Login

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 20

माही अर्जुन

भाग 20

 

अर्जुन माहिला सोडून घरी आल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होत होता....... वारंवार त्याच्या डोळ्यासमोर माहिने बोललेल्या गोष्टी आठवत होत्या.....

" माझं चुकलं....... मीच तिला बोलायला चान्स दिला.......आजपर्यंत कोणाची  अशी बोलायची हिंमत झाली नव्हती माझ्यासोबत........ समजते काय स्वताला......?.. आता तिला पण दाखवतो अर्जुन काय चीज आहे ते..???.......पण तिच्या डोळ्यात काही वेगळं होतं...... जे ती बोलत होती ते तिच्या डोळ्यात दिसत नव्हतं."" .... अर्जुन आपल्या विचारात ठरवला होता तेवढ्यात आईने  डोअर नॉक केलं.... त्याची तंद्री तुटली....

"अग आआई, ये आत,  तिथे का उभी आहे?" ....अर्जुन

" अर्जुन.... असा अचानक लग्नाचा निर्णय..???.... फार घाई तर नाही झाली ना......" .. म्हणजे बघ तू अजून विचार कर...." आई

" काय  आई,  लग्नाला नाही म्हणत होतो तेव्हा सुद्धा मागे लागले होते,  आता हो म्हणालो तरीसुद्धा तुला प्रश्न पडलाच आहे काय??......आता कुणासोबत तरी लग्न करायचं तर सोनिया बेटर आहे  सगळ्यांमध्ये,  ओळखतो मी तिला आधीपासून  आणि तुम्हाला सुद्धा आवडली म्हणाले ना .......म्हणून हो बोललो..... " अर्जुन

" अरे तसं नव्हतं म्हणायचं मला........ तुला मनापासून आवडली असेल तर हो म्हण असं बोलत होते मी" ...आई

"अस बीस काही नसते आई......... प्रॅक्टिकली विचार केला तर सोनिया ओके आहे माझ्यासाठी........ आता ठरलंय ना आता परत यावर चर्चा नको" ...... अर्जुन

" बरं बाबा तू विचार करूनच काही निर्णय घेतला असेल,  ठीक आहे तू खुश आहेस ना मग मी पण खुश......  आज खूप थकला असशील....बरं झोप आता...... " ...आई त्याच्या गालावर थोपटत निघून गेली...

" खरंच आई बोलते तसं तर काही नाही ना....??. सोनिया  सोबत लग्नाचा निर्णय योग्य आहे ना...???... सोनिया पण प्रॅक्टिकल आहे ती मला ओळखते...... ठीक आहे सगळं..." .. बेडवर पडल्या पडल्या विचार करतच अर्जुन झोपी गेला

******

ऑफिस सुरू होते,  आता अर्जुन माहिला जमेल तितका इग्नोर करत होता........त्याला आता ती त्याच्या समोर सुद्धा नको वाटायची..... त्याच्या केबिन मधून त्याला ती दिसायची म्हणून त्याने तिची जागा सुद्धा बदलवायला सांगितली होती.........महिला खूप वाईट वाटत होतं , पण हेच आपल्यासाठी चांगल आहे विचार करून ती स्वतःला समजूत घालत होती आणि कामांमध्ये लक्ष घालत होती...

अर्जुन फोनवर बोलत जात होता...... " निलेश मला कॅलेंडर प्रोजेक्ट ची फाईल दाखव" ...... अर्जुन ने आवाज दिला....

माही कडे त्या प्रोजेक्टची फाईल होती म्हणून माहि ती प्रोजेक्ट ची फाईल घेऊन पुढे आली,  निलेश सुद्धा तिच्या मागे आला....... माहीने फाईल अर्जुन च्या समोर धरली..

" मिस देसाई,  मी निलेश ला फाईल मागितली होती,  तुम्ही काय घेऊन आलात फाईल..??"... अर्जुन तिच्याकडे रागाने बघत बोलला

" स......... सर फाईल माझ्याकडे होती म्हणून मी घेऊन आले.." .... माही थोडी चाचरत बोलली

" यु शट अप..... असा आगाऊपणा मी खपवून घेणार नाही...... इतकी हूशारी दाखवायची असेल तर दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ शकता...... इथे तुमची काहीही गरज नाही.... बाँड झाला आहे तुमचा कंपनी सोबत,  म्हणून मी तुम्हाला येथे सहन करतोय,  नाहीतर कधीच काढून घेतलं असतं...... Now go ..... आणि हो परत माझ्यापुढे यायचं नाही.....काय ते फाईल वाईल सगळं ,  काम असेल ते निलेश च्या हाताने द्यायचं...... गेट लॉस्ट नऊ.." ... अर्जुन तिच्यावर खूप खूप जोरात रागाने ओरडला....

