Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे ... कसं जगायचं तुझ्याविना 21

Read Later
तू ही रे ... कसं जगायचं तुझ्याविना 21

 

 

 

भाग 21

 

 

 

त्या दिवसापासून अर्जुन च माही सोबत वागणं बदललं होतं..... आता तो तिला फार काही ओरडायचा नाही.....जास्तीत जास्त तिच्याकडे दुर्लक्ष करायचा पण ती कधी समोर दिसली की त्याचं मन मात्र बेचैन व्हायचं..... तिची पण मनस्थिती सारखीच होती......... पण त्याला कामात चुकारपणा आवडायचं नाही , तसं काही दिसलं तर तो मात्र चांगलाच रागवायचा.... ती पण आपलं काम मनपूर्वक करत होती......... तिने लग्नासाठी दिलेला नकार त्याने पचवला होता...... तसाही लग्न त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती...... तिच्या डिसिजन चा मान ठेवला होता.......आणि सोनिया सोबत जमलेले लग्न एक्सेप्ट केलं होतं..... पण तो तिच्यासोबत एकदम कॅज्युअल राहायचा..... स्पेशल अशी काही ट्रीटमेंट नव्हती..... आधी तो सोनिया सोबत वागायचा तसेच आताही वागत होता, लग्न जमले म्हणून वेगळा काही बदल त्याच्यामध्ये झाला नव्हता .... सोनिया मात्र त्याच्यासोबत लग्न जमलं म्हणून हवेत होती.... खूप खुश होती , कॉलेज पासून आवडणाऱ्या मुला सोबत तिचं लग्न जमलं होतं , मनोमन अर्जुन तिला खूप आवडायचा सुद्धा..... पण माहीवर ती नेहमीच नाखूष असायची..... घरच्यांसोबत माही चे  चांगलं जमायचं.... आणि नेहमीच कुठेतरी तिला वाटायचं अर्जुन ला माही आवडते...... म्हणून ति माहीला नापसंत करायची...

 

******

 

 

माहिची ऑफिसला जायची तयारी सुरू होती...

 

आई आणि आत्या चा गप्पा सुरु होत्या....

 

" ताई मी काय म्हणते,  आता अंजली साठी आपण लग्नाचा विचार करायला हवा...... बरेच दिवस झाले आता इकडे येऊन.... वय पण होत आहे आणि तिच्या नंतर माहीच सुद्धा बघायला हवं..." .. आई

 

" माही च तर कठीण आहे .... सगळं समजून घेणाऱ्या मुलगा भेटला तरच व्यवस्थित होईल..... आपण तिच्यासाठी सुद्धा   चांगलं स्थळ शोधू....... आधी अंजलीचं करूया , नात्यांमध्ये आजूबाजूला मुलांबद्दल चौकशी करते.... माझ्या ओळखीचे एक महाराज आहेत तिथे बाजूलाच देवळामध्ये बसतात,  त्यांच्याकडे बरीच स्थळ असतात ,त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस करून येते...... अंजली चा तेवढा बायोडेटा बनवून ठेव आणि फोटो काढून ठेव..." . आत्या

 

" माझ्या लग्नाचा काय बोलणं सुरू आहे तुमचं..??.... मी सांगितले ना मला लग्न करायचं नाही आहे म्हणून.... मी अशीच खुश आहे...." . माही त्यांचं बोलणं ऐकत बोलली

 

"अगं आता कुठे म्हणतो आहे ,आधी ताईचं लग्न करू,  आणि आम्ही काय तुला आयुष्यभर पुरणार आहोत..... आम्ही आज आहे उद्या नाही.... जोडीदाराची तर गरज असतेच ना..... असा एकटीने जाणार आहेस काय.?" .... आई

 

"मला कोणाची गरज नाही आहे..... आणि तुम्ही दोघी आहात ना....... या आत्याबाई आहेत ना , या काय सोडतात होय मला." ... माही हसत बोलली

 

 

"हो तू आयुष्यभर माझ्या डोक्यावर बसून मिरे लाटा." ....... आत्याबाई

 

"मग काय तू माझी लाडाची आत्याबाई नाही काय?"..... माहि आत्याबाई चे गाल ओढत बोलली

 

"बरं आता तो विषय नको ....आधी अंजलीच्या लग्नाचा बघूया तशी पण ती तुझ्या पेक्षा मोठी आहे..." . आई

 

" अरे वा ताईचं लग्न , खूप मजा करू हा मीरा आपण दोघी ताई माई च्या लग्नात ." ....माही मीरा सोबत खेळत बोलत होती.....

