भाग ६
अर्जुन खिडकीत उभा राहून माही गेलेल्या दिशे कडे बघत होता ....आज घडलेलं विचार करत राहिला ... का तिच्या डोळ्यात हराऊन जातो मी...कोण आहे ....
जाऊ दे ... महत्वाची मीटिंग आहे उद्या ...झोपायला पाहिजे.. खूप कसरत करावी लागली आज ..विचार करत फ्रेश होऊन आला नि बेड वर पडला..
सकाळी ऑफिस ला जायची तयारी करत होता तेव्हा डोर बेल वाजली
कम इन ...अर्जुन
सर हे मोती सापडले रूम साफ करताना ..एक पॅकेट दाखवत हॉटेल सरवंत म्हणाला...
ह्म्म दे ...म्हणत अर्जुन ने ते घेतले नि ब्लेझर च्या पॉकेट मध्ये ठेवले ...
anything else sir... sarvant
no ...fine ...u may go now ... अर्जुन
अर्जुन तयारी करून ऑफिस साठी निघाला..त्याचा लक्षात आल आजच्या मीटिंग ची महत्वाची फाईल घरीच राहिली होती... त्याने कार घराच्या दिशेने वळवली.
******
अर्जुन आता मुंबई मध्ये शिफ्ट झाला होता .... त्याचा बिझनेस आता खूप वाढला होता ..मुंबई मध्ये त्याची मेन ब्रांच होती ... नाशिक वरून ह्यंडल नव्हतं होत.. म्हणून ते सगळे मुंबई ला शिफ्ट झाले होते. बिझनेस टॉप वर नेण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती , त्यामुळे त्याला कामात सगळं परफेक्ट लागायचं , थोडीशी पण चूक त्याला सहन नाही व्हायची , खूप चढाव उतार बघितले होते, वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत होता ....आणि घरचा जुना अनुभव होताच त्यामुळे त्याचा स्वभाव जास्तीच कडकं बनत चालला होता ..दिसायला हँडसम टॉप च बिझनेसमन खूप मुली त्याच्या मागे लागायच्या, लोकं फक्त पैसाच्या मागे असतात असं त्याचं मत बनलेल होत ....
******
कार शांतिसदन समोर येऊन थांबली तसा वाचामन ने दार उघडले ..त्याची गाडी आतमध्ये आली ....
खूप मोठा बंगला होता तो ... पुढे खूप मोठं लॉन..
सगळं घर त्याने घरच्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेऊन डिझाईन केले होते. थोडा ट्रॅडिशनल टच दिला होता ...
आतमध्ये मोठा हॉल, त्याला लागूनच किचन, बाजूला मोठं देवमंदिर... मंदिर खूप सुंदर डिझाईन केले होते, बघितले की खूप प्रसन्न वाटायचं ... काही बेडरूम खाली काही वर होत्या, त्याच्या पायऱ्या किचन जवळून चान डेकोरेट होत्या ... वरती पण मोठा पॅसेज नी नंतर बेडरूम होत्या .. त्यांना सगळ्यांना कॉमन मोठं ओपन टेरेस होत.
अर्जुन घाईताच आतमध्ये आला .... आजिसहेब सोफ्यावर बसल्या होत्या ..
अर्जुन रात्री घरी आला नाहीस ...आजी
हो काम रात्रीपर्यंत चाललं , मग तिथे हॉटेल मध्येच थांबलो...अर्जुन
तेवढयात अर्जुन ची आई येत ... कसा झाला काळाचा शो
ठीक होता...अर्जुन
काही घोळ झाला होता काय ...आई
ह्म्म्म थोडा, पण झाला सगळं ठीक, don't worry, महत्वाची मीटिंग आहे जायचं लवकर म्हणून तो फाईल घेऊन ऑफिसला गेला .
तेवढयात आकाश ऑफिस साठी तयार होऊन ब्रेकफास्ट करायला आला .. आकश ने सुद्धा आता अर्जुन ला जॉईन केले होते दोघे मिळून बिझनेस छान सांभाळत होते ... म्हणून मामांनी पण रिटायरमेंट च घेतले होते पण महत्वाचं काही असले की मदत करायचे ..
काल काय गडबड झाली शो मध्ये आकाश ... नलिनी (अर्जुन ची आई)
ह्म्म्म डील नाही झाली काल ...थोडा घोळ झाला पण काळजी नको करू आज भाई सगळं सांभाळून घेईल , काळजी नको करू आत्या... आकाश
नी त्याने काल घडलेले थोडक्यात सगळं सांगितले
बरं ठीक आहे ... नाश्ता करून घे ...नलिनी
आजी सगळं ऐकत होत्या .... आकाश नी सांगितलेलं नी माहिनी सांगितलेलं मिळतं जुळत होत ...त्यांच्या लक्षात आलं की ती मुलगी माहीच होती ...नी अर्जूनमुळे तिची नोकरी गेली .
