Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 92

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 92

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 92

 

भाग 92

 

         माहीने बघितलेली सगळी स्वप्न सत्यात उतरणार होती , आज ती गोड पहाट उगवली होती , कठीण असह्य दुःख नंतर सुखाची पालवी उमलली होती. माही ला तर रात्री नीट झोप सुद्धा लागली नव्हती , नवीन सुखाच्या आयुष्याची सुंदर सुंदर स्वप्न ती रंगवत होती . ती खूप खूप आनंदी होती. 

            माही ला पहाटे लवकर जाग आली . बाकी सगळे झोपले होते . माही उठून खिडकी मध्ये आली , पहाटेचे ती थंड फ्रेश हवा , मनाचा उत्साह आणखीच वाढवत होता . अजूनही बाहेर अंधार होता , पण छोटी छोटी लाईट्स टीमटीमत होती. त्या प्रकाश ती पहाट आणखीच लोभस वाटत होती , हवीहवीशी , रोज व्हावी अशीच . माहीने सभोवताल नजर फिरवली , आणि तिची नजर एका ठिकाणी जाऊन थांबली, तिच्यालग्नाचा तो मांडव. खूप कौतुकाने ती त्याच्याकडे बघत होती , थोड्या वेळाने तिथेच तिचे अर्जूनसोबत नवीन आयुष्य सुरु होणार होते.. ती मांडव चा प्रत्येक कॉर्नर निरखून निरखून बघत होती , ते बघतांना उगाच काहीतरी गोड गोड , लग्नाच्या विधी तिला आठवत होते , आणि ते आठवून तिच्या ओठांवर हसू पसरले . हसता हसता तिचे लक्ष अर्जूनच्या रूम कडे गेले , तर तिला खिडकी मध्ये उभा असलेला अर्जुन दिसला , आणि तो तिच्याकडे बघून हसत होता .

 

" हा , अर्जून पटवर्धन पहाटे पहाटे खिडकी मध्ये , ते पण हसत ? नाही नाही , इतक्या पहाटे ते का उठतील ? माही तू भ्रमिष्ट झाली आहे , आजकाल तुला सगळीकडे अर्जुन दिसत आहे . लग्नाची भयंकर उत्साह तुला आहे , त्यामुळे तुला झोप येत नाही आहे , सरांना थोडी असे काही आहे , ते तर त्यांचा वेळेवर उठतील ना ? परत मीरा पण त्यांच्याजवळ आहे , ते येवढ्या लवकर उठूच शकत नाही !", माही समोर खिडकीत दिसणाऱ्या अर्जूनकडे बघत विचार करत होती . 

 

इकडे माहीला स्मायल देऊनही माहीची त्यावर काहीच रिॲक्शन न बघून अर्जून ला अजब वाटले. अर्जून ने तिला हात हलवत हाय केले . 

 

" जागेपणी सुद्धा हे कार्टून झोपेत आहे !, झोप झाली नाही तर इतक्या लवकर उठायची काय गरज होती हिला ?", अर्जुन स्वतःशीच हसला.

 

नंतर अर्जुन ने तिला आपल्या दोन्ही हाताने हार्ट बनवून , आपल्या हार्ट जवळ पकडत नंतर तिच्याकडे केले .. 

 

" I love you !", माही त्याची सुरू असलेली अँक्शन बघून स्वत:शीच पुटपुटली . 

 

" हा !! म्हणजे हे खरंच उभे आहे तिथे !", माही आपले दोन्ही डोळे चोळत त्याच्याकडे बघत होती… 

 

" हा हा हा , स्वप्नात होते हे ध्यान !", अर्जुनला तिचं सुरू असलेले अजीब हातवारे बघून हसू आले … त्याने परत तीच सेम अँक्शन केली . 

 

" I love you ? ", माही त्याला आवाज जाईल असे जोरदार ओरडली...त्याने होकारार्थी मान हलवली . 

 

" माही काय झालं ? काही पाहिजे काय ? ", आत्याबाई तिचा आवाज ऐकून खाली खिडकी जवळ आल्या . 

 

" हा? काही नाही !", माहीला तिची चूक कळली होती, तिच्या आवाजाने लोकं जागे झाले होते .. 

