Feb 29, 2024
प्रेम

तू तर चाफेकळी - भाग 18

Read Later
तू तर चाफेकळी - भाग 18

 

 

 

 

अबिरने अंजुला घरी सोडलं. पण तिच्यावरचा राग जराही कमी झाला नव्हता. आता तर काय तिने सापाच्या शेपटीवरच पाय दिलाय म्हटल्यावर तो फणा काढणारच होता. त्याने रागाने स्टेरींगवर एक पंच मारला. त्याला तिचा राग येत होता तरी तिला सोडायला तो का आला त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. दोन मिनिटं तो तिथेच थांबला. मग त्याने गाडी स्टार्ट केली. गेअर चेंज करणार तोच बाजूच्या सीटवर त्याचं लक्ष गेलं. एक इनवोल्वप होतं. आधी त्याला वाटलं अंजूचं राहिलं असेल उद्या ऑफिसला गेल्यावर देऊ म्हणुन तिथल्याच रॅकमध्ये ते ठेवायला लागला तेव्हा त्याला त्यावर काहीतरी लिहिलेलं दिसलं. त्याने पाहिलं तर त्यावर To , Abir लिहिलं होतं. आता काय आहे यात..?? त्याचं वैतागलेलं मन म्हणालच. जाऊदे बघू मग. असं म्हणुन त्याने ते तिथेच बाजूला ठेवलं आणि गाडी चालवायला लागला. घरी आला तोपर्यंत त्याला प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे घाईघाईत ते पाकीट तो गाडीतच विसरून वरती आला. त्याने आल्या आल्या फोनवरून पिझ्झा ऑर्डर केला आणि तो आवरायला गेला. थोड्याच वेळात बेल वाजली त्याने पार्सल घेतलं आणि त्याची आवडती मुव्ही लावुन तो मस्त पिझ्झा खात होता. त्यामुळे त्याचा मूड देखील थोडा फ्रेश झाला. खाऊन झाल्यावर त्याने थोडावेळ मोबाईलवर टाईमपास केला आणि तो बेडवर आडवा झाला. डोळे मिटले तर सकाळचा अंजुचा चेहराच आला डोळ्यासमोर. फॉर्मल मध्ये आज वेगळीच दिसत होती ती. मी का विचार करतोय पण तिचा...?? त्याने मग तिचा विचार झटकुन दिला आणि पडल्या पडल्या त्याला झोप लागली. 

 

........................................

 

आज कॉन्फरसचा दुसरा दिवस. कालप्रमाणे आज देखील प्रेझेंटेशन होणार होती. अंजूचं टेंशन कालच संपलं होतं. आता उरलं होत ते फक्त एकच टेन्शन. बाजूला बसलेलं...!! तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं तर तो शांतपणे समोर चाललेलं बघत होता. तिला खरंतर विचारायचं होतं. इनवोल्वप पाहिलं का म्हणून..?? पण विचारणार कसं अँग्री बर्डला...?? तिने सेशन संपेपर्यंत वाट पाहायची ठरवली. शेवटी एकदाचा लंच ब्रेक झाला आणि ते बाहेर आले. 

 

 

 

" अबिर........... " अंजुने हाक मारली तेव्हा तो थांबला. 

 

 

" अबिर मला बोलायचं होतं तुझ्याशी. परवा जे काही झालं त्यासाठी........ " तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अबिर बोलला. 

 

 

 

" हे बघा मिस अंजली.. मला तुमच्याशी बोलण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये. हे प्रोजेक्ट जर आपण करत नसतो ना तर कदाचित मी तुमचं तोंड देखील पाहिलं नसतं.... " एवढं बोलून अबिर तरातरा निघून गेला. अंजुच्या डोळ्यात मात्र पाणी साचलं. कोणी बघत नाही असं पाहून तिने ते हलकेच टिपलं. 

 

 

 

" का माफ करशील तू तरी मला..?? मी पण काहीही विचार न करता तुझ्यावर एवढे आरोप केले.. सॉरी अबिर. खरंच सॉरी... " ती मनातच बोलत होती आणि डोळ्यातलं पाणी तिने पुसलं. पण यावेळी निषादने तिला पाहिलं आणि रागाने गेलेल्या अबिरला देखील. 

