Aug 18, 2022
सामाजिक

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 5

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 5

भाग ५

माही वॉश रूम मधून बाहेर आली, पर्स नी फाईल घेऊन जायला निघाली , दार उघडायला गेली त तिच्या लक्षात आलं दार बाहेरून बंद आहे ... ती घाबरली , दाराच नोब सतत फिरवत होती पण दार उघडत नव्हते .... आता तिला रडायला आले ... तिने मोबाईल काढला तर तो पण बंद झाला होता, ... आता तिला एसी मध्ये पण घाम फुटायला लागला , ती भिर भिर इकडे तिकडे बघत होती .. खिडकी जवळ आलो काही मदत मिळते काय बघायला पण तिथे पण कोणी नव्हते .... ... तिला ती भयाण रात्र आठवली... ती रडकुंडीला आली... ..

घरचे, मीरा वाट बघत असतील, फोन पण नाही ,काय करू मी आता ....

खूप वेळ झाला तरी कुणी आला नव्हते की कुणी दार उघडला पण नव्हते, गुंतलेले केस आवारात  ती खिडकी तून बाहेर बघत होती कोणी दिसतंय काय , पण रूम पण इतक्या उंचावर होती की तिचा आवाज पण नसता गेला ....

तेवढयात मागून कुणीतरी तिच्या ब्लाऊज ची मोत्यांची दोरी ओढली तशी ती घाबरून मागे फिरली... तो होता... ती त्याच्या कडे बघत, खाली बघत सगळे मोती खाली पडत होते ... परत तिने रागाने त्याच्या कडे बघितले...
ती मदती साठी ओरडणार तेवढयात तो म्हणाला ओरड जितकं ओरडायचे, कोणी येणार नाही... माझं हॉटेल आहे हे इथे मला कोण काय बोलणार.. तशी ती चूप झाली..

कळलं न तुला मी काय काय करू शकतो ते आता, सांग कोणी पाठवलं होत तुला इथे माझा शो खराब करायला..तो राग ओकत तिच्याकडे बघत बोलत होता ..

त...तुम्ही क.. बोलताय... मला काहीच कळत नाहीये... आणि हे काय तुम्ही माझ्यासोबत असा नाही वागू शकत... ती त्याच्या कडे थर थर कापत बोलत होती... आणि दाराकडे जायला निघाली...

माझं बोलणं झालं नाहीये अजून असा म्हणत त्याने तिचा दंडाला पकडून तिला ओढला नी दार बंद करून दारवर आपटला... नी तिच्या कडे रागाने बघत होता ...

ती रडवली झाली, मी खरंच सांगतेय मी चुकून आले इथे, मी त्यांना पण सांगत होते.. त्यांनी पण कोणीच माझं ऐकून नाही घेतले ..... मी मीटिंग साठी आली होती ... रस्ता चुकली...

अच्छा किती पैसे खाऊ घातले त्यांनी तुला...... मी चांगलं ओळखतो तुझ्या सारख्या मुलींना ... तुला कळते काय आज माझं करोडोच नुकसान होता होता वाचलंय .. कसातरी सगळा हाताळला मी हे ... बोल. पटकन कोणी पाठवलं तो खूप जोर्यानी ओरडला ..

ती अजून घाबरून दचकली...
ती त्याच्या डोळ्यांकडे बघत होती, आता तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होत, तो तिच्या निळ्या डोळ्यात बघत होता ... तिला तसं बघून त्याला वातलेल कुठेतरी बघितले हे डोळे पण त्याला काही आठवत नव्हतं.....तो एकटक तिच्या कडे बघत होता ... आता राग थोडा कमी झाल्यासारखं वाटत होत

खूप दुखतय, हाथ सोडा ... तिच्या डोळ्यातून पाणी खाली ओघळल ..ते बघून त्याला पण आता थोड खराब वाटत होत... त्याने तिचा हाथ सोडला ... ती त्याचा कडे बघत होती ... तो तिच्या पासून दूर झाला नि मागे वळून उभा राहिला... तिने तिची पर्स नी फाईल उचलली नी जायला दारच नोब उघडायला लागली ..

थांब.... त्याच्या आवाजाने तिने परत वळून बघितले , तो तिच्या जवळ येत होता...तिला परत भीती वाटायला लागली... आता हा काय करतो आपल्यासोबत ..तो तिच्या जवळ आला..थोड पुढे झुकला नी हाथ तिच्या खांद्याकडे न्यायला लागला ... ती थर थरली.. तिच्या तोंडून शब्द च पडत नव्हते.. ती फक्त त्याच्याकडे बघत होती..त्याने हाथ मागे केसांजवळ नेला नी तिच्या केसांच क्लच काढून तिचे केस मोकळे केले.....

जा आता ... परत मला दिसू नकोस ..... असा बोलून तो वळला..तिने पटकन दार उघडलं नी पळतच ती लिफ्ट मध्ये आली नि बाहेर गेली, ती बाहेर आली , खूप रात्र झाली होती जवळपास ११ वाजत आले होते... ऑटो पण दिसत नव्हते, ती खूप घाबरली .. तिला राहून राहून ते आठवत होते... कसाबसा एक ऑटो भेटला , त्यात बसून ती गेली..तो वरतून खिडकी मध्ये उभा होता तिला बघत होता..

