Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तुल मला मी तुला भाग ६

Read Later
तुल मला मी तुला भाग ६
कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग ६

घनदाट, मोहरलेल्या आंब्याच्या झाडाला, लांब दोरखंडाचा झोपाळा बांधलेला दिसला, तशा दोघी ही झोपाळ्याच्या दिशेने धावल्या.

एक झोका एक झोका..
चूके काळजाचा ठोका, एक झोका..

वा-याशी स्पर्धा करत, दोघीही मनसोक्त गात उंचच उंच झोके घेत होत्या.

गावापासुन दूर शेतात, थंडगार वा-याचे हिंदोळे अंगावर झेलत... सगळेच मनसोक्त रमले.

फट्..फट्.. फट्..फट्.... बूलटच्या आवाजाचा रियाने कानोसा घेतला, तशी उंच झोक्यावरुन उडी मारत, रियी आवाजाच्या दिशेने धावत सुटली.

बुलटवरुन आलेल्या, वैभवला रियाने धावत जावून, घट्ट मिठी मारली..

कुठे गेला होतास रे दा!! आत्ता निघायची वेळ आलीय बघ आमची आणि तू आत्ता येतोयस..

रियाचा रुसवा काढण्यासाठी, वैभवने कानाला हात पकडून, लागल्या हाती रियाची माफी मागितली.

गाडीची चाबी रियासमोर धरली तशी, रियाने झटकन वैभवच्या हातून बुलेटची चाबी हिसकली..

क्षणभराचा विलंब न लावता, गाडीला किक मारुन रियाने गाडीला किक मारली, मोठ्या कॉन्फिडन्स रियाने गाडी गावाच्या दिशेने पळवली.

हळू गं.. नाहीतर, तुला बुलेट शिकवायचा पश्चाताप व्हायचा मला, तो जोरात ओरडला..

रियाच्या मागोमाग अदिती ही आलीच होती. अदिती आणि वैभवची नजरानजर झाली...

मी रियाची मैत्रीण, अदिती... स्वत:च स्वत:ची ओळख करुन देताना, अदितीला ओशाळल्यागत झालं..

यार असं! मैत्रीणीला एकटं सोडून जातं का कुणी.. ही रिया पण ना! मनातल्या मनात स्वगतातूनचं त्याने अदितिकडे बघून हलकसं स्माईल दिलं.

मी वैभव, रियाचा मामेभाऊ, वैभव बोलला...

हँलो हाय... चा सोपस्कार पूर्ण झाला..

यार काय हॉट आहे हा... पिळदार शरिर, व्यायामने कमावलेलं गाठेल अंग... हाईट, पर्सनँलिटी काय मस्त! अदिती चोरट्या नजरेतून वैभवच्या राजबिंड रुपाचं मनातल्या मनात कौतुक करत होती. .


काय बोलावं काहीच सुचेना खरतर दोघांनाही.. एकमेकांना बघून पहिल्या नजरेतलं सुख मात्र दोघांनी ही क्षणात वेचलं होतं..

दुरवरुन बुलट पळवून, रियाही काही क्षणात दोघांजवळ पोहचली.

बुलट झाडाखाली, अदितीजवळ आणून लावली..

सांग आहे का पसंत, होणार माझी वहिणी, हलकेच, हाताच्या कोपराने धक्का देत, रिया अदितीच्या कानाशी येवून हळूच कुजबुजली..

ये गप्प गं! अदितीने डोळ्यांनीच इशारा केला, वैभवकडे बघत, अदिती जराशी लाजलीच..

कसला हँन्डसम आहे यार हा, ह्याला मुली मिळत नाहीत, विश्वासचं बसत नाही. वैभवची ही नजर अधुनमधुन इकडेतिकडे फिरुन फिरुन अदितीवर स्थिरावत असल्याचं अदितीच काय रियाच्या ही लक्षात आलं.

हीच असेल का ती... जीला मी आजवर शोधत होतो... त्याचं मन आतून जणू, स्वत:च्या पसंतीची ओळख सांगू बघत होतं...

शहरातल्या पोरींचे हजार नखरे! दँट्स व्हाय... इटसं नॉट पॉसिबल, अपना दिल काबू में रख.. भावा! वैभवने मनातल्या मनात स्वगतात म्हटलं.

शेतावर कच्च्या चिवडा करण्याचा बेत होताच, त्याने लागणारं सगळं साहीत्य पहिलेच आणून ठेवलेलं होतं..

हिरवी मिरची, पातीचा हिरवा कच्चा कांदा, कोथिंबिर मळ्यातून रिया आणि अदितीने मामींसोबत जावून खुडून आणला.

हिरव्या गार ताज्या ताज्या काकड्यांवर सर्वांनीच मनसोक्त ताव मारला.

भाजलेले शेंगदाणे, विकतचं थोडसं फरसान टाकून, मुरमु-याचा कच्चा चिवड्याला सर्वांचाच हातभार लागला.

सर्वांसाठी, प्लेटा भरल्या गेल्या.. बाकी उरलेला घमेलाभरं चिवडा.. शेतात काम करणा-या बायका-माणसांकडे सोपवण्यात आला.

