Jan 22, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 91

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 91

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 91

 

भाग 91

 

 

         संध्याकाळी सगळे तयार होऊन ठरलेल्या जागी जमले. तिथे गोलाकार अशी बसायची अरेंजमेंट केली होती. सोफा , खुर्च्या ठेवल्या होत्या , आणि मधोमध परफॉर्म करण्यासाठी एक छोटा गोलाकार स्टेज होता. सगळे आवडेल त्या जागेवर जाऊन बसले. अर्जून आणि माही साठी बसायला स्पेशल अरेंजमेंट केली होती. माहीने लाईट पीच कलरचा खूप घेरदार घागरा घातला होता , साजेसा मेकप , खूप गोड अशी ती बार्बी डॉल दिसत होती . अर्जुनने तिला मॅच असा शर्ट ब्लेझर असा गेटअप केला होता. दोघंही त्यांच्या जागेवर येऊन बसले , आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली . आशुतोष ने कार्यक्रमाची धुरा सांभाळली. अधून मधून तो जोक मारत आणि सगळी कडे हशा पिकत. एका बॉक्स मध्ये नावांच्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या , लहान मुलांकडून एक एक चिठ्ठी काढत होते , त्यात ज्याचे नाव यायचे त्याला बाकीचे जे काही सांगेल ते करून दाखवायचे होते. आकाश अंजली ला तर मामा मामी ची नकल करायला सांगितली होती . मनीष ने तर माहीचे बालपण साकारले होते . त्याने माहीच्या जन्मापासून चे ती सोळा सतरा वर्षांची असतानाचे सगळे फोटो प्रोजेक्टर वर लावले होते. रक्षाबंधन , दिवाळी , माही ने पहिल्यांदा आईची साडी नेसली ,असे अनेक फोटो होते .

 

" सो स्वीट !" , माहीचे फोटो बघून आपसुकच अर्जूनच्या तोंडून बाहेर पडले. 

 

अधून मधून प्रश्नोत्तरे सुरू होते. आता आशुतोष अर्जून माही जवळ आला . 

 

" अर्जून , तुला माही मध्ये काय आवडले ?" , आशुतोष 

 

" काहीच नाही !" , अर्जुन हसतच मस्करीच्या सुरात म्हणाला. ते ऐकून माही नाटकी रागात डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती . 

 

" माही ?" , आशुतोष

 

" ड्रॅक्युला !" , माही तोंड वाकडं करत म्हणाली . 

 

" हा हा हा ! " , अर्जुन हसायला लागला. " काहीच नाही , पण सगळं काही !" , अर्जून हसत बोलला. " मला तिचे डोळे सगळ्यात जास्त आवडतात , ते नेहमी खरं बोलतात !" , अर्जून पुढे बोलला. " मल तिचे डोळे वाचायला आवडतात !" 

 

माही त्याचाकडे बघत होती .. " खरं बोलतोय मी , तू ऑफिस मध्ये , किंवा जेव्हा पण माझ्या अवतीभोवती असली की किती गडबड करत होती , मला एक मिनिट सुद्धा खपत नव्हते , खूप राग यायचा , पण तुझ्या डोळ्यात बघितले की मला काहीतरी व्हायचं , तुझ्यावर का ओरडलो याचाच मला नेहमी राग यायचा !" , अर्जून ने हसतच कबुली दिली . 

 

" ओह, तर हे कारण आहे , आमचा खडूस अर्जुन चे रूपांतर गोडुला अर्जुन मध्ये झाले !" , आशुतोष 

 

" व्हॉट ? गोडुला?" , अर्जून परत अजब नजरेने बघत होता . आशुतोष ने माही कडे इशारा केला.

 

" गोडुला ?" , अर्जून तिच्याकडे अजब नजरेने बघत होता. तिने सुद्धा बिचारा चेहरा करत होकारार्थी मान हलवली . सगळे हसायला लागले. 

 

असेच परत अधूनमधून काही गेम झाले . आता वेळ आली माही वर. सगळ्यांनी तिला डान्स सोडून काहीतरी वेगळं करायला सांगितले , कारण ती डान्स चांगला करते हे सगळ्यांना माहिती होते . माहीने आशुतोष ला कानात काहीतरी सांगितले . आशुतोष ने तिने सांगितल्या प्रमाणे सगळी सोय करून दिली . 

 

मधोमध एक उंच चेअर ठेवली होती , त्यासमोर माईक होता. माही त्या चेअर वर जाऊन बसली . आशुतोष ने तिला अर्जूनची गिटार आणून दिली. 