मी तिला बघितले... कधीतरी....का मला तिच्या बद्दल वेगळच फील झालं.... तिच्या डोळ्यातले पाणी आठवले नी त्याने मुठ आवळली नी भिंतीवर मारला...

हो हा आपला अर्जुन च ... या तीन वर्षात तो खूप बदलला होता.. त्याने बिस्नेस खूप मोठा केला होता, आता ap कंपनी ap and group of industries झाली होती,  बाहेरच्या देशात सुद्धा त्यांचे ऑफिसेस होते . खरतर त्याच्या घरचा फक्त टेक्सटाइल च बिजनेस होता ... पण आता त्याने वेगवेगळ्या फील्ड मध्ये पण पदार्पण केले होते, हॉटेल्स होते त्याचे बऱ्याच ठिकाणी .. नी आता डायमंड ज्वेलरी बिझनेस  टेक ओव्हर केला होता... त्याचाच आज डील होत आणि तोच शो आज सुरू होता... जिथे माही ने येऊन गडबड केली होती ..

माही घरी पोहचली, डोळे नीट पुसले, अवतार ठीक केला नि आतमध्ये गेली. आई आत्याबाई बसल्या च होत्या, माही ने आई कडे बघितले नी मीरा येवढाच म्हणाली , आई ने तिला सांगितले अंजु सोबत झोपली आहे ... तेवढयात आत्याबाई नी तोंडाचा पट्टा सुरू केला उशिरा येण्याबाबत.... माही बोलली मीटिंग थोडी उशिरा पर्यंत चालली , नी फोन ची बॅटरी पण गेली म्हणुंन कळवता नाही आला ... ऑटो पण नव्हता भेटत..

बरं जा अवरून ये जेवायला वाढते... माही ची भूक च गेली होती, ती जेऊन आली सांगून आतमध्ये चालली गेली ...

सगळं आवरून ती बेड वर आली, मीरा ला कपाळावर किस केले नि तिच्या बाजूला पडली..

तिला झोप येत नव्हती, संध्याकाळ च घडलेलं सगळं तिच्या डोळ्यासमोर दिसत होत, नी मग ती त्या डोळ्यावर येऊन थांबली, कुठे बघितले मे ते डोळे .. तिला काही आठवत नव्हते , पण कुठेतरी बघितले तिला वाटत होत, असाच विचार करत ती झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठली, पटापट सगळं आवरून, सर्वांना बाय करून ऑफिस मध्ये गेली.

ऑफिस मध्ये पाय ठेवताच सगळे तिच्या कडेच बघत होते , ती आतमध्ये जायला निघाली तेवढयात पिऊन येऊन बोलला तुम्हाला सर नी आत बोलावले आहे ..

तशी ती केबिन मध्ये गेली, त्यांचे बॉस रागात बसले होते...
दोर नोक करून मी आत येऊ का विचारले
या या मिस देसाई... बसा
तशी ती बसली ..
ऑफिस च्या पहिल्याच दिवशी तुम्ही खूप मोठे काम केलेय ऑफिस साठी...
ती डोळे फाडून त्यांच्या कडे बघत होती...
you are fired... मिस देसाई ..
तिला काही कळेनासं झालं... सर ते मी...मी..मुद्दाम नाही केले... मी पोहचले हो....
मला काही ऐकायचं नाही ....बॉस ओरडला
तुमच्या मुळे खूप मोठं नुकसान झालंय कंपनी च...
तुम्हाला काढलाय कामावरून..

गेट आउट...

तिच्या डोळ्यात पाणी आले , फाईल टेबल वर ठेऊन ती बाहेर पळतच आली ते थेट बाहेर गेली, तिच्या चमेली जवळ येऊन रडू लागली... .
तिला काहीच समजत नव्हते... काय करू ...कुठे जाऊ..जॉब ची गरज होती खूप..
ती गाडी वर बसली नी निघाली आपल्याच विचारात...

रस्त्यांनी जातांना तिला एक देऊळ दिसले , तिने गाडी पार्किंग मध्ये लावली नी पायऱ्या चढत वर देवळात आली, हाथ जोडले ,नमस्कार केला नि बाहेर झाडाजवळ कठड्यावर येऊन बसली..

डोक्यात खूप विचार सुरू होते
बाप्पा का रे असा माझ्या सोबतच का होत, मला जॉब ची किती गरज होती , तुला माहिती होत ना ..  आता काय करू , काय सांगू घरी जाऊन... इथे मुंबई ला आलो , आत्याकडे.. तीच जुना वडिलोपार्जित घर आहे म्हणून सोय झाली, तिचा शिवणकाम च छोटंसं काम चालेल.. आई ताई तिला मदत करतात, पण असा कितीस भागणार त्यात , मुंबई मध्ये राहायचं तर खूप पैसे लागतात... कसातरी जॉब भेटला होता ...सगळे किती खुश होते ... सगळं मार्गी लागेल असा वाटत होत ... पण त्यात हे असा भलतच होऊन बसलं... विचार करत बसली होती , समोर बघत, अचानक एक आजी तिथे पायऱ्या उतरतांना चक्कर आल्यासारखे खाली बसल्या , ती धावतच त्यांच्या जवळ गेली..