अस्ताला गेलेल्या सूर्याच्या साक्षीने, सर्वांनीच आपआपलं काम आटोपतं घेतलं होतं.. सर्वांनी पेपरच्या तुकड्यांवर मुठमुठभरं चिवडा घेवून उभ्याउभी खालला.

तिळ, शेंगदाणे... शेतातले ताजे ताजे संत्र.. तुरी-पोपटीच्या शेंगा.. अजून कितीतरी खाण्याच्या पदार्थांनी मामींनी, नको नको म्हणताना ही मामींनी पिशव्या भरल्या.

शेतावरुन सगळेच घरी परतले, मामींनी मंदारसाठी पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा डब्बा भरून गाडीत ठेवला.

साड्या, छोटे झालेले कपडे, चादरी, गावात मुलांना वाटण्यासाठी, नव्या बँगा, शालेय साहित्याच्या पिशव्या डिक्कीतून काढून गावात वाटून देण्यासाठी वैभवकडे सोपवण्यात आलं.

शहरात बोहारणीला देवून भांडी घेण्यापेक्षा, कुणाच्या तरी ह्या वस्तू कामी येवू शकतात, ही भावना कित्ती उदात्त होती.
अदितीला सगळंच, खूप छान वाटतं होतं. जमेल तेवढी मदत ह्यापुढे आपण करायची, मनोमन अदितीने ठरवलं.

सगळे कारमध्ये बसले, वैभवची चोरटी नजर, निरोपाच्या वेळी अदितीचा वेध घेत होती.. मामींनी, सर्वांना हळदीकुंकू लावून पुन्हा नमस्कार केला. परत ये वं बाई, म्हणत मामींनी अदितीच्या पाठिवरुन प्रेमाने हात फिरवला.

आजचा दिवस, खरचं खूप भरभर सरकल्याची भावना, सर्वांच्याच मनात डोकावली, सगळेच कारमध्ये बसले, जड अंत:करणाने सर्वांनी, गावाचा निरोप घेतला.


घरी पोहचायला, रात्री उशिरचं झाला होता... बाय अदिती, अदितीला घरासमोर बाहेरचं सोडलं.

अदिती गेट उघडून आत आली, विनितची भल्ली मोठी कार पोर्चमध्ये उभी बघून, अदितीला आश्चर्याचा धक्काच बसला.

आस्था आणि जीजू.. आज अचानक असे घरी... व्हॉट अ सरप्राईज,मनातल्या मनात पुटपुटत, अदिती मोठ्या आनंदात आत धावत गेली.

हुंदडायला, एवढ्या रात्रीच्या कुठे गेल्या होत्या मँडम, .. वेळ काळ काही पाळता का नाही.... विनितने अदितीला बघताच टोमणा मारला.

अदितीने, विनितच्या बोलण्याकडे साळसुदपणे दुर्लक्ष केलं, ताई, तीने धावत जावून आस्थाला घट्ट मिठी मारली..

ओ माय गॉड.. काय हा तुझं लूक... अगदीच ऑसम... आस्थाला बघून, तीने तीन बोटावरचा मोर नाचवला..

थोडीशी अक्कल भरं तिच्या डोक्यात. सांग काही तुझ्या बहिणीला! आज्जीबाईला, त्या केसांच्या शेपटावरचं प्रेम.. ओल्ड फँशन मिरवण्यात कसलं आलयं सुख, काय माहीती? विनित आस्थाकडे बघत बोलला..

आपल्या लेकीबदद्ल असं फटकून बोललेलं अदितीच्या बाबा आईला मुळीच आवडलं नव्हतं, ते काही बोलायच्या आत अदिती बोलली.


ज्याची त्याची चॉईस हे जीजू, आत्ता आम्हाला आवडतात लांब केस. अदितीने पाठीमागे असलेल्या लांब सडक केसांची वेणी झटका मारत, समोर आणत म्हटलं.

तू ही त्याच गावची. एखाद्या हँडसम हंट ला नको बांधू ह्या तुझ्या वेणीच्या शेपटात, पस्तावेल बिच्चारा... विनित चिडून काहीबाही बोलत होता..

दुनियेबरोबर चालायला शिक, नाहीतर राहाशिल मागेचं..

न मागता असा, फुकटचा सल्ला दिलेला अदितीला मुळीच आवडलं नव्हतं. शब्दाने शब्द वाढेल, ह्या काळजीत, प्रतिउत्तर द्यायच्या आधी, वसंतरावांनी गप्प राहाण्यासाठी दूरुनचं इशारा केला तशी अदिती पुढे बोलता बोलता गप्प झाली.

समोर मागून अस्ताव्यस्त कातरलेल्या केसांचा लूक, तिला स्वत:लाच आवडलेला नसल्याचं आस्थाच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होतं. पण विनितसमोर तिचं काहीच चालतं नाही.

विनित आस्थाचा पानउतारा करताना जरासा ही विचार करायचा नाही. लग्नानंतरच्या ह्या अडिच तिन वर्षात, माहेरी सर्वांच्याच लक्षात आलं होतं.

