Jan 27, 2022
कथामालिका

तुहिरे ... कसं जगायचं तुझ्याविना 22

Read Later
तुहिरे ... कसं जगायचं तुझ्याविना 22 

भाग  22

माही ने घरी जाऊन आकाश बद्दल अंजलीला सगळ सांगितलं.... आणि आकाश सरांना तिच्यासोबत भेटायचं हे सुद्धा सांगितलं.....

हो नाही ....हो नाही ....करता करता अंजली एकदा भेटायला तयार झाली..... माहीने आकाश सरांना अंजली बद्दल सांगितल... आणि त्यांनी सॅटर्डेला ऑफिस नंतर भेटायचं ठरवलं.....

" भाई,  प्लीज चल ना यार तू माझ्या सोबत..." . आकाश तयारी करत नर्व्हस होत अर्जुनला बोलत होता

" इतका काय नर्व्हस होत आहेस....??. सिम्पल एका मुलीला तर भेटायला चालला आहेस... माझी काय गरज आहे तिथे यायची आणि मला तसं पण काम आहे , काम करू दे.. " अर्जुन लॅपटॉप मध्ये काम करत बोलला..

" भाई , मी पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीशी बोलायला चाललो.... प्लीज सोबत चल,  प्लीज आय ॲम रिक्वेस्टिंग यु...."  आकाश

" आकाश , इतक  काय घाबरायचे त्यात??..... लग्न करायचे आहे ना,  मग तुला तुझं बघायला पाहिजे..... ऑफिस मिटींग्स ला पण तू कधी असा घाबरला नाहीस" ...... अर्जुन

" ऑफिसच्या कामामध्ये नेहमी तू माझ्यासोबत राहिला आहे,  तुझ्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आहे ...पन आज मला भीती वाटत आहे   .....भाई,  मला भीती वाटते ती नाही म्हणाली तर?" ..... आकाश

" ती नाही म्हणू शकत नाही.... तुझ्यासारखा श्रीमंत ..देखना... हुशार मुलगा तीला कुठे मिळणार आहे.?... यू डोन्ट वरी...." . अर्जुन

" थँक्स भाई.... पण तू माझ्यासोबत चल " .... आकाश

" ओके" ...... अर्जुन तयार व्हायला निघून गेला.

******

आकाश आणि अर्जुन एका हॉटेलमध्ये अंजली ची वाट बघत बसले होते......

" हा ड्रॅक्युला,  काय करतोय इथे? ..... आकाश सरांना  भेटायचं होतं, हे का आले सोबत......???"  अर्जुन ला तिथे आलेला बघून माही अंजलीला बोलली.... तेवढ्यात आकाश च लक्ष माही कडे गेलं,  त्याने हात दाखवून त्यांना आपल्याकडे बोलावलं......

" कसे कसे लोक आहे इथे... कसे कपडे घालतात त्या मुली" ... बडबड करत मा ही आणि अंजली त्यांच्याजवळ गेल्या.

आकाशने उभे राहात  अंजलीला हॅलो केले आणि तिच्यासाठी चेअर मागे सरकवली...... थॅंक्यु म्हणत अंजली त्यावर बसली.... सगळ्यांनी एकमेकांसोबत हॅलो हाय केले.... आणि थोडं फार औपचारिक बोलणं केलं... पण मुद्द्याचं कोणी काहीच बोलत नव्हते... माही अर्जुन मुळे आकाशला अंजली सोबत  बोलायला थोडं लाजल्यासारखं होत होतं..... अंजलीला पण अर्जून मुळे तिथे अक्वरड फील होतं....... पण माही मात्र अंजली ला सोडत नव्हती..

आकाशने अर्जुनला थोडे डोळ्याने खुणावले..... तसे अर्जुन समजला...