खरच त्या मुलीची चूक होती काय आकाश... आजी
माहिती नाही, पण डील होऊ नये म्हणून कोणीतरी तिला मुद्दाम पाठवल असा वाटलं भाई ला..आकाश
चेहऱ्यावरून तरी ती तशी वाटली नाही मला...मला देवळात भेटली होती काल... आजी ने देवळात घडलेलं सगळं सांगितले
हो चुकून आली ती असं कळलं नंतर...आकाश
बरं आकाश ऐक ना तिची नोकरी गेली... तर आपल्या ऑफिस मध्ये बघ दे तिला नोकरी..आजी
अगं भाई ला नाही चालणार ग ...आकाश
अर्जुन तर मेन ब्रांच ला असतो ना ,तिथे नाही , ते आपला दुसरं ऑफिस आहे ना तिथे inventory मधे घेऊन घे तिला ... आजी
बरं सांगतो तिथल्या मॅनेजर ला ...उद्या पाठाऊन दे तिला तिथे ...आकाश...
ठीक आहे ..आजी
*******
माही आज लवकर उठली ... पटापट आवरून मीरा जवळ आली ती झोपली होती..
.
अरे माझं पिल्लू उठलं नाही आज, माऊ बघ आज तुझ्या आधी उठली ...
माऊ ........ डोळे चोळत मीरा उठली....
मीरा चे पापी घेऊन तिला उचलून घेत बाहेर आली...
अगं छाया (अंजु ची आई) पाच्चिमे कडे उगवला काय सूर्य आज.... माही ला तयार झालेलं बघून ... काय ग मीरा तुझी माऊ आज तुझ्या आधी कशी काय उठली...आत्याबाई
काय हो आत्याबाई मला ना कळतच नाही तुम्हाला नेमक काय आवडते ते ..... पाच्चिमे चा सूर्य की पूर्वीचा .... मस्करी करत माही
माझी मस्करी करते काय..थांब..म्हणत आत्याबाईनी माहीच्या पाठीत एक धपाटा घातला...
आई ग....पाठ चोळत...माही
आई ची आठवण होताच तिच्या डोळ्यात पाणी साचलं...
आई च लक्ष जाता , बर बर पुरे आता या नाश्ता करा... तुला जायचं आहे ना शांतिसदन मध्ये.... आवर पटापट ओढण्या पण काढायच्या आहेत ना...
सगळ्यांनी नाश्ता आटोपला
माही ने सगळ्या ओढण्या एका बाग मध्ये घेऊन ती चमेली घेऊन निघाली..
ती दिलेल्या अड्रेस वर येऊन पोहचली
तिनी वाचमन ला सांगितले... त्यांनी माही ला आतमध्ये सोडले ...
बापरे केवढ मोठं घर... दोन्ही हाथ गालांवर ठेऊन डोळे मोठे करून बघत होती
तिनी डोर बेल वाजवली ... एका बाई ने दार उघडलं...
ये ये माही तुझीच वाट बघत होती .... पिंकी जा सरबत वैगरे खाण्याच घेऊन ये...आजी घरात काम करणाऱ्या बाई ला म्हणाल्या...
ये बस इथे....आजी
माही सोफ्यावर जाऊन बसते नी घराचं निरीक्षण करत असते...बापरे किती सुंदर घर .... मी तर असा घर फक्त टीव्ही मध्येच बघितलंय
आजी घर खूप सुंदर आहे तुमचं... माही
हो...माझ्या नातवाने सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सजवलय... आजी हसत
बापरे क्रिएटिव्ह माईंड दिसतंय माही मनातच
बरं आणल्या काय सामान... आजी
आ....हो हो बॅग पुढे करत म्हणाली
पिंकी नाश्ता, ज्यूस घेऊन आली..
घे बाळा ....आज्जी
मी आताच नाश्ता करून आलेय आजी ....माही
अग घे थोड काहीतरी ....आजी
तिने ज्यूस घेतलं.. धन्यवाद पिंकीताई....माही
माही ने ज्यूस संपवला..
बरं चल आपण वरती माझ्या खोलीत जाऊया... आरामात बघता येईल...आजी
दोघी वरती खोलीत गेल्या ...
माही ने ओढण्या दाखवायला सुरूवात केली ....
अगं हो काय घायो आहे ....बर बाजूच्या खोलीत नलिनी आहे माझी मुलगी, तिला पण आन बोलावून ,ती पण बघेल..आजी
बरं.. माही बाहेर बाजूच्या खोलीत जायला निघाली
जातांना तिला एक काचेच दार दिसलं , तिने तिकडे बघितले..
