Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तु मला मी तुला भाग ८

Read Later
तु मला मी तुला भाग ८
कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग ८

आस्थाच्या घरुन परतताना, गाडीवरच अदितीच्या मोबाईलची रिंग वाजली. गाडी रस्त्याच्या कडेला लावून, गळ्यातल्या स्लिंग बँगमधुन अदितीने फोन काढला आणि बंद व्हायच्या आत उचलला.

हँलो, आवाज अनोळखी होता.
अननोन नंबर वरुन फोन कॉल आला होता.

कोण? अदितीने विचारलं..

अनोळखी इसमाने, गाडीचा नंबर सांगितला...

ही तर बाबांची गाडी, गाडीचा नंबर ऐकून, अदिती दचकली.

माझ्या बाबांच्या गाडीचा नंबर, तुम्ही कोण? माझा नंबर तुमच्यापाशी कसा? अदिती उत्तरली.

त्यांचा अपघात झालाय, त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेवून आलोय, बेशुद्धावस्थेत आहेत ते, त्यांच्या मोबाईलच्या इमरजंसी कॉलवर, तुमचा नंबर सापडला, म्हणून तुम्हाला कळवू शकलो. तुम्ही शक्य तितक्या लवकर पोहचा, एवढचं सांगून, त्यांने फोन ठेवला.

बाबांचा अपघात, ऐकताच अदिती घामाघुम झाली.

अगं काय झालं.. आईच्या बोलण्यावर अदितीने आईला बाबा गाडी वरुन पडले, हॉस्पिटलमध्ये नेलय त्यांना कुणीतरी, त्यांचाच फोन.. एवढंच सांगितलं आणि गाडी सिटी हॉस्पिटलकडे वळवली.

अँक्सिडेंट झालाय, पोलीस केस आहे ही... हास्पिटलमधल्या रिसेप्शनिस्टने पोलिसांना कॉल लावला.

अहो, आता सध्या ह्यांना मेडिकेशनची जास्ती गरज आहे नाही की, पोलीसांची...हॉस्पिटलमध्ये घेवून आलेला माणुस चिडून बोलला.

लगोलग, एक टिम आली स्ट्रेचरवर बेशुद्धावस्थेत असलेल्या वसंतरावांना, आत घेवून गेली.

साहेब आम्हाला कळतयं हो, पण आम्हाला ही प्रोसिजर फॉलो कराव्याच लागतात.. माणसाच्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही, हे आम्हाला कळतय..

महत्वाचं म्हणजे, तुम्ही म्हणताय तुम्हा त्यांना ओळखत नाही, तरी तुम्ही त्यांना इथे घेवून आलात, तुमचं खरं तर कौतुक करायला हवंय.. आजकाल लोकं बघून न बघितल्या सारखं करतात आणि पुढे जातात. आम्ही रोज बरेच इंसिटंट बघतो. तुमच्यी सारख्या माणसांमुळेच माणुसकी जीवंत आहे, ह्यीवर विश्वास बसतो, अन्यथा भावनाशुन्य माणसांची काही कमी नाही. रिसेप्शनिस्ट, बोलतच होत्या तोवर अदिती आणि सुमनताई तिथे येवून पोहचल्या.

बेशुद्धच आहेत ते, डॉक्टरांनी त्यांना अँडमिट करुन घेतलंयं. अनोळखी माणूस स्वत:ची ओळख करुन देत बोलला. त्यांच्या गाडीची चाबी, ऑफिसची बँग आणि मोबाईल त्यांने अदितीकडे सोपवला.

टेबलवर वसंतराव, निपचित पडले होते, इकडे तिकडे मशिन्स लावल्या होत्या, ट्रिटमेंट सुरु झाली होती.

धन्यवाद काका.. तुमचे कसे आणि किती आभार मानावे तेच कळतं नाही आहे, अदितीने वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये आणणा-या अनोळखी माणसाचे आणि सोबत असलेल्या ऑटोवाल्याचे हात जोडून आभार मानले.

हात नका जोडू बेटा, माणुसकी ह्या नात्याने, एवढं नाही करणार तर मग माणसाच्या जन्माला येवून फायदाच काय? आम्ही काही खूप मोठ, काम केलेलं नाही, आमचं कर्तव्य निभावलं एवढचं, अगदी साधेपणाने दोघे ही उत्तरले. अदितीला भरुन आलं

साहेब पडले तिथे मी रस्त्याशेजारीच उभा होतो. चालता चालता, गाडी स्लिप झाली त्यांची. गाडी तिथेचं एका दुकानाच्या समोर, पार्क करुन ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. काही लागलं तर, जरुर कळवा, अर्थात पोलीस केस म्हटलं तर गरज लागेलच.. जाताना दोघांनी ही आपआपले मोबाईल नंबर, अदितीला दिले

पडल्यामुळे, डोकं सुन्न पडलं त्यांच त्यामुळे बेशुद्ध आहेत , पायावर गाडी पडल्याने, गुडघ्यापासुन खाली, पायाच्या हाडांचे तुकडे झालेत, ऑपरेशन करावे लागेल, डॉक्टरांनी बाहेर येवून अदिती आणि सुमनताईंना सांगितलं.