 

" This is for you Sweetheart !" , माही एकदम अर्जूनच्या स्टाईल मध्ये बोलली , आणि अर्जुन नेहमी पुढे येणारे त्याचे केस एका हाताने मागे घेतो , तशी माहीने स्टाईल मारली . अर्जून ला ते बघून खूप हसू आले , त्याच्या ओठावर ब्रॉड स्मायल आले . अर्जुनच्या खोड्या काढण्याची हिम्मत तर फक्त माही मध्येच होती , आणि त्याची स्टाईल पण ती परफेक्ट मारत होती. नलिनी चे लक्ष अर्जून कडे गेले तर त्याला हसतांना बघून त्यांच्या पण चेहऱ्यावर समाधानकारक हसू पसरले. बाकी सगळे पण अवाक् होत तिच्याकडे बघत होते . 

 

माहीने गिटारची तार छेडली …. 

 

हो…

ना वो अखियाँ रूहानी कहीं

ना वो चेहरा नूरानी कहीं

कहीं दिल वाली बातें भी ना

ना वो सजरी जवानी कहीं

 

जग घूमेया तारे जैसा ना कोई ….. 

 

आशुतोष गँग ला तो दिवस आठवला , जेव्हा हे गाणं अर्जुन म्हणत होता, पण तेव्हा त्या गाण्यात खूप वेदना उमटल्या होत्या… माही तेच गाणं म्हणत होती पण आता त्यात खूप आनंद जाणवत होता.  

 

माहीने तिच्या कंबरेला खोचलेला गॉगल काढला आणि आपल्या डोळ्यांवर चढवला , आणि एका हाताने अर्जूनकडे बघत फ्लाईंग किस केले .. अर्जुन तिच्या एक एक खोड्या एन्जॉय करत होता . तिने किस केले तसे तो लाजला , गालातच हसत तिच्याकडे बघत होता. तिने किस केले तसे परत टाळ्या वाजवल्या. अर्जूनला असे लाजातांना बघून आजीला सुद्धा खूप गम्मत वाटत होती. माहीच्या आई वडिलांना मात्र तिचं असे वागणे खूप वेगळे वाटत होते , पण सगळे ते positively घेत आहे बघून ते शांतपणे बघत बसले होते. 

 

" अर्जूनचा गॉगल ?" , अनन्या 

" आता अर्जूनच तिचा आहे , तू काय गॉगल चं घेऊन बसली आहे " , आशुतोष 

" हा हा , अरे तसे नाही , त्या दिवशी त्याने पण असाच डोळ्यांवर गॉगल चढवला होता , ते आठवले !" , अनन्या

" ह्मम डोक्यातील अश्रू लपवायला , रडला होता तुझा भाऊ त्या दिवशी !" , आशुतोष 

" काय ?" , अनन्या शॉक झाली . 

" पुरुषांना सुद्धा त्रास होतो अनन्या , दुरावण्याचा वेदना होतात कधी कधी असह्य " , आशुतोष 

" म्हणजे तो तेव्हा …".

" हो , त्याचं तेव्हा सुद्धा माहीवर च प्रेम होतं ! सोड जुनं ते , आता सगळं त्याचा मनासारखं होत आहे , त्यात शामिल होऊया " , आशुतोष 

 

 

अपने नसीबों में या

हौसले की बातों में

सुखों और दुखों वाली

सारी सौगातों में

 

संग तुझे रखना है

संग तुझे रखना है

तेरे संग रहना

मेरी दुनिया में भी

मेरे जज़्बातों में

 

तेरी मिलती निशानी कहीं

जो है सबको दिखानी कहीं

मैं तो जानती हूँ मरके भी

तुझे आती है निभानी कहीं

वो ही करना जो है कहना 

 

( आता गाणं गातांना माहीचा आवाज कापरा झाला होत ता ) 

 