बापरे काय सुंदर बगीचा ,.... ती दार उघडून आतमध्ये गेली ..
खूप मोठं ओपन टेरेस, मध्ये स्विमिंग पूल,आजूबाजूला मोठं पॅसेज, त्यावर कुंड्या नी खूप झाड ... फुलांची शो ची सगळीच ... तिथेच साईड ला एक टेबल नी खुर्च्या ठेवल्या होत्या... ती सगळं कौतुकाने बघत होती...
किती छान वाटत असेल ना इथे बसायला...ती पुटपुटली
हो खूप फ्रेश वाटते...माझ्या मुलाची आवडती जागा आहे ती ....नलिनी येत बोलली ...
माही मागे वळली....
तुम्ही..... माही
मी नलिनी...
अरे हो मी तुम्हालाच बोलवायला येत होते ... हे सुंदर दृष्या दिसले तर हेच बघत बसले .. माही
खूप सुंदर आहे हे सगळं.... माही
हो.. माझ्या मुलाला गार्डनींग ची खूप आवड आहे ...त्यानेच लावले सगळी झाडं...
निसर्ग प्रेमी दिसतो...माही मनातच
बरं जायचं आत ... नलिनी
अ..हो चला जाऊया..माही
माही ने दोघींना ओढण्या दाखवल्या....
आजी नी नलिनी ला खूप आवडल्या... हातानी केलेलं बारीक काम ..खूप सुंदर होत , डिझायनर ला पण मागे सोडेल असे...
खूप सुंदर....नलिनी
हे बघ आमचा टेक्सटाइल च बिझनेस आहे .. आधी आम्ही बघायचो .. आता मुलांनी हातात घेतली सगळी कामं..तरी पण आमची आवड म्हणून आम्ही बायका स्पेशल लक्ष देऊन काही ब्रायडल थीम ठराऊन ड्रेस डिझाईन करता असतो, दर वर्षी सगळ्या कंपनी चे शो असतात त्यात भाग घेत असतो ... तर अमाची अशी इच्छा आहे की तू आम्हाला यात मदत करावी.....हवं तर नोकरी सारखं समाज... नलिनी
माही खूप खुश झाली , ती लगेच तयार झाली ..
तितक्यात बोलतांना आजिना ठसका लागला...
नलिनी पाणी द्यायला गेली त मग मधले पाणी संपले होते ...
पिंकी ला आवाज देतच होत्या की माही ने जार घेतला नि खाली पळत मी घेऊन येते ...म्हणाली
किती लाघवी पोर आहे ना ही .... आजी
ह्म्म्म ... नलिनी
माही ने आजींना पाणी दिलं..
ममता आली तिथे .... ... एक ओढणी हातात घेत ...माही कडे बघत वाकड तोंड करत... हे काय आहे ... आउट फॅशन डाऊन मार्केट ......सासूबाई तुम्ही याची तारीफ करत होता काल.....
ममता आपल्याला जे समजत नाही ते बोलू नये ..म्हणून तू नाही आहे ना या बिझनेस मध्ये ... नलिनी आणि मोहन ने सांभाळलं ना सगळं... आजी
मला काय करायचं करत ममता बाहेर गेली...
बरं अजून एक बाळा... आमच्या ऑफिस मध्ये एक जागा आहे रिकामी, तू उद्या तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊन बघ... नोकरी मिळाली तर चांगलच होईल...म्हणत ऑफिस कार्ड माहीच्या हातात देत आजी बोलल्या.
हो आजी उद्या नक्की जाऊन बघते.... खुश होत माही
पण आजी हे ड्रेस डिझायनिंग च काम .... माही
ते तू रविवारी नी सुट्टीच्या दिवशी येत जा करायला...नी तुला थोडा समजाऊन दिले की ते तू घरी पण करू शकतेस .... म्हणजे तुला मदतच होणार .... आजी
ही चालेल आजी... माही
बरं मी येते आता, उद्या जाऊन येते नी कळवते तुम्हाला ... माही
माही आनंदातच घरी गेली
दुसऱ्या दिवशी आजी नी दिलेल्या ऑफिस मध्ये गेली, नावापुरतीच इंटरव्ह्यू होता..तिची निवड आधीच झाली होती...ऑफिस तसा थोड गावच्या बाहेर होत ..पण रस्ता रहदारीचा होता, काही प्रोब्लेम नाही वाटला तर तिने नोकरी जॉईन केली...तिने आजी ना फोन करून सांगितले नी धन्यवाद केले...उद्या पासून जॉईन करायचे ते पण सांगितले...
अभिनंदन...आजी
*********
आता इथून पुढे आपल्या अर्जुन - माही ची love story chi सुरुवात होणार.....
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा