Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तु मला मी तुला भाग १२

Read Later
तु मला मी तुला भाग १२

कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग १२

अदिती आणि वैभवच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती. मुलाकडचे म्हणून त्यांच्या फारशा काही अपेक्षा नव्हत्या, त्यामुळे अदितीच्या लग्नाचं काडीचही दडपण वसंतराव आणि सुमनताईंना नव्हतं. सगळच सुखासुखी पार पडतं होतं...

शहरातली मुलगी, म्हणून तिच्याही लग्नाच्या काही अपेक्षा असतीलच ना!! वैभवची आई, मामी तिच्याशी बोलून, तू करं बाई तुझ्या मनासारखं वारंवार फोन करुन सांगत होत्या.

अदितीच्या आवडीनिवडी लक्षात घेवून, त्या पूर्णत्वास उतरवण्याचा प्रयत्न रिया आणि रियाची आई आपल्या परीने करतच होती. वैभवच्या आईने ती सगशी जबाबदारी रियाच्या आईवरच टाकली होती.

रिया होतीच मदतीला, प्रत्येक गोष्ट गोडजोडीच्या मताप्रमाणे होतं होती... वैभव, अदितीच्या मर्जीराखून सगळं करत होता.

शॉपिंग असो की अजून काही, लग्नाचा अवाजवी खर्च टाळण्याचा मात्र दोघे ही पुरेपुर प्रयत्न करत होते.

लग्न एकदाच होतं, बाई वं तुले काय तो आजकाल लाछा का काय ते घेतात तो घ्यायचा असन तर घे बरं.. मामींच्या बोलण्यावर अदितीने हलकेच मान डोलावली.. पण ताईच्या लग्नात तिने घेतलेला ते महागडा लाछा आजवर घालण्यात आला नव्हता.. तसाच पडला होता त्यापेक्षा साड्या नाही का ब-या, म्हणत तिने सुंदर साड्याच घ्यायचं ठरवलं. विनाकारण कपड्यांवर हजारो रुपये खर्च करायचं तीने टाळलं होतं..

आमच्या कडचे लोकं, गावखेड्यातले.. त्यांच रहनसहन खाणपाण जरा वेगळं. तेवढं सांभाळून घ्या म्हणजे झालं, वैभवच्या बाबांनी लग्न पत्रिका देत काळजी व्यक्त केली. वातावरणाचा फरक, आपआपल्यात समृद्धपणा जपतो, वसंतरावांनी आश्वस्त केलं आणि वैभवच्या बाबांच टेंशनच हलकं झालं.


विनितला ही सोयरिक मुळीच आवडली नव्हती. पण अदू हे एक बरं झालं बरं का.. एक हॉट हँन्डसम, थोडक्यात बचावला म्हणायचा, म्हणत विनितने अदितीची खिल्ली उडवली होती. दोघांची भेट झाल्यावर मात्र, वैभवने ही विनितच्या मनात घर केलं होतं.

आस्थाचे दिवस भरत आलेच होते.. चवथ्या महिण्यात, सोनोग्राफिच्या वेळी, आस्थाच्या सासूबाईंनी मुलगा की मुलगी, डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अगदी साधे आणि साळसुदपणे विचारल्याचा आव त्यांनी आणला, आणि त्यावर डॉक्टरांनी पाजलेला डोज न विसरता येणारा होता.

डॉक्टर खूप रागावले होते, म्हणाले तुम्हाला पोटातलं बाळ म्हणजे काय, वस्तू वाटते का काय? हा म्हणजे छान ती म्हणजे वाईट म्हणायला.. गर्भलिंगपरीक्षण गुन्हा आहे, तरी तोंड उस्कटून तुमच्यासारखी लोक येतातच आम्हाला विचारायला.

शिकली सवरली आहात की गावंढळ... शोभतं का तुम्हाला
डॉक्टरांनी त्यांना रागावून रुममधुन बाहेर काढलं होतं. सुन म्हणजे काय घराण्याला वंश देणारी वस्तू वाटते की काय तुम्हाला, खबरदार आहे, माझ्या पेशंटला ह्यावरुन जज केलं तर, आस्थाला ह्यावरुन तुम्ही काही बोललात आणि मला हे कळलं, तर ती काय मीच तुमच्यावर गुन्हा दाखल करेन.

