
भाग ३
तीन वर्ष नंतर.....
मुंबई
माऊ sssss उठ ना , शकाल झाली ना ....ये माऊ
अम्म््म जा ना आपल्या ताई माई कडे , बघ तीनी चोकेत शेक बनलाय .. जा बघून ये
मीरा माही चा पोटावर बसत , ये माऊ मी आल्लेडी पिलाय
झोपू दे ना ग , सकाळी सकाळी का उठावते
ये माऊ बघ ना मोठ्ठी शकाल झालिये , शुर्य मामा पण आलाय बघ ना .. मीरा आपल्या इवल्याश्या हातांनी माही चे गोबरे गोबरे गाल ओढत बोलते
अल्ले माझा शोनू , माही मीरा ला मिठीत ओढून परत झोपते
ये गाधडे ... चल उठ लवकर आठ वाजायला आलेय , त्या मीरा ला पण ओढून घेतलेस .. उठ .. लेट व्हायचंय काय ऑफिस ला पहिल्याच दिवशी ... अंजु माही ला पाठीत धपाटा देत बोलली
क..काय आठ वाजलेत , ये तायडे तुला आधी उठवायला काय झालं ग .. उठात मीरा ला किसी देत नाही बोलली
चला मीरा बाळा आपल्याला पटापट तयार व्हायला लागेल नाही आत्या आजी धपाटे घालायची आपल्याला ..
मीरा ये माई कडे .. माऊ ला तयार होऊ दे आज ऑफिस ला जाणार ना आपली माऊ .. अंजु माही कडे बघत बोलली
माही आवर आणि ये खाली , आई ने नाश्ता बनवलाय ... म्हणत मीरा ला कडेवर घेऊन बाहेर गेली ..
चला माही आवरा पटकन पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको ऑफिस ला , काय इंप्रेशन पडायचं आपलं म्हणात बाथरूम मध्ये गेल्या मॅडम..
माही देसाई .. ५.६ उंची, गोरा नितळ रंग, निळे पाणीदार डोळे, छोटंसं सरळ चाफेकळी नाक , गुलाबी नाजूक ओठ जे सतत बडबड आणि खाण्यासाठी उघडत असतात , गुलाबी गोबरे गाल , हसतांना डाव्या गालावर पडणारी खळी,कंबरेच्या खाली पर्यंत काळे सुंदर केस , कमनीय नाजूक बांधा जशी काही अस्मानी अप्सरा च
माही फ्रेश होऊन आली , तिने लेमन येलो रंगाचा कुर्ता चुडीदार घातला , कानात झुमके , कपाळावर छोटीशी ओरंज टिकली , डोळ्यात काजळ , ओठावर फक्त लीप बाम केसांची लांब वेणी घातली, हातात मॅचिंग बांगड्या , पायात पैंजण .. अशी आपली माही तयार झाली .. मेकप चा लवलेश ही नाही
सादगी मे ही सुंदरता है मानणारी
चला माही मॅडम , उशीर व्हायचा , म्हणत पर्स घेतली अन स्वतः ला एकदा आरश्यात बघितले , अरे हे काय ओढणी राहिली, तिने कपाट उघडलल, सुंदर ऑरेंज रंगाची भरीव रेशमी काम केलेली ओढणी काढली अन गळा भोवती दोन्ही शोल्डर वरून घेतली . ओढणी काढतांना तिची नजर एका छोट्याश्या डब्बी कडे गेली , तिने ती डब्बी हातात घेत उघडली, त्यातले लाईट ब्ल्यू रंगाचे २ बटन हातात घेत , अम्म मिस्टर ऐंजल कुठे आहात तुम्ही , तुम्हाला थ्यांक यू म्हणायचं राहूनच गेले.. परत बटन डब्बित ठेऊन कपाटात ठेऊन दिली , डोळ्यात आलेलं थोडंसं पाणी पुसत , चेहऱ्यावर हसू आणात बाहेर पळाली .
आई नाश्ता दे पटकन उशीर होतोय ग..
उठायला नको वेळेवर आणि मग घाई करायची .. सगळे हातात देणारे नोकर च बसले इथे ...आत्याबाई ची बडबड सुरू होती ..
आई ने गरम गरम पोहे आणून दिले , माही ने पटापट ते तोंडत कोंबले नी जायला निघाली
अगं अगं अशी काय करतेय , आज पहिला दिवस ना बाप्पाचा आशीर्वाद तर घे आधी ..आई
हो हो ... माही ने बाप्पा ला नमस्कार केला, बाप्पा नवीन सुरुवात करते आहे , सगळं नीट होऊ दे , सगळ्यांना आनंदी बघायचे मला म्हणत सगळ्यांना हग केले, मीरा ची किसी घेतली .. पिल्लू माऊ येते हा ... खेळ माई बरोबर . म्हणत पायात कोल्हापुरी घातली नी निघणार तेवढयात परत फिरली अन आत्या ला कडकडून मिठी मारली अन तिच्या गालावर किस करत, काय आत्याबाई एवढा राग बरा नाही , तुझ्या सुंदर सुंदर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील ना ... हस बघू थोड असे म्हणत आत्यचे गाल ओढले .. तशी मीरा हसली छोटीशी आत्या आजी रुसली आणि टाळ्या वाजवायला लागली, तसे सगळे हसायला लागले .. सगळ्यांना बाय करून माही आपली स्कूटर घेऊन निघाली ..
