Aug 16, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 24

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 24

 

 

भाग  24

 

"सर,  मी खरंच काही नाही केलं" ...... माही रडतच अर्जुनच्या केबिनमध्ये उभी होती

 

"यु शट अप माही.... .... पहिले हे रडणे थांबव.... खूप इरिटेट होत आहे मला" ........ अर्जुन.

 

अर्जुन लॅपटॉप मध्ये काहीतरी बघण्यात मग्न होता....

 

माही चूप होते......"  पण सर खरंच मी ते घेतलं नाही आहे..... मला माहिती नाही ते माझ्या बॅगमध्ये कस आलं" ...माही

 

" तुला तुझं डोकं वापरता येत नाही काय.???..... आपल्याकडे  स्टाफसाठी बॅग , इम्पॉर्टंट सामान ठेवायला लॉकर आहेत , तिथे तुला ठेवता येत नाही का?" .....अर्जुन


"

सोनिया.... केबिनमध्ये ये" ... अर्जुन ने फोन बोलून ठेवला

 

आज ऑफिसमध्ये डायमंड ज्वेलरी कलेक्शनचे फोटोशूट होतं.... त्यातून एक नेकपिस हरवले होते.... सगळ्या स्टाफचे  चेकिंग करण्यात आल.... माहिच्या बॅगमधून ते नेकलेस मिळालेलं होतं...... माही खूप घाबरली होती आणि ती अर्जुनच्या केबिन मध्ये येऊन अर्जुनसोबत बोलत होती....

 

आपली नोकरी जाईल यापेक्षाही आपण अर्जुनचे विश्वास घातकी ठरू या भावनेने तिला फार वाईट वाटत होते आणि म्हणून ती अर्जुनला बराच प्रयत्न करत सांगायचा प्रयत्न करत होती....

 

सोनिया अर्जुनच्या केबिनमध्ये आली...... अर्जुन एका साईडला भिंतीला टेकून दोन्ही हात खिशामध्ये घालून उभा होता...... त्याच्या फेस एक्स्प्रेशनस आणि एटीट्यूड वरून सोनियाला कळले होते की अर्जुनला सगळं कळलं आहे.... तिच्या मनात थोडी धडकी भरली...


"

अर्जुन काही काम होतं?" ...... सोनिया


"

सोनिया तुला चांगलंच माहिती आहे की मला काय काम आहे , आता तू सांगते की मी बोलू?" ..... अर्जुन


"

पण तू हिची का साईड घेतो आहेस? ...... तिला जाऊ दे,  इफेक्ट जॉब वरूनच काढून टाक.... नाहीतर तिला परत आपल्या बॅक ऑफिस ला पाठवून दे....... तशी पण इथे काही गरज नाही आणि मला ती आवडत सुद्धा नाही..... तसे पण अशा चोर लोकांची आपल्या ऑफिसमध्ये काही जागा नाही आहे" ..... सोनिया


"

सोनिया....." ...... अर्जुन जोराने भिँतिवर हात मारत बोलला....

 

त्याच्या आवाजाने माहि सुद्धा दचकली..


"

इनफ नाऊ... .... मी तुला खरं काय ते बोलायला सांगितलं होतं.......... ती चोर नाही आहे" ........अर्जुन

 

त्याच्या या वाक्याने माही आश्चर्यचकित होत अर्जुनकडे बघत होती...... म्हणजे सरांचा माझ्यावर विश्वास आहे....... माहीला मनातून आनंद झाला होता...


"

अर्जुन प्लीज काम डाऊन...... तू काय इतका रिॲक्ट होत आहेस??.... ते पण या दोन कवडीच्या मुलीसाठी...... तू माझ्यावर ओरडतो आहेस???....... कोण आहे ती तुझी.... तिच्यासाठी तू माझा इन्सल्ट करतो आहेस?" ......... सोनिया


"

तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही आहो..... ती माझी एक प्रामाणिक स्टाफ आहे..... आणि मला माझ्या ऑफिसमध्ये चुकीचं झालेलं काहीही सहन होत नाही..... हे तुला चांगलंच ठाऊक आहे....... मी हे सगळं पूर्ण स्टॉप समोर करू शकत होतो...... पण तू इथली खूप जुनी एम्प्लॉइ आहे आणि मी तुला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो तू अशी नाही आहे,  म्हणून मी तुझा मान ठेवून तुला इथे आत मध्ये केबिनमध्ये बोलावलं तर बऱ्या बोलाने खरं काय ते सांग मला ओरडायला लावू नकोस" ...... अर्जुन

 

ती दोघं काय बोलत आहेत महिला मात्र काहीच कळत नव्हतं , ती त्या दोघांकडे फक्त बघत होती आणि त्यांचं बोलणं ऐकत होती...