अहो कोणत्या जगात राहाता तुम्ही, मुलगा मुलगी भेद राह्यलाय का आता, मुली ही कुठल्या कुठे पोहचल्या, महत्वाचं म्हणजे ते पोटातलं बाळ, आपल्या रक्तामासाचं आहे ते महत्वाचं नाही का? तिथेच बसलेल्या विनितची ही डॉक्टरांनी चांगलीच कानउघाडणी केली.

कुणी काहीही म्हणू देत, मुलगा असो की मुलगी आपल्याच रक्तामासाचा गोळा.. मग भेदभाव तो कशाचा.. समोर बसलेला विनित, गप्प बसून ऐकत होता. हळूहळू त्याच ही मतपरिवर्तन होवू लागलं होतं. आजकालच खर्च लक्षात घेता, एकूलतं एक बाळ जास्ती बरं.. मग ते बाळ बेबी बॉय असावं, ह्या मताला त्याने छेद दिला. पोटातलं बाळ मुलगा की मुलगी ह्याने त्याला फरक पडत नव्हता.

थोड्याच दिवसात आस्थाला मुलगी झाली, नाराज असलेल्या आस्थाच्या सासूने ही बाळाची, "माझ्या घरची लक्ष्मी" म्हणत छान स्वागत केलं. उलट आत्ता विनितचं बाळाचा खूप लाड करत होता. विनितने आस्थाची ह्या दिवसात खूप काळजी घेतली होती. बाळ आलं आणि दोघांच्या आयुष्याला सुंदर आकारच मिळाला होता.

आस्थाचं बाळ पाच महिण्याच झालं तोच अदिती आणि वैभवचं लग्न झालं. फार काही अपेक्षा वरपक्षाकडून नसल्या तरी, अदितीच्या आईबाबांनी, आपल्या परीने मानपानात,काहीच कमी ठेवलं नव्हतं.

"मेरा भैया राजा भैया दुल्हा बनके आ गया, मेरा राजा भैया".. म्हणत रिया वरातीत नाचली, तशी अदितीची करवली म्हणून तिची साथ ही निभावली.

अदितीसारखी सुन मिळाल्याचा, मुळात आपल्या लेकाला त्याच्या पसंतीचा जोडीदार कुठलीही तडजोड न करता मिळाल्याचा आनंद वैभवच्या आईवडिलांच्या चेह-यावर स्पष्टच दिसत होता.

लग्नाच्या वेळी, भाऊ ह्या नात्याने मंदारने वैभवचा चांगला कान पिळून काढला. माझ्या अदिताताईला नेहमी सुखी ठेवण्याचं जणू वचनचं मागून घेतलं होतं त्याने. फुलांच्या पायघड्या घालून म़नव्या नवरीचं स्वागत मामींनी केलं होतं.

मज्जा मस्तीत लग्नाचा आठवडा कसा संपला कळलं देखिल नव्हतं.

लग्नानंतर, हट्टाने मामा मामी आणि रियाने अदिती आणि वैभवला छान शिमला कुल्लू मनाली ला फिरायला पाठवलं. आणि वैभावादितीचा सुखी संसार सुरु झाला.


अदिती, बाळा.. तु तुला सहज हाताळता येतील असे कपडे घातले तरी चालतील बरं का, साड्याच नेसल्या पाहीजे तसा काही अट्टाहास नाही. काळ बदललाय, काळाप्रमाणे बदलायलाच हवं. आम्ही नेसल्या बाई साड्या पण तुझ्यावर तशी काही जोरजबरदस्ती नाही.. तु ड्रेसच घाल.. मामींनी विश्वास दिला.

अदितीने तिची नोकरी सोडली नव्हतीच, पाच दिवस शहरात माहेरी राहून आपली नोकरी सांभाळणारी अदिती तेवढ्यात उत्साहात, प्रत्येक विकए्डला आपल्या सासरी जावून तिथली जबाबदारी पेलण्यासाठी हजर होतं होती. कधिकाळी तर अपडाऊन ही करत होती.