जेवण खावणं झालेलचं होतं, आस्था आणि अदिती जरावेळ गप्पात रमल्या ना रमल्या, तसा विनित जायची घाई करु लागला.

जरावेळ थांबायची इच्छा असुनही आस्थाचं काहीच चालणार नव्हतं... आस्था विनित गेले, तसे हात हालवून बाय करत, सगळेच घरात आले..

बाबा तुम्ही गप्प का बसवलतं मला, चांगलं सुनावलं असतं आज...

बाळा, काहीवेळा, अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर कानाडोळा कराव लागतो... मन कलुषित करुन घेण्यापेक्षा, आदराने, प्रेमाने नाती सांभाळावी लागतात. आईने जवळं घेत समजावलं..

अगं पण, सात फेरे, सोबत घेतलेत ना तुम्ही, सुख-दु:खात साथ देण्याचं वचन ही दिलत. तिला होती तसं स्विकारलतं होतं ना! मग तिच्या मनाविरुद्ध, तिला आवडतं नसताना तिच्यावर आपली मत लादणं कितपतं योग्य आहे, सांग बायकोच्या मनाचा तिच्या भावनेचा किंचीत ही विचार करु नये आपल्या जोडीदारान.

नवरा बायको, दोन हातांसारखी असतात.. एकत्र येतात आणि बाकी सगळंच सोप्प होतं जातं आपोआप.. "तू मला मी तुला" म्हणत एकमेकांना सांभाळत, जपत दिलेली साथ, म्हणजे संसार...

पती-पत्नी म्हणजे संसाररथाची दोन चाक, एक चाक डगमगीत झालं तरी संसार रथ कोलमोडून पडतो.. संसाररथ सुरळीत चालावा म्हणून, दोन्ही चाक व्यवस्थित असणं गरजेचं.

आस्था ताईला कित्ती वाईट वाटतं असेल.

आई, खरं सांगू... थोडं कमी जास्ती असलं, मुलगा गरिब असला त्याच्या कडे मला द्यायला फार पैसा नसला, तरी चालेल मला, पण माझ्या मताचा आदर करणारा नवराच मला हवाय. ज्याने माझी बाजू सांभाळून घ्यावी.

तु मला मी तुला! म्हणत मला मी आहे तशी स्वीकारणारा नवरा मला हवाय, अदितीच्या बोलण्यावर बाबा, अदितीकडे बघत गालातल्या गालात हसत म्हणाले?

कुणी आवडलयं की काय? कुणी असेल तुझ्या मनात तर सांगून दे...

आम्ही, दोघांनी ही तुम्हाला पुरेपुर स्वतंत्र देण्याचा प्रयत्न केला. अर्थात स्वत:साठी जोडीदार निवडण्याचा ही हक्क तुम्हाला आहेच.

अदूबाळा, खरचं कुणी आवडतं असेल, हाच मुलगा ,माझ्या योग्य आहे, मला खुप खुश ठेवेल अस जर का तुला वाटतं असेल, तर नक्की सांग...

आमची काहीच हरकत नसेल!!


दुधाने तोंड पोळल्यावर माणसाने ताक ही फुंकून प्यावं, म्हणतात, आम्हाला आमच्या पोरींच सुख हवयं फक्त, वसंतरावांच्या बोलण्यावर सुमनताईंनी ही.. खरयं म्हणत मान डोलावली.

कसा गेला गं अदू आजचा दिवस!! सुमनताईंनी अदिती विचारलं.

एकच नंबर! दोन शब्दात अदितीने गावाचं वर्णन केलं.

गावातला रानमेवा अन् सुकामेवा धाडलाय बघ रियाच्या मामीनं आपल्या समद्यांसाठी.. एका दिवसात भाषेचं अँडॉप्शन क्या बात है अदू! अदितीच्या बोलण्यावर आईबाबांच्या चेह-यावर समाधान झळकलं.

चला उद्या मला, ऑफिसला जायचंय, म्हणत अदिती... रुममध्ये झोपायला गेली.

वैभवं!, खरं वैभव आहे तो. काय काय करतो, बापरे!!

दामदुप्पट तिप्पट योजनांवर भाळून, पैशाची गुंतवणूक करु बघणा-या गावक-यांना एक मोठ्ठा फ्रॉड होण्यापासून वाचवलं होत त्याने, किती सजगपणा किती डोळसपणे पर्दाफाश केला असेल त्याने ह्या सगळ्याचा.

मला हवा तस्सा!! माझ्या स्वप्नातला राजकुमार.. असेल का वैभवसारखा. की वैभवचं असेल... वैभवचाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता.

झोप येतच नव्हती, अदितीच्या मनात सतत, वैभवचाच विचार रेंगाळत होता... ह्या कडावरुन त्या कडावर, तिचं कड बदलणं चाललं होतं. तिने काढलेल्या एक दोन फोटोंमध्ये, वैभवाचा फोटो, ती पुन्हा पुन्हा बघत होती.

काय होईल, पुढे... घेईल का अदिती आणि वैभवचं नातं आकार? काय वाटतं तेव्हा वाचत रहा तु मला मी तुला...

टिम: भंडारा
-©®शुभांगी मस्के...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//