तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 19

माही अर्जुन

भाग  19

शांती सदन मध्ये बाप्पांच्या तयारीची खूप गडबड सुरू होती,  बरेच पाहुणे बोलावले गेले होते...... पूर्ण घर फुलांनी आणि लाइटिंग ने छान सजवलं होतं...... माही आणि तिची फॅमिली थोडी लवकरच तिथे पोहोचली...... थोडी मदत व्हावी म्हणून माहि तिथे लवकर गेली होती.......

" अरे ये बाळा...... आत मध्ये या..." ... आजी  माहि आणि तिच्या परिवाराला दारात आलेलं बघून म्हणाल्या , तसे सगळे आत मध्ये आले.......

" अरे वा खूप गोड दिसते साडी मध्ये......." .. आजी माही चा गालाला मायेने हात फिरवत बोलली.. त्यांना आलेलं बघून सगळे त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले , नलिनी , मामी , अनन्या,  रुही , आकाश सगळेच तिथे आले...

" आजीसाहेब या माझ्या आत्या कमलादेवी, ही आई छाया ,ही माझी मोठी ताई अंजली, आणि हि मीरा आमची सर्वांची लाडकी" .... माही सगळ्यांची ओळखी करून देत बोलली..... 

" आई...... आई या आजीसाहेब..... याच मला देवळात भेटल्या होत्या आणि यांनीच मला नोकरीसाठी बोलावलं होतं...... या नालीनी काकी.... या ड्रेस डिझाईनिंग बघतात..... या मामी..... या अनन्या ताई.... ही श्रिया..... आणि ही अनन्या ताई ची मुलगी रुही .. आणि हे आकाश सर."" ....रुही चे गाल ओढत माही बोलली...

" तुमचे खूप आभार , आमच्या महिला नोकरी दिली तुम्ही." ..आई

" ती आहेच गुणी...आम्ही देणारे कोण आहोत..." आजी

सगळ्यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला.....

आकाश चा लक्ष अंजली वर गेलं....... तो एकटा तिच्याकडेच बघत होता....." लव्ह अँट फस्ट साईट" म्हणतात तसं काय ते फिलिंग त्याला होत होतं...... अंजली सुद्धा आकाशी रंगाच्या साडी मध्ये खूप सुंदर दिसत होती..... अंजलीच्या सुद्धा लक्ष आकाश कडे गेलं , तो तिला बघत आहे तिला जाणवलं , तिने लाजून मन खाली घातली.....

माही सगळ्यांची ओळखी करून देत होती तेवढ्यात अर्जुन त्याच्या रूम मधून खाली शर्टच्या बाह्या फोल्ड करत येत होता..... त्याचा लक्ष माही कडे गेलं आणि तो थोड्यावेळासाठी तिथेच स्तब्ध होऊन तिला बघत उभा राहिला......

आज माहिने  मोरपंखी कलरची लाल काठ असलेली पैठणी घातली होती..... त्यावर नाजूकसा मोत्याचं गळ्यातलं.... कानात मोत्याचे झुमके... हातात मॅचींग बांगड्या , त्याच्या आजूबाजूला मोत्यांच्या बांगड्या..... केसांचा साजेसा अंबाडा...... कपाळावर चंद्रकोर टिकली.... डोळ्यात काजळ... ओठांवर हलकीशी गुलाबी कलरची लिपस्टिक...... मराठमोळी अशी  ती  खूप सुंदर दिसत होती.... अर्जुन थोड्या वेळासाठी तिला बघतच राहिला...... त्याला कधीच हे ट्रॅडिशनल प्रकार आवडले नव्हते..... तो स्वतः कधीच ट्रॅडिशनल कपडे घालत नव्हता,  नेहमी तो आपला शर्ट, पॅन्ट, वेस्टकॉट,  ब्लेझर मध्येच असायचा.. आज सुद्धा त्यांनी वाईट शर्ट, ग्रे ट्राउझर त्यावर की ग्रे  वेस्टकॉट घातला होता......... साडीमध्ये  सुद्धा मुलगी इतकी सुंदर दिसते , हे त्याला माहि कडे बघून जाणवत होते.... माहिला साडीत बघितलं की तो हिप्नोटाईज झाल्यासारखा व्हायचा......

" अरे अर्जुन इकडे ये..... तिथे काय उभा   बघत बसलाय..." . आईने त्याला आवाज दिला तसा तो भानावर येत खाली त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला...

" अरे ही छोटीशी परी राणी कोण म्हणायची....?"". म्हणत आईने मीराला कडेवर उचलून घेतले....

