तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 23

माही अर्जुन

भाग 23

रविवारचा दिवस होता , आई आणि आत्या मीरा ला घेऊन देवळात गेल्या होत्या.... माही आणि अंजली अंगणामध्ये कपडे वाळत घालत गप्पा करत होत्या.... तेवढ्यात एक मोठी गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली.... दोघींचे लक्ष तिकडे गेलं....

" माही अंजली लवकर चला.. आकाशचा एक्सीडेंट झाला आहे" .... अर्जुन धावत येत बोलला

"काय.....!?".. अंजली

"काय....?.".माही

"अंजली हे लेटर दिला आहे त्याने तुझ्यासाठी" ....अर्जुन

अंजलीने लेटर लगेच त्याच्या हातातून घेऊन वाचायला सुरुवात केली......पण अर्जुन ने सांगितलेल्या न्यूज मुळे तिचे डोळे पाणावले होते तिला वाचता येईना , म्हणून महिने तिच्या हातातून लेटर घेतले आणि वाचायला सुरुवात केली...

प्रिय अंजली

आज सकाळी ऑफिसमध्ये जाताना तुझ्याच विचारात असताना माझा एक्सीडेंट झाला...... आजकाल डोक्यात फक्त तुझेच विचार असतात , त्यामुळे मला समोरचं काही दिसत नाही आणि ऐकू पण येत नाही..... आता मी ...मी माझ्या शेवटच्या घटका मोजत आहो......  आता मी तुला त्रास देणार नाही.... आणि त्रास द्यायला असणार सुद्धा नाही.... माझ्यामुळे तुला काही त्रास झाला असेल तर मला माफ कर ..... तु माझी झाली नाहीस पण मी मात्र तुझा बनुनच चाललो आहे....तू खुश रहा , तुला सगळं तुझ्या मनाप्रमाणे भेटू देत ... काळजी घे स्वताची.

तुझाच

तुझ्यावर खूप प्रेम करणारा

आकाश

माहीने पत्र वाचून  अर्जुन कडे बघितलं ....अर्जुन दोघींचे एक्सप्रेशन  टिपत होता... अंजली मात्र रडत होती तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत होते...

"ये ताई नंतर रड ...आधी दवाखान्यात चल" .... माही

"पण तुम्ही इथे लेटर घेऊन का आलात .....फोन करून सांगायचं असतं... आम्ही लवकर आलो असतो"  ...अंजली काळजी करत बोलली...

अर्जुन कसनुस तोंड करत माही कडे बघितलं..... "आता काय बोलू...."

"तुम्ही इथे गप्पा काय मारत बसले आहात.. चला लवकर "...... माहीने दाराला लॉक केलं आणि अंजली चा हात पकडून तिला ओढतच बाहेर नेलं आणि ऑटो साठी जायला निघाल्या..

"तिकडे कुठे चालले, मी आलोय ना तुम्हाला घ्यायला"...अर्जुन

"आम्ही आमच्या येऊ ...तुम्ही जा" ... माही

"हीच डोकं कुठे चरायला जाते काय माहिती" ...... अर्जुन डोक्यावर आठ्या पाडत तिच्याकडे बघत होता

"माही अर्जुन सरांसोबत चल... ते बरोबर बोलत आहेत, ऑटो बघन्यात आपल्याला अजून उशीर होईल" ......अंजली

दोघीजणी अर्जुनच्या गाडी मध्ये जाऊन बसल्या आणि ते लोक हॉस्पिटल मध्ये आले.....

अर्जुन त्यांना रूम जवळ घेऊन आला....

"इथे घरचे कोणीच का नाही आहे?" ...... अंजली

"हा ते येत आहेत" ..... अर्जुन

"ताई तू हो ना पुढे"" .... माही

अंजली ला थोडं वेगळं वाटलं पण ती जास्त विचार न करता आत मध्ये गेली....

आत मध्ये एका बेडवर आकाश झोपला होता,  त्याच्या  हाताला डोक्याला खूप बँडेज बांधले होते..... आणि आजूबाजूला काही मशीन्स टुकटुक आवाज करत होत्या.....

