तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 29

माही अर्जुन


 

भाग  29

पक्ष्यांच्या किलबिलाटाने अर्जुनला जाग आली.... बाहेर अजून उजाडायच होते.,.. पहाटेचा हवेत गारवा होता...... सूर्य आभाळमागून डोकावू पाहत होता... नुकताच पाऊस पडून गेला होता........ शांत सुंदर अशी ती सकाळ होती.. त्याने डोळे उघडले तर समोर त्याला माहिचा शांत सुंदर चेहरा दिसला.,..... .. ती खूप गाढ झोपेत होती....... ती एका कडावर झोपली होती तिचं तोंड अर्जुनकडे होतं.... थोडेसे पाय जवळ घेतले होते..... तिचे मोकळे केस तिच्या गालावरुन मानेवरून समोर आले होते हवेमुळे काही थोडेसे भुरभुरत होते...... त्याचं लक्ष वेधून घेत होतं ते तिच्या डोक्यावर केसांच्या भांगेमध्ये  असलेले कुंकू....... समोर चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करायचा त्याचा मोह झाला होता पण त्याने तो आवरला होता..... तो एकटक तिच्या त्या शांत निरागस चेहऱ्याकडे बघत होता....... तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आले...,. त्याला आता बरेच फ्रेश वाटत होते...... आजी बाहेर काहीतरी करत होती....... तो उठला.... कपडे तर नव्हतेच काही..... त्याने तिथे असलेली चादर लूंगीसारखी गुंडाळून घेतली...... आणि तिथे माहिची  ओढणी पडली होती ती जवळपास वाळली होती.... त्याने ती ओढणी अंगावर गळ्यातून समोर  घेतली...,

माहि पाय पोटाजवळ घेऊन झोपली होती , थंडी वाजत असावी , तिच्या  अंगावर त्याने गोधडी टाकली.... झोपेतच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली.... तिने गोधडीचे एक टोक पकडून आपल्या डोक्याखाली घेतले.... आणि थोडे पाय लांब केले......रात्रीपासून ती तशीच पडून झोपली होती,  तिने सगळे तिथे असलेले  पांघरून अर्जुनच्या अंगावर टाकले होते........ एकदा तिच्या हसर्या चेहऱ्यावर नजर टाकली...... आणि तो बाहेर आजीजवळ गेला

आजी बाहेर पडवीमध्ये चूल पेटवत होती..... तिथेच मोठाले दगड होतं,  त्याच दगडावर तो जाऊन बसला....तिथून आत मध्ये माहि झोपली होती ती जागा क्लिअर दिसत होती .....अधून-मधून तिकडे बघत होता.....

पहाटेचा गारवा आणि चुलीजवळ बसायला खूप छान वाटत होते.... तो अधून मधून हात सोडून चुलीजवळ पकडत होता...

" उठला होय रे पोरा....... बरं वाटते का आता??" .....आजी त्याच्याकडे हसुन बघत काळजीने विचारत होती

" हो........ ठीक वाटत आहे आता" ..........अर्जुन

" चहा पिशिल पोरा?" .......आजी

" हो." ....अर्जुन

आजीने चुलीवर पातेले  चढवले ..... पाणी, चहापत्ती, थोडी साखर,  गवती चहा... थोडा तुळशीचा पाला... आल..... बिन दुधाचा असा चहा बनवला..... आणि त्याला एका ग्लास मध्ये दिला......

" Awesome." ...... अर्जुनने चहाचा एक घोट घेतला

" काय.?" ....आजी

" आजी चहा खूप छान झाला आहे , मी पहिल्यांदाच असा पितो आहे......आजी तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला मदत केली" ......अर्जुन

" माझे कायचे आभार....... आभार मानायचे असतील तर  आपल्या बायकोचे मान...... रात्रभर काळजी घेतली तिने तुझी........ तुझी तब्येत बिघडत होती तर त्या पोरीचा बिचारीचा जीव खालवर होत होता ...... खूप हिमतीची आहे......... खूप प्रेम करते तुझ्यावर" .........आजी