आई आत्याबाई एकमेकींकडे बघत होत्या....

"काकी ती..."... माही काही बोलणार तेवढ्यात आत्या बाई बोलल्या...

" ही मिरा,  माझ्या पुतण्या श्रीकांत ची मुलगी आहे...... तो तिकडे लंडनला राहतो .....सांभाळायला कोणी नाही म्हणून आम्हीच मिराला इकडे ठेवून घेतलं..... मीरा माहिच्या खूप अंगावरची आहे दोघींचा खूप खूप पटते " ..... माही त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघत होती..... आईने तिला डोळ्याने चूप रहा असं सांगितलं....

" खूपच गोड आहे पिल्लू"..... अनन्या तिचे गाल ओढत बोलली......

"मी पिल्लू नाही , आता मोठी आहे.... फक्त माऊ च मला पिल्लू म्हणते..." ... मीरा आपल्या बोबड्या बोलमध्ये बोलली... तिचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले...... रूही ची आणि मिराची छान गट्टी जमली  ....दोघीही खेळत बसल्या..

" तुमच्या दोन्ही मुली खूप गोड आहेत ....अगदी महालक्ष्मी सारख्या दिसतात"...... आजी दोघींना बघत बोलल्या... ते ऐकून माही अंजली  दोघींनी लाजून मान खाली केली...

" खूप हुशार आहे हां माही...... ड्रेस डिझायनिंगचा तर काम आमचं खूप फास्ट होत आले आहे....... घरात रुही सोबत तर फार जमते...... आता आम्हाला आमच्या घरातली च एक मेंबर झाल्यासारखी आहे.."...... आई माहीच कौतुक करत बोलल्या...

"हो थोडीशी धांदरट , बावळट आहे , पण हुशार आहे.." ... आत्या

" धांदरट बावळट शब्द ऐकून अर्जुनला हसायला आलं..... त्याने आपले हसू  कंट्रोल केलं .... नि माहिकडे एक कटाक्ष टाकला.... माही सुद्धा  नाटकी राग दाखवत त्याच्याकडे बघत होती....

" सतत इथलं कौतुक सांगत असते , आजी साहेब अशा....... नलिनी काकी कशा हुशार आहे,  सतत तिचं बोलणं सुरू असतं....... आणि हो काय तो कोण द्र.... ड्रॅक्युला कोणीतरी आहे,  दिवसभर त्याच्या नावाचा जप सुरू असतो..... त्यांनी असा त्रास दिला...... त्यांनी असं केले....तसा बोलले..." ..... आत्या

"ड्रॅक्युला " शब्द एकूण अनन्या ने अर्जुन कडे बघितले..... आणि एक डोळा उंचावून त्याला चिडवत होती.. आणि ती खुदकन गालात हसली....... अर्जुन ने डोळे मोठे करून तिला चूप रहा सांगितलं आणि आता तो माही कडे नाटकी रागाने बघत होता......

" बापरे ही आत्याबाई कुठे काय सांगते ......आता काही खैर नाही तुझी माही..." . माही मनातच बोलत अर्जुन कडे कसानुसा चेहरा करत बघत  होती

कोण" ड्रॅक्युला..??" ..... मामी

" असं काही नाही  ते असंच ऑफिसच्या गोष्टी..." .... माही गोष्ट सांभाळण्यासाठी बोलत होती.... आणि आत्याबाईला शांत रहा इशारा करत होती होती.....

घरात बरीच पाहुणेमंडळी जमत आली होती...... अर्जुन आकाश आजी सगळे पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होते.. अधून मधून चोरून आकाश अंजली कडे बघत होता...... माही सगळ्यांना कामांमध्ये मदत करत होती..... रूही आणि मीरा खेळत होते , आत्याबाई त्यांच्याकडे लक्ष देत होत्या.......... अर्जुन येण्याजनाऱ्या लोकांसोबत बोलत असला तरी त्याचे सगळे  लक्ष माहिकडे होतं.....

माहीने आत्याला आणि आईला बाजूला घेतले.....

