Jan 22, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 35

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 35

भाग 35

 

" माही , तु हो  पुढे..... सरांना  रिक्वेस्ट करून पाहू.... सरांनी ऐकलं तर ठीक नाहीतरी  तू बोलशील तर त्यांना माहीत आहेत की तू काही पण बोलत असते तर तेवढ मनावर घेतील नाही" ...... सतीश

 

" हा???....... मी काय तुम्हाला जोकर दिसते काय.???" .... माही

 

" तसं नाही....... पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोनामध्येच हिम्मत  नाही आहे  सरांसमोर  जाण्याची ...... आणि बरेचदा तुला सर इग्नोर सुद्धा करतात" ..... प्रीती

 

" प्लीज चला ना माहि ताई....दिवाळीला दरवर्षी तीन दिवसाच्या तर सुट्ट्या देतात ते पण यावर्षी रिक्वेस्ट करून बघू,  जर पाच दिवसाच्या मिळाल्या तर खूप चांगलं होईल,  मला सुद्धा तिकडे गावाला माझ्या मुलांसोबत आई-वडिलांसोबत वेळ घालवता येईल" ......राजू

 

" हे तुम्ही लोक बरोबर नाही करत आहात.... मला तुम्ही ब्लॅकमेल करत आहात..... नाही ऐकले तर माझ्यावर ओरडतील ना ते" ......माही

 

" प्लीज माही .. एकदाच ट्राय करून बघू ना...... फक्त एकदाच" ...सतीश

 

" ठीक आहे.... तसे  तर मला पण पाहिजे आहेत सुट्ट्या....... चला जाऊया" ..... माही

 

ऑफिसमध्ये दिवाळीसाठी अर्जुन नेहमी तीन दिवसाच्या सुट्ट्या देत होता.... पण सगळ्या स्टाफ मेम्बर्स मिळून अर्जुनला पाच दिवसाच्या सुट्ट्या मागायचा डिस्कशन चाललं होतं आणि त्यासाठी त्यांनी महिला पुढे केलं होतं..... ऑफिस मध्ये नेहमी माही आणि अर्जुनचे खटके उडायचे....माही नेहमी काही ना काही गोंधळ घालून ठेवायची त्यामुळे अर्जुनला तिला  इग्नोर करायची सवय लागली होती.... त्यामुळेच सगळ्या स्टाफने  तिला समोर केले होते.....

 

" मे आय कम इन सर.." .... सतीशने डोर नॉक केले

 

" येस." .....अर्जुन

 

सतीश.... माही.... प्रीती.. आणि सोबतच अजून दोन-तीन कलिग असे सहा सात लोक अर्जुनच्या केबिन मध्ये आले होते ...

 

" सर" ........सतीश

 

" येस." .....अर्जुन

 

" सर ते....... दिवाळीसाठी पाच दिवसाच्या सुट्ट्या" ..... सतीश बाकीच्याकडे बघत बोलायचा प्रयत्न करत होता....

 

" तुम्हाला तीन दिवसाच्या सुट्ट्या असतात....enough आहेत" .......अर्जुन

 

" सर." .......प्रीती

 

" तुम्ही सगळे जाऊ शकता" .......अर्जुन

 

' माही बोल ना काहीतरी " प्रीती  तिला हाताने बाजूला धक्का देत इशारा करत होती.........सगळे माहिकडे खूप आशेने बघत होते......... नेमक तेव्हाच अर्जुनने त्यांच्याकडे बघितले....

 

" Any problem?"  ........ अर्जुन

 

" सर,  ते सगळ्यांना पाच दिवसाच्या सुट्ट्या हव्या होत्या....... बऱ्याच लोकांना त्यांच्या गावी जायचं होत" ...... माही बोलतच होती की अर्जुनने  मध्येच तिला टोकल...

 

" मिस देसाई तुम्ही थांबा.... आणि बाकीचे सगळे तुम्ही आपापल्या कामाला जा" ......अर्जुन

 

" बोंबला... लागली माझी वाट " .... माही प्रीती आणि सतीशकडे बघत हळू आवाजात पुटपुटली....

 

" सॉरी." .... प्रीती डोळ्यांनीच तिला इशारा करून बाकी सगळे बाहेर गेले...

