तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 34

Mahi arjun

भाग 34
 

माही अर्जुनच्या रूम मधून बाहेर गेली असं जाणवताच अर्जुन मटकन आरामखुर्चीवर  बसला...... त्याच्या डोक्यात असंख्य विचार सुरू होते... त्याच्या मनात खूप कोलाहल झालं होतं.........

" का आली माहि तू माझ्या आयुष्यात??? ....तू नव्हती तर सगळं कसं नीट सुरू होतं..... ' प्रेम '  फालतू वाटणार्‍या अशा गोष्टी पासून किती दूर होतो......... मुलींवर माझा विश्वास नव्हता.........तुला प्रॉमिस तर केले सोनिया सोबत लग्न करेल म्हणून...... पण मलाच कळत नाही आहे मी हे पूर्ण करू शकेल की नाही" ....... अर्जुन खुर्चीला टेकून डोक्यावर हात ठेवून डोळे मिटून विचार करत बसला होता तेवढ्यात कुठून तरी एका गाण्याचा आवाज येत होता आणि तो त्या गाण्यांमध्ये हरवला......अगदी त्याच्या मनातले भाव ते त्या गाण्यांमध्ये होते.....

( कलंक मुवीचे गाणे आहे)
हवाओं में बहेंगे
घटाओं में रहेंगे
तू बरखा मेरी
मैं तेरा बादल पिया
जो तेरे ना हुवे तो किसी के ना रहेंगे
दीवानी तू मेरी मैं तेरा पागल पिया
हज़ारों में किसी को तक़दीर ऐसी
मिली है इक राँझा और हीर जैसी
ना जाने ये ज़माना क्यों चाहे रे मिटाना
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया
पिया, पिया, पिया रे..
दुनिया की नजरों में
ये रोग है हो जिनको
वो जाने ये जोग है इक तरफा
शायद हो दिल का भरम दो तरफा
है तो ये संजोग है
लायी रे हमें जिंदगानी की कहानी कैसे मोड़ पे
हुवे रे खुद से पराये हम किसी से नैना जोड़ के
हज़ारों में किसी को तक़दीर ऐसी मिली है
इक राँझा और हीर जैसी
ना जाने ये ज़माना क्यों चाहे रे मिटाना
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया
मैं तेरा, मैं तेरा, मैं तेरा, मैं तेरा मैं तेरा, मैं तेरा, मैं तेरा,
मैं तेरा मैं गहरा तामस तू सुनहरा सवेरा
मैं तेरा ओ, मैं तेरा मुसाफिर
मैं भटक तू मेरा बसेरा
मैं तेरा ओ.. मैं तेरा
तू जुगनू चमकता मैं जंगल घनेरा
मैं तेरा आ.. ओ पिया
मैं तेरा, मैं तेरा, मैं तेरा हो..
मैं तेरा हो.. मैं तेरा, मैं तेरा, मैं तेरा ओ..

" का तू मान्य करत नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे ???...... तुला प्रेम करण्याचा हक्क आहे , तुला तुझे आयुष्य परत सुरु करायचा हक्क आहे...... तू निष्पाप आहेस..... तू निरागस आहे...... का घबरतेस तू  घरच्यांना,  समाजाला...... तुला पण प्रेम करायचा अधिकार आहे........ मी आहे तुझ्यासोबत एक पाऊल तर पुढे टाक....... का शिकवले मला प्रेम करायला???....... किती खुश होतो माझ्या आयुष्यात.......कसा राहू तुझ्याशिवाय .......मला कधीच वाटले नव्हते कि असं कोणाशिवाय जगणं मला इतकं असहैय होईल.....नाही सहन होत आहे माही....श्वास घेणे सुद्धा खूप जड होत आहे ग..... माझी लाईफ आहे ग तू...... का कळत नाही तुला....... ऐक ना ....येना एकदाच परत...... खूप सांभाळून ठेवेल तुला" ......... विचार करता करता त्याच्या बंद डोळ्यातून पाणी त्याच्या गालांवर वाहत होते........

" अर्जुन दादा तुमची सगळे वरती वाट पाहतायत " .....रामू परत अर्जुनला आवाज द्यायला आला......

