तु मला नी तुला भाग ११

Sun Mhanun Nahi Ter Lek Mhanun Gheun Jau, Lekipramane Japu
कथेचे नाव : तु मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग ११

अरे, तो शेतकरी आहे, त्याला विरोध नाहीच... तिच मानसिकता खरं तर बदलायला हवीय ना, आणि महत्वाचं म्हणजे मुळात प्रश्न अदितीचा आहेे, तिला पसंत असेल तर हरकत काहीच नाही?

शहरातली माणसं माणस आणि गावखेड्यातली माणसं का माणसं नसतात का, माणुसकी जपणारी माणसं हवीत, जीवाला जीव लावणारी हवीत. बघितलचं न आपण..

काही नातंगोतं, ओळखंपाळख नसताना, वैभवं कसा ऐनवेळी अडचणीच्या वेळी धावून आला ते, आस्थाने ही वडिलांच्या बोलण्याला दुजोरा दिला.

अदिती, बाळा... अदिती.. ऐकतोय ते खरं आहे का? बाबांनी अदितीला विचारताच, अदिती बाबांच्या कुशीत शिरली, तिने त्यांना दोन्ही हातांनी कवटाळून घेतलं.

न बोलतात अदिती खूप काही बोलून गेली...

मेरी बन्नो की आयेगी बारात, की ढोल बजाओ जी
मेरी लाडो की आयेगी बारात, की ढोल बजाओ जी..

ततड...ततड...ततड...ततड, ततड..ततड...ततड, रिया अदिती ला घेवून, नाचायला लागली...

अगं अगं.. कशातच काही नाही अजून ... वाटतं तेवढं सोप्प नाही ते, वसंतरावांनी रियाला म्हटलं.

काका, माझं मन बोलतंय.. सगळं नक्की जुळून येणार.. खूप छान आहे माझा वैभव दा.. अदितीला खूप सुखात ठेवेल, फुलासारखं जपेल तो तिला, तिच्यापर्यत येणारं प्रत्येक संकट पहिले तो स्वत:वर घेईल..

आठवतयं तेव्हापासुन बघतेय.. "वैभव दा म्हणजे कोहिनुरी हिरा आहे हिरा".... बोलताना रियाला गहिवरुन आलं...

मी बघितलयं त्याच्या डोळ्यात, अदितीबद्दलचं प्रेम, माहीती आहे मला.. हॉस्पिटलमध्ये असताना, तुमच्याबद्दलची काळजी, अदितीच्या मनातली अस्वस्थता, आणि ती दूर करण्याचा त्याचा आटापिटा, मी खूप जवळून अनुभवलाय.

अदितीचा कॉल यायचा तेव्हा त्याचा खुलललेला चेहरा बघितला मी, अदिती बदद्लचं प्रेम त्याच्या शब्दाशब्दात डोकावतं. मला माहिती आहे, वैभव दा ला अदिती खूप आवडते ते..

अगं, ताई गावाला गेलो होतो तेव्हा, अदिती आणि माझा फोटो, काढला त्याने, पठ्ठ्याने क्रॉप करुन मला कटच केलं गं..ते की केलं असेल त्याने? रिया आस्थाच्या कानात कुजबुजली.

काही काय ग? तू गप्प बसं... अदिती जोरात ओरडली...


कधी एकदाची घरी जाते आणि, आईबाबांना ही बातमी सांगते असं झालंयं बघ माझं.. रिया जोरात ओरडली.

अदिती मनापासुन खूप खुश होती.. पहिल्या नजरेतलं प्रेम होतं ते... रिया चिडवायची तेव्हा, मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या तिच ग्वाही होती तिची त्याच्या वरच्या प्रेमाची..

रियाने घरी आल्याआल्या आई बाबांना ही बातमी सांगितली... सर्वांत जास्ती आनंद तर, रियाची आईला म्हणजे कविताताईंना झाला...

दादा, वहिणीला सांगतेच म्हणून, रियाच्या आईने फोन हाती घेतला.

अगं पण, रियाची मैत्रीण आहे अदिती.. आपल्या पोरीसारखीच आहे, बातमी चांगलीच आहे, वादच नाही... अदिती काय आणि रिया काय, दोघीही सारख्याच.
पण, आपण आपली शिकली सवरली आपली लेक दिली असती का, अशा गावखेड्यात अर्थात शेती करणा-याला??रियाचे बाबा बोलले.