 

" ह्म्म....बोला.....काय म्हणत होता???"  .....अर्जुन

 

" सर ते सगळ्यांना दिवाळीसाठी पाच दिवस सुट्ट्या हव्या होत्या....बऱ्याच लोकांना त्यांच्या गावाला जायचं...त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवायचा.... तीन दिवसात जाण्यायेण्या मध्येच वेळ जातो.....म्हणून जर पाच दिवस सुट्ट्या मिळाल्या  तर सगळ्यांना खूप आवडेल" .....माहीने एका श्वासात बोलले..

 

" ओके " .......अर्जुन

 

" सर तुम्ही समजून नाही घेत आहात......सर दिवाळी आपला सगळ्यात मोठा सण ....सगळ्यांनाच आपल्या परिवारासोबत राहायला आवडते ना ......आता तुम्हाला ऑफिस जास्ती आवडते , तो अपवाद आहे , आणि तुम्ही अपवाद असलाच ना , तुम्ही जगावेगळे ........तुम्ही फक्त काम करता ....पण बाकीच्यांचे तसे नाही ना ........किती तरी काम" ........माही बोलतच होती की .....अर्जुन ने तिला मध्येच थांबवले

 

" माही" ........अर्जुन

 

" सर .... प्लीज प्लीज एकदाच ऐका ना .... सगळ्यांचा तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल बघा... तुमची पण दिवाळी हॅप्पी हॅप्पी होईल....." ..माही

 

" ओ बुलेट ट्रेन ............." ....अर्जुन

 

" सर सर प्लीज समजून घ्या ना आमच्या भावना" .........माही

 

" माही .....तू ऐकले नाही काय....I said okay......म्हणजे मी हो म्हणालो होतो" ........ अर्जुन

 

" हा???" .........माही

 

" Yes .... I said yes....... पण तू एकदा बोलायला सुरुवात केली की थांबायचं नावच घेत नाही आणि मग तुला ऐकू कुठे जात दुसऱ्यांच?" .....अर्जुन

 

" म्हणजे तुम्ही रेडी आहात पाच दिवस सुट्टी देण्यासाठी?" ......माही

 

" ह्म्म" .......अर्जुन

 

" ये ssss" ...... माही तिथेच आनंदाने उड्या मारायला लागली....... तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्जुनसुद्धा आनंदी झाला...


"

थँक्यू सर, थँक्यू थँक्यू वेरी मच " ..... माही


"

तू काहीतरी मागशील आणि मी देणार नाही..... असं होईल काय?? ....... तुला जे पाहिजे ते तू माझ्याकडे कधीही केव्हाही मागू शकतेस" ........अर्जुन


उड्या

मारता मारता माही शांत झाली......


"

मी जाऊ सर?" ......माही


"

नको " .......अर्जुन

 

माही त्याच्याकडे मोठे डोळे करत बघत होती...


"

माझ काही ऐकणार आहेस का तू???......... मग विचारते कशाला......... जा." ....अर्जुन तिच्या एकटक बघत होता

 

माहीने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि ती बाहेr गेली...

 

अर्जुन सगळ्यांसमोर येऊन उभा राहिला...


"

Guys..... यावर्षी दिवाळीसाठी तुम्हा सगळ्यांना पाच दिवसाच्या सुट्ट्या डिक्लेअर केल्या आहेत........आल्यावर जर काही काम पेंडिंग राहिलं तर मात्र एखाद्या संडेला येऊन तुम्हाला ते काम पूर्ण करावे लागेल" .....अर्जुन


अर्जूनचे

बोलणे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला....

" हो सर नक्की, जर  काही काम पेंडिंग राहिले  तर संडेला येऊन करू" .......सतीश


"

ओके देन...... एन्जॉय युवर हॉलिडेज अंड हॅपी दिवाली" ........अर्जुन बोलून निघून गेला.

एकमेकांना टाळ्या देत सगळे आपला आनंद व्यक्त करत होते.

 

********

 

सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरू होती.....चांगली नोकरी मिळाल्यानंतर माहीची ही पहिली दिवाळी होती..... माहीने सगळ्यांसाठीच छान छान गिफ्ट घेतले होते.....ती  ह्या वर्षी मनसोक्त दिवाळी साजरी करणार होती आणि घरात सुद्धा सगळं चांगलं होत होते , अंजलीच लग्न जमलं होतं,  त्यामुळे वातावरण सुंदर खूप प्रसन्न होते....

 

शांती सदन मध्ये सुद्धा दिवाळीची जोरदार तयारी सुरू होती...... दोन मुलांची लग्न , दोन नवीन सुना.... खूप आनंदाचे वातावरण होते....... सगळेच खूप एक्साईटेड होते..... अर्जुन मात्र नेहमीसारखाच नॉर्मल होता....