 

" मग अशी पहाटे पहाटे ओरडत काय आहे ?", आत्याबाई 

 

" का…..काही नाही , ते ते … ", माही अडखळत बोलत होती , " आता आत्याबाईला काय सांगावं की सर तिकडून काय काय इशारे करतात आहेत …", माही स्वतः शीच बोलत होती . 

 

" लग्न अंगात आले हिचा !", आत्याबाई पुटपुटल्या , " जा थोड्या वेळ आराम कर , मग दिवसभर खूप दगदग होईल !", आत्याबाई बोलल्या तशी ती अर्जुन कडे एक नजर टाकत आतमध्ये गेली. अर्जून सुद्धा हसतच परत बेड वर जाऊन पडला . खरे तर आज त्याला सुद्धा नीट झोप येत नव्हती , त्यात आता पहाटे मिराची झोपेत चुळबुळ सुरु होती , झोपेत चुळबुळ करतेय म्हणजे तिला सुसू आली हे त्याला आता कळायला लागले होते . त्याने तिला उठवून बाथरूम मधून घेऊन आला होता. तिला झोपवून बाहेर बघतो तर माही खिडकीत उभी दिसली होती , आणि त्याला आपल्याच बायको सोबत फ्लर्ट करायची इच्छा झाली होती , आणि तो उगाच तिला छेडत होता. 

 

******

 

मांडव दारी सजला होता . एका बाजूने सनई चौघडा वाजवणारे अगदी पारंपरिक कपड्यांमध्ये एका लाईन मध्ये बसले होते . दोन्ही घरातील पारंपरिक कपड्यांमध्ये तयार झाले होते . रंगांची उधळण , सिल्क च्या साड्या , गजरे , मंतरलेले सुगंधित वातावरण , सनई चौघडे चे सुर त्यात मिसळत होते .खूप पवित्र प्रसन्न असे वाटत होते 

 

माही नववधू वेशात खूप सुंदर दिसत होती. मधल्या कळतील बायका जशा सजयाच्या अगदी चित्रपट नटी रेखा ,सारखी तयार झाली होती. टोमॅटो लाल शालू , तसेच मॅचींग ब्लाऊज , दोन्ही हातांवर घेतलेला हिरवा कंच शेला , हातात हिरवा चुडा त्यात पुढे सोन्याचे कंगण , केसांना गंगावण लावून खूप लांब अशी वेणी घातली होती , खांद्यावरून पुढे येणारे खूप सारे गजरे माळले होते. मधातून भांग काढून त्यात नाजूक बिंदी , कानात झुमके त्याला एक नाजूक सर जी कानापसून मागे नेत केसांमध्ये खोचली होती , पायात चांदीचे पैंजण , डोळ्यात काजळ , ओठांवर लाल मरुन शेड चे लिपस्टिक , लाल गोल टिकली त्याखाली छोटीशी हिरवी टिकली , आणि गळ्यात नाजूक नेकलेस. छूमुई ती खूप गोड अशी नववधू दिसत होती. छाया आईने येऊन तिची दृष्ट काढली आणि तिच्या कानाच्या मागे काजळाचा टीका लावला. 

 

 . तेवढयात माही ची आई सुद्धा तिथे आली . " माही , हे काही दागिने आहे , तुझ्यासाठी आणले !", माहीची आई तिच्या जवळ येत बोलली. 

 

" आई, अगं याची काय गरज होती , मी तयार झाली ग ! असू दे ते !", माही 

 

अगं , किती वेळ लागेल दागिने घालयाला , घे ग , तुझ्या हक्काचं आहे , तसेही तुझा शृंगार अपूर्ण वाटतो आहे , हे घाल ! ", आई 

 

हक्काचं शब्द ऐकून ती आई कडे बघत होती.

 

" अगं , हे बघ छान ठसठशीत नेकलेस बनवले तुझ्यासाठी , तू घातलेलं बघ किती साधं आणि बारीक आहे , हे घाल छान दिसेल !", माहीची आई म्हणाली. 