"व्हेरी बॅड आयडिया माही..... आणि मी तुमच्या या बकवास प्लॅन  साठी  काबरं हो म्हणालो मलाच कळत नाही.... तिचं बोलणं बरोबर होतं ...लेटर घेऊन का आला ?? फोन करून पण सांगू शकत नव्हतो का..... आणि इथे घरातले तिला कोणीच नाही दिसणार, डाऊट तर येणारच आहे" ....... अर्जुन

"नाही परफेक्ट प्लॅन आहे..... बघा आत मध्ये.... फोनवर बोलण्यापेक्षा लेटर ने जास्त इफेक्ट पडतो" ...... ती भुवया उंचावत अर्जुनकडे बघत बोलत होती... आणि ती  काळजी मध्ये आली आहे त्यामुळे एवढ्या काही विचार करणार नाही ,कोण इथे आहे आणि कोण नाही आता तिला फक्त आकाश सर दिसत आहे." ....माही

अंजलीच्या मागोमाग अर्जुन आणि माही पण रूम मध्ये आले.... आणि जरा मागेच उभे होते.

" आकाश काय झालं तुम्हाला हे???..... अचानक कसा काय एक्सीडेंट झाला???.... किती लागलाय तुम्हाला...... प्लीज उठा ना तुम्ही..... तुम्हाला काही होणार नाही" ..... अंजली रडतच त्याच्याजवळ जाऊन बसत त्याचा हात हातात घेत बोलत होती.....

"तू आलीस अंजली , तुझीच वाट बघत होतो...... तू माझ्या आयुष्यात नाही तर मी आता जागून सुद्धा काय करू........ डॉक्टर म्हणाले आता फार कमी वेळ आहे माझ्या जवळ." ...... आकाश

"असं काहीही बोलू नका,  सगळं नीट होईल ".....अंजली आकाश च्या तोंडावर हात ठेवत बोलली

माहीने अर्जुनकडे बघितलं आणि स्माईल केलं....." माझा प्लॅन फेल होऊ शकत नाही बघा" ....... अर्जुन कसतरीच तोंड करत सगळ्यांकडे बघत होता

" नाही अंजली , मला बोलू दे,  नंतर कदाचित मला माझ्या मनातलं बोलायला भेटणार नाही....याआधी मी कधीच कुठल्या मुली बद्दल असं काहीच फील केले नव्हते... जसं तुझ्याबद्दल मला वाटते...... माझे खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे..... आय लव यु अंजली........ प्लीज तुझ्या मनात माझ्याबद्दल जर काही भावना असेल तर मला सांगून दे म्हणजे मला खूप शांतीचे मरण येईल..... प्लीज अंजली" .... आकाश

"तुम्ही असं काही बोलू नका आकाश........ मला पण तुम्ही खूप आवडता ,माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे..... तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत....... माझ्या लग्नामुळे हे सगळे घडते म्हणून मला लग्न नव्हतं करायचं.... पहिले माझ्या लग्नाच्या काळजीने माझे वडील मला सोडून गेले..... आता तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत आकाश, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय" ...... अंजली आता खूप भरून आलं होतं... ती रडायला लागली.....

अंजलीला असा बोलताना बघून आता महिला सुद्धा खूप वाईट वाटत होतं, तिच्या पण डोळ्यातून अश्रू निघत होते..... ती अंजलीला समजवायला म्हणून पुढे जाणार तेवढ्यात अर्जुनने तिचा हात पकडला...... तिने पाणी भरल्या डोळ्यांनी अर्जुन कडे मागे वळून बघितलं...... त्याने मानेनेच तिला नको जाऊ म्हणून सांगितले.... आणि डोळ्यानेच पुढे बघ म्हणून सांगितले.... माहीने त्याचा इशारा समजून पुढे बघितलं.... अंजली आकाशाच्या मिठीत होती आणि आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचं सांत्वन करत होता

"अंजलीची काळजी करणारा आणि तिला सांभाळणारा तिला भेटला आहे" ..... अर्जुन

तिला सुद्धा वडिलांचा जाण्याचा दुःख होतं .... तिचं सुद्धा आठवणींनी मन खूप भरून आले होते..पाणी भरल्या डोळ्यांनी माही.....अर्जुन कडे बघत होती .....

तिच्या डोळ्यात पाणी बघून अर्जुन च्या काळजात धस्स झालं........ अर्जुन सध्या सहानुभूतीने तिच्याकडे बघत होता..... आता मात्र माहितीच्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळायला लागले.... तिला असं बघून अर्जुन ला काही सुचत नव्हतं.... त्याने तिच्या डोक्यावर मायेने हाथ ठेवला, आणि डोळ्यांनीच नको रडू म्हणून खुणावले.  माही मात्र  ब्लँक तशीच उभी होती.......