 

लक्ष्मी पूजा मनोभावे आटोपली.....आणि सगळे सेल्फी ग्रुप फोटो काढण्यामध्ये बिझी  झाले....


"

अंजली तुझा आजचा फोटो पाठव ना....मला माहिती आहे तू नेहमी छान दिसतेस पण आज दिवाळीसाठी काही खास तयार झाली असेल  म्हणून..... मला बघायच आहे तू कशी दिसत आहे ते" .......आकाश एका कॉर्नरमध्ये जाऊन अंजली सोबत फोनवर बोलत होता...


"

ओह..... फोटो send-a-send कार्यक्रम सुरू आहे तर?" .....अनन्या... श्रेया आकाशच्या मागे येत त्याला त्रास देत बोलल्या ....


"

बिचारा आकाश,...आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला त्याची लक्ष्मी बघायला भेटत नाही आहे" ......अनन्या त्याला चिडवत बोलली


"

काय ताई..... असं काही नाही..... मी तर ते असंच आपलं" ..... आकाश लाजतच केसातून हात फिरवत बोलला


"

अर्जुन दादा तर भलताच लकी आहे बाबा याबाबतीत...... त्याची लक्ष्मी त्याच्या पुढेच उभी आहे" ......श्रिया सोनियाकडे बघत तिला चिडवत बोलली..


"

आकाश तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू..... आजच्या दिवशी  जर आपल्या लक्ष्मीचा चेहरा बघितला तर आयुष्यभर आपल्या घरात लक्ष्मीची कमतरता राहत नाही आणि आपल्या मधलं प्रेम सुद्धा खूप वाढते" ........ अनन्या त्याच्या कानाजवळ जात बोलली


"

आकाश तुला उगाच त्रास देत आहेत..... असं काही नसते.....if you work hard ..u will be successful" ...... अर्जुन


"

याचे  काय ऐकतोय , याला या अशा गोष्टींमध्ये कधीच  इंटरेस्ट नसतो ..... आणि त्याची होणारी बायको इथेच आहे म्हणून त्याला मोठ्या गोष्टी सुचते आहेत.... मी खरच सांगते तुला..... ऐकायचं असेल तर ठीक.... नाहीतर असू दे" ......अनन्या आणि दोघीजणी तिथून गायब झाल्या

 

अनन्या आणि श्रियाने त्याच्या डोक्यामध्ये किडा सोडला होता.....

 

आकाश तोच विचार करत होता की आज अंजलीला कसं भेटता येईल......."  आज सणाच्या दिवशी बाहेर गेला तर घरातले ओरडतील...... पण मला आज  अंजलीला बघायच आहे" .........


"

भाई प्लीज चल ना..... तुला कोणीच काही म्हणत नाही" ... आकाश


"

आकाश , असं घाबरून कसे  चालेल???.... तू स्वतःच्या मनाच करू शकतो....अंजली तुझी  होणारी बायको आहे,  तू  तिला कधी पण भेटू शकतो,  त्यात एवढी परमिशन... एवढ घाबरायचं काय काम???" .....अर्जुन


"

भाई ते सगळ ठीक आहे.... .. नंतर मी बघेल.... पण आता चल ना....प्लीज ..प्लीज" .....आकाश


"

ओके " ..... अर्जून

 

घरी ऑफिसचे  कारण सांगून अर्जुन आणि आकाश अंजलीच्या घरी त्यांना भेटायला आले होते ..


"

भाई तू चल आतमध्ये" .....आकाश

 

तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजला ...... " आकाश तू भेटून ये,  मी ईथेच थांबतो आहे "  तो फोन पिकअप करत बोलला ...

 

आकाश आतमध्ये अंजलीला भेटायला गेला ..... अर्जुन गाडीला टेकून फोनवर बोलत होता.....


"

Wow.....what a beautiful night " ..... बोलता-बोलता अर्जुनचे  लक्ष घराच्या वरती छताकडे गेलं,  तर तिथे त्याला माही आणि मीरा खळखळून हसताना दिसत होत्या..... माही मिराला आकाशात  उडणारे फटाके दाखवत होती ,  ते फटाके फुटले कि मीरा टाळ्या वाजवायची आणि हसायची.... अर्जुनने फोन कट केला आणि त्यांचे हसरे येथे चेहरे आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर केले....

