Jan 27, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 18

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 18

भाग १८

 

 

दुसऱ्या दिवशी माही ऑफिसला आली नि आपलं काम करण्यात बिझी होती.......अर्जुन च मात्र आज कामात लक्ष लागत नव्हतं......त्याने विचारलेल्या प्रश्नाला मही ने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते ......

 

आपण घाई तर नाही केली तिला विचारायला..??....पण मुळात आपण तिला असा विचारलेच का...???..मला तर लग्न नव्हते करायचे ???......की काल सकाळी घरच्यांनी दिलेल्या दबावमुळे आपण असा वागलो......नाही माझ्यावर कोणीच दबाव आणि शकत नाही???.....ही घरची मंडळी पण ना मला भंडावून सोडतात...त्यात आता हे नवीनच सोनिया प्रकरण सुरू झालाय....सोनिया तर माही पेक्षा खूप पटीने स्मार्ट आहे ....पण मला ती गर्लफ्रेंड वैगरे म्हणून मी कधी लक्ष पणं नाही दिले तिच्या कडे .....कुठून कुठून काय काय कळत बाहेर ????.....या बावळट कडे कसे काय येवढे लक्ष जाते आपले......???... आपल्याला ही काकूबाई आवडायला लागली की काय.????.....मला प्रेम तर नाही झाले..????.... शक्यच नाही ...माझा या फालतू गोष्टींवर विश्वास नाही........पण मग तिच्या डोळ्यात बघितले की आपण तिच्याकडे का इतके खेचले जातो....????.तिला झालेला त्रास का बघवत नाही मला..?????... पण का मग मीच तिला त्रास देतो...????..माझ्या भावना लपवायचे प्रयत्न करतोय काय मी.......????...............यार ही पागल मला पण पूर्ण पागल करून ठेवेल...?????.डोक्यावर हात ठेवत  बसल्या बसल्या विचार करत तो माही कडे केबिन मधून बघत होता

...

 

काल माही का अशी म्हणत होती की मी आणि सोनिया क्लोज होतो???....अस तर काही झालंच नव्हते.....माझ्या डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा सोनिया ते काढत होती...ते बघून तर तिला असा वाटले नसेल????....अर्जुन मनात विचार करत होता...

 

काल जेव्हा सोनिया त्याचा केबिन मध्ये काही discuss करायला गेली होती तेव्हा अर्जुन चा डोळ्यात काही गेले होते......त्याची डोअर कडे पाठ होती ... ती त्याचे डोळे टिश्यू ने क्लीन करत होती , तेव्हा तिला माही येताना दिसली होती... माही ला बघून ती मुद्दाम अर्जुनाच्या जवळ खाली वाकून डोळे बघत होती....बाहेरून माही ला ते विचित्र प्रकारे  दिसले होते .

 

आजचा ऑफिस चा दिवस संपत आला होता ....माही ने पूर्ण दिवस अर्जुन ला इग्नोर केले होते.....पण आता तिला फाईल चेक करायला त्याच्या कडे जान भाग होते....त्याशिवाय ती घरी जाऊ शकली नसती..

 

माही ने सगळ आवरून बॅग पॅक करून ठेवली,  नी फाईल घेऊन ती अर्जुनच्या केबिन कडे गेली...तिने डोअर नॉक केले .,.नी आतमध्ये गेली....अर्जुंन फोन वर बोलत होता ..त्याने इशाऱ्यानेच तिला बसायला सांगितले.....माही त्याच्या पुढ्यात जाऊन बसली नी त्याचा फोन संपायची वाट बघत होती ..... फोन वर बोलत असताना तो तीच निरीक्षण करत होता.....नंतर बोलू म्हणून त्याने फोन कट केला ..

 

माही तू कालच ब्यांडेज चेंज नाही केले???....ते थोडा ओल पण दिसत आहे .???...मी तुला बोललो होतो ना आज चेंज करशील.....म्हणत त्याने तिचा हाथ त्याच्या हातात घेतला आणि बघू लागला...

 

हा....ते विसरली......आणि ते आता वॉशरूम मध्ये गेली होती,  तेव्हा ओल झाले , आता घरी गेली की करेल आहे .... ती तिच्या हाथ त्याच्या हातातून काढून घेत बोलली..