 

 

 

" Any problem miss...?? "   निषादने तिला हळू आवाजात विचारलं. 

 

 

" नाही काही नाही....." तिने मान दुसरीकडे फिरवली. 

 

 

" मग डोळ्यात पाणी का..?? अबिर काही बोलला का...?? " निषाद 

 

 

 

" नाही. तो काहीच बोलला नाही... " तिने त्याला सांगायचं टाळलं. 

 

 

 

" पण मला माहित आहे ना. तो असाच आहे आधीपासून...वागला की चांगला वागतो लोकांशी. पण चिडला की काही खरं नाही.... " निषाद हसला. 

 

 

त्याने मग तिला लंचसाठी बोलावलं. दोघांनी मिळुन जेवण केलं पण अबिर कुठेच दिसत नव्हता. 

 

 

" तुम्ही कधीपासून ओळखता अबिरला....?? " अंजुने खाता खाता विचारलं. 

 

 

" आम्ही दोघेही कॉलेजला होतो. मग तो MBA साठी अमेरिकेला गेला ना सो भेट नाही......"        निषाद सहज म्हणाला.

 

 

 

" अमेरिकेला.....??? " अंजुच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. तिने असं अनपेक्षित विचारलं आणि निषादला एकदम ठसकाच लागला. 

 

 

 

" हळूहळू..... वर बघा.... बरं वाटतंय का आता.. ?? पाणी घ्या....." निषादने तिला हातानेच ok असल्याचं सांगितलं.       निषाद सहज म्हणाला.

 

 

 

" अमेरिकेला.....??? " अंजुच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. तिने असं अनपेक्षित विचारलं आणि निषादला एकदम ठसकाच लागला. 

 

 

 

" अमेरिका नाही... अमरावती..... ते आमच्या कॉलेजला एक कबीर म्हणुन मुलगा होता तो शिकुन आलाय तिकडून... तो कबीर नि हा अबिर सो जरा कन्फ्युजन झालं. खूप दिवसांनी भेटलो ना सो..... " निषादने वेळ मारून नेली.

 

 

 

" ओहह.... ok ok...... " अंजुनेही मग लक्ष दिलं नाही. निषादने एक सुटकेचा निःश्वास सोडला. ती मग काम होतं सो तिथुन उठुन गेली तोच पाठून अबिर टपकला. 

 

 

 

" अरे , शहाण्या मारशील मला एक दिवस.... तिच्यासमोर काही बोलू नकोस. डिटेक्टिव्ह नजर आहे तिची.... " अबिरने निषादला फैलावर घेतलं. 

 

 

 

" सॉरी सॉरी..... ते चुकुन गेलं तोंडातून. आता परत बोलताना नीट सांगेन.. चल आपण आत जाऊ.. तू खाल्लस का पण काही....?? " निषादने उठत विचारलं. 

 

 

 

" तुझं झालं ना....?? चल मग. मला भूक नाहीये.... " अबिरने त्याच्या खांद्यावर हात टाकला. 

 

 

 

" अरे पण....... " त्याने निषादला काही बोलू न देता...आत घेऊन गेला. 

 

 

 

पुन्हा पुढचं सेशन चालू झालं. एका नवीन कंपनीच नाव जाहीर करण्यात आलं. त्याची रिप्रेझेन्टेटीव्ह म्हणून एक मुलगी पुढे आली. व्हाइट शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट , ब्लेझर.... खांद्यापर्यंत रुळणारे केस... चेहऱ्यावर ब्लॅक फ्रेमचा स्टायलिश चष्मा.... तिने सर्वांवर एक नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली. अबिरला तर तिलाच बघत राहिला. निषादने त्याला कोपरानेच मारलं तेव्हा त्याला जाग आली. बाजूला बसलेल्या अंजुचा जीव मात्र वरखाली व्हायला लागला.  तिने अगदी साध्या आणि मोजक्या शब्दात प्रेझेंटेशन सुरू केलं. ती इतकं छान बोलत होती की तिथे बसलेल्या प्रत्येकाला ते फक्त ऐकत राहावं वाटतं होतं. विचारलेल्या प्रश्नांची देखील तिने तितक्याच सफाईदारपणे उत्तरं दिली आणि ती आपल्या जागेवर जाऊन बसली. सर्वांची प्रेझेंटेशन संपली होती. मॅनेजर सर उठले आणि माईकजवळ आले. 