 

त्या दोघींना बघून अर्जुनला सुद्धा वरती जाण्याचा मोह झाला..... पण तो गेला तर हसती खेळती  माही   शांत होईल म्हणून त्याने आपला मोह आवरला आणि गाडीला टेकून उभा राहत तिथूनच त्या दोघींना बघत होता...... दोघीजणी खूप गोड दिसत होत्या..... आणि त्याला अनन्याचे बोलणं आठवलं.......


"

खरंच अनन्या बोलली तसे होईल काय???....... I wish ती बोललेलं खरं होऊ दे" .....

 

*******

 

आज पाडवा होता आणि त्यासोबतच आजीचा वाढदिवस होता...... त्यामुळे माही आणि तिच्या पूर्ण फॅमिलीला पाडवा आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बोलवले होते.  तेवढेच दिवाळीनंतर गेट-टुगेदर आणि सेलिब्रेशन सुद्धा.....

 

आजी यांचा वाढदिवस आणि पाडव्याचे सेलिब्रेशन छान पार पडलं....

 

मामीने मामांना पाडव्याचं औक्षण केले....... त्यानंतर श्रियाने  आणि अनन्याने मामांना औक्षण केले


"

बघून घ्या बघून घ्या ......पुढल्यावर्षी तुमचा पण नंबर आहे" ........ अनन्या अंजलीला खांद्याने धक्का देत बोलली


"

आणि मग मस्त  मस्त गिफ्ट मिळणार " .......श्रिया


"

अंजली,  आतापासून बोलायची सवय कर , नाहीतर मग  आकाश तुला काहीच देणार नाही" .......अनन्या


"

सोनिया वहिनीचा काय बघावे लागते....... आता अर्जुन पटवर्धन त्यांचा झाला म्हटल्यावर त्यांना तर बाकी कशाचीच गरज नसणार , ऑटोमॅटिकली सगळं त्यांच्या हातातच येईल...... काय वहिनी???" ........श्रिया सोनियाला चिडवत होती.....


"

अर्जुन भेटल्यावर बाकी कशाची गरज असणार आहे काय??? " ........सोनिया पण अर्जुनकडे बघत सगळ्यांच्या मस्करीमध्ये मस्करी करायला लागली....

 

अर्जुनला मात्र  यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता तो फक्त सगळ्यांची बोलणे ऐकायचा काम करत होता....... माही मात्र स्वप्नवत त्या सगळ्यांकडे बघत होती.... त्यांच्या आनंदात आनंदी होत होती..


"

रुही,  चल बाबाचा व्हिडिओ कॉल आला... त्याला तुझ्याशी बोलायचं आहे" ....... अनन्या रुही तिथून घेऊन गेली...


"

माऊ , मला पण बाबा पाहिजे.....माझ्या बाबाला बोलव.....फोन कर"  .....मिराचा हट्ट सुरू झाला ...सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले....... माहीला काय बोलावं काही कळत नव्हते


"

तिच्या बाबाला कर फोन..... रुहीच बघून तिला पण आठवण आली असेल" ......नलिनी


"

तिकडे आता रात्र असेल." .....आत्याबाईने वेळ मारून नेली

 

मीराचा हट्ट अजुनच वाढत होता  .....आईने माहीला इशारा केला  .....माही तिला तिथून बाहेर घेऊन आली.....मिराला काही काही गोष्टी सांगत ती बाहेर मीराला  काही काही दाखवत होती....पण मिरा काहीच ऐकायच्या मूडमध्ये नव्हती ....


"

आमच्या प्रिन्सेसला काय झालं???......का रडते आहे ??" .....अर्जुनने मिराला माही जवळून स्वतःकडे घेतले..


"

अंकल , माऊ मला बाबा नाही देत" .........मिरा रडत बोलली

 

ते ऐकून अर्जुनने माही कडे बघितले......ती हतबल नजरेनी खाली बघत होती......अर्जुनला तिला बघून फार वाईट वाटले......


"

मी आहो ना ....मिराचा फ्रेंड"  ......अर्जुन मिराला समजवत बोलला...


"

मला बाबा पाहिजे." ....मिरा

 

त्यांना तिथे बघून सोनिया त्यांच्याजवळ आली


"

अरे या क्युट क्युट बेबीला काय झालं???....रडतांना ही अगदी त्या कार्टून मधल्या मंकी सारखीच दिसते" .....सोनिया


"

खरंच??" .....मिरा


"

हो......पण मिरा तर खूप क्युट आहे ना ....तो मंकी नाहीये" .....सोनिया


"

मी नाही रडत.....आता मी मंकी नाही दिसत नाही ?" .....मिरा


"

गुड गर्ल" ......सोनिया...