सर्वांसमोर त्याचं असं बोलणं एकूण माहीच्या डोळ्यात पाणी आलं.... तिला खूप वाईट वाटत होतं..... चूक नसताना सुद्धा त्याने तिला खूप सुनावलं होतं...... ती चुपचाप आपल्या जागेवर जाऊन बसली...

आता हे ऑफिसमध्ये असंच चालायचं ......अर्जुन छोट्या छोट्या कारणावरून माही वर सर्वांसमोर रागवायचा...... तिला सुद्धा खूप वाईट वाटायचं पण नोकरी करण्य पासून तिच्याजवळ काही पर्याय नव्हता त्यामुळे ती चूप असायची.... माही वर असा अर्जुन चा रागावण सोनियाला खूप आवडत होतं......ती मुद्दामून काही ना काही असे करायची की अर्जुन  माही वर भडकायचा........आता लग्न जमलं असल्यामुळे सोनिया सुद्धा अर्जुनच्या खूप जवळजवळ करत असायची...... जास्तीत जास्त वेळ ती अर्जुनच्या आजूबाजूलाच असायची.....

असेच दिवस जात होते....

******

अर्जुन चे लग्न फिक्स झाल्यापासून मामी खूप खुश होती,  कारण आता आकाश ची लाईन क्लिअर झाली होती..... मामीच आकाश साठी मुली बघणं सुरू झालं होतं...... मामी ने खूप हाय प्रोफाईल च्या मुली शोधून आणल्या होत्या,  रोज आकाशला एक एक फोटो दाखवून भंडावून सोडायच्या....... पण आकाशच्या मनात मात्र एकच भरली होती अंजली....... जेव्हा पासून त्याने अंजलीला बघितलं होतं तेव्हापासून डोक्यात अंजली चे विचार सुरू होते...... पण त्याची घरात बोलायची हिंमत होत नव्हती.... दोन-तीनदा बाहेर जाताना मार्केटमध्ये त्याला अंजली दिसली होती...... हाय-हॅलो च्या पुढे त्याचं तिच्या सोबत बोलायची हिंमतच होत नव्हती...... अंजली ची अवस्था सुद्धा सेम होती...... आकाश दिसला कि अंजली लाजून मान खाली घालून तिथून निघून जायची....... आकाशला अंजली बद्दल माही सोबत बोलावसं खूपदा वाटलं....माही घरी यायची , पण तेव्हा त्याची बोलायची हिंमत व्हायची नाही आणि ऑफिसमध्ये अर्जुन तिच्यावर इतका चिडायचा की तिथे पण त्याला तिच्या सोबत बोलायची हिंमत होत नव्हती...... आकाशला वाटायचं की अर्जुन सुद्धा अंजली साठी नाहीच बोलणार..... म्हणून घरात त्याने कोणालाच काही सांगितलं नव्हतं.....तसेपण अर्जुन च लग्न होईपर्यंत त्याच्याजवळ वेळ होता.....

*******

आज माहिला ऑफिसमध्ये यायला थोडा उशीर झाला होता...... मीरा आज तिला सोडतच नव्हती.... माहीने चमेली पार्क केली आणि धावतच आत मध्ये लिफ्ट जवळ आली...... अर्जुन नुकताच लिफ्टमध्ये गेला होता....... त्याला लिफ्टमध्ये बघून ती लिफ्टच्या बाहेरच थबकली,  जाऊ की नको विचार करू लागली पण उशीर पण खूप झाला होता..... आणि भीतीने  ती लिफ्ट मध्ये जाऊन उभी राहिली....... अर्जुन मोबाईल मध्ये बघत लिफ्टला मागे टेकून उभा होता.......त्यांनी एक कटाक्ष माही वर टाकला आणि परत मोबाईल मध्ये कंटिन्यू केलं..... माही दाराजवळ उभी होती...... अचानक लिफ्ट चौथ्या-पाचव्या फ्लोर च्या मध्ये येऊन बंद पडली... लिफ्ट मधले लाईट सुद्धा ऑफ झाले...... माही आता पॅनिक व्हायला लागली होती....... तिने लिफ्टच्या बटन दाबून बघितल्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही..... नंतर तिने फोन काढला पण फोन ला एकही सिग्नल नव्हतं........ अर्जुन ने सुद्धा त्याचा फोन चेक केला त्याच्या सुद्धा फोन ला सिग्नल नव्हतं...... पाच-दहा मिनिटं असेच निघून गेले.... माही आता घाबरायला लागली होती..... ती लिफ्ट च्या दारावर जोराने ठोकत उघडा उघडा म्हणून ओरडत होती......