( माही च्या डोळ्यांपुढे ते प्रत्येक क्षण येत होते , जेव्हा जेव्हा अर्जुनने तिला वाचवले होते, नाशिक ला त्या गुंडा पासून , स्टेज वरून खाली पडताना , दिवाळी ला तिला आगीने घेरले होते तेव्हाच अर्जून , आपल्या उघड्या हातांनी तिला लागलेली आग विजवतांना , तिला घेऊन खाली स्विमिंग पूल मध्ये उडी घेणारा अर्जुन , अशी अर्जुन ची सगळी रुप तिच्या डोळ्यांपुढे तरळत होती , तिला माहिती होते तो स्वतःच्या जीवावर खेळेल पण तिला काहीच होऊ देणार नाही ) , ते सगळं आठवून तिचं मन खूप भरून आहे , झालं हातातील गिटार तिने बाजूला ठेवला , उंच असलेल्या चेअर वरून खाली उडी घेतली , तिला असे करतांना बघून सगळे जागेवरून उठून उभे राहिले , अर्जुन सुद्धा उभा राहिला … माही पळतच येत अर्जूनच्या कुशीत शिरली आणि त्याच्याभोवती आपली पकड घट्ट केली …. आता अर्जून ला पण बऱ्यापैकी तिच्या भावना कळल्या होत्या , बाकीच्यांना पण ( तिचे आई वडील बहीण भाऊ सोडून ) तिचे असे करण्याचा अंदाजा आला होता, त्यांना सुद्धा ती दिवाळी ची रात्र आठवली होती , ते आठवून त्यांच्या सुद्धा अंगावर सरकन काटा आला होता … अर्जूनने सुद्धा तिला आपल्या जवळ घेतले … थोड्या वेळ तिथे एकदम शांतता पसरली . 

 

" Mahi , see we are perfectly fine sweetheart ! " , अर्जूनने तिच्या चेहऱ्याला पकडत तिचा चेहरा वर करत तिच्या डोळ्यांमध्ये बघत बोलला. तिच्या डोळ्यात अश्रू होते , " No baby , आपण एकत्र आहोत " , अर्जुन तिचे अश्रू पुसत परत तिला आपल्या मिठीत घेत बोलला. हसते खेळते वातावरण एकदम शांत झालेले बघून अर्जून ला च ठीक वाटत नव्हते , त्याने आशुतोष ला इशारा केला तसे आशुतोष ने अर्जुनच्या हातात माईक दिला … 

 

एका हातात माईक आणि एका हाताने माहीला आपल्या जवळ पकडत त्याने माहीने अर्धवट सोडलेले गाणं कंप्लीट केले.. 

 

ना तो हंसना रूमानी कहीं

ना तो खुशबू सुहानी कहीं

ना वो रंगली अदाएं देखीं 

ना वो प्यारी सी नादानी कहीं 

जैसी तू है वैसी रहना

जग घूमेया थारे जैसा ना कोई 

जग घूमेया थारे जैसा ना कोई 

 

        माहीच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर आनंदच हसू होते . ती कौतुकाने त्याचाकडे बघत होती . खरंच त्यांचं प्रेम वेगळं होतं , न बोलताही एकमेकांच्या भावना , दुःख त्यांना कळत होते. गाणं संपलं तसे परत आनंदाने सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.  

 

          दोघंही मधोमध उभे होते. दोघांनीही एकमेकांना अंगठी घातल्या , तसा परत त्या दोघांवर फुलांचा वर्षाव झाला. मीरा पण पळत येत अर्जून ला बिलगली. त्याने तिला आपल्या कडेवर उचलून घेतले. तिघांचा पण एक गोड फॅमिली फोटो क्लिक झाला. 

 

          सगळे कार्यक्रम आटोपले होते, उद्या लग्न म्हणून सगळे लवकरच झोपायला गेले. अर्जूनमीरा ला आपल्या सोबत झोपायला घेऊन गेला होता, तेवढाच माही ला थोडा आराम .

 

         इकडे आऊट हाऊस मध्ये गप्पा सूरू होत्या. माहीची आई अचानक माहीला गाणं गाताना काय झाले होते ते विचारत होत्या , तेव्हा आत्याबईंनी दिवाळी च्या दिवशी घडलेला सगळा प्रकार सांगितला , ते ऐकातांना अक्षरशः सगळ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते . माहीची आई मनोमन देवाचे खूप आभार मानत होती की तिला अर्जुन सारखा जीवनसाथी भेटला होता . जीवनसाथी या शब्दाचा खरा अर्थ म्हणजेच अर्जून होता. 

 

********

 

        लग्नाची पहाट उजाडली. सगळीकडे लगीन घाई सुरू झाली. बाहेर सनई चौघडा वाजू लागला. माही तयारी करत होती . तेवढयात माहीची आई काही दागिने घेऊन माही जवळ आली . 

 

" माही , हे काही दागिने आहेत ,आम्ही खूप हौसेने तुझ्यासाठी बनवले " , माहीची आई तिच्या जवळ येत खूप प्रेमाने बोलली. पण माहीने मात्र ते घेण्यास स्पष्ट नकार दिला. 

 

*******

 

क्रमशः  

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️