Login

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 93 (अंतिम)

माही अर्जुन

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 93

भाग 93

           अर्जुनने सोन्याचा अंगठीने माहीच्या भांगेमध्ये कुंकू भरले. तो जागेवरून उठून तिच्या मागे जाऊन उभा राहिला , थोडा खाली वाकला आणि आपल्यात दोन्ही हाताने मंगळसूत्र तिच्या पुढे धरले , माहीने वळून त्याच्याकडे बघितले , तो पण तिच्या डोळ्यात बघत होता , तिच्या डोळ्यात आनंदाने तारे लुकलुकत होते . तो हसला, तिने परत मान सरळ केली. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्या बाजूला येऊन बसला. गळ्यात मंगळसूत्र पडले आणि साता जन्माचे नाही जन्मोजन्मीचे एक अतूट नातं निर्माण झाल्याचे फिलिंग माहीला जाणवत होते. अर्जुन पूजा करता करता अधूनमधून तिच्याकडे बघत होता , जगातील सगळ्यात सुंदर नववधू ती दिसत होती . सौभाग्याचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होते . आज ती पूर्ण जगासाठी मिसेस माही अर्जुन पटवर्धन झाली होती, अर्जूनची राणी झाली झाली होती . 

          माहीने एका हातात आपले मंगळसूत्र पकडले होते तर दुसरा हात अर्जूनच्या हाताला लावला होता आणि होम वगैरे सुरू होते . लग्नाच्या पुढल्या सगळ्या विधी आटोपल्या होत्या. अर्जुनची कान पिळणी सुद्धा झाली होती. 

" अर्जून पटवर्धन यांचा कान परत नाही भेटायचा , जिजाजी सोडू नका , आपल्या बहिणीच्या सुखासाठी सगळं मागून घ्या !", आकाश हसत बोलला.

" हो हो नक्की , अशी सुवर्ण संधी परत नाही यायची ! ", आशुतोष हसत बोलला. त्यावर अर्जुन हसला. 

" वर्षातून एकदा फुल फॅमिली ट्रीप , एक आठवड्याची ? ", आशुतोष अर्जून ला म्हणाला . 

अर्जून ने हसतच मान हलवली. 

" Without laptop and phone !", आशुतोष पुढे बोलला. 

" व्हॉट ?" , अर्जून एकदम अजब नजरेने त्याचाकडे शॉक झाल्यासारखा बघत होता .. ते बघून सगळ्यांना खूप हसू आले. 

" माही , बरोबर ना ?" , आशुतोष म्हणाले. 

" हो हो , एकदम बरोबर !", माही अर्जूनकडे बघत हसतच बोलली. अर्जूनचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 

" Yess , बोला मान्य की नाही ? बाकी मला भारी मजा येतेय कान पकडायला , ओ मिस्टर फोटोग्राफर exclusive फोटो आला पाहिजे , न्यूज मध्ये खूप पैसे मिळतील !", आशुतोष ने मस्करी केली … परत सगळे हसू लागले. 

माही कडे बघत अर्जून ने होकार दिला … ते ऐकून आशुतोष आणि माहीने एकमेकांना टाळी दिली. 

" माही , आणखी काही agreements साइन करायचे आहेत काय ? सांग , पटापट करून घेऊ !", आशुतोष हसत म्हणाला. 

" What? Agreements ?", अर्जून 

" तुला तिच भाषा कळते रे , तू थांब , माहीला बोलू दे !", आशुतोष ,ते ऐकून अर्जुनाच्या डोक्यावर आठ्या पडल्या. 

" हो हो , महिन्यातून एकदा मूव्ही बघायची , बाहेर नाही गेले तरी चालेल, घरच्याच थिएटर मध्ये ", माही म्हणाली. 

" No !", अर्जून 

" फोटोग्राफर दादा , more exclusive photos pls !", आशुतोष ने आवाज दिला.

" कशाला बिचाऱ्या माझ्या नातवाला त्रास देत आहात ?", आजी अर्जूनकडे बघत हसत म्हणाली. 

" बिचारा ? ", माही आशुतोष एकसाथ म्हणाले. 

" नाही वाटत तो बिचारा, मला माहिती !", आजी त्यांना हाय फाय देत बोलत तिथून बाजूला जाऊन बसल्या . 

" Okay !", अर्जून म्हणाला. 

" इंग्लिश नाही , मराठी आणि हिंदी मूव्ही !", माही 

" Okay !", अर्जुनने बेबस नजरेने आशुतोष कडे बघितले आणि होकार दिला. 

" सणासुदीला कुर्ता घालायचा जसा आता घातला आहे !", माही 

बिचाऱ्या नजरेने अर्जून आजूबाजूला सगळ्यांकडे बघत होता . घरच्यांना त्याला बघून खूप हसू येत होते, सगळे आशुतोष , माही आणि अर्जुन मध्ये सुरू असलेली डील खूप एन्जॉय करत होते. 

