तू मुंबई मी पुणे भाग नऊ

After the response from Mrunalini both houses start their communication for preparations of sunday event...Just see the flow of the sequences in this blog

तू मुंबई मी पुणे:-(भाग 9)

"अहो ऐकलत का,  मृणालिनी ने होकार कळवला आहे"
"काय सांगतेस काय!"
"अहो मग काय...तिचा चेहरा बघा किती खुलला आहे आणि लाजत पण किती आहे"
"अरे हो की, माझ्या तर लक्षात पण नाही आले.."
"तुमचे लक्ष असते का कधी...?"
"तुझे टोमणे थांबतात का कधी...?"
"जाऊदे...माझेच चुकले! मी विसरले होते की तुम्हाला माझे टोमणेच दिसतात..."
"आणि त्यामागचे प्रेम दिसते का कधी...?
"इश्श...मुलीचे लग्न ठरतंय आता तरी चावटपणा सोडा"
"मी चावटपणा करतो...ठीक आहे आता पत्रिकेत लिहुयात की चावट बापाची एकुलती एक मुलीचे लग्न ठरलंय...."हा हा हा
"तुमच्याशी बोलणे च अवघड बाई.."
"ते जाऊदेत कुठे आहेत आपल्या सुकन्या..."
"बसली आहे बेडरूममध्ये काहीतरी विचार करित..."
"चल जरा बोलूयात"
............
"मृणा...येऊ का आत?"
"ओ बाबा, विचारताय काय! या की"
"नाही, मी ऐकले की मुलगा पसंत नाही पडला तुला....काही त्रास होत असेल तुला म्हणून एकटी बसली आहेस...तर विचारूनच आत यावे"
"पसंत नाही हे कुणी सांगितले... आईने?"
"अगं... मी नाही सांगितले बरं का..."
"आई..तूच सांगितले असणार...!"
"अगं आईने नाही सांगितले....पण आता पसंत नाही तर राहु देत"
"पसंत आहे बाबा...खूप पसंत आहे"
"आआआआ........बघू बघू चेहरा तर बघू जरा"
"काय हो बाबा तुम्ही पण...." असे म्हणून तिने बाबांना हग केले..
"आता काय...आमची मृणा आता चि सौ.का. मृणालिनी सारंग होणार..."
"बाबा...."
बाबा मस्त हसले आई पण हसण्यात सामील झाली.
मग काय ते येत आहेत का आपण जायचंय तिकडे?
"बाबा... त्या सगळ्यांना येऊ दे की मुंबईला...नाहीतरी नंतर मला पुण्याला जायचंय"
"हो ग बाई...तुझे मुंबई प्रेम"
"आहेच मुळी!"
"मग या रविवारी बोलवूयात का त्यांना?...चालेल का तुमच्या सारंग रावांना"
"सारंग रावांना?...प्लिज बाबा नो राव..ओन्ली सारंग"
"जावई ना ते आमचे...मग राव नाही म्हणले तर चालेल का"
"हो हो हो ...चालेल...नक्की चालेल...कसे नाही चालते बघतेच मी"
"आत्तापासूनच बघते...काही खरं नाही"
"अहो रविवारी बोलवायचे म्हणताय मग लगोलग साखरपुडा करूनच टाकायचा का?"
"मनातील बोललीस बघ...सारंग च्या बाबांना फोन करून लगेच विचारून घेतो...चालेल ना मृणा तुला का घाई होत आहे?"
"घाई नाही...उशीर होतो आहे"
"काय सांगतेस काय!...एवढी लगीनघाई आमच्या पोरीला..वाह वाह!
"बाबा...!" असे म्हणून ती लाजून आत पळून गेली.
...........
"रमेश राव....मी गाडी पाठवतो हवे असेल  तर. सारंग ची बहीण पण येणार असेल ना?"
"दिलीप जी, तुम्ही निश्चिन्त राहा! मी 18 सीटर गाडीच बुक करतोय खास....आम्ही येऊ डायरेक्ट बोरीवली ला"
"बरं.. जसे तुम्हाला योग्य वाटते तसे...अच्छा एक विचारायचे होते..."
"बोला ना..."
"तुमची काही अपेक्षा त्या दिवशी साठी....."
"हो आहे ना..."
"सांगा ना, अगदी बिनधास्तपणे...."
"आमचे आदरातिथ्य न करता आम्हाला तुमच्या घरातील हक्काचा माणूस असल्यासारखे वागवा, म्हणजे झाले.." ते जोरजोरात हसत म्हणाले.
"रमेश राव, तुमच्यासारखी माणसे मिळणे अगदी दुर्लभ"
"अहो आमची मुलाची बाजू म्हणून काय तुम्ही आमच्या ईच्छा पूर्ण करायला नाही बसलात...तुम्ही पण मुलगी देताय आम्हाला...उलट आम्हीच नमते असले पाहिजे"
"नाही हो...असे नाही...पण विचारलेले योग्य नाही का...?"
