Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 31

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 31

भाग 31

अर्जुन पाठमोरा उभा होता...... तो काहीच बोलत नव्हता...... माहीने थोड्यावेळ त्याच्याकडे बघितले...... आणि रडत रडतच  तिथून निघून गेली....

माहीचे  बोलणं ऐकून अर्जुन सुन्न झाला होता...... त्यावर त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हते....... तिच्याकडे बघून त्याला नेहमी वाटायचं की तिच्या मनात काहीतरी आहे..... तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे...... पण ते इतकं वाईट असेल याची त्याने कल्पनासुद्धा केली नव्हती......... जेव्हाही  तो तिच्या डोळ्यांमध्ये बघायचा..... प्रत्येक वेळा तिचे डोळे त्याला दुखी दिसायचे..... तिच्या डोळ्यांमध्ये त्याला पेन दिसायच....... जरी ती  हसत खेळत  असायची ,  पण डोळे मात्र तिचे त्याच्याशी नेहमीच खरं  बोलायचे...... पण एवढं काही वाईट घडलेलं असेल हे मात्र त्याच्या कल्पनेच्या बाहेर होतं......

" माही" ............. त्याने  मागे वळून बघितले तर तिथे कोणीच नव्हतं...... माही तिथून गेलेली होती....... तो लगेच त्याच्या बाल्कनीमध्ये आला...... खाली बघितले तर माही रडत रडत जात होती........ अर्जुन तिला जाताना बघत उभा  होता........' माझ्याशी लग्न करशील काय?'  या प्रश्नाचं त्याला आता उत्तर मिळाले  होते...... आता त्याला कळले होते ,  ती का लग्नासाठी  नाही म्हणते आहे........... आज तो स्वतःला खूप हेल्पलेस फील करत होता......

*****

माही अर्जुनच्या केबिन पुढे उभी होती...... आतमधे जाऊ की नको विचार करत होती.......

" मिस देसाई कमिन" ..... अर्जुन

माहि आतमध्ये आली.

माहिने  तीच्या हातातलं लेटर त्याच्या टेबलवर त्याच्या पुढ्यात ठेवले आणि मागे सरकत चुपचाप त्याच्याकडे बघत उभी होती. ......

अर्जुनने एकदा तिच्याकडे बघितले, त्याला  तिचा चेहरा खूप उदास वाटत होता.  ते लेटर उचलत ओपन करत ते वाचत होता........
त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव माही बघत होती...

" सर,  फक्त एक रिक्वेस्ट आहे..... सर,  प्लीज आकाश सर आणि अंजलीताई चे लग्न होऊ द्या...... प्लीज तुमच्या घरी माझ्याबद्दल काही सांगू नका.....मी हवे तर आजिसहेवांचे ड्रेस डिझायनचे पण काम सोडेल.......... एवढीच इच्छा पूर्ण करा" ......माही

" You shut up.....काय बकवास गोष्टी करते आहेस तू" ...... त्याने ते ते लेटर फाडून डस्टबिन मध्ये टाकले......

" I am not accepting your resignation letter.....you may go now" .... अर्जुन

" सर?" ............माही

" मी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मिक्स करत नाही...... आणि आकाश - अंजलीच्या रिलेशशिपबद्दल  म्हणशील तर त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे..... अशा कुठल्याही गोष्टीने त्यांच्या  प्रेमावर फरक पडायला नको ......असं होत असेल तर ते प्रेम खरं नाही........ आणि दुसऱ्यांना सांगायचं म्हणशील तर एम नॉट इंटरेस्टेड इन  एनी गॉसिपिंग ........ आणि नोकरी सोडायचा विचार सुद्धा करू नको... तू ऑलरेडी लोन घेतले  आहेस..... आधी ते फेडायचे........आणि एक,  इथून जाण्याची परमिशन मी तुला कधीच देणार नाही....सो नेक्स्ट टाईम असं काहीही  डोक्यात येऊ सुद्धा देऊ नकोस" ..........अर्जुन

माहीने तिच्या हातातली एक छोटी डब्बी त्याचा टेबल वर ठेवली......

" थँक्यू अर्जुनसर,  तुम्ही मला नेहमीच माझ्या वाईट प्रसंगी मदत केली आहे.......तुम्ही प्रत्येकवेळी देवासारखे माझ्या  मदतीला धावून आले आहेत....... थँक्यू शब्द पण खूप छोटा आहे...... पण या ऐवजी काहीच नाही माझ्याजवळ" ......ती त्याचा समोर हाथ जोडून उभी होती......माही मान खाली घालून परत जायला वळली......

"तर तू मला ओळखतेस ..... आधीपासून..... " अर्जुन ने ती डबी उघडली आणि त्यात दोन ब्लू कलरच्या शर्टच्या बटन होत्या..... ज्या त्याच्या शर्टच्या होत्या.......

माही परत वळली आणि तिने होकारार्थी मान हलवली...

" मी तुम्हाला कसं विसरेल..... ज्या हातात मी सुरक्षित  होती..... त्या हातांना मी कशी विसरेल....... ज्यांच्याजवळ मी सुरक्षित  होती त्यांना कशी विसरेल आहे.....ज्वेलरी शो,  त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा खाली पडले आणि तुम्ही मला पकडलं त्यावेळेसच मी तुम्हाला ओळखते असं मला वाटत होतं, तुमचा स्पर्श ओळखीचा वाटत होता .......  त्यादिवशी जेव्हा  आजींच्या घरी तुम्ही शुद्धीत नव्हते... तेव्हा मी तुम्हाला जवळून बघितले , तुमच्या मानेवरचा तो काळसर डाग मी ओळखला आणि मला खात्री झाली की नाशिकला मला वाचवलं ते तुम्हीच होता" ...........माही

" मी तुला त्यादिवशी विचारलं होतं तू नाशिकला गेली होतीस काय,  मग खोटी का बोलली?? " .....अर्जुन

"मी खूप घाबरली होती......जे आयुष्य मी मागे सोडून आली होती ते मला परत इथे सुरु नव्हते करायचे.....खूप मुश्किलीने मी इथे मुंबईमध्ये नवीन आयुष्य सुरु केले होते.....मला परत त्या त्रासात जायचे नव्हते.... एकट्या मुलीला...... नवरा नसलेल्या मुलीच्या आईला किती त्रास होतो ते मलाच माहिती....... लोकांची नजर खायला उठते........नाशिकला खूप त्रास झाला मला...नी माझ्यामुळे सर्वांना.....म्हणून मी खोटं बोलले....... मला माफ करा....... जाणून-बुजून दुखवायचा माझा कुठलाही हेतू नव्हता" ......माही

" आत्याबाईनी  पण तुमच्या घरी मीरा त्यांच्या पुतण्याची मुलगी आहे म्हणून सांगितले.... खरंतर मला ते आवडले नव्हते,  मी आत्याबाईना तेव्हाच बोलले... खोटं का बोलतोय?? .... मला तुमच्या घरी सगळे लोक खूप प्रेमाने वागवत होते.... आजी साहेब खूप जीव लावतात...... जर त्यांना सगळं खरं कळेल तर सर्वांच्या नजरेत माझ्या प्रती तिरस्कार निर्माण होईल....... म्हणून आत्याबाई तुमच्या घरी खोटं बोलल्या ....... त्यांचा उद्देश तुम्हाला फसवायचं नव्हता...... फक्त माझ्या सुखासाठी आनंदासाठी त्या खोटे बोलल्या...... त्यांच्यावतीने मी तुमची माफी मागते" .......माही

अर्जुनला तर हे सगळं ऐकून त्यावर काय बोलावं काही कळतच नव्हते....... तो सुन्न डोक्याने तिचं बोलणं ऐकत होता......

" माही  ....तो  कोण आहे?" ......अर्जुन

" माहिती नाही....... मी फक्त  चेहरा ओळखते... त्याच नाव नाही माहिती मला......आमच्या गावांमध्ये मी त्याला पहिले कधी बघितलं सुद्धा नव्हतं...... बहुतेक तो कुणाकडे तरी पाहूना आला होता.... श्रीमंत घरचा वाटत होता....खूप वाईट दिवस होता तो माझ्या आयुष्यातला......"

"ते गाव सोडून मी नाशिकला शिफ्ट झाले....त्यादिवशी नाशिकला मी माझ्या नोकरीवरून येत होते तेव्हा परत तोच मुलगा मला तिथे नाशिकला दिसला आणि त्याची दोन मित्र माझ्या मागे लागली होती...... त्यांना घाबरूनच मी तिथून पळत होते.......... आणि तुम्हाला येऊन धडकली होती " ...........माही

" मला तर नीट काही कळतही नव्हते,... खूप शिकायचं होतं ......खूप स्वप्न बघितली होती... सगळी मातीमोल झाली" ........  तिला बोलायला आता खूप जड होत होतं.........

" बस ......आता मला काहीच जाणून घ्यायचे नाही" ....अर्जुन

माहीने डोळे पुसले आणि ती अर्जुनच्या केबिन मधून बाहेर चालली गेली....

आतापर्यंत अर्जुनने माहीला  इतकं तरी नक्कीच ओळखलं होतं की तिला सहनाभूती दाखवलेली  आवडत नाही..... ती खूप स्वाभिमानी आहे...... आणि तसे पण तिच्या भूतकाळामुळे ऑफिसमध्ये काहीच फरक पडणार नव्हता ....ती एक खूप चांगली एम्पलोयी होती....... त्यामुळे त्याला ती ऑफिस ऑफिसमध्येच हवी होती....

माहिनेसुद्धा  स्वतःला परिस्थितीनुसार खूप स्ट्रॉंग बनवून घेतले होते...... तिला झालेल्या गोष्टीसाठी रडत बसायचं नव्हतं....... तिला आता पुढे जायचं होतं..... मीराचे  भविष्य घडवायचं होतं....... पुढचे  आयुष्य आनंदाने हसत जगायचे होते...... तिच्यामुळे तिच्या परिवाराला  तिला दुखवायचे नव्हते , त्यामुळे ती जास्तीत जास्त आनंदी राहायची , खोड्या करायची.....तिचा तो खोडकर स्वभाव,  तिच्यातले  बालपण तिने जिवंत ठेवले होते.....

*******

ऑफिस नेहमीप्रमाणे सुरू असायचे..... अर्जुन तर काहीच न  झाल्या सारखा वागत होता......... तसा तो माहिसोबत आधी वागायचा तसाच तो आतासुद्धा वागत होता..... माही आता बरीच शांत झाली होती...... घरी भेटली की मात्र ती पहिल्यासारखीच वागायची........ तिचा हसणं खिदळणं धांदरटपणा करणे सगळं सारखे  असायचे ........ अर्जुनपुढे असला की मात्र ती हे नाटक नव्हती करू शकत, ती आपोआप त्याच्यापुढे शांत व्हायची .... अर्जुनला  सगळं माहिती आहे म्हणून तिला त्याच्यासमोर आनंदी राहायचं नाटक करावं नाही लागायचं..... पण घरच्यांसमोर मात्र ती नेहमीच आनंदी असल्याचे दाखवायची...... अर्जुनला मात्र तिच वागण हे नेहमीच अजब वाटायचं......

*****

आता दिवाळी जवळ येत होती........ आणि त्यानंतर लगेच साखरपुडा होणार होता....... सगळीकडे साखरपुड्याची तयारी सुरू झाली होती.....

" माहि चल ना  सोबत , मी एकटी कशी जाऊ?" ......अंजली

" मी तिथे येऊन काय करू तुमच्या मध्ये?? ...... आकाश सर आहेत ना तुझ्यासोबत".......माही

" पण तरीही...... तिथे ती सोनिया आणि अर्जुन सर असतील ना...... मला खूप अवघड होतंय....... चल ना  प्लीज".....अंजली

" म्हणूनच तर नाही यायचं" ....... माही मनातच पुटपुटली

" ये माही नाटक नको करू,  चल आता...... तुझी चॉईस पण खूप छान आहे...... मला तर काही कळत सुद्धा नाही" .....अंजली

" जाणा सोबत ती इतके  बोलते तर..... तुला कोण खात आहे तिकडे" ......... आत्याबाई

" अहो आत्याबाई किती बोर होणार मी तिकडे...... हे कपल आणि ते एक कपल........ मी काय करू यांच्यामध्ये..... असा करा तुम्ही पण चला तेवढेच मला कंपनी" ........माही आत्याबाईचे मस्करी करत बोलली.

" हो जावयांमध्ये मी येणार आहे काय??..... बरं तरी दिसते का ते??........ आकाशराव तरी बरे आहेत...... ते अर्जुन सर, ते  तर सदानकदा रागातच दिसतात......... आणि तुला काय काम , मीच भेटली काय  आपली मस्करी करायला?" .....आत्याबाई

" होना बघा तेच मी म्हणते आहे..... ऑफिसमध्ये तर मी त्यांचा राग झेलतच असते...... आता एक दिवस सुट्टी,  आता आराम करू दे" ...... माही

" माही नाटक करू नको..... चल पटकन तयार हो....दहा मिनिटात आकाश घ्यायला येणार आहे" ......अंजली

" यार ताई तू पण ना , कुठे फसवतेस" .... माही तयार व्हायला निघून गेली...

" अर्जुन चल ना प्लीज....... काम तर तुला ट्वेंटी फोर अवर्स असतात......... थोडा वेळ काढ ना?...... अंजली आणि आकाश पण बघ सोबतच शॉपिंग करत आहेत...... आपण पण सोबतच करू ना..... एकमेकांना कॉम्प्लिमेंट होतील असे  ड्रेस घ्यायचे आहेत ".......सोनिया अर्जुनला लाडीगोडी लावत होती....... अर्जुन मात्र लॅपटॉप घेऊन आपलं काम करत होता....

"सोनिया तु जा त्यांच्यासोबत...... मला हे शॉपिंग वगैरे काही आवडत नाही........ आणि त्यापेक्षाही बरीच महत्त्वाची कामे आहेत मला " .......अर्जुन

"अरे भाई तू अजून रेडी नाही झाला...... तिकडे अंजली आणि माही वाट बघत असतील" ...... आकाश त्यांच्या रूममध्ये येतो बोलला

"माही येणार आहे??" ...... अर्जुन मनातच विचार करत होता....  माहीच नाव ऐकून तो त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार  झाला......

माहिच्या घरासमोर कार येऊन थांबली...... माही आणि अंजली कारमध्ये मागे जाऊन बसल्या..... मागे आकाश बसला होता त्याच्याच बाजूला त्या  दोघी बसल्या...... सोनिया अर्जुनच्या शेजारी समोर बसली होती आणि अर्जुन ड्राईव्ह करत होता.......

" मीरा नाही दिसली,  कुठे आहे?" .......अर्जुन

" तिला आई पार्क मध्ये घेऊन गेली आहे..,.आम्हाला बाहेर जाताना पाहून तिने सुद्धा सोबत यायचा हट्ट केला असता" .....अंजली

" ओके" ......अर्जुन....
 

सोनियाची शॉपिंगची रिलेटेड खूप बडबड सुरू होती....... कुठे जायचं ....काय घ्यायचं .....कुठला कलर...... कुठली ब्रांड........ अर्जुन मात्र तिला फक्त "ह्म्म ह्म्म" करत होता आणि मिरर मधून माहीला बघत होता...... माही चे  त्याच्याकडे लक्ष गेले की ती  विंडो मधून बाहेर बघायची....... आकाश आणि अंजलीची सुद्धा आपली वेगळीच कुजबूज सुरू होते.......

अर्जुनने गाडी एक मोठा डिझायनर शॉपपुढे उभी केली......

" तुम्ही सगळे पुढे जा , मी  पार्क करून येतो" ......अर्जुन

सगळे पुढे जायला निघाले...

" माझी पर्स" ........ माही इकडे तिकडे शोधत बोलली

"बहुतेक कारमध्येच राहिली असेल...... मी घेऊन येतो..".... आकाश

" नाही नको तुम्ही जा पुढे...... तुम्हालाच घ्यायचे आहे तुम्ही बघायला सुरूवात करा,  मी घेऊन येते" .....माही

"हो ठीक आहे चालेल..... आम्ही जातो पुढे" .....सोनिया

माही पार्किंगकडे जायला निघाली...... तिला रस्त्यात अर्जुन येतांना दिसला आणि त्याच्या हातात तिची पर्स सुद्धा होती......

माही आपल्याच विचारात पुढे जात होती..... तिचे  आजूबाजूला लक्ष नव्हते..........

" मााही" ...... अर्जुन जोरात ओरडला आणि तिला स्वतःकडे ओढले......... एक भरधाव गाडी माहीच्या अगदी जवळून गेली होती......

अशी अचानक जवळून गाडी गेल्यामुळे माही  खूप घाबरली होती... तिला खूप घाम सुटला होता .. तिच्या हृदयाची ठकठक जोराने होत होती...... अर्जुनला सुद्धा ती जाणवत होती....... ऐकू येत होती......

" माही इट्स ओके........ गेली ती कार"......अर्जुन

" ह्म्म." .... मान हलवत ... ती त्याच्यापासून दूर झाली....

"चल जाऊया..... ते आपली वाट बघत असतील" .......अर्जुन

" काय ग तुझा वरचा मजला कधीच काम नाही करत काय??...... रादर जिथे गरज असते तिथे काम नाही करत" ...... तिचा बिघडलेला मूड पाहून अर्जुन तिचा मूड ठीक करण्यासाठी बोलला

" ह..??" .....माही

"ह.......काय??...........तुझ्यासोबत बोलतोय...... भूतांसोबत नाही"........अर्जुन

" ह......काय....काही बोललात.........?" तिने कसनुस तोंड करत त्याच्याकडे बघितले...

