Dec 03, 2020
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 4

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 4

भाग ४

माही हातात फाईल घेऊन हॉटेल sunshine समोर उभी होती . ते एक पंचातरिका हॉटेल होते, जवळपास ३०-३५ मजली भव्य , सुंदर अशी  बिल्डिंग होती ती , आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान मेन्टेन केला होता . तिने मोबाईल मध्ये बघितले, चला १५ मिं आधीच पोहचलो .. खुश होत ती आतमध्ये जायला निघाली , द्वारपाल ने ते भव्य असे काचेचे दार उघडले , तशी ती आतमध्ये गेली .

आतमध्ये आल्यावर ती सगळं न्याहाळत होती, मोठं मोठे झुंबर, लाइट्स ...सगळं कसं डोळे दिपून टाकणारं होत . ती पुढे चालतच जात होती की तिथला मॅनेजर पुढे आला,

गूड इविनिंग म्याम , वेलकम  टू Sunshine हॉटेल, मे आय हेल्प यू , आर यू लूकिंग फोर समथिंग स्पेशल ?

आपली माही इंग्लिश मध्ये तशी ढ च पण थोडा तिला हाय हॅलो पर्यंत समजायचं ..

माही त्या मॅनेजर ला sp कंपनी ची  मीटिंग कुठे आहे विचारात होती की तेवढयात मॅनेजर चा सहकारी काही विचारायला आला आणि त्यांनी sp ऐवजीं ap ऐकले आणि तो बोलला म्याम फिफ्त फ्लोर राइट साईड . ती ऐकून निघून गेली . लिफ्ट मध्ये आली , ५ नंबर च बटन प्रेस केले ,  हे सगळं बघून आता थोडी ती नर्व्हस झाली होती , लिफ्ट ५ मजल्या वर आली , ती घाबरतच लिफ्ट चा बाहेर आली आणि उजवी कडे जायला निघाली , बरीच माणसं ये जा करतांना दिसत होती, तिला वाटलं तिकडेच मीटिंग आहे ती आतमध्ये गेली .

****

भव्य हॉल होता ओपन टेरेस, सगळीकडे लाइट्स , कॅमेरा , फॅशन शो सारखी स्टेज ची अरजमेंत केली होती  ... कसला तरी प्रोग्राम सुरू होणार होता , सगळे स्टेज चा बाजूने बसले होते आणि त्यांच्या मागे खूप कॅमेरा रिपोर्टर उभे होते ..
हो तिथे एक डायमंड & brides असा कॉन्सेप्ट चा मोठा फॅशन शो होता .

इकडे हॉल ला लागूनच काही रूम्स होत्या जिथे मॉडेल्स ची तयारी सुरू होती , सगळ्या मॉडेल्स एकदम नवरी चा गेटअप मध्ये होत्या, हेवी ज्वेलरी ,मेकप , हाय हिल्स , सगळं कसं परफेक्ट होत.
फॅशन शो मॅनेजर ची गडबड सुरू होती, तो ज्युली वर ओरडत होता .. त्यांची शोज टॉपर अजून पर्यंत आली नव्हती, मॅनेजर खूप टेन्शन मध्ये होता ,बॉस ला कळलं तर आपली काही खैर नाही तो समजलं होता , जॉब जायची भीती त्याला वाटत होती .. त्याची अशी गडबड सुरू होती तो सारखा फोन वर इकडे तिकडे फिरत चौकशी करत होता.. इतक्यात तो एका मुली ला धडपडला , तो बघतच तिच्यावर ओरडायला लागला ही काय वेळ आहे काय यायची, बॉस ला कळलं तर माझं तर जाऊ दे तुझं पण काही होऊ शकणार नाही ...
ती धडपडलेली मुलगी दुसरी तिसरी नसून आपली माही होती
ती डोळे फाडून त्या मॅनेजर कडे च बघत होती , नंतर आजूबाजूला बघितला , सगळ्या मुली उभ्या होत्या तयार होऊन, आणि मग तिला कळलं आपण चुकीच्या ठिकाणी आलोय .. ती परत जायला फिरली तर ज्युली नी तिचा हाथ पकडला आणि ड्रेसिंग रूम कडे घेऊन जाऊ लागली
मी चुकून .... माही काही बोलणार तेवढयात मॅनेजर ओरडला आपल्याकडे बिलकुल वेळ नाहीये , बोलत काय बसलाय तयार करा तिला, .. फक्त ५ मिन उरले शो सुरू व्हायला...