 

" माही नाश्ता झाला आहे खाऊन घे लवकर नाहीतर ऑफिसला उशीर होईल." .. आई

 

" चला मिरा रानी नाश्ता करू आपण....." . मीरा ला  घेऊन ती डायनिंग टेबल वर जाऊन बसली आणि मिरा खाऊ भरवू लागली.....

 

नाश्ता आटोपून माही ऑफिसला निघाली..

 

*****

 

" यार भाई,  ही आई बघ ना लग्नासाठी किती मागे पडली आहे.... घरातले कोणीच ऐकून घेत नाही आहे...... तू काय लग्नासाठी होकार दिला आता हे लोक माझ्या मागे पडले...."  आकाश अर्जुन च्या केबिनमध्ये येत वैतागत बोलला....

 

त्याचं बोलणं ऐकून  अर्जुन  हसायला लागला....

 

" काय भाई तू हसत आहेस.....ती आई जाम माझ्या पाठी लागली आहे कुठल्या कुठल्या हिरोईनींचे फोटो रोज दाखवत असते......"  आकाश

 

" चांगला आहे ना मग... सुंदर मुलगी शोधून आणत आहे मामी तुझ्यासाठी..... करून घे एखादी पसंत त्यातून.....काय आता लग्न करावंच लागते म्हणतात तर काय करणार .". ....आता हे महिला मंडळ काही सोडायचे नाही... " अर्जुन

 

" भाई मला लग्न करायचं... लाइफ पार्टनर आणायची आहे....पण असं कोणाही सोबत कसं काय लग्न करणार.?? .. आणि त्या आईने आणलेल्या मॉडेल तर अजिबात नको..... त्यांना काय घरच्या व्हॅल्यू समजणार...??... मला एक साधी सिंपल मला समजून घेणारी अशी मुलगी हवी आहे..... आईला ते कळतच नाही.. टेन्शन आलय.." .. आकाश

 

 

" हे बघ सगळ्या मुली सारख्याच असतात , फक्त पैशाच्या मागे धावणाऱ्या..... कुठलीही शोधून आणली तरी  ती तशीच निघेल..... तू तुझ्या आवडीची शोध....... एक मिनिट तुला आवडते का कोणी...? .  अर्जुन.

 

" भाई तू चिडणार नसशील तर....... तर मला तुला काही सांगायचं होतं....?". आकाश

 

" पर्सनल लाईफ वर कधी चिडलो आहे का मी तुझ्यावर.... मला फक्त इथे बिजनेस  मध्ये सगळे परफेक्ट हवे असते.... बोल काय सांगायचं आहे तुला...?" 

 

" भाई मला ती माही" .......आकाश काही बोलणार तेवढयात अर्जुन ओरडला...

 

" व्हॉट.......तुला माही आवडते......??..... अर्जुन थोडा जोरातच टेन्शन मध्ये येत बोलला...

 

" नो नो भाई... वेट.....मला माही नाही आवडत." ....आकाश

 

" ओह.... ओके...." अर्जुन ने सुटकेचा श्वास सोडला..

" मग...?" .अर्जुन

 

" भाई मला ती माही ची सिस्टर" .....आकाश

 

" अरे बोल पटकन.." ...अर्जुन

 

" मला अंजली आवडते.." ....आकाश एका दमात बोलून घेतले..

 

" व्हॉट...??...आर यू शुअर??" .......अर्जुन

 

"हो... पुजे ला आली होती तेव्हा पहिल्यांदा बघितले ...तेव्हापासून तिचाच विचार येतोय मना मध्ये ..." .

 

तेवढयात फोन वाजला....." okay will be there in five minutes..."  अर्जुन ने फोन ठेवला

 

" आकाश , चल क्लाएंट आले आहेत ... डील फायनल करायची आहे .... मीटिंग आहे , कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊ.." . दोघे रूम मध्ये निघाले

 

सगळे मीटिंग साठी कॉन्फरन्स हॉल मध्ये जमले होते.... ड्रेस डिझायनिंग शी रिलेटेड मिटींग होती त्यामुळे माहीच्या ड्रेस डिझायनिंग मधलं काम बघता अर्जुनने  माहिला सुद्धा तिथे बोलावले होते.... जवळपास मिटिंग मध्ये पंधरा ते वीस लोक जमले होते.... मीटिंग व्यवस्थित सुरू होती... प्रेझेंटेशन चांगले झाले होते...... अर्जुनने डील फायनल केली  आणि कॉन्ट्राक्ट पेपर चेक करत बसला होता.....