" माही आपण तिकडे जाऊया,  मला थोडं काम आहे" .... अर्जुन

" तुम्ही जावा , आपलं काम करा.... माझं काय काम तुमच्या सोबत? ...... मी इथेच ठीक आहे" ..... माही

" मिस माही देसाई विसरू नको मी तुझा बॉस आहे,  मला तुझ्या सोबत काम आहे तिकडे चल"  .....अर्जुन थोडा ओरडतच बोलला

अर्जुन थोड्या मोठ्या आवाजात बोलण्यामुळे आजूबाजूचे त्यांच्याकडे बघत होते.....

" माही सगळे आपल्याकडे बघतात आहे,  तिकडे चल" .... आता अर्जुन थोडा हळू आवाजात पण रागातच बोलला

त्याला बघून माहि चुपचाप तिथून उठली आणि त्याच्यासोबत दुसऱ्या टेबलवर जाऊन बसली.......

" अर्जुन सर हे तुमचं ऑफिस नाहीये,  इथे माझ्यावर ऑर्डर नाही सोडू शकत तुम्ही?" ..... अर्जुन

" तु मठ्ठ आहे का ग.... आपण तिथे होतो म्हणून त्या दोघांना बोलायला ऑकवर्ड फिल होतं..... आपल्यासमोर कसे काय बोलणार ते?"...... अर्जुन

"अरे हो मला ते कळलच नाही.." ... माही कन्फ्युज चेहरा करत बोलली

" ह्म्म......डोकं वापरशिल तर कळेल ना......... तसे मी कोणाला सांगतोय??....तसेही तुझा  वरचा मजला तर रिकामाच आहे " .......अर्जुन ... अर्जुनला  तिला कन्फ्युज झालेल्या बघून हसायला येत होतं......

वेटर त्यांच्याजवळ आला आणि काय हव आहे ते विचारायला लागला...

" दोन कॉफी" .... अर्जुन

" मला एक चहा,  अद्रक घातलेला." ..माही

" मी कॉफी सांगितली ना?"" ......अर्जुन

" हा  तुम्ही घ्या.. मला चहा हवाय .....मला कॉफी नाही आवडत..... कसली कडू कडू लागते ती.... पण तुम्ही दोन कॉफी का सांगितली?" ........ माही

" वन कॉफी वन टी " .... अर्जुन वेटरला बोलला

" आणि हो त्यात अद्रक पण," ..... माही
वेटर कसंनुसं हसत तिथून गेला...

" अंजली मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं होतं..... मी जास्त घुमाऊन फिरवून काही बोलणार नाही...... तुम्ही गणपती पूजेला घरी आला होते, ..... तुला पहिल्यांदा बघितलं आणि तू माझ्या मनात घर करून गेली..... त्या दिवसापासून मला तू खूप आवडते" ...... आकाश अंजली च्या डोळ्यात बघत बोलला.

अंजली चूप,  त्याच्याकडे बघत होती...

" मला तु आवडतेस...... लग्न करशील माझ्यासोबत??" .... आकाश

" आकाश तुम्ही फार चांगले आहात.....तुम्हाला खूप चांगली मुलगी मिळेल , पण मी तुमचा प्रस्ताव मान्य करू शकत नाही" ..... अंजली

" का.....?." ... आकाश

" हे बघा आकाश तुमच्या आणि आमच्या राहणीमानात,  स्टेटस मध्ये खूप मोठी ग्याप आहे......  कुठेच काही सारखे नाही.... आमची तुमची काहीच बरोबरी  नाही........ आणि" ....... अंजली बोलायची थांबली

" आणि काय अंजली?" ...... आकाश , ती काय बोलेल विचार करत आता त्याचं हृदय धडधडायला लागलं होते

" माझं एकदा लग्न जुळल होतं..... इंगेजमेंट सुद्धा झाली होती...... पण ते नंतर मोडलं" ... अंजली

" का मोडले.?" ... आकाश

" त्या लोकांनी  वेळेवर खूप मोठा हुंडा मागितला........ माझे वडील ते देऊ शकले नाही..... त्यामुळे त्यांनी मग लग्न मोडलं...... त्याचे  माझ्या वडिलांनी फार मोठा टेन्शन घेतलं आणि त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते आम्हाला सोडून  गेले" ........ अंजली चे डोळे आता थोडे पाणावले होते.......