" अरे तू खूप हँडसम दिसतो आहे यात , म्हणून म्हणतेय ती ", आशुतोष 

" हो , भयंकर गोड दिसतात आहेत ", माही लाजयाचे नाटक करत म्हणाली. 

" Okay !", अर्जुन 

" आणि डान्स ….."

"Shut up ! ", अर्जुन 

" तू एकट्यात सापडणार आहेस , लक्षात ठेव ", माहीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधी अर्जून धमकीच्या सुरात म्हणाला .. ते ऐकून आशुतोष ला खूप हसू येत होते , पण त्याने आपलं हसू दाबून ठेवले होते . 

" ते… ते मी करून घेईल ! ड्र्याक्युला ! ", माही 

" Now better !", अर्जूनला तिला बघून हसू येत होते. 

" अरे कूछ ना , लग्नानंतर बायकोच्या इशाऱ्यावर नवरा नाचतच असतो , म्हणजे त्याला नाचावेच लागते , हो ना अनन्या ?", आशुतोष 

" काय ? मला काही ऐकू नाही आले !", अनन्या म्हणाली , ती त्यांच्यापासून थोडी दूर बसली होती .

" काही नाही , तू फक्त हो म्हण !", आशुतोष अनन्या ला म्हणाला.. त्यावर अनन्या ने हो म्हटले. ते ऐकून अर्जुन ला खूप हसू आले .

 " Girls will be girls only !" , अर्जून म्हणाला. 

" ना , याला म्हणतात बायकोचा विश्वास !", माही म्हणाली. 

" Okay madam !", अर्जून हात जोडत माही पुढे मान झुकवली . माही खुदकन हसली. 

         अशाप्रकारे आशुतोष ने अर्जून कडून अगदी सगळे मनवून घेतले होते , तो पर्यंत त्याने अर्जुनचा कान सोडला नव्हता… सगळे खूप हसत होते. 

        अर्जुनच्या उपरण्याची आणि माही घेतलेल्या शेल्याची गाठ घट्ट झाली होती , कधीही , कुठल्याही परिस्थितीत न सुटण्यासाठी. बाहेर येऊन नारायण देवतेची पूजा करून त्याचा सुद्धा आशीर्वाद घेतला होता . 

       लग्नाच्या सगळ्या विधी आटोपल्या होत्या. आता विहिनीच्या पंगतीची तयारी सुरू होती . माही परत कपडे बदलून आली होती. माहीने बेबी पिंक कलरला डार्क रेड गोल्डन काठ असलेली सिल्क ची साडी नेसली होती , साधीशी हेअरस्टाईल , गळ्यात छोट मंगळसूत्र , एक नेकलेस , आणि लांब मंगळसूत्र , सौभाग्यवती रुपात ती फारच देखणी दिसत होती , अगदीच तिला बघत राहावं अशीच. अर्जुनने सुद्धा कॅज्यूआल ड्रेसअप केले होते . 

    विहिनीची पंगत सजली होती , ताटात पंचपक्वान्न च्या राशी सजल्या होत्या. पटवर्धन परिवार जेवायला बसले होते आणि माहीच्या माहेरचा परिवार सगळ्यांची खातिरदारी करत होते. तरुण मंडळी माही अर्जूनच्या भोवती जमली होती, आणि अर्जून माहीला नाव घ्या नाव घ्या करत गोड घास भरवायचा आग्रह सुरू होता . 

" माही !", अर्जून ने नाव घेतले आणि माहीला तिच्या फेवरेट जीलेबीचा घास भरवला . त्याची नाव घेण्याची पद्धत ऐकून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. 

       आता सगळे उण्यासाठी माहीच्या मागे लागले . माहीने उखाणा घ्यायला सुरुवात केली , दोन ओळी झाल्या , चार ओळी झाल्या , आठ ओळी . उखाणा संपायचा नावंच घेत नव्हते… सगळे तिचा उखाणा एन्जॉय करत होते , अर्जुन मात्र अजब , बिचाऱ्या नजरेने बघत होता , त्या उखाण्यात माही इतके भारी भारी अलांकरित शब्द वापरत होती की ते सगळं अर्जूनच्या डोक्यावरून जात होते , पण बाकीचे लोक मात्र तिचा तो उखाणा एन्जॉय करत होते . जवळपास एक अख्खी कविता म्हणून झाली होती आणि अर्जून चे नाव घेत माही ने उखाणा पूर्ण केला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.  

" हे काय होते ?", अर्जून 

" तुझं नाव !", अनन्या हसत म्हणाली. 