"आत्याबाई तुम्ही खोटं का बोलल्या मीरा बद्दल..." .. माही

" मी चांगल्यासाठीच बोलले.....बघितलं नाही का सगळ्यांना तुझं किती कौतुक आहे..... आजी साहेब किती जीव लावतात तुला...... त्यांना सगळं खरं कळलं तर कुठल्या नजरेने बघतील ते तुला..... तुला हा जो त्यांच्या घरात आपलेपणा मिळतोय तो मिळेल काय..???.... तुझ्यासाठीच मी खोटं बोलले" ....आत्या

" हो पन हे असं खोटं बोलणं ..??...कधी ना कधी तर खरंच समोर येणारच ना...मला नाही आवडल ." ....माही

"हे बघ बाळा,  आत्याबाई जे बोलल्या ते बरोबरच बोलल्या...... तुला प्रश्नांना सामोरे जावं लागू नये म्हणून बोलल्या..... तुझ्या सुखासाठीच बोलल्या , पुढचं पुढे बघू ....आता सध्या तरी जे आहे ते असू दे..." ..आई

सोनिया आणि तिचे पेरेंट्स सुद्धा आले होते...... अर्जुन ने सोनियाची ओळख आजी ...... आई सोबत करून दिली..

सोनियाने स्लीव्हलेस सलवार कुर्ता घातला होता...... ती बऱ्यापैकी ट्रॅडिशनल गेट अप करून आली होती तरीसुद्धा त्यात ती बरीच मॉडर्न  दिसत होती....... सोनियाचे आई-वडील आणि आजी मामा गप्पा मारत बसले होते........माही आणि अंजली दोघी किचन मध्ये नलिनीला मोदक करण्यात मदत करत होत्या....... माहिला सगळ्यांच्या एवढा क्लोज बघून सोनियाला थोडी जिलेसि फिल झाली,  तीसुद्धा उठून आत मध्ये मदत करायला गेली.....

"मी काही मदत करू का...?" ... सोनिया किचनमध्ये जात बोलली

" ये ये...... मोदक करतोय आम्ही...... तुला येतात का?? कर तू पण.." .. आई

माही छान मोदक चे आकार बनवत बसली होती.... सोनिया ने सुद्धा तिच्या सारखे मोदक बनवायला घेतले पण तिला काही जमत नव्हते..... सारखे सारखे फुटत होते..... नालीनी ना ते बघून तिची गंमत वाटत होती....

"असू दे सोनिया आम्ही करतो ....येईल तुला हळूहळू करता... बस तू तिकडे सगळ्यांसोबत ....झालंच आहे काम....." .आई...

" माहि वरती पूल साईडला फुलांची टोपली ठेवली आहे , ती तेवढी घेऊन येते काय...??... श्रेया ला सांगितलं असतं पण श्रेया इथे कुठे दिसत नाही आहे.." ....नलिनी

" अहो असू द्या हो , असेल इकडेतिकडे कुठेतरी,  मी घेऊन येते....." .माही  म्हणाली आणि ती पायऱ्या चढत वर जात होती.....हातात तिने साड्यांच्या मिऱ्या पकडल्या होत्या त्यामुळे तिचा थोडासा पाय चढताना दिसत होता..... अर्जुन  ती वर जाते आहे   त्याकडे लक्ष गेले.... तो पण सगळ्यांची नजर चुकवून हळूच वर गेला..... माही फुलांची टोपली घेत होती , तो एकदम तिच्यामागे जाउन उभा राहिला....

माहीने फुलाची टोपली उचलली आणि टोपली घेऊन वळणार कि तीला अर्जुन एकदम तिच्याजवळ दिसला... ती दचकली.... तिच्या हातातली फुलांची टोपली उडाली आणि सगळे फुले त्यांच्या अंगावर पडली....

" तू....., तुम्ही इथे काय करत आहात..?" ... माही

" अरे राम , सगळे फूल खाली पडली .... काकीने मला फुल आणायला सांगितले होते,  हे तर सगळे खराब झाले आता काय करू.??... तुम्ही इथं काय करायला आले?? सगळं काम माझं खराब करून ठेवलं..., आता काय उत्तर देऊ काकींना...??. पूजेसाठी हे खाली पडलेले फुलं सुद्धा वापरता येत नाही.... तुम्हाला काय गरज होती इथे यायची.,.??" ... माही डोक्यावर हात मारत फुलांकडे बघत बडबड करत होती.....

" एस्क्युज मी...... हे माझं घर आहे मी कुठेही जाऊ शकतो...," . अर्जुन एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत बोलला..

" हो,  पण तुम्ही इथे मला घाबरावयाला  का आले.??.... हे फुल पडले ना .....आता मी काय करू??? कुठून आणू दुसरे फुल .??.....आता पूजेची वेळ होत आली,  काकी रागावेल  मला...??....... मला त्रास द्यायला आज काल तुम्हाला फारच आवडते.... नेहमी जवळ येत असता  आणि असे घाबरवत असतात , एखाद्या दिवशी हार्ट अट्याक आणून सोडल मला........." 