 

मीराला चूप झालेले बघून अर्जुनने   डोळ्यांनीच सोनियाला थांक्स केले.  


"

अंकल तू मला बाबा आणून देतो काय?" ....मिरा


"

बाबा का हवा?? ....काय करत असतो तो??" ......अर्जुन


"

तो खेळणी घेऊन देतो" ..... .मिरा


"

ठीक आहे,  मी तुला खूप खेळणी आणून देईल. " ......अर्जुन


"

तो गोष्टी सांगतो"......मिरा


"

ओके.....मी मिराला रोज गोष्ट सांगणार" .....अर्जुन


"

पार्क मध्ये पण नेशील??" .....मिरा


"

हो" ......अर्जुन


"

अंकल तू तर बाबा सारखाच आहे .....तू माझा बाबा बनतो काय??......मिरा...

मीराच्या त्या निरागस भावना.....माही अर्जुनाच्या मनाला चर्र करून गेल्या...अर्जुनने एकदा माहीकडे बघितले......माहिने दुसरीकडे आपला चेहरा लपवला होता......

 

 


"

मला तर मिरा फारच आवडते...मी तिच्यासाठी काहीपण बनू शकतो" .......अर्जुन तिला गुदगुल्या करत बोलला.....


"

अर्जुन जर मिराचा बाबा,  तर मला सुद्धा मिरची आई बनायला आवडेल बर काय"  .......सोनिया मिराचे गाल ओढत बोलली

 

ते शब्द माहीच काळीज चिरून गेले....दोघांच्या मध्ये आपण तिसरे आलो अशी तिला फिलिंग झाली आणि ती तिथून जायला वळली..... तेवढ्यात अर्जुनने हळूच मागून तिचा हात पकडला , नी तिला तिथे थांबवले....


"

मी क्युट दिसते ना आंटी....मी रडत नाही...मी good girl आहे" .......मिरा


"

हो तर......ती कोण.... हा.... एल्सा सारखी एकदम क्युट क्युट" .....सोनिया


"

अंकल पण तू मला गोष्ट कशी सांगशील रोज??..... तू तर माझ्या घरी पण येत नाही??"  .......मिरा


"

अंकल ऑफिस मध्ये जातात ना रोज....म्हणून रोज घरी  येता नाही येत .....फोनवर गोष्ट सांगेल " .......अर्जुन

 

अर्जुनने माहीचा हाथ पकडून ठेवल्याने माहीला तिथून जाता येत नव्हते.....माही अर्जुनाच्या साईडला मागे उभी होती....

 

सोनियाला दिसेल म्हणून माही अर्जुनच्या हातातला आपला हाथ सोडवण्याचा प्रयत्न करत होती.....पण अर्जुन हात सोडायला तयार नव्हता, आणि त्याची पकड इतकी घट्ट होती की तीच्याने तो सुटत सुद्धा नव्हता . अर्जुनने हाथ पाठीमागे धरल्यामुळे सोनियाला काहीच दिसत नव्हते ........

 

अर्जुनने माहिकडे बघितले....तर माहीच्या डोळ्यात त्याला पाणी आणि पेन दिसले...... त्याने डोळ्यांनीच  तिला नाही रडायचा म्हणून खुणावले.......... महिने अलगदपणे तिचे डोळे पुसले.... आणि हसणाऱ्या मीराकडे बघत होते..

 

मिरा खळखळून हसायला लागली...ती सगळच विसरली होती आणि त्यांच्यासोबत मस्ती करायला लागली..... तिला हसताना बघून अर्जुन आणि सोनिया सुद्धा हसायला लागले आणि तिच्या सोबत खेळत होते

 

जेवण आटपून सगळे मोठी मंडळी गप्पा करत बसली..... आणि बाकीचे सगळे लोक टेरेस वरती फटाके बघायला आणि उडवायला  गेले.....

 

रुहीला आणि मीराला फटाके बघून खूप मजा येत होती........ दोघे लहान असल्यामुळे त्यांनी  छोटे-छोटे अनार आणि फुलझडी आणले होते...... बाकी आजूबाजूने आकाशात उडणारे रॉकेट फटाके बघण्यात सगळ्यांना खूप मजा येत होती........ अर्जुन मात्र या सगळ्यांपासून दूर एका कोपऱ्यात फोनवर बोलत उभा होता.....

