Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तु मला मी तुला भाग ९

Read Later
तु मला मी तुला भाग ९
कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग ९

जेवण झालं होतं, आय. सी.यू.त जावून अदिती बाबांना बघून आली. आत्ता फक्त वेटिंग रुममध्ये बसुन तेवढी, रात्र काढायची होती. पेशंटचे नातेवाईक बरेच लोकांनी आपल्या सामान आणि पिशव्यांनी वेटिंग रुममधल्या खुर्च्यावर कब्जा केला होता.

मागच्या साईडला, एका कोप-यातल्या दोन खूर्च्या रिकाम्या होत्याच. अदिती आणि वैभव तिथेच जवळजवळच्या चेअरवर बसले.

दिवसभ-याचा शिन जणू तिने त्या खूर्च्यांच्या हवाले केला. बसल्या बसल्या, खूर्चीला मागे टेकून अदितीने डोळे घट्ट मिटले. हॉस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईंकांनी वेटिंग रुम तशी भरलेलीच होती.

दवाखान्यात अँडमिट असलेल्या, आपआपल्या सग्यासोय-यांच्या आरोग्याची काळजी सर्वांच्या चेह-यावर त्यांच्या बोलण्यात दिसत होती.. अदीतीच्या कानी त्यांच बोलणं पडत होतं.

म्हणतात ना इतरांच दु:ख बघितलं की आपलं दु:ख कमी वाटायला लागतं, तसचं झालं होतं. चार वर्षाचं एक बाळ, आय.सी.यू. त मृत्युशी झुंज देत होत. त्या आईच्या डोळ्यांच्या धारा काही थांबायचं नाव घेत नव्हत्या. बाळ तिच्याच गाडीवरुन पडल्याने सगळाच दोष तिने स्वत:वर घेतला.

होनी को कोन टाल सकता है! भगवान पे भरोसा रखो, सब ठिक होगा, असं म्हणत, नवरा तिला समजावत होता.

तिचा अव्यक्त आकांत, मन विदिर्ण करणारा होता. जोडीदार म्हणून तो मात्र आपलं कर्तव्य पुरेपुर निभावत असल्याच जाणवत होत. आपल्या चार वर्षाच्या बाळाला आणि चार वर्षाचं आईपण निभावणा-या त्या आईला सांभाळण्यासाठीची त्याची धडपड, मन हेलावून टाकणारी होती.

जोडीदाराने सुखाबरोबर असचं दु:ख ही वेचावं .. तेच खरं सांसारिक सुख, अदितीला दोघांना बघून वाटलं.

कुणाच्या पाठी कोणत तर कुणाच्या पाठी कोणत दु:ख होतं. ऐकावं ते सुन्न करणारं होतं.

"जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधुनी पाहे!"

इतरांच्या वेदनादायी सत्यापुढे बाबांच थोडक्यात निभावलं असचं अदितीला वाटलं. ऑपरेशन सुरळीत पार पडलं होतचं, मेडिक्लेम असल्याने पैशाची ही तशी चिंता नव्हतीच. नाही म्हणायला आपली माणसं ही सोबत होतीच.

वैभव अधुनमधुन मोबाईलकडे, तर कधी इतरत्र बसलेल्या लोकांकडे, तर मधुनचं अदितीवर त्याच्या नजर स्थिरावत होती.

अदिती मनोमन सुखावली, तिला थोडं हलकं वाटायला लागलं. तिने डोळे उघडून वैभवकडे बघितलं. वैभव वेटिंग रुममधल्या मुक्या टीव्हीचे चित्र एकटक बघत होता.

बॉटलमधलं पाणी अदितीने घटाघटा वरुनच घशात ओतलं. पाणी, बॉटल पुढे करत अदितीने वैभवला विचारलं.

वैभवने पाण्याची बॉटल हाती घेवून पाणी पिलं.

मामा मामी कसे आहेत?
बरे आहेत.. अदितीच्या बोलण्यावर वैभवने उत्तर दिलं..

तुम्ही अचानक इथे कसे! अदिती ने विचारलं..

ए असं तुम्ही आम्ही नको बरं का! तु मी म्हटलं तरी चालेल.. वैभव बोलला..