" shh.... तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवत...... किती बोलते.., थोडा तर पॉझ घेत जा... तोंड नाही दुखत का तुझं ..???...सतत बडबड करत असते.... ते बघ तिकडे ,"  एका  फुलांनी भरलेल्या मोठ्या बॅग कडे हात दाखवत अर्जुन बोलला.....

त्या बॅग मध्ये खूप फुले होती..... ते बघून तिला हायसं वाटलं..... तिने टोपली घेतली आणि बॅग जवळ गेली आणि त्यातले फुलं टोपलीत काढू लागली.... अर्जुन पण तिच्या मागे आला ..... तिच्या जवळ जाऊन बसला.... ती जवळून खूप सुंदर...... तिचे निळे पाणीदार डोळे त्यात लावलेलं काजळ..... अर्जुनला घायाळ करत होतं,  तो तिच्या डोळ्यात हरवला होता.... त्याला तसा बघून माहि च लक्ष त्याच्याकडे गेले, त्याच्या डोळ्यात आता ती सुद्धा  हरवली होती....... त्याच्याकडे बघतच माही बॅगमधून टोपलीत फुलं टाकत  होती...... अर्जुन ते फुलं परत बॅगमध्ये टाकत होता.... तो तिला बघण्यात इतका गुंग झाला 

होता की त्याला कळतच नव्हतं तो काय करतो आहे...

" माही  ताई,  आईसाहेब फुलांची वाट बघत आहेत...."  म्हणत रघु तिथे आला... त्याच्या आवाजाने ते दोघे भानावर आले.. तिचे  टोपली कडे लक्ष गेलं,  त्यात फार थोडे फुलं जमा झाले होते....

" सर तुम्ही हे काय करत आहे..???.. माझं काम वाढवत आहात....." . त्याचं ते फुलं बॅगमध्ये परत ठेवताना बघून माही बोलली

" अं...... तुला मदतच करत आहो  " ....त्याने त्याच्या हाताकडे बघितलं त्याच्या लगेच त्याच्या लक्षात आलं की तो उलट काम करतो आहे.....त्याने त्याचा हात बाजूला केला....

तिने टोपली मध्ये फुल भरली आणि ती टोपली घेऊन जाऊ लागली...

" माही एक मिनिट थांब....." ... अर्जुन ने आवाज देत तिच्या हातातली टोपली काढून घेतली आणि रघु च्या हातात दिले.......

" रघु घेऊन जा खाली." .....अर्जुन

रघु गेल्यानंतर अर्जुनने तिला हाताला पकडून खुर्चीवर  बसवले......

" काय करताय.? ..... प्लीज मला जाऊद्या खाली , सगळे वाट बघत असतील........" 

" shh..." .... म्हणत त्याने त्याच्या पँटच्या खिशातून एक पैंजण काढले........आणि तिच्या समोर धरले..

" आ....हे तर माझे पैंजण आहे.... तुम्हाला कुठे मिळाले........ तीन चार दिवसापासून हरवले होते,  मी सगळीकडे शोधत होती, सापडतच नव्हते, " .... माही पैंजण हातात घ्यायसाठी तिने हात पुढे केला...

" अह..... म्हणत त्याने पैंजण धरून ठेवलेला  हात मागे केला....

" सर नाही अर्जुन बोल........ मग परत देईल..." ..अर्जुन

" सर पण तुम्ही माझे बॉस आहात...... असं कसं तुम्हाला अर्जुन बोलू..???." .... ती  पैंजण घेण्यासाठी हात पुढे करत बोलली...

" ड्रॅक्युला पेक्षा तर बर आहे ना.....?" . अर्जुन मस्करी च्या सुरात बोलला...

ती ओशाळली आणि खाली बघू लागली.....तिला तसे बघून  अर्जुन गालात हसला.... तो तिच्या पायाजवळ गुडघ्यांवर जाऊन बसला.....

" May I..? " ... म्हणत त्याने त्याचा हात तिच्या पायाजवळ नेला.....तो पायाला हाथ लावतो आहे बघून  तिने तिचा पाय मागे घेतला..... त्याने एकदा तिच्याकडे बघितले आणि परत तिचा पाय आपल्या हातात घेतला आणि तो आपल्या  गुडघ्यांवर ठेवला...... त्याच्या स्पर्शाने ती मोहरुन गेली..... त्याने ते पैंजण हळूवारपणे  तिच्या पायात घातले.....

