तू जिथे मी तिथे भाग 05

Love story

       मनोहर रेवतीला उचलून टेकडीवर घेऊन आला.. रेवती तेथील एका दगडावर बसली होती.

मनोहर बरं वाटतंय का ?

रेवती हं..

मनोहर पाणी देण्यासाठी बॅग शोधू लागतो.. नंतर त्याच्या लक्षात येतं..

मनोहर बॅगssss ... बॅगा राहिल्या आपल्या..

रेवती वॉट ?

दोघेही घामाघूम होतात.. मनोहर धावत त्या पायरीपाशी जातो.. तिथे त्या बॅगा व्यवस्थित होत्या.. त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.‌तो अवजड बॅगा घेऊन कसा बसा पुन्हा रेवतीपाशी आला...

मनोहर सॉरी.. आपल्या बॅग्स राहिल्या..

रेवती अरे तू कशाला माझ्या एवढ्या वजनदार बॅग्स आणल्या ? मी आणल्या असत्या..

मनोहर बरं मग ठेवून येऊ का पुन्हा जागच्या जागी ?

रेवती हसू लागते..

रेवती वेडा आहेस..

मनोहर रेवतीकडे तसाच पाहत असतो.. त्याच्या अश्या बघण्यामुळे रेवती स्वत:चं हसणं थांबवते..

रेवती काय रे असा का बघतोय्स ?

मनोहर मला ती जुनी रेवती आठवली.. त्या आपल्या आठवणी आठवल्या.. त्या गावच्या टेकडीवर आपण खूप मज्जा करायचो ना..

रेवती येस.. मला अजूनही ती टेकडी आणि त्या टेकडीवरून दिसणारा तो समुद्र आठवतोय.. त्या टेकडीवर असाच वारा रेंगत होता..

मनोहर हं.. आणि मी त्याच टेकडीवर तुला प्रपोज केलं.. त्याच टेकडीवर आपण शेवटचे भेटलो होतो...

रेवती पण इथे आल्यावर सगळं कसं नव्याने सुरू होतंय असं वाटतंय..

मनोहर आपण परत कधी भेटू असं मला वाटलं नव्हतं..

रेवती हं.. गाी तू ट्रेन सोडलीस ना तेव्हा मला वाटत होतं कि परत कधी भेटू ? मग मनात विचार आला ही काही तासांची आपली भेट मनात साठवून ठेवली पाहिजे..  

मनोहर हं..

तेवढ्यात रेवती तिच्या पर्समधून सिगारेट व लायटर बाहेर काढते .

रेवती सिगरेट हव्ये ?

रेवती सिगरेट ओठात धरते..

मनोहर छे ! नको. मी नाही सिगरेट ओढत.. बाय द वे.. तू कधीपासून सिगरेट ओढायला लागलीस..

रेवती नवरा गेल्यापासून...

मनोहर एक विचारू ?

रेवती नवरा कसा गेला हेच विचारायचं असेल ना ?

मनोहर हो..

रेवती जेलमध्ये होता गेली ५-६ वर्ष.. म्हणजे माझ्यामुळेच गेला तो जेलमध्ये.. गावात असताना बाबांनी त्याच्याशी लग्न लावून दिलं हे तुला ठाऊक असेलच.. १८ वर्षांची होते तेव्हा . लग्न म्हणजे काय ? संसार म्हणजे काय ?हे सुध्दा माहिती नव्हतं मला तेव्हा फक्त पैशांसाठी बाबांनी माझं लग्न लावून दिलं त्याच्याशी.. त्याचं वय तेव्हा ३८ वर्ष होतं... बाबा कर्जबाजारी झाले होते. घरात २ रूपये आणण्यासाठी सुध्दा भीक मागावी लागत होती मग काय केला माझा सौदा.. ४ लाख रूपये माझ्या नवऱ्याकडून घेतले आणि मी कशी आहे ? कुठे राहते ? काय करते ? काय खाते ? याची आजपर्यंत चौकशी केली नाही.. अगदी माझ्या आईने सुध्दा नाही केली.. नवरा मला इकडे मुंबईत घेऊन आला.. त्याचा कंस्ट्रक्शनचा बिझनेस होता.. आणि फिल्म वगैरे प्रोड्यूस करायचा. अनेक गैरव्यवहार होते . नंतर हळूहळू माझा वापर करू लागला.. मला सारखा मी इच्छा नसताना संभोगासाठी बळजबरी करायचा... खूप वेळा मारायचा बेल्ट ने ..एवढंच नाही तर त्याच्या इतर मित्रांसोबत सुध्दा मला झोपायला सांगायचा.. एवढी क्रूर वृत्ती सहन नाही झाली  याची.. मग मीच त्याच्या नकळत पोलिसांत तक्रार केली.. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून त्याला काही दिवसांनी अटक केली.. नंतर असं लक्षात आलं की एक नाजूक जीव आपल्या पोटात वाढतोय. तेव्हा मात्र धक्काच बसला रे मला.. आनंद झालाच नाही उलट प्रश्न पडला कि ह्या बाळाचा नक्की बाप कोण ?

मनोहर म्हणजे ?

रेवती म्हणजे या बाळाचा बाप नक्की माझा नवराच आहे की नवऱ्याचे मित्र ? हा प्रश्र्न पडला.. शेवटी डिएनए टेस्ट केली , इतर काही टेस्ट केल्या. तेव्हा कळालं कि बाळाचा बाप माझा नवराच आहे.. तेव्हा सुटकेचा श्वास सोडला. नवरा गेल्याची बातमी काही दिवसांनी कळाली.. मी त्याला शेवटचं पाहायला सुध्दा गेले नाही. तो गेला आणि त्याचे काळे धंदे , काळा पैसा सगळंच नष्ट झालं.. अख्खं घर पवित्र झालं...एके दिवशी त्याचा मित्र घरी आला .. फिल्म इंडस्ट्रीतील तो एक होता. त्याच्या फिल्म साठी पैसे गुंतवाल का असं विचारलं.. माझ्याकडे नवऱ्याचेच पैसे होते.. त्यातील ८०-९० लाख रूपये मी एका फिल्म साठी गुंतवले.. जसे पैसे गुंतवले तसे पैसे दुप्पट पटीनं येऊ लागले.. काही वेळा लॉस सुध्दा व्हायचा.. हळूहळू या इंडस्ट्रीत स्वत:चं नाव कमावलं.. काही दिवसांनी मला मुलगी झाली. स्वरा . मग तिच्यासोबत वेळ घालवत गेले.. नवऱ्याला सहज विसरून गेले. आणि बऱ्याच वर्षांनी गावावरून आई-बाबांचा फोन आला. पैशांची मदत हवी होती त्यांना.. आता कसेही असले तरी आई-बाबा होते माझे .. केली मदत त्यांना.. महिन्यातून पैसे पाठवत असते‌. हळूहळू मी फिल्म इंडस्ट्रीत गुंतत गेल्ये आणि सोबतच माझी एक स्वत:ची.. कंपनी आहे. पैसा येतोय , जातोय . कामाचा व्याप एवढा आहे .. आणि ही व्यसनं.. दारू , सिगरेट.

मनोहर फारच बदललेली आहेस तू....

रेवती तुला काय वाटतं की तू जसा होतास तसाच आहेस का आता ? माझा बदल जसा तुला अनपेक्षित आहे तसाच तुझ्यात झालेला बदल अनपेक्षित आहे.कसा काय बदललास एवढा ?

क्रमश : 

लेखक : पूर्णानंद मेहेंदळे 

संपर्क - 7507734527

( कथेचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन ! )