बरं.. तु इथे कसा?.. अदिती

माझ्या काय फे-या चालूच असतात, एवढचं की येवून जावून असतो, सलग, दोन चार दिवसांच काम असलं म्हणजे, आहे एक घर अगदी हक्काचं... तिथे थांबतो..

नेहमी नेहमी कशाला ना कुणाला त्रास द्या, म्हणून फार कुणाकडे थांबत नाही एवढंच. वैभवं बोलला

हक्काचं म्हणजे... सासुरवाडी शोधली की काय?

अदितीच्या बोलण्यावर वैभव हलकेच हसला.

नाही तसं काही नाही, आमच्या सारख्याला कोण देणार पोरगी, आम्ही असचं ब्रम्हचारीच मरणारं असं दिसतंय.

काहीही काय बोलतोस, असं अभद्र, मरणाचं नाव काढताच, अदितीचा हात समोर आला.

का नाही मिळणार मुलगी? नक्की मिळेल.. कमी आहे काय तुझ्यात... अदिती बोलली.

कमी नाही गं.. तालुक्याच्या गावी किंवा असं शहरात शिफ्ट, व्हायला तयार झालो तर रांग लागेल बघ मुलींची..

आमचं गाव म्हणजे पक्कच खेड, बघितलयसं तू, सांगायचू गरजच नाही... जगापासुन खूप दूर दूर कुठेतरी, यायला तयार होतं पोरी सहसा.

अरे पण, हो ना मग, तालुक्याच्या जागी शिफ्ट, त्यावर वैभवने बोलायच टाळलं.

हॉस्पिटलमध्ये असं थांबण, किती बोअरिंग.. माझी तर ही पहिलीच वेळ, कंटाळवाण ह्या शब्दाचा खरा अर्थ मला ह्या हॉस्पिटलच्या वातावरणात उमगतोय, अदिती बोलली.

तुला उगाच त्रास होतोय, थांबली असती अरे मी, एकटी.. अदिती

हॉस्पिटलमध्ये कुणी काय हौस म्हणून येतं काय? नाईलाज असतो तो. हे आमच्यासाठी काही नविन नाही काही. आपलियी लोकांसाठी असे कितीतरी दिवस रात्र कुर्बान केलेत आम्ही..

सुखं के सब साथी दु:ख मे ना कोई असं म्हणता पण आम्ही मात्र ठरवलंय, सुखाबरोबर दु:खात ही साथ द्यायची. अडी अडचणीत मदत नाही करायची तर कधी करायची? जबाबादा-या झटकून पळ नाही काढता येत आपल्याला. ना आपल्या आईवडिलांना ते जमलं ना मला ते जमायचं. वैभव उत्तरला..

हॉस्पिटलमध्ये, टिफिन पाठवणा-या मामी चटकन अदितीच्या डोळ्यासमोर आल्या.

खरयं, अडी अडचणीत मदतीला देवासारखे धावून येतात, ती माणसं सदैव आठवणीत राहातात, मनावर कब्जा करतात..

विनितचं वागणं म्हणजे केवळं पळवाट होती, साधी घरू जावून विचारपुस करण्याचू तसदी ही त्याने घेतलू माही की, हॉस्पिटलमध्ये रात्रू कोण थांबलयं विचारलं सुद्धा नाहू. विनितवरचा राग अदितीच्या मनात अधिकच गडद होतं होता.

गावात राहून तुझी भाषा.. अगदी आमच्यासारखीच रे.

ह्यावर , "जैसा देस तैसा भेस" वैभवने हसत हसत उत्तर दिलं.

माझं चवथी पर्यत शिक्षण, गावात बाकी सगळचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी आणि नंतर उच्चशिक्षण शहरातच झालयं.

आमच्या गावात पूर्वी चवथीपर्यतच शाळा होती, तालुक्यातून पहिला आलो आणि शाळेला सातवीपर्यतची मान्यता मिळाली. आजही ती शाळा सातवी पर्यतच आहे, गावात हायस्कूल दहावी पर्यत शाळा नाही.