"आय लव यु आकाश" ...... म्हणत अंजलीने तिचे डोकं त्याच्या डोक्याला लावले..... ते थोडं जोऱ्यात धडकले....

"आ..".... आकाश कळवळला......

त्याच्या आवाजाने माहि भानावर आली ...तिला जाणवले अर्जुन चा हाथ तिच्या डोक्यावर आहे. तिने एकदा अर्जुन कडे बघितले , तसा अर्जुन ने आपला हाथ खाली केला,  आणि दोघेही आता आकाश कडे बघत होते..

" बस झाल  सर,  आता नाटक करायची काही गरज नाही,  अंजली ताई ने आपलं प्रेम कबूल केले आहे" ..... माई हसतच त्याला थम्सअप दाखवत बोलली..

अंजली ने मागे वळून बघितलं तर माही त्याला थम्सअप दाखवत होती.....

"नाटक???....काय याचा अर्थ???.... तुम्ही नाटक करत होते???........ माझा इथे जीव जात होता आणि तुम्ही नाटक करत होते???""...., म्हणत अंजलीने आकाश च्या हातावर मारायला सुरुवात केले...

"आ.... आ...... आकाश कळवळून ओरडत होता..... अगं खरंच दुखत आहे ना........ खरंच माझा एक्सीडेंट झाला आहे" ...... आकाश

"काय.....?" ..... माही आणि अर्जून एकसाथ ओरडले

"तुम्हाला खरोखरचा एक्सीडेंट करायला कोणी सांगितल होते?? .....तुम्हाला मी तर फक्त नाटक करायला बोलले होते ना...... इतका पण सिरिअस व्हायला नव्हतं सांगितलं मी तुम्हाला आकाश सर?"".........माही

"मी हॉस्पिटलमध्ये येत होतो , थोड्या दूरवरच माझी गाडी बंद पडली..... अर्जुन तुम्हाला घ्यायला निघाला होता.... उशीर नाही झाला पाहिजे म्हणून मी घाईघाईतच रस्ता क्रॉस करत हॉस्पिटल कडे येत होतो.... माझं लक्ष नव्हतं तर एक गाडी माझ्या अंगावर आली... वेळेतच गाडी थांबल्यामुळे मला जास्त लागलं नाही, पण मी बाजूला रस्त्यावर जाऊन पडलो...... तिथेच दोन लोकांनी मग मला इथे हॉस्पिटलमध्ये आणले , ते तर बरं होतं की इथला डॉक्टर माझा फ्रेंड होता , म्हणून सगळं मॅनेज झालं लवकर....... जास्ती नाही लागलाय बस थोडं खरचटलं डोक्याला आणि हाताला" ........ आकाश

"माही हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे ...आकाशला काय झालं असतं तर..??" ... म्हणत अंजली माहिच्या मागे मारायला धावली,  माहिसुद्धा ती मारेल म्हणून पुढे पुढे धावत होती......

" अगं ताई पण जास्त नाही लागल आहे ना...... आणि ते बघ आकाश सर किती खूष आहेत हसत आहेत ते...... त्यांना त्यांचं प्रेम मिळालं" ...... म्हणत माही  बेडच्या गोल गोल फिरत होती आणि अंजली तिच्या मागे फिरत होती...... आकाश या दोघींना तसं गोंधळ घालताना बघून खूप हसायला येत होतं...... अर्जुन ने मात्र डोक्यावर हात मारून घेतला...... ते दोघेही त्या दोघींना बघण्यात मग्न झाले

"अरे हॉस्पिटल आहे , घर नाही.?".... अर्जुन

पण त्याच्या बोलण्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं...... अंजली महिला पकडणार की माही रस्ता चुकून आता अर्जुनच्या मागे आली होती आणि अर्जुनच्या भोवती दोघीजणी फिरत होत्या....... अंजलीने तिच्यापाठीवर दबका मारला आणि माही अर्जुन च्या अंगावर जाऊन पडली..... अर्जुनने तिला पकडत नीट उभा केलं

"झालं असेल तुमच खेळून तर आता घरी निघायचं का???..... हे हॉस्पिटल आहे......... काय अंजली तू पण हिच्या सोबत लहान बनते....... ही तर डोकं वापरतच नाही.... कुठे गहाण ठेवून आलीये माहिती नाही .... ही तर मला तुमच्या मिरा एवढच वाटते ....इनफॅक्ट मला तर वाटते मीराला तरी जास्त कळत असेल हीच पेक्षा" .. ... अर्जुन थोडा मोठ्याने बोलला..... त्याच्या बोलन्याने एकदम चिडीचूप शांतता पसरली.... माही घाबरतच एका जागेवरच मान खाली घालून उभी होती........ तिला बघून सगळे हसायला लागले....... माहि कन्फ्युज नजरेने सगळ्यांना बघत होती......