 

" आई , माहिती आमच्याकडे इतकं भारी नाही आहे , पण तुला माहिती , ही माझी आई आहे ना ( छाया कडे बघत ) , तिने हे खास करून माझ्यासाठी काढून ठेवले , माझ्या लहान मुलीसाठी ठेवते हे अशी म्हणाली होती . अंजली ताई चे लग्न होते ना , तर तिला सगळं दिले हिने , पण त्यातून तिने हे माझ्या लग्नासाठी काढून ठेवले , माझं लग्न करणे हे तिचे स्वप्न होते , आणि तिने ते तिचे कर्तव्य पण मानले होते, छोटेसे का नाही , पण तिने माझा तिच्यावर नसलेला कोणताच हक्क , तरी हक्क दिला ग मला. आणि हे कंगण , हे माहिती कोणाचे आहे? हे आत्याबाईंचे आहे . तश्या तर त्या माझ्या सतत मागे लागल्या असतात , कुरकुर करत असतात , पण आई जो प्रेम करतो त्याचा तर हक्क आहेच रागवायचा . तुला माहिती त्या आईला म्हणाल्या होत्या , अंजली तर मोठ्या घरीच जाते आहे , तिला भरपूर दागिने मिळतील , माहीच्या लग्नात माझ्या माही चे हात रिकामे नको , तर त्यांनी त्यांचे हे कंगण माझ्यासाठी जपून ठेवले , त्यांच्या लग्नाचे आहे खास . आई माझा शृंगार पूर्ण आहे , माझ्या आईचा , आत्याचा आशीर्वाद आहे त्यात , आणि जे उरले आहे ते पटवर्धन पूर्ण करतीलच की. आई , नातं हे नातं असते , रक्तचेच नातं जवळचे असते , खरे असते असे नाही आहे . मला माझी यशोदा आई खूप प्रिय आहे ! आई नातं हे नातं असते , रक्ताचेच नाते हे जवळचे नाते असते असे नाही आहे , नातं म्हणजे परस्थिती कशीही असली तरी ते नातं स्वीकारल्या जाते , दुःखात, वाईट परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभे असते , नाती रक्तापक्षा मनाने जुळलेले असावे . इथे माझं एकही रक्ताचे नाते नाही तरी माझी ही नाती सर्व श्रेष्ठ आहेत ! ", माही 

 

ते ऐकून तिच्या आईचा चेहरा थोडा उतरला. 

 

" माही घे ते , तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप हौसेने बनवले आहेत, त्यात त्यांचा आशीर्वाद आहे !",छाया माहीला दटावत म्हणाली. 

 

" बरं , मी घेते हे , पण आता नाही घालत, नंतर एखाद्या कार्यक्रमाला घालेल , आता फक्त तुझा आशिर्वाद दे !", माहीने ते दागिने घेतले आणि आपल्या बॅग मध्ये ठेऊन दिले. माहीच्या आईला माहीची नाराजगी कळली होती आणि तिचे म्हणणे सुद्धा पटले होते, आई वडील, बहीण भाऊ या नात्यांवर तिचा हक्क होता , आणि तोच हक्क तर तिच्याकडून हिरावून घेतला होता, त्या पुढे हे दागिने वगैरे सगळंच गौण होते. 

 

" बदमाश ! तर तू लपून आमचं बोलणं ऐकत , हा ?" , आत्याबाईने माहीच्या पाठीत एक धपाटा घातला. त्या वातावरण हलके करण्यासाठी बोलल्या. 

 

" मी इथून सासरी गेले ना , तरी माझी एक नजर सतत तुमच्यावर असेल. असा , इतक्या आरामात मी तुमचा पिच्छा नाही सोडणार आहे", माही आत्याबाई च्या गळ्यात पडत त्यांचे गाल ओढत बोलली. 

 

बाहेर बँडचा आवाज यायला लागला . 

 

