Oct 26, 2020
प्रेम

तू मुंबई मी पुणे भाग आठ

Read Later
तू मुंबई मी पुणे भाग आठ

तू मुंबई मी पुणे:-  (भाग 8)

ओबेरॉय मॉल च्या पार्किंग ला पोचेपर्यंत मृणालिनी एकदम शांत होती, तिथे पोचल्यावर गाडी पार्क करत म्हणाला
"आपण पोहचलोय मॅडम!"
"ओह सॉरी सारंग, पण मी खूप जास्त शॉक होते. एक तर मी तुला मुंबई ला बोलवले, आवडत्या ठिकाणी नेले माझ्या डोक्यात फार वेगळे प्लॅन होते आणि ते सोडून काहीतरी भलतेच झाले."
"अग एवढा विचार करू नकोस, हे काही तू केलं नाही की तू इतका विचार करावा."
"तसे नाही सारंग पण तू मुंबईला आला, काही झालं असते तुला इथे आल्यावर तर."
"चला एवढी काळजी बघून छान वाटले, पण एक लक्षात ठेव की अशी दोन चार लोक येऊन मला काही करू शकणार नाहीत तेवढा मी सक्षम आहे."
"सारंग मला फक्त 5 मिनिटे दे,मी फ्रेश होऊन येते,  मग आपण वरती फूड कोर्ट ला जाऊयात आणि मग ठरवूयात काय जेवायचे  ते."
"टेक युअर टाइम" असे म्हणून तो आत गेला आणि तिचे होईस्तोवर एस्केलेटर जवळ थांबला.
जशी ती आली तसे दोघे जण फूड कोर्ट ला गेले
"सारंग मी सँडविच आणले होते, तू ते पण नाही खाल्ले.
तू सकाळी ब्रेकफास्ट केला की नाही माहीत नाही ऑलरेडी दोन  वाजत आले आहेत, मला वाटते आपण आता जेवायलाच बसू."
"ओके मॅडम " तो हसत म्हणाला.
"तुला काय खायला आवडेल"
"तू सांग, इथे खूप सारे रेस्टॉरंट आहेत आणि तुला माहिती असेल की इथे काय चांगले  मिळते"
"मला ना आत्ता यावेळी छानशी प्युयर व्हेज थाळी खायला आवडेल."
"मला सुद्धा" असे म्हणून ते दोघे तिथल्या महाराजा भोग थाळी रेस्टॉरंटमध्ये  गेले.
महाराजा भोग ला भली मोठी थाळी होती ज्या थाळी मध्ये अनेक प्रकारचे स्वीट आणि इतर पदार्थ होते.
थाळी खाण्याच्या वेळीस मात्र मृणालिनी चा मूड नॉर्मल झाला.
सारंग ने तिला एकदाही त्या घटनेची आठवण करून दिली नाही आणि तिने परत नॉर्मल  बोलायला सुरुवात केली.
तिच्या मैत्रिणीबद्दल, मुंबईतल्या घराबद्दल ती बोलत होती
आम्ही या मॉल मध्ये आल्यावर कायकाय करतो हे सांगत होती. तिचे सतत काहीतरी सांगणं सुरू होत अणि हा शांतपणे ऐकत होता.
जसे जेवण सुरू झालं तसे सारंग ने विषय काढला,
"माझा प्रश्न अर्धाच राहिला"
"कोणता?"
"पुण्यात यायला तू तयार आहेस का?"
" सारंग दरवेळी भेटीमध्ये मला या गोष्टीची जाणीव होते की मी तुझ्याकडून नवीन गोष्टी शिकतेय, अनुभवतेय.
तू प्रचंड मॅच्युअर्ड आहेस आणि ही गोष्ट मला प्रचंड आवडली आहे.   दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप कन्ट्रोल व्यक्ती आहेस तुझ्या मध्ये कुठेही आततायीपणा नाही आणि त्यातूनही सगळ्या प्रकारचे गट्स तुझ्यात आहेत.