काय झालं आजी ... बर नाही काय वाटतं तुम्हाला.. तिने लगेच पाण्याची बॉटल काढली , त्यांना पाणी दिलं .. तस त्या आजी ना थोडं बरं वाटलं..
काही नाही ग आता बर वाटतेय, देवळात यायचं म्हणून काही खाल्लं नाही , नी आता वयोमनणे होतेच असं .
माही त्यांना आधार देऊन कथड्या जवळ येऊन बसवलं .
मदत झाली बघ तुझी.. काय ग नाव तुझं
माही.. माही ने सांगितले
मघापासून बघत होती, काय विचारात होती... आजी
काही नाही हो असाच आपलं रोजचच ..
सांग ग बाळा , आजी म्हणालीस ना मला, सांग बघू मग, मदत झाली तर होईलच माझी नाही तर मन च हलके होईल तेवढे...
माही ला पण वाटले मन हलके करावं तसं पण त्यांच्या जवळ बोलण्याने काही कोणाला कळणार थोडी..  मग तिने सांगितले पहिल्याच दिवशी माझी नोकरी गेली, नी थोडाफार जे घडले ते सांगितले..
खूप गरज होती हो आजी मला नोकरी ची ... घरी जाऊन काय सांगावं काहीच कळत नाहीये...
बाळा बाप्पा जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो , विश्वास ठेव त्याचावर... सगळं ठीक होईल.. नको काळजी करू....आजी

खूप सुंदर आहे ग तुझी ओढणी.. खूप छान काम केलंय ..
कुठून घेतले...आजी
तशी माही हसली
धन्यवाद आजी, कुठून काय हो, मी केलंय हे काम ...
अरे होका , खूप सुंदर केलंय ग, मोठं मोठ्या डिझायनर ला मागे सोडेल अस काम आहे बघ...खूप छान..
माझ्या आत्याबाई च हेच छोटंसं काम आहे , तेच मग आम्ही तिला त्यात मदत करतो, आणि हे विणकाम, टाके हे माझं खूप आवडत काम आहे तर मी माझ्या ओढणी वर करत असते ....माही त्यांना सांगते.

अरे वाह खूप छान...तुझ्याकडे किती आहेत अश्या ओढण्या ,...आजी

आहेत बऱ्याच... पण का हो, तुम्हाला आवडल्या काय तुम्ही घालणार काय.. माही हसत आजीकडे बघत बोलली

आजी ला पण हसू आल, ... तुला बघुन घालायची इच्छा झाली तशी माझी अस म्हणून दोघी खळखळून हसायला लागल्या...

बरं ऐक आमचा असाच कपडे डिझायनिंग चा बिझनेस आहे ..तर तुझ्या सगळ्या अशा छान काम केलेल्या ओढण्या दाखवायला उद्या घरी घेऊन ये ... बघू मग पुढे होत काय काही कामच... म्हणत त्यांनी त्यांचा पत्ता तिला दिला.

माही खुश झाली ... ठीक आहे म्हणाली
आजी ने ड्रायव्हर ला फोन केला , तो घ्यायला आला
माही ने आजी ला कार मध्ये बसायला मदत केली. कार पुढे गेले...

माही पण चमेली जवळ आली किल्ली लावली नी आनंदाने घरी गेली.

चप्पल काढतच होती की मीरा येऊन तिला बिलगली.. माऊ माऊ आली म्हणून टाळ्या वाजवत उड्या मारत होती. तिने मीरा ला उचलून घेतले तिला किस केले तेवढयात आत्याबाई आल्या, येवढ्या लवकर कशा आल्या मॅडम घरी ... काय काही घोळ घालून आल्या की काय...
तशी आई ताई पण बाहेर आल्या..
माही ने मीरा ला खाली उतरवला तशी ती खेळायला पळली ..
का ग काय झालं आज अशी लवकर का आली... आई
मला कमवरून काढलंय... ती हळु आवाजात बोलली

तरीच मला वाटलच, मॅडम जिथे जातात घोळ करून येतातच
आई माझी काही चुकी नव्हती ग ... खरंच.... नी मे तिने काल जे घडलं ते हॉटेल रूम चा भाग सोडून सगळं सांगितले...
आत्याबाई ने डोक्यावर हात मारून घेतला... अशी कशी ग तू धांदरट...
आता काय करायचं आपल्याला काहीतरी करावं च लागेल ना ... आई काळजीत बोलली
मग माही ने तिला देवळात घडलेलं सांगितले नी उद्या जायचं त्यांच्या कडे बोलली
सगळ्यांना मग थोड बर वाटलं... ..
माही ने सुटकेचा निःश्वास सोडला नी ती आतमध्ये मीरा सोबत खेळण्यात रमली..

*********

क्रमशः






 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️