" चला , वरात आली !", आत्याबाई बोलल्या आणि तिघीही जणी तिथून खाली मांडवदारी आल्या. माही सुद्धा पळतच खिडकी मध्ये गेली. अर्जून ची कार दारा पुढे आली होती. घोडीवर बसण्यासाठी सगळे त्याचा खूप मागे लागले होते , पण त्याला हे काय आवडत नव्हते, शेवटी तो अर्जुनच , त्याने कोणाचेच ऐकले नव्हते , पण मग सगळ्यांचा मान ठेवायला तो कार मधून देवदर्शनाला गेला होता , तिथूनच आता कार परत आली होती. माही वरती गॅलरी मधून खाली बघत होती . अर्जून खूप छान दिसत होता . पहिल्यांदा त्याने माहीचे ऐकून भारतीय पारंपरिक ड्रेस घातला होता, बाकी माहीने त्याला फार काही घालायचा आग्रह नव्हता केला, तिला माहिती होते त्याला असे कपडे वगैरे नाही आवडत , लग्न त्याचे सुद्धा होते त्यामुळे त्याचा सुद्धा आवडीचे व्हावे , असेच माहीला वाटत होते , जसे त्याने तिला कुठल्या गोष्टीचा फोर्स केला नव्हता तसेच माहिने सुद्धा त्याला कशाच जास्त फोर्स केला नव्हता. त्याने एकदम सिंपल क्रीमिष गोल्डन सेल्फ प्रिंट डिझाईन चा कुर्ता पायजमा घातला होता .आली फेटा, मुंडावळ्या सुद्धा पुजे पुरते बांधायचे असे सगळ्यांना सांगितले होते. तो साधासा तयार होऊनही, त्याचे ते राजबिंडे रूप सगळ्यांमध्ये उठून दिसत होते . तो कार मध्ये बसला होता आणि त्याच्या मांडीवर त्याची प्रिन्सेस बसली होती , ती सुद्धा छोटीशी गोडुली राजकुमारी दिसत होती. ही कदाचित अशी पहिलीच वरात असावी ज्यात नवरदेव आपल्या मुलीसोबत आपली दुल्हन घ्यायला आला असावा. माही तर भान हरपून त्याला बघत होती. अर्जुन कार मधून बाहेर उतरला. पुढे लग्नाचा बँड वाजत होता. सगळेच धमाल नाचत होते . अर्जुनाच्या कुशीतून उतरून मीरा सुद्धा रूही सोबत नाचायला पळून गेली. अर्जून गाडीला टेकून उभा होता आणि सगळे त्याच्या अवतीभोवती नाचत होते. जसे काही आता लग्नात नाचायला मिळणार नाही , तर आताच कसर पूर्ण करून घ्या , असाच आशुतोष आणि बाकीचे नाचत होते. अर्जून ला नाचायला मधात घ्यायची हिम्मत मात्र कोणात नव्हती . अर्जुन उभा सगळ्यांची मस्ती बघत होता, त्यांना बघून त्याला हसू सुद्धा येत होते. हसता हसता त्याचे लक्ष वर माही च्या रूम कडे गेले तर माही तिथे उभी त्याला बघतांना दिसली. तिला नववधू रुपात बघून तो तर पुरताच घाळ्याळ झाला . एकटक तिला बघत होता. माही ला त्याचाकडे बघतांना पहाटेची त्याची मस्ती आठवली.. आणि तिने त्याला सेम पहाटे तो त्याचा हाताने हार्ट शेप करून तिला I love you म्हणाला होता तसे तिने सुद्धा हाताने त्याला इशारा केला.. ते बघून तो गालाताच हसत स्वतःशीच लाजला , त्या लाजाऱ्या रुपात तो खूप गोड दिसत होता. 

तिथे सगळे असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नव्हते, तो फक्त तिला बघत उभा होता. 

 

" पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची !", आशुतोष चे मात्र लक्ष या दोघांकडे होते . त्याने बँड वाल्याचा कानात काही सांगितले आणि तिथून आतमध्ये पळाला. आणि माहीचा हात पकडत तिला खाली घेऊन आला, तरी रस्त्यात त्यांना माहीची आई भेटली. 

 

" अहो आशुतोषराव , तिला कशाला इथे ? आपल्याकडे वधू आपल्याच वरातीत नाचत नसते . लोकं काय म्हणतील ?", माहीची आई काळजीने म्हणाली. 

 

" लोकं काय म्हणतील वाले जे लोकं आहेत ना , त्यांना आपण लग्नाला बोलावलेच नाही आहे मावशी , त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि असं कुठे लिहिले आहे वधू नाचणार नाही , तिचं लग्न आहे तर नवरदेवाप्रमाणे ती सुद्धा आपली वरात एन्जॉय करू शकते , ती मुलगी आहे म्हणून का तिने आतमध्ये बसून राहावे ? लग्न एकदाच होते मावशी, जे आवडते ते करून घ्यायला हवे आणि मुख्य म्हणजे तिला नाचायला आवडते . मी म्हणतो , तुम्ही पण या !", म्हणतच तो माहीचा हात पकडत समोर सगळे होते तिथे घेऊन गेला , तसा एक इशारा झाला आणि अर्जुन उभा होता तिथे सगळ्यांनी दुतर्फा होत अर्जून पर्यंत पोहचायचा रस्ता केला . आता अर्जुन स्पष्टपणे माहीला दिसत होता , आणि माही त्याला. परत एक इशारा झाला आणि बँड चे गाणे बदलले. 