 

 

मीटिंग संपली होती, काही पेपर साईन व्हायचे होते, म्हणून सगळे शांत अर्जुंकडे बघत बसले होते. माही इकडे तिकडे बघत होती बघता-बघता तिचं लक्ष वरती गेले..... आणि ती जोराने किंचाळली......

 

" व्हॉट हॅपेन...??... व्हॉट्स गोईंग ऑन हिअर..?" ....  अर्जुन थोडा जोरातच ओरडला..

तसे सगळे माही कडे बघायला लागले

 

माहीने त्याचं  ऐकून न समजल्या सारखे करत घाबरून ती कॉन्फरन्स टेबलच्या आजूबाजूला रूममध्ये सैरावैरा धावत सुटली......

 

" पाल .....पाल........ " ओरडत  ती  पळत होती... तिला कशाचेच भान नव्हते..... सगळ्यांना धक्का मारत वरती बघत ती पळत होती..... पाल सुद्धा वरती इकडून तिकडे पळत होती...... सगळ्यांना धक्का लागल्यामुळे सगळ्यांच्या हातातले पेपर्स फाइल्स सगळं खाली पडलं होतं...... अर्जुन ला ते सगळं बघून त्याचा राग अनावर झाला....

 

" माही स्टॉप इट...... " अर्जुन ओरडला... तरीसुद्धा ती तशीच पळत होती

 

अर्जुन ने तिचा हाताला पकडून तीला स्वताकडे ओढले......ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली

 

" माही शट अप.....काय चाललंय हे..? ..इथे खूप इंपॉर्टन्ट मीटिंग सुरू आहे .? ...तुला कामाचं काही सेन्स आहे की नाही...? ." अर्जुन तिला पकडुन रागवत होता.....तिला काहीच ऐकू नव्हते जात...ती मात्र उभी होती तिथे वरती छत कडे बघून उड्या मारत होती आणि पाल पाल ओरडत होती......तितक्यात ती पाल खाली पडली.....

 

आता मात्र तिला बघून सगळे हसायला लागले

 

" पाल.....पडली.." ..म्हणत ती अर्जुन ला जाऊन घट्ट बिलगली..... अर्जुन ला आता खूप एम्बरेस फील होत होते...... आणि माही काही ऐकायलाच तयार नव्हती...

 

" एस्क्युज मी " .......म्हणत अर्जुनने माहिला तसेच छातीशी घट्ट पकडले आणि उचलून कॉन्फरन्स हॉल च्या बाहेर आणलं..... ती मात्र डोळे बंद करून तशीच ओरडत होती....

 

"चुप .....चुप एकदम.." .. अर्जुन ओरडला आणि तिला खाली ठेवलं.....

 

माहि चूप बसली आणि इकडे तिकडे बघायला लागली.....

 

" मी कुठे आहे??" ..... माही डोळे चोळत होती

 

" काय....? तुझ्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला आहे का ग..??." ...अर्जुन

 

अर्जुनाच्या आवाजाने तिने आजूबाजूला बघितले आणि मग माहीच्या लक्षात आल आपण कॉन्फरन्स रूमच्या बाहेर आहोत, आणि आपण काय करून ठेवले आहे हे तिच्या लक्षात आले ,  तशी ती मान खाली घालून चुपचाप उभी होती.

 

"Now go to my cabin...and write I am sorry hundred times..on paper.... " अर्जुन माहिला बोलत काय रागवत  होता

 

माही मात्र तशीच उभी होती...

 

" गो,  गेट लॉस्ट....."  अर्जुन ओरडला , तशी माही  मागे वळून बघत पळतच त्याच्या केबिन कडे निघाली,  मध्ये येणाऱ्या पिऊन ला सुद्धा ती धडकली..... अर्जुन ने डोक्यावर हात मारला ... कॉन्फरन्स रूम मध्ये जाणार तितक्यात त्याला एक फोन आला ...फोन अटेंड करून तो आत मध्ये कॉन्फरन्स रूम मध्ये आला...