का नाही बाबा!! मुलगा जर चांगला आहे, तर हरकत काय? मुळात प्रेम महत्वाचं नाही का?

बघा बॉ, मी नाही विषय काढणार.. वैभव चांगला आहेच, तरी सुद्धा... बाबा असं काय हो करता, करा ना फोन... प्लिज, हा प्रश्न आपल्याला नाही काका काकूंना पडायला हवा, आणि त्यांच्या प्रश्नांच आपण निरसन करायला हवं खरं तर..

रिया बोलत होती, रियाचे बाबा तिला टाळू शकलेच नाही..
बरं बरं.. पण ह्या गोष्टी फोनवर नाही व्हायच्या, जावू एक दोन दिवसात अदितीकडे, तिच्या बाबांची ही भेट होईल.. रियाने आनंदाच्या भरात उडीच मारली..

प्यारा भैया मेरा भैया.. राजा बनके आयेया
प्यारा भैया मेरा...
डिअर डार्लिंग... तू बस्स!! सज धजके तयार रहना...
रियाने अदितीला मेसेज केला...

विचार करायला सोप्प वाटतं असलं तरी, वाटतं तेवढं हे सोप्प नव्हतचं..... दोन चार दिवसांनी रियाचे आईबाबा, ठरवून वसंतरावांना, भेटायला आले.

अदितीला विचारल्या बरोबर, अदितीने गोड हसुन होकार दिला..

बाळा विचार केलायस का तू... लग्न म्हणजे फक्त दोन जिवांचेच नाही तर दोन कुटूंबाचे मिलन असते. दोन टोकाचे दोन तुम्ही.. शहर - ग्रामिण, भाषा, चालिरीती, रुढी, प्रथा, परंपरा, एवढंच नाही तर सनसमारंभ आणि वागण्या बोलण्याच्या पद्धती सुद्धा.. जमिन आसमानाचा फरक, जाणिव आहे का तुला त्याची.

सर्वतोपरी विचार करुन घे आणि मग काय ते निर्णय घे. तू शिकली सवरली, करिअर चा ध्यास असलेली, कसं काय जुळवून आणणार आहेस तू सगळं..

लग्नावरुन चर्चा रंगली, वसंतराव सर्व विचारांची बोलत होते, त्यांच्या बोलण्याला रियाच्या बाबांनी ही दुजोरा दिला.. दोघांच्याही बोलण्यात, काळजीच दिसत होती.

बाबा!! हातावर हात देत, अदितीने बाबांना आश्वस्त केलं.

रियाच्या बाबांनी, वैभव आणि त्याच्या आईवडिलांना बोलवून घेतलं.. एक दिवस निश्चित करुन, सगळे गावावरुन आले ... नाश्ता, जेवण खाण झालं तरी, विषय निघेचना...

सायंकाळी ऑफिसवरुन, रियाने अदितीला घरी बोलावलं.... ती आल्या लगेच रियाच्या बाबांनी सरळ विषयालाच हात घातला.

अदितीला अस अचानक समोर बघताच वैभवचा चेहराच खुलला.. लगान करायचयं ह्या पोरीचं, सांगा आहे का पसंत.

काय वैभव, अदिती पसंत आहे का? रियाच्या बाबांनी स्पष्टच विचारलं. खरतंर वैभवसाठी हा गोड धक्काच होता.

तो स्तब्धपणे अदितीकडे बघतच राहीला. कविताताईंनी वैभवच्या आई आणि बाबांना थोडी जुजबी माहीती पुरवलीच होती.. आणि त्या आधारावर आजकाल वैभवचं वागणं कसं बदललयं, ह्यावरुन ही त्यांच्यात चर्चा रंगत होती.


माय बाप आहोत आम्ही तुमचे.. तुम्ही सांगितलं नाही म्हणून कळणार नाही वाटलं की काय तुम्हाला.. मामांनी वैभवच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.

एवढ्यात पाह्यतो, ना खाण्यात लक्ष ना कशात...आपल्यातच राह्यचे.. कायचा तरी नुसता इचार करत राह्यते.. वैभवची आई बोलली..

