तू काय आहेस

Tu Kaay AAhes
@everyone

तू काय आहेस आधी स्वतःमध्ये डोकून बघ

जेव्हा म्हणतात आमचे काय केले
तेव्हा तू काय करत आहेस
जरा स्वतःमध्ये डोकून बघ

जेव्हा म्हणतात तुमचा काय उपयोग
तेव्हा आपला काय उपयोग आहे
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात तुम्ही काय उपकार केले
तेव्हा आपण काडी इतके ही झिजलो का
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात तुझी काही गरज नाही
तेव्हा आपण किती गरजेला पुढे आलो
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात तुम्ही पसारा करतात फक्त
तेव्हा आपण किती पसारा आवरला
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात तुम्ही नुसते वाया लावले
तेव्हा आपण किती वाचवले
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात जीव नाही लावला
तेव्हा आपण किती जीव लावला
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात आमच्या आवडीसाठी काय केले
तेव्हा आपण किती केले कोणासाठी
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा म्हणतात मला सुख नाही लाभले
तेव्हा आपण तिला कधी ते तिचे सुख दिले
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा ती तिचे सुख सोडून तुझ्या घरी येते
तेव्हा तू किती तुझे घर सोडून तिचा होतोस
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा ती तिचे आई बाबा सोडून निघते
तेव्हा तू किती तुझे आई बाप सोडले
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ

जेव्हा तू तिला म्हणतोस तू काही साथ दिली नाहीस
तेव्हा आठव तू किती साथ दिलीस तिची
जरा स्वतःमध्ये डोकावून बघ..

जेव्हा ती सगळे नाते सोडत सोडत येते
तेव्हा तू का नाही सोडत सोडत गेलास तुझे ही नाते
जरा आठवून बघ ,तिला कोणी राहिले नाही तुझ्याशिवाय

©®अनुराधा आंधळे पालवे