 

 

"सॉरी मिस्टर जॉन...... आम्ही ही डिल तुमच्या सोबत करू शकत नाही.."...अर्जुन

 

"मिस्टर अर्जुन, तुम्ही फार चूक करत आहात...." मिस्टर जॉन

 

" मिस्टर जॉन,  leave now from my office...otherwise I would take some serious actions on you...."  अर्जुन थोडा चिडत बोलला..

 

सगळे आश्चर्यचकित होऊन अर्जुन कडे बघत होते....इतकी महत्त्वाची डील त्याने कशी काय अचानक कॅन्सल केली कोणालाच काही कळत नव्हते...

 

मिस्टर जॉन निघून गेला..

 

अर्जुन ने सगळ्यांवर नजर फिरवली तसे सगळेजण आपापल्या डेस्कवर निघून गेले...

 

" भाई , हे अचानक कसं काय झालं.?" .....आकाश

 

" आकाश,  तो मिस्टर जॉन खूप फ्रॉड आहे , त्याने आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपौन ठेवल्या होत्या,  आत्ताच मला एक कॉल आला होता,  त्यात मला त्याची सगळी माहिती मिळाली.." .....अर्जुन

 

" थॅंक गॉड,  आपला खूप मोठा लॉस होता होता वाचला." ..आकाश

 

" थँक्स माही...... नाहीतर मी ऑलमोस्ट डील साईन करत होतो..." .... अर्जुन ला आता तिच्या वागण्यावर खूप हसू येत होतं... तिच्यावरचा त्याचा रागही आता कमी झाला होता

 

" भाई , माही  फारच वेगळी आहे तुला वाटत नाही का...??" .. बोलत बोलत ते अर्जुनच्या केबिनमध्ये आले... तिथे माही सोफ्यावर मांडी घालून पेपर वर काहीतरी लिहत बसली होती....

 

" भाई Mr  Pal......kar....."  आकाश काही बोलणार तेवढ्यात माहीने परत पाल शब्द ऐकला आणि ती सोफ्यावर उभी राहून परत पाल पाल पाल करत उड्या मारू लागली..... तिला तसं बघुन अर्जुन आणि आकाशला खूप हसू आले....

 

" माही खाली उतर" ....अर्जुन

 

तिने मानेनेच नकार दर्शविला...

 

" माही आय सेड कम डाऊन..... राईट नाव.... " अर्जुन रागाचा नाटक करत बोलला..

 

माहीने गपचूप हळूच एक पाय खाली ठेवत परत वर उचलून घेतला......

 

"मी.....मी नाही उतरणार खाली,   इथे पाल आहे.." ....माही

 

" इथे काहीच नाही आहे,  तुम्ही खाली येऊ शकता.." .आकाश

 

" मग ते तुम्ही आता पाल म्हणालात ना.???.." .माही

 

"काय..???..मी तर mr पालकर बोललो होतो....." .आकाश

 

"खरंच इथे पाल नाही आहे..?" .. माही इकडे-तिकडे बघत बोलली

 

" नाही...."  अर्जुन एकटक तिच्याकडे बघत बोलला

 

माही चुपचाप खाली उतरली......

 

" माहि हंड्रेड टाइम्स लिहून झाल्याशिवाय घरी जायचं नाही." ..अर्जुन 

 

माही मान हलवत अर्जुन च्या केबिन बाहेर पळाली.......

 

"Are you sure ??... तुला हिची बहीण आवडली आहे....??? म्हणजे ती पण तिच्या सारखी असेल तर....... तुझा जो  काही लग्नाचा कॉन्सेप्ट आहे , त्यावरून बोलतोय मी...." .. अर्जुन आकाश ची मस्करी करत बोलला.... तसे दोघे खळखळून हसायला लागले

 

********

 

 

आकाश ने माहीला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं....

 

"प्लीज सिट, माही." ..आकाश

 

"सर काही काम होतं..?"... माही.. 

आकाश सोबत तिला फार कमी काम पडायचे..... तिचा प्रोजेक्ट अर्जुन सोबत सुरू होता.... त्यामुळे आकाश सोबत बोलायचं तिला काही काम पडत नव्हते...