 

हीरिए सेहरा बाँध के मैं तो आया रे (हे या)

डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे (हे या)

 

आणि आशुतोष ने माहीच्या हाताला ओढत तिला अर्जूनच्या साईडने अर्जूनवर फेकले , त्यामुळे माही अर्जूनच्या छातीवर जाऊन आदळली आणि तिच्या माळलेल्या गजऱ्यांच्या सरींचा मारा अर्जूनच्या गालावर बसला. 

 

" Uff ! (काय बोलणार आता पुढे , तुम्हीच समजून घ्या त्याचा फिलिंग ) ", अर्जुनने तिला तिच्या कंबरेत पकडून तिला आपल्या जवळ घट्ट पकडून घेतलें . नेहमीप्रमाणे माहिने डोळे बंद केले , माहिने तिच्या सवयीप्रमाणे त्याची कॉलर पकडून घेतली होती. 

 

" इथूनच तर सुरुवात झाली होती , अगदी अशीच !", आशुतोष 

 

आशुतोष चे बोलणे ऐकून माहीने डोळे उघडले , आणि अर्जूनकडे बघत होती . माही अर्जून ला त्यांची नाशिकची पहली भेट आठवली , तेव्हा सुद्धा माही त्याचावर आदळली होती. नंतर दुसऱ्या भेटीत पण माही स्टेज वरून डायरेक्ट त्याच्या कुशीत पडली होती आणि हा पडापडीचा , आणि सांभाळण्याचा सिलसिला पुढे सुरू राहिला होता . ते सगळं आठवून दोघांच्याही ओठांवर हसू उमलले, दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागले… 

 

" तुझको तो बस मेरी होणी रे

तैनू ले के मैं जावांगा

दिल दे के मैं जावांगा …" 

 

सगळे बँड सोबत ओरडले , तसे माहीने लाजून आपला चेहरा परत त्याचा छातीजवळ लपवून घेतला… 

 

आता तर नाचायची धमाल मस्ती सुरू झाली. माही अर्जुन मध्ये , आणि सगळे त्यांच्या भोवती. आशुतोष ने अर्जुन माहीला डान्स साठी म्हटले . अर्जुन तर जागीच उभा होता . आशुतोष ने माही ला गॉगल दिला, माहीने अर्जुन ला बघून डोळा मारला आणि गॉगल आपल्या डोळ्यांवर चढवला.. 

 

तेनू लेके मैं जावाँगी  

दिल दे के मैं जावाँगी 

 

माहीने अर्जुन भोवती फिरत अगदी सिंपल स्टेप्स पण कॉमेडी स्टेप्स केल्या होत्या , तिचं ते नाचणं बघून तर त्याला खूप हसू येत होते . 

 

आज मेरे यार की शादी है …. ऐसा लगता है पुरे संसार की शादी है …. लास्ट मध्ये ऑल टाइम हिट बँड वाजला . मुहूर्ताची वेळ झाली होती. अर्जून ने एकदा माहीकडे बघितले, तिला गोड स्मायल दिले आणि तिचा हात पकडला , आणि तिला घेऊन तो लग्न मंडपी चालायला लागला. माही सुद्धा चालता चालता फक्त अर्जूनकडे बघत होती , त्याचा चेहऱ्यावरचा त्याचा तो आनंद , त्याचे प्रत्येक भाव टिपत होती . दोघंही मध्यभागी जाऊन पोहचले. हातात हार दिले , दोघांमध्ये आंतरपाट पकडल्या गेला , चहू बाजूंनी मंगलाष्टकाचे सुर गुंजत होते. १-२-५-७-११ … तब्बल अकरा मंगलाष्टकं गायली गेली ( अगदी आजी पासून सगळ्यांनी मंगलाष्टक म्हणायची आपापली हौस पूर्ण केली होती ) 

 

" शुभ मंगल सावधान " , आणि आंतरपाट दूर झाला,त्या दोघांवर फुलांचा , अक्षदांचा वर्षाव होऊ लागला. अर्जुन माहीपेक्षा थोडा उंच असल्यामुळे माहीला त्याला हार घालतांना टाचा उंचाव्या लागत होत्या , पण तरीही तिला जमत नव्हते . अर्जुन तिच्याकडे बघून हसला आणि त्याने त्याची मान तिच्या पुढ्यात झुकावली. 