फुल हिंदी सिनेमासारखा ड्रॅमॅटिक शॉट झाला मगाशी पण तोही तू सहजतेनं घेतला न स्वतःबद्दल बढाई केलीस न त्याची आठवण काढून दिलीस, खरंच you are a Gem of person."
तो मस्त हसला आणि म्हणाला
"धन्यवाद या माझ्या गोष्टी नव्याने सांगितल्याबद्दल
पण  मेन मुद्दा मागेच राहतोय, पुण्याला येण्याबद्दल काय ठरलाय?"
"पुण्याला यायचं न,  ते पण ठरलंय!"
"काय?"
"पुण्याला मी ! जाताना सांगेन."
"अच्छा अजून वेळ हवाय! "
ती फक्त हसली.
जेवणामध्ये मुगाचा शिरा होता आणि ड्रायफ्रुट जिलबी होती.
सारंग ला प्रचंड गोड आवडायचे आणि मृणालिनी ला गोड कमी आवडायचे पण तिने आज सारंग करता जिलेबी आणि शिरा भरपूर खाल्ला.
जेवण अप्रतिमच होते. वेगवेगळे पदार्थ, त्यांनी एकमेकांना अगदी आग्रह करून करून खायला घातले.
दोन ला जेवायला बसलेले ते 3.30 वाजेपर्यंत तिथेच होते.
त्यांच्या गप्पा त्यांच्या चर्चा या सतत वेगवेगळ्या विषयावर चालू होत्या.
जस जेवण झालं ती म्हणाली" तुला माहितीय मला आज माझा एक बेस्टफ्रेंड मिळाला!"
त्याने विचारलं "कोण?"
"त्याचे नाव आहे सारंग!"
"अच्छा! म्हणजे मी खास पण आहे आणि बेस्टफ्रेंड पण आहे का?"
"येस! You are my best friend! आणि तो आत्ता झालास असे  नाही तर प्रत्येक सहवासातून तू बेस्टफ्रेंड च भासलास.
तुझ्याबरोबर मी खूप कम्फर्टेबल आहे सारंग!
प्रचंड आणि प्रचंड हॅपी आहे तुझ्या बरोबर असताना.
आतून जो मला हॅपी फील येतो  आहे, तो खूप सुरक्षित पणाचा  आहे. आतून मी जशी आहे तशीच तुझ्या बरोबर आहे आणि ही सगळ्यात छान गोष्ट आहे."
" तुला एक विचारू?"
"हो विचार ना! "
" तुला माझ्या बरोबर असताना काय वाटत?"
"खूप आनंदी , उत्साही आणि lively वाटते"
त्याने smile दिली.
"तुला काय वाटते सारंग?"
"मलाही तेच वाटते! मलाही खूप आनंदी वाटते तू आजूबाजूला असली की, तुझ्यातली अल्लड मुलगी ना मला एकदम आणि एकदम भावते आणि ती मला तुझ्याशी परत परत भेण्यासाठी सांगते. "
"येस! म्हणजे तू परत भेटणार आहेस तर."
"ते तुझ्या आज पुण्याला येणार की नाही या उत्तरावर अवलंबून आहे."
ती मस्त हसली " सारंग थोडीशी विंडो शॉपिंग करायची?"
"विंडो कशाला ऍक्चुयल शॉपिंग करू!"
"नाही विंडोच ! कशाला उगाच मॉल मधून घ्यायचे.
तुला माहीती आहे का,  मला मॉल मधून घेण्यापेक्षा , बांद्रा ला लिंकिंग रोड ला किंवा चर्च गेट ला फॅशन स्ट्रीट ला शॉपिंग करायला आवडते. "
"ओह छान! आमच्या पुण्याच्या फॅशन स्ट्रीट ला मी जात नाही पण ऐकलं त्याबद्दल."
" मग तू कुठून खरेदी करतो?"
"मी लक्ष्मी रोड किंवा कधी कॅम्प मधून."
" ए तू ज्या एरिया मध्ये राहतो वानवडीला तिथून तुला पुणे स्टेशन जवळ आहे का?"
"तू कॅब करून आली होतीस ना तुला आठवत नाही का? का एकदम असे?"
"नाही मी विचारले जस्ट."
"का विचारले ते तर सांग?"