 

"हो, म्हणजे मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं....... मला लग्न बद्दल विचारायचं होतं." .... आकाश

 

" काय.......? .... सर ते मी लग्न करू शकत नाही..... तसा मी अर्जुन सरांना पण सांगितलं होतं...... तुम्ही माझ्या मागे लागू नका..... माझा लग्नाला नकार आहे म्हणजे नकारच आहे....... आणि तसं पण माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आम्ही करणार आहे..... त्यामुळे माझ्या लग्नाचा विषय तुम्ही काढू नका......." माहिची अखंड बडबड सुरू होती...

 

" माही वेट...... मी तुझ्या बद्दल बोलत नाही आहो." ....आकाश

 

" काय....??मग मला का बोलावलं.." .माही

 

" माही , मला तुझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलायचं आहे..... मी जास्त आढेवेढे न घेता तुला सरळ सरळ सांगतो..... मला तुझी मोठी बहीण आवडली आहे.... मला तिच्याशी लग्न करायचे आहे........ प्लीज मला एकदा तिच्याशी भेटून देशील....?" .आकाश

 

"काय....?" .. माही डोळे मोठे करत ओरडलीच..

 

"अगं हो हळू बोल..." आकाश

 

तेवढ्यात अर्जुन नही आकाश च्या केबिनमध्ये काही कामाने आला.....

 

"सर आमची तुमची काहीच बरोबरी नाही..... त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही..." . माही अर्जुन कडे एक कटाक्ष टाकत बोलली..

 

"तुम्हा बहिणींचा काही प्रॉब्लेम आहे का लग्न सोबत.....?? नेहमी काय नाही नाही म्हणत असता??....आकाश सारखा इतका चांगला मुलगा कुठे भेटणार आहे तुझ्या बहिणीला...... ?" अर्जुन थोडा चिडला

 

"मी तुला बोललो होतो , या मुली फार चालू असतात.... त्यांना फक्त पैसे हवे असतात, लग्न वगैरे यांना कोणाला काही करायचं नसते.." ....अर्जुन चा बोलण्यावरचा ताबा सुटला आणि तो मनात येईल तसं बोलत होता...

 

" सर प्लीज, तुम्ही माझ्या ताईला ओळखत नाही, तिच्याबद्दल तुम्हाला असं काहीही बोलायचा अधिकार नाही.... ती तशा मुलींमध्ये येत नाही..." .....माही 

 

"माझ ऑफिस आहे, मी काहीही बोलेल...... तू कोण होते मला सांगणारी.?" ..अर्जुन

 

"अरे तुम्ही लोक थांबा, इथे मी माझ्या लग्नाबद्दल बोलतोय आणि तुम्ही काहीतरी वेगळेच भांडण सुरू केलं..." ....आकाश

 

तसे ते दोघे चूप बसले. 

 

" हे बघ माही, भाईला तसं काही म्हणायचं नव्हतं..... मला प्लीज एकदा तिला भेटवून दे..... मला एकदा तिच्यासोबत बोलू दे नंतर काय ते ठरवू..." .आकाश

 

" सर पण तिचा भूतकाळ.." ..... माही काही बोलणार तेवढ्यात आकाश बोलला

 

"मला तिच्या पास्ट सोबत काही घेणेदेणे नाही.... मला तीला माझं फ्युचर बनवायचा आहे..... त्यामुळे मला एकदा तिच्याशी भेटवून दे, रिक्वेस्ट करतो.." ..आकाश

 

" ठीक आहे सर, मी ताईशी बोलून सांगेल तुम्हाला...." . तिने रागाने एक कटाक्ष अर्जुन कडे टाकला....

 

" व्हॉट...?" .अर्जुन माही त्याच्या रागाने बघत आहे बघून ओरडला

 

त्याचा आवाज ऐकून माही केबिन मधून बाहेर पळाली..

 

"भाई मी तुझ्यासोबत आणि माही सोबत जेव्हा  लग्नाबद्दल बोललो तेव्हा तुम्हाला असं का वाटलं की मी माहि बद्दल बोलतोय.??....... तुमच्या दोघांची पण रीएक्शन्स सेम होती....... काही प्रॉब्लेम झाला आहे का भाई?...... नाही म्हणजे तुमच्या दोघांचे ऑफिसमध्ये सुद्धा पटत नाही......?" आकाशने एक भुवई उंच करून अर्जुन कडे बघत बोलला

 

 

" काय..... ?? कोण म्हणाल आमचे पटत नाही....??" ..अर्जुन

 

"कोण कशाला म्हणायला पाहिजे... सगळ्या ऑफिस ला माहिती आहे, तुम्ही भांडत असता नेहमी......पण भाई तू कसा काय तिला टोलेरेट करतो...??.I mean तू असा कुणाचे पण ऐकून घेत नाही.......म्हणून....म्हणजे तुम्हा दोघांमध्ये........?" .......अर्जुन चे बदलते एक्स्प्रेशन बघत आकाश अडखळत बोलत होता.