" माही तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..?"... अर्जुन तिच्याकडे बघत बोलला

" कोणत्या......? " माहीने समजून न समजल्या सारखे केले

" लग्नाबद्दल ?? माझ्याशी लग्न करशील.." .... अर्जुन

ती थोडी लाजली , आणि आणि काही न बोलता उठून तिथून चालली गेली.....तिला ह्या क्षणाला काहीही कळत नव्हतं काय बोलावं , काही समजत नव्हतं म्हणून ती चुपचाप तिथून चालली गेली...... थोड्यावेळाने अर्जुन सुद्धा तिच्यामागे खाली आला...

पुजेची सगळी तयारी बहुतेक झाली होती..... महाराज यायचे होते...... त्यांची वाट बघणं सुरू होतं.....माही मीरा च्या मागे पळत होती,  अचानक ती एका ठिकाणी थांबली तेथे सोनियाचे आई-वडील आणि आजी, नलिनी काकी ,मामी, मामा अर्जुन आणि सोनियाच्या लग्नाच्या गोष्टी करत होते,.....

" आम्हाला तुमच्यासारखेच तोलामोलाचे स्थळ हवं होतं..... अर्जुन ला शोभेल अशी मुलगी हवी होती.... तुम्हाला माहीतच आहे अर्जुन ने बिजनेस जगात खूप नाव कमावले आहे....त्याचं नाव पुढे घेऊन जाणार अशीच मुलगी आम्ही त्याच्यासाठी शोधत होतो....... सोनिया थोडी नवीन विचारांची वाटते पण ठीक आहे, लग्नानंतर सगळं घरच्या रिती ती शिकून घेईल..... आता ते दोघं एकमेकांना पसंत करतात , तर आता आमची पण त्यात काही हरकत नाही आहे...." .. आजी बोलत होत्या

माहि ते सगळं ऐकलं होतं , कोणीतरी तिच्या काळजावर दगड मारून फेकल्या सारखं तिला वाटलं.......

" आजींचे बोलणे बरोबर आहे.... तू कुठे ....सोनिया मॅडम कुठे..??... सोनिया मॅडम इतक्या शिकलेल्या , अर्जुन सरांच्या बरोबरीने काम करू शकतात.... त्यांचे घर पण एवढे मोठे....फॅमिली अर्जुन सरांच्या फॅमिली च्या तोलामोलाची आहे..... आपण तर यात कुठेच बसत नाही...... माही तू पण काहीही विचार करत होती ....अर्जुन सर थोडेसे चांगले काय वागले , तू तर अगदी राजा राणीच्या स्वप्नात गेली होती....तू हे  कसे विसरली की तुझा आणि अर्जुन सरांचा काहीही मेळ नाही .....मुळात तू तर लग्न सुद्धा करू शकत नाही.....त्यांच्या थोड्याश्या प्रेमळ वागण्याने तू... तुला कशी काय एवढी भुरळ पडली की तू तुझं खरं आयुष्याच विसरली...... नाही अर्जुन सरांसोबत आपण लग्न नाही करू शकत....आजी , नलिनी काकी सगळ्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे , आपण तो विश्वास तोडू नाही शकत.... आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप खूप प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात...... एवढी प्रतिष्ठित फॅमिली आहे , आपल्यासारखे इथे कुठेही बसत नाही.... आणि आपल्यावर आपल्या मीराची जबाबदारी आहे...तिच्याशिवाय तर आपण कुठल्या दुसर्‍या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही, आणि करायला पण नको..." . माही विचार करत एका साईडला उभी होती....

अर्जुन पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त होता , पण त्याचा लक्ष माही कडे होतं...... त्याने आजूबाजूला बघितलं दोन तीन लोकांची नजर माही कडे होती, माही त्यांना पाठमोरी उभी होती, अर्जुन ते लोक बघतात तिकडे बघितलं.....

माही उभी होती तेथे एक रूम होती, कोणीतरी माहिचा हात पकडुन तिला त्या रूममध्ये ओढल होतं आणि डोअर लॉक  केलं....

" सर तुम्ही हे काय करत आहात.???.....हे तुमचे ऑफिस नाहीये तुम्ही माझ्या सोबत असे वागू शकत नाही......." माही रागात त्याच्याकडे बघत बोलली....