" पिंकीला पाठव इकडे..... आणि आलोच म्हणून सांग" .......अर्जुन

अर्जुन डोळ्यांवर पाणी घेत फ्रेश होऊन आला आणि आपला चेहरा नीट केला.....

तेवढ्यात पिंकी तिथे आली.....

" पिंकी इथे मीरा जवळ बस..... आणि तिच्याकडे लक्ष दे.....उठली तर तिला वरती घेऊन ये नाहीतर मला कॉल कर पण तिला एकटे सोडून कुठेही जाऊ नको.... कितीही काम असलं तरी इथेच बस" ..... अर्जुन तिला इन्स्ट्रक्शन देऊन वरती टेरेसवर गेला....

" अर्जुन तुझ्या डोळ्यांना काय झालं.......  तू रडला होता काय?" .... सोनिया

" nothing.....  डोळ्यात कचरा गेला होता ...जास्ती चोळल्या मुले लाल झालेत बाकी काही नाही" .........अर्जुन

"तुझ्या पण डोळ्यात कचरा गेला???......... या माहीच्या पण डोळ्यात कचरा गेला... ती पण तेच म्हणे चोळून चोळून लाल झाले....... तुम्ही दोघं काय कचऱ्यात जाऊन उभे होतात काय???" ....... अनन्या मस्करीच्या सुरात बोलली

अर्जुनचे डोळे लाल आहे ऐकून माहिच लक्ष अर्जुनकडे गेले....... आणि तिच्या काळजात धस्स झाले...... अर्जुनकडे बघून तिला खूप वाईट वाटत होते.......... त्याला बघून तिच्या डोळ्याच्या कडा परत पाणावल्या होत्या.........

अर्जुन दोन्ही हात त्याच्या  खिशात घालून उभा होता .....त्याचं लक्ष माही कडे गेल....... त्याने डोळ्यानेच तिला रडू नको असा इशारा केला....... माहीने आपली मान वळवून कोणाचेही लक्ष नाही बघुन अलगद आपले डोळे पुसले......

" झालाच नाही का अजून तुमचा गेम.??" .....मामी

" नाही ना.... हे आकाश आणि अंजली यांच्यामध्ये टाय झाली आहे" .....अनन्या

आकाश आणि अंजली एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.... ज्याची पापणी पहिले मिटेल तो हरला असतो गेम सुरु होता....

" ह्म्म..... आता काय राहिलं , आधीच माझ्या मुलाला हरवून ठेवलाय तिने" ......मामी

मामीचा डायलॉग ऐकून ते तोंड दाबून हसत होते...

" बरं .......झालं झालं तुम्ही दोघेही ही विनर डिक्लेअर केलं...... नाहीतर पूर्ण रात्र इथेच उलटेल ....  पण त्यांच्यापैकी एकही जण हरणार नाही" ........आजी त्यांची मस्करी करत बोलली....

सगळ्या यंग लोकांनी जोराने टाळ्या वाजवल्या......

आकाश अंजली लाजतच तिथून उठून मागे गेले....

बारा वाजले होते...... बासुंदी आणि बाकी प्रसाद यांचा देवासमोर आणि चंद्रखाली नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद आणि थोडा स्नॅक्स घेतलं......

रात्र झाली होती मात्र कुणाच्या डोळ्यात झोप नव्हती ....सगळे खूप उत्साहात होते....... आणि सगळे अंताक्षरी खेळत होते.....

" अर्जुन चल ना." ...... सोनिया

" सोनिया तुला माहिती आहे ना मला नाही आवडत...... नको ना मला फोर्स करू.... जा तुम्ही एन्जॉय करा .....मी इथेच ठीक आहो" ........ अर्जुन

" अर्जुन आर यू ओके.???" ..... सोनियाला अर्जुन ठीक वाटला नाही

" या , अब्सोलुटीली फाईन" ........अर्जुन

" ह्म्म" ..... सोनिया परत ग्रुप मध्ये जाऊन बसली

मोठ्या लोकांच्या एका कॉर्नरला बसून गप्पा सुरु होत्या आणि दुसर्या कॉर्नरला हे बाकीचे बसून अंताक्षरी खेळत होते सोबत नाश्ता सुरु होता......