" याच्यापेक्षा तर ड्रॅक्युला चांगलं होतं , शॉर्ट अँड स्वीट !"", अर्जुन

" ही ही ही …. स्पेशल आहे ड्रॅक्युला , तर स्पेशल उखाणा होता ! तिने समतोल साधला, तू एका शब्दात नाव घेतले तर , तिने भरपाई केली ", आशुतोष  

आशुतोषच्या बोलण्यावर माहीने हसतच होकारार्थी मान हलवली. 

" Great !", अर्जून भुवया उंचावत म्हणाला. 

" आता घास भरव !", अनन्या 

माहीने कारल्याचा भाजी पोळीचा घास अर्जून ला भरवला. 

" कारले? अगं गोड काहीतरी भरवायचे असते ना ?", अनन्या 

" तुमचा भाऊ आहेच का…….म्हणजे माझे फेवरेट अर्जुन आणि त्यांचे फेवरेट कारले . जे आवडते ते द्यायला हवे ना !बघितलं ना , गुलाबजाम घेत होते तर चेहरा कसा केला होता यांनी , परत धमकी देतील काही ", माही 

" हा हा हा …. " 

          जेवण वगैरे सगळं आटोपले होते. आता पाठवणी ची वेळ झाली होती . त्याची तयारी सुरू होती .

" किती बकेट आणायच्या ? नाही म्हणजे पूर वगैरे यायचा !", आशुतोष माहीची मस्करी करत बोलला. 

" रडण्याचे दिवस गेले आता !", माही हसत म्हणाली. 

" रडवण्याचे सुरू झाले !", आशुतोष आकाश ला हाय फाय देत अर्जूनकडे बघत म्हणाला . 

" आता फक्त हसण्याचे दिवस !" , माही 

" म्हणजे तू आता रडणार नाही आहेस ?", आशुतोष

" नाही , आपल्या घरी जातांना रडायचं कशाला ? मी तर हसत हसत जाईल . आता तर मला माझं घर मिळाले आहे , माझं घर . ध्रुवपदा सारखं माझं हक्काचं घर . अभी तो और आशियाने बनेंगे हमारे !", माही हसतच बोलली. 

" येह बात ! आयुष्यभर अशीच पॉझिटिविटी ठेव !", आशुतोष म्हणाला. 

      पाठवणी साठी निघायचं तर अर्जून चे बूट गायब होते , त्यांची शोधाशोध सुरू होतीच की मंजू अर्जूनचे शूज घेऊन समोर उभी होती . ती अर्जून माही जवळ गेली. 

" सॉरी ! " , मंजूच्या डोळ्यात अश्रू होते . सगळे शांत बघत होते. 

" मला माफ कर ताई , खूप दुःख दिले आम्ही तुला , खूप वाईट बोलले मी तुला , तरी सुद्धा तू माझाच विचार केला . तुझ्यामुळेच माझं भविष्य चांगलं होत आहे . पण मी मात्र तुला साथ नाही देऊ शकली. ", मंजू रडत रडत बोलत होती . 

" तुझं दुःख , तुझा त्रास तर कमी नाही करू शकले , कमीत कमी चांगलं बोलून तुला धीर सुद्धा नाही देऊ शकले , उलट सगळ्यासाठी तुलाच जिम्मेदार समजले . तुझी सोबत द्यायला हवी होती , पण आता फक्त पच्छतावा उरला . " , मंजू 

" प्लीज आम्हाला माफ करा ! मला हवी आहे माझी ताई ! " , मंजू अर्जूनकडे बघत , रडत बोलत होती . 

" आम्ही सगळ्यात मोठे गुन्हेगार आहोत ताईचे , प्लीज एकदाच माफ करा ! मला ताई हवी आहे , पूर्वी सारखी , माझा खूप लाड करणारी , मला माझी ताई हवी आहे " , मंजूने आपल्या ओढणी ने अर्जुन चे शूज पुसले आणि त्याच्या पुढ्यात खाली बसत त्याचे शुज त्याच्या पायांपुढे त्याला घालायला ठेवले. मंजू कळवळून बोलत होती. मंजुला बघून बरेच लोकं भाऊक झाले होते. अर्जूनला सुद्धा वाईट वाटले. त्याला ती त्याची श्रिया च वाटत होती . श्रिया ने सुद्धा किती चुका केल्या होत्या , किती काय काय बोलली होती , तरी त्याने श्रियाला माफ केले होते , मग मंजू सुद्धा लहान आहे , तिला सुद्धा नव्हतं कळत , ती तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे माही ला बोलली होती. आता अर्जुन ला सुद्धा ती त्याची लहान बहीनच वाटत होती. 

" एका अटी वर माफ करेल !", अर्जून म्हणाला. मंजूने होकारार्थी मान हरवली. 

" स्वत:चे अस्तित्व , स्वतःचे भविष्य , स्वतःचा आनंद जपण्यासाठी लढायची गरज पडली तर लढायचे . तू आता मोठी आहेस , स्वतःसाठी आवाज उठवायचा , जे बरोबर आहे त्यासाठी बोलायचं , कोणाच्याही दबावाला बळी पडायचे नाही , मग कोणीही असू देत , घाबरायचे नाही . आणि आम्ही नेहमी तुझ्या सोबत असणार आहोत , हे कायम लक्षात ठेवायचं !", अर्जुन मंजुला म्हणाला आणि तिने त्याच्या पुढे ठेवलेले शूज त्याने आपल्या पायात घातले. त्याचे शब्द ऐकून मंजुला आणखी रडू कोसळले , ती जागेवरून उठत होकारार्थी मान हलवत माहीला बिलगली. मनीष आणि माहीच्या आईला सुद्धा गहिवरून आले होते. मंजू सोबत आपण किती वाईट करत होतो हे माहीच्या वडिलांना सुद्धा कळत होते, आणि सगळ्यात जास्त तर तिच्या आईला वाईट वाटत होते कारण एक आई , एक बाई असून आपण इतके हतबल कसे वागू शकतो , आपण आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू नाही शकलो , आई बनण्यात आपण हरलोय हे आता त्यांना चांगलच कळले होते, स्वतः शीच नजर मिळवू शकत नव्हती. 

" Shh!! तुझा काहीच दोष नव्हता . तू अजूनही माझी छोटी मनुच आहे , आणि मी तुझी नेहमीच मोठी ताई असणार आहे. आता रडायचं नाही , सगळं छान छान होईल. " , माही तिचे डोळे पुसत बोलली . 

" मोठा बिजनेसमन आहे बाबा तुझा जिजा , terms and conditions शिवाय इथे काहीच होत नाही !", आशुतोष म्हणाला तसे सगळे हसायला लागले . 

" अंत भला तो सब भला !", सगळ्यांना हसतांना बघून आशुतोष ने डायलॉग मारला.

माहीने आनंदाने सगळ्यांसोबत गळाभेट घेतली. नंतर ती तिच्या आई जवळ गेली. 

" माही , आमचं खूप चुकले आहे , आता ते सगळं बोलून काहीच फायदा नाही , तुझी दुःख त्याने कमी होणार नाही . एक संधी दे , माफ कर आम्हाला , एकदाच फक्त. परत तुला कधीच दुखावणार नाही. ये ग कधी आपल्या घरी , माझं घरकुल पूर्ण कर , माझ्या तिन्ही मुलांसोबत मला आनंदाचे क्षण घालवायची संधी दे या आईला !", माहीची आई हात जोडत म्हणाली. 

शेवटी होती तर ती आई च , जरी चुकली होती तरी सुरवातीचे माहीच्या आयुष्याचे १७-१८ वर्ष आईने तिला जे संस्कार दिले, जे प्रेम ,जी काळजी घेतली , तिच्या साठी रात्र रात्र जागली होती हे तर नाकारू शकत नव्हते. आई होणं सोपं नाही हे तर माही ला सुद्धा कळले होते कारण ती पण आता एक आई होती . आईचे बोलणे ऐकून माहीने अर्जून कडे खूप आशेने बघितले , अर्जून ने सुद्धा होकारार्थी मान हलवली , शेवटी त्याचासाठी माहीची खुशी सगळ्यात महत्वाची होती . 

" हो आई , नक्की येईल !" , म्हणत तिने आपल्या आईला मिठी मारली. हसत आणि आनंदी वातावरणात माहीची पाठवणी झाली . 

       माहीच्या गृहप्रवेश ची तयारी झाली होती. लग्न तिथेच होते , म्हणून सगळे पाई चालतच घरी येत होते, लग्न मंडपापासून अर्जुनाच्या घराच्या मेन डोअर पर्यंत फुलांच्या खूप सुंदर अशा पायघड्या घातल्या होत्या , त्याच्या दोन्ही साईडने दिव्यांची आरास केली होती. सगळीकडे भरपूर रोषणाई केली होती. नेत्रदीपक असे ते सौंदर्य होते. माही अर्जुन दाराजवळ पोहचले. नलिनी ने दोघांचं औक्षावण केले. माही उंबरठा ओलांडणार तेवढयात परत सगळ्यांनी त्या दोघांना तिथेच अडवले . 

" दोघांनी पण नाव घ्यायचे , मग प्रवेश करायचा !", आजी म्हणाली. 

" परत ?", अर्जूनच्या माथ्यावर आठ्या पडल्या. 

" हो , तशी रितच असते !", आई , आजी एकासाथ म्हणाल्या. माहीने होकारार्थी मान हलवली आणि ती उखाणा घेणार तेवढयात अर्जुन बोलला. 

" आम्ही माही अर्जून म्हणजे माहीर्जून ,

  प्लीज येऊ द्या आता घरात , नमस्कार करतो सगळ्यांना वाकून !", अर्जुन हात जोडत म्हणाला. 

ते बघून सगळे हसायला लागले. 

" अर्जून ला खूप घाई झाली "

" हा हा , थकला तो आता " 

" थकलो नाही , पण माही मॅडम चा उखाणा सुरू झाला तर इथेच पहाट होईल आणि काय म्हणते आहे ते सगळं माझ्या डोक्यावरून सुद्धा जाईल ! ", अर्जून माही कडे बघत मस्करीच्या सुरात म्हणाला.  

" काय ? मी … मी काय इतकं बोर करते ? तुम्हाला बघून घेईल ! ", माहीने तिथेच त्याचा दंडावर दोन फटके दिले. 

" तुझाच आहे तो आता , खुशाल बघत बस ! ", अनन्या ने चिडवले. 

" बरं बरं , झालं काय तुमचं ? माही चल आता माप ओलांडून ये आतमध्ये. !", नलिनी 

              माहीने माप ओलांडले आणि तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश तिचा गृहप्रवेश झाला होता. 

       दिवसभर लग्नाची चांगलीच धावपळ झाली होती. थोड्या वेळ गप्पा गोष्टी , मस्ती , मस्करी सुरू होती. जेवण आटोपून सगळे लवकरच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी माही अर्जुन यांच्या हाताने सत्यनारायणाची पूजा सुद्धा छान पार पडली. आणि आता आली होती ती मिलनाची रात्र. अर्जूनची रूम खूप सुंदर सजवण्यात आली होती. माही अंजलीच्या रूम मध्ये मीराला झोपवत होती, सोबतच तिचे अंजली सोबत बोलणं सुरू होते. रोजच्या सवई प्रमाणे अर्जुन मीरा ला झोपवायचे म्हणून मीरा ला घ्यायला अंजलीच्या रूमकडे यायला निघाला, दाराजवळ पोहचला तर त्याला अंजली आणि माही चा बोलण्याचा आवाज येत होता. तो तिथेच थांबला. 

" ताई , भीती वाटते आहे !", माही 

" कशाची ?", अंजली 

" हे आता जे आहे !", माही 

" मधुचंद्र ?", अंजली

" हो ! " , माही 

अर्जून ने येवढे ऐकले , आणि अंजलीच्या रूमचा दरवाजा ठोठावला. दरवाजाचा आवाजाने दोघीही शांत झाल्या.  

" मिरा ला घ्यायला आलो होतो !", अर्जून 

" मीरा झोपली , तिला आज इथेच झोपू द्या !", अंजली म्हणाली. 

" Okay ! " , बोलून त्याने माहीकडे बघितले तर ती आपल्याच विचारात दिसली . एकदा तिच्याकडे बघून तो आपल्या रूमकडे निघून आला. त्याला गेलेले बघून अंजलीने आपलं बोलणं काँटिन्यू केले. 

" कशाची भीती वाटते आहे ? तू काय कधी त्यांच्या मिठीत नाही गेली की कधी तुम्ही किस नाही केले ? ", अंजली 

" असं नाही ग !", माही 

" मग ? त्यांनी कधी तुला आतापर्यंत कशाची बळजबरी केली आहे का ?" अंजली

" नाही , त्यांनी तर मला स्वतःहून लिपकिस पण नाही केले आहे , आतापर्यंत जे केले मीच केले आहे !", माही 

" मग , आता घाबरायचे काय आहे ?" ,अंजली 

" ताई , किस करणे , मिठी मारणे ते वेगळं ग , पण हे , आजचं , हे वेगळं आहे ना !", माही 

" अर्जुन सर , तुला त्रास होईल असं काहीच करणार नाही , ती काळजी नको करू !", अंजली 

" नाही ग तसं नाही , म्हणजे बघ माझ्या सोबत ते इतकं वाईट पद्धतीने घडले आहे की , मला तेच आठवते आहे . वारंवार माझ्या डोळ्यांपुढे तेच येत आहे. अर्जून sir तर नाही ग काही करतील , पण मलाच भीती वाटते आहे मी त्यांची बायको म्हणून पूर्णत्वाला उतरेल काय ? मला त्यांची पूर्णपणे बायको व्हायचं आहे , पण पुढला विचार नाही करवल्या जात आहे , त्याची भीती वाटते आहे. " , माही 