"अंजली ताई तू चलते आहेस कि मी निघू.... मला शांतीसदन ला पण निघायचे आहे...... उशीर झाला की तिथे पण आमचे बॉस ओरडतील मला" .... अर्जुन कडे एक कटाक्ष टाकत माही बोलत होती.....

एकमेकांना बाय करून सगळे आपापल्या घरी निघाले....

*******

अर्जुन आकाश ला घरी घेऊन आला..... आकाशला तसं लागलेले बघून घरातले सगळे काळजीत पडले...

" हे काय झालं तुला,  आत्ताच तर घरातून नीट बाहेर पडला होता?" ... मामी

" काही नाही,  ठीक आहे तो.....ते एका गाडीला धडकला,  पडला तर थोडसं खर्चटले आहे, दोन दिवस आराम केला की नंतर ठीक होईल..... मी आकाशला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो." . अर्जुन

दोन-तीन दिवस आकाशने घरीच आराम केला , त्यामुळे त्याला आता बरं वाटत होतं आणि अंजलीने होकार दिल्यामुळे त्याच्या  आनंद गगणापार झाला होता....

मामीने पंडितजींना आकाशसाठी मुलींचे फोटो आणि पत्रिका घेऊन घरी बोलावलं होतं.....

मामीने त्यातले तीन-चार फोटो सिलेक्ट केले आणि त्यांची माहिती विचारली... सगळ्या मुली श्रीमंत घरच्या होत्या..

आजीला त्यातला एक फोटो आवडला,  तिने सुद्धा तो काढून बाजूला ठेवला.... आकाश खाली येत होता...... तेवढ्यात मामीने त्याला आवाज दिला......

" आई परत हे नको सुरू करू तू..... मला नाही आवडत अशा मुली..... मला साधी सिंपल मुलगी आवडते....... तू काय हे रोजचे फोटो घेऊन येतं असते माझ्यापुढे?" .... आकाश वैतागत बोलत होता

" आकाश इकडे ये माझ्याकडे...... हा बघ हा फोटो आवडेल तुला...... तुझी आवडनिवड माहिती मला , तू एक साधा मुलगा आहे , तुला पण तशीच मुलगी आवडणार...... मला खात्री आहे तुला ही मुलगी नक्कीच आवडणार" ....आजी

" आजी आता तू पण आईसारख नको सुरू करू?" ....... आकाश

तेवढ्यात अर्जुन खाली आला...... "तो नाही म्हणतोय तर का बरं त्याच्या मागे लागला आहात तुम्ही सगळे?....... मे बी त्याला कोणी आवडत असेल?.... त्याची पण काही चॉईस असेल, आधी त्याला तर विचारा?"... अर्जुन

" याला काही कळत नाही , मी जे सांगते ते बघ" ..... मामी

" श्रेया हा फोटो घे ....आकाशला दाखव"  ... आजी

श्रेया फोटो पाहून अचंबित होते.......

" सून सून सून दादा तेरे लिये एक रिश्ता आया है.....

सून सून सून दादा तेरे लिये एक रिश्ता आया है.....

सून सून सून लडकी मे क्या गुन.... सून दादा सून....

अरे सून सून सून दादा तेरे लिये एक रिश्ता आया है....."

म्हणत श्रेया फोटो त्याच्या डोळ्यासमोर नाचवत होती.... कधी ती अर्जुन च्या पुढे जात होती कधी आकाशच्या पुढे येत होती.....


