तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 33

माही अर्जुन

भाग  33

There's no one
as adorable and innocent like you

You yourself don't know who you are

There are millions here but
there's no one like you

My heartbeat, my heart,
my life are spread around you

You don't know that you're my life

अर्जुन माहिकडे डोळ्यात डोळे घालून बघत होता...... महिला मात्र खूप अवघडल्यासारखे झाले होते....... तिला अक्षरशः घाम फुटला होता........ सगळे काय विचार करतील या विचारानेच तिचं हृदय जोरजोराने धडधडत होते.....अर्जुनच बोलणं ऐकून तिला वाईट वाटत  होते पण थोडा रागही येत होता  आणि त्याच्या भावना सुद्धा कळत होत्या....... तिने आजूबाजूला बघितले तर सगळे अर्जुनकडे शॉक होत बघत होते.......

" अर्जुन सर प्लीज मला सगळ्यांसमोर लाजवू नका" ......माही एकदा अर्जुनच्या डोळ्यात बघितले आणि मनातच बोलत होती

" you are very precious for me Mahi ......how I can emberrace you" ......... अर्जुन मनातच बोलत होता........अर्जुनाला जस काही तिच्या मनातलं कळलं होतं.......

" I love you my little sweetheart " ......म्हणतच अर्जुनने आपला एक हात पुढे केला..... आणि मीराकडे बघत बोलला...

" Will you be mine forever....... "

मीरा त्याच्याकडे बघून खुदकन हसली....... तो काय बोलला हे मिराला  तर समजलं नव्हतं..... पण आय लव यू हे समजलं होतं..... घरी माही अंजली तिला नेहमी बोलत असायच्या...... त्यामुळे हा शब्द तिच्या ओळखीचा होता....

मीरा धावतच त्याच्या जवळ गेली......त्याने पण तिला त्याच्या कुशीमध्ये घेतले आणि तिच्या डोक्यावर केसांवर किस केले.........

" आय लव यू अंकल." ....... मीराने  सुद्धा त्याच्या गालावर छोटीशी किसी केली........

ते बघून माहिने सुटकेचा निश्वास सोडला.....

"  Wow दादू you are awesome.......तू असा काही बोलू शकतो....माझा तर विश्वासच बसत  नव्हता....... मीरासाठी बोलला  म्हणून काय झाले , पण तू रियली सुपर लाइन्स म्हटल्या.......हाय" .......श्रिया

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या...... कारण अर्जुन असं काही बोलू शकतो याचा कोनालाच विश्वास नव्हता....... पण एक व्यक्ती मात्र तिथे होती ज्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती...... अर्जुनने  हे मीरासाठी बोलले आहे ,  त्याच्यावर विश्वास बसत नव्हता......

" Guys I am done now....... तुम्ही खेळा." .... अर्जुन मिराला कडेवर उचलून घेतले आणि तो तिथून तिला घेऊन गेला......

गेम चांगलाच रंगला होता , सगळे एक्साईटेड होत खेळत होते........ सोबतच थट्टा मस्करी सुरू होती.....

" माही... बघ मीरा काय करते आहे??...... बरीच रात्र झाली आहे ,  तिला झोपवून दे .....नाहीतर उगाच कुरकुर करत बसेल आणि त्रास देईल " ......आई

" हो बघते आणि तिला झोपवून देते" ...... माहि तिथून उठली आणि मीराला शोधायला गेली....... ती शोधत शोधत अर्जुनच्या रूमकडे आली.......

अर्जुन बेडला टेकुन बसला होता....... मीरा त्याच्या छातीवर डोकं ठेवून पालथी झोपली होती ..... त्याचा सुद्धा डोळा लागला होता.... बाजूला टेबलवर वरण भाताची प्लेट दिसत  होती..... बहुतेक अर्जुनने   मीराला खाऊ घातलेल दिसत  होतं...... तिला अर्जुनच खूप कौतुक वाटलं....अर्जुन झोपेत खूप निरागस दिसत होता..त्याच्या चेहऱ्यावर छोटीशी स्मायल होती........" हा ड्रॅक्युला सुद्धा क्युट दिसू शकतो" ....... विचार करत ती स्वतः गालात हसली.