"आता मी सांगितले बरं का...त्यामुळे देवाण घेवाण हा प्रश्न कधीच नको पडायला...तुमची मुलगी आणि नारळ एवढेच आम्ही घेणार..."
"लग्नात सुद्धा काही नाही घेणार...?"
"नाही...आणि खर्च निम्मा निम्मा बरं का! आमच्या लोकांचा जेवणाचा भार तुम्हाला नाही देणार आम्ही..."
माफ करा रमेश राव...ईतर सगळे ठीक पण लग्न तरी आम्हाला करू देत! आमची एकुलती एक मुलगी आहे.."
"ठीक आहे रविवारी भेटल्यावर बोलूयात आपण....आम्ही 11 पर्यंत येतो डायरेक्ट मग...!"
"या या...वाट पाहतोय..."
......................
"सुलोचना, ऐकती आहेस का ग...!"
"मगाच पासून तुम्ही च मोबाइल ला कान लावून बसलाय...मी काय ऐकणार?"
"अगं... फार म्हणजे फारच चांगले लोक आहेत...आपली मृणा अगदी खुश असेल तिथे..."
"खरंच देव पावला ग..."
"आता रविवारच्या तयारीला लाग...हे घे माझे डेबिट कार्ड....हवी तशी आणि हवी तेवढी कॅश काढून घे आणि मृणा च्या तयारीत काही कमी पडून देऊ नकोस...."
"मी बरी कमी पडून देईन.... मी तर भरतक्षेत्र ला जाते खरेदी ला! चालेल ना...?"
" जरूर जा...तोपर्यंत मी पंचवटी गौरव ला जाऊन येतो...त्यांचा फंक्शन हॉल आणि 35 लोक यांच्या जेवणाची सोय करायची आहे ना...रविवारसाठी"
..................
"सारंग, तू काय घालणार आहेस रविवारी...?"
"कपडे...." हा हा हा
"सारंग...! मी नीट विचारत आहे"
"Ok... तू सांग काय घालू?"
" मोतीया कलर चा सिल्क चा कुडता आणि पांढरी शुभ्र चुन्नी वाली सलवार..."
"बाप रे...माझयाकडे नाही आहे हे...."
"अरे मी इथून घेऊन ठेवणार आहे...जे तू इथे आल्यावर घालायचे आहेस.."
"ओ....! मला वाटले मला आता शॉपिंग ला पाठवतेस की काय"
"साहेब जी..शॉपिंग ला तुला तर जावेच लागेल ना, माझ्यासाठी काय आणणार आहेस..?"
"लोणावळ्याला थांबून चिक्की आणतो चालेल का?"
"सारंग............!"
"हा हा हा....!"
"तुला कायम मजाच सुचते का..."
"सॉरी सॉरी....सांग काय आणू..."
"सांगू....?"
"येस..."
"माझ्या साठी खूप वेळ आण...."
"येस मॅडम...बंदा आपकी किस्मत में हाजीर रहेगा..."
"प्लिज लवकर ये...वाट पाहायला लावू नकोस..."
"आत्ता निघू का...?"
"काही नको...रविवारीच ये..."
"हे बघ...मी आत्ता स्टॉप वॉच लावतोय....अं... आता 76 तास 49 मिनिटे आणि 16 सेकंद राहिले आहेत आपल्याला भेटायला..."
"76 तास...? खूप जास्त होतात सारंग"
"अगं 65 तासांनी तर रविवार सुरू होईल त्यापुढे अकरा तास..."
"Hmmm."
"बाय द वे...हे स्टॉप वॉच तुला पण लागू पडते बर का मृणालिनी..."
"हो तर... मला कळते.."
"आत्ता नाही कळणार ...भेटल्यावर कळेल मी काय म्हणतो आहे ते..."
"मिसिंग यु सारंग...लवकर ये..."
"आणि..."
"आणि काय...?"
"मिसिंग यु नंतर काहीतरी म्हणतात...मी वाचलंय पुस्तकात..."
"काय म्हणतात?...मी नाही वाचले..."ती खट्याळ पणे हसत म्हणाली.
"नाही वाचले का...ठीक आहे रविवारी येताना ते पुस्तक घेऊन येतो आणि तुझ्या बाबांसमोर तुला वाचायला लावतो...
"ऐ.. असे रे काय सारंग..."
"मग बोल... लवकर"
"ओके...बोलते...."
"अं....I .......L डॉट डॉट ई ....यु.."
"आता हे डॉट डॉट काय आहे?"
"आम्ही नाही जा...."
"मग आम्ही रविवारी येत नाही जा...."
"सारंग....."
"मृणाल...."
"Wow....मृणाल ...किती छान वाटतंय...परत म्हण...."
"मृणाल...."
" मस्त....आय ल डॉट डॉट ई यु सारंग"
"परत तेच..."
"तुला फील ईन द ब्लॅंक नाही येत का सारंग..."
"नाही..."
"ओके... पहिला डॉट म्हणजे...आय आणि दुसरा डॉट म्हणजे के..
म्हणजे...एल आय के ई...
आय like you सारंग...."
"मृणाल....!"
"हा हा हा....बाय स्वीट हार्ट....रविवारी भेटू"

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all