" ओह सॉरी अंजली"  .....तिला पाण्याचा ग्लास देतो आकाश बोलला..." .मला तुझं मन नव्हतते दुखवायचं.... तु ठीक आहेस??"

" ह्म्म" .....अनजली

" तुला तो मुलगा आवडत होता काय?" ...... आकाश

" नाही ......म्हणजे घरच्यांनी लग्न जुळवले होतं... दोन-तीनदा भेटलो होतो एंगेजमेंट नंतर...... बाकी काही नाही"  ....अंजली

" अगं पण त्यात मला नकार देण्याचा त्याचा काय संबंध?...... मी आवडलो नाही का तुला?" .... आकाश

माहीच  सगळे लक्ष आकाश आणि अंजली कडे होतं.....टेबल वरचा चमचा हातात घेत, तो वाजवत ती त्यांच्याकडे बघत बसली होती...

" माही सगळे आपल्याकडे बघत आहे... तू मला खूप एम्बॅरास फील करवते आहे..... स्टॉप इट" ..... अर्जुन

तरी माहि चे  चमच्याने ठकठक करण सुरू होतं आणि तिचे लक्ष त्या दोघांकडे होतं.....

" माही..." ...त्याने तिचाा हात पकडला आणि तिच्या हातातून चमचा काढून बाजूला ठेवला

" इतक्या वेळा पासून काय बोलत आहेत हे दोघे??.....आणि हे काय आकाश सर माझ्या ताईला रडवत आहेत?" ..... ती खुर्ची उठत तिकडे वळली....

" माही इथेच बस..... त्यांना त्यांचं बोलू दे...... अंजली रडत नाही आहे,  फक्त थोडी भाऊक झाली आहे,  तू काळजी करू नकोस,  आकाश तिला नीट हँडल करेल" ..... अर्जुन

माही परत वळून जागेवर बसली......

वेटर चहा आणि कॉफी घेऊन आला......

चहा पीत तिचं लक्ष आता बाजूला बसलेल्या एका मुलीवर गेलं , तिने हाफ शोल्डर टॉप घातलं होतं आणि जीन्स घातला होता,  त्या जीन्स वर टोंगळे जवळून  दोन-तीन ठिकाणी फाटलेल्या सारखं होतं.....

माही कसंनुस तोंड करत बघत होती....... " किती फाटलेले कपडे घातले तिने,  कसं दिसतंय ते.??...कपडे अंग झाकण्यासाठी घालायचे असतात की अंग दाखवण्यासाठी घालाlयचे असतात?" ......... माहि तिच्याकडे बघत बडबडत होती

" आज-काल तसेच कपडे घालतात.... फॅशन आहे तशी....... इथे तर सगळे तुझ्याकडे बघत आहे तूच अशी कशी वेगळी दिसते आहेस.... अंजली तरी तुझ्यापेक्षा बेटर दिसते...... हे असे एवढं तेल लावून कोणी वेणी घालतात का आता? ...... तू बघ स्वताकडे कशी अठराशे च्या जमान्यातली दिसते आहेस" ......... अर्जुंन आता तिची मस्करी करायचा मूड झाला होता.....

" हा.....?" .....ती डोळे मोठे करत अर्जुनला बघत होती

"तुम्ही बघा स्वताकडे किती डेंजर दिसत आहात ते".....माही

" तुझे डोळे बघ किती डेंजर आहे मांजरीसारखे,  मला म्हणते " .....अर्जुन

" तुमचं नाक बघा,  समोसा सारखं" .....माही

अर्जुन आणि माही मध्ये आता भांडण सुरू झालं......आता ते दोघे इतक्या जोराने बोलत होते की सगळे त्यांच्याकडे बघत होते........ आकाश आणि अंजली सुद्धा काय झालं म्हणून त्यांच्याजवळ धावत आले....... आणि त्या दोघांना सावरलं......