अर्जुन  बसल्या-बसल्या अकडून जाईल म्हणून माहीने अलगद मिराला  त्याच्या कुशीमधून काढले आणि त्याच्या बाजूला खाली झोपवले....  तिने मीराच्या आणि अर्जूनच्या अंगावर पांघरूण घातले...... अर्जुनच्या अंगावर पांघरूण घालत होतीच की अर्जुनने  तिचा हात पकडला आणि स्वतःवर तिला ओढले...... हे सगळे अचानक झाल्यामुळे माही अर्जुनच्या छातीवर जाऊन पडली.... तिने बावरून अर्जुनाकडे बघितला.... तर अर्जुनचे डोळे अजूनही बंद होते......

" तर तुम्ही जागे होता तर???" .....माही

" नाही......आता झालो" .......अर्जुन

" मग तुम्हाला कसं कळलं.. मी आहे म्हणून???" .......माही

" तुला बघायसाठी मला डोळ्यांची आवश्यकता नाही....... तू आजूबाजूला असली की मला सहज कळते....तुझ्या सोबत येणारी हवा मला तुझ्या येण्याची माहिती देते...... मी तुला अनुभवत असतो..........जाऊ दे  तुला नाही कळणार" .....अर्जुन

माही त्याच्या बोलण्यात हरवत त्याचाकडे बघत होती ....

" खूप कळतो ना मी तुला?? .....खूप निरीक्षण करत असतेस ना माझं??" ......अर्जुन

" मी का करू तुमचे निरीक्षण.....जे आहे ते सगळ्यांनाच दिसते" .....माही

" Oh really........मी जे बोललो नाही ते सुद्धा कळले ना तुला..... छान अक्टिंग केली माझी......खरंच मी इतका रुड आहो काय ?? " ....अर्जुन

" माहिती नाही....सोडा मला....... उगाच कोणी बघतील तर गैरसमज वाढतील" ......माही

" कोणी नाही येणार.... सगळे वरती बिझी आहेत...... आणि कोणी बघितले तरी आय डोन्ट केअर.... जे खरं आहे तेच कळेल" .....अर्जुन

" अर्जुन सर प्लीज...... तुम्ही विसरू नका तुमचे  लग्न जुळले  आहे ते...... काही दिवसांनी तुमची इंगेजमेंट आहे" ..... माहि तीचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत बोलत होती.......

" इंगेजमेंट अजून झाली नाही आहे..... आणि तसं पण मी आता  खरं सांगणार आहे सगळ्यांना , मी सोनिया सोबत इंगेजमेंट करणार नाही आहे" .......अर्जुन

" तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला???....... तिथे सगळ्यांसमोर पण तुम्ही काहीतरी बोलत होता....... तुम्ही असं कसं करू शकता??" ......माही

" माही मी खोटं बोलत नाही..... तेव्हा पण मी खरंच बोललो होतो........ आता कुणाला समजून घ्यायचंच नाहीये त्याला मी काही करू शकत नाही" ...... अर्जुनने  डोळे उघडले आणि तो आता महीच्या डोळ्यात बघत बोलत होता...

" माही I know u love me....but you don't want to accept the reality" ..... अर्जुन

" नाही.......अस काही नाही आहे"  ..... माही तिची नजर चोरत बोलत होती.....

" Oh..... really.....don't lie infront of me .....I can read your  each and every heartbeats....they are not lieing with me...... आणि तसंच आहे तर तू माझ्या डोळ्यात बघून का बोलत नाही आहेस??" ....... अर्जुन

" मी सांगितले ना .... असं काही नाही आहे.... तुम्हाला गैरसमज होतो आहे" .....माही....अर्जुनच्या हाताची पकड ढिली झाली तसा तिने त्याच्या हातून आपला हात काढून घेतला  आणि ती बाजूला जाऊन उभी राहिली...

" खरंच???..... मग त्यादिवशी मला का वाचवलं??..... मला बरं नव्हतं तर तुला का त्रास  होतं होता??' ...... अर्जुन उठून तिच्या जवळ येत बोलला....