 

सर ही फाईल ...एकदा तुम्ही चेक करून मला काही चेंजेस असतील तर सांगा....... माही

 

अर्जुन ने ती फाईल साईड ला ठेवली नी उठून फर्स्ट किट बॉक्स आणला.....त्याला तस बघून तिला कालच सगळं आठवलं....सर तुम्ही बघून घ्या फाईल.मी येते थोड्या वेळात म्हणत ती जायला निघाली...तो एका झटक्यात तिच्या पुढे जाऊन उभा राहिला....तशी ती मागे मागे जाऊ लागली नि भिंती ला आदळली.....तो परत तिच्या समोर येऊन उभा राहिला....

 

सर तुम्ही नेहमीं नेहमी असे जवळ येऊन घाबरवत नका जाऊ ..... माही

 

तू घाबरते मला..???....तिचा हाथ हातात घेत तिच्या हाथाची ब्यांडेज काढत तो म्हणाला......

 

हे बघा ...हे माझं मी करेल.....ती हाथ सोडवण्याचा  प्रयत्न करत बोलली....पण त्याने हाथ घट्ट धरून ठेवला होता...तो सुटायचा प्रश्नच नव्हता...

 

 

तू घाबरते मला....???.माझ्या प्रश्नांचे उत्तर नाही दिले तू....???अर्जुन

 

छे ...छे ....मी नाही घाबरत तुम्हाला.....मी का म्हणून घाबरु तुम्हाला.????...ती अडखळत बोलत होती

 

 

पण तुझे डोळे तर वेगळेच सांगतात....मी जवळ आलो की तू बेचैन का होते........अर्जुन हाठावरची जखम क्लीन करत बोलत होता ..

 

 

क..... काय....सांगतात माझे डोळे .,?....ते मला खूप  धडधड होत असते...कधी कधी ते एसिदिटी मूळे मलामळल्या सारखे होते त्यामुळे घाबरायला होते.....म्हणून तुम्हाला असा वाटत असेल......बाकी काही नाही तिने वेळ मारून नेली.......

 

अर्जुन ला हसू आलं.... तो हसू कंट्रोल करत होता......

 

धडधडायला ला होत.....तो परत मिश्कीलपणे हसत बोलला..

 

त.....ते......सांगितले ना ... acidity मुळे होते...माही

 

तो जवळ होता म्हणून तिला आता काही सुचत नव्हते....ती गोंधळली होती.......

 

अजब मुलगी आहे..... ...अर्जुन मनातच तिचा गोंधळलेला चेहरा बघून विचार करत होता.

 

बरं कॉफी घेशील....??.अर्जुन 

 

न....नाही....म्हणजे नको.........माही

 

का...?अर्जुन

 

ते... एसिदिटी....सांगितले ना....माही

 

बरं ठीक आहे ......हे झाले ब्यांडेज चेंज....२ दिवस काळजी घे ...ठीक होईल आहे ......अर्जुन

 

तेवढयात तिचा फोन वाजला....... हा आजिसहेब ..येते आता ऑफिस झालं की ,.बोलत तिने फोन ठेवला

 

आजीचा फोन होता काय.???...काय म्हणत होती..????...अर्जुन

 

ते मूर्ती वाळली... घेऊन जा आणि काही कामच बोलायचं आहे ...... माही

 

चल मग सोबतच जाऊ या ...अर्जुन

 

नाही नको ......ते मी चमेली सोबत जाईल....माही

 

चमेली........? ओह अच्छा तुझी स्कूटर.....अर्जुन

 

चमेली सोबतच आधी मैत्री करायला लागेल दिसत  .....हसतच अर्जुन पुटपुटला...

 

 

क......काय म्हणाले तुम्ही....??. माही

 

 

आ.....काही नाही....चमेली लकी आहे बोललो....