" भाई काय करतोय तु ? सगळे बघतात आहे  आपल्याकडे.." .... आकाश

" माही चूप बस आता.... एक शब्द नाही.." ... अंजली

तसे ते दोघं चूप बसले

" आकाश मला वाटतं आता आम्हाला निघायला हवं" ..... अंजली

" अंजली प्लीज असा एकदम  निर्णय नको घेऊस... हवं तर थोडा वेळ घे..... आणि आरामात कळव मला काहीच घाई नाही" .... आकाश

" माझं ठरलंय आकाश .....तुम्ही  दुसरी मुलगी बघा , माझी वाट बघू नका" ..... अंजली

अर्जुन आणि माही एकमेकांना रागाने बघत होते......

माही आणि अंजली त्यांना बाय करून निघून गेल्या

" भाई तुला काय होतं.... ती माहि समोर असली की,  तू असा कसा भांडायला लागतो..?... तू कोण आहेस हे सुद्धा विसरून जातो.?" ... आकाश

" इट्स ओके,  चल निघूया,  तसेही तिने माझं डोकं खराब केलं आहे " ...अर्जुन

दोघं घरी निघून आले

*****

अंजलीला सुद्धा आकाश आवडला होता पण आधी एकदा तिचं लग्न तुटल्यामुळे तिला आता भीती वाटत होती.... त्यामुळे तिने त्याला नाही म्हटले होते..... माहिला हे सगळं कळत होतं तिला पण माहिती होतं की आकाश अंजली ला आवडला आहे.... महिने तिला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला होता पण अंजली ऐकायला तयार नव्हती.... इकडे आकाशाचे मात्र प्रयत्न सुरू होते त्याने हार मानली नव्हते.

******

आकाश आणी अर्जुन ...अर्जुन च्या केबिन मध्ये बसले होते.... आकाशने माहिला केबिनमध्ये बोलवले

" बापरे आता का बोलवलं  यांनी.??..... त्या दिवशीचा राग तर नाही काढणार ना हा ड्रॅक्युला.???...  मला नोकरीवरून तर नाही काढणार ना.???..... माहि तुला पण काय गरज होती त्यांना नको ते बोलायला??.... पण त्यांनी तर आधी सुरू केलं,  अशी दिसते... तशी दिसते" ... अर्जुन च्या केबिन समोर येऊन उभी राहात माहि तिथेच पाच मिनिटे विचार करत उभी होती

" हे बघ .....ही अशी नमुना आहे ....तिला माहिती आहे केबिनमधून बाहेरच सगळ दिसते तरी बघ तिथे उभी आहे.........तुला खरंच वाटते ही तुला मदत करेल?" ....... अर्जुन आकाश कडे बघत बोलला

" भाई प्लीज तू तुझ्या रागावर कंट्रोल ठेव..... बाकी मी बोलतोय तिच्यासोबत  " ....आकाश माहिला तिथे विचार करत उभा असलेला बघून हसतच बोलला

" मिस माही देसाई तुम्ही आत मध्ये येऊ शकता." ..... अर्जुन च्या आवाजाने माही भानावर आली आणि आत मध्ये गेली

" काही काम होतं सर.....?" . माही

" आज तर दोघं मिळून माझी वाट लावणार दिसत आहे...आकाश सर किती चांगले शांत , अर्जुन सर त्यांना स्वतः सोबत ठेवून स्वतासारखं बनवणार दिसत आहे.......... भोगा आपल्या कर्माची फळं" ... माही मनातच विचार करत बोलत होती

" माही येथे बस आरामात.." .. आकाश तिला सोफ्यावर बसायला सांगत बोलला.... माहिने एक कटाक्ष अर्जुन वर टाकला,  अर्जुन एकटक तिला बघत होता..... ती सोफ्याजवळ जाऊन उभी राहिली आणि अर्जुन कडे बघत होती....

"व्हॉट.......?"  ...अर्जुन

"ह.???"....माही

"माही आकाश तुला बसायला सांगत आहे ....तू सोफ्यावर बसू शकतेस." .... अर्जुन

माही मान हलवत सोफ्यावर बसली..

