तू मला मी तुला भाग २

Esharyaver Nachnarya Kathputlidarkhi Tichi Avstha
कथेचे नाव : तू मला मी तुला

विषय : सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग : २

नवरा मुलगा आणि त्याचा परिवार आस्थाला बघून गेल्यावर, समोरुन होकार येवूच शकतो, नाही म्हणायला कुठलीच जागा शिल्लक नव्हती अशी सगळ्यांनीच सर्वसाधारण आशा बाळगली होती. मुलाकडेचे बघून गेल्यावर मात्र कुठलाच निरोप नव्हता, तेव्हा मध्यस्थाला विचारल्यावर, समोरुन नकारचं आल्याचं कळलं.

"म्हणे मुलगी जास्ती आगावू आहे"," माहेरचा उदो उदो करणारी आहे", ही तर सासरं खावूनचं टाकेल.. वगैरे वगैरे.

दोनच मुली, भाऊ नाही.. म्हणजे पोरीचा एक पाय सासरी आणि एक पाय माहेरी... ना धड इकडे ना धड तिकडे..

आईवडिलांच्या पुढे आयुष्यात येणारी आजारपण, त्यांची देखभाल... त्यांची पोरगी तर पोरगी, जावई गुरफटत जाणार ह्या सगळ्यात आणि त्यातून मनस्ताप आलाच... नकार द्यायला हे छोटसं कारण ही पुरेस होतं..

चांगल्या शिकल्या सवरल्या घरचे, आस्थाच्या तोडीस तोड मुलं बघायला येवू लागले. प्रत्येक वेळी तेवढ्याच उत्सुकतेने आणि तयारीने, बघायला येणा-या मंडळींच आगत स्वागत केल्या जात होतं.


पेटवण्यालायक, संपत्ती असल्यावर, सुनेच्या नोकरीची गरजचं काय? नोकरी केलेली चालणार नाही. नोकरी सोडावी लागेल.


नोकरी केलीच तर मग... पगारावर अधिकार कुणाचा, देणार का ती पूर्ण पगार नव-याला? की तिचा पगार, ती तिच्या माहेरच्यांवर खर्च करणार...

नोकरी करणा-या पोरी अहंकारी असतात नव-याला आपल्या तळहातावर नाचवतात... वगैरे वगैरे

तुमचं हे घर स्वत:चं, तुम्ही गेल्यानंतर, ह्या घराचा वारसदार कोण? दोन मुलीच तुम्हाला... मग हिस्से कसे करणार? तुमचं म्हातारपण कुणी काढायचं कोण ठरवणार.. वगैरे वगैरे...

तुमची परिस्थीती तशी जेमतेमचं... मग काय बोंबच बोंब.. सासूसास-यांचं करता करता लेकी जावयाची पुरेवाट होणार. पोरगा नाही, त्यामुळे.. शरीराने ही झिजायचं आणि पैशाने झिजायचं.. वगैरे वगैरे..

भाऊ नाही म्हणजे, आईवडिलांनंतर माहेर नाही... नातवंडांना आजोळ नसेल, आईवडिलांनंतर लग्नाऐवात, सन समारंभात मानपान कोण करणार?

प्रत्येक वेळी बघायला येणा-या मुलांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांनी बघून गेल्यावर नकाराची कारणं वेगवेगळी असायची, हसावं की रडावं की त्यांच्या संकूचितपणाची किव करावी असचं प्रत्येक वेळी होत होतं..

शिकल्या सवरल्या, शहरात पाहाणा-या, स्वत:ला सो कॉल्ड मॉडर्न समजणारी, कुटूंब ही अशा संकूचित विचारांची असू शकतात, ह्यावर विश्वास बसत नसला तरी, परिस्थिती ह्याहून वेगळी नव्हती.

मुली बघण्याचा कार्यक्रम नसून मुलीला दाखवण्याचं प्रदर्शन भरलय की काय असा फिल हळूहळू, चहापोह्याच्या कार्यक्रमाला येवू लागला होता.

एक ना अनेक.. तर्क वितर्क काढले जावून समोरुन नकार यायचा आणि काही केल्या आस्थाच्या लग्नाचा योग जुळूनचं येत नव्हता..

अनेकदा, ह्या सगळ्याचा कंटाळा येवून.. आस्था मला लग्नच करायचं नाही, म्हणून जाहीर करायची.. रितच गं बाळा ही.. मुलीचा जन्मचं तो, सोसावं मुलींनाचं लागतं, विरोध पचवावाचं लागतो.

जोड्या ह्या स्वर्गात बांधल्या जातात, कुणीतरी असेलचं तुझ्याही नशिबात, जो येईल तुझ्या स्वप्नांचा राजकुमार बनून... तो शोधण्यासाठीचं तर असतो हा दाखवण्याचा कार्यक्रम, वसंतराव आणि सुमनताई आस्थाची समजूत काढत तिला धीर देत.