 

वेड लागलंय दिसतय सरांना आज....माही मनातच बोलली

 

सर ते फाईल.... माही

 

उद्या घेऊंन जा....अर्जुन

 

ठीक आहे सर ...मी निघते आता..... माही

 

हा.....अर्जुन

 

ड्राकुला ला काय झालंय ??असं का वागतोय...???...ड्रिंक wink घेतात की काय???....काल सुद्धा काहीही बोलत होते ???..... काल लग्न बाबतीत विचारात होते.???..आज तर काहीच विचारले नाही त्या बाबतीत......नक्कीच मस्करी करत असतील.....आजकाल फारच मस्करीच्या मुड मध्ये असतात.........आधी तर कधी हसायचे सुद्धा नाही आजकाल तर बरेच हसत असतात........यांच्यासोबत कोण लग्न करेल.??....यांच्या सोबत लग्न करणं म्हणजे ..अा बैल मुझे मार सारखं होईल.....देवा वाचावं रे बाबा त्या मुलीला.... माही मनातच विचार करत होती

 

माही त्याच्याकडे बघतच बाहेर जायला निघाली आणि दाराला जाऊन धडकली....

 

अगं ये....हळू....दार तुटेल ना ते ......अर्जुन मस्करी करत बोलला

 

माही डोकं चोळत त्याच्याकडे बघितले नी बाहेर पळाली

 

 

माही निघून शंतिसदन ला आली.....

 

 

आजीच्या रूम मध्ये जाणार तेवढयात तिला बोलायचा आवाज आला नि ती तिथेच थांबली

 

ह्म्म...बरी दिसतेय मुलगी फोटो मध्ये तर.....आई

 

हो पण जरा जास्तीच मॉडर्न वाटतेय.....आजी

 

आई आजकाल असेच असतात मुली.....शिकल्लेया, मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या.....शोभेल अर्जुन ला ...तसा पण खूप वर्षांपासून ओळखतो तो तिला .....बऱ्यापैकी स्वभाव सुद्धा माहिती झाला असेल दोघांना एकमेकांचा....आणि सोबतच काम करतात म्हणजे पुढे जाऊन एकमेकांना कामात मदत पण होईल.......आई

 

ह्म्म....बघू आता पूजेच्या दिवशी आली की .....आजी

 

तेवढयात आजी च लक्ष दरात उभ्या असलेल्या माही कडे गेले......

 

अग माही कधी आली....आत ये ....आजी

 

माही आत गेली.....आजी काही काम होत ???

 

हो...ये बस...... तू अर्जुंसोबत ऑफिस मध्ये काम करते ना ...?...तुला ही माहिती काय..??....आजी लॅपटॉप वर फेसबुक मध्ये फोटो दख्वत बोलली

 

हा...या.....या सोनिया मॅडम.....अर्जुन सरांच्या गर्लफ्रेंड.....तिने जीभ चावली ...हे काय बोलून गेलो आपण..... पण जाऊ दे ऑफिस मध्ये तर सगळे तसेच बोलतात

 

काय म्हणाली तू...???.आजी

 

नाही म्हणजे त्यांची चांगली मैत्रीण आहे ....सारवासारव करत माही बोलली.

 

कशी आहे ती...? आजी

 

चांगल्या आहेत, strict आहेत कामात...स्मार्ट आहेत....माही

 

अच्छा.....आजी

 

बरं मूर्ती घेऊन जा तू... छान सुकली आहे .....रंग वैगरे द्यायचा असेल ना तुला ...??..आजी

 

हो आजी....माही

 

बरं मी काय म्हणतेय...पूजेच्या दिवशी तुझ्या घरच्यांना पण आमचं निमंत्रण दे इथे यायचं...तेवढीच आपली ओळख होईल....अजी

 

हो पण घरी पण पूजा असते ....माही

 

अगं आपल्या कडे संध्याकाळी असते पूजा....तेव्हा तर जमेल ना यायला तुम्हाला सगळ्यांना??.....आजी

 

हो....मी घरी विचारून कळवते....माही

 

ठीक आहे ....आजी

 

बरं आजी मी निघते आता .....उशीर होतोय...माही

 

हो हळू जा.....आणि हो ते तीकडे टेरेस गार्डन मध्ये ठेवलीय मूर्ती तिथून घेऊन घे .......आजी

 

 

तर सोनिया मॅडम बद्दल बोलत होते हे. ...सोनियामॅडम   आणि अर्जुन सरांच्या लग्न बद्दल...... ....पण आपल्याला का वाईट वाटतेय...चांगली जोडी आहे ....एकमेकांना शोभते सुद्धा ...

