॅचमध्ये जर माझा मुलगा हरला असता तर ते मला अजिबात आवडलं नसतं.... " मॉम


" मॉम.. पण मी जिंकलो असतो. हे सगळं करायची काही गरज नव्हती...." अबिर


" तुम्हाला दोघांनाही श्रीमंतीचा माज आलाय. ही बाहेरच्या लोकांवर रुबाब झाडत असते. हा कॉलेजला.... " डॅड


" डॅड... ते.... ते मी.... " अबिरला काही बोलायलाच सुचत नव्हतं.


" नाही ना बोलायला सुचत. मग राहूदे. स्वतः कष्ट करून मिळवलेलं असतं ना ते खरं यश. हे असं दुसऱ्याच ओरबाडून आणलेलं नाही.... " डॅड


" डॅड....... " अबिर ओरडला.


" का...?? त्रास होतोय का ऐकायला. हे सगळं वैभव लगेच निर्माण झालेलं नाहीये. मी कष्ट घेतलेत त्यासाठी. तुम्हाला सगळं आयतं मिळतंय का तुम्हाला कशाचं काही वाटेल... " डॅड


" अहो काय बोलताय तुम्ही...?? जाऊद्या हा विषय.... प्लिज तुम्ही शांत व्हा.... अबिर तू तर शांत हो... " ती त्या दोघांना समजावू लागली.


" अग काय पोरखेळ वाटला हा तुम्हाला. कॉलेजला हा रॅगिंग करत फिरत असतो. तुमच्यामुळे आयुष्य उध्वस्त व्हायचं एखाद्याचं... हे हे सगळं कशामुळे तर पैशामुळे... उधळायला पैसे मिळतात ना दर महिन्याला.... " डॅड देखील चांगलेच चिडले होते. एवढ्या दिवसात अबीरबद्दल ऐकू येणाऱ्या गोष्टींकडे त्यांनी कानाडोळा केला होता. पण आज हे सगळं ऐकून त्यांचा कंट्रोल सुटला होता.


" हो. कारण माझे पैसे आहेत ते... मी कधीही घेऊ शकतो... " अबिरने खांदे उडवले.


" अजिबात नाही. हा माझ्या कष्टाचा पैसा आहे.. एवढीच जर का हिंमत असेल ना तर स्वतःच स्वतः कमवायचं..." डॅड


" डॅड तुम्ही चॅलेंज करताय मला....?? " त्याचा इगो हर्ट झाला होता.


" तसं समज हवं तर..." ते ही मागे हटण्यातले नव्हते.


" ठीक आहे. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतो.... "


" गुड.. तुझं शिक्षण पूर्ण झालं की... मी सांगेन ते तुला करावं लागेल... कबूल...?? "


" कबूल..... "


क्रमशः....

🎭 Series Post

View all