तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 89
भाग 89
माहीचा परिवार अचानक तिथे शांतीसदन मध्ये आल्यामुळे अर्जून खूप चिडला होता , त्याला त्या लोकांचं तिथे आलेले अजिबात आवडले नव्हते . सगळ्यांशी बोलून एक वारनिंग देऊन तो रागातच तिथून निघून वरती आपल्या रूम मध्ये आला होता . त्याची मनधरणी करण्यासाठी माही त्याच्या पाठोपाठ तिथे आली होती, आणि तिने नेहमी प्रमाणे त्याला मनवले होतेच. अर्जून ने माहीच्या परिवाराला लग्नात येऊ देण्याची परवानगी दिली , तेव्हा माहीच्या आनंदाला उधाण आले होते , आनंदाने तिने अर्जूनच्या गालावर किस केले आणि त्याला बिलगली . बाहेर उभे आशुतोष आणि गँग हे बघत होते . अर्जूनचा मूड ठीक झालेला बघून वाजत , गाजत , नाचत ते सगळे अर्जूनच्या रूम मध्ये आले . त्यांना असे अचानक आलेले बघून अर्जुन च्या मिठीतली माही लाजातच त्याचा दूर झाली .
" ओके , सो ऑल सेट ना ?".... आशुतोष
माही ने होकारार्थी मान हलवली.
" कोई गीले शिकवे नही ?"... आशुतोष
माही ने नकारार्थी मान हलवली .
" चला , तयारी ला लागा रे पलटण ! ये धतर धतर धतर धतर !".... आशुतोष प्लेट वाजवत
" Yeh !".... सगळे एकसाथ ओरडले.
" कशाच्या तयारी ला ?"... अर्जुन
" ही पोरी साजूक तुपातली , हिला भवऱ्याचा लागलाय नाद !".... सगळे भयंकर सुरात गाणे म्हणून या दोघांभोवती नाचू लागले .
" म्हणजे ?"... अर्जून
" हळदीची ! उद्या हळद !"... आशुतोष
" ओ , अती उत्साही माणसा , हळद उद्या नाही परवा आहे , उद्या मेहेंदी आहे !" , अनन्या
" ही ही ही , दादू पेक्षा जास्त घाई जिज ला च झाली आहे !" , श्रिया जोरजोराने हसत होती.
" तुमच्या भावासाठीच घाई केली , बर ते जाऊ द्या , मला माही ला खूप महत्वाचं विचारायचे आहे " , आशुतोष
" आता तुझं मध्येच काय महत्वाचं आलं ?" , अनन्या
" तू थांब ग , खूप महत्वाचं आहे , तुमच्या पण कामी च येईल ते !", आशुतोष
आशुतोष ने एवढा सिरीयस चेहरा केला होता की सगळेच त्याचा कडे बघत होते , अर्जून पण यांना काय विचारायचं आहे, विचार करत त्याचाकडे बघत होता .
" हा तर माही , हा अर्जुन एवढा रागीट , चिडका , आता पण खाली तो भयंकर रागात होता , तर आता हे एवढया लवकर शांत कसा झाला ? नाही म्हणजे तुझ्याकडून हा इतक्या लवकर नेहमीच मानतो कसा ? काय जादूटोना करते की काही घुटी वगैरे पाजते ?" , आशुतोष
" येस बॉस , ये तो सही सवाल है , हा तर माही वहिनी ( वहिनी या शब्दावर जोर देत ) आमच्या या खडूस भावाला तुम्ही कसे मानवता ?", अनन्या
" ते ? …. ते तर खूप सोप्पी आहे , ते 'लोहे को लोहा काटता है ' म्हणतात ना , एकदम तसं !", माही अगदी बिनधास्त टोनिंग मध्ये बोलली.
" म्हणजे ?" , अनन्या
" हे खूप चिडतात ना , म्हणजे चिडके आहेत ना , तर यांना आणखी आणखी इरिटेट करायचं , अगदी यांना नाही आवडत तेच करायचं !"
" हा हा हा , सही … आणि मग ?" , आशुतोष
" मग हा चिडका बिब्बा फुटतो , चिडकी हवा बाहेर , आणि मग यांना एक क ..." , माही आपल्याच तालात मस्त हातवारे करत बोलत होती. बोलता बोलता तिचं लक्ष अर्जुन कडे गेले तर अर्जुन खडूसवाले एक्स्प्रेशन ने तिच्याकडे बघत होता , त्याला बघितले आणि आतापर्यंत बिनधास्तपणे बोलणारी माही मध्येच बोलायची अडकली .
" एक काय ?" , अनन्या
" एक स्मायल द्यायची " , माही
" नाही , ते क वरून होते काहीतरी . एक क .." , अनन्या तिला चिडवत होती . बाकीचे पण आता खूप चिडवायला लागले होते , तिची होणारी त त प प बघून अर्जुनला सुद्धा हसू येत होते .
" बरं , चला आता , जेवणं आटोपा , झोपा लवकर . उद्यापासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार आहे , खूप मस्ती करायची , एनर्जी पाहिजे !" , अनन्या
" आणि हो , मेहंदी कमाल रंगायला हवी हा माही , हवं तर तुझं ते एक काय भरपूर किस देऊन दे , प्रेम वाढायला हवे !' , अनन्या बोलता बोलता माहीच्या कानाजवळ जात हळूच बोलली. ते ऐकून माहीला लाजल्या सारखे झाले.
" हो हो , माही मेहंदी खूप रंगायला हवी , ये दादा तुझं प्रेम जरा आणखी वाढव, नाहीतर अनन्या ताई सारखं व्हायचं , मेहंदीचा काय रंग चढत नाही आजकाल !", श्रिया आशुतोषला टार्गेट करत म्हणाली.