सर येवढ्या कमी वेळात कसं तयारी करायची .. ज्युली
कपडे राहू द्या तेच, ज्वेलरी घालून द्या आणि थोड टच अप करून द्या फक्त..... फास्ट फास्ट .... मॅनेजर
पण सर आपली कलर थीम तर रेड आहे .. यांनी डार्क ब्ल्यू घातलेलं आहे..ज्युली
असू द्या शोज टॉपर आहे , मुद्दाम वेगळा रंग दिला संगुया ...now no more discussion on this .. hurry up fast guys ... मॅनेजर भडकला.

माही फार घाबरली .. त्याचा आवाजाने.. मला जाऊ द्या मी चुकून आलेय इथे , ..मला .. फाईल ... कोणीच तीच बोलणं ऐकत नव्हते

इकडे शो सुरू झाला होता, जोरात हाय वोलम मुजिक सुरू झालं होत , मॉडेल्स एक एक करून रॅम्प वॉक करत येत होत्या... डोळे दिपवणार शो सुरू होता
पत्रकार फोटो काढत त्यांचे काम करत होते
मोठ मोठे बिस्नेसमन आजूबाजूला बसले होते

त्यांनी माही ला तयार केले..
माही त्यांना विनवणी करत होती जाऊ द्या ,माझं काम आहे पण त्या लाऊड मुजिक मध्ये कोणालाच काही ऐकायला जात नव्हते.

आणि आता अनाउन्समेंट झाली शोज टॉपर ची
ये काकूबाई ते चप्पल काढ आधी आणि त्या हाई हिल्स घाल .. फास्ट अस म्हणत तिला हिल्स घालायला दिल्या
माही कशी बशी घालतच होती की परत शो टॉपर ची नाव घेतल्या गेले तसेच जुईली नी तिला स्टेज वर ढकलल.

आणि माही स्टेज च्या मध्ये येऊन उभी राहिली स्वतहाला , सगळं सांभाळत
ती कशी बशी उभी राहिली सावरून , अन पुढे बघितले ,तसाच तीच अवसान गळून पडलं.. इतकी लोक, सतत क्लिक होणारे फोटो .. तिला काही सुचेनास च झालं

स्टेज चा अगदी समोर मधोमध एक २७ वर्षाचा राजबिंडा तरुण , नेव्ही ब्ल्यू थ्री पीस , अगदी फिटींगच असल्यामुळे त्याची बॉडी एकदम त्यात परफेक्ट दिसत होती , जेल ने सेट केलेले केस, ट्रिम असलेली शेव, डोळ्यात करारीपणा , चेहऱ्यावर कॉन्फिडन्स , ट्राऊझर चा पॉकेट मध्ये हाथ घालून रागाने पुढे माही कडे बघत  उभा होता .. त्याचाच हा शो सुरू होता .

व्हॉट द हेल इज गोईंग ऑन हिअर ..नमन.... तो रागात येऊन बोलला
नमन सुध्धा ते बघून गडबडला होता, काम डाऊन सर मे बघतो काय सुरुये ते असा बोलून तो निघून गेला .

इकडे माही तशीच उभी होती,थोड्या वेळाने बसलेल्या लोकांमध्ये खुसरपुसर सुरू झाली, ज्युली च्या ते लक्षात आले , ती माही ला पुढे वॉक करायला हळू आवाजात सांगत होती ,पण माही ला काहीच ऐकू येत नव्हते समजत नव्हते,.

समोर इतके मोठ मोठे लोकं , सतत पडणारे कॅमेरा फ्लॅश लाइट्स , रिपोर्टर बघून तीच अवसान च गळले होत , पाय थर थर कापत होते , तिला पुढे चलवेना.
ज्युली ने बाजूला उभ्या असलेल्या मॉडेल्स ला इशाऱ्याने काही सांगितले तसे त्या माही जवळ आल्या आणि तिचा हाथ पकडून तिला पुढे घेऊन जाऊ लागल्या .. माही कशी बशी अडकळत सांभाळत चालत पुढे येऊन त्यांच्या सोबत उभी राहिली. मॉडेल्स नी आपापले पोज देऊन परत मागे आपल्या जागेवर जाऊन उभ्या राहिला.

माही तशीच उभी होती, तिची नजर इकडेतिकडे भिरभिरत त्याच्यावर येऊन थांबली , आता तो अगदी तिच्या पुढे उभा होता , तिची नजर त्याच्यावर गेली, त्याच्या ब्राऊन डोळ्यांमध्ये तिला खूप राग दिसत होता, त्याचे डोळे रागाने लाल झाले होते .