" काही नाही चल" ....... डोक्यावर आठ्या पाडत अर्जुन बोलला

दोघेही आतमध्ये आले तर सोनियाने  खूप ड्रेस काढून ठेवले होते......... आकाश आणि अंजली एकमेकांना बघण्यात गुंतले होते...

"अर्जुन ..........my baby....... बघ ना ..... मला हेल्प करना...... I am so confused" ........ सोनिया अर्जुनचा हाथ ओढत त्याला नेऊ लागली....

"Baby.??" ....... अर्जुन कसतरी तोंड करत सोनियाला बोलला..

"अरे असच बोलत असतात ....आता अशीच फॅशन आहे .....baby"....... सोनिया

अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला......त्याला तसे बघून माहीला हसू आवरले नाही आणि ती खळखळून हसायला लागली.....अर्जुनने डोळे मोठे करत  तिच्याकडे  बघत होता .....तशी ती चूप बसली आणि अंजलीकडे गेली....

आकाश आणि अंजली एकमेकांना बघण्यात येवढे गुंतले होते की त्यांना माही आलेली पण कळले नाही.......

माहीने त्या दोघांच्या डोळ्यांमधून हाथ फिरवला तरी त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही.....त्यांना तस बघून माहीला खुदकन हसू आले........

माहिने अंजलीला मागून धक्का दिला ......लक्ष नसल्यामुळे   अंजली आकाशवर जाऊन  पडली........आणि आकाश अंजलीची तंद्री तुटली..... अर्जुन माही सगळ्यांना आजूबाजूला बघून आता ते दोघं मात्र चांगलेच ओशाळले....

अर्जुनच त्यांच्या कडे लक्ष गेले ......."सगळे पागल माझ्याच वाट्याला आले." .......तो मान हलवत स्वतःच  बोलला......

" काय मग मन भरलेच असेल." ........माही अंजलीला खंद्याने मारत आकाशकडे डोळे उडवत बोलत होती......

अंजलीने लाजून मान खाली घातली......आकाशने पण केसांवरून हाथ फिरवत मान वळवली...

" चला मग घरी परत.....तुमचं तर झालच...... शॉपिंग वैगरे तर सगळे मनाचे खेळ आहेत" .....माही त्यांची मस्करी करत होती..

" माही गप्प बस आता नाहीतर तू आता मार खाशील...." . अंजली
 

" Do fast..... मला जास्त वेळ नाही आहे" ..... अर्जुन सगळे टाईमपास करत असताना बघून जवळ जवळ ओरडलाच ......

त्याच्या आवाजाने   आकाश अंजली कपडे बघायला गेले..... सगळे आपापल्या कामात बिझी झाले....

आकाश आणि अंजलीच्या मध्ये मध्ये काय करायचं.... त्यांना थोडी प्रायव्हसी भेटावी , म्हणून...... माही एका साईडला ठेवलेल्या काऊचवर  एकटी बसली होती..... आणि त्या सगळ्यांना बघत होती......

अर्जुनला सुद्धा शॉपिंग मध्ये काही इंटरेस्ट नव्हता...... तो दुसऱ्या साईडला माहीच्या समोर पण बराच दूर एका चेअरवर बसला होता....... मधून मधून सोनिया त्याला कपडे आणून दाखवायची..

"सोनिया,  मी हे असं काही घालणार नाही आहो"......अर्जुन सोनियाने एक ट्रॅडिशनल इंडियन ड्रेस त्याचसाठी आणला होता आणि त्याला ट्राय करायला सांगत होती......

" प्लीज , अर्जुन " .......सोनिया

" No way...... माझ्या ब्रँड्स ठरलेले आहेत..... आणि ड्रेस पॅटर्न पण...... हे असलं मला काही आवडत नाही.....मी ऑलरेडी त्यांना सांगितला आहे ते काढून ठेवतील आहे... मला ट्राय करायची सुद्धा काही गरज नाही...... तू तुझं बघ".........अर्जुन

" You are so bore ... ते आकाश आणि अंजली बघ ना किती एन्जॉय करत आहेत". .....   सोनिया

" Don't compare Soniya" ....... अर्जुन

" You are so unromantic" ...... सोनिया पाय आपटत तिथून निघून गेली...

