तू मुंबई मी पुणे (भाग चार)

Conversation between Both of them continues on different subject. Sarang opens his mind by stating what family matters to him..What he said exactly read in this blog.

तू मुंबई मी पुणे (भाग 4)

त्याला ठसका लागलेला पाहून ती जोरजोरात हसायला लागली. 
"का रे मुंबई चे नाव काढल्या बरोबर एकदम ठसकाच?"
"अग तुझी डायरेक्ट प्रश्न विचारायची पद्धत समोरच्याला पूर्णपणे निष्प्रभ करते."
ती अजून खळखळून हसली.
"तुझ्या मनात का आला एकदम मुंबईचे?"
"अरे असंच!मला मुंबई सोडवीशी वाटत नाही आणि पुण्यात यावं अशी इच्छा नाही म्हणून असेच वाटलं, तुझा काही मुंबई चा प्लॅन आहे का?"
"अच्छा म्हणजे ही ऑफर आहे का माझ्यासाठी की जर तू मला हो म्हणणार असशील तर तुला मुंबईला आले पाहिजे?"
"हे असे काही नाही!तुझा जॉब ही तुझी प्रायोरिटी.  तुझा मित्र परिवार तुझ्या ईच्छा हे सगळं पुण्यात आहे तर उगाच मी तुला मुंबईला ये म्हणण्यात काही अर्थ नाही हे मलाही कळते. मी फक्त विचारात होते की तुझा मुंबईला येण्याचा काही विचार केला आहेस का की ज्यानुसार तुला मुंबईला यायला आवडेल."
"नाही मी काही विचार केला नाही.मला असं वाटत की पुण्यामध्ये मी सगळ्याच बाजूने सेटल आहे घर आहे, गाडी आहे, चांगली नोकरी आहे पुढे जाऊन बिझनेस करण्याचा पण प्लॅन आहे डोक्यामध्ये आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला वाटते की मला पुण्यात मनःशांती आहे. मुंबईत धकाधकीत यावं अस मला अजून तरी वाटलं नाही."
" मला याची कल्पना होतीच."
" तू मला अजून काही सांगणार आहेस!"
"काय सांगू तुला अजून भूतकाळाबद्दल, जे तुला ऐकायचं आहे?"
" मृणालिनी मुंबई वरून खास मला भेटण्यासाठी आलीं आहेस, तुला खूप काही बोलायचे आहे. तर हे खूप बोलणं काय आहे? तुझ्या मनातलं काय बोलायचे आहे हे तर तू मला सांग!"
" सारंग तुला माहिती आहे माझा लग्न पद्धतीवरचा विश्वास हा फार वेगळा आहे. मला अरेंज पेक्षा लव मॅरेज खूप मॅटर करते. मला असं वाटते की आपण त्या माणसाला ओळखावं, जाणून घ्यावं आणि त्यानंतर लग्नासाठी हो म्हणावे कारण आपण आयुष्यभरासाठी संसार त्याच्याबरोबर करणार असतो. "
"बरोबर आहे तुझे, यात काहीच चूक नाही."
" आणि म्हणून,  तुझ्याकडे शंभर चांगले गुण असतील पण तरी हो म्हणण्यासाठी मन अजून धजावत नाही. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न  आहे, म्हणून मी हेच बघायला आले होते की तुझ्याबरोबर जेव्हा वेळ घालवते तेव्हा कसे वाटते?"
 "हम्मम्म"
"पण तुला खर सांगू,  तुझा शांत स्वभाव, तुझी ही वागण्याची पद्धत मला इथे जेवण आणून देण्यासाठी तू केलेली धडपड , तुझी अशी आऊट ऑफ द वे जाऊन मला अश्या ठिकाणी आणण्यासाठी तुझी तयारी,  या सगळ्यामधून तुझ्याबद्दलचे वेगळेपण तर मला नक्कीच भासतंय. 
पण हे जरी असलं तरी,  मला अजून लक्षात येत नाहीय.  मी अजून थोडी confuse आहे."
"हे बघ, confuse आहे हा शब्द आपण कधी वापरतो जेव्हा दोन गोष्टी या सेम वाटतात आणि त्या दोन पैकी एक गोष्ट आपल्याला  निवडायची असते.  असे अजून कोणाबद्दल वाटतंय का की अजून कोणा मुलाबद्दल विचार करते आहेस?" त्याने हसून विचारले. 
"नाही तसं नाही, मला confuse नाही म्हणायचं मग मी माझ्या बाबतीतच अजून फर्म नाहीय आणि म्हणून मी काही म्हणू शकत नाहीय.
 पण तुझा होकार आहे का सारंग,  म्हणजे मुलगी आवडली आहे इतकाच निरोप आम्हाला मिळाला होता. याचा अर्थ होकार असतो का?"