आणि ते दोघं किती वर्षापासून ओळखतात एकमेकांना.....चांगलेच तर आहे ...पण मग अर्जुन सर आपल्यासोबत असे का बोलले..???..घरी तर त्यांच्या सगळ्यांना सोनिया मॅडम आवडल्या आहेत........विचार करता करता तिच्या डोळ्यात पाणी आले.....ती गार्डन मध्ये पोहचली तर तिला तिथे टेबल वर अर्जुन बसला होता....दरवाजाच्या आवाजाने ने अर्जुन च लक्ष माही कडे गेले.....तिच्या डोळ्यात पाणी होते .....

 

माही ...........माही मूर्ती घ्यायला वळणार तेवढयात त्याने आवाज दिला नी तिच्या जवळ उठून गेला...

 

काय झालं.....? .अर्जुन

 

काही नाही .....ती चेहरा लपवत बोलली

 

मग रडत का आहेस...???..कोणी काही बोललं काय?...अर्जुन

 

ते....कचरा गेला.बहुतेक.....माही

 

बरं....बस इथे आधी....अर्जुन तिला खुर्ची कडे हाथ दाखवत बोलला...

 

केशव दादा कॉफी आणा....अर्जुन 

 

मला नको कॉफी....निघते मी ...उशीर होईल....माही

 

इट्स ऑर्डर.....बस.......अर्जुन

 

हे ऑफिस नाही.....तुम्ही मला इथे ऑर्डर देऊ शकत नाही.....माही

 

ओह रिअली.???....आणि कोण अडवेल मला..??......अर्जुन

 

मी का ऐकू ..???......मला नकोय कॉफी....माही

 

मी जबरदस्ती करू शकतो ....तुला माहिती....नाहीतर डेमो दाखाऊ काय तुला.???....अर्जुन नजर रोखत तिच्याकडे बघत बोलला...

 

ती चुपचाप जाऊन बसली.....केशव ने कॉफी आणून टेबल वर ठेवली...

 

घे....अर्जुन तिच्या समोर मग धरत बोलला

 

माही ने चुपचाप मग घेतला नि कॉफी पिऊ लागली.....तो कॉफी पित पित तीच निरीक्षण करत होता

 

माही उठून मूर्ती घेऊन आली....नी जायला निघाली

 

माही.......अर्जुन

 

माही तिथेच थांबली....नी त्याचाकडे बघायला लागली

 

तू ठीक आहेस....? अर्जुन

 

तिने मानेनेच होकार दिला...

 

माही तुला कधी पण काही सांगावस वाटलं तर मी आहे ....मला तू सांगू शकतेस......अर्जुन

 

तिने मान हलवली नी ती निघून गेली...

 

********

 

आज सगळीकडे बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू होती....महीच्या घरी सुद्धा खूप धामधूम सुरू होती... माही..ताई सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन केले होते ....माही मीरा ताई सगळे छान तयार झालेत...घरात बाप्पांचे आगमन झाले.....पूजा , आरती प्रसाद ...सगळीकडे वातावरण कसे खूप प्रसन्न झाले होते ....घराघरांतून आर्त्यांचे आवाज...प्रसादाचा सुंगांध....बाहेर ढोल ताशा चा गजर....वातावरण अगदी मोहक झाले होते ....

 

माही ने सगळ्यांना आजीचा निरोप दिला...सगळे जायच्या तयारी ला लागले.....

 

हे काय तू हे काय घातले...??...आई

 

काय ....ड्रेस घातला आहे .....माही

 

तुम्ही पुजे साठी हे घालणार आहात काय..???..तिथे किती मोठे लोक असतील....सणासुदीचे असे तयार होतात काय...???.आई

 

त्यात काय....सगळे असेच तर घालतात.....ताई

 

नाही ...अस असेल तर मग आम्ही येणार नाही ..आई

 

मग काय घालायचे...???..माही डोक्यावर आठ्या पाडत बोलली .

 

थांबा....आई आतमध्ये जाऊन हातात ह्यंगर घेऊन आली....हे घ्या हे नेसायच दोघीही ......

 

काय..... साडी.....? अगं लग्न थोडी आहे तिथे साडी नेसायला .....माही

 

जे सांगते ते करा.....आई

 

बरं जगदंबे...,.हाथ जोडत माही बोलली..

 

सगळे छान तयार होऊन शंतिसदन ला गेले....

 

**********

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️