" तिकडे तुमच्या परिवारामध्ये तुमक्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि तुम्ही अशा दुसऱ्या मुली सोबत एका रूम मध्ये..??? तुम्हाला हे सगळ शोभत नाही......" .. अचानक पणे तिचा हात ओढून सर्वांसमोर त्याने तिला एका रूममध्ये ओढले होतं , त्याचा तिला खूप राग आला होता आणि डोक्यात आजीचं आणि सोनियाच्या आईवडिलांचं बोलणं घुमत होतं , त्यामुळे ती आणखीनच रागात होती...

" माही...... माही.... काय बोलते तू..??. तुला तरी कळत आहे काय...???. कोण काय बोललं का तुला....??" .... अर्जुन तिच्याजवळ जात तीचा हात पकडत बोलला..,.

" दूर राहा माझ्या पासून..... मला स्पर्श करायचा नाही.....  मी जरी गरीब असेल तरी मी त्या मुली मधली नाही, जी तुमच्या मागे लाईन मध्ये उभी असते.... ज्यांना तुम्ही युज करून फेकून द्या...,. ... तुम्ही एका प्रतिष्ठित घरातले आहे..... तुम्हाला एका नोकरदार मुलीच्या मागे फिरण शोभत नाही...... आणि काय ते लग्नाबद्दल बोलत होता तुम्ही....?... तुम्हाला तुमच्या तोलामोलाच्या मुली सोबत लग्न करायला पाहिजे....... मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही...... काही दिवस तुम्हाला बरं वाटेल नंतर तुम्हाला माझ्या मधून इंट्रेस निघून जाईल......... मला तुमच्या मध्ये काहीही एक इंटरेस्ट नाही.... तुम्ही आपल्या हद्दीत राहायचं, मला असं तुमचं माझ्या जवळ आलेलं..... स्पर्श केलेला अजिबात आवडणार नाही.....तुमच्याकडे काम करते म्हणून तुम्ही माझ्यासोबत वाटते तसं वागू शकत नाही...."" .. माही सतत बडबड करत होती.....आता तिच्या बोलण्याचा अर्जुनला सुद्धा राग येत होता.....

" इनफ........ काय बोलतय तुझं तरी तुला कळत आहे काय..??... थोडं आपुलकीने काय वागलो तू तर अगदी डोक्यावर बसायला आली...... लग्नाबद्दल काय विचारलं तुला तू तर स्वतःला राणी की परी समजायाला लागली..., बघ स्वताकडे आधी...... तुला कोण पसंत करणार आहे....? इतका कशाचा घमंड आलाय ग तुला..... माझं पण चुकलं.... माझे विचार बरोबर होते..... तुम्ही मुलींना जवळ करण्याच्या लाईक नसता...... तुम्ही तुमची औकात दाखउन च  देता.... तुम्हाला फक्त पैसा हवा असतो.... त्यासाठी वाटेल ते तुम्ही करू शकता..... हे प्रेम हे लग्न हे काहीच नसते , तुमच्यासारख्या मुलींमुळेच लोकांचा यावरून विश्वास उडाला आहे...." अर्जुन रागात बोलत होता

" सर तुम्ही हे काहीही बोलत आहात .....तुम्ही माझ्याबद्दल असं बोलू शकत नाही...... मी काही तुमच्या पैशाच्या मागे आलेली नाही , तुम्हीच माझ्या मागे मागे करत होता.....आणि एवढंच वाटत तर मग आपल्या बरोबरीच्या मुलीशी लग्न करा , आमच्या सारख्या गरीब मुलीनच्या आयुष्यासोबत का खेळता? ......माझा आणि तुमचा फक्त ऑफिस पुरता संबंध आहे, बाकी तुमचा माझा काहीही एक संबंध नाही.... उगाच माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका" ....माही

" गेट आउट from here " ...... अर्जुन जोरात ओरडला

ती जायला मागे वळली.......तिला बघून त्याला आठवलं की ती त्याने तिला काबरं आत मध्ये ओढलं होतं.....तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या आंबाड्याची क्लिप काढून तिचे केस मोकळे केले....... त्याच्या त्या कृतीने महिला परत राग आला तिने वळून त्याच्याकडे बघितलं

" तुम्हाला इतका बोलून सुद्धा काही कळत नाही का...??...तुम्हाला दूर राहा बोलले ना ..???...आपल्या हद्दीत राहायचं??" त्याच्यासमोर बोट करत ती बोलली

" शट अप.... डोन्ट क्रॉस यूर लिमिट्स...." .अर्जुन रागात ओरडला....

ती स्तब्ध त्याच्याकडे बघत उभी होती.....

" I said leave..." ... अर्जुन भिंतीवर हात आपटत बोलला..