अर्जुन मात्र फक्त महिला बघत होता...... अधून मधून तिची सुद्धा नजर त्याच्यावर जायचे आणि ती नजर वळवायची....

आपण माहीला असं बघत आहो..., कोणालातरी कळायचं म्हणून अर्जुन इकडे तिकडे बघत होता पण राहून राहून त्याची नजर तिच्यावरच जायची...... उगाच कुणाला काही गैरसमज होईल... विचार करून तो आजी आणि आई सोबत बोलून  ऑफिसच्या कामाच निमित्त सांगून खाली त्याच्या रूममध्ये चालला गेला....

जवळपास दीड वाजला होता..........आकाश अंजली आणि सगळ्यांना घरी सोडणार होता.....

माही मीराला घ्यायला अर्जुनचा रूम मध्ये आली...,.. मीराने झोपेत थोडीशी चुळबूळ केली...... उठेल म्हणून अर्जुनने तिला आपल्या खांद्यावर घेतला आणि रूममध्येच फिरत फिरत तिच्या पाठीवर थोपटत होता.......

" सर.... आम्ही घरी निघतो आहे" ......... माही

" हमम" .... अर्जून

" मीरा" ...... माही मिरा कडे हात दाखवत बोलली...

" अ........हो.......घे" ......अर्जुन तिच्याकडे वळत बोलला...

माहीने  त्याच्याजवळून मिराला आपल्या खांद्यावर घेतले........ एकदा अर्जुनकडे बघून ती परत जायला वळली......

" टेक केअर माहि" ........अर्जुन

माहीने जबरदस्तीच हसू आणले आणि तिथून निघाली....

अर्जुन त्याच्या बाल्कनी मध्ये उभा होता आणि खाली माहिला जाताना बघत होता....

******

" आता का बरं बोलवले असेल सरांनी??..... मी तर माझे  सगळं काम केलं आहे ....... आता परत नवीन काम द्यायला नको ......सगळे घरी चालले ..... मला पण घरी जायचं..... आणि अर्जुन सरांचं काही कळतच नाही...... कधी कुठे कोणतं काम देतील काही भरवसा नाही....... की  परत काल बद्दल काही बोलायचं असेल??........ किती समजवले यांना पण यांना ना लवकर काही  समजतच नाही" ....... माही अर्जुनच्या केबिन समोर उभी राहून विचार करत होती....

" माही आत मध्ये ये." ....अर्जुन

" सर काही काम होतं...... मी तर माझं सगळं काम आटोपले" ........ माही

" आ......हो....... हे तुझ्यासाठी" ..... टेबलवर एक बॉक्स गिफ्ट बॅगमध्ये ठेवला होता त्याच्याकडे बोट दाखवत अर्जुन बोलला...

" हे..... हे काय आहे....?. गिफ्ट...?. माझ्यासाठी.....? पण का......?मी हे नाही घेऊ शकत " ...... माही

" का??...... गिफ्ट नाही घेऊ शकत?? ......की मी देतोय म्हणून ?" .....अर्जुन

" असं काही नाही आहे...... पण का म्हणून हे गिफ्ट.?" .....माही

" तुला एका स्पेशल मोमेंटला द्यायचे होते....... म्हणून तुझ्यासाठी घेतले होते..... पण तशी काही वेळ येणार नाही असं वाटते" ......अर्जुन

त्याचं बोलणं माहिच्या जिव्हारी लागलं....... तिने चुपचाप बॉक्स ओपन केला.......

" काय???......... ही तर तेच साडी आहे त्यादिवशी मी बघत होती" .... माही डोळे मोठे करत बघत होती

" हो " ........अर्जुन

" तुम्ही ना खूप बुद्धू बिझनेसमॅन आहात..... तुम्ही काही बरोबर डील केली नाही.....मला तर कळतच नाही तुम्ही इतका मोठा बिजनेस कसा सांभाळता ते??" ......माही

" काय???" ........... अर्जुन कसानुसा चेहरा करत तिच्याकडे बघत होता... त्याला तिच्या बोलण्याच हसू सुद्धा येत होतं...