"

आजी खरच मला यामधली कुठलीच मुलगी आवडली नाही आहे" ...... आकाश

अर्जुनचे लक्ष फोटोवर जाते...... " आकाश वेट...... आधी फोटो तर बघून घे...,. मला वाटते तुला मुलगी आवडेल" .... अर्जुन


"

भाई......?.... तुला तर सगळं माहिती आहे ....तरी पण" .....आकाश


"

अरे बघ एकदा" ......अर्जुन


"

भाई तु इनसिस्ट करतो आहे म्हणून मी बघतो......"  बोलतच होता की फोटो बघून त्याचे होषच उडाले.... तो एकटक  फोटो बघत होता


"

काय मी बोलले होते ना .....मला माहिती आहे तुझी चॉईस ...आवडली ना मुलगी?" ....... आजी  त्याच्याकडे बघत गालात हसत होती

आकाशने लाजून मान खाली घातली...... "हो आवडली"


"

काय..???... कोण... कोण आहे??? मला पण बघू दे??" ... म्हणत मामीने त्याच्या हातातून फोटो घेतला....

" " नाही , ही त्या फटीचर ची सिस्टर... सिस्टर... मला आवडली नाही.... मला ही सून म्हणून पसंत नाही" .... मामी


"

तुला लग्न करायचंय की त्याला लग्न करायचंय.??..... आयुष्य त्याला तिच्यासोबत घालवायचा आहे तुला नाही..... मला पण ही मुलगी खूप आवडली आहे.... संस्कारी वाटली"...... आजी

आता एकदा अजिनी फायनल केल आहे  म्हणजे आपल्याला पुढे काहीच बोलता येणार नाही म्हणून रागातच मामी तिथून निघून गेली....


"

आतातरी ये,  माझ्याजवळ बस इथे" .... आजी आकाशला बोलली....  आकाश आजी जवळ जाऊन बसला......


"

मला त्याच दिवशी कळलं होतं तुलाही आवडली आहे म्हणून "..…आजी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलले...... " खरं सांगू का मला पण खूप आवडली ती,  त्याच दिवशी माझ्या मनात आलं होतं..... पण तुम्हा मुलांवर आपले काय विचार  लाद्यायचे म्हणून मी काही तुला बोलले नाही....... आज पंडित हे फोटो घेऊन आलेत तेव्हा म्हटलं थोडं विचारून बघुयात" ......आजी


"

आजी यु आर  ग्रेट" ..... आकाश ने आजीला हग केले


"

मला पण आवडली माझी वहिनी" .... श्रेया पण त्यांच्या गळ्यात पडली...


"

चला मग सगळ्यांना आवडली तर आता घाई करायला हवी" .... नलिनी


"

हो त्यांच्याशी बोलून घेऊ या.. ते बहुतेक मला तरी वाटते तयार होतीलच आणि जमलं तर अर्जुन चा आणि आकाश एंगेजमेंट एकत्रच करूया" ......आजी

आजीच्या बोलण्याने अर्जुनच्या डोक्यावर आठ्या आल्या तो त्याच्या रूममधे निघुन गेला....


"

चला मग आता रविवारीच आपण त्यांच्याकडे बोलायला जाऊया"

आजीने माहिला सांगितले की काही महत्त्वाच्या कामाने येत्या रविवारी सगळेजण त्यांच्या घरी भेटायला येणार आहे .... माहीने सुद्धा घरी निरोप दिला


"

माही तू तिथे काय गडबड करून आली आहे??...... खरं खरं सांग काही केलं असेल तर??" .....आत्याबाई


"

आत्याबाई मी काहीच नाही केलं खरं सांगते." ...माही


"

मला वाटतंते बहुतेक ताईच्या लग्नासाठी बोलायला येतील" ......माही


"

काय.....?"  ..... आई


"

हो अगं ते आपले पंडित आहेत ना देवळातले ते त्यांच्याकडे गेले होते ..... आकाश सरांच्या लग्नासाठी ते लोक मुलगी बघत होते..... तर त्यांच्या पत्रिकेमध्ये फोटोमध्ये ताईचा पण फोटो होता तर आजींना  ताई खूप आवडली आकाश सरांसाठी म्हणून बहुतेक ते येत आहेत ताईचा हात मागायला" ....... माही


"

अरे बापरे..... तयारी करा चांगली" .....आत्याबाई....