" मी परतफेड केली.... तुम्ही मला वाचवले..... मी तुम्हाला ..... बस बाकी काही नाही आहे" ........माही

" खरंच??...... आपलं सगळं अस्तित्व  पणाला लावून???" ......अर्जुन

" काय फरक पडतोय??...... मी काही पवित्र नाही राहिली आता" ...... माही

" माही ssss " ........अर्जुन थोड्या जोराने ओरडला आणि त्याने माहिच्या तोंडावर आपला हात ठेवला...... " आता बोललीस तर बोलली,  पुढे मला असे शब्द तुझ्या तोंडातून नको आहेत...... आणि मी आत्ताच सगळ्यांना सांगायला चाललो आहे..... मी सोनियासोबत एंगेजमेंट नाही करू शकणार" ..... अर्जुन दाराजवळ जात बोलत होता..

" अर्जुन सर." ............ माहीने आवाज दिला

माहीच्या  आवाजाने अर्जुन मागे वळला....

" का असे वागत आहात???..... तुम्हाला सगळं माहिती असून  सुद्धा तुम्ही काहीच न समजल्या सारखे का करत आहात???...... का माझा त्रास वाढवत आहात???..... का माझी परीक्षा घेत आहात????...... बाहेर बघा सगळे किती आनंदी आहेत ,तुमची फॅमिली माझी फॅमिली..... त्यांच्या चेहर्‍यावर किती आनंद आहे..... का त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेता आहात ??.....माही , त्याच्या बोललण्याने ती घाबरली होती , त्याला थांबवणे तिला गरजेचे वाटत होते.

" तुझे  आयुष्य जर नीट होत असेल,  तर तुझी फॅमिली का नाराज होईल???. राहिला माझ्या फॅमिलीचा प्रश्न तर मी त्यांना समजवून सांगेल ..... आणि जर त्यांनी ऐकलं नाही तरी मी माझे मत बदलणार नाही...... आणि राहिला प्रश्न  तुझं सगळं जाणून घेण्याचं.... तर तुझ्या सोबत घडलेल्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही"  .... अर्जुन

" बोलायला सोपं जातं,  पण खर्या आयुष्यात हे खूप कठीण असतं.....माझ्यासारख्या मुलीला कोणी आपल्या घरची सून बनवून घेणार नाही..... आणि तुमची तर इतकी प्रतिष्ठित फॅमिली आहे... बाहेरच्या जगात तुमचं नाव आहे..,. माझ्यामुळे तुमचं नाव थोड सुद्धा खराब झालेले मला चालणार नाही" .......माही

" आय डोन्ट केअर" .....अर्जुन

" असं बोलण्याने नसते  चालत अर्जुन सर...... आपल्याला फक्त आपला स्वतःचाच नाही तर आपल्या परिवाराचा सुद्धा विचार करायला हवा.... आपली फॅमिली आपल्यासोबत नसल्याचे दुःख मला माहिती आहे आणि मला परत ते अनुभवायचे नाही आणि तुम्हाला सुद्धा अनुभव द्यायचे नाही" .......माही

" हे काय बोलते आहे तू???..... तुझा परिवार तुझ्या सोबत आहे आणि त्यांना जर कळत असेल की तुझे  चांगल्या घरी लग्न होते आहे तर ते सुद्धा खुश होतील" ......अर्जुन

" आणि माझ्यामुळे अंजली ताईचं लग्न मोडलं तर???...... माझ्या सोबत घडलेली गोष्ट जर तुमच्या घरी कळली  आणि त्यामुळे अंजली ताईच्या लग्नावर काही फरक पडला तर???.... मला हे नको आहे....... मी दुसऱ्यांच सुख हिरावून घेऊ शकत नाही..... मी जर दुसर्यांना सुखी करू नाही शकले,  तर मी पण सुखी राहू शकत नाही....... परत आपला परिवार गमावण्याची हिम्मत आता माझ्या मध्ये नाही आहे" ,.....माही

" म्हणजे??" ...... अर्जुन काही न समजल्या सारखा तिच्याकडे बघत होता...

" अर्जुन सर तुम्हाला माझं अर्ध सत्य माहितीये.... अर्ध नाही....... हा परिवार अंजलीताईचा परिवार आहे,  जो आता माझासुद्धा झालेला आहे.... ती आई अंजली ताईची आई आहे , माझी आई दुसरेच कोणीतरी आहे......"