" बायको??" ........ स्वतःशीच पुटपुटला......आजी बोलत होती तेव्हा तो आतमध्ये माहिकडे बघत होता..... त्याला रात्रीचा प्रसंग आठवला........  त्याला सगळं नीट आठवत नव्हतं , तरी त्याला तिचा स्पर्श .......तिचे त्याच्या जवळ झोपने  आठवत होते..... तिचा तो रेशमी  स्पर्श,  तो फील करत होता..,..त्याला काही होऊ नये म्हणून तिने स्वतःला पणाला लावले होते .....त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या त्याने अलगद पुसून घेतल्या.... त्याने तिची ओढणी अंगाभोवती शाल सारखी लपेटून घेतली आणि एक दीर्घ श्वास घेतला..
त्याच्या डोळ्यांमध्ये खूप कृतज्ञता आणि प्रेम दिसत होते...

" खुप प्रेम करतो ना तिच्याव??" र...........आजी

" अ....... हमम." ......अर्जुन

" पण ती बोलत नाही ना?" .........आजी

" ह्म्म." ....अर्जुन

" त्रास नको करून घेऊ पोरा..... तिचेपण खूप प्रेम आहे बघ तुझ्यावर...... पोरींवर सगळ्या घराचे जिम्मेदारी असते....... दुसऱ्यांच्या खुशीसाठी आपल्या मनातल्या भावना आपल्या मनात ठेवतात.......... ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आनंदासाठी कधीकधी स्वतःचा आनंद बी दिसत नाही त्यांना........ त्यांना फक्त समजून घेणारे  पाहिजे असते...... समजून घे तिला" .......आजी

" ह्म्म.." .... तो आजीच्या बोलण्यावर विचार करत होता

" अरे पाहा.... कालपासून आले,  नाव पण नाही विचारली" .........आजी

" मी अर्जुन..... अर्जुन पटवर्धन...... आणि ती.... तिचं नाव माही" ......अर्जुन

" तुम्हाला आजकालच्या पोरांना काय म्हणतात ते फॅशनचे खूपच वांग आलाय..... तिचं पूर्ण नाव सांगायला लाज वाटते व्हय...... सौभाग्यवती माही अर्जुन पटवर्धन असं सांगायचं पुढल्यापासून" ....,...आजी

" अ....?" ........ तिचं नाव सोबत आपलं नाव ऐकून त्याला खूप छान वाटले......... " स्वप्न तर तेच आहे पण ही हट्टी मुलगी मानत नाही आहे ना" ..... अर्जुन मनातच विचार करत होता

आता बरंच उजाडलं होतं........

थोड्या वेळाने माहिला जाग आली...... आजूबाजूला बघितले  तर अर्जुन तिला कुठेच दिसत नव्हता........ ती दचकून घाबरून उठली...... तिने गुंडाळलेली साडी नीट केली.... आणि आजीला शोधत होती...... आजीसुद्धा तिला दिसली नाही..... आता मात्र ती चांगलीच घाबरली.....

" अर्जुन सर ...... अर्जुन सर" ..... ती झोपडीच्या आजूबाजूला सगळीकडे बघत ओरडत होती....... तरी सुद्धा तिला काही दिसत नव्हते...... आता मात्र तिचा जीव घाबरा झाला..... तसा तो एरिया जंगल सारखाच  होता...... कोणी प्राणी वगैरे येऊन गेलं की काय ... की कोणी दुसरं जंगली माणूस वैगरे.........तिच्या मनात भलते सलते विचार यायला लागले....... आता मात्र ती घाबरून थरथरायला लागली...

"अर्जुन ....अर्जुन ....अर्जुन"  .....जीवाच्या आकांताने ओरडत ....दिसेल त्या दिशेने पळत सुटली होती...... पावसाने बऱ्याच ठिकाणी चिखल झाला होता...... एका ठिकाणी ती पाय घसरून खाली पडली , तिचे हात साडी चिखलाने खराब झाली.....डोळ्यावर आलेले केस बाजूला सारायला गेली तर चिखलाच्या हाताने कपाळाला सुद्धा थोडी माती लागली......... आता मात्र तिला खूप रडू कोसळलं होतं.... तिच्या डोळ्यातून पाणी येत होते आणि ती सैरभैर इकडे तिकडे बघत होती......