" ही किती महाग आहे साडी...... या किमतीत तर माझे  आणि मिराचे वर्षभराचे कपडे आले असते...... तुम्हाला फसवलं त्यांनी" .......माही

" काय" ......... अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला........

" बरं नेक्स्ट टाईम वर्षभर पुरेल एवढ देईल....... रादर तुलाच घेऊन जाईल आणि तूच मग डिल कर" ..... अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत हसत बोलला..

" ह.....तेच बर राहील."" ........
" काय???....... नेक्स्ट टाइम??? परत काय तुम्ही मला गिफ्ट..... मला नकोय काही........ आणि मी हे पण घेऊ शकत नाही" .....माही

" माही......... उगाच माझ्या डोक्याचा भुगा नको करू" .......अर्जुन

" अहो खरंच..... हे खूप टेन्शन वाल गिफ्ट आहे........ हे घालून फिरायचं म्हणजे डोक्यावर किती टेन्शन येतं" ...... माही

" माही ......मला वाटत तू ना एकदा डोक्याचा डॉक्टरकडे जायलाच पाहिजे...... किती डोकं खाते आहेस तू माझं...... आता यात कसल टेन्शन आलं??" .......अर्जुन

" तशी साडी घालून फिरायचं म्हटले  की इथे नका बसू तिथे नका बसू..... नाहीतर कशाचे डाग लागतील....... असं मन मोकळे जगता नाही येत त्यात.....असे साधे कपडे घातले कि काहीच टेन्शन नसतं ......कुठे ही  मातीत बसा,  लोळा.... खराब करा काही प्रॉब्लेम नसतो...........तुम्हाला सांगते एखाद्यावेळेस आत्याबईंची साडी घातली ना..... तर आत्याबाई माझा जीव खाऊन घेतात........ मग हे तर अजूनच भारी , वरून तुम्ही दिलेली....... तुम्ही किती जीव घ्याल माझा " .......माही

" माही तुला खरंच वाटते मी तुझा जीव घेईल ?....... तुला माहिती सुद्धा नाही , पण तू तर माझी लाईफ झालेली आहेस " ....... अर्जुन मनामध्ये विचार करत होता...

" बाकी मुलींना असे गिफ्ट किती आवडतात.....,. आणि तुला काय तर त्याचं टेन्शन येते...... आइटम आहेस" ......अर्जुन

" मी दुसऱ्या सारखी कुठे आहे" .........माही

" हो ते पण खरंच आहे......म्हणूनच तर तू स्पेशल आहेस " .... अर्जुन मनातच बोलला

" माही हे बघ तुला घालायचं नसेल तर घालू नको....... कपाटात ठेव ........त्याची रोज पुजा कर,  पण तुझ्यासाठी आणले  आहे....... ते तू घेऊन जा मी तरी ठेवून काय करू??" ......अर्जुन

" ह्म्म...... बरोबर आहे तुम्ही कशी घालणार ना??..... तुम्ही तर पुरुष  आहात...... नाही तुम्ही तर ड्रेकुला आहात" .....माही

" एक्सक्यूज मी" ..........अर्जुन

आपण काय बोलून गेलो म्हणून तिने जीभ चावली..... तिने टेबलावरचा बॉक्स उचलला आणि ती परत जायला वळली....

" अगं थँक्यू" .......अर्जुन

" थँक्यू कशाचं....... तुम्ही जबरदस्ती दिलाय मला गिफ्ट.... तुम्हाला वापरता नाही येत म्हणून मला दिलं " ..........त्याच्याकडे बघत पुढे जायला निघाली तर तिचा पाय खुर्चीमध्ये अटकला आणि ती पडता पडता वाचली....

" माही केअरफुली" ............अर्जुन

" अ??" .......माही

" हळू जा" .....अर्जुन

" ही इतकी नॉर्मल कशी काय वागू शकते...... जसे काही काही झालंच नाही....... सगळे इतक्या लवकर कशी काय विसरु शकते" ..... तिला जाताना बघून अर्जुन मनातच बोलत होता......