"मी विचारलं यासाठी की तूला सारखे मुंबईला यायचं असेल मला भेटायला तर तुला गाडीने येणे चांगलं की ट्रेन ने?"
"ऑफकोर्स डेक्कन क्वीन! डेक्कन क्वीन ने जाणे आणि येणे हा सगळ्यात छान भाग!"
"पण आज तर तुझी डेक्कन क्वीन गेली ना"
"आज तुझ्या साठी मी जाऊ दिली" त्याने हसत सांगितले.
तिने लाजत मान वळवली.
मॉल मध्ये तीनही चारही फ्लोअर ला ते छानपैकी एक एक शॉप हिंडत होते, कुठल्याच शॉप मध्ये शिरत नव्हते फक्त एकमेकांशी बोलत होते. एकमेकांशी किती बोलू आणि किती नाही असे त्यांचे  झाले होते.
शेवटी संध्याकाळचे 5 वाजले तो म्हणाला " मॅडम कुठेतरी बसून कॉफी घेऊयात का? मग थोड्या काही गोष्टी बोलू."
ते दोघे जण  तिथल्याच एका छानशा रेस्टॉरंटमध्ये गेले आणि कॉफी ऑर्डर केली
"पुण्याचा दिवस छान होता आजच्यापेक्षा " असे ती म्हणाली.
"अग नाही ग, आजचा पण दिवस छानच होता, पण आज बोललं पाहिजे. आपण जे बोलतोय ते सगळं इतर गोष्ट बोलतोय.
जे आपल्याला बोललं पाहिजे ते बोलले तर पाहिजे."
" हो बोललो तर पाहिजे! "
"काय वाटत तुला ? काय ठरवलेस तू?"
"सारंग तुला खर सांगू?"
"हो मला खरंच ऐकायचं आहे."
"मला तू आवडलास!मनापासून आवडलास! खूप आवडलास!"
त्याच्या चेहऱ्यावरती एक छानशी smile आली."
"तुला मी आवडले हे तर तू कळवले आहेच आहे.
आता राहिला प्रश्न तिथे जॉब करायचं किंवा काय ?"
"अच्छा म्हणजे तू पुण्याला यायला आता तयार आहेस? "
"आता तू पुण्याला आहेस म्हणल्यावरती मला तिथे तर यावं लागणारच ना! त्याशिवाय कसं होणार.
पण काही गोष्टींकरता मला आई आणि बाबां बरोबर पण बोलावे लागेल.
"हो नक्कीच! तुझ्या आईबाबांना आणि माझ्या आईबाबां ना पण भेटणे गरजेचं आहे पण काही गोष्टी ठरवता आल्या पाहिजे."
"तू देण्याघेण्याचं बोलतोय का?"
"नाही ग!  देणंघेणं असे काही नसतं. आम्हाला मुलगी आणि नारळ मिळाले तरी खूप आहे.
मुलीनी पुण्यात यायची तयारी फक्त ठेवली पाहिजे."
ती अजून हसली" तुझे लग्नाच्या बाबतीत काय म्हणणं आहे?"
"म्हणजे?"
"तुला ट्रॅडिशनल वे ने करायचं आहे की रजिस्टर मॅरेज?"
"मला या गोष्टीबद्दल मी असे काही अजून ठरवलं नाही. पण तुला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे."
"सारंग मला विधी झालेल्या फार महत्वाच्या आहेत, मला विधीयुक्त लग्न करायचं आहे."
"ठीक आहे काही हरकत नाही पण जास्त फाफट पसारा पण नको."
"ठीक आहे, तुमचे काही आणि आमचे काही लोक असे."
"ओके आणि?"
"लग्न छान असले पाहीजे आणि त्यात जेवण खूप मस्त. सगळ्यांनी जेवणाची आठवण कायम काढली पाहिजे."
"ओके चालेल पण लग्न करायचं कुठे?"
"ऑफ़कोर्स मुंबई?"
"का पुण्याला का नाही?"
"असे कसे सारंग तू आमच्याकडे वरात घेऊन यायचे ना, आमच्या  मुंबईला."