म्हणूनचं का गाव मागे पडतात, अदितीने उत्सुकतेपोटी विचारलं

नाही गं तसं काही नाही, सरकार शाळेत वर्ग वाढवतील तरी कसे? वर्ग वाढवावे, एवढी गावातली लोकसंख्याच नसते. हजार दिड हजार लोकवस्तीच्या गावात कशाला देतील ते पुढच्या वर्गांची मान्यता..

सुविधा मात्र उपलब्ध करून देतात. सरकारी बसची पास मुलामुलींना मोफत दिली जाते. शाळेच्या वेळा पाहून बसच्या वेळा ठरवल्या जातात.. आत्ता तर टेम्पो ट्रँक्स ही धावायला लागल्यात..

दळणवळणाची साधणं वाढली, खेडी शहरांना जोडली गेली आणि शहरीकरणाचा पगडा ग्रामिण भागांवर पडायला लागला. फायदा म्हणावं की नुकसान त्यामुळे सगळ्यांचाच ओढा शहराकडे..

माझ्यासारखा एखादाच, नमुना जो गावाकडे खेचला जातोय.

जगाचा पोशिंदा, शेतकरी... मानात आपला रुतबा मिरवतो, सगळेच असे शहराकडे वळले तर, शेती करायची कोणी. मी तर म्हणतो. बळिराजाने साथ दिली तर, दिडदोन एकर शेती असलेला शेतकरी ही लाखात उत्पादन काढू शकतो, मग तो उत्पादक उद्योजक नाही का!

पण आजच्या पिढीला... तामझाम, चकाचॉद, दुनियेची भूरळ, म्हणून आज शेतकरी मागे पडतोय.असु दे बोलू तेवढं कमी ह्या विषयावर ....

मिळेल मिळेल कुणीतरी मिळेलच.. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेलेल्या असतात म्हणतात.. आमची ही बांधलीच असेल की कुणाशी तरी, वैभवने कॉलर नसलेल्या टि शर्टची कॉलर वर करत म्हटलं.

मिस्टर परफेक्शनिस्ट, अदिती मनातल्या मनात पुटपुटली.

झोपायची तशी वेळ झालूच होती, आत्तीपर्यत घाईगडबडूत धावपळ करणारा सिटाफ ही ब-याप्रमाऩ़णात पांगला होता.

वेटिंग रुममधले, एव्हाना बसल्या बसल्या घोरायला लागेल होते. बसल्या बसल्या झोप तर येणार नव्हतीच.

तू झोप म्हणत.. वैभवने डोळे बंद केले..

वैभवकडे अदिती ने एक नजर फिरवली, डोळ्यीची पापणी ही न लवता, त्याच्याकडे ती डोळे भरुन बघतच राहीली. वैभवने डोळे उघडले, तशी ती दचकली..

काय? तीने राही नाही म्हणत हलकेच मान डोलावली आणि खुर्चीला मागे टेकली, तिने ही डोळे बंद केले.

लांब लांब पापण्यांच्या आड, मिटलेल्या तिच्या सुंदर डोळ्यांकडे वैभव बघतच राहीला.

कित्ती सुंदर आहे यार ही.. महत्वाचं म्हणजे खंबीर आहे आहे ऐनवेळी ओठवलेल्या परिस्थितीसाठी खमकी आहे. आजवर अनेक मुलींना बघितलं पण, पण आपली जोडीदार असावी, हिच ती, असं कधीच वाटलं नाही..

मी गुंतत जातोय का अदितीमध्ये,

कसं शक्य आहे पण हे.. एका खेडवळ खेड्यातल्या मुलाशी ही का लग्न करेल? सगळे म्हणतात, सँक्रिफाईस काय फक्त मुलींनीच करायचे का? का फक्त मुलींनीच आपलं सगळं सोडून सासरी जायचं, मुलाने का नाही कधी एखादी तडजोड करायची?

अदितीवर मी प्रेम करायला लागलोय का? वैभव स्वगतात रमला.

काय होईल पुढे... उमललेल्या प्रेमाच्या अंकुराला फुटेल का पालवी, काय वाटतं तुम्हाला..

-©®शुभांगी मस्के...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//