" काहीच विचार करू नको . अर्जून सरांच तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना , की त्याचा प्रेमाचा वर्षाव तुझ्यावर होईल ना , तर तूच आपोआप सगळं विसरून जाशील , ते तुझ्या नजरे समोर असल्यावर तुला दुसरे कोणी दिसणार नाही. प्रेमात इतकी जादू असते ना की आपोआप वाईटाचा , दुःखाचा विसर पडतो.त्यांचं पण पहिल्यांदाच लग्न झाले आहे , त्यांचेनोन काही स्वप्न काही अपेक्षा असतील आजच्या रात्रीच्या, ते पण वाट बघत असतील त्यांच्या बायकोची नको इतकी काळजी करू , positive फ्रेश मनाने जा त्यांचा जवळ , आजची रात्र खूप स्पेशल असते , ती असे फालतूचे विचार करण्यात घालवू नको. आणखी चांगली कशी होईल ही रात्र , याचा विचार कर !", अंजली. 

********

माही अर्जूनच्या रूम मध्ये आली होती. 

" हा, रूम तर एकदम स्वच्छ आहे, ताई तर म्हणे फुलांनी सजवलेली असेल . रोमँटिक वातावरण असेल , कँडल असतील .. इथे तर काहीच नाही . नेहमी प्रमाणे आहे सगळं . !", माही विचार करत अर्जून कुठे दिसतोय काय ते बघत होती . तर अर्जुन बाहेर बाल्कनी मध्ये सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसला होता. ते बघून माहीने डोक्यावर हात मारला. " हे आजपण कसं काय काम करू शकतात ? माही तू विसरलीच कशी , त्यांचं पहिलं प्रेम म्हणजे त्यांचं काम आहे … खडूस !" माही स्वत:शीच बडबड करत त्याचा जवळ गेली आणि त्याचा जवळ उभी होती. 

" माही , ये बस , मला थोडं काम आहे !", अर्जून ने माहीकडे बघून न बघितल्यासारखे केले आणि परत लॅपटॉप मध्ये घुसला. 

" हा , यांनी माझ्याकडे बघितले सुद्धा नाही . इतकी तयार झाले , ते पण यांच्यासाठी , आणि एक कौतुकाचा शब्द नाही ? पण ताई , श्रिया , सगळे म्हणाले होते मी सुंदर दिसते आहे , परी सारखी दिसते आहे , अप्सरा दिसते आहे , मग यांना कशी काय मी दिसली नाही . डोळे तर खराब नसेल झाले ? इतकं लॅपटॉप वर काम करत असतात , यांची नजर अंधुक तर नसेल झाली ?" , माही स्वतःशीच मनात बोलत त्याच्या पुढ्यात थोडी खाली वाकून त्याचा डोळ्यांचे निरीक्षण करत होती . 

" व्हॉट ?", अर्जून 

" ह , काही नाही … ते … ते काय करत आहात ,ते बघत होती. ", माही 

" खूप इंपॉर्टन्ट डॉक्युमेंट स्टडी करायचे आहे , आता एका तासात पाठवायचे आहे , एका महत्वाच्या डील चे आहेत !", अर्जून 

" आपल्या मधुचंद्र च्या दिवशी कोण काम करते ? मी विसरले कसे , हे अर्जुन पटवर्धन आहेत , हे कधीही काहीही करू शकतात , अजब रसायन आहे !", माही मनातच बडबडत त्याचा बाजूला बसली आणि त्याचे काम संपायची वाट बघत होती . 

     माही रूम मध्ये आली होती तेव्हाच अर्जून ने तिला बघितले होते , ती कमालीची सुंदर दिसत होती , अगदी तिला फक्त तिला बघत बसाव असेच त्याला वाटत होते. ती सुंदर दिसत असली तरी तिच्या चेहऱ्यावर त्याला थोडी भीती दिसत होती किंवा काहीतरी नकोसे असे काही दिसत होते . ते बघून , अर्जूनने जेव्हा अंजली माहीचे बोलणे ऐकले होते , माही ची भीती ऐकून त्याने सजलेली सगळी रूम स्वच्छ करायला लावली होती, ती सजलेली रूम मागून सुद्धा तिला काही वाईट गोष्टी आठवू नये , येवढाच त्याचा प्रयत्न होता. त्याला माहीवर कसलीच बळजबरी करायची नव्हती, आणि जबरदस्ती ने पुढे जाण्यापेक्षा हळूहळू उमलणारेच नाते त्याला हवे होते , त्यामुळे त्याला कसल्या गोष्टीची काहीच घाई नव्हती. म्हणून जोपर्यंत माही त्याच्या सोबत अगदी सगळ्या बाबतीत फ्री होत नाही तोपर्यंत अगदी नेहमीसारखं राहायचं त्याने ठरवले होते आणि म्हणूनच मग तो आपला लॅपटॉप उघडून बसला होता. 