लग्नाबाबत एकंदर मुलीच सुंदरसं स्वप्न असतं... चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे कुणीतरी घोड्यावरुन येणारं आणि
ओ मेरे सपनोंके सौदागर मुझे ऐसी जगह ले जावो
प्या ही प्यार हो उस डगर.. मुझे परियों की दुनिया दिखावो.. म्हणत... स्वप्न रंगवली जातात..
पण सत्य परिस्थती काही वेगळीच असते.

मुलगा मुलगी भेदभाव वरवर दिसत नसला तरी आजकाल लोकांना सगळचं परफेक्ट हवं असतं, कुठल्याच गोष्टीत कमी जास्ती चालत नाही, अँडजस्टमेंट करण्याची सवय नसलेली ही मंडळी कधी कशाची अपेक्षा ठेवतील सांगता येत नाही असचं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहात होतं.

अदिती, ह्यावरुन कधिकधी खूप चिडायची.. मी माझं असं प्रदर्शन मांडणार नाही, मी माझा बघण्याचा कार्यक्रम होवूच देणार नाही, माझ्या स्वप्नाचा राजकुमार मीच शोधणार, अगदी हट्टाने सांगायची.

मल्टिनँशनल कंपनीत, इंजिनिअर असलेल्या विनितचं स्थळ चालून आलं.. विनित उच्चशिक्षित होता मेहनती होता.

आईवडिलांना एकूलता एक मुलगा होता, मुलगी दिसायला सुंदर, उच्चशिक्षित, नोकरी करणारी असावी, ही एकमेव अपेक्षा असल्याने, आस्था विनितच्या पसंतीस उतरली.

जोडा एकमेकांना साजेसा होता. नाही म्हणायला जागाच नव्हती. आस्था आणि विनितचं लग्न पक्क झालं..

आस्थाच्या लग्नात, वसंतराव आणि सुमनताईंनी काहीच कमी पडू दिलं नव्हतं.. दागदागिने, पसंतीप्रमाणे कपडेलत्ते, मानपान तोडीस तोड, लग्नसमारंभ पार पडला.

लेकीच्या लग्नाचं स्वप्न आईवडिलांच्या डोळ्यात तेवत राहातं, जणू ते ह्याच दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. आणि तेच स्वप्न पूर्णत्वास गेल्याच समाधान वसंतराव आणि सुमनताईंच्या चेह-यावर झळकल.

कन्यादानाच्या वेळी, विनितच्या हाती आस्थाचा हात सोपवताना, वसंतराव आणि सुमनताईंचा उर भरुन आला. निरोपाच्या वेळी, खंबिर असलेल्या वसंतरावांच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. सुमनताईंची अवस्था काही वेगळी नव्हती.

विनित करीअर ओरिएंटेड होता.. आस्थाने ही करिअर ओरिएंटेड असावं, जमान्याच्या तालावर ताल मिळवतं चालावं, आजकालच्या नव्या टेंडनुसार रहावं... विनितला नेहमी वाटायचं.

तिची कॉलेजची रोजची धावपळ, तिचं ते रोजचं कॉलेजला साडी नेसुन जाणं... तिचे कमरेच्या खाली, रुळलेले झुपकेदार लांब सडक केसं... रात्रंदिवस, कॉर्पोरेट वर्ल्डच्या सानिध्यात राहिलेल्या, विनितला आस्थाचं तेच तेच जगणं केटाळवाणं वाटायला लागलं...

आपल्या बायकोने कसं मॉडर्न रहावं..आपल्या खांद्याला खांदा लावत, सुटाबुटात ऑफिसला जावं.. प्रेझेंटेशन देताना, चारचौघातं स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड करावी, नवे चँलेंजेस घ्यावे, तिचं ही व्यक्तिमत्व मला साजेसं असं असावं, असं विनितला वाटे.

तुमच्या प्रोफेशनमध्ये ना कुठली चँलेंजेस असतात ना कुठलं नाविण्य.. तू तुझं प्रोफेशन बदलवायला हवं, लेक्चरररशिप सोडून, छान एखाद्या मल्टिनँशनल कंपनीत, चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी शोधायला हवीस...

ह्यासाठी अदितीवर विनित नेहमी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा. टिचिंग हे माझं पँशन आहे. मला आवडतं तेच मी करणारं, आस्था विनितला सांगायची तेव्हा आजकाल ह्यावरुन दोघांमध्ये ब-याचदा खटके ही उडायचे.

विनितला आवडतं त्याप्रमाणे वागण्याचा, त्याच्या कॉर्पोरेट जगताशी त्याच्या मित्रमैत्रिणींशी, जुळवून घेण्याचा ही आस्था पुरेपुर प्रयत्न करायची.

