Aug 09, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 2

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 2

तू ही रे ..... कसं जगायचं तुझ्याविना

भाग  2

नाशिक
अर्जुन पटवर्धन , 24 वर्षाचा उमदा तरुण , दिसायला एकदम  भारी handsom , 6ft उंची , रंग गव्हाळ गोरा , व्यायामाने कमावलेलं शरीर , पाणीदार ब्राऊन डोळे, थोडासा रागीट , प्रेम लग्न संकल्पनेवर अजिबात विश्वास नसलेलं, नुकताच अमेरिका वरून डिग्री घेऊन परतलेला , ap कंपनी चा एकुलता एक वारसदार .

रस्त्यात भेटलेल्या मुलीला हॉस्पिटल मध्ये तिची सोय करून घरी आला, घरात जाणार तोच त्याला आवाज आला अर्जुन थांबा ...

अर्जुन दारातच थांबला , बघतो तर काय पुढे त्याची ताई अनन्या  आरती च ताट घेऊन उभी होती स्वागतासाठी, तिच्या सोबत आई, आजी(आई ची आई), मामा, मामी, मामेभाऊ आकाश , मामे बहीण श्रीया उभे होते ...

अर्जुन मोठे डोळे करून बघत होता ... व्हॉट .. आई हे काय आहे ,तुम्हाला माहिती न मी हे सगळं काही मानत नाही , तरी तुम्ही हे काय करताय...

(अर्जुन चा घरचे वावरण खूप पारंपरिक , सगळे रीतिरिवाज प्रमाणे व्हायचं, आजी च तसा कटाक्ष च असायचं , त्यात त्याची ताई अनु तिला सुद्धा खूप आवड आणि विश्वास, अर्जुन चे वडील नव्हते   )

आई डोळ्यात आनंदाश्रु आणून असू दे रे तुझ्या ताई च आणि आमचा सगळ्यांचा आहे न विश्वास , करू दे तिला आरती .. आम्ही तुझी तीन वर्षांपासन वाट बघतोय ,एकदाही भेटायला नाही आलास तू 

आजी अरे हो हो सगळं राग लोभ पूर्ण करा ,त्याला आधी घरात तर घ्या, अनु बेटा चल कर त्याची आरती लवकर , बिचारा माझा सोन्या तत्कळला आहे दारातच , किती थकला दिसतोय

अनु नी अर्जुन ला कपाळाला कुंकू अक्षद लावल आणि छान हसून आरती केली आणि सगळ्यांनी एका सुरात वेलकम केले .

अनु त्यांचा कडे काम करत असणाऱ्या गोपाळ काका अर्जुन च समान त्याच्या रूम मध्ये नेऊन ठेवा

अर्जुन आत आला त्यांनी आई ला घट्ट मिठी मारली आणि वाकून नमस्कार केला , (आपला अर्जुन या गोष्टींना मनात नसतो पण आई आजी ताई चा  आशीर्वाद मात्र घ्यायला विसरायचं नाही , आई आणि ताई त्याचे जीव की प्राण )

अर्जुन ने सगळ्यांना हग केले , तेवढयात ताई ने त्याचा एक कान ओढला काय रे आरू इतका कुठे वेळ लागला , आधीच तीन वर्षांनी येतोय त्यात अजून उशीर , घ्यायला एअरपोर्ट वर यायचं म्हणलं तर नको म्हणाला आणि आता इतका उशीर कुठे केला  , (अर्जुन ला झालेला प्रकार सांगायचं नव्हता नाहीतर ही लोकं अजून टेन्शन घेतील ) अर्जुन नाटकी आवाजात ओये ओये सोडणा दुखतेय .. आई बघना कशी करतेय , तुझ्या नवऱ्याला पण अशीच त्रास देते काय ग  , सांगतो सांगतो आधी कान तर सोड ... ते रस्त्यात कार पँक्चर झाली होती म्हणून उशीर झाला

बरं आता हेच सगळं विचारणार की जेवायला पण विचारणार , खूप भूक लागलीय ,किती दिवस झालेत आई चा हातचं खाल्ला नाहीये .. तुम्हाला तर माझी काही काळजीच नाहीये ????????

हो जा फ्रेश होऊन ये , सगळं तयार आहे ..आई

अर्जुन आपल्या रूम मध्ये जातो .. बघतो तर त्याची रूम जशीच्या तशी ठेवलेली , जुन्या आठवणी आठाऊन आल्या .. कसा काय मे तिकडे राहिलो मलाच माहिती आपल्या मनातच तो बोलला आणि फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेला

सगळी लोक डायनिंग टेबल वर बसले, अर्जुन पण फ्रेश होऊन खाली आला आणि श्रीया चा शेजारी जाऊन बसला

वाव सगळं माझं आवडत .. आई ने पानात जिलेबी वाढली ... ये काय ग आई हे काय हे कुठे आवडते मला , अरे खाऊन बघ ताई ने बनवली आहे

ये काय ग ताई आमच्या वर च प्रयोग करशील काय हे सगळे , आल्या आल्या हॉस्पिटल ला पाठवायची तयारी केली तू ????  (हॉस्पिटल च नाव घेताच त्याला ती मुलगी आठवली, कशी असेल ती , बरी असेल ना ) अचानक तो शांत झाला आणि जेवण करू लागला

ममता(मामी) : ये अर्जुन मी सांगितलेली लिस्ट आणली काय रे
मामा - चिडून )  अभ्यासा साठी गेला होता , तुझं सामान आणायला नाही
ममता: असं काय हो एकुलता एक लाडाच भाचा आहे  माझा , त्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार
अर्जुन - सगळं आणलं

मामा : मामी नी काय मागवला रे , इकडे माझ्याकडून पण खूप शॉपिंग करवते ती

श्रिया : अजून काय .. मेकप च समान असेल , काय दादू बरोबर ना

अर्जुन गालात हसला
तसे सगळे हसायला लागले

आपल्या मामी ला मेकप करायची खूप हौस बरा का ☺️????