पहिले अदितीने रियाला कॉल करुन बाबांचा अपघात झाल्याच कळवलं. आस्थाला ह्या अवस्थेत, धक्का पोहचला असता, म्हणून अदितीने विनितलाचं फोन करुन बोलावून घेतलं.

रियाला अपघाताबद्दल कळताच, रिया आईला घेवून हॉस्पिटलमध्ये पोहचली. आईला धिर देणा-या अदितीला रियाला बघताच,रडू अनावर झालं. रियाच्या आईने सुमनताईंना धीर दिला.

अस्वस्थ, घाबरलेल्या सुमनताईंना त्यांनी, एका जागी आपल्या जवळ बसवलं, सोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटलमधुन त्यांनी त्यांना पाणि प्यायला दिलं. सुमनताईंच्या डोळ्याच्या धारा काही केल्या थांबायला तयार नव्हत्या.

थोड्याच वेळात, वसंतराव शुद्धीवर आले, तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. तपासण्या झाल्याचं होत्या. ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉक्टरांनी, ऑपरेशनचा दिवस वेळ, निश्चित केली.

विनित, हॉस्पिटलमध्ये आला, जुजबी चौकशी केली. ऑफिसमधुन आलेला असल्याने, मिटिंग्जमुळे खूप थकल्याचं सांगून, पटकन घरी निघून ही गेला. कसा आला आणि कसा गेला, कुणाला कळलं देखिल नाही. डॉक्टरांना भेटण्याची ही तसदी त्याने घेतली नव्हती. न भेटताच तो बाहेरुनचं घरी निघून गेला होता.

रियाचे बाबा, ऑफिसमधुन सरळ, हॉस्पिटलमध्येच आले होते. पैशाची काही काळजी करु नका, आम्ही आहोत म्हणून सुमनताईंना त्यांनी आश्वस्त केलं.

ऑपरेशनच्या दिवशी, हॉस्पिटलमध्ये रिया रियाचे आईबाबा जातीने हजर राहीले, हॉस्पिटलमध्ये वैभवला असं अचानक समोर बघून अदितीला आश्चर्याचा धक्काच बसला. वैभवला रियाने सांगितलं तसा वैभव इकडे निघून आला होता.

ऑपरेशनच्या वेळी, सगळी धावपळ, वैभवने एकहाती पेलली, जवळजवळ तिनेक तीस ऑपरेशन चाललं.. डॉक्टरांनी ऑपरेशन, व्यवस्थित झाल्याचं सांगितलं. आता दहा बारा दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवावं लागेल, असही डॉक्टरांनी सांगितलं.

अदितीचे मामा-मामी ही हॉस्पिटलमध्ये बघायला आले. संध्याकाळ झालीच होती. ऑपरेशनच्या विचारात दिवसभर कुणीच जेवलं नव्हतं.

मी घरी जाते, सर्वांचा स्वयंपाक करते, टिफीन पाठवते, रियाची आई बोलली.

सुमनताई, तुम्ही घरी जा, सकाळपासुन इथेच आहात, थकल्या असाल, बाळा अदिती तू ही जा घरी.. आज बाबा आय. सी. यू. तच असणार आहे, तेव्हा आज एखाद्या पुरुषमाणसानेचं हॉस्पिटलमध्ये थांबणं अपेक्षित आहे.


ठरवा, आज कोण थांबणार हॉस्पिटलमध्ये, रियाच्या बाबांनी मामांकडे आणि विनितकडे बघितलं.

नाही बॉ.. आपल्याला ते हॉस्पिटलमध्ये थांबणं वगैरे जमणार नाही. मिटिंग्ज लाईनअप असतात माझ्या, घरी आस्था ही एकटी आहे, थेडी नाजूक परिस्थिती आहे, मी नाही थांबू शकत विनित स्पष्टच बोलला.

आणि तस ही काही गरज पडत नाही, आपले फोन नंबर असतात त्यांच्याकडे, काही लागलं काही तर ते कळवतात. विनितने सारवासारवं केली.

बी पी शुगर पेशंट आपण, वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं, गरजेचं.. सुमनताई येतो गं, भाऊजी शुद्धीवर आले की येवून जाईल एकदा भेटायला. काळजी घे म्हणत मामा मामी, दोघे ही घरी जाण्यासाठी निघाले.

