तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 30

माही अर्जुन

भाग 30

माही हतबल होत आय सी यु च्या समोरच्या बाकाड्यावर आपल्या दोन्ही हातात चेहरा झाकून  बसली होती...... अचानक तिला काहीतरी जाणवलं,  तिने मान वर करून बघितलं...... तर तिथे पुढून अर्जुन येताना दिसला..... त्याचं माहीकडे लक्ष गेलं  ...तिच्या डोळ्यात त्याला असंख्य आसवे दिसली, तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसल्या .. आणि त्याचे पाय तिथेच खिळले...... माहीसुद्धा भरल्या डोळ्यांनी त्याला बघत होती.....

ती उठून उभी राहिली....  अर्जुन उभा त्या दिशेने हळू हळू चालत जात होती.....जशी  जशी  जवळ जात होती तशी तशी तिची स्पीड वाढत होती आणि ती धावतच जात अर्जुनला मिठी मारत पकडून घेत   रडायला लागली...... तिला असे बिलगलेले, तिच्या स्पर्शातून तिला होणाऱ्या वेदना त्याला जाणवत होत्या...

" माझी मीरा ........ माझी मीरा,  ती तिथे"  ....... ती icu कडे बोट दाखवत बोलत होती .....तिच्याने नीट बोलल्या सुद्धा जात नव्हते.....

" माझी मिरा...... मला माझी मीरा पाहिजे..... मी तिच्याशीवाय.... मी तिच्याशिवाय जगु नाही शकत...... अर्जुन माझ्या मीराला ठीक करून द्या ना......  मला माझी मीरा पाहिजे अर्जुन.... मला माझी मिरा पाहिजे" ...... माही रडत होती.....

" ठीक होईल सगळं " ...... अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता...

" मॅडम , ओ पॉजिटिव रक्त पाहिजे आहे" .... नर्स बाहेर येत बोलली......

माही डोळे पुसत तिच्याजवळ गेली..... " चला मी येते" .....

" मॅडम तुमचं आधीच ब्लड चेक केले आहे ...... तुमच ब्लड ग्रुप मॅच नाही होत..... तिच्या बाबांना किंवा बाकी कोणाचं ओ  पॉझिटिव्ह असेल तर बोलवा" .......नर्स

" तिचे बाबा???.........असं कसं होऊ शकते मी तिची आई आहे , माझं ब्लड मॅच व्हायलाच पाहिजे....... तुम्ही नीट चेक करा" ...... माही काकुळतीला येऊन बोलत होती....

"मी तिची आई आहे."..... अर्जुन ते ऐकून सुन्न झाला...... जसे काही त्याच्या हृदयावर कोणीतरी खूप मोठा आघात केला......."  माहि मीराची आई??" ......... तो निशब्द झाला होता....... त्याचं डोकं ब्लॉक झालं होतं........ त्याला आता  फक्त माहीची होणारी तळमळ दिसत होती...

" नाही मॅडम , तुमच मॅच होत नाही...... होतं असं बरेचदा.... यात काही चुकीचं नाही..... तुम्ही बघा दुसरं कोणी असेल तर  प्लीज घायी करा..... आपल्याकडे जास्त वेळ नाही.....

" तुमच्या ब्लड बँक मध्ये असेल... चेक करा ना?"  ......माही

" नाही.... प्लीज घायी करा." .....नर्स सांगून निघून गेली...

माही लगेच पर्समध्ये फोन चेक करत होती....पण ती फोन विसरली होती.....तिला काहीच सुचत नव्हते...तिचे लक्ष अर्जुनकडे गेले.....आघात झाल्यासारखं प्रश्नार्थक नजरेने तो तिच्याकडे बघत होता.........माहीच्या  आता सगळं लक्षात आले  की अर्जुंनला कळलं आहे, '"  मिरा माझी मुलगी आहे ते ' ......अर्जुनला नक्कीच राग आला असेल,  ते  वारंवार विचारात होता पण आपण काही सांगितले नाही......नंतर जाऊ त्याच्या प्रश्नांना सामोरे.....आधी ब्लडच बघायला हवे होते....तिने एक काळजीभरली  नजर त्याचावर टाकली आणि ती  बाहेर जाणार तेवढयात अर्जुनने तिचा हाथ पकडला.......