आपणं ज्यात कम्फर्टेबल असू तोच पेहरावं आणि तेच प्रोफेशन, आपलं व्यक्तीमत्व घडवतं असतं, पण झोपणा-याला उठवू शकतो, झोपेच्या सोंग घेतलेल्या ला कसं उठवणारं असचं विनितच्या बाबतित म्हणनं वावगं ठरणारं नव्हतं....

एका हाती बिअरचा ग्लास घेवून, धांगडधिंग्याच्या तालावर, स्मोकींगच्या धुव्व्यात हरवलेली तरुणाई, विनितला ह्या जगाची भुरळ पडलेली होती.

त्याच्या कोर्पोरेट पार्ट्योंमध्ये आस्थाचं कधीच मन लागलं नव्हतं आणि त्यामुळे की काय आस्था आपल्याला साजेशी नाही.. ही कुठे पार्ट्यांमध्ये घेवून जायच्या लायकीची नाही तर पक्की मँरेज मटेरियल बननू घर सांभाळणारी काकूबाई आहे, अशी भावना विनितची झाली होती.

आस्थाला वर्षभ-यात बाळाची चाहूल लागली.. प्रेग्नेंसी किटवरच्या दोन गुलाबी रेषा नव्हत्या फक्त त्या, मातृत्वाची चाहूल होती.

आपलं नवराबायकोमधलं नातं अधिकाधिक दृढ होणार, आता सगळं सुरळीत होणार, नव्याने तिच्या मनाने उभारी घेतली. नवी उमेद तिच्या मनात जागवली.


आपण आईबाबा होणार, विनितला ही आनंदाची बातमी कळताच, आस्थावर तो जोरात चिडला... आनंद काय ह्यात, ह्या सगळ्याची वेळ आहे का ही. आत्ता कुठे करिअर सुरु झालय, आणि आत्ता पुन्हा ह्या सगळ्यात स्वत:ला गुंतवायचं मग करिअर कधी करायचं?

मी ह्या सगळ्यासाठी मनाने अजून प्रिपेयर नाही, आत्ताशी हे बाळ मला नकोय... ह्या सगळ्यात, आत्तापासुन मला स्वत:ला अडकून घ्यायचं नाही.

विनित बाळाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. आस्थाच्या मनाचा कुठलाच विचार न करता, तिला अँबॉर्शन पिल्स देवून, गर्भपात करायला विनितने भाग पाडलं...

विनितच्या आईवडिलांनी विनितला लहानपणापासुन खूप स्वातंत्र्य विचारांत वाढवलं होतं.. त्याच्या कुठल्याचं निर्णयात हस्तक्षेप ते करीत नसतं, अनेकदा विनित चूकत आहे, माहीती असुनही ते आस्थालाचं ती कशी चूक आहे, पटवून देत.

एकूलत्या एका लेकाचे, पुरवलेले फाजील लाड आणि तो करेल ते योग्य ह्या मुलावरच्या अंधळ्या विश्वासाने विनितच्या चुकांवर पांघरुन घालण्याचचं काम त्याचे आईवडिल उत्तमप्रकारे करीत होते..

दिवस पुढे पुढे सरकत होते, घरदार पैसा सगळच असून ही विचारस्वातंत्र्य नसलेली आस्था, एक प्रकारे दडपणात जगत होती.

विनितच्या इशा-यावर नाचणा-या कढपुतलीसारखी तिची अवस्था झाली होती.

माहेरी, दोन दिवस मनसोक्त जावून तिच्या हक्काच्या लोकांसोबत, रहाण्याचं स्वातंत्र्य ही तिच्याकडून विनितने हिरावून घेतलं होतं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आस्था कुठेतरी हरवली होती..

वसंतराव आणि सुमनताईंना हे सगळं कळत होतं मात्र, नशिबाला दोष देत, आस्थालाच ते जोडीदाराशी कसं जुळवून घ्यावं लागतं, समजावून सांगत.

नवराबायकोचं नातं हे खूप नाजूकं असतं. दोन मन जुळली की नातं बहरतं.. पण मनचं जुळली नाहीत तर ते नातं कोमेजतं. आस्था आणि विनितचं असचं होतं..

आला दिवस पुढे ढकलल्या पलिकडे, नात्यात काहीच निविण्य आस्था आणि विनितच्या आयुष्यात उरलं नव्हतं.


काय होईल पुढच्या भागात, आपल्या जोडीदाराकडून होणारा हा अत्याचारचं नाही का? आपल्या जोडीदाराकडून होणारा हा मानसिक छळ, ह्याला तुम्ही प्रेम म्हणाल की छळ... फक्तच, नवरा म्हणून, सहन करत राहाणे कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. तेव्हा लाईक आणि कमेंट करुन नक्की सांगा.

आस्था आणि अदितीच्या आयुष्यात पुढे काय होणार, वाचत रहा कथेच्या पुढच्या भागात.. तु मला मी तुला!!
क्रमश:

टिम : भंडारा
-©®शुभांगी मस्के...

🎭 Series Post

View all