तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना. 11

माही अर्जुन

भाग ११


 

कुणीतरी  माही चा हाथ पकडून तिला स्वतःकडे ओढून  उचलून घेत बाजूला केले.....माही सुद्धा खूप घाबरली होती अचानक अशी ती गाडी समोर आली....तिला काहीच कळलं नव्हतं...तिने पण दोन्ही हातांनी गळ्यात हात घालुन घट्ट पकडून घेतले होते ....

पागल आहेस काय ग तू, दिसत नाही काय तुला , अस न बघता रस्ता क्रॉस करतात काय .... कधीचा आवाज देतोय ...ऐकू येतं की नाही .....काही झालं असते म्हणजे.....म्हणत तो तिच्या डोळ्यात बघत होता, अजूनही त्याने तिला उचलून  पकडून ठेवलं होत.....बोलता बोलता तो अचानक थांबला......आता एकटक तो तिच्या डोळ्यात बघत होता.....

खूप पाऊस सुरू होता....दोघंही पूर्णपणे भिजले होते, पावसाचं पाणी तिच्या केसांवरून खाली ओघळत होते.....त्यातही त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसले... खूप असहाय्य भाव त्याला तिच्या डोळ्यात जाणवले....ती खूप घाबरलेली त्याला जाणवत होती, तीच अंग थरथरत होते...... तिची धडधड वाढली होती,  जी त्याला स्पष्ट ऐकू जात होती... ती रडत होती ... एकटक पेन्फुल नजरेने त्याला बघत होती........तो सुद्धा तिचे डोळे वाचण्यात गुंग झाला होता....

बाजूंनी गाड्या जात होत्या, हॉर्न चा आवाजाने दोघांची तंद्री सुटली...

relax..... तू ठीक आहेस.....म्हणत त्याने तिला खाली उतरवले..

तिने आजुबाजुला बघितले,  ती मुलं आता तिथे नव्हती..तिला आता थोड बर वाटले...तिने ह्म्म म्हणत मान हलवली.....

ती ऑटोसाठी वळणार ... तेवढयात तो तिला म्हणाला चल गाडीत बस मी घरी सोडतोय तुला...

मी जाईन.....माही

अर्जुन ला ना ऐकायची सवय नाही आहे, मी विचारत नाहीय्ये , सांगतोय तुला...बस चुपचाप...अर्जुन

हो तिला ॲक्सिदेंट होण्यापासून वाचवनारा अर्जुन च होता, तो घरी जायला निघाला होता, पार्किंग मधून गाडी काढत होता तेव्हा त्याने तिला तिथे बघितली होते ...

माही गाडी मध्ये जाऊन बसली, अर्जुन दोन्ही हातांनी केस नी अंगावरच पाणी झटकून गाडीत येऊन बसला....नी ड्राईव्ह करू लागला....... कार चालवताना तो अधूनमधून तिच्या कडे बघत होता, ती तिच्याच विचारांमध्ये हरवली होती.... ओली झाल्या मुळे तीच अंग थरथरत असावं बहुतेक....त्याच्या ते लक्षात आलं, त्याने गाडी च हीटर सुरू केले , आता तिला थोड बर वाटत होत..,...

माही घराचा पत्ता.....अर्जुन

अं....माही , तिची विचारांची तंद्री सुटली.....

address......? अर्जुन

तिने पत्ता सांगितला..,...थोड्या वेळाने गाडी घरासमोर येऊन थांबली.....तिने स्वतःचा अवतार ठीक केला ...गाडीतून उतरली, ... नी घराकडे चालत गेली.... ती घरी जाई पर्यंत  अर्जुन तिथेच थांबला होता....दाराजवळ पोहचली तशी ती थांबली... अर्जुन तिच्याकडेच बघत होता.....तिने मागे वळून थोड बघितले....नी आतमध्ये गेली..

तिला आतमध्ये गेलेले बघून , अर्जुन गाडी स्टार्ट करून तिथून निघून गेला...

माही घरात गेली तशी आत्याबईंचा प्रश्नांची तिच्यावर भरिमाड सुरू झाली....तिने काम जास्ती होते नि पावसामुळे ऑटो भेटत नव्हता सांगून वेळ मारून नेली..