         एक तास झाला , दोन तास झाले , तरी अर्जूनचे काम काही संपायच्या मार्गावर दिसत नव्हते. दिवसभर माही सुद्धा खूप थकली होती , त्यात ती शांत बसली होती , त्यामुळे बसल्या बसल्याच तिला झोप लागली आणि आपोआप तिचे डोकं अर्जूनच्या खांद्यावर पडले. अर्जूनने तिला झोपलेले बघितले आणि हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला , तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलेले आणि बेड वर आणून झोपवले. 

" आह ss !" माही झोपेतच थोडी कळवळली . 

       अर्जूनने वळून बघितले तर तिचे डोळे बंद होते , माहीचा हात तिच्या डोक्याजवळ होता , लक्ष देऊन बघितले तर तिला काहीतरी टोचत होते. तो तिच्याजवळ जाऊन बसला , त्याने तिला एका साईडला तिला कडावर केले , तर झोपेतच तिने त्याच्या गळ्यात हात घातला आणि त्याला पकडून झोपली. त्याने पण तिला एका हाताने आपल्या कुशीत पकडून घेतले. तिच्या केसांचा आंबाडा ला खूप गजरे लावलेले होते ,त्यात खूप साऱ्या पिना लागल्या होत्या . त्याच तिला टोचल्या होत्या . तिची झोपमोड होऊ नये म्हणून अगदी हळुवारपणे तो एक एक पिन काढत तिचे केस सैल करत मोकळे केले. 

" नेकलेस पण टोचत आहे !", अर्जूनला एक हळुवार आवाज आला. त्याने बघितले तर माही खूप प्रेमळपणे त्याचाकडे बघत होती. 

" तू जागी आहेस ?", अर्जून

" जागी झाले , ते गळ्याला टोचत आहे !", माही

अर्जुनने अलगदपणे गळ्यातले नेकलेस दूर केले. 

" गळ्यात आणखी दोन आहेत !", माही झोपाऱ्या अशा गोड आवाजात म्हणाली. आता तो सुद्धा तिच्या त्या गोड दिसण्यात हरवला होता, तिलाच बघत होता. 

"ते कंबरेला पण टोचत आहे ! ", तो असा हरवल्यासरखा झालेला बघून माही म्हणाली . 

" टोचत आहेत तर इतके सारे दागिने का घातले ? ", अर्जून 

" ते अनन्या ताई ने घालून दिले , त्या म्हणाल्या अर्जुन ला रात्रभर जागवायचे आहे !", माही 

" व्हॉट ?", अर्जून 

" ह्मम !", तो पपी फेस करत मान हलवत म्हणाली. थोड्या वेळ दोघेही एकमेकांकडे अजब नजरेने बघत होते , आणि अर्जून एकदम खळखळून हसायला लागला. त्याला हसतांना बघून ती सुद्धा हसायला लागली. 

" बरं , चल मग जागुयाच आज !", अर्जुन 

 माही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. 

" जा फ्रेश हो ,आणि रिलॅक्स वाटेल असे काही कपडे घाल, यात नीट झोप नाही होणार !", तिच्या अंगावरचे दागिने काढून देत तो बोलला. 

      माही फ्रेश झाली , त्याने तिला खूप सारे चॉकलेट्स दिले . दोघंही खूप वेळ गप्पा करत होते. गप्पा करता करता उशिरा कधीतरी माही त्याच्या कुशीत झोपी गेली आणि नवीन आयुष्याच्या गोड स्वप्नात रममाण झाली. तो पण तिला आपल्या जवळ घेऊन अगदी बिनधास्त झोपला. आता त्याला तिला गमावण्याची कसलीच भीती नव्हती, तिच्याकडे येणाऱ्या सगळ्या दुःखद वाटा त्याने पूर्णपणे ब्लॉक केल्या होत्या. 

**********

         ते दोघे मनाने कधीच जवळ आले होते , पण शरीराने जवळ यायला थोडा उशीर लागणार होता. कितीही प्रेम असले तरी काही गोष्टी इतक्या भयानक घडल्या होत्या, की त्याचे घाव अजूनही होते. पण अर्जून ने आपल्या प्रेमाने हळूहळू ते घाव भरून काढले होते, आणि मग एक दिवस ते पूर्णपणे एकमेकांत विरघळून गेले होते. 