" हे बघ माझ्या लग्नाबद्दल च्या कल्पना खूप अवास्तव आहेत असे नाही पण मला मुलगी एक सहचारिणी,  जी मला, माझ्या घरच्यांना आणि स्वतःला सुद्धा छान समजून घेईल. योग्य संसार करेल आणि सगळ्यांना आनंद देईल या अश्या खूप मिनिमम अपेक्षा आहेत. आणि या अपेक्षांवरतीच मला माझं नाते पुढे न्यायचं आहे.
मी पण मुली पाहिल्या असे नाहीये की मी मुली कधी पहिल्या नाहीत, पण प्रत्येक वेळी माझी अपेक्षा हीच होती."
" ए सारंग तुझ्या आयुष्यात काही झाले आहे का आधी? "
"म्हणजे काय?"
"म्हणजे तुझा भूतकाळ रे?"
"हो आहे की, माझाही आहे काही भूतकाळ!"
"काय आहे सांग ना!"
" अच्छा म्हणजे मी असे म्हणू का आता,  की तुला माझ्या भूतकाळात जायचय?"
"हो मला जायचय !"
" मॅडमजी 3.45 होत आलेत, तुमच्या गाडीचं टायमिंग काय आहे?"
"अरे हो 3.45 झाले, माझी 5.55 ची गाडी आहे मला 5.30 पर्यंत स्टेशन वर पोहचावे लागेल."
"आपण गाडीत जाताजाता बोलायच का?"
 " हो बोलूयात !"
"चल!"
"तू सांगतो आहेस ना तुझ्या भूतकाळाबद्दल?"
"माझा भूतकाळ असा छान आहे! छान आहे याचा अर्थ असा की तुझ्या बाबतीत जे झाले असे काही नाही, पण माझ्या बाबतीत काही समजुती काही गैरसमजुती झाल्या."
" म्हणजे?"
"म्हणजे असे की मी जे वागतो त्यामागचे अर्थ वेगळे घेतले गेले!"
"तू असे कोड्यात बोलू नकोस!"
"अगं मी सांगायचा प्रयत्नच करतोय पण मी काय सांगू?"
"सगळं!"
"मृणालिनी तू मला बोलताना कधीतरी खूप अल्लड वाटतेस" "असेलही,  माणसांनी आपला बालिशपणा सोडू नये." ती हसत म्हणाली
" मला एक मुलगी आवडत होती आणि तिला मी, आम्ही  दोघेही 10 महिने डेंटिग केलं. म्हणजे फिरलो, भेटलो , बोलणं गप्पा मारणे. पण माझे जे विचार आहेत माझे आई बाबा, माझं घर माझ्या ज्या प्रायोरिटी आहेत ते तिला पटायचे नाही."
"म्हणजे?"
"ती असे म्हणायची आपण वेगळं राहू, परदेशी स्थायिक होऊ. आईवडिलांना त्यांचं आयुष्य घालवू दे आपण आपलं आयुष्य घालवू आणि मी कधी या मताचा नव्हतो. मी जगात कधीही कुठेही गेलो तरी मला माझे आईबाबा हवेत ही माझी ईच्छा आहे."
" ती त्याला तयार नव्हती?" 
"बिलकुल तयार नव्हती तीचे असे म्हणणं होतं की त्यांचं  ते आयुष्य जगले आता तुझ्या आयुष्यात तू तुझा विचार कर."
"मग तुला असे नाही वाटलं का की हा विचार बरोबर आहे?"
" हे बघ प्रत्येकवेळी आपले आईवडील बाजूला ठेऊन आपले आयुष्य जगावे हे योग्य नाही ना!"
"म्हणजे?"
"म्हणजे मला असं म्हणायचे की मला माझ्या आईवडिलांना पण बघायचे आहे ,त्यांच्या उतार वयामध्ये पण त्याच्या सोबत थांबायचे आहे, मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे त्यांना वेळ द्यायचा आहे आणि बायकोलाही वेळ द्यायचा आहे आणि हे चुकीचं नसले पाहिजे."
" हो पण तुझ्या बायकोकडून तू अपेक्षा करणे की तिने तुझ्या आईवडिलांच केले पाहिजे  हे बरोबर का?"
"अस मी अजिबात म्हंटलं नाही आहे, तिने माझ्या आईवडिलांना सांभाळून घेतले पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे!"
"सारंग तुला असे नाही वाटत की तुझं आयुष्य हे तुझ्या फॅमिली ट्री पासून सुरू व्हावे?"
"वाटते न पण त्या ट्री मोठं करणाऱ्या आईवडिलांचा त्यात भाग असलाच पाहिजे, त्यांच्याशिवाय मजा ती काय?"
"सारंग तुझी बहीण आहे ना आणि ती सोलापूरला असते?"
" हो तीच लग्न झाले आणि मुलगा म्हणून तर मी एकटाच आहे आई बाबां जवळ! मला तरी वाटते की ते कायम माझ्याबरोबर राहावे आणि फक्त माझे नाही तर तुझेही आईवडील म्हणजे sorry जी माझी बायको असेल तिचेही आईवडील हे कायम आणि कायम आपल्याबरोबर राहावेत. त्यांच्यापासून आपण लांब जाऊ नये आणि  कुठेही गेलो तरी त्यांना घेऊन जावे."