दरम्यान रियाचं ही लग्न झालं.. अदिती वैभवने, भाऊ वहिणी म्हणून सगळे सोपस्कार निभावले, लग्नात छान मिरवून घेतलं.

गावखेडी, सुखसुविधांपासुन वंचित राहू नये म्हणून अदीती प्रयत्नशिल होती., ज्या गोष्टी शहरात सहज शक्य होतात, त्या गोष्टी खेडेगावात सहज उपलब्ध होताना दिसत नाही, त्यासाठी झगडावचं लागतं, अदितीच्या लक्षात आलं.

गावातल्या शाळेत,अवतीभोवतीच्या परिसरातल्या शाळांमध्ये, वाढत्या वयाच्या मुलींसाठी सँनिटरी पँडची मशिन तीने लावण्याचा अट्टाहासच घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्णत्वास नेला.

स्त्रीजीवनातले ते चार दिवस म्हणजे, विटाळ नसुन तो स्त्रीच्या जीवनातला \"सुकाळ\" आहे हे पटवून देण्यासाठीची तीची धडपड साध्य होताना दिसत होती. सनसमारंभाच्या वेळी दडपणात राहाणा-या बायकांनी आता दडपण विसरुन निसर्ग नियमाशी जणू हातच मिळवणी केली होती.

नशिब अजमवायला गावातील मुल गावाबाहेर गेली, आणि थकलेल्या वयोवृद्ध आईवडिलांच्या वाट्याला एकटेपण आलं, हे एकटेपण अगतिक करणारं होत.

घराच्या पडवीत,घरातल्या जून्या जिर्ण कपड्यांच्या गोधड्या, बनवून आपला वेळ कसाबसा दवडू बघणा-या आजीला गोधडी शिवताना बघितलं आणि अदितीने ह्याच गोधडीला कलात्मक रुप द्यायचं ठरवलं.

आत्ता गावातल्या बाया, वेळ मिळेल तशा, गोधड्या शिवू लागल्या. थकल्या, भागल्या, वयोवृद्ध आणि स्व अस्तित्व विसरलेल्या लोकांना उपजिविकेचे साथन उपलब्ध झालं होतं.

शहरात एक्झिबिशनमध्ये आजीची गोधडी गाजली आणि गोधडीला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न सुरु झाला, आता ह्या गावातल्या गोधड्या देशविदेशातच जावू लागल्या. गोधड्यांची मागणी चांगलीच वाढली.

वैभव करवी ही अतिउत्तम असे प्रकल्प राबवले जात होतेच. महागड्या एल पी जी गँस सिलेंडरच्या जागी, घरच्या घरी शेणापासुन, गोबर गँसची निर्मिती, गृहिणींना दिलेला दिलासा कौतुकास्पद होता.

गांडुळ खत प्रकल्प असो की घरगुती वस्तूंपासुन कंपोस्ट बनवण्याच्या पद्धती... शेती भरपूर होतीच. फळभाज्या, फळांच्या बागा, फुलांची शेती, बरेबरच, सोबतीला औषधी वनस्पतींची शेती करण्याचा निर्णय वैभवने घेतला. आवळा, ब्राम्ही, शतावरी, बेहडा, हिरडा, अश्वगंधा अशी नाव ही न ऐकलेली औषधी वनस्पतींची लागवड करुन, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड आणि नर्सरीतून ह्या झाडीवेलींची विक्री वैभवने सुरु केली.

निसर्गरम्य वातावरणाचा भुकेला शहरी माणुस, धकाधकीच्या जीवनातले दोन निवांत क्षण त्याच्या जीवनात स्फूर्ती आणतात.. ह्याच विचाराने अदितीच्या डोक्यात एक सुंदर संकल्पना आली आणि आपल्या मोकळ्या पडीक जमिनिवर, त्यांनी रिसॉर्ट योजना राबवण्याचं ठरवलं.