"हो का?  मला असे वाटलं की तू पुण्याला येणारच आहेस त्या निमित्ताने तू पुण्याला लग्न पण करू शकतेस."
"काही पण हां तुझं! "
"नाही मी खरंच विचारतोय, पुण्यात मस्त कार्यालय आहेत."
"हो का मुंबईत पण आहेत."
"पण मुंबईत की पुण्यात हे आपण नंतर ठरवूयात
पण करायचं हे तर नक्की ना?"
ती लाजून खाली बघून हळूच आणि हळूच "हो " म्हणाली.
"काय करायचं?"
"लग्न!"
"कुणाशी?"
"ऑफकोर्स तुझ्याशी सारंग!" ती डोळे दटावून म्हणाली.
"हो बोल ना मग जरा सौम्य डोळे करून".
ती नुसतीच हसली.
"मुंबईची कॉफी पण छान असते बरं का सारंग"
"तुला हो म्हणायचे नाही आहे बहुतेक"
"अरे असं नाही हां..."
"मग तुला पुण्यात यायचे नाही बहुतेक"
"असे तर अजिबातच नाही...."
"चला,  माझी पुण्याला निघण्याची वेळ झाली..."
"काय एवढ्या लवकर...? आत्ता कुठे 6 वाजत आलेत फक्त"
"मॅडम तुम्ही पण याच वेळेला ट्रेन ने परत गेल्या होत्या ना..आणि माझी तर ट्रेन पण तुम्ही घालवली.."
"हो पण तू उशिरा जाऊ शकतोस की.."
"आता मला बोरिवलीवरून वोल्वो पकडावी लागेल...आत्ता निघालो की 7 ची गाडी मिळेल"
"त्यापेक्षा असे करूयात, तू दादर वरून वोल्वो पकड, मी तिथपर्यंत तुला सोडायला येते"
"अग तुला उलटे नाही पडणार का?"
"नाही"
"ठीक आहे..."
"चल मग जाता जाता बोलूयात...."
तिने गाडी पार्किंग मधून बाहेर काढली आणि त्याला घेऊन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला गाडी शिरली.
थोडे पुढे गेल्यावर तिने एका टॉवर कडे बोट दाखवले आणि म्हणाली की, "हे गोरेगाव वेस्टिन हॉटेल आहे. पुढच्या वेळेस तू आलास की मी तुला इथे घेऊन जाणार आहे जेवायला"
"छान दिसतंय की ग"
"टॉप क्लास"
तो हसला आणि ती पण.
ती आता त्याला मुंबई दर्शन करत होती. "हा इंटरनॅशनल एअरपोर्ट, हा डोमेस्टिक चा रस्ता, हे सहारा स्टार हॉटेल, हा रोड जुहू ला जातो, इथून बांद्रा रेक्लेमेशन आणि पुढे सी लिंक"
तिचा उत्साह पाहून तो पहिल्यांदा पहात असल्यासारखे दाखवत होता. पण तिला हे माहिती नव्हते की यातली प्रत्येक गोष्ट त्याला माहिती होती.
सायन ला आल्यावर त्याने सांगितले की इथेच थांब, इथून मला शिवनेरी मिळेल आणि मी जाईन म्हणजे तुला दादर पर्यंत उलट वळसा नको.
ती जस्ट ओके म्हणाली.
तेवढ्यात एक वोल्वो येताना दिसली आणि तो म्हणाला, "चल माझी गाडी आली, मी निघतो"
"सारंग...."
"हां..."
"एक बोलू...."
"बोल ना..."
"तुझी गाडी यायच्या आत मला तुला सांगायचे आहे की..."
"काय..."
"हेच की सारंग, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे."
तो फक्त तिच्याकडे अनिमिष पहात होता.
वोल्वो मध्ये चढल्यावर सुद्धा त्याला कंडक्टर ने काहीतरी विचारले....त्याला काहीच कळले नाही...
कंडक्टर परत काहीतरी बोलला त्याला मात्र एकच वाक्य कानात ऐकू येत होते...."सारंग मी तुझ्याशी लग्न तयार करायला तयार आहे.."

क्रमशः
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!