 

आता सोनिया घाबरली...... माही समोर अर्जुनच तिला बोलणं सोनियाच्या खूप जिव्हारी लागलं.......पण आता जर प्रकरण सांभाळून नाही घेतलं तर अर्जुन काहीही करू शकतो... कदाचित जमलेले लग्न सुद्धा मोडेल हे सोनियाला कळले होतं......


"

सॉरी माही...... मी ठेवलं होतं तुझ्या बॅगमध्ये हे नेकलेस....... मला तू आवडत नाहीस.... मला तू या ऑफिसमध्ये नको होती...... म्हणून मी हे सगळं केलं...... माझं अर्जुन वर खूप प्रेम आहे........ मला इंसिक्युर वाटलं..... म्हणून मी तसं केलं" .... सोनिया माही जवळ जात बोलली........

 

सोनियाच्या बोलण्याने आता माहिसुद्धा नरमली होती.....

 

अर्जुन तिथेच सोनियाच्या मागे उभा होता....


"

ठीक आहे सोनिया मॅडम " ..म्हणत माही ने  सोनियाला हग केलं.... अर्जुन सरांसाठी तुमच्या शिवाय दुसरं कोणीच बेस्ट असू शकत नाही..... अर्जुन कडे बघत  माही बोलली,


अर्जुन सुद्धा

माहीकडे बघत होता..... तिच्या या वाक्याने त्याला वाईट वाटले होते...माही तिथून निघून गेली..


"

बेटर नाऊ...... तू स्वतः तिला सॉरी बोलली..... मला तुझं हे वागणं अजिबात आवडलं नाही आहे ...मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती.....दुसरा कोणी असता तर मी त्याला आत्ताच्या आत्ता ऑफिस मधून काढून टाकलं असतं." ... अर्जुन रागात बोलत होता


"

सॉरी अर्जुन.... मी असं नव्हतं वागायला हवे होते ..... माही खूप चांगली आहे.... मी तिच्या बद्दल खूप खूप गैरसमज करून घेतला........ मी स्वतःच हे ऑफिस सोडून जाईल" .....सोनिया


"

As you wish" ........ अर्जुन ....आणि तो सोनियाकडे दुर्लक्ष करत आपलं काम करत बसला


सोनियाला

त्याचं हे वागणं खूप मनाला लागलं होतं..... तिला वाटलं की कंपनी सोडून जाण्याबद्दल बोलेल तर अर्जुन तिला थांबवेल पण अर्जुन ने तसं काही केलं नव्हतं...... ती त्याच्या केबिन मधून बाहेर चालली गेली

 

सोनियांनी महिला तिच्या केबिनमध्ये बोलावलं....


"

सोनिया मॅडम तुम्ही बोलावलं मला?" ....माही


"

माही खरच मनापासून खूप सॉरी.... माझ खरच खूप चुकलं...... तू खूप चांगली आहेस , तु मला मोठ्या मनाने माफ केलं त्याबद्दल धन्यवाद...... पण मी तरी काय करू माझा अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि मला असं वाटलं की अर्जुन तुला जास्ती अटेन्शन देतो आहे...... मला वाटलं अर्जुन तुझ्यामुळे माझ्या मध्ये इंटरेस्ट घेत नाही आहे...... मी आता हे ऑफिस सोडून जात आहे" ..... सोनीयाची डोळे पाणावले होते


"

नाही सोनिया मॅडम,  तुम्ही अस अर्जुन सरांना सोडून जाऊ शकत नाही....... तुमच्या शिवाय त्यांच्याजवळ कोण आहे? ...... तुम्ही त्यांची फार जुनी मैत्रीण आहात.....आणि आता तर तुमचं लग्न सुद्धा फिक्स झाला आहे,  तर तुम्ही असे सोडून जाऊ शकत नाही...... तुमच्याशिवाय अर्जुन सरांना दुसरी कोणी चांगलं मुलगी भेटू शकत नाही...... प्लीज तुम्ही जाऊ नका"  .... माही ्सोनिया ला समजावत होती


"