" काय??" .......अर्जुन

" आम्ही नाशिकजवळ एका छोट्या खेड्यात राहत होतो..... माझे  आई बाबा ,  मी मोठी , लहान बहीण,  भाऊ असे आम्ही सगळे तिथे राहत होतो.... बाबा शेती करत होते.... खाऊन-पिऊन ठीक होता आमचं....... माझे  बारावी झालं,  मला शिकायची खूप आवड होती ,  मला पुढे शिकायचं होतं,  काहीतरी बनायचे होतं , पुढे शिकायचं म्हणजे तालुक्याच्या गावाला जावं लागणार होतं , बाबा पुढे शिकवायला तयार नव्हते,  परिस्थिती तशी बेताचीच होती.... मी  आईच्या मागे खूप  लागले....आईने बाबांना कसेबसे  तयार केले आणि मी पुढल्या शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला जायला लागले......  तिथेच कॉलेजमधून परत येताना  एक दिवस माझ्यासोबत हा सगळा प्रकार घडला होता ....... मी स्वतःला सावरत कसेबसे घरी आली...... मी घरच्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती...... घरी जर असं काही कळलं तर माझं  शिक्षण बंद होईल या भीतीने मी कोणालाच काही सांगितले नाही..... आठ दिवस बरं नाही वाटत म्हणून मी घरीच राहिले कॉलेजमध्ये गेली  नाही..... सगळे वारंवार  विचारू लागले  म्हणून मी परत कॉलेज जॉईन केले.....मैत्रीण सोबतच येणे जाणे  करत होती , पण तेव्हा मात्र मला तो मुलगा नंतर कधी दिसला नाही.... आणि मला थोडं हायसे वाटले.... माझे रुटीन नीट सुरु होतं..... आणि अचानक एक दिवस घरात गोंधळ झाला..... माझे पिरेट्स मिस झाले होते , पण मला तेव्हा या गोष्टीचे इतकी जास्ती माहिती नव्हती,  ज्ञान नव्हतं,  मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं....पण जवळपास पाच महिन्यांनी माझ्या आईच्या ते लक्षात आले आणि तिला  कळलं..... दवाखान्यांमध्ये जाऊन चेक करून आल्यावर कळलं की मी प्रेग्नंट आहे..... पण तेव्हा खूप वेळ झालेली होती...... अबोर्शन किंवा असं काही करता येणार नव्हतं , माझी तब्येत खूप खराब  झाली होती...... मग ही सगळी गोष्ट घरात बाबांना सुद्धा कळली , आणि मग मी झालेला सगळा प्रकार  घरात सांगितला,  तेव्हा ते माझ्यावर खूप चिडले,  मला खूप मारलं चपलेने, लाथा बुक्क्यांनी .. ....... ही  गोष्ट जर  घराच्या बाहेर पडली तर,  आमची सगळ्यांची खुप बदनामी होणार होती..... माझ्या नंतर माझी लहान बहिण भाऊ होते,  त्यांचे अख्खं  आयुष्य पुढे पडलं होतं.... मला वडिलांनी घर सोडून जायला सांगितले...... त्यांना आता मी घरात नको होते.......मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की यात माझी काही चुकी नाही,  पण कोणीच माझे  ऐकायला तयार नव्हते .....ते फक्त एवढेच बोलत होते की  माझ्यामुळे त्यांच,  सगळ्यांच आयुष्य खराब होईल..... आणि त्यांनी मला घराबाहेर काढलं........ नाशिकला माझ्या आईची मैत्रीण राहत होती,  तिची खूप जवळची मैत्रीण होती......माझी आई तिच्या मैत्रिणीला , फॅमिलीला,  तिच्या नवऱ्याला लहानपणापासून ओळखत होती आणि तेसुद्धा माझा  लहानपणापासून खूप लाड करायचे..... आईने मला काही पैसे दिले आणि तिचा पत्ता दिला...... थोडेफार कपडे घेऊन मी घर सोडले..... मी नाशिकला आले.... आईने फोन करून त्यांना थोडंफार कळवलं होतं.... अंजलीताईचे बाबा म्हणजे दामोदर काका , त्यांनी मला घरात घेतलं.... माझ्या डोक्यावरून हात फिरवला..... ते खूप चांगल्या मनाचे होते,  त्यांनी मला मुलीसारखं प्रेम दिलं आपल्या घरात ठेवलं.....बाहेर सगळ्यांना माझं लग्न झालं आहे आणि नवरा दुबईला पैसे कमवायला म्हणून गेला आहे असं सांगितलं...... मला त्यांनी त्यांच्या ओळखीने एका ठिकाणी छोटीशी नोकरी लावून दिली......अंजली ताईची आई बाबा आता माझे आई बाबा झाले होते....... माझं बऱ्यापैकी रुटीन सेट झालं होतं....मला नववा महिना लागला होता की मी एक दिवस ऑफिस मधून घरी येत होते... तिथे परत रस्त्यामध्ये मला तोच मुलगा त्याच्या काही मित्रांसोबत दिसला , त्याची नजर माझ्यावर पडली ...... त्याने त्याच्या मित्रांना काहीतरी सांगितले आणि त्याचे दोन मित्र माझ्या मागे लागले होते,  तिथूनच पळत पळत मी तुम्हाला येऊन धडकली होती..... बाकी पुढचा तर तुम्हाला माहितीच आहे...."

