तू मुक्त हो राणी

Its a life face it

 "आई ,ही आजी किती वाईट आहे गं.... सतत तुझ्याविषयी काही तरी बोलत राहते.वाईट शब्द बोलत राहते ,मला पण ओरडत राहते..कधीच जवळ घेत नाही...नेहमी मारतच असते मला.. बाबा पण खूप वाईट आहे ,ते पण मला कधीच जवळ घेत नाही..दुसऱ्यांचे बाबा किती छान आहेत ,ते किती लाड करतात,बाहेर फिरायला घेऊन जातात मुलांना,खाऊ देतात, मग माझे बाबा असे कसे????...आई तुच मला शिकवते ना???कोणी त्रास देत असेल तर सहन करायचा नाही, मग तू का गप्प बसते???मला इकडे अजिबात आवडत नाही राहायला, जाऊया ना आपण आपल्या त्या आजीकडे, ती किती छान आहे ना ??माझे किती लाड करते ...मला तुझ्याबरोबर खेळायला भेटते तिथे,इथे तर तू दिवसभर कामात असते ..माझ्या डोलबरोबर खेळुन मी वैतागते....चल ना आई ,  खरंच जाऊ आपण.......

शलाकाची पाच वर्षाची मुलगी तन्वी  हे सर्व बोलत  होती,शलाका स्तब्ध होऊन ऐकत होती.....आज पहिल्यांदा तन्वी असं बोलली..तन्वी लहान जरी असली तरी,घरातल्या वातावरणाचा तिच्यावर खुप प्रभाव पडत चालला होता...खोलवर मनात, आताच तिच्या रुजलं होतं की खरच माझ्या आईला किती त्रास मग ती का राहते....ती का अन्याय सहन करते...?

शलाका जणु सहन करायला शिकली होती, आज ना उद्या हा जाच थांबेल.. उठसुठ माहेरच्यांचा उद्धार,  तिला मुलगी झाली म्हणुन नाराजी,सतत काही तरी तिच्यापाठी कुरबुर..नवऱ्याकडून ती अपेक्षा करत होती की,तो तरी तिला समजुन घेईल पण तोही ,तू मला शोभत नाही,तुला धड जेवन बनवता येत नाही...तुला अक्कल नाही...माझी आई बोलेल तसेच राहायचे... तिच्या परवानगी शिवाय बाहेर जायचं नाही... शलाका ला माहेरी जायचीसुद्धा मुभा न्हवती, गेली तरी तिने त्याच दिवशी परत यायचे... ती सहन करत होती,आईला त्रास नको...एकटी आई राहात होती...वडील तर वर्ष झाले देवाघरी गेले होते....

मनात कधी कधी यायचं ,सोडून द्यावा संसार ...पण मग आईचा चेहरा आठवायचा...तिला त्रास होईल आधीच आजारी असते, आणि मुलीला वडिलांचं छत्र हवं, म्हणुन ती  मनात किती जरी इच्छा असली तरी ते धाडस करतच न्हवती...हेच कारण होते ती निभावत होती अश्या माणसासोबत संसार ज्याच्यासाठी  ती असुन नसल्यासारखी होती.घरात खर्च करायलापण मोजुन मापून पैसे देत होता... कसं तरी जगायचे म्हणुन जगत  होती, ही कासावीस तिच्या मुलीला तन्वीला कळत होती,तिलाही पण ती अगदी लाचार झाल्यासारखी झाली होती.....

आलेला प्रत्येक दिवस देवाचं नाव घेऊन काढत होती.... आज ना उद्या सर्व व्यवस्थित होईल,ह्या आशेवर जगत होती..लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा सतत बाहेर फिरत राहायचा....नियमसुद्धा पाळत न्हवता...

तन्वी लहान होती, तिची काळजी तिला वाटत होती, म्हणुन शलाका त्याला न राहून बोलली "तुम्ही बाहेर जाताना मास्क लावा,आल्यावर अंघोळ करत जावा,तन्वी लहान आहे ना तिला नको त्रास व्हायला काही" तिच्या नवऱ्याला खुप  राग आला,त्याने तिला माझ्या घरात तू शिकवणारी मला कोण..तुझ्या मुलीची काळजी तू घेत बस मला शाळा नको शिकवू......बेअक्कल बाई......

न जाने का,पण शलाकाला प्रचंड राग आला...तिने सरळ बॅग भरली आणि मुलीला घेऊन आईकडे आली ते नेहमीसाठी... अत्याचार शलाकापर्यंत होता तोपर्यंत तिने सहन केला,पण त्याला मुलीचीही काळजी नाही..मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं म्ह्णून ती एवढ्या दिवस तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करत होती, पण आता मुलीचीसुद्धा हेळसांड होत आहे हे समजल्यावर तिला तोच निर्णय योग्य वाटला....


तिने चांगला वकील बघुन त्याला घटस्फोट दिला... शिक्षीत होतीच ,तिने नोकरी करायला सुरू केली..थोड्या दिवस भूतकाळातल्या जखमा त्रास देत होत्या ,पण तिच्यातली आई फार कणखर झाली होती, निगरगट्ट झाली होती...संसाराच्या पलीकडेही स्वतःच वेगळे अस्तित्व होते हे विसरून गेली होती, तिच्यातल्या आईने,तिला जाणीव करून दिली "तुला अधिकार आहे स्वतंत्रपणे जगण्याचा, तुझ्यावर अन्याय होत असल्यास त्यातुन मुक्त होण्याचा,नको अडकुस अश्या बंधनात जिथे तुझा स्वाभिमान पायदळी तुडवला जाईल ,येईल पंखामध्ये उडण्याची ताकद फक्त पिंजऱ्यातुन मुक्त हो ,तू मुक्त हो"......


अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास लाईक ,शेअर ,कंमेंट करा......
साहित्यचोरी हा गुन्हा आहे......