माही ला काही कळतच नव्हत, त्याचा नजरेनी ती घाबरली होती , तिने सारी चा पदराच एक टोक बोटांमध्ये फिरवत पकडून ठेवले होते .   तो पण तिला वरून खाल पर्यंत बघत होता आणि त्याची नजर तिच्या निळ्याशार डोळ्यावर गेली आणि कोणास ठाऊक तो थोड्या वेळ साठी त्यात हरवला होता .

माही ने डार्क ब्ल्यू रंगाची  साडी अगदी चोपून घातलेली होती, त्यात तिचा कमनीय बांधा छान दिसत होता, त्यावर बंद नेक चे सेम ब्लाऊज , हाताला फिट्ट अश्या लाँग बाह्य, मागून डीप नेक , गळ्यात ब्रायडल थीम चे नेक पिस ,त्यालाच माचींग थोडे मोठे इअर रिंग्ज घातले होते, कंबरेवर नाजूक वेस्ट चेन, हातात ब्रेसलेट त्यातून एक चेन अंगठी कडे आलेली , तिने सागर वेणी घातली होती , त्यात प्रत्येक वेढ्यान मध्ये नाजूक डायमंड ची फुले खचलेली होती, सगळी ज्वेलरी डायमंड ची होती .. मागून दोन्ही हातावरून ब्रायडल ओढणी अशी पुढे येत घेतली होती, डोळ्यात काजळ, ओठावर पिंकिष लिपस्टिक , साध्या साडी मध्ये सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती . भीतीने डोळ्या आलेलं थोडासा पाणी, घाबरलेले,त्याच्या बघण्याने थोडे लाजले भांबावलेल्या नजरेनी ती बघत होती, त्यात पण ती नवं वधू भासत होती.
तिला बघून त्याचा पण राग थोड्या वेळ साठी कमी झाला होता..
beautiful, awesome असे शब्द त्याचा कानावर पडले तसा तो गालात हसला.
टाळ्यांच्या आवाजाने माही भानावर आली, तशी ती त्याचावरून नजर काढून इकडे तिकडे बघू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या सोबत आलेल्या मॉडेल्स तिथे नव्हत्याच, त्या आपल्या जागेवर गेल्या होत्या , तशी ती बावरली नी आपल्या जागेवर जायला मागे वळणार तोच तिचा तोल गेला नि ती खाली पडली, घाबरून तिने डोळे मिटून घेतले .

लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली, तसा त्यांचा आवाजाने माही भानावर आली तेव्हा तिला कळले की कोणीतरी तिला हातावर पकडलेले होत , तिने एक डोळा उघडून बघितला तर समोर तो रागाने तिच्याकडे बघत होता, तिने त्याचं शर्ट कॉलर जवळ घट्ट पकडून ठेवलं होत , ते बघतच तिने दोन्ही डोळे उघडले आणि त्याच्या बाहुपाश मधून खाडकन खाली उतरली .
त्याने नमन ला काही इशारा केला तसा नमन समजला ...

तेवढयात तिथे ज्युली आली ,  नमन ने तिच्या कानात काही सांगितले तशी ती माही ला तिथून घेऊन गेली .

नमन आजचे आतचे फुटेज मीडिया मध्ये जायला नकोय मला ... येवढे रागात बोलून तो तिथून निघून गेला .

नमन मीडिया कडे निघून आला.

इकडे ज्युली माही ला हॉटेल चा एका रूम मध्ये घेऊन आली , तिला घाबरलेले बघून फ्रेश व्हायला सांगते , ती माहीला तिची पर्स आणि ती फाईल देते आणि तू जाऊ शकते सांगते.  फाईल बघून तिला आपण इथे कशासाठी आलो होतो ते आठवते .. पण वेळ निघून गेलेली आता काही फायदा नाही म्हणून ती चूप होती,
माही वॉश रूम मध्ये आपला रडवलेला चेहरा धुवायला जाते , तिला वॉशरूम मध्ये गेलेले बघून ज्युली बाहेर येऊन डोर लॉक करून निघून जाते .

क्रमशः

 

Circle Image

Megha Amol (Radhika)

Hello friends.. I am Megha Amol.......writing blogs as a Radhika ...... I am computer engineer... I like to explore new things .... I am very much art lover ...my Megha rangolies very much loved by social media friends .... I like reading a lot .... I have started reading books.. novels... historic books from my very young age .....so now I am trying my writing skills here...hope you will likey stories ... Thank you ???? Take care ????