बरं बरं किती ओली झालीय, जा आधी कपडे बदलून  घे आधी  , नाहीतर सर्दी होईल....आई

माही मीरा चा पापा घेऊन आतमध्ये गेली... नी कपडे बदलून घेतले, डोकं पुसल....बाहेर आली

माऊ तू किती उशिरा आली, तू येताना केक आणार होती ना ....आता तर दुकान पण बंद झाले असणार ...... मी केक कसा खाऊ आता.... ताई माई चा happy birthday आहे न.....मीरा लहानसे तोंड करत म्हणाली

अगं मीरा बाळा....माऊ आली ना आता...तू मघापासून किती विचारत होती कधी कधी येईल ते ....आपल्याला birthday उद्या पण करता येतो ना...ताई

मीरा बाळा, माऊ आहे ना तुझी..... चल आपण गम्मत करूया ....ताई माई ला पण नाही सांगू हा.... सिक्रेट आहे हा आमचं ......उचलून तिला किचन मध्ये घेऊन गेली ... तिला ओट्यावर बसवला...

मीरा मदत करणार मला , आपण मस्त केक बनऊया....कोणता बर बनवायचा..... चॉकलेट केक....मीरा आनंदाने ओरडली...... माही मीरा गप्पा मारत केक बनवायला लागल्या.... कूकर मध्ये बेक करायला ठेऊन हॉल मध्ये आल्या.....

आई आत्या ताई यांच्या गोष्टी ऐकत बसल्या होत्या..

किती थकली आहे , तरी पोरीचं मन ठेवायला सगळं करत बसली......कुठून येते इतकी energy ..... आई

चला आता मीरा झोपणार....माही

नाही.....मला केक खायचा ....आता....नी bulloons पण लावायचे ना आपल्याला... माझ्या happy birthday ला केलें तसे.......मीरा

मीरा चा काही झोपायचा मूड दिसत नव्हता .....

सगळ्यांनी मिळून हॉल डेकोरेट केला .....नाचत गाजत मीरा माही च सुरू होते काम, बाकीच्यांना पण हुरूप आला ....

ताई जा नवीन ड्रेस घालून ये ....आपण केक कट करू...माही

खर तर रात्र बरीच झाली होती, पण एकमेकांच्या उत्साहाने सगळे तयार झाले.......आई ने औक्षावान केले, ताई ने केक कट केला... मीरा आपल्या बोबड्या बोल मध्ये happy birthday to you song म्हटले..... वाढदिवस साजरा करून सगळे झोपी गेले.

अर्जुन घरी आला, त्याने चेंज केले, डोकं पुसत पुसत सारखा माही चा च विचार त्याच्या डोक्यात फिरत होता...... काय होत तिच्या डोळ्यात...का मला ती आठवते आहे .......तिच्या विचारातच तो झोपी गेला...

********

दुसऱ्या दिवशी

आपल्याच तालात माही बडबड करत ऑफिस चा आत आली नी आपल्या डेस्क कडे जात होती .....अचानक चालता चालता थबकली.....

आज पण आला ड्राकुला, आज काय काम आहे याला इथे..,... काल साठी रागव्हायला तर नाही आला.....अरे देवा हे काय सकाळी सकाळी यांचं तोंड दिसलं, आता परत दिवस वाईट जाणार , किती रागाने बघताय... २-३ जणांवर नक्कीच ओरडणार दिसतंय आज.... ती अर्जूंकडे बघत मनातच विचार सुरू होते....

अर्जुन पण प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता....

आ..... आश्ची.....अर्जुन ला शिंका आली....सकाळपासून त्याला असाच होत होते.........

राजू (peon) टिश्यू पेपर ...अर्जुन

राजुने लगेच टिश्यू पेपर चा बॉक्स आणलं, त्यातला एक काढून अर्जुन ला दिला...तितक्यात...

आ....आश्ची.....माही...

माही च पण सकाळपासून हेच सुरू होत, दोघं काल पावसात चांगलेच बिझले होते ना ...

राजुनेएक टिश्यू पेपर काढून माही ला दिला .....

आ....आश्ची..............अर्जुन

राजुने त्या परत एक काढून दिला....