(आकाश खूप लाजळू) आकाश कसा चाललं तुझं कॉलेज ... बोलायला शिकला की नाही ..अर्जुन

छान सुरू आहे कॉलेज दादू , शेवटचं वर्ष आहे

सगळे गप्पा करत जेवण करतात

आई मी थकलोय ग खूप, आराम करतो ... सी यू guys .. असं म्हणून आपल्या रूम मध्ये जातो, बेड वर स्वतःला झोकून देतो .. हॉस्पिटल मधल्या मुली बद्दल विचार करता करता झोपून जातो .

सकाळी उठतो सगळ्यांसोबत थोडा वेळ घालवतो  , पण जेट लाग मुळे परत लंच करून झोपून जातो.

**********

दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ला फ्रेश वाटतं, आज तो हॉस्पिटल मध्ये जाऊन त्या मुलीला भेटून यायचं ठरवतो , त्यालाच स्वतःच आश्चर्य वाटते की का आपण इतका विचार करतोय तिचा ..

अर्जुन लंच आटोपून आई ला सांगून बाहेर जातो
इथे तो हॉस्पिटल ला येतो , बघतो तर त्याला कळते की ती डिस्चार्ज घेऊन गेली असते, तो डॉक्टर ला त्या मुली चा तब्बेती बद्दल  विचारतो . डॉक्टर how's she ?
she is much better now, just need some rest
अर्जुन त्यांची माहिती विचारतो पण त्याला काहीच माहिती मिळत नाही ... हॉस्पिटल च रुल असतो तसा
डॉक्टर लास्ट क्स्शन , how's the baby.. अर्जुन
इट्स a baby girl , she is absolutely fine and normal ????

thank you doctor ????

तो विचार करत घरी येतो , अशी कशी निघून गेली, इतकी काय घायी होती तिला  , केशव काका ना विचारायला हवं , तिचे निळे डोळे आठवत तो घरी येतो .

समोर गाडी जवळ केशव काका त्याला दिसतात , अर्जुन त्यांच्या जवळ जातो

काका परवा तुम्ही तिथे होता ना, काय झालं , सगळं नीट झालं ना

हो साहेब , मी थांबलो होतो , मुलगी झाली त्यांना , छान होत बाळ, थोड्या वेळानी त्या शुद्धी वर आल्या , त्यांना नर्स नी कल्पना दिली

मी भेटलो आणि त्यांना झालेला प्रकार थोडा सांगितला , आपण इथे त्यांना घेऊन आल्याचं सांगितले.
नंतर त्यांनी कुणाला तरी काल केला , थोड्या वेळाने एक बाई आली , त्या म्हणाल्या मी घेते काळजी तुम्ही जा , मी त्यांना तुमचा आणि माझा फोन  नंबर दिला नी सांगितले काही पण मदत लागली तर फोन करा, आणि मे निघून आलो .

ह्म्म्म ..अर्जुन , ठीक आहे काका घरी कुणाला नका सांगू काही , उगाच त्यांना टेन्शन .
हो साहेब , काळजी नका करू .

*********

अर्जुन ने घरचा बिस्नेस जॉईन केला , त्याच स्वप्नं च होता बिस्नेस ला टॉप वर नेऊन ठेवायचं ,त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता, दिवस रात्र एक करून काम करत होता.

********

रविवार असल्यामुळे अर्जुन आज घरीच होता,
आई ला आता सासू होण्याचे वेध लागलेले, त्या हातात काही घेऊन अर्जुन चा रूम मध्ये आल्या, अर्जुन लॅपटॉप वर काहीतरी काम करत बसलेला .
बोला आईसाहेब आज काय काम काढलं..अर्जुन
तुला कामा व्यतिरिक्त काही दिसतंय काय रे ..आई
अर्जुन आई चा हाथा कडे बघत , आई आता परत तोच विषय नको ग
अरे बघून तरी घे , छान मुलींचे फोटो आहे, आणि शिकलेल्या सुद्धा , आवडतील बघ

अर्जुन रागात डोळे मोठे करून , परत शांत होण्याचा प्रयत्न करतो

आई आता कुठे मे कामाला सुरुवात केलीय, खूप स्वप्नं आहेत पूर्ण करायची आहेत, आता कुठे मी फक्त २४ च आहे , माझं सध्यातरी वय आहे का हे सगळं करायचं  आणि तसा पण तुला माहिती माझा लग्न प्रेम वैगरे वर विश्वास नाहीये .. का मागे लागते ग

अरे पण...आई

अगं आई सोड त्याला , प्रेमात पडेल , आपोआप येईल आपल्याजवळ लग्न करून द्या म्हणून सांगायला .. ताई आतमध्ये येत बोल ली

मी आणि प्रेम .. नो वे , तुम्हाला सगळं माहिती आहे तरी तुम्ही परत तोच विषय का काढता , अर्जुन त्रासून रागात बोलतो ..

बरं राहील ...नको तो विषय .. आई

*************

तीन वर्ष नंतर .....

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️