तू तर चाफेकळी - भाग 19 A

Love story

तू तर चाफेकळी - भाग 19 A 

( " निषाद गाडी उघड लवकर......." त्यालाही दोन मिनिटं के झालं ते कळलं नाही. त्याने मग पटकन येऊन गाडीचा दरवाजा उघडला तसं अबिरने अंजुला पुढच्या सीटवर बसवलं. अंजुने तर घाबरून डोळेच मिटले होते. काय झालं तिला काही कळलंच नाही. तिने डोळे उघडले तेव्हा अबिर येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. निषाद मात्र अबिरच्या पळत जाणाऱ्या गाडीकडे बघत स्वतःशीच हसला.  ) 

आता पुढे

मागच्या दोन मिनिटांत काय झालं अंजुला काही कळलंच नाही. घाबरून मिटलेले डोळे उघडल्यावर एवढंच लक्षात आलं की आपण अबिरच्या गाडीत आहोत. मगाशी विचारलं तेव्हा नव्हतं यायचं सोडायला आणि आता डायरेक्ट उचलूनच आणलं. हिंमत कशी झाली याची मला हात लावायची. तिला राग आला त्याचा. वाटलं विचारावं ओरडुन. पण करणार काय..?? उगाच तो चिडला तर इथेच उतरवेल गाडीतून. धड चालता पण येत नाहीये. जाउदे त्यापेक्षा शांत बसलेलं बरं. तिने त्याच्याकडे बघितलं तर तो शांतपणे ड्राइव्ह करत होता. 

" अबिर...... ती काव्या तुझी फ़्रेंड आहे का..?? " अंजुने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्याने तोंडातून एक शब्द काढला नाही. 

" अबिर......?? " तिने पुन्हा हाक मारली. तरीही शांतताच. 

जाऊदे मी तरी कशाला बोलू. नाही बोलायचं ना..?? नको बोलू. सॉरी म्हटलं एवढं त्याचंही काही उत्तर नाही. स्वतःशीच बडबडत तिचा डोळा लागला. एके ठिकाणी स्पीडब्रेकर वर गाडी जरा दणकली तेव्हा तिला जाग आली. तिच्या समोरचं असलेला एक कप्पा ओपन झाला त्यामुळे. त्यात तिने दिलेलं कालच लेटर तसंच होतं. ते बाहेर आलं. अंजुने ते हातात घेतलं. 

" हे पाहिलं नाहीस का ओपन करून....?? " तिने लेटर दाखवत विचारलं. 

" नाही. मी बघितलंच नाही. तुझंच राहिलंय वाटतं. काल तू गेल्यावर इथे पडलं होतं ते मी ठेवलं. घेऊन जा... " तो ड्रायव्हिंगवरचं लक्ष विचलित न करता म्हणाला. 

इतका राग आला म्हणुन सांगू. मीच लिहिलेलं लेटर मलाच देतोय. आता काय बोलणार...??  तिने ते आपल्या पर्समध्ये टाकलं. तिचं घर आलं. ती उतरायचा प्रयत्न करायला लागली. 

" थांब. उतरू नको खाली.... " इतकी जरब होती त्याच्या आवाजात की अंजु तिथेच बसून राहिली. 

त्याने जाऊन तिच्या घराची बेल वाजवली. आई किचनमध्ये पोळ्या करत होती. बाबा पुस्तक वाचत बसले होते. 

" अहो , अंजु आली असेल. जरा बघता का...?? " आईने आतूनच सांगितलं तसं बाबा उठले. त्यांनी दार उघडलं. 

" कोण हवंय....?? " दारात उभ्या असलेल्या अबिरला बघुन त्यांनी विचारलं. 

" मिस अंजलीचे बाबा का तुम्ही....?? " त्याने विचारलं.

" हो.. काय झालं..?? अंजु कुठाय....?? " दाराबाहेर येऊन त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. 

" अहो कोण आलंय....??" एव्हाना आई पण दाराजवळ आली. 

" अंजलीचा पाय मुरगळलाय... मी आणलंय त्यांना गाडीतून.. तुम्ही त्यांना न्यायला येता का जरा...?? " त्याने गाडीकडे बोट दाखवलं.

" अरे देवा.... फार लागलंय का हो.... अहो तुम्ही जा ना... तिला घेऊन या... " आईला काळजी वाटायला लागली. 

" हो... हो मी जातो. थांब तू.. नि इथे जवळच आहे गाडी..थांब मी आलोच... " बाबा अबिर सोबत गाडीपर्यंत गेले.

अबिरने अंजु बसली होती. तिथला दरवाजा उघडला आणि हळूहळू बाहेर यायला सांगितलं. उठताना जरा कळ आलीच. तसा अबिरने तिला आधारासाठी हात पुढे केला. तिने त्याचा हात घट्ट धरला आणि ती बाहेर आली. अबिरने तिला सावकाश बाहेर काढलं आणि तिचा हात बाबांच्या हातात दिला. 

" काही राहिलं नाही ना...?? " त्याने विचारलं.