आ....आश्ची..,,,,..............माही

३-४दा अस झालं, राजू दोघांकडे डोळे विस्फारून बघत होता नि त्यांना टिश्यू पेपर देत होता...

आता ऑफिस मध्ये साग्गळेच त्या दोघांकडे बघत होते...अजब नजरेनी....सगळ्यांना हसू पण येत होत , पण कंट्रोल करत होते ...

बापरे काय कॉम्बिनेशन झालंय बॉस नी माही च ......सीमा रिया टीना कडे बघत बोलली

हो ना ....काकूबाई जॉईन झाल्यापासून यांचं हे असच काहीस tom n jerry सारखं सुरू आहे .... टिना

तसे त्यांच्या आजूबाजूला उभे असणाऱ्यांना थोड हसू आलं..... गोपाल पण त्यांना बघत गालातच हसत होता...

सर तर कोणालाही जवळ भटकू देत नाही त्यांच्या आसपास...हिला कसं टोलेरेट करतात......किती इरीटेटेड आहे ही..,...रिया

सगळ्यांची आपसात कुजबुज सुरु होती..

how dare u.???..... माझ्याच समोर माझी नकल...आ....आश्ची.....अर्जुन, आता अर्जुन ला राग यायला लागला होता

आ....आश्ची,.......... माही

stop it....आ....आश्ची....अर्जुन

मी जाणून नाही......आ....आश्ची....... माही

just shut up..........आ....आश्ची........अर्जुन

s..sorr.........आ....आश्ची.......माही

राजू पण घाबरला अर्जुन चा आवाजाने ....

go ssss......... अर्जुन, राजू रागाने जोर्यात ओरडला

राजू जायला निघाला........

तुला नाही तिला....,आ....आश्ची.....अर्जुन

माही ने ४-५ टिश्यू पेपर डब्ब्यातून काढले नी आपल्या डेस्क कडे पळाली....अर्जुने सगळ्या स्टाफ वर नजर फिरवली , तसे ते पण आपल्या जागेवर बसले आपले काम करत.....अर्जुन आपल्या केबिन मध्ये येऊन बसला...

माही डेस्क जवळ येऊन बसली , पण तिच्या शिंका सुरूच होत्या ...अर्जुन तिला आतमधून बघत होता......... त्याचा पण शिंका सुरूच होत्या.......आता त्याला हसू यायला लागलेले......आधी त्याला वाटले ती त्याची नकल करत आहे .......किती विचित्र आहे ही.... impossible आहे .......आता त्याला खूप हसू यायला लागले, त्याला आठवलं काल ती सुद्धा भिजली होती...

अर्जुन ने कॉफी ऑर्डर केली...नी राजू ला माही ला आतमध्ये पाठवायला सांगितले...

राजू ने कॉफी आणून ठेवली नी माही ला सर बोलवत आहे, सांगून गेला

आता परत का बोलावले...... परत ओरडतील आता .....अजून तर कामाला सुरुवात पण नाही झाली,  काहीच केले नाही....परत जास्ती काम देतील काय,...मनातच बोलत......ती हळु हळु चालत केबिन जवळ आली , डोअर नॉक करणार तेवढयात come in आवाज आला....

बापरे नॉक ची पण वाट नाही बघितली यांनी... एवढी घाई झालीय ओरडायची .... ती घाबरतच आतमध्ये आली, अर्जुन समोर जाऊन उभी राहिली, अर्जुन फाईल मध्ये बघत काही काम करत होता....

सर मला बोलावलं ...?? काही काम होत काय..?? तिचा आवाज भीतीमुळे  कापरा झाला होता

बसा मिस देसाई........अर्जुन

अं....... माही

sit down मिस देसाई.......अर्जुन

माही खुर्चीवर जाऊन बसली

कॉफी घ्या.....कॉफी कडे हाथ दाखवत.... अर्जुन बोलला

माही डोळे विस्फारून अर्जुन कडे बघत  होती....

घ्या....,अर्जुन

त्याच्याकडे एकटक  बघत , आज येवढी मेहरबानी आपल्यावर.... मूड बरा वाटतोय.....,. माही डोक्यात विचार करत .... कॉफी घ्यायला हाथ पुढे करत होती.....कप उचलायला  गेली तसा तिला जोरदार चटका बसला.... नी कप हातातून खाली पडला.......

what the....... अर्जुन उठून उभा राहिला .......