एस पी कंपनी मध्ये वेळेत पोहचली , स्कूटर पार्क करत हुश्श पोहचले बाबा एकदाची ..किती ती ट्रॅफिक , थ्यांक ऊ ग चमेली ( चमेली स्कूटर च नाव) आज तुझ्यामुळे वेळेत पोहचले , स्कूटर ला फ्लाईंग किस करत ती आतमध्ये आली, तशी कंपनी छोटी होती , पण माही खुश होती , तिला जॉब मिळाला त्याचीच खुशी होती .. ती receptionist जवळ गेली, ऑफर लेटर दिला . receptionist ने मॅनेजर ला आवाज दिला , सर या मिस माही देसाई , आपल्या न्यू जोईनी, मिस देसाई हे आपले मॅनेजर mr राय , हे तुम्हाला तुमचं प्लेस अँड काम समजवतील..
mr राय , हॅलो मिस देसाई वेलकम टू sp company.. म्हणत शेक हांड साठी हाथ समोर केला, माही ने त्यांना हाथ जोडून नमस्कार केला आणि थ्यांक ऊ म्हणाली, mr राय गालात हसले , ओके चालयच मिस देसाई असा म्हणून ये दोघे आत मध्ये गेले. mr राय नी माही ची टीम सोबत ओळख करून दिली , तीनी पण आपल्या बोलक्या स्वभावानं सगळ्यांसोबत छान मैत्री केली. आज पहिला दिवस होता तर जास्ती काम नव्हतं , ती अपाल काम समजून घेत होती .
mr राय तिला केबिन मध्ये बोलावले
मिस देसाई आज तुमचा पहिला दिवस आहे आणि काम काही नाही त आज तुम्ही लवकर जाऊ शकता
तेवढयात फोन वाजतो, mr राय फोन वर .. ओके सर म्हणून फोन ठेवतो
मिस देसाई mr कमलेश सुट्टीवर आहेत आज तर एक काम कराल काय तसाही तुम्ही लवकर जातआय घरी तर तुम्हाला वेळ पण भेटेल .
माही ..हो सर .. करेल मी
आज आपली खूप महत्वाची एक बिस्नेस मीटिंग आहे हॉटेल sunshine मध्ये संध्याकाळी सात वाजता , तिथे आपले हेड असतील आहे त्यांना ही फाईल द्यायची आहे, sp ग्रुप साठी एक हॉल असेल तिथे जायचं .
ओके सर ... माही
आणि हो थोडा इंपॉर्टन्ट मीटिंग आहे तर ठीक तयार होऊन जावा आणि वेळेत पोहाचा .. सर खूप स्ट्रिक्त आहेत , त्यांना उशीर झालेलं चालत नाही
ठीक सर असा बोलून माही ने फाईल आणि हॉटेल अॅड्रस घेतला आणि ती घरी आली
सगळ्यांना पहिला दिवस कसा गेला सांगून ऑफिस मीटिंग बद्दल सांगून थोडा आराम करावा विचार करून ती ५ च अलार्म सेट करून झोपी गेली .
अलार्म चा आवाजाने ती उठली , आणि मीटिंग साठी तयार व्हायला गेली
आता मोठा प्रश्न घालायचं काय ... ती विचार करत होती , तेवढयात अंजु तिथे आली, तिला असा बघून काय ग काय विचार करतेय, जायचं ना मीटिंग साठी .. हा काय पसारा काढून बसलीय कपड्यांचा
अगं ताई हो , पण काय घालू काहीच कळत नाहीये , सर म्हणाले presentable banun जा निट .. अगा इथला मुंबई च काहीच माहिती नाही ग कसे तयार व्हायचे मीटिंग साठी, त्यात पण हा पहिला जॉब, पहिलाच काम ..माही
हमम अंजु पण विचार करायला लागली
तेवढयात आई एक प्लेन डार्क ब्ल्यू कॉटोन सिल्क साडी हातात घेऊन आली ... ही घे ही घाल ... छान दिसेल, प्लेन आहे , मीटिंग ला सुट होईल ..
माही साडी बघून खुश झाली , साडी हातात घेत आई तू किती हुशार आहेस ग , माझी सगळे प्रश्न झटक्यात सोडवते..????
बस बस पुरे आता लाड , जा तयार हो लवकर ... आणि हो लवकर ये ..आई
हो ग फक्त फाईल द्यायची आहे , थोड्या वेळ काम असेल तर थांबेल आणि येईल लवकर .. नको काळजी करू .. अस म्हणत ती तयार झाली
बाहेर आली तर सगळे बघत होते तिच्या कडे , मीरा ये माऊ खुप्पाच शुंदर दिसतेय तू म्हणत तिने माही ला फ्लाइंग किस दिले .. आणि सगळ्यांना बाय करून निघाली. हॉटेल थोडा दूर होत म्हणून ती ऑटो ने च गेली .
*******
क्रमशः
Series Details