पळता पळता  एका जागेवर थांबली..... समोरुन तिला अर्जुन येताना दिसला....... ती पळत पळत त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली....धावल्यामुळे घाबरल्यामुळे ती आता जोरजोराने श्वास घेत होती आणि पाणी भरल्या डोळ्यांनी अर्जुनकडे एकटक बघत होती....

विस्कटलेले केस...,.  पडल्यामुळे तिची साडी सुद्धा थोडी विस्कटली होती नी चिखलाने माखली  होती.... खांद्यावरून पदर थोडा खाली सरकला होता...... हाताला पायाला लागलेला चिखल........ डोळ्यामध्ये भीती..... तिचे ते रूप पाहून त्यालासुद्धा तिची खूप भीती वाटली...त्याला ती खूप घाबरलेली दिसत होती.

" माही." ..... तो काही बोलणार तेवढ्यात माही त्याला जाऊन बिलगली...... आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली..... तिचं अंग भीतीने थरथरत होतं.....

" तिला हाथ लावू की नको ..."... बराच विचार केल्यावर त्याने त्याचे हात तिच्या कमरेतून मागे घेत तिच्या पाठीवर पकडले.

" अर्जुन .....तुम्ही ठीक आहात ना ?? " .... त्याला पकडून एकदा त्याच्याकडे बघत ती बोलली...... त्याने मानेनेच तिला हो सांगितले.... तिने परत त्याला मिठी मारली...त्याला नीट बघून तिच्या जीवात जीव आला होता ....

थोड्यावेळाने ती त्याच्या दूर झाली......
" तुम्ही कुठे गेले होता?" .......माही

" माही.... ते मी" ........ अर्जुन काही बोलणार तेवढ्यात ती त्याच्या छातीवर आपल्या दोन्ही हातांनी मारू लागली......

" अस न सांगता कोणी जात असते काय??........ किती शोधले मी तुम्हाला....... माझा जीव गेला असता आता........ तुम्हाला काही झाले असते म्हणजे??" ........... ती रडत रडत त्याच्या छातीवर मारत बोलत होती.....

ती खूप पॅनिक  झाली होती.....

" माही .... मी ठीक आहो.....मी फोन" ..... तो बोलत होता पण तीच त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं...... तिची आपली  बडबड सुरु  होती..तिचे स्वतःकडे सुद्धा लक्ष नव्हते....तिचा साडीचा पदर खांद्यावरून खाली आला होता ..... त्याने तिचा घसरलेला साडीचा पदर नीट करत तिच्या खांद्यावर ठेवला  आणि तिच्या हाताला धरून स्वतःकडे ओढले..... आणि आपल्या मिठीमध्ये घट्ट पकडले......

" Shssss.......मी ठीक आहे" ......अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला...

" माही काय झालं आहे तुला?? ..... का इतकी  घाबरते आहेस.???.... रात्री पण खूप घाबरली होती .....आता पण.... आणि समजा मला काही झाले तरी तुला काय फरक पडतो??..... मी कोण आहे तुझा??..., प्रेम करायला लागली माझ्यावर???....मान्य तरी  कर" ......अर्जुन

आता मात्र माहिचा दिवा लागला....... " माही हे तू काय करत आहे?? ....आपल्या वागण्यातून  त्यांना भलतेच सिग्नल पोहोचत आहेत....... आपण आपले फीलिंग्स भावना त्यांना दाखवू शकत नाही ....आवर घाल स्वतावर"" .... माही मनातच बोलत होती

" प्रेम???...... कोण म्हणाले ??.... मी प्रेम बिम नाही करत कोणावर...... आणि तुमच्यासारख्या खडूसवर तर अजिबातच नाही....... तुम्ही माझे बॉस आहे..... तुम्हाला काही झालं तर बिजनेसची वाट लागणार..... माझ्यासारखे कितीसाऱ्या लोकांची  नोकरी जाणार..... आम्ही बेघर होणार..... बेरोजगार होणार...... मग आम्हाला कोण देईल नोकरी???....... आमची घर रस्त्यावर येणार...... किती लोकांचे मला श्राप लागले असते..... किती लोकांनी मला शिव्या दिल्या असत्या....... तुम्ही सहीसलामत राहिले पाहिजे ही माझी जिम्मेदारी होती....... तीच मी पूर्ण करत होती." .... माहि बडबड सुरू झाली