"  मीरा झाली..... सगळ्यांनी मला सजेस्ट केले की आपण मीराला एका अनाथ आश्रममध्ये  देऊ..... अधून मधून जाऊन लक्षसुद्धा ठेऊ...... मीरा जर माझ्या आयुष्यात, माझ्या सोबत राहीली  तर पुढे जाऊन माझ्या लग्नासाठी,  पुढच्या आयुष्यासाठी त्रास होईल...... त्यामुळे सगळ्यांना हे सोयीचे वाटत होते.......... मला आई होणे म्हणजे काय असते ,  काहीच माहिती नव्हतं...... माझ्यासाठी तर तो एक आपघात होता...... मला माझ्या आईवडिलांनी घराच्या बाहेर काढलं होतं, अनाथ असण्याचे  हे दुःख मला कळत होतं..... मी आई वडिल असताना सुद्धा  , एकटेपणा कसा असतो, एकटे जगणे किती कठीण असते ,  हे मला माहिती आहे....  मीरा माझी मुलगी आहे.... फक्त माझी.....तिला हातात हातात घेतले तेव्हा आईपण कळले , आपोआप तिच्यासोबत मी माझं नातं अनुभवत होती, कोणीतरी माझं आपलं होत .मी कशी मिराला एकटे सोडणार होती.....तिची आई असताना मी तिला कशी  एकटी सोडणार होती..... तिला कस अनाथ बनवणार होती......

" अर्जुन मीरा माझी मुलगी आहे..... मी तिला नाही सोडू शकत.... मी तिच्याशिवाय नाही जगू शकत...मीरा माझी मुलगी आहे , अर्जुन मीरा माझी मुलगी आहे" ........... मी बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला होता,  माही रडतच अर्जुनकडे बघत बोलत होती

तिचा बोलणे ऐकून अर्जुनच्या पण हृदयातूनी एक जोरदार कळ गेली होती, तिला मारले, चपलेलने लाथाबुक्क्यांनी , हे तर त्याला सहनच होत नव्हते ....... तिला रडताना बघतांना आता  त्याला असह्य होत होते .........एका क्षणाचा विलंब न करता  त्याने तिला जाऊन टाइट हग केले..... ती सतत मीरा मीरा म्हणून बडबड करत होती.... त्याने तिला आपल्या मिठीमध्ये घेतले होते आणि तिच्या डोक्यावरून पाठीवरुन हात फिरवत होता , तिला अजून अजून आपल्या मिठीमध्ये घट्ट पकडत होता ......माहीला तिच्या सोबत घडलेल्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या होत्या .....त्यामुळे माहिला  अजून जास्त वाईट वाटत होते....

" शsss.... माही , मीरा तुझीच आहे...... बघ ती तुझ्याजवळ आहे......you are so brave... शांत हो" ......अर्जुन तिच्या डोक्यावर थोपटत बोलत होता...

" अर्जुन दादा तुम्हाला वरती बोलवत आहे" ..... घरात काम करणारा रमुदादा दाराजवळ नॉक करत बोलला....

रामूच्या आवाजाने माही अर्जुनच्या दूर जायला बघत होती..... त्याने परत तिला स्वतःजवळ.... स्वतःच्या हातात घट्ट पकडले......... "हमम.... थोड्यावेळात येतोय सांग.... आणि इकडे कोणाला येऊ नको देऊ..... दार बंद करून घे" .... अर्जुन रमुला बोलला

रामूने मान हलवली आणि त्याने दार बंद करून घेतले....