       अर्जुन माहीचा सुखी संसार सुरू झाला होता . दोघेही अजूनही तसेच भांडत होते जसे ते आधी भांडायचे. माही त्याला नेहमीच खडूस आणि ड्रॅक्युला च म्हणत होती, तो सुद्धा ते एन्जॉय करत होता. घरात आनंदी वातावरण होते. अधून मधून मामी ची कुरकुर सुरू असायची. नलिनी ने मीरा ला पूर्णपणे स्वीकारले होते. मिरा आता मिरा अर्जुन पटवर्धन होती, ती शाळेत जात होती . श्रिया पुढले शिक्षण घेण्यासाठी अब्रोड गेली होती. आता तिने स्वतःला प्रेम सारख्या गोष्टींपासून दूर ठेवले होते. तिने पूर्ण लक्ष आपल्या करिअर आणि एज्युकेशन वर दिले होते, आणि लग्न आपल्या परिवारावर सोडले. घरच्यांनी पण काही घाई केली नाही . आकाश अंजली कडे गोड बातमी होती, दोघंही लवकरच आईबाबा बनणार होते. आशुतोष आणि अनन्याने रुही ला भावंडं हवे म्हणून एक मुलगी दत्तक घेतली होती. आशुतोष स्वतः अनाथ होता , म्हणून परिवाराचे महत्त्व त्याला माहिती होते . 

माहीचे आईवडील गावी राहत होते . माही कधीतरी जाऊन यायची . मंजूने पुढले शिक्षण सुरू केले होते , सोबतच ती नोकरी करत होती. स्वतसाठी खंबीरपणे उभी होती. मनीष सुद्धा जॉब करता करता शिक्षण घेत होता. माहीच्या आई वडिलांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा खूप पछतावा होता . झालेले तर ते बदलू शकत नव्हते , पण आता गावात त्यांनी मुलींचं शिक्षण , आणि त्यांच्या सेफ्टी साठी लागणाऱ्या गोष्टी , गावातील लोकांना शिक्षित करणयचे काम सुरू केले होते. आजी आणि नलिनी सांभाळत असलेले ड्रेस डिझायनिंग त्यांनी माहीच्या हवाली केले होते. आत्याबाई , आणि छाया माहीला ला यात मदत करत होत्या. Bridal dress designing चा जो फॅशन शो होणार होता त्यात माही आणि टीम ने पहिला क्रमांक पटकावला होता. आता माही ची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. माहीने आता आपले वेगळे ड्रेस डिझायनिंग चे फर्म सुरू केले होते. कुठेतरी तिला सुद्धा अर्जूनचे म्हणणे पटले होते की पैसा असला की पॉवर आपोआप मिळतो. आणि तिला पैसे आणि पॉवर या दोन्ही गोष्टींची गरज होती. 

       ज्या प्रमाणे अर्जून माही सोबत होता , म्हणून माही वाईट परिस्थतीतून बाहेर येऊ शकली होती , पण प्रत्येकाच्या नशिबी ऐकून असेल असे नव्हते. म्हणून तिने अशा मुलींसाठी अर्जुन बनायचे ठरवले होते. आणि हेच सगळं लक्षात घेत माहिने पीडित , एकट्या पडलेल्या मुलींसाठी आश्रम सुरू केले होते. तिथे त्यांनां पारिवारिक प्रेम , काळजी , एज्युकेशन आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मदत केली जात होती. ती तिथे त्या जंगलातल्या आजीबाई ला सुद्धा घेऊन आली होती , तिने त्यांना सगळं खरं खरं सांगितले होते. आजीबाई सुद्धा आनंदाने तिथे राहत तिथल्या मुलींना आजीच प्रेम देत होत्या. त्या मुलींच्या पाठीशी उभ्या. होत्या. या संस्थेचे नाव ठेवले होते " अर्जुन ". 

************

समाप्त 

*********** 

नमस्कार फ्रेंड्स 

       तू ही रे एक काल्पनिक कथा होती, त्याची मूळ लाईन बलात्कार , रेप ही होती . कथेत सगळं easily होत गेले, पण खऱ्या आयुष्यात ज्यांच्यावर हे वाईट प्रसंग आले आहे , त्यांच्यासाठी परत उभ राहणे ते इतकं सोपी नाही आहे. बलात्कार हा खूप मोठा गुन्हा आहे , मुलगी , बाई म्हणजे खेळणं नाही , याला प्रायश्शित नाही, याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे , नाहीतर हे घृणास्पद गुन्हा थांबणार नाही. 

            या कथेला आपण सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिले , नेहमी छान छान कॉमेंट्स करून प्रोत्साहन दिले त्यासाठी आपण सर्वांचे खूप खूप thank you . आणि माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी Sorry . 

        कथा कशी वाटली नक्की कळवा . कथेत तुम्हाला काय आवडले, काय नाही आवडले , कोणते पात्र आवडले ते पण नक्की नक्की कळवा, मी वाट बघते आहे. 

काळजी घ्या ! हसत राहा ? हसवत रहा ! 

परत एकदा Big thank you .