 

 

 

" सर्व कंपनीजनी खूप छान प्रेझेंटेशन केली आहेत. त्यामुळे first up all thank you so much.. आता पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला एक टास्क देण्यात येईल. तुमच्यापैकी एकाने येऊन तो पूर्ण करायचा आहे. सर्वांना वेळ सारखीच असेल.... " एवढं बोलून मॅनेजर सर आपल्या जागेवर बसले. 

 

 

मग प्रत्येक कंपनीच्या रिप्रेझेन्टेटीव्ह म्हणून एकाला पुढे बोलवण्यात आले. त्यात अबिर देखील होता. अंजुने प्रेझेंटेशन दिलं होतं त्यामुळे या टास्कसाठी त्यालाच जावं लागणार होतं. पण मगाशी प्रेझेंटेशन दिलेली मुलगी पुन्हा एकदा आली होती. सर्वांना 15 मिनिटांची वेळ देण्यात आली. काही कोडिंग आणि प्रोग्रॅमिंगचे टास्क त्यांना देण्यात आले. त्यासाठी प्रत्येकाच्या समोर लॅपटॉप देण्यात आला. 

 

" Your time start now...... " कोणीतरी म्हणालं तशी सगळ्यांची बोटं कीबोर्ड वरती फिरू लागली. 

 

अबिरने त्या मगाशी आलेल्या मुलीकडे एक नजर फिरवली पण ती आपल्या कामात होती. अबिरने देखील मग आपलं काम करायला सुरुवात केली. थोडा वेळ फक्त कीबोर्डसच्या कीजचा आवाज हॉलमध्ये घुमत होता. काही वेळातच टाइमअप झाले. काही जणांचे अजूनही प्रोग्रॅमिंग अर्धवट होते. सगळ्यांना पुन्हा एकदा जागेवर बसायला सांगितलं. थोडा वेळ प्रोजेक्टबद्दल चर्चा करण्यात आली आणि आजच सेशन संपलं. सगळे बाहेर आले. मगाशी प्रेझेंटेशन दिलेली मुलगी बाहेर आली. स्टाईल मध्येच तिने लावलेला चष्मा बाजूला केला आणि ती निघाली. तोच तिच्या मागुन येत अबिरने तिला गाठलं. 

 

 

" काव्या........... " त्याने हाक मारली. तशी ती थांबली. या अनोळखी ठिकाणी कोण हाक मारतंय म्हणुन तिने मागे वळुन पाहिलं. 

 

 

 

" काव्या पटेल ना.......?? " अबिरने विचारेपर्यंत तिनेच त्याला हाक मारली. 

 

 

 

" अबिर........!!!!! " काहीशा मोठ्याने ती म्हणाली आणि तिने त्याला मिठीच मारली.     

 

 

 

" Abir , what a plsent surprise....!!!!  Don't say  की तू इथे प्रेझेंटेशनसाठी आला होतास....?? " तिच्या चेहऱ्यावर आनंद नुसता ओसंडुन वाहत होता. बाजूला होत ती बोलत होती.      

 

 

 

" हो करेक्ट.... मी प्रेझेंटेशनसाठीच आलो होतो..पण तू किती बदललेयस...किती दिवसांनी भेटतोय आपण... " तो हसून म्हणाला.     

 

 

 

 

" हो ना.... कॉलेज संपल्यावर मी ऑस्ट्रेलियाला होते. माझ्या आतेकडे... सगळं एज्युकेशन तिकडेच कम्प्लिट केलं नि आले.... " काव्या बोलत होती. 

 

 

दोघांच्या गप्पा चालू होत्या तोच मागुन अंजु आली. अबिरला त्या मुलीशी इतकं हसताना बघुन तिला त्याचा राग येत होता. मी काल सॉरी म्हणत होते तर साधं माझ्याकडे बघायला पण वेळ नव्हता. आता हिच्याशी बोलतोय छान. पण ही तर मगाचीच मुलगी. याच्या ओळखीची असेल का....??  ते बोलत असतानाच अंजु त्यांच्याजवळ गेली.         