माही तु खूप चांगली आहे,  खूप निरागस आहे अशीच रहा.... पण मला मात्र जावं लागेल आता...... अर्जुन ने सुद्धा मला थांबवलं नाही" ....सोनिया


"

नाही मॅडम,  ते आता रागात आहे म्हणून काही बोलले नाही..... राग शांत झाल्यावर ते बोलतील तुमच्यासोबत... तुम्ही असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका" .... माहि


"

तो नाही थांबवणार  मला ....मी त्याला चांगली ओळखते... मी उद्याच सगळं हॅण्डओव्हर करून युकेला निघून जाईल" .....सोनिया


"

अर्जुन सरांनी थांबवलं तर थांबाल?" ...... माही


"

तो नाही थांबवणार माही....... अन हो त्याने थांबवलं तर नक्कीच थांबेल" .......सोनिया


"

सर थांबतील तुम्हाला..... आता हसा बघू आणि हे जायचं डोक्यातून काढून टाका" ..... माही

 

सोनिया ने  तिला स्माइल दिली.... माहि तीच्या केबिन मधून बाहेर निघून आली


"

सोनिया मॅडम अशा जाऊ शकत नाही.... त्यांचं  लग्न जमले आहे अर्जुन सरांसोबत...... त्यांच्याशिवाय चांगली मुलगी अर्जुन सरांना भेटणार नाही...... हुशार तर आहेस त्या ..पण मुख्य म्हणजे त्यांच खुप प्रेम आहे  अर्जुन सरांवर....... मला एकदा सरांसोबत बोलायलाच पाहिजे" ..... विचार करत ती अर्जुनच्या कॅबिनसमोर उभी होती..... अर्जुन तिला केबिनमधून बघत होता


"

ह्म्म्म.....आली सोनिया ची वकील" .......अर्जुन मनातच तिला बघत विचार करत होता


"

मिस माही तू आत मध्ये येऊ शकते" ....... अर्जुन बोलला

 

माही आत मध्ये गेली.......


"

तुला दरवाजा नॉक करायचा कंटाळा येतो का??....की. तुझी एनार्जी वेस्ट होते?" ..... अर्जुन


"

ह.....?" .. माही


"

बोल काय बोलायला आली होती" .......अर्जुन


"

सर ते सोनिया मॅडम,  ऑफिस सोडून चालल्या उद्या" .....माही


"

हा...... माहिती मला मग?" ....अर्जुन


"

सर तुम्हाला सोडून चालल्या आहे ....... तुम्हाला कसं काही वाटत नाही आहे" ..... माही


"

ती तिच्या मर्जीने चालली आहे,  मी तिला जा म्हटलं नाही....... तसंही मी कोणावर माझी मर्जी लादत नाही." .......अर्जुन माहिकडे एक कटाक्ष टाकत फाईल मध्ये बघत बोलला..

 

त्याच्या वाक्याने माहि थोडी गोंधळली..... पण परत तिने आपला मुद्दा धरून ठेवला


"

सर पण तुम्ही त्यांना थांबवलं सुद्धा नाही ना? .... सर तुम्ही त्यांना थांबवाल तर त्या थांबतील सुद्धा" ...माही


"

तिला जायचंय , जाऊ दे" .....अर्जुन


"

सर तुम्ही असं कसं करू शकता? ...... तुमचं लग्न जमले आहे त्यांच्यासोबत...... घरच्यांना किती वाईट वाटेल..... घरच्यांना सगळ्यांना किती त्रास होईल...... सोनिया मॅडम खूप प्रेम करतात तुमच्यावर,  त्यांना पण खूप त्रास होईल" ........माही


"

इनफ माही" ........ तो उठून तिच्या जवळ जात बोलला.


"

तुला सगळ्यांच्या त्रासाचे दिसते ना? ....... तुला सगळ्यांचे मन कळते.......... तुला फक्त माझं मन कळत नाही??...... आय डोन्ट केअर ज्याला जिथे जायचे तो जाऊ शकतो...... यू मे गो नाऊ" ....... अर्जुन चिडत बोलला

 

माही चुपचाप तिथून निघून गेली....

 

********

 

दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफीस मध्ये आला...... केबिन बघून तो अवाक् झाला....