" नाही. पर्स घेतली मी...." अंजु 

" चला मी निघतो.... " तो अंजुच्या बाबांना सांगुन निघत होता.

" अहो थांबा. थोडा चहा तरी घेऊन जा. तुम्ही एवढं अंजुला घेऊन आलात. खरंच थॅंक्यु.... " अंजुला आधार देत बाबा तिथेच उभे होते. 

" काका... खरंच नको. उशीर झालाय. मी निघतो. " तो निघाला. 

" मी काय म्हणतो... प्लिज तुम्ही चहा तरी घेऊन जा. आमच्या घरी येऊन तुम्ही असेच गेलात तर आम्हाला ते बरं वाटणार नाही.. प्लिज... " बाबांचा आग्रह त्याला मोडवेना. त्या दोघांच्या   पाठोपाठ तोही घरात आला. आई तिथेच उभी होती. 

" फार लागलंय का...? असा कसा पाय मुरगळला...?? " एक ना हजार प्रश्न...आईला पडत होते अंजुच्या काळजीने. 

" अग थांब तिला आत तरी येऊदे.... " बाबा तिला घेऊन आत आले नि तिला त्यांनी सोफ्यावर बसवलं. 

" या ना... आत या.... " दाराजवळच घुटमळणाऱ्या अबिरला आई म्हणाली. तेव्हा तो आत आला. 

" या ना. बसा..... "  अबिर येऊन अंजुच्या समोर बसला. 

" अग यांच्यासाठी चहा टाक. आपल्या अंजुला एवढं घरी घेऊन आले ते.... " बाबा 

" हो हो... आत्ता करते.... " आई किचनकडे जायला वळली.

" कॉफी कर त्याच्यासाठी... चहा घेत नाही तो फार... " अंजु बोलली तसं त्याने चमकून अंजूकडे पाहिलं. बरं म्हणून आई आत गेली. 

" काय झालं अंजु... कुठे धडपडलीस....?? " बाबांनी विचारलं.

" कॉन्फरस चालू आहे ना सध्या मेहता कंपनीत. तिथेच पडले. पायऱ्यांवरून. येताना... " अंजु. 

" हम्मम... बरं झालं यांनी सोडलं तुला.. एवढ्या रात्री रिक्षा पण मिळत नाहीत वेळेवर... मला फोन केला असतास तर मी आलो असतो.... " बाबा.

" तेच करणार होते शेवटी. पण याने मदत केली.... " अंजु त्याच्याकडे बघत म्हणाली. पण तोंड वेडावत बाकी कोणाला दिसणार नाही असं. 

अबिर शांत बसून होता. त्याने घरावरून एक नजर फिरवली. मध्यम आकाराचा हॉल... मध्ये मोकळा पॅसेज... त्यालाच लागून समोर किचन... सोफ्याच्या मागच्या बाजूला वरती जायला जिना.... डाव्या हाताला टीव्ही... नि त्याच्यावरती असणारं शोकेस.....हलका पण प्रसन्न वाटेल असा भिंतींचा रंग.... कोपऱ्यात शोपिसेस.....  त्याला बरं वाटलं. तोपर्यंत आईने त्याच्यासाठी कॉफी आणली. 

थोड्या वेळाने अमेय पण घरी आला. बाईकला हेल्मेट लावत असतानाच त्याला समोर कार दिसली. कोण आलंय आत्ता रात्रीच...?? विचार करत साहेब आत आले. 

" बाबा , आपल्या घरासमोर गाडी कोणाची....?? " अमेयने आत येत विचारलं. 

" यांची आहे. अंजुला सोडायला आले होते हे.... " बाबांनी सांगितलं. तसा अबिर त्याच्याकडे बघुन हसला. 

" हिचं का तोंड उतरलय असं.....?? " अमेय अंजुच्या बाजूला जाऊन बसला. 

" धडपडून आल्यायत मॅडम.... म्हणून तर यांना सोडायला यायला लागलं..." आई 

" आई आता काय मुद्दाम पडलेय का मी....?? " अंजुने रागाने अबिरकडे पाहिलं. तो कॉफी पीत होता. 

" हाय... मी अमेय.. अंजलीचा भाऊ..... " अमेयने हात पुढे केला. 

" अबिर....." त्याने ही हात मिळवला. 

" ओहह.... तुम्हीच का ते अबिर....??? " अमेयच्या बोलण्याने अबिरला पटकन ठसकाच लागला. 

" अहो हळु हळु...... " अबिरने कप खाली ठेवला.. बाबांनी हात फिरवला तसं त्याला बरं वाटलं. 

" चला मी निघतो आता.. खूप उशीर झालाय...." अबिर घड्याळ बघत उठला. 

" मी काय म्हणते... तसही.. साडेआठ होऊन गेलेत.तुम्ही  जेऊनच जा ना. अंजु म्हणाली आम्हाला तुमची फॅमिली कोण नसते इथे....तुम्हाला जायला उशीर होईल.. " आई 

" अहो नको... कशाला उगीच तुम्हाला त्रास.... मी जाईन ना. फार नाही वाजलेत.... " तो निघतच होता. 