चला मॅडम झाल्या नॉर्मल........."  बस बस कळलं सगळं........मग काय पाहिजे तुला माझा जीव वाचवल्या बद्दल??" .....अर्जुन.........अर्जुन कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे बघत होता

" एवढं काय टेन्शनमध्ये बघत आहात..... तुमची कंपनी नाही मागणार आहे मी" ....... माही मस्करी करत बोलली

" तू मागून तर बघ...... एक काय सगळे बिजनेस एम्पायर तुझ्या नावावर करेल" .......अर्जुन

" मी काय करू त्याचं,  मला काही समजत नाही....... वेळ आल्यावर मागील तेव्हा द्या..... प्रॉमिस??"  माही हात पुढे करत बोलली

कुतुहलाने तो तिच्याकडे बघत होता..... " मला माहिती आहे तू स्वतःसाठी काहीच मागणार नाही...... आणि मला जे पाहिजे ते पण देणार नाहीस." ........मनातच विचार करत हसतच त्यांनी तिच्या हातावर ठेवला आणि प्रॉमिस म्हटले...

तेवढ्यात तिथे आजी आली...... "तुम्ही दोघे इथे हाय तर मी तुम्हाला कुठे कुठे शोधत आहे.....".

" हा मी ते मोबाईलला नेटवर्क मिळते काय  म्हणून थोडा इकडे तिकडे बघत होतो..... तर तिकडे थोड्या दूरवर नेटवर्क सापडलं....... घरचे सगळे काळजी करत असतील.... म्हणून घरी फोन करून आलो...... आणि कारची जाण्यासाठी सोय करायची होती ते करत होतो...... अंजलीला सुद्धा फोन केला आहे"..... त्याने एक  कटाक्ष माहीवर टाकला आणि आजीलाकडे बघत बोलला....

" बरं...बर.....तुला ग पोरी..... तूला काय झालं ही अशी काय मातीने माखलेली आहेस?" ......आजी

"मी झोपून उठली तर मला कोणीच दिसले नाही..... तुम्ही सुद्धा नव्हते..... मी तुम्हाला दोघांना शोधत होती तर तिथेच चिखलमध्ये पाय घसरून पडली" ......माही

" अग बया......तुम्ही आता इथून जेवणच करून जावा,  मी मागे बाजूच्या मळ्यामध्ये भाजी वगैरे आणायला गेली होती.... तू झोपली होती म्हणून तुला उठवले नाही..... बरं चला आता अंघोळ करून घे म्हणजे बरं वाटेल" .. म्हणत  तिघेही झोपडीकडे गेले.....

दोघांनीही अंघोळ आटोपली...... त्यांचे कपडे वाळले होते ....त्यांनी आपले कपडे घातले...... माहि तीची ओढणी शोधत होती पण तिला ती कुठेच सापडत  नव्हती.....

" माझी ओढणी दिसली काय??"  ती शोधत शोधत बोलत होती...

" नाही ... मला तर माहिती पण नाही" .....अर्जुन

" कुठे गेली माझी ओढणी?" ...माही

" काल असेल रस्त्यात कुठे अडकून पडली..... इट्स ओके...एवढं काय त्यात?" ....अर्जुन

" मी घरी कशी जाऊ?" ......माही

" ठीक आहे ....एवढं पॅनिक व्हायची गरज नाही.... जाता जाता आपण शॉपमधून घेऊन घेऊ... नंतर घरी जाऊ" ..,..अर्जुन

" नक्की" ......माही

" हो" .....अर्जुन
 

माही तयारी करून आजीजवळ स्वयंपाकासाठी मदतीला गेली......

" हे काय परत तू भांग न भरताच आली??....... तुमच्या पोरींना आजकाल काहीच आठवणीत राहत नाही....... आम्ही जुन्या मतांची असलो तरी आम्हाला याच्या सगळ्यांमध्ये खूप विश्वास आहे.....

" अर्जुन हीची भांग भरून दे." .....आजी अर्जुंकडे बघत बोलली....

आता मात्र आजीच्या अशा बोलण्याने माहि आणि अर्जुन  एकमेकांकडे बघत होते..... काय करावं त्यांना कळत नव्हते.....