" बाहेर सगळ्यांना कळेल ".....माही त्याच्या दूर होत बोलली..

" तु ठीक आहेस?" ......अर्जुन

महिने होकारार्थी मान हलवली...

"डोन्ट वरी...... बाहेर कुणाला काही कळणार नाही .....रामू दादा काही सांगत नाहीत" ...अर्जुन

"अर्जुन सर ......अंजली ताई आणि आकाश सरांचे लग्न मोडणार नाही ना??? ....... माझ्यामुळे त्यांनी खूप त्रास सहन केला आहे..... आता परत माझ्यामुळे मला त्यांना त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नाही आहे..... त्यादिवशी बाबांनी मला समजून घेतले आणि मिराला सोबत ठेवण्यासाठी तयार  झाले होते ........ त्यामुळे त्यांना  सगळ्यांना बरच ऐकाव लागल...... पण त्यांनी मला मुलगी मानले होतं आणि त्यांनी माझी मुलीसारखीच काळजी सुद्धा घेतली..... अंजली ताईचं लग्न एकदा जमलं होतं.... पण त्या लोकांनी वेळेवर खूप हुंडा मागितला त्यामुळे ते लग्न मोडलं...... त्याचा धक्का सहन झाला नाही.... बाबांना हार्ट अटॅक आला आणि ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेले ..... नंतर तिथे नाशिकला राहणे कठीण झालं होतं म्हणून तिथलं घर विकून आम्ही इथे आत्याबाईंकडे आलो...... आत्याबाईने सुद्धा खूप मोठ्या मनाने माझा स्वीकार केला...... कसेबसे आता सगळं ठीक होताना दिसत आहे.... आम्ही सर्वांनी खूप खूप मुश्किलीने सांभाळला आहे....... मला आता कोणालाच परत दुःखात बघायचं नाही आहे..... मी जशी आहे तशी खूप खूष आहे...... प्लीज ऐका माझं" ......

" ह्म्म" ......अर्जुन खिन्नपणे माहीकडे बघत होता... तिचं सगळं त्याला समजत सुद्धा होतं.... पण त्याच मन मानायला तयार होत नव्हतं....

" सोनिया मॅडम खूप चांगल्या आहे.... महत्त्वाचं म्हणजे त्यांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे...... त्या तुम्हाला खूप खुश ठेवतील..... आता तर त्या घरात सुद्धा खूप छान रुळल्या आहेत........   माझं काय,  तुमचं काय परिवार.... मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद हवा आहे... एका चुकीने ..... सगळं खराब होऊन जाईल" .....माही

" ह्म्म" .......अर्जुन

" तुम्ही कराल ना..... सोनिया मॅडम सोबत लग्न??" ..... माही खूप आशेने त्याच्या डोळ्यात बघत होती..

" तूला आनंद होईल?" ........अर्जुन

" हो.....खूप' ......माही

" तुझ्या आनंदासाठी काही पण" .......... अर्जुन त्याच्या मनावर मोठा दगड ठेवुन बोलला होता.....

तो स्वतःला आज खूप हेल्पलेस फील करत होता...... सगळे असून सुद्धा काहीच नसल्यासारखं वाटत होते..... आज तो खूप एकटा पडला होता

" थँक्यू सर" ..... म्हणून ती बाहेर जायला वळली..

" माही....one last time"  .. म्हणत.... तिला जाताना बघून तो परत तिच्याजवळ गेला आणि तिला खूप टाइट हग केले.... आणि तिच्या डोक्यावर किस केले...." stay always happy my  sweetheart" .....आणि तिच्या केसांचे  क्लच काढून.. तिचे केस मोकळे केले...... स्वीटहार्ट शब्द ऐकून माहीला सुद्धा खूप भरून आलं.... तिने पण आपल्या हातांचा वेढा त्याच्या भोवती घातला,  त्याच्या पाठीवर त्याला पकडून हग केले...... तो तिच्या दूर झाला आणि त्याने मान वळवली......

" Go माही" ....... अर्जुन पाठमोरा बोलला...

माहीने  एकदा त्याच्याकडे बघितले आणि मीराकडे बघत होती...

" डोन्ट वरी ..I am here.....go." ... अर्जुन

माहि तिथून चालली गेली..........

******

क्रमशः 

🎭 Series Post

View all