" स्टॉप इट........ होईल थोड्यावेळाने सुरू इतकी ओरडायची काय गरज आहे...??..". अर्जुन तिच्यावर ओरडला ....त्यालासुद्धा गर्मी होत होती..... त्याने त्याचं जॅकेट काढून ठेवलं...

त्याला तसं बघून    आता तिला दरदरून घाम फुटला होता..... तिचा अंग थरथरायला लागलं होतं....... अंधारामुळे तिला खूप भीती वाटत होती....... ती परत दारावर ठोकत ओरडत होती........

तिच्या असं वागण्याने अर्जुनचे मात्र डोकं दुखायला लागलं.........

" आय सेड स्टॉप...... हे काय लहान मुलांसारखी आरडाओरडा करते आहेस......... चूप बसायचं बिलकुल.... माझं डोकं दुखायला लागलं तुझ्या अशा वागण्याने.." .... अर्जुन ओरडला

माही त्याला घाबरून चूप झाली..... तिला आता तिथे  गुदमरायला होत होते...

आता जवळपास वीस-पंचवीस मिनिटं होत आले होते तरी सुद्धा दरवाजा उघडला नव्हता........

माहि चा आवाज का येत नाही म्हणून अर्जुन मोबाईल मधला लाईट ऑन करून इकडेतिकडे बघितलं......

" ओह शिट....,...." . अर्जुन ने माही कडे बघितले आणि तिच्या जवळ गेला

माहि तिथेच कॉर्नर मध्ये  खाली आपल्या गुडघ्यामध्ये मान घालून बसली होती..... तिला खूप घाम फुटला होता.... तिचा अंग थरथरत होतं.....

" माही....... माही..." ..अर्जुनने तिला डोक्यावर थोपटून आवाज दिला... तरी ती त्याला काही रिस्पॉन्स देत नव्हती...... नंतर त्याने तिच्या गालाला पकडून तिची मान वर केली....,.. तिने मान एका साईडला टाकली,  ती बेशुद्ध  झाली होती........ अर्जुन ने लगेच तिला त्याच्या मिठीमध्ये पकडलं...... खिशातून रुमाल काढून तिच्या कपाळावरचा मानेवरचा घाम  त्याने टिपला.....

" माही उठ...... माही उठ " तो तिच्या गालावर हाताने मारत बोलत होता...... पण ते काहीच रिस्पॉन्स देत नव्हती....... आता मात्र तो घाबरला होता........ त्याने तिला आपल्या कुशीत घट्ट पकडून घेतले...... फुंकर मारत.... रुमाल हलवत......तिच्यावर हवा घालत होता........

" माही प्लीज उठना........ सॉरी मी तुला रागावलो..... यापुढे मी तुला कधीच रागवणार नाही..... प्लीज उठना एकदा....." ..  तो खूप  काकुळतीने तिला उठवत होता.... त्याचा आवाज कापरा होत होता.....

" माही प्लीज उठ...... माही........"  तो तिचे श्वास चेक करत बोलत होता......... आता त्याला तिचे श्वास कमी जाणवू लागले........आता त्याच्या डोळ्यात पाणी जमायला लागले  होते....

काय करावं त्याला कळत नव्हतं..... परत त्याने फोन चेक केला पण सिग्नल दिसत नव्हते...... तो आता फ्रस्ट्रेट होत होता....... त्याने सुद्धा आता डोअर ठोकत आवाज देत होता......

तिचे श्वास कमी होत होते....... त्याच्या काळजातून एकच कळ निघाली........ त्याच्या मनातली भीती वाढत होती.....

काय करू आता......."  माही गेट अप...... प्लीज माही..... मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो...... प्लीज मला माफ कर .....प्लीज उठाना...... त्याने तिला खूप कडकडून मिठीत घेतले...... तिचे तर श्वास कमी होत आहेत.... काय करू आता......" ..त्यानें तीला त्याच्या मांडीवर घेतले....