" जर वाईट गोष्टी लक्षात ठेवल्या तर हसता येणार नाही ना....... आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्या जवळच पाहिजे असं कुठे आहे.......  आपलं प्रेम खरं आहे आणि आपण फक्त प्रेम करायचं......... सोबत असण्याचा हट्ट का करायचा?? ......जर तो आपल्या डोळ्यांसमोर आहे..... आनंदी आहे....... इतकं पुरेसं नाही का आनंदी राहायला?? खुश राहायला?? " ........माही त्याच्याकडे बघून छोटीशी आनंदाने स्माईल केली...... आणि बाहेर पडली...

जसे काही त्याच्या मनातलं तिला ऐकू गेलं होतं आणि तिथेच वळून त्याला ती बोलली होती ........

" सगळ्यात लहान आहेस , पण सगळ्यात समजदार आहेस" ....त्याचा चेहऱ्यावर स्मायल आले.....

तिच्या त्या चार वाक्याने त्याला त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.......... त्याला माहीला फक्त खुश आणि आनंदी बघायचे होते आणि त्यातच त्याचं समाधान होतं.....

********

" माही चल आवर पटकन........... आकाशरावकडे हे सगळे घेऊन जा........ त्यांनी आपल्याला दिवाळीचे फराळ आणि गिफ्ट सुद्धा पाठवले.........  त्यांना आपल्या घरचा फराळ आणि हे छोटेसे गिफ्ट देऊन ये..... बाकी तर आपण फार काही देऊ शकत नाही" ........आई

" इतकी मोठी अंजलीताई देतोय की......आणखी काय द्यावं लागते?" ........माही

" बस पुरे कर तुझी नौटंकी...... चल जा आता" ......आई

" येस बॉस" ......माही बॅग घेऊन शंतिसदन मध्ये गेली...

" अरे वाह रांगोळी काढत आहेत?" ....... माही रांगोळी काढत असलेल्या श्रिया आणि सोनियाला बोलली

" कुठे काय.....आम्हाला काही येत नाही....अनन्या ताई आम्हाला शिकवत होती तर रुहिने आवाज दिला तीला....आता काय?" ......श्रिया नाराजीच्या सुरात म्हणाली

"हिला कलर तरी भरता येतो....मला तर ते पण नाही येत" ......सोनिया

" अरे अरे तुम्ही दुखी नका होऊ.....मी शिकऊ काय?" ......माही

" तुला येते??....अरे सहीच की" ......श्रिया

तिघी मिळून दाराजवळ रांगोळी काढत बसल्या होत्या..,

माहिने त्यांना संस्कार भ सुंदर रांगोळी शिकवली....

" अर्जुन , look...... रांगोळी खराब करतोय तू" ......सोनिया

अर्जुन मॉर्निंग रानिंग करून फोनवर बोलत येत होता....त्याच यांच्याकडे लक्षच नव्हते....तो रांगोळीच्या एका कॉर्नर वरून चालत गेला होता....

" लक्ष नव्हते.....परत ठीक करून घ्या" .....अर्जुन

" व्हॉट?? .....तुला माहिती माहीने किती मेहानितीने आम्हाला शिकवली" ......सोनिया

" व्हॉट.... माही?? .....ही काय करतेय इथे सकाळी सकाळी??" .....अर्जुन

" का....ती इथे येऊ नाही शकत??" .......श्रिया

" तस नाही.....मी सहज म्हणालो" ....अर्जुन

" Happy Diwali विश करायला आली होती.....परत जाईल मी...काळजी नका करू" .....माही

" बघ तिला वाईट वाटले" ......सोनिया

" मला तसे नव्हते म्हणायचे....ती या वेळी नसते इकडे...म्हणून म्हणालो" ....अर्जुन

" मग कुठल्या वेळी यायला पाहिजे तिने?" .....श्रिया

" मी कुठे फसलो तुमच्या मध्ये....महिला मंडळ" ....अर्जुन हाथ जोडत एक कटाक्ष माहिवर टाकत त्रासूनच तिथून पुढे गेला

हाहाहाहा......तिघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या....." बिचारा... दाद्या....फारच बदमाश आहात तुम्ही माझा दादा ला त्रास देता" .....श्रिया

" आम्ही.?.....तुझा दादा ऑफिसमध्ये आम्हाला किती त्रास देतो, तुला कल्पना सुद्धा नाही " .......माही