" आकाश सर बोला काय काम होतं?" .... माही

" माही मला अंजली खूप आवडते.... आणि मला माहिती आहे तिला सुद्धा मी आवडतो....... मी खूप विचार केला ,  माझे मला कळलं आहे की मी अंजली वर प्रेम करतो आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे....तिच्या नकाराला होकारा मध्ये कसं बदलावयच त्यासाठी तू मला मदत कर." ..... आकाश

" सर पण मी कसं?" .... माही

" माही , आता तूच काय ते मला मदत करू शकते,  नाहीतर मला काहीच कळत नाही आहे?"  ......आकाश

" आकाश अशी कशी नाही म्हणते ती..... आपण आपल्या कंपनीचे काही शेअर्स तिच्या नावावर करू,  तिला तु ते गिफ्ट  दे ....लगेच डिल फायनल होईल" ...अर्जुन

"डिल???....... लग्न म्हणजे काय  डील असतं का??? ...... आणि तसं पण मी माझ्या ताईला चांगलं ओळखते ...ती अश्या गिफ्ट नी वगैरे मानायची नाही." ......माही कसतरी तोंड करत अर्जुनला बोलली

" ओह... रियली.??.... मुली अशाच मानत असतात" ... अर्जुन

" ठीक आहे तुम्हाला जास्ती कळतं तर तुम्ही तुमचा प्रयत्न करा ...देऊन बघा गिफ्ट ..मी चालले"  ....माही जागेवरून उठली

" भाई प्लीज अंजली यांची बहीण आहे...माही ला जास्ती कळेल ना तिला काय आवडते काय नाही ते"  .... माहि प्लीज बस" ....आकाश

" हा माही सांग मग..... काही आयडिया दे... काय करायचं?" ... आकाश

माही विचार करत फिल्म मधल्या घास्यपिट्या आयडिया सांगत होती... जसा की गुंडांनी एकट तिला पकडायचं आणि मग आकाशने तिला त्या लोकांना मारून सोडवायचं.... असं काहीबाही सांगत होती...

" किती फिल्मी आहे ही??....... तू मुव्हीज खूप बघते का ग.??.... किती बोर आयडिया देत आहे??..... असा रिअल लाईफ मध्ये काही नसतं.." .अर्जुन

" हो माही दुसरं काही सांग?" .... आकाश

माही विचार करत बसली होती
" मला चहा आणि जिलेबी पाहिजे" ........माही

" काय...? ... हे कोण सोबत खातं?" .......अर्जुन डोक्यावर हात मारत बोलला

" मला काही सुचत नाही आहे,  मला भूक लागली की माझं डोकं काम नाही करत?" ...,माही

" ओके ... ओके..... वेट मी पिउन ला सांगतो" ....आकाश

" बापरे किती नखरे या मुलींचे?" ..... अर्जुन कपाळावर आठ्या पाडत बोलला

"भाई प्लीज ना" ...आकाश...

पिऊनने चहा आणि जिलेबी आणून दिले...... माहि ते खात होती... ते खाताना तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता.... जिलेबी तिची फेवरेट  होती...... आकाशला काही फोन आला म्हणून तो फोनवर बोलत होता..... अर्जुन फाईल मध्ये काहीतरी काम करत होता..... काम करता करता त्याचा लक्ष तिच्या कडे गेले...... तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याला सुद्धा मनातून खूप आनंद झाला...... आणि एकटक तिला बघत बसला

"कधीकधी किती निरागस वाटते ही..... तर कधीकधी फालतू बडबड करत असते ...शांत असले की खूपच गोड वाटते" ..... तिला बघत अर्जुन च्या डोक्यात असे वेगवेगळे विचार येत होते...

माही हात धून परत येऊन बसली..... आणि तिने आकाशला एक आयडिया सांगितली..... पहिले तर तो मानायला तयार नव्हता पण नंतर मनाला...