" ती देवाजवळची डब्बी घे आणि जा त्याच्याजवळ." ....आजी

" असू द्या,  त्यांना कशाला त्रास मी करते" ......माही

"त्यात काय आला त्रास.??..... तू आहे ना सोबत,  तो करेल" .....आजी

आता तिचा नाईलाज झाला... ती कुंकवाची डब्बी घेऊन अर्जुन जवळ गेली... आणि तिने हात पुढे केला...

"माही हे काय करते आहेस तू??...... इतके खोटे बोलायची खरच गरज आहे काय??..... का खोट बोललीस आजींना की आपण नवरा-बायको आहे ते?" ......अर्जुन

" नाहीतर आजींनी घरात घेतले नसते..... तुमची तब्येत पण खूप खराब होत होती...... काय करणार होते मी?" ...माही

" ठीक आहे,  चल मग आता खरं काय ते सांगू" .....अर्जुन

" नाही.... नको.... त्यांना वाईट वाटेल.... आपण त्यांच्याकडे थांबलोय,  त्यांना किती आनंद होतो आहे....... किती आनंदाने ते आपल्यासाठी हे सगळं करत आहे........ आपण त्यांना खरं सांगु तर त्यांच्या आनंदावर पाणी फिरेल..... जाता जाता दोन सुखाचे क्षण त्यांना देऊन जाऊ शकतो ना.??" ....... माही

" अगं पण हे??...... आपल्या लग्न नाही झालं आहे" .....अर्जुन

" काय फरक पडते...... फक्त कुंकू लावण्याने लग्न होत असतं तर टीव्ही मधल्या सगळ्या लोकांची लग्न झालेली असती" .......माही

अर्जुनाने डोक्यावर हात मारून घेतला......

" आणि काल रात्री काय करत होती??  ......ते  काय  होतं??? ....... मी जर शुद्धीत  नसतो तर?? ......... तुला कळतय का किती वाईट घडले असते??........ माझं जाऊ दे....... कुणाला कळलं तर???.... तुला कोण कोण काय काय बोलेल???........ लग्नाआधी असा काही केले तर आपल्या समाजात किती नावं ठेवतात..... काय काय म्हणतात....."

" तेव्हा तुमचा जीव वाचवणे एवढेच काय ते माझ्या डोक्यात होते.... मला माहिती आहे असं काही घडलं तर  मुलींनाच समाज दोष देत असतात...... यात मुलाची पण चूक असू  शकते कोणालाच कळत नाही...... काही राक्षसी वृत्तीचे मुलं..माणसं आपल्या थोड्या  हव्यासापोटी मुलींसोबत काय काय करतात आणि त्यांना रस्त्यावर फेकून देतात...... त्यांना कळत सुद्धा नाही की त्यांचे दहा मिनिटाच्या हव्यासापोटी त्या मुलीचे  पूर्ण आयुष्य बरबाद होते आहे....... तिला आयुष्य पुढे जगायला किती त्रास जातो हे सुद्धा त्यांना कळत नाही....... ती नुकतीच आयुष्यातले रंग जगायला शिकत असते,  त्या मुलींना ही समाजातली जनावर बुद्धीची लोक चिरडून फेकतात.....पुन्हा उठून जगायचा प्रयत्न त्या मुली करत असताना हे लोक पुन्हा त्यांना खाली पडतात......... आणि हा स्वतःला शिकलेला मॉडन समजत असलेला  समाज सुद्धा मुलीलाच दोष देत असतात...... समाजाच्या या विचारसरणीला कोणीच काही करू शकत नाही...... कोणीच बदलू शकत नाही...... मला चांगलंच माहिती आहे...मुलीला आपला मान टिकऊन ठेवणे किती कठीण आहे ........ तुम्हालापण अशा काल एक रात्र एका परपुरुषासोबत घालवलेल्या मुलीसोबत लाजच वाटेल ना ......???" .. माही च्या दबलेल्या भावना उफाळून बाहेर आल्या होत्या.
 