बरं झालं कविताबाई, तुम्ही सांगितलं... नाहीतर चिंतेनं मले पार पोखरलं असतं बरं..

पोरगी पसंतीचा प्रस्नच नाही, आमची एवढी पोच च नाही.. कोणाच्या पोरीत कमतरता काढाची.

आमची हरकत काहीच नाही, आमचं पाह्यलं खेडेगावं.. पोरगी कशी राहीन म्हणतो मी... दोघायनं एकमेकांले पसंत केल, इचार केलाच असन म्हणा... वैभवची आई बोलली.

वैभव जसा आहे, तसा त्याच्यावर प्रेम केलय.. त्याने बदलावं ही माझी अपेक्षा मुळीच नाही. आणि मी आहे तशीच त्याने मला स्विकारावं ही माझी अपेक्षा मात्र मक्कीचं असेन.

अगं पण बाळा, तुझं करिअर.. रियाचे बाबा बोलले.मी करेन ते मँनेज बरोबर.... वैभवची आणि मामा मामांची साथ हवीय फक्त, अदितीचा मनमोकळेपणा मामींच मन जिंकून गेला..

बघण्याच्या कार्यक्रमातला कुठलाचं सोपस्कार नव्हता, होता तो फक्त, मनमोकळा संवाद... गप्पा गोष्टी झाल्या, वसंतराव तर येवू शकलेच नसते, नंतर सगळेच अदितीच्या घरी आले.

अदितीच्या बाबांच्या प्रकृतीची सर्वांनी पहिले चौकशी केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

वैभव आणि अदिती दोघांना ही समोर बसवण्यात आलं.. लग्न म्हणजे तडजोड, असं मला वाटतं.. पण त्या तडजोडीला ही मर्यादा असाव्यात ह्याची जाणीव मला माझ्या पहिल्या मुलीच्या म्हणजे आस्थाच्या लग्नानंतर प्रकर्षाने जाणवली..

आपल्या ह्या मुलीला कुठलीच तडजोड करावी लागू नये, ह्याचाच विचार मी करत होतो.. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलयं मी तिला.. माझा जीव वसतो माझ्या मुलींमध्ये... वसंतरावांनी सर्वांसमोर हात जोडले..

एका बापाचं काळीज, लेकीच्या सुखासाठी कसं धडपडतं असतं, ह्याची जाणिव झाली.

अहो साहेब.. हात नका जोडू, आम्हाला ही मुलगी आहे.. मामा रियाकडे बघत बोलले.

सुन नाही तर लेक म्हणून घेवून जावू आम्ही... तिला लेकीप्रमाणे सांभाळू, जपू..

अदितीच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहात होता.. रियाच्या वैभववरुन चिडवल्यानंतर आतल्या आत गुदगुल्या का होत होत्या, ह्याच कारण अदितीला उमगलं.

आम्हाला आम्ही आहोत तसं स्विकारण तसं सोप्प नाही. लेकाला उच्चशिक्षित आणि संस्कारात वाढवलंय हीच काय ती जमेची बाजू. लेकीच्या सुखासाठी धडपडणारे आम्ही देघे.. त्याचं सुख ते आमचं सुख.. दोघ एकमेकांना पसंत आहे म्हटल्यावर... आमचा नकार नाही.. मामांनी ही वसंतरावांच्या समोर हात जोडले...

अदिती पसंत हाय आम्हाले... मामींनी पसंती दर्शवली तशा, सुमनताईंनी घरातून मिठाई आणली आणि सर्वांना स्वत:च्या हाताने चारली.

झाला ना आनंद, अखेर... अदिती आणि वैभवच्या लग्नाची सुपारी फुटलीच म्हणायची...

एखाद्या गोष्टीचा पायंडा.. हाच समाज पाडून देतो, असं नाही का वाटत तुम्हाला... अदिती सारख्या मुली असा देखादेखी रचलेला पायंडा मोडीत काढण्यात यष़शस्वी होताना दिसतील तेव्हाच.. खेड्याकडे वळा, ख-या अर्थाने सिद्धीस जाईल आणि जगाच्या पोशिंदा सदैव आनंदी दिसेल.

टिम : भंडारा
-©®शुभांगी मस्के...




,

🎭 Series Post

View all