 

अंजली आकाश श्रिया अनन्या आरोही मीरा सोनिया.....सगळे छोटे-छोटे फटाके उडवत होते...... आणि माही पुढे उभी होती आकाशातले फटाके बघत होती...

 

फोनवर बोलता बोलता अर्जुनचे  लक्ष माहीकडे गेलं आणि ते बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला...... त्याच्या हृदयात एक जोराची कळ गेली..... तो खूप घाबरला...... तो जोराने ओरडलाच....


"

माही " .........अर्जुनने हातातला  फोन बाजूला फेकला आणि माहिकडे येत होता

 

अर्जुनच्या आवाजाने सगळे माहिकडे बघायला लागले.... तर माहीच्या ड्रेसला आग लागली होती.... आता माहीचे सुद्धा लक्ष गेलं..... तर तिचा ड्रेसला खालून चांगलीच आग लागली होती.  ते  बघून ती घाबरली........


"

अंजली मुलांना खाली घेऊन जा.... फास्ट" ....

ओरडतच अर्जुन धावतच माहीजवळ आला आणि त्याने तिची ओढणी काढून फेकली........ तिच्या ड्रेसवर आग बरीच वर पर्यंत आली होती.... अर्जुन आपल्या हाताने तिच्या ड्रेसची आग विझविण्याचा प्रयत्न करत होता , पण आज  इतकी वाढली  होती की त्याच्या हाताने काहीच होत नव्हते,.....

माही आकाशात बघत होती तेव्हा कुठून तरी एक रॉकेट मागून  तिच्या ओढणीला स्पर्श करत गेला होता, त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. आणि तीच आग आता वाढायला लागली होती.

 

सगळेच माहीला बघून खूप घाबरले होते.... अंजली आणि अनन्या मुलांना घेऊन खाली गेल्या ..... श्रेया आणि सोनिया काही मदत मिळते  काय  म्हणून आजूबाजूला आग विझवण्यासाठी काहीतरी शोधत होत्या.......


"

सॉरी माही" ...... म्हणत अर्जुनने  तिच्या कुर्त्याची चेन काढली.... आणि ड्रेस फाडून बाजूला फेकला......... कपडे नसल्यामुळे  अर्जुनने  तिला मिठी मारली , स्वतःमध्ये तिला लपवण्याचा त्याचा  प्रयत्न सुरू होता.......


"

अर्जूनsss ....... खाली सलवारला आग लागली आहे ...... अर्जुन तिचे केस "" .........सोनिया ओरडली..... आणि ती दरी किंवा पाणी कुठे मिळते  आहे काय शोधायला गेली..


"

Ohh शीट.." ....... माहीच्या केसांना सुद्धा चांगलीच आग  लागली होती आणि खालून तलवार सुद्धा बराच जळत  होता.....


सगळच आवाक्याच्या बाहेर गेले होते ,

अर्जुन जवळ फार कमी वेळ राहिला होता , काय करावे त्याला काहीच कळत नव्हते...... चुडीदार घातला असल्यामुळे त्याला सुद्धा काढायला वेळ लागणार होता आणि केस....... केस कसे विझवायचे..

 

हे सगळे इतक्या कमी सेकंदात घडलं होतं की विचार करायला आणि मदत करायला सुद्धा कोणालाच काही वेळ  मिळाला  नव्हता..... सगळेच खूप पॅनिक झाले होते

 

अर्जुनने इकडे तिकडे बघितले...... आणि त्याने एक मोठा श्वास घेतला...


"

आकाश कॉल डॉक्टर " ......... अर्जुन ओरडला

 

अर्जुनने  माहीच्या  डोळ्यात बघितले..... ती खूप  घाबरलेली दिसत होती....... तिचा शरीर थरथर कापत होतं...... अर्जुनने आपली मिठी घट्ट केली......तिला  आपल्या मिठीत खूप घट्ट पकडले.


"

माही I love you......."

 

माहीने त्याच्याकडे बघितले , तिच्या डोळ्यात खूप चमक त्याला दिसत  होती,  तिने त्याला खूप सकारात्मक अशी स्माईल दिली  आणि तिची मान त्याच्या खांद्यावर पडली........

 

******

 

क्रमशः

( सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. पण अश्या आग लागलेल्या दोन घटना मी प्रत्येक्षात बघितल्या आहेत. काळजी घ्या, carefull रहा . ) 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️