माही बाहेर निघून आली..... तिला त्याच्यासोबत तसं बोलल्याचं वाईट सुद्धा वाटत होतं पण त्याचं वागणं तिला आवडलं नव्हतं...

ती मोकळे केस पुढे करत तिच्या ताई जवळ जाऊन उभी राहिली...... अंजली च  लक्ष तिच्याकडे गेलं...

" माही...." ...... अंजली तिला ओढत भिंतीजवळ एका कोपर्‍यात घेऊन गेली

" काय झालं ताई अशी का ओढत घेऊन आली इकडे?" ...माही

" अगं मागे...... तुझ्या  ब्लाऊजचे हूक निघालेके आहे...." अंजली तिच्या मागे जाऊन तिचं हूक लावत होती..... 

आता महिला अर्जुनच तिला रूम मध्ये ओढण्याच आणि केस मोकळे करण्याचं कारण समजलं होतं.... अर्जुन समोरून रूम मधून रागातच बाहेर येत होता.. त्याने माहिकडे बघितले..... माहि च लक्ष त्यांच्याकडे गेलं.... आता केविलवाण्या नजरेने ती त्याच्याकडे बघत होती..... त्याचे डोळे आग ओकत होते, इतका तो रागात होता, तो तिथून चालला गेला...

महाराज आले होते...... सगळे पूजेसाठी जमले होते..... पूजा छान झाली होती........ सगळे आरतीसाठी जमले पण अर्जुन मात्र कुठेच दिसत नव्हता.... ते त्याला इकडे तिकडे शोधत होती....

" श्रेया जा अर्जुन ला बोलावून आण.....  इथे दिसत नाही आहे... आरतीची वेळ झाली......." आजी श्रीया  ला बोलली....

श्रीयाने अर्जुन ला बोलावून आणले..... तो फ्रेश होऊन खाली येत होता... त्याचे डोळे मात्र लाल दिसत होते..... त्याने एक कटाक्ष माहिकडे टाकला आणि तो आजीजवळ जाऊन आरती साठी उभा राहिला....

मनोभावे पूजा आणि आरती झाली...... अनन्या आणि श्रेयाने सगळ्यांना प्रसाद वाटला.....

अर्जुन आजीला कानात जाऊन काहीतरी बोलाला...

आजी जाऊन सोनियाच्या आईवडिलांची काही बोलून आले..

" सगळे इकडे या प्लीज." ..... तसे सगळे आजीच्या भोवती जमले....

" आज गणपती बाप्पांच्या शुभ आगमन सोबत एक खूप खास न्यूज मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटते.....आजच्या या शुभ दिवशी... आम्ही सगळ्यांनी अर्जुन आणि सोनिया च लग्न फिक्स केले आहे....." ...आजी 

सगळे आजीकडे आश्चर्य चकित होत बघत होते.... सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या..... सोनिया आणि अर्जुन समोर येऊन उभे होते.... सोनिया ला खूप आनंद झाला होता...... पण अर्जुन चा लक्ष मात्र माहिकडे होतं...

या अनाउंसमेन्टने माहिच्या डोळ्यात पाणी आले होते......

" माहि तुला का वाईट वाटते आहे , तुलासुद्धा तर हेच हवे होते...... म्हणून तर तू अर्जुन सरांसोबत छोट्याश्या गोष्टीवरून वाद घातला होता, आता खुश हो... तुला जे हवं होतं तेच होत आहे......." ........ डोळ्यातले अश्रू पुसत माहीने सुद्धा त्याच्याकडे बघत टाळ्या वाजवल्या आणि ती आत मध्ये काम करायच्या निमित्त्याने निघून गेले....

सगळे अर्जुन ला आणी सोनिया ला विष करत होते.... हळूहळू सगळे पाहुणे घरी जात होते......सोनिया आणि सोनिया चे आई वडील सुद्धा बाकी सगळं सविस्तर बोलू आरामात ठरवून घरी निघाले...

" आजी साहेब, नलिनीताई तुम्हा सर्वांना लग्न जमलाचे अभिनंदन " .....आत्याबाई बोलत होत्या

" बरं आता आम्ही निघतो....." आई

" तुम्ही आलात , आम्हाला खूप छान वाटलं....." ..आजी

" आम्हाला पण भेटून फार आनंद झाला.." ...आत्या

" बरं माही यांना जाऊ दे ......तू थोडा वेळ थांबते काय ?? ....आपल्या त्या ड्रेस डिझायनिंग च्या स्टाफला मी काही गिफ्ट आणले आहे ते द्यायचे ... मदत करते काय? ..... चालेल का छाया ताई मी नंतर घरी पाठवते" .........आई

" हो हो ठीक आहे , माही तू ये मागून , आम्ही पुढे निघतो." ..... म्हणत आत्या... आई ....अंजली आणि मीरा निघून गेले.....