" सर मला माहितीये तुम्हाला या वेळेला खूप प्रश्न पडले आहेत.... तुम्हाला माझा खुप राग पण येत असेल........ मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन.... पण प्लीज मला आता जाऊ द्या" ...... ..माही

" मॅडम , तुम्ही अजून इथेच आहात ?? प्लीज घाई करा"....नर्स

" हो...... सर ,  प्लीज सोडा  माझा हात..... जाऊ द्या मला" ..... ते रडक्या सुरात बोलली..

अर्जुनने तिचा हात सोडला........ माहिने  एक नजर त्यांच्यावर टाकली आणि ती बाहेर दारापर्यंत जातच होती की...

" सिस्टर , माझा ब्लड ग्रूप ओ पॉझिटिव आहे..... चला मी येतोय........"

त्या आवाजाने पळत जाणारी माहि दारातच थबकली..... आणि तिने मागे वळून बघितले....... तिथेच बाजूला भिंतीजवळ सरकली........ तिने सुटकेचा एक मोठा श्वास घेतला.... पाणी भरल्या डोळ्यांनी ती अर्जुनकडे बघत होती..... आणि तशीच भिंतीजवळ खाली बसली....

अर्जुनने एकदा तिच्याकडे बघितले आणि तो शर्टच्या स्लीवस फोल्ड करत नर्स सोबत आत मध्ये निघून गेला....

माही तशीच तिथे बसून अर्जुनच्या  पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत होती...

अर्जुन ऑफिसच्या कामाने बाहेर गेला होता.... तिथून परत आल्यावर तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याला कळलं होतं की माही ऑफिसमध्ये आली नाही.....तेव्हा त्याने माहीच्या फोनवर केला तर तो फोन आत्याबाई जवळ होता आणि आत्याबाईनी  त्याला सगळे सांगितले होते.... मीराला हार्टमध्ये छिद्र होतं लहानपणापासूनच ...... काल अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते..,.. तिच्यावर हार्ट सर्जरी झाली होती......

मिराची सर्जरी होऊन आठ दिवस झाले होते..... ती आता बर्‍यापैकी रिकवर करत होती...... अर्जुन मात्र त्या दिवसापासून माहि सोबत काहीच बोलला नव्हता...... तो तिच्याकडे  बघत सुद्धा नव्हता...... महिला त्याचा राग कळत होता....... तिला माहिती होतं चूक आपलीच आहे..... ती निमूटपणे बसली होती...

" माही उद्या मिराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होईल....... उद्या आपल्याला सगळे बिल भरावे लागतील..... थोडे पैसे मी आणि आत्याने जमवले आहे...... पण तरीसुद्धा दिढ लाख कमी पडत आहेत..... तुला तुझ्या ऑफिसमधून लोन भेटत असेल तर किंवा ऍडव्हान्स मध्ये तुझा पगार भेटतो काय एकदा विचारून घे" ......आई

" हो मी आत्ताच जाते आणि सरांसोबत बोलून येते" .......माही

तेवढ्यात अर्जुन मीराला भेटायला तिथे आला...... थोड्यावेळ मिरा सोबत खेळून तो डॉक्टरांना भेटायला गेला.... माही सोबत मात्र तो एकही शब्द बोलला नव्हता .......

ऑफिस सुटायच्या आधी माही ऑफिसमध्ये आली.... आणि भीतच अर्जुनच्या केबिनमध्ये गेली.... तिने डोअर नॉक केले...... अर्जुनने  तिला बाहेर बघितले होते.....

" Come in......"

माही चुपचाप अर्जुनच्या पुढे जाऊन उभी राहिली.....

अर्जुन लॅपटॉप मध्ये बघण्यात बिझी होता....... माही बराच वेळ तिथे चुपचाप उभी होती.......

" सर.........."

" Yes??........"

" सर ......सर.......मला पैशांची गरज आहे , तर मला माझी सॅलरी ऍडव्हान्स मध्ये भेटू शकते काय?" .........

" ह्म्म......अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जाऊन बोलून घे......"  अर्जुन लॅपटॉप मध्येच बघत बोलत होता....

" सर....." ..... माही पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुनने तिला थांबवले

" 10 days leave sanction.....go now,  Meera needs you more" ......

" सर......... "

" Ms Desai you may leave now." ....

थँक्यू बोलून माही निघून गेली......तिच्या लक्षात आले होते,  अर्जुन आता  तिचे  ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता....

दुसऱ्या दिवशी माहि बिल पे करायला गेली....... तर तिला कळले की बिल आधीच पे केलेले आहे.........

" मॅडम मला कळेल का बिल कोणी पे केले ते?" .....माही

" वन मिनिट" ...... ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये अकाउंटने मिराचे बिल्स चेक केले........ " मॅडम,  मिस्टर अर्जुन पटवर्धन....... त्यांनी सगळे क्लियर केले आहेत" ......

तिच्या डोक्यात आले होते खरं झालं होतं..... काल अर्जुन तिला डॉक्टरांसोबत बोलून झाल्यावर  इथेच ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जवळ काहीतरी बोलतांना दिसला होता.....

मिराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता...... आता मीरा बऱ्यापैकी रीकवर झाली होती....... तिचं आता पहिल्यासारखा खेळेने कुदने सुरू झालं होतं...... तसे तसे पण लहान मुलं फार काळ बेडवर झोपून  राहत नाहीत....,.. मीराचे  नॉर्मल रुटीन सुरू झाल्यावर माहीने ऑफिस जॉईन केले....

*****

ऑफिसमध्ये अर्जुन पूर्णपणे माहीला इग्नोर करत होता......तो तिच्याकडे बघत सुद्धा नव्हता.... बोलणं तर दूरच होतं......

" सर मला काही का विचारत नाही आहे......सरांना माहिती झालेल आहे मिरा माझी मुलगी आहे तरीसुद्धा ते मला काहीच का विचारत नाही......... माझ्यावर राग का बरं काढत नाही आहेत" ...... माही मनातच विचार करत होती....... माहीला त्याचे असे शांत वागणं सहन होत नव्हते आणि स्वतः  माही अर्जुनच्या केबिनमध्ये गेली......

" Yes......."

" सर.......ते मला तुम्हाला........" .

" मला काही ऐकायचे नाही" .......

" सर ".....

" Ms Desai...... हे ऑफिस आहे ......इथे ऑफिसची  कामे झालेली बरी" ......

" पण...."

" I said I don't want to listen anything..... Go now." .... अर्जुन थोड्या मोठ्या आवाजात बोलला

माहि चुपचाप निघून गेली.....

माही अर्जुनच्या केबिनमध्ये जात  रोज त्याच्यासोबत  बोलायचा प्रयत्न करत होती पण अर्जुन मात्र काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता...... आज दोन आठवडे होत आले होते पण अर्जुन काही ऐकायला तयारच नव्हता......

आज रविवार होता माही शांतीसदनमध्ये ड्रेस डिझाईनच्या कामाने आली होती.... काम आटोपून ती आजीला भेटायला गेली...,. आजीशी सगळे डिटेल्स बोलून ती परत जायला निघाली....... तिला खाली पिंकी भेटली

" पिंकीताई,  आज घरात कोणीच दिसत नाही आहे??" ....माही

" माहीताई , सगळे बाहेर गेले आहे..... फक्त मोठे दादा घरी आहेत... त्यांच्या रूममध्ये काम करत आहेत आणि आजीसाहेब आराम करत आहेत,  बाकी घरी कोणीच नाही....."

माहिने विचार केला एकदा अर्जुन सोबत बोलून बघावं..... ऑफिसमध्ये तर ते काही बोलू देत नाहीत...... आता घरी एकदा बोलायचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही...... विचार करत ती अर्जुनच्याकडे जात होती...

हवा खूप सुटली होती...... बहुतेक पाऊस वादळ येईल असे वाटत होते......

माहीने अर्जुनच्या रूम मध्ये डोकावून बघितले.,.... ती दारातच... दाराच्या फ्रेमला हात पकडून उभी होती

अर्जुनला तिची चाहूल लागली होती , त्याच्या लक्षात आलं होतं की माही आली आहे.... पण तो लॅपटॉप मध्येच बघत बसला होता....

" सर........"

अर्जुनने ऐकून न ऐकल्यासारखे केले......

" अर्जुन सर मला तुमच्याशी बोलायचं आहे...... तुम्ही मला इग्नोर करत आहात........ मला आता सहन होत नाही आहे...... तुम्ही माझ्यावर रागवा.. चिडा... वाटेल ते करा...... मला कंपनीतून काढायचं असेल तर काढा..... मला माहिती आहे मी खूप चुकली आहे...,.. माझ्या चुकीला माफी नाही......... तुम्ही जी शिक्षा द्याल ,   मी भोगायला  तयार आहे........ पण माझे एकदा बोलणं ऐकून घ्या....... तुमचे शांत बसणं मला खूप त्रास देत आहे" ....... माही

" मी तुला ऑफिसमध्ये पण बोललो होतो आणि आता पण बोलतो आहे,  मला तुझ्या सोबत काहीच बोलायचं नाही आहे..... यू आर नॉट डिझरव एनीथिंग नाऊ....... तू जाऊ शकतेस" .....अर्जुन

अर्जुन तिचं काहीच ऐकायला तयार नाही बघून तिच्या डोळ्यात पाणी आले होते........ ती  थोड्या वेळ तशीच तिथे स्तब्ध उभी होती....पण अर्जुनने एकदाही तिच्या कडे बघितले नव्हते ...खूप वेळ वाट बघूनही तो बघत नाही आहे बघून परत जायला निघाली ..... माही  जायला वळणार तेवढ्यात हवेमुळे दार आपाटले .... आणि तिचे बोटं त्यामध्ये चेपल्या गेले ....... आणि  ती जोराने कळवळली......

तिचा आवाज ऐकून अर्जुनपुढे बघितलं तर तिचा हात दारामध्ये आला होता..... तो लगेच उठून धावतच तिथे गेला आणि त्याने दार उघडले ...... बघितले तर माहीचे तीन बोट दारामध्ये आली होती.......

" You mad....... समजत नाही का तुला???..... दिसत नाही का की हवा सुटली आहे,  दार आपटत आहेत ..... दारात हाथ  घालून  कोण उभा राहतो??"....... त्याने तिच्या हाताला पकडून तिला आतमध्ये काऊचवर बसवले....... पळत जात तो  फ्रीजमधून बर्फ घेऊन आला..... आणि तिच्या बोटांवर लावले......... अर्जुनने  तिच्याकडे बघितले तर ती रडत होती ,  तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते आणि चुपचाप अर्जुनकडे बघत होती.......

" खूप दुखतय काय??" ......अर्जुन

" नाही....... लागल्याचं काहीच त्रास होत नाही आहे....... पण तुम्ही मला काही विचारत नाही आहात त्याचा मला खूप त्रास होत आहे" ..... माही

" तुझी पर्सनल लाईफ आहे,  मी त्यामध्ये कसा काय बोलू शकतो??" .......अर्जुन

"मग तुम्ही मीराचे सगळे बिल का बर क्लीयर केले??"..... माही

" मला तुझ्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाही आहेत..... माझी मर्जी..... मला जे वाटेल ते मी करेल" ...... अर्जुन

माही उठून परत जायला निघाला लागली...

" कुठे आहे मिराचा फादर??" .. ...........अर्जुन

माहीने अर्जुनकडे वळून बघितले....

" माहिती नाही....."

" माहिती नाही म्हणजे??  ......ज्याच्या सोबत लग्न केले तो कुठे आहे तुला माहिती नाही??.........how fool you are??......ka  लपवले तुझे लग्न झाले आहे ते ??" ........ अर्जुन

"माझे लग्न झालेले नाही" ......माही

" काय..?... मग मीरा........?.ohh got it .... He dump you..... कशी काय कुणावरही विश्वास ठेवून बसली तू??....... खरंच आहे म्हणा तू तुझ्या डोक्याचा वापर तरी कुठे करते". ......... अर्जुन रागात बोलत होता......अर्जुन मागे वळला ....... तो कमरेवर हात ठेवून तसाच पाठमोरा उभा होता.....

" माझावर ते  झाल होत........ मला तो शब्द बोलतानाही खूप त्रास होतो आहे" ..........माही

तिच्या बोलण्यावर अर्जुन काही बोलला नाही...... आणि त्याने मान वळवून घेतली...... माहिला वाटले अर्जुनला आता आपला तिरस्कार वाटतो आहे.... म्हणून तो काही बोलत नाही आहे आणि त्याने मान वळवून घेतली आहे......


"

पण मीरा फक्त माझी..... माझीच मुलगी आहे....... मीरा फक्त माझी आहे...... मीरा फक्त माझी आहे"....... त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे ती थोड्यावेळ बघत राहिली आणि तिथून रडतच निघून गेली......

*******

माही सोबत जे झाले आहे त्यामुळे अर्जूनच  माहीवरचे प्रेम कमी होईल की त्याला काही फरक पडणार नाही ??अर्जूनच आता काय निर्णय असेल?? तिच्या बरोबरीने उभा राहील की त्यांच्या वाटा वेगळ्या होतील .....

क्रमशः

********

🎭 Series Post

View all