" किती वेळ लागतो तुम्हाला,  एवढ्या वेळात तर माझ्या तीन-चार डिअल्स साइन झाल्या असत्या" ..... अर्जुन त्या दोघांच्या बाजूला येत भिंतीला टेकून उभा राहत बोलला

" प्रेम म्हणजे काही डिल नाही.... जी पटकन होणार" ..... माही बोलतच असते की आकाशचा परत फोन येतो आणि तो फोन घेऊन बाहेर जातो.... माही मात्र आपल्याच तंद्रीत होती ..फिल्मी भूत घुसला होता तिच्या अंगात.... तिच्या या वाक्याने अर्जुन तिला बघत बसला

" प्रेम म्हणजे काही डील नसते...... जी पटकन होणार आहे..... प्रेम म्हणजे मनावर हळुवार फुंकर घालावी लागते..... मनाशी मनाचं नातं जोडलं गेलं पाहिजे..... त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो..... त्यासाठी घाई केलेली चालत नसते...... प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घ्यावे लागते" ...... म्हणत ती अर्जुन जवळ जात होती.... अर्जुन एकटक तिच्याकडे बघत होता, नी तिचे बोलणे ऐकत होता .... ती पण अर्जुनच्या डोळ्यात कैद झाली होती...... त्याचा जवळ जाऊन तिने त्याची टाय आपल्या हातात पकडत स्वतःकडे ओढली.......त्याला तिच्या या फिल्मी वागण्याचे हसू येत होत....पण त्याचे मन सुद्धा तिच्या त्या वागण्यात सामील होते....तीच असा स्वतःहून त्याच्या जवळ येणे त्याला सुखावत होत..... तो पण आता तिच्या अगदी जवळ आला...... त्याच्या डोळ्यात बघत तिचं बोलणं कंटिन्यू सुरू होतं....."  प्रेम म्हणजे एकमेकांच्या आनंदात आनंदी होण...... प्रेम म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवण...... प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांची किंमत करणे..... प्रेम म्हणजे न बोलता मनातलं समजून जान.... प्रेम म्हणजे डोळ्यांनी डोळ्यांची भाषा बोलणं..... प्रेम म्हणजे सोबत नसताना पण एक दुसऱ्याचं होऊन जाण..... प्रेम म्हणजे शरीराने एकत्र नसले तरी मनाने एकत्र असणं........ आप नही समझोगे अर्जून बाबु......"

त्याचे कान जरी तिचं बोलणं ऐकत असले..... त्याचे डोळे मात्र तिच्या बोलताना हालचाल करणाऱ्या ओठांवर खिळले होते...... त्याला तसं बघतांना आता माहिच्या हृदयाची धडधड वाढली होती........ त्याने त्याचा एक हात तिच्या कंबरेत घालून तिला स्वताकडे घेतलं....... त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठले....... तो आता एकदम तिच्याजवळ जात होता..... त्याचे ओठ तिच्या ओठां जवळ येत होते..... तिचे ओठ मात्र आता भीतीने थरथरायला लागले होते...... त्याला इतका जवळ येताना पाहून तिने तिचे डोळे बंद करून घेतले....... तिच्या अशा वागण्याने त्याच्या गालात हसू आले..... " प्रेम म्हणजे एकमेकांच्या दुःखात सामील होण.....प्रेम म्हणजे एकमेकांचे सुख दुःख वाटून घेणे....... प्रेम म्हणजे तुझ्याशिवाय जगणं कठीण होणे." .... अर्जुन हळूच माहीच्या कानाजवळ जात बोलला...... त्याच्या शब्दाने ती भानावर आली..... तिने डोळे उघडले तर ति अर्जुनच्या मिठीत होती..... तिने त्याला दोन्ही हाताने धक्का देऊन दूर केलं.... आणि तिथून पळतच बाहेर पडली.....

अर्जुन िच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत उभा होता....

" काहीच कळत नाही तुला प्रेम म्हणजे काय असते"  ....त्याने एक मोठा श्वास घेतला......

*******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️