महिने सगळे काम आटोपले.... " काकी आणखी काही काम आहे काय ???....माही

" thank you माही....झाले सगळे काम" ....आई

" . बरं काकि, मग आता मी निघते." ....माही

" अगं थांब, अशी रात्रीची एकटी जाऊ नको.... तसे पण सणासुदीचा दिवस आहे ......बाहेर खूप गर्दी असेल..... थांब मी ड्रायव्हरला सांगते, तो तुला सोडून देईल" .... आई 

पण ड्रायव्हर घरी नव्हता तो श्रेया अनन्या रुही ला बाहेर घेऊन गेला होता.....

तेवढ्यात त्यांना अर्जुन दिसला, तिने अर्जुन ला हाक मारली....

" अर्जुन बाळा, प्लीज माहीला घरी सोडून देतोस काय??.... रात्रीचे तिला एकट पाठवण बरं नाही दिसत.." ...आई

" ड्रायव्हरला सांग." ...अर्जुन रुक्षपणे बोलला

" अरे ड्रायव्हरलाच सांगणार होते, पण ड्रायव्हर बाहेर गेला आहे..... तू तेवढ एक काम कर... पोहोचवून दे तिला." ..आई

तो आईला टाळू शकत नव्हता, तो होकार देऊन पुढे गेला....

" जा अर्जुन तुला पोहोचवून देईल" ..... आई महिला बोलल्या

माहि मान हलवत तिथून निघाली..... अर्जुन गाडीमध्ये बसून तिची वाट बघत होता...

माही घाबरतच त्याच्या गाडीजवळ जाऊन उभी राहिली..

त्याने तिच्या साईटचा दरवाजा ओपन केला..... ती आत मध्ये जाऊन बसली..... दोघंही शांत होते, कोणी कोणाशी बोलत नव्हते...... अर्जुन चुपचाप गाडी ड्राईव्ह करत होता... त्याच्या डोक्यात माहीच बोलणं फिरत होतं..

माहिच्या मनात झालेल्या गोष्टीच येत होत्या .....ती सतत तोच विचार करत बसली होती...... अर्जुन सर  तर आपली मदत करत होते .....आपण त्यांना उगाच काही काही बोलून बसलो....... आपल्या ब्लाऊजचा हूक निघालं होतं..... दुसऱ्या कोणाला दिसू नये म्हणून त्यांनी आपले केस मोकळे केले होते....... थँक्यू आणि सॉरी तर म्हणायलाच पाहिजे, " ती विचार करत बसली होती...... पण आता यांच्याशी काही बोलली तर हे खूप चिडतील..... पण तरी त्यांनी आपली मदत केली आहे, थँक्यू तरी आपल्या म्हणायलाच पाहिजे...... बऱ्याच वेळ विचार करून आणि धीर एकवटून ती बोलायला लागली....

"सर....."

अर्जुन ने ऐकून न ऐकल्यासारखे केले

"अर्जुन सर........ थँक्यू..... सॉरी मी ते चुकून......"

माही काही बोलणार तेवढ्यात अर्जुनने करकचून ब्रेक मारला..... "गेट आउट फ्रॉम माय कार."...अर्जुन रागात बोलला...

"सर इथे मध्येच कशी उतरू मी, कशी जाऊ घरी.".... ..ती अर्जुन कडे बघत होती......

"आई सेड .....गेट आउट फ्रॉम माय कार.."... अर्जुन ओरडला

ती डोअर ओपन करत खाली उतरत होती.....बघितले तर घर आले होते.

"आणि हो अशी अजिबात समजू नको कि एक श्रीमंत घराचा मुलगा तुझ्या वस्तू हृदयाशी कवटाळून बसला होता....... नाव गेट लॉस्ट.." .....अर्जुन

त्याच्या त्या बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी आले तिने एकवार त्याच्याकडे बघितले आणि ती घराकडे चालायला निघाली.....

तो तिथेच गाडीत बसला होता........तिने घरे जाऊन मागे वळून बघितलं तर तिला अर्जुन तिथेच गाडीत दिसला होता....... ती आत मध्ये गेली , नंतर तो तिथून निघून गेला...

*******

क्रमशः 

क्रमशः

🎭 Series Post

View all