" सॉरी माही...... पण मला आता हे करावेच लागेल..........."  त्याने तिला अगदी आपल्या छातीजवळ घट्ट पकडून धरले..... त्याने तिची मान पकडून तिचं डोकं वर केले...... दुसऱ्या हाताने तिचं गालांना पकडून  त्याने आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले.......आणि Mouth-to-mouth resuscitation ... तिला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत होता..... त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते........... त्याचा अश्रूचा एक थेंब तिच्या गालावर पडला...... तसे तिने चुळबूळ केली....... तिला जाणवत होते की तिच्या ओठांवर कोणाचा तरी स्पर्श होत आहे.......तिने डोळे उघडले...... बघितले तर अर्जुन तिच्या खूप जवळ होता....... तिने त्याला हाताने दूर केले...... आणि सावरून बसन्यासाठी त्याच्या मिठीतून दूर व्हायचा प्रयत्न करत होती......

तिला शुद्धीवर आलेले बघून अर्जुनच्या जीवात जीव आला.....

" आर यु ओके....? "... अर्जुन ने दोन्ही हाताने तिचे गाल पकडून स्वतःकडे करत तिला विचारलं...

तीने मानेनेच होकार दर्शविला....

त्याने तिला परत आपल्या हृदयाशी घट्ट पकडून घेतले , तिला उठलेलं बघून त्याला खूप आनंद झाला होता....

लिफ्टचा दरवाजा उघडला..... त्याने लगेच तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतले......तिने त्याच्या शर्ट च्या कॉलर ला घट्ट पकडले होते.....त्याने एकदा तिचा  तसा पकडलेल्या हाथाकडे बघितले....ते  बघून त्याला  हसायला आले......हसू कंट्रोल करून एका जळजळीत रागाने कटाक्ष तिथे जमलेल्या स्टाफ वर टाकला....... आणि त्याच्या केबिनमध्ये तिला घेऊन गेला...... नमन कॉल द डॉक्टर....... केबिनमध्ये जाता जाता  तो ओरडला..... तिथल्या त्याच्या रूममध्ये बेडवर तिला झोपवले......


"

सर मी ठीक आहे आता...... " माही अर्जुन कडे बघत बोलली


"

ह्म्म..... डॉक्टर येतील,  एकदा चेक केलं म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही..... तोपर्यंत इथेच थांब, आराम कर ." ..अर्जुन

सगळे स्टाफ मेंबर अर्जुन कडे बघत होते....... आज अर्जुनाचा  राग त्यांना चांगलाच कळला होता.......

थोड्या वेळात डॉक्टर आले....... त्यांनी तिला चेक केलं...... एक इंजेक्शन देऊन तिला थोड्यावेळासाठी रेस्ट करायला सांगितलं......


"

मिस्टर अर्जुन तुम्ही mouth resuscitation देऊन खूप हेल्प केली....नाहीतर त्यांना जास्ती त्रास झाला असता....."  डॉक्टर

अर्जुन ने स्माईील केले...


"

बाकी सगळं ठीक आहे ....काही वाटलच तर फोन करा......" बोलून डॉक्टर निघून गेले.....

अर्जुन ने ज्यूस मागवला.....आणि माही जवळ रूम मध्ये गेला.............


"

बरं वाटतेय आता.?" ..अर्जुन


"

ह्म्म.... सॉरी तुम्हाला त्रास झाला........मला अंधारात...खोली बंद,  खूप भीती वाटते" ......माही बोलतच होती की त्याने तिला चूप बसवले....

पियोन ने ज्यूस आणून दिला....

अर्जुन ने तिला ज्यूस हातात दिला...."हे घे,  आधी पियुन घे ....नंतर बोल काय बोलायचे.....आणि हो आता इथेच थोडा वेळ आराम करायचा...." अर्जुन ने ऑर्डर सोडली

ती एकटक त्याच ते बदललेल रूप बघत होती..........औषधामुळे तिला गुंगी आली....आणि ती गाढ झोपेत गेली....

तिला तस ठीक बघून त्याला बरे वाटले....तो रूम चा दरवाजा बंद करून बाहेर केबिन मध्ये आला.....


"

नमन ...कशाचे इतके पैसे and salalries पे करतो आपण ........call maintanance स्टाफ राईट now ....."  अर्जुन रागातच ओरडला......

अर्जुन आज खूप रागात दिसत होता......सगळा स्टाफ चांगलाच घाबरला होता......