 

" गेला तुझा भाऊ ! अब कोई नही बचा सकता , झाला आता तो जोरू का गुलाम ", आशुतोष मस्करीच्या सुरात म्हणाला , तसा एकच हशा पिकला. माहीला सुद्धा आशुतोष चे बोलणे ऐकून खूप हसू आले होते. माही ने अर्जूनच्या गळ्यात हार घातला. नंतर अर्जुन ने सुद्धा तिच्या गळ्यात हार घातला. मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. 

 

नंतर स्पत्पदी आणि बरीच काही विधी होते. माही साडी बदलून आली होती. आता तिने ऑरेंज गोल्डन नऊवारी नेसली होती . गळ्यात मोठ्या मण्यांची कंठी माळ , मोत्यांचा तन्मनी , गळ्याला टाईट डिझायनर ठुसी , नाकात नथ , कानात मोठ्या कुड्या , केसांचा आंबडा , त्या भोवती फुलांची वेणी, तिने पूर्ण मराठमोळा थाट केला होता . अर्जुनने सुद्धा सेम रंगाचे सोवळ घातले होते , आणि गळ्यातून उपर्ण घेतले होते . त्याची फिट , कसलेली बॉडी , त्यावर हे सोवळ आणि उपर्न , तो भयंकर ऑसम दिसत होता. दोघेही होमहवन करण्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी पाटावर येऊन बसले. विधिंना सुरुवात झाली . आता कन्यादानाची वेळ आली . भटजींनी कन्यादान करायला आवाज दिला. माहीचे वडील पुढे यायला लागले. तेवढयात माहीने आशुतोष दादा म्हणून आवाज दिला. तसे पुढे जाणाऱ्या माहीच्या बाबांना तिच्या आई ने तिथेच थांबवले. 

 

" पण सख्खे असताना , परके कशाला ? ", माहीचे बाबा

 

" ते सख्खे आहेत , आपण कधीचेच परके झालो आहोत ! त्यांचाच हक्क आहे तो , करू द्या त्यांना ! आशुतोष राव तुम्ही करा कन्यादान! ", माहीची आई बोलली. ( माही च्या आईला मघाशी दागिन्यांच्या वेळी झालेला प्रसंग आठवला , आणि त्यांनी तिच्या बाबांना रोखले होते ). 

 

तसे आशुतोष आणि अनन्या माहीचे कन्यादान करायला पुढे गेले. कन्यादानाची विधी छान आटोपली. 

 

आता दोघेही सप्तपदी चालायला उठले , अगदी सगळ्या मंत्रांचा अर्थ समजून घेत दोघंही स्पत्पदी चालत होते . तसे तर या सप्तपदी चा अर्थ अर्जुनला केव्हाच समजला होता, आणि त्याने तिची साथ देत त्यांनी एकमेकांच्या सोबतीने चालणं पण सुरू केले होते . आज तर फक्त औपचारिकता होती. 

 

अर्जुनने सोन्याचा अंगठीने माहीच्या भांगेमध्ये कुंकू भरले. तो जागेवरून उठून तिच्या मागे जाऊन उभा राहिला , थोडा खाली वाकला आणि आपल्यात दोन्ही हाताने मंगळसूत्र तिच्या पुढे धरले , माहीने वळून त्याच्याकडे बघितले , तो पण तिच्या डोळ्यात बघत होता , तिच्या डोळ्यात आनंदाने तारे लुकलुकत होते . तो हसला, तिने परत मान सरळ केली. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्या बाजूला येऊन बसला. गळ्यात मंगळसूत्र पडले आणि साता जन्माचे नाही जन्मोजन्मीचे एक अतूट नातं निर्माण झाल्याचे फिलिंग माहीला जाणवत होते. अर्जुन पूजा करता करता अधूनमधून तिच्याकडे बघत होता , जगातील सगळ्यात सुंदर नववधू ती दिसत होती . सौभाग्याचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होते . आज ती पूर्ण जगासाठी मिसेस माही अर्जुन पटवर्धन झाली होती, अर्जूनची राणी झाली झाली होती . 

 

 

******

 

 

क्रमशः 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️