" अहो , तुम्ही तरी सांगुन बघा....." आई म्हणाली.

आलायत... असंच न जेवता जाऊ नका.... " बाबा म्हणाले. 

" आई कशाला.. त्याला थांबायचं नसेल तर आग्रह करता....?? " अंजु पचकलीच रागाने. तसं अमेयने तिच्या डोक्यात टपली मारली आणि गप्प राहायला सांगितलं. 

" अहो अंजूचे बाकीचे मित्र मैत्रिणी पण येतात आमच्याकडे.. त्यामुळे तुम्ही काही वाटुन घेऊ नका... थांबा जेवायला.... " त्याच काही न ऐकता आई आत तयारी करायला गेली.

" आम्ही पण जेवू आता. जेवणाच्या वेळेवर आलायत... असंच न जेवता जाऊ नका.... " बाबा म्हणाले. 

" आई कशाला.. त्याला थांबायचं नसेल तर आग्रह करता....?? " अंजु पचकलीच रागाने. तसं अमेयने तिच्या डोक्यात टपली मारली आणि गप्प राहायला सांगितलं. 

" अहो अंजूचे बाकीचे मित्र मैत्रिणी पण येतात आमच्याकडे.. त्यामुळे तुम्ही काही वाटुन घेऊ नका... थांबा जेवायला.... " त्याच काही न ऐकता आई आत तयारी करायला गेली.

" अहो नको कशाला...... " अबिर बोलायचा प्रयत्न केला पण त्याचं कोणीच ऐकलं नाही. 

जेवणाची तयारी होईपर्यंत तो तिथेच बाबांच्या बाजूला सोफ्यावर बसला. बोलणार तरी काय..?? सगळेच अनोळखी. अंजुशी बोलावं तर आधीच तिचा राग आलेला बोलणार तरी कसं. अंजु पण मग आवरुन आली. अबिर घर न्याहाळत होता तोच टीव्हीच्या वरती असणाऱ्या शोकेसकडे त्याचं लक्ष गेलं. तिथे खूप ट्रॉफीज होत्या. बऱ्याचशा अंजुच्याच होत्या. तो जाऊन त्या ट्रॉफी पाहू लागला. बऱ्याच स्पर्धांमध्ये अंजुला बक्षीस मिळालं होतं. कबड्डी , खो खो शिवाय वक्तृत्व स्पर्धेत देखील मॅडम पहिल्या यायच्या.  

" चला जेवायला.... तयार आहे.... " आईने बोलावलं सगळ्यांना. 

" अबिर सर चला... " बाबांनी त्याला हाक मारली तसा तोदेखील त्यांच्यासोबत गेला. 

जेवणाची ताट मांडली होती. साधाच पण छान बेत होता. टोमॅटोच सार... भात , काकडीची कोशिंबीर , पापड , गरम गरम फुलके... लोणचं... वासावरूनच त्याची भूक चाळवली. 

" सावकाश जेवा हा. लाजू नका.... " बाबांनी सांगितलं त्यावर त्याने मान डोलावली. 

रोजच्या पक्वानापेक्षा आजच साधं जेवण त्याला खूप आवडलं. 

" तुम्ही एकटेच असता का इकडे....?? " अमेयने विचारलं.

" हो. ते इकडे ट्रान्सफर झाली ना.... त्यामुळे एकटाच.... " तो जेवता जेवता म्हणाला. 

" घरी कोण कोण असतं मग...?? " बाबा 

" आई , बाबा , बहीण आहे लहान... "  अबिर 

" वडील काय करतात....?? " बाबांनी विचारलं आणि अबिरला एकदम ठसकाच लागला. 

" अहो काय तुम्ही पण प्रश्न विचारताय.... तुम्ही जेवा हा सावकाश.... " आईने अबिरला पाणी दिलं. त्याला जरा बरं वाटलं. 

" अग मी आपलं सहजच विचारलं.. बरं का अबिर सर अंजली आमची पहिल्यापासूनच हुशार.... सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायची...  ट्रॉफ्या बघितल्यात ना मगाशी...  " बाबा उत्साहाने सांगत होते. 

" हो ..... " तो हसला.

" बाबा कशाला उगीच... " अंजु 

" असू दे गं बाळा.... आपल्या मुलांचं असं छान कर्तृत्व असलं की आई वडिलांना पण अभिमान असतो... "  बाबा 

बाबा म्हणाले आणि अबिरच्या मनावर त्यांचा प्रत्येक शब्द कोरला जात होता. थोड्या वेळाने सर्वांची जेवणं झाली. सर्वांना बाय करून अबिर निघाला. जाता जाता त्याने त्या शोकेसवर नजर टाकली. त्यातली बक्षिसं उगीचच आपल्याकडे बघुन हसतायत असं त्याला वाटलं. 

क्रमशः..... 

पुढील भाग आज रात्री पोस्ट करेन. कोकणात प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळे रेंज प्रॉब्लेम आहे. थोडे दिवस तरी भाग पोस्ट करायला उशीर होईल. त्याबद्दल क्षमस्व. 

🎭 Series Post

View all