 

" आता तू मला विचारणार आणि मी तुला उत्तर देणार काय?" .....अर्जुन दुर्लक्ष करत बोलला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला

 

खरच आहे, लग्न हा शब्द खूप सेन्सिटिव्ह विषय झाला होता त्या दोघांसाठी...

 

" चला आज ताईला विचारूयाच काय गडबड आहे ते!" .. माही मनातच विचार करत तिच्या डेस्कवर जाऊन बसली...

 

आकाश तिला पहिल्यापासूनच आवडत होता..... तो एकदम शांत ,मनमिळावू, दिसायला चांगला होता....त्याचा आणि तिच्यात ताईचा स्वभाव बराच मिळताजुळता येत होता....... तिच्या ताईला शोभेल असाच होता....

 

 

" समजतो काय हा ड्रॅक्युला स्वतःला ?? तुम्हाला काय सॉरी बोलता येत नाही की सॉरी लिहिता येत नाही...... स्वतःला तर कधीच थँक्यू आणि सॉरी बोलता येत नाही ात्र दुसर्‍यांकडून जबरदस्ती बोलवून घेतो..." ...माहिने एका पेपर वर शंभर वेळा सॉरी लिहीले, ती त्यांच्या केबिन कडे जात होती.... कि ती पाय घसरून पडणारच होती की तिला कमरेत पकडून कोणीतरी स्वतःकडे ओढून घेतलं......पडायच्या भीतीने माहिने डोळे बंद करून घेतले होते..... आणि तिने त्याच्या शर्टच्या कॉलरला एका हाताने घट्ट पकडले होते.....

 

आपण खाली पडलो नाही आहो , हे लक्षात येताच तिने डोळे उघडून समोर बघितलं तर अर्जुन एकटक तिच्याकडे बघत होता आणि ती अर्जुनच्या मिठीत होती......त्याला तसं बघतांना बघून ती सुद्धा त्याच्या डोळ्यात हरवली होती.....

 

"मी आवडतो तुला ......तुझ्या डोळ्यात दिसते ते..... तू मान्य का करत नाही माही...." . अर्जुन मनातच तिच्या डोळ्यात बघत बोलत होता

 

"मला माहिती आहे सर.....तुम्ही माझ्यावर प्रेम करायला लागले, सर पण माझा नाईलाज आहे मला माफ करा...." माही सुद्धा त्याला बघत , मनात बोलत होती. 

 

" नो नीड टू से सॉरी .... आय रेस्पेक्ट यूर फीलींग्ज.... लिव इट....." अर्जुन तिला बघत बोलला.......जसं काही तिच्या मनातलं त्याला एकू आले होते.......

 

" तुझा प्रॉब्लेम काय आहे , एकदा सांगून बघ माही .?" ...अर्जुन मनातच बोलत होता... आणि तो माहीच्या दूर झाला.... 

 

माहीने सॉरी लिहिलेला पेपर त्याच्या हातात दिला...... ते बघून तो गालातच हसला.....

 

" नीट लक्ष देऊन चालत जा माही... नेहमी नेहमी मी नसणार आहे तुला सांभाळायला" .... म्हणत तो तिथून निघून गेला...

 

******

 

क्रमशः 

 

********

 

 

 

Hello wachak mitranno

 

Aadhi tar tumha sagalyanche khup khul dhanyawad ki tumhala katha aawadate aahe ... मी सगळे कॉमेंट्स वाचते, फक्त कधी कधी सगळ्यांना reply करायला होत नाही तरी क्षमस्व.

 

आजच्या पाली च्या incident बद्दल, कदाचित ते फार फिल्मी वाटले असेल, पण खरंच पाल कॉकरोच ला घाबरणारे लोक असतात, मी जवळून बघितले आहे. 

 

धन्यवाद 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️