" तुला सगळ्यांसमोर बघण्याचा हक्क सुद्धा नाही माझ्याजवळ......मिस्टर अर्जुन  पटवर्धन , नेहमी जिंकणारा तू.....प्रेमात मात्र हरलास" ....
वरती  बाल्कनीत  अर्जुन माहीलाच बघत उभा होता.....तिला हसतांना बघून त्याच्या ओठांवर पण स्मायल आले......" keep smiling sweetheart "

" बरं ती खराब झालेली तेवढी नीट करा तुम्ही.....मी आतमध्ये सगळ्यांना भेटून येते" ....माही

माही सगळ्यांना भेटून आली..

" अरे वाह झाली नीट रांगोळी...कुठेच वाटत सुद्धा नाही खराब झाली होती" ....म्हणत माही त्या दोघींकडे येत होती.....आणि तिचा पाय तिथे पडलेल्या एका प्लास्टिकवर पडला आणि ती धपकन खाली पडली

" माहीsssss " ..........सोनिया श्रिया एकसाथ ओरडल्या

माहीने बघितले तर ती पूर्णपाने  रांगोळीत पडली होती....संपूर्ण रांगोळी खराब झाली होती....

" सॉरी!!" .......माही

" आता काय, जाऊ दे , आधी दादू, आता तू  " ......श्रियाने तिला उठायला हाथ दिला., महीच्या डोक्यात खोडकरपणा शिजत होता ....माहीने तिचा हात पकडत  तिला आपल्याकडे ओढल.....आता श्रिया सुद्धा रांगोळीमध्ये पडली होती..दोघींचे कपडे हाथ सगळं रांगोळीने माखले होते.....दोघींनी एकमेकांकडे बघितले आणि डोळ्यांनीच काही इशारा करून उठल्या आणि सोनियाच्यामागे धावल्या......त्या एकमेकींना कलर लावायला लागल्या.....सोनियाला  कलर लावण्यासाठी हातात रंग घेऊन माही तिच्या मागे धावतच होती की ती समोर जाऊन धडकली......ती पडणारच होती की मजबूत हातांनी तिला पकडले होते..... माहीने त्याची  कॉलर पकडली होती..माहिने एक डोळा उघडून बघितले तर...समोर अर्जुन होता .....

अर्जुनला  बघून श्रिया आणि सोनिया तिथून कधीच पसार झाल्या होत्या....त्यांना माहिती होत आता तो चांगलच चिडणार होता.

त्याला बघून माही दचकली आणि सरळ उभी राहिली.....

अर्जुन ऑफिसला जायला तयार होऊन खाली येत होता की माही त्याला धडकली होती.......

" हा???" ...... माहीच लक्ष त्याच्या कॉलरकडे गेले तर तिथे रंग लागला होता.....ती तो झटकत होतीच की झटकता झटकता तिचा हाथ त्याच्या मानेजवळ गालाला लागला...आता तिथे सुद्धा माहीच्या हाथाचा रंग लागला होता.....ती त्याच्या गालावरच्या रंग पुसत होती...... अर्जुन मात्र तिलाच बघत होता.....

" सॉरी सॉरी.....ते चुकून" .......माही

" Sh ssss ..... it's okay" ..... अर्जुन तिच्या ओठांवर बोट ठेवत तिच्याकडे बघत बोलला....

" अरे हे काय दिवाळीमध्ये तुम्ही होळी खेळत आहात??" .......अनन्या तिथे येत बोलली....अनन्याला बघून श्रिया आंनी सोनिया पण तिच्या मागे आल्या...

अनन्याचा आवाजाने अर्जुन माहीच्या दूर झाला......आणि सगळ्याकडे बघून चुपचाप आतमध्ये चेंज करायला निघून गेला......

" हा अर्जुन होता?? " ......अनन्या शॉक होत बघत होती...

"हो ना , दादा ओरडला नाही?" ......श्रिया

" अर्जुन बदलत चाललाय" ......अनन्या....

" ह्म्म" .......सोनिया

" ह्म्म" .....माही अर्जुनला जातांना बघत होती...

*****

क्रमशः 

🎭 Series Post

View all