 

 

 

" चला निघायचं का....?? " अंजु पर्स चेक करत म्हणाली. 

 

" मिस अंजली.... मला आज यायला नाही जमणार. तुम्ही जा... " अबिरने तिच्यासोबत जाणं टाळलं आणि तो पुन्हा काव्या सोबत बोलू लागला.   

 

 

" पण..... पण उशीर झालाय... मला वाटलं तुम्ही सोडाल मला आज पण..." अंजु काकुळतीला आल्यासारखी बोलत होती.   तेवढ्यात मागुन निषाद आला. 

 

 

 

" अरे तुम्ही गेला नाहीत अजून......?? " निषादने अबिरला विचारलं आणि त्याची नजर काव्यावर गेली. 

 

 

 

" अरे हिला ओळखलं नाहीस का...? ही काव्या.. काव्या पटेल.... टॉपर... " अबिरने सांगितलं आणि निषादच्या चेहऱ्यावर आठवल्याचे भाव आले.      

 

 

 

" अरे हाय..... किती दिवसांनी भेटतोय..... " निषादने हात पुढे केला तसं काव्याने देखील त्याला विश केलं. 

 

 

त्यांचं आपापसात बोलणं चालू होतं त्यामुळे कोणाचंच अंजूकडे लक्ष नव्हतं. एकतर बाहेर काळोख पडला होता. तिला एवढ्यात रिक्षा मिळणं पण मुश्कील होतं. ती तशीच रागाच्या भरात बाहेर जात होती. पायऱ्या उतरत असतानाच तिचा पाय मुरगळला आणि पडली. जोरात " आई गं..... "म्हणुन ती ओरडली. तसे सगळे तिकडे धावले.   काव्याने पुढे होऊन तिला उठवलं. 

 

 

" लागलंय का तुला फार...... " तिने आपुलकीने विचारलं. निषाद पण अंजुच्या मदतीला आला होता. अबिरही आला पण थोडा मागेच राहिला. 

 

 

" फार नाही ठीक आहे... एकदम कळ आली.... " ती उठायचा प्रयत्न करत होती तोच पुन्हा कळ आली आणि तिचा तोल गेला.      

 

 

 

" आ..... आई गं..... " दुखऱ्या पायावर हात ठेवत ती तिथेच कशीबशी पायरीवर बसली.           

 

 

" मी सोडू का तुला.....??? कुठे राहतेस तू....?? " काव्याने विचारलं. 

 

 

 

" नाही.  It's ok.  मी जाईन माझी माझी.. thank you so much mam....."  अंजु म्हणाली. 

थोडा वेळ थांबुन काव्या देखील निघून गेली. आता निषाद , अंजु आणि अबिर तिघेच इन्ट्रान्सजवळ थांबले होते.      

 

 

 

" अबिर काय करायचं आता...?? तिला चालता पण येत नाहीये....तू नेऊन सोडशील का तिला...?? " निषादने विचारलं. 

 

 

" काही नको... मी जाईन माझी.. विचारलं होतं तेव्हा कोणाला बघायला पण वेळ नव्हता.... " अंजु रागातच बोलली. 

 

 

तिने तिची पर्स घेतली. हळूहळू ती उठायचा प्रयत्न करायला लागली तोच पुन्हा पायात चमक भरली.   " आई गं..... " ती कळवळली. तिला आधार द्यायला निषाद पुढे होणार तोच अबिरने तिला उचललं आणि आपल्या गाडीच्या दिशेने घेऊन गेला. 

 

 

" निषाद गाडी उघड लवकर......." त्यालाही दोन मिनिटं के झालं ते कळलं नाही. त्याने मग पटकन येऊन गाडीचा दरवाजा उघडला तसं अबिरने अंजुला पुढच्या सीटवर बसवलं. अंजुने तर घाबरून डोळेच मिटले होते. काय झालं तिला काही कळलंच नाही. तिने डोळे उघडले तेव्हा अबिर येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. निषाद मात्र अबिरच्या पळत जाणाऱ्या गाडीकडे बघत स्वतःशीच हसला.         

 

 

क्रमशः.... 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//