माही तिच्या हातातली कुंकुची  डब्बी मागे घेणार तेवढ्यात अर्जुन काही न बोलता त्यातले  कुंकू काढून तिच्या केसांमध्ये भांगेमध्ये  भरल...... आणि मागे वळला

" कालपासून आजींनी मला इतकं प्रेम दिलं आहे..... जर त्यांना कळेल की मी तुमची बायको नाही...... तरी मी तुमच्यासोबत होती रात्रभर..... तर त्या माझा  तिरस्कार करतील" .........माही

तिचे बोललेल सगळे वाक्य अर्जुनच्या मनाला भिडले होते....... सरळ झोपडीच्या बाहेर चालला गेला..

आजीसोबत दोघांनी पण छान जेवण केले,  आजीने मस्त भाकरी ठेचा,  वांग्याचे भरीत असा साधाच बेत केला होता..... पण आजीने दिलेल्या प्रेमामुळे तो पण त्यांना पंचपक्वांनाच्या सारखा वाटला होता..... खूप गप्पा... गोष्टी..... खेळीमेळीच्या वातावरणात दिवस घालवला होता......

दोघेही आजीचा निरोप घेत होते....

" पोरांनो तुम्ही आले खूप छान वाटलं..,.... म्हातारीच्या आयुष्यात हे दिवस तुम्ही आनंदाने भरून टाकला..... अर्जुन पोरा माझ्या बोलण्याचा तू  मान ठेवला आणि आज येथे जेवायसाठी थांबला...... खूप बरं वाटलं पहा...... असेच एकमेकांना साथ देऊन रहा..... माही पोरी खूप नशीबवान आहेस इतका प्रेम आणि काळजी करणारा नवरा भेटला..... सुखी राहा दोघेही"..... आजी

माहीने आजीला वाकुन नमस्कार केला आणि तिला गळाभेट केली........

" या पोरांनो असाच कधी रस्ता चुकले तर या,  म्हातारीला भेटायला या" ..... दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत आजी बोलली....

दोघांनीही आजीचा निरोप घेतला आणि चालत चालतच रस्त्यापर्यंत आले.... तिथे ड्रायव्हर दुसरी गाडी घेऊन आला होता..... अर्जुनने बंद  झालेल्या गाडीची किल्ली ड्रायव्हरला दिली...

त्याने कारचे दार   माहीला बसण्यासाठी  ओपन केले..... माही चुपचाप सीटवर जाऊन बसली..... अर्जुनने कार सुरु केले आणि ते घरी परत जायला निघाले...... रस्त्याने कोणीच कोणाशी बोललं नव्हतं..,.. अर्जुनच्या डोक्यात माहिचे  बोलणे फिरत होतं..... आणि माही विचार करत होती की आपण सरांना जास्तच बोललो.......

अर्जुनने  माहीला  घरी सोडले.... दोन मिनिटं घरात भेटून तो त्याच्या घरी परत निघून गेला.....

अंजलीला त्यांनी सकाळी फोन वर सगळं समजावून सांगितले होते...... त्यामुळे घरी माहीला कोणी जास्ती काही बोलले नाही...

*******

आल्या आल्या लगेच अर्जुन आठ दिवसापासून ऑफिसच्या कामाने  मुंबई मधून बाहेर गेला होता......जे घडलं होतं तेव्हापासून माहीला त्याला सामोरे जायला थोडं अवघड वाटत होतं........पण अर्जुनला  डाउट आला आहे ,  हे बघून आता आपण त्याच्यापासून दूरच राहिलं पाहिजे आणि त्याला आपण तो आला की दुसऱ्या ऑफिस मध्ये ट्रान्सफर मागून घेऊ हाच विचार ती करत होती........ इकडे अर्जुनाच्या  डोक्यात सतत तिचे बोललेल्या गोष्टी सुरू होत्या...... ती का अशी बोलत होती.????...... परत गेले की तीला विचारू असा तो विचार करत होता......

********

माही हॉस्पिटल मध्ये ICU समोर बेंचवर रडणे कंट्रोल करत बसली होती......... सतत देवाचे नाव घेत होती...... हाथ जोडत  होती.......

" देवा का बघतोय माझी इतकी परीक्षा.....जो द्यायचा तो त्रास मला दे"  ..........ती देवाला हाथ जोडत होती.....हताशपणे कुठेतरी शून्यात हरवली होती.

********

क्रमशः

🎭 Series Post

View all