" अचानक हिला काय झालं??..... हिला तर माहितीये मी असाच आहे...... इमपॉसिबल.... ओह ... कुठे फसलो मी"......अर्जुन मनातच बोलत होता..... विचार करता करता त्याचं लक्ष माहीवर गेलं....... माही एका साडी घातलेल्या स्टॅच्यूजवळ उभी होती........ आणि साडी बघत ती कुठेतरी हरवली होती......

"मॅम डू यू वॉन्ट टू सी एनीथिंग" ...... तिथली एक स्टाफ माही  जवळ येत  विचारत होती...

"आ....... नाही" .....माही..तिच्या आवाजाने भानावर येत... माही तिला मानेने नाही बोलली आणि तिने कुणाचे लक्ष नाही बघून तिच्या डोळ्यांच्या कडा पुसल्या...... आणि तिथून चालली गेली............ मात्र अर्जुनचे  संपूर्ण लक्ष तिच्याकडे होते.....

" सोनिया एकच ड्रेस घालावा लागतो....,. तू किती सारे काढून ठेवले आहेस?" ...... अर्जुन तिने काढून ठेवलेले ड्रेसकडे बघत बोर होत बोलला....

"अर्जुन दिवाळी येते आहे..... किती सारे ड्रेस लागतात तेव्हा..... नंतर तू माझ्यासोबत येणार नाही..... आता आहेस तर मी तो चान्स बिलकुल सोडणार नाही".....सोनिया

अर्जुन इकडे तिकडे बघत होता, त्याला  माही तिथे  कुठे दिसली नाही........ तिला शोधत शोधत अर्जुन शॉपच्या मागच्या एका कॉर्नरला आला...... आणि समोरचे दृश्य बघून स्वतः गालात हसत होता...... " पागल आहे ही मुलगी आत्ताच रडत होती,  आता हसायला सुद्धा लागली" ......

माहि तिथे एका आरशासमोर उभी होती.....त्या कॉर्नरमध्ये माधुरी दीक्षितचे बरेच वेगवेगळ्या एक्स्प्रेशन पोजचे फोटो लावले होते....... माही तिचे वेगवेगळे एक्स्प्रेशन कॉपी करत स्वतःलाच आरशात बघत होती..... आणि स्वताच खुदकन हसत होती...... ती त्यामध्ये खूप क्युट दिसत होती....बऱ्याच वेळ तिचं हेच सुरू होते.

" Ahh.....She will made me crazy" ...... त्याने त्याच्या खिशातून मोबाईल फोन काढला आणि तिचे ते वेगवेगळे एक्सप्रेशन्स पटापट क्लिक करत होता....

तेवढ्यात तिथे एक स्टाफ मेंबर आली आणि ति माही जवळ जाणार तेवढ्यात अर्जुनने तिला थांबवले आणि हातानेच इशारा करत  परत जायला सांगितले....... आणि परत माहीचे फोटो क्लिक करायला लागला... त्याने फोन आतमध्ये ठेवला आणि आता तो स्वतःच्या डोळ्यात तिचे क्युट फेशियल एक्स्प्रेशनस साठवून घेत होता..... तेवढ्यात माहिच लक्ष अर्जुनकडे गेले  आणि ती एका जागेवर चुपचाप उभी राहिली.....

" तर माधुरी दीक्षित समजतेस तु स्वताला?" ..... अर्जुन तिच्याजवळ येत तिची मस्करी करत बोलला

" ह.....काय?" .........माही

" हे.... हेच...... काय करत होती तू ?" ...... तो माधुरी दीक्षितच्या फोटोकडे बोट दाखवत बोलला...

आता मात्र माहीच्या लक्षात आलं की आपल्याला असे विचित्र वेडेवाकडे तोंड करताना अर्जुनने  बघितले आहे....

" त.....ते...... मी काही करेल.... तुम्हाला काय??.........ते ती मला आवडते" .......  माही मान इकडे तिकडे फिरवत बोलत होती

" मला काही प्रॉब्लेम नाही आहे...... कर तुला जे करायचं...... मी फक्त एवढंच सांगायला आलो होतो...... तू तिच्यापेक्षा पण खूप क्युट दिसतेस" ........अर्जुन तिच्या नाकावर टिचकी मारत हसतच परत गेला...

" हा sss........ काय म्हणाले ते???......... अरे देवा मला तर वाटलं होतं हे आता माझा तिरस्कार करतील...... त्यांच्यात तर थोडासुद्धा बदल झाला नाही..... माही अर्जुनला जाताना बघत विचार करत होती......

*****

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️