 

 

 

 

त्याच पूर्ण केबिन plants नी भरले होते....तो plants जवळ गेला ....तिथे त्याला एक नोट दिसले

" प्रिय अर्जुन सर"  .....सर कट केलेले

" मला माहिती आहे माझं चुकलं....फक्त एकदा मला माफ करा.....मी तुमच्या शिवाय राहू शकत नाही...एकदाच मला थांबाऊन घ्या .....प्लीज...
तुमचं झाडांवर खूप प्रेम आहे आणि माझे तुमच्यावर, म्हणून हे गिफ्ट पाठवले आहे .... अपेक्षा करते तुम्हाला आवडले असेल
I Love you

फक्त तुमचीच
सोनिया

अर्जुनला ते वाचून त्याचा चेहऱ्यावर स्मायल आले...
"कुठल्या मातीची बनली आहे तू माही" ....मनातच विचार करत तो सोनियाचा केबिनमध्ये गेला

सोनिया केबिन रिकाम करत होती....माही तिला समजावत होती...
" मॅडम हे काय करताय तूम्ही..... अर्जुन सर येतील .... थोडी वाट तर बघा" ..... माही

" माही I know तो नाही येणार .....तो स्वतः कुणाला कशाची कमिटमेंट देत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा कशाचा फोर्स करत नाही" .......सोनिया

" सोनिया तू कुठेही जात नाही आहेस" ......म्हणत अर्जुन केबिन मध्ये आला

" पण.......अर्जुन...........?" ...सोनियाचा मनातून तर खूप आनंद झाला होता....नी आश्चर्य पण वाटत होते ...

" I said you are not going anywhere......and that's final" ...... अर्जुन माही कडे बघत बोलला

सोनिया ला खूप आनंद झाला....ती अर्जुन ला हग करत त्याच्या गळ्यात पडली.....त्याने पण तिला कमरेवर हाथ ठेवत एका हाताने तिच्या पाठीवर थोपटले........नी माही कडे बघत होता.....माही सुद्धा त्याच्याकडे बघत होती

" नाऊ हॅपी" ........अर्जुन माही कडे बघत सोनिया ला बोलला

" Yes अर्जुन ... खूप.... Love you" ...... सोनिया

ते बघून माही चा डोळ्यात पाणी आले.....इथे आता आपली  गरज नाही विचार करत ती तिथून जायला मागे फिरली...

" माही." ....अर्जुन

माही अर्जुन चा आवाजाने मागे वळली

" गिफ्ट चांगलं आहे"  .....अर्जुन

" कोणत गिफ्ट?" ....सोनिया

" नथिंग सोनिया" ....अर्जुन

जाउ दे आपल्याला काय करायचं विचार करत सोनिया परत अर्जुनला बिलगली

" यांना कस कळलं की ते गिफ्ट मी पाठवले आहे?"  ....विचार करतच माही कसनुस स्मायल करत बाहेर गेली

" हिला काय झालं आता रडायला? ....तिचीच तर इच्छा होती मी सोनियाला थांबवावे" .....अर्जुन मनातच विचार करत होता....अर्जुन केबिन मध्ये परत आला नि plants बघत होता......

" Wow...very nice plants भाई........पण तू ऑफिस मध्ये का केले ऑर्डर,?" ........आकाश अर्जुनचा केबिन मध्ये येत समोर ठेवलेले plants बघून बोलला..

" ह्म्म...gifts" ...... अर्जुन

" क..... काय......?...तुला कोणी गिफ्ट पाठवायची हिम्मत केली? .......पण ज्याने पण गिफ्ट केलेय ...तुला चांगलाच ओळखतो.......looks like the person really likes you" ........,आकाश अवाक् होत बोलला

" ह्म्म" .....अर्जुन

" भाई कोणी पाठवलं?" .....आकाश

" आकाश.........काय काम होते? ....का आला इकडे?" .....अर्जुन

आकाश ला कळलं ...अर्जुन ला पुढे बोलायचं नाही....आणि मग ते कामाचं डिस्कस करत होते.....अर्जुनच्या डोक्यात मात्र आकाश चे बोलणे फिरत होते.... .." that person really likes you...."

*****

त्या दिवसापासून माही आणि सोनिया खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या....सोनिया बऱ्याच गोष्टीत माहीची हेल्प घ्यायची.... तिला माहिती होत शंतिसदन मध्ये सगळ्यांना स्पेशली आजीला माही आवडते....त्यामुळे बऱ्याच गोष्टी ती माही कडून शिकत होती...

" काय मुलगी आहे ........ मी सोडून सगळे हीचे फ्रेंड्स झालेत" ......माही सोनियाची bonding बघून तो विचार करत होता....

****

क्रमशः
      

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️