*****

अर्जुन आणि घरातले सगळे माही च्या घरी आले होते...... सगळ्यांनी चांगल्या गप्पा करून आकाशाने अंजली चे लग्न ठरवले....... अंजली च्या आईने सुद्धा अंजली सोबत घडलेली गोष्ट सांगितली ..... आजीने सगळे मान्य केले आणि अंजलीचा स्वीकार केला...... मामींना एवढं काही आवडलं नव्हतं पण आजी आणि मामा , अर्जुन पुढे त्या चूक होत्या आणि त्यांनी लग्नाला होकार दिला..... दिवाळीनंतर अर्जुन आणि आकाश चे इंगेजमेंट एकत्र करायचं डिसाईड झालं.......

अर्जुन चा इंगेजमेंट ऐकून माहिला थोडं वाईट वाटलं..... तिचा चेहरा पडला होता.... अर्जुनच तिच्याकडे लक्ष होतं...... तो तिचे हावभाव टिपत बसला होता.....


"

माही जा आत मधून सगळ्यांसाठी नाश्ता पाणी घेऊन ये." ..आत्याबाई

माही आत मध्ये गेली...... अर्जुन सुद्धा काहीतरी कारण काढून आत मध्ये गेला...... माही प्लेट भरत होती......


"

तुला का नाही आवडलं माझी इंगेजमेंट होते आहे तर?"..... अर्जुन हळूच तिच्या मागे जाऊन तिच्या कानात बोलला

अचानक असं अर्जुनला आलेला बघून माही दचकली आणि तिने वळून अर्जुन कडे बघितलं....


"

क.....कोण म्हणाले मला नाही आवडले......मला तर खूप आवडले" ....माही अडखळत बोलत होती

अर्जुन तिच्या अगदीच जवळ जाऊन उभा राहिला,  ती मागे मागे सरकत होती,  तो पुढे पुढे जात होता...


"

खरच तुला आवडलं? ......... पण तुझे हे डोळे वेगळच काही सांगतात" ......... अर्जुन तिच्याकडे एकटक बघत बोलला


"

क.....काय डोळे.....डोळे कधी बोलतात का?? मी जे बोलते आहे तेच खरे आहे,  मला तुमची एंगेजमेंट पासून काहीच प्रॉब्लेम नाही ..... मला काही फरक पडत नाही" ......माही


"

खरच तुला काही फरक पडत नाही.?".....अर्जुन.


"

नाही....मला काही फरक पडत नाही.... तुमची आणि सोनिया मॅडमची जोडी खूप छान दिसते...आणि सोनिया Madam la तुम्ही खूप आवडतं सुद्धा" ........माही

तिच्या बोलण्यामुळे अर्जुन ला खूप राग आला होता....


"

इनफ....... तुला विचारलं नाही....काय चांगला दिसते आणि काय नाही" ..... अर्जुन तिच्या दंडाला जोराने पकडत बोलत होता.....


"

सर कोणी बघेल...... सोडा मला" ......माही....अर्जुन रागाने त्याच्याकडे बघत होता

आत्याचा आवाज आला तसा अर्जुन  तिच्यापासून दूर झाला आणि बाहेर जाऊन बसला

त्याने पकडले होता तिथे तिच्या दंडावर त्याच्या हाताचे बोटांचे निशान उमटले होते . तिचा हात खूप लाल झाला होता......कुणाला दिसू नये म्हणून तीने ओडणीमध्ये हात लापवला आणि नाश्ता घेऊन बाहेर सगळ्यांना दिला.....

सगळे बोलत असताना मीरा गडबड करत होती म्हणून माहि तीला बाहेर अंगणात घेऊन गेली आणि तिच्या सोबत खेळत होती......  अर्जुन ला फोन आला म्हणून तो सुद्धा बाहेर आला...... बोलता बोलता त्याचा लक्ष माही आणि मीरा वर पडले....... माही आणि मीरा खेळण्यात मग्न होते..... अर्जुन  त्यांच्या निरागस खेळण्याकडे बघत बसला..... त्यांना खेळताना बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आले...


"

दोघी एकाच वयाच्या वाटतात...... एक काय  हाईटने उंच झाली.... एवढाच काय तो दोघींमध्ये डिफरेन्स दिसतो" ....अर्जुन मनातच बोलतात त्यांच्याकडे बघत होता.  त्याचं लक्ष तिच्या हातावर दंडा  कडे गेलं...... आणि त्याला त्याचे हात उमटल्याचे निशान दिसले....... ते बघून त्याला फार वाईट वाटलं.......


"

का मी तिला नेहमी  इतका हर्ट करत असतो." .....

*****

क्रमशः

🎭 Series Post

View all