"सारंग तुझे काही विचार छान आहेत,पटतात ही आणि नाही सुद्धा.
" ए  4.30 वाजत आहेत आणि आपण स्टेशन पासून 10 मिनिटांवर आहोत. आपण कॉफी प्यायला थांबायचं का 5 मिनिटे?"
" हो का नाही? तसाही आपल्याकडे स्टेशन ला पोचेपर्यंत वेळ बराच आहे."
" मग तुला कॅम्प मधल्याच एका रेस्टॉरंट ला नेतो तिथे छान कॉफी मिळते."
"कुठे रे?"
"एक रामकृष्ण म्हणून रेस्टॉरंट आहे!चल तिथे जाऊयात! तिथे पार्किंग पण मिळेल"
आणि त्याने इंडिकेटर देऊन रामकृष्ण च्या साईड ने गाडी वळवली.
गाडी वॅले मध्ये देऊन तो तिला घेऊन रेस्टॉरंटमध्ये आला. तिला पहिल्या पाहिल्या ते रेस्टॉरंट आवडले.
आतल्या एअर कंडिशन हॉल मध्ये एका नक्षीदार  टेबलाच्या कुशन फोम खुर्चीवर तो  बसला. ती समोर बसली.
"2 फिल्टर कॉफी आणि ब्रेड बटर"  वेटर पाणी भरत असताना त्याने ऑर्डर देऊन टाकली.
वेटर गेल्यावर तिने विचारले, 
"तुला एक विचारू सारंग?"
"बिनधास्त"
"एखादी मुलगी तुझ्या अपेक्षांना सुरुवातीला हो म्हणाली आणि नंतर ती बदलली तर"
"असे नाही होणार"
"कशावरून?"
"एकतर मी लोकांना ओळखू शकतो आणि दुसरे म्हणजे घरच्या वातावरणाचा खूप फरक पडतो. माझे आई बाबा इतके फ्री आहेत की ते माझयाशीच मित्राप्रमाणे वागतात. त्यामुळे माझ्या होणाऱ्या बायकोला काळजी करायचे कारण नाही"
"आणि नंतर बायकोचे आणि तुझ्या आईचे जर नाही पटले तर?"
"मी एवढ्या जर तर मध्ये नाही राहत ग! मला नाते निभावण्याचा सक्षम विश्वास आहे"
"तुझा फर्मनेस तुझ्या आत्मविश्वासाची साक्ष देतो"
"म्हणूनच मी कॉन्फिडन्ट आहे"
"कश्याबद्दल?"
"तुझ्या हो म्हणण्याबद्दल......"
ती एकदम स्तब्ध झाली....
तो तिच्याकडे बघत असताना कॉफी आली.
कॉफीचा पहिला सिप घेतल्यावर ती म्हणाली, "wow"
"आवडली?"
"खूप"
"मला पण"
"पण तू तर आधी टेस्ट केली आहेस ना?"
"मी कॉफीबद्दल नाही बोलत आहे"
त्याच्या या बोलण्याने ती एकदम लाजली.
कॉफी संपवून घड्याळात बघत म्हणाली, "निघायचे?"
"येस मॅडम"
त्याच्या उत्तराने ती खुदकन हसली.
बिल पे करत तो बाहेर पडला.  वॅले अटेंडन्ट गाडी घेऊन आला त्याने त्याला टीप देत गाडीत बसला आणि ती बाजूला येऊन बसली. 
अत्यंत सावकाश पणे गाडी चालवत तो स्टेशन रोड ला लागला. 
दोघेही शांत बसलेले होते कुणीच काही बोलत नव्हते. 
त्याने FM रेडिओ सुरू केला. त्यावर गाणे सुरू होते "दो दिल मिल रहें हैं......"
त्याने तिच्याकडे पाहिले ती बाहेर पाहत होती.
पुणे स्टेशन च्या पार्किंग लॉटमध्ये त्याने गाडी आत घेतली तेव्हा बरोबर 5.25 होत होते.
ड्रॉप सेक्शन ला त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, "आपण वेळेत आहोत मॅडम"
"येस सारंग, थँक्स"
"तुझा दिवस ठीक गेला का आत्तापर्यंत?
"अरे कसा गेला कळलेच नाही. You are a indeed a good company"
त्याने मान वाकवून thank you म्हणले आणि ती परत खळखळून हसली.
"मी उद्या तुला फोन करेन सारंग"
"ओके"
"चालेल ना?"
"बाय ऑल मिन्स"
"निघते आता, प्लॅटफॉर्मवर जाऊन डबा शोधेपर्यंत अजून 10 मिनिटे जातील"
"येते म्हणावे मृणालिनी"
तिने त्याच्याकडे बघितले आणि हसत म्हणाली, "ओह येस, येते मी"
त्याला बाय करून ती निघाली.
तिच्या जाण्याकडे बघत तो मनात म्हणाला,
"तू नक्की येशील मृणालिनी, पुण्यातच येशील कायमची"


क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all