तो खाली बघत होता......माही ने पण तो बघत आहे तिकडे बघितले ..नी तिची घाबरगुंडी उडाली....

फाईल चा काही पेज वर कॉफी सांडली होती.....

तो तिच्याकडे रागाने बघत होता.......

s....sorry .... त... ते कॉफी गरम होती....माही अडखळत बोलली...

मग.....? कॉफी गरमच असणार ना ..,.....अर्जुन

ते चुकून झाल......माही

डोक्यात काही काही बडबड करत राहशील तर असच होणार ना .......तो ओरडला..

माहीच्या चा डोळ्यात पाणी आले...

पाहिले त मला वाटतं होत डोक्यातच प्रॉब्लेम आहे , पण सगळ्या बॉडी मध्येच प्रॉब्लेम दिसतोय........अर्जुन रागात

यांना कसं कळलं मी डोक्यात बोलत होती ते .......माही घाबरतच त्याच्या कडे बघत होती....

तुझ्या या डोक्यावर तान नको देऊ आता जास्ती......त्याने फोन लावला..,.महेश मला शाह प्रोजेक्टचे पेपरचे printouts पाहिजेत, right now.... म्हणत फोन ठेवला...

माही कपचे  तुकडे उचलत होती ...तिला आता खूप भीती वाटत होती......

ते राहू दे ....बोलावतो मी क्लिनर ला ...अर्जुन

माही चुपचाप उठून उभी राहिली.......

घरी जाऊ शकते तू,  आज लवकर....बर वाटत नाहीये ना.........अर्जुन

तिने मान हलवली नी जायला वळली... दारा जवळ पोहचली...........तेवढयात त्याला आठवले की आपण तिला घाबरावयाला नाही तिचा हालचाल विचारता यावा म्हणून आज ऑफिस ला आलोय....

माही......अर्जुन ने परत आवाज दिला


मिस

देसाई वरून माही.......तिला बरं वाटले

माही मागे वळली......काय...?

तू ठीक आहेस ना ???......अर्जुन

माही ने होकारार्थी मान हलवली....l

जाऊ मी.....माही

ह्म्म ...अर्जुन

माही अर्जुनाच्या केबिन बाहेर पडली

आज अर्जुन मुद्दाम या ऑफिस ला आला होता ... काल त्याला माहीची काळजी वाटली होती...का वाटत होती ते त्याला पण कळत नव्हते,  पण त्याला माही ठीक आहे की नाही बघायचं होत,  म्हणून आज तो त्याला बर नसतांना पण ऑफिस मध्ये आला होता....

*******

क्रमशः

********

प्रेम आहे पण सांगता येत नाही, काळजी आहे पण दाखवता येत नाही, एकेमकांचे आहे पण सोबत राहता येत नाही.....हा या कथेचा गाभा आहे ...

आतापर्यंत माझ्या तीन कथा नंदिनी, जय वेडी, अभिमन्यू या खूप भावनिक कथा झाल्यात.... म्हणून हा वेगळा प्रयत्न.....पण पुढे जाऊन ही पण भावनिक झाली....

इस प्यार को क्या नाम दू , बऱ्याच वर्षांपूर्वी ही सिरियल स्टार प्लस वर यायची.....मला खूप आवडली, खास करून त्या दोघांमधल chemistry..... त्यांनी त्यांचा मनभवाक अक्टिंग नी सर्वांवर तेव्हा भुरळ पाडली होती....त्या नंतर परत ते दोघं टीव्ही वर सोबत आले नाही........

ॲक्टिगद्वारे दाखवलेली chemeistry आपण आपल्या लेखणामधून दाखाऊ शकतो काय, लिखाणातून तसे magic creat होऊ शकते काय असे वाटत होते.....म्हणून हा प्रयत्न करत आहे......कथा पुढे जाऊन बरेच वेगळे वळण घेणार आहे.....यातूनही परत मी काहीतरी सामाजिक गोष्टींवर फोकस केला आहे......तो हळूहळू पुढे येईल......आवडल्यास नक्की सांगा, बोर वाटल्यास ते पण कळवा.....

Thank you

🎭 Series Post

View all