सगळेच, रात्री थांबायच्या नावावर, आपलं अंग काढून घेतयं, वैभवच्या लक्षात आलं, काही हरकत नसेल तर, मी थांबू का? मला जमेल थांबायला, घरी झोपायचं इथे झोपेन, तस ही काका आज, आय. सी. यू. त आहेत, वेटिंग रुममध्येच थांबावं लागणार.. मी थांबतो, वैभव बोलला.

अरे पण दादा, तुला काका ओळखत ही नाहीत, काही लागलं तर, तु कसा काय सांभाळशील सगळं, रिया बोलली..

आज पेशंट आय. सी. यू. तच असणार आहेत. फक्तच एखादी इमरजंसी म्हणूनच पेशंटच्या जवळची एखादी व्यक्ती हवी असते. सर्वांची चर्चा ऐकून रिसेप्शन स्टाफपैकी एका मँडमने आपल ओपिनियन दिलं... हॉस्पिलमधला स्टाफ, सगळंच बघतोच.. मँडमने आश्वस्त केलं.

मी काल थांबले होतेच, आज ही थांबते, तुम्ही जा... उगाच तुम्हाला कशाला त्रास, अदिती वैभवकडे बघत बोलली...

अगं बाळा, अशी एकटीदुकटी तू कशी थांबशील... वैभव थांबेल.. तू थांबचं वैभव... रियाच्या आईने हक्काने वैभवला हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितलं..

चला आम्ही सोडतो तुम्हाला घरी, रियाचे बाबा सुमनताईंना बोलले.

मी टिफिन घेवून येतो, तोवर रिया तु ही थांब इथेच, मग चल हवं तर घरी... रियाचे बाबा बोलतच होते, तर रियाची आई बोलली.. नको नको, आज काकूं सोबत त्यांच्या घरी त्यांच्या सोबत थांब, त्यांना एकटं वाटणार नाही.. आईच्या बोलण्यावर रियाने होकारार्थी मान डोलावली.

आय सी यू च्या खिडकीतून, इकडे तिकडे नळ्या लावलेल्या वसंतरावांना बघून सुमनताईंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

बाळा काळजी घे, डोळ्यातलं पाणी पुसत, त्यांनी रियाच्या पाठीवर थोपटलं. एक नजर वैभवकडे बघितलं. काकू काळजी करु नका मी आहे वैभव बोलला.

रियाच्या आई बाबांनी, अदितीच्या आईला घरी सोडलं. फ्रेश व्हा आणि आराम करा, टिफिन मी पाठवते, रियाच्या आईच्या बोलण्यावर अदितीच्या आईने होकारार्थी मान डोलीवली.

रियाच्या आईने, पटापटा आवरुन सर्वांसाठी, स्वयंपाक बनवला. दवाखान्यात अदिती, वैभवचा, सुमनताईं आणि रियासाठी वेगळा टिफीन भरला..

रियाच्या बाबांनी, सर्वांचे डब्बे पोचते केले. बाळा तू ही घरी गेली असतीस तर, बरचं झालं असतं, खूप थकली असशील, घरी जरा आराम झाला असता गं.. रियाच्या बाबांनी अदितीला म्हटलं.

नाही काका, बाबा अशा अवस्थेत असताना, माझं मन कसं मानेल सांगा घरी.. काळजावर दगड ठेवून, आईला पाठवलं तेच खूप, मी नाही जावू शकत.. मी थांबते.. अदिती बोलली.

आमचा वैभव आहेच सोबत, तेव्हा काळजी नाहीच काही, तरी तू कम्फर्टेबल नसशिल तर मी थांबू का वैभवच्या जागी, रियाच्या बाबांनी, अदितीला विचारलं..

नको काका, तुम्ही काल रात्री ही खूप वेळ होतात, तुम्हाला ही आरामाची गरज आहेच.. मी ठिक आहे. हॉस्पिटलमध्ये आहेत सगळे, स्टाफ ही चांगला आहे.


रियाने, दोघांना, ताटात जेवन वाढलं. जेवनाचा प्रत्येक घास अदितीच्या तोंडात फिरत होता. खायची काहीच इच्छा नसताना, रियाने तिला आग्रहाने जेवू घातलं.

रियाच्या बाबांनी, रियाला अदितीच्या घरी सोडलं. अदिती आणि वैभव दोघेही वेटिंग रुममध्ये बसले.

काय होईल पुढे, वाचत रहा कथेच्या पुढच्या भागात.. तु मला मी तुला कथा कशी वाटतेय नक्की सांगा.

टिम- भंडारा
-©®शुभांगी मस्के...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//