"वैभवादिती" रिसॉर्ट.. मध्ये, शहरातल्या यंगस्टर्स पासुन सर्वचं जनरेशनच्या लोकांचे weekend आता मोठ्या जोमाने सेलिब्रेट होवू लागले. बायकांच्या दोन दिवसाच्या पिकनिक, किटिपार्टीजना रिसॉर्टची मागणी वाढली.

लग्नाला चार वर्ष झाली. व्याप वाढला होता, सुरु केलेल्या मिर्च मसाला गृहउद्योगाला ही व्यापक स्वरुप आलं होतं.

यशस्वी उद्योजिका म्हणून अदितीला पुरस्कार मिळाला.. तिने आपल्या विचारांना पंख देण्याचा विचार सुरु केला
तिला नोकरी सोडावी लागणार होती, हसत हसत तिने नोकरी ही सोडली.

वसंतराव आणि सुमनताईंची जबाबदारी स्वत: वैभवने घे
उचलली. गरजेच्या वेळी वैभव तिकडे जातीने तिने हजर राहात होता.

वसंतराव आणि सुमनताईंना अनेकदा, गावाकडे बोलवून घेेई, त्यांचा ही बराचसा वेळ आता, गावाकडे जायचा. शहरापासुन दूर,शांत वातावरणात रहायला, त्यांनाही आवडू लागलं होतं. गावखेड्यात आपलं ही एखाद छोटसं टुमदार घर असावं हे स्वप्न, त्यांनी लवकरचं पूर्ण केलं...

लग्नाला पाच वर्ष झाली आणि अदितीला बाळाची चाहूल लागली.

आज, कृषीक्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना म्हणजे वैभव आणि अदिती देवळे ह्यांना सन्मानित करण्यात आलं होत. प्रगतिशील शेतकरी म्हणून मिळालेला सन्मान, घेतलेल्या उंच झेपेची ग्वाही होती.

कृषी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, अदितीचं आर्टिकल पेपरमध्ये छापून आल्यापासुन, आठवड्याचा एक दिवस ठरवून,न्यूजपेपरच्या संपादक टिमने, अदितीज कॉर्नर, पेपरचा एक कप्पा, अदितीकडे सोपवला.

आगत स्वागत आणि सन्मान कार्यक्रम छान पीर पडला होता. सन्मान घेवून गावाकडे दोघे ही निघाले, गेल्या पाच वर्षातल्या कडू गोड आठवणींना उजाळा मिळाला, डोंगर क-या कपा-या माळराणावर आल्हाददायक वातावरण होतेच साक्षीला.

गावात पोहचतात, वाट बघत असलेल्या वैभवच्या आईने, दोघांवरुन भाकर तुकडा ओवाळला, रियाचं आईबाबा ही सर्वांच्या पहिले गावी पोहचले होते. वैभवच्या आईने अदितीच्या पायावर पाणी घातलं, औक्षण केलं.... "तुच माझ्या घरची लक्ष्मी" म्हणत, अदितीला कुरवाळलं.. कौतुक करायला, कृतार्थ भाव घेवून हजर असलेले, रियाच्या आईबाबा डोळे भरुन हा कौतुक सोहळा बघत होते.

गाव असो की शहर, विचारांची प्रगल्भता असायला हवी. माणुस शहरात राहातो म्हणून त्याचे विचार समृद्ध असतीलच असे नाही तसेच गावात राहाणा-या लोकांचे विचार गावंढळ, जूनाट ,असतील असे नाही. कुणाला त्याच्या राहणीमान, त्याच्या दिसण्यावरुन

तु मला मी तुला म्हणत पती पत्नींनी एकमेकांना दिलेली साथ, आपलं समृद्धपण निरंतर जपतच असते, असं नात कोणत्याही परिस्थीतीत फळते आणि फुलतेच. नाही का..

वाचक मित्र मैत्रिणींनो, वेळेे अभावी कथा आवरती घेतेय त्याबद्दल क्षमस्व.. कथेला खूप प्रेम देताय त्याबद्दल खूप खूप आभार. कथामालिका लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने काही चूकभूल झाली असल्यास क्षमा करा.

टिम : भंडारा

-©®शुभांगी मस्के...ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//