" हो , याला ना जरा बघायला हवेच आता !", अनन्या
" अरे , मी काय केले आता ?" , आशुतोष
" इतिहास गवा है , आकाश दादाच्या लग्नात ताईच्या मेहंदीला अजिबात कलर नव्हता आला !' , श्रिया मस्करीच्या सुरात बोलली.
" हो सालीसाहेबा , हे काय मध्येच आगीत तेल ओतत आहेत ?' , आशुतोष
" आगीत तेल ? ", आकाश
" तुमची ताई ऑलरेडी आग आहे आग !' , आशुतोष
" काय ? मी आग काय , थांब सांगते तुला " ,असे म्हणत अनन्या आशुतोष ला फटके मारू लागली .
" माही , तुझी तर आकाश दादा च्या लग्नात पण खूप रंगली होती ग ? What's the secret ?" , श्रिया भुवया उडवत तिला चिडवत होती.
" ते तर यांनी काढून दिली होती ! माझी आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट मेहेंदी होती ती , म्हणून तर इतकी रंगली होती ना ! ", माही आपल्याच तालात बोलून गेली
" काय ? काय ? काय ? " , सगळे परत जागीच स्तब्ध झाले.
" कोणी …. कोणी काढून दिली म्हटलं ?" , अनन्या
" म्हणजे , ते यांनी माझ्या पायावर काढून दिली होती ! " माही
" दादू नी ? Impossible … अगं त्याला तर ते मेहंदी , त्याची स्मेल सुद्धा अजिबात आवडत नाही . आम्ही कधी केसांना जरी लावली ना , तर तो आमच्या आजूबाजूला पण भटकत नाही . " श्रिया
" हा ? पण यांनी तर मला..." , माही बोलत होती की अर्जून ने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला , आणि त्याने आपला चेहरा भिंतीकडे वळवला . ते बघून मात्र आता सगळ्यांना जे कळायचे ते कळले होते . आता मात्र परत त्यांनी या दोघांना चिडवायला सुरुवात केली होती .
" दादू , पण तू इतका बदशील कधीच वाटले नव्हते !", श्रिया
" प्रेम असतेच असे , पार्टनर च्या प्रेमावर सुद्धा प्रेम होतं , पार्टनर ची आवडती गोष्ट आपल्याला कधी आवडायला लागते ते आपल्याला कळत सुद्धा नाही , बस ते होऊन जातं !" , आशुतोष
अनन्या तर आशुतोष कडे बघून गोड हसली.
अंजली सुद्धा आकाश कडे बघत होती .
" Aww ! " जिज तुम्ही ठीक आहात ना ?" , श्रिया
" हा हा हा , I am fine … आता तुम्ही बघत रहाच कारले माहीचे फेवरेट होतात की नाही !" , आशुतोष परत मस्करी करायला लागला.
" ते तर झालेच , मी आता कारल्याची भरपूर भाजी खाते " , माही परत बोलून गेली .
" काय ताई ? तू कारले खाते ?" , मनीष आश्चर्यचकित होत तिच्याकडे बघत बोलला.
तसे सगळे खळखळून हसायला लागले.
" अर्जून , आवर हिला , नाहीतर तुझे सगळे रोमँटिक राज बाहेर पडतील , बघ म्हणजे तुझ्या खडूस इमेज ला धक्का पोहचेल , म्हणून सांगतो आहे. ! " , आशुतोष अर्जुंची मस्करी करत होता, आणि अर्जूनचा ओठांवर हसू पसरले.
" हाये … दादू , तू ब्लश करतोय !" , श्रिया
" Who will dare to dash dash dash !" , अनन्या आणि श्रिया टाळी देत बोलल्या.
सगळी खूप धमाल मस्ती सुरू होती.
सगळ्यांची जेवण आटोपले , सगळे झोपायला गेले.. इकडे माहीचे आई वडील सुद्धा खूप खुश होते की माही ला खूप चांगलं घर आणि तिला सांभाळण्यासाठी जिवाचं रान करणारा जीवनसाथी भेटला होता.
******
आज मेहंदी होती , मेहंदी ची सगळी तयारी झाली होती . माही ने सुंदरसा पिस्ता ग्रीन लेहेंगा घातला होता , त्यात ती एकदम डॉल दिसत होती. बाकी सगळे पण मेहेंदी थीम नुसार तयार झाले होते. मेहेंदी डिझायनर आली होती. माही मधोमध बसली होती , तिच्या हातावर मेहेंदी काढणं सुरू होते. बाकी सगळ्या महिला मंडळ सुद्धा त्यांची मेहेंदी ची हौस करून घेत होता.
अर्जूनने सुद्धा माही ला मॅच होईल असा एकदम फिटिंगचा सिंपल लिनेनचा शर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर घातला होता , त्याचे सिल्की केस अधूनमधून कपाळावर यायचे , तो एका हाताने ते मागे घ्यायचा , पण ते परत पुढे यायचे. माही बसल्या जागेवरून त्याला बघत होती, त्याचे हे असे वारंवार केस मागे घेणे आणि ते परत पुढे येणे , हे बघणं म्हणजे नेहमीच माहीचे आवडते काम होते, तिला त्याचं फार हसू यायचं . बोलता बोलता अर्जूनचे लक्ष माहीकडे गेले तर ती त्याच्याकडे बघतांना दिसली, त्याने भुवया उंचावत तिला तिथूनच काय हवे म्हणून विचारले, माहीने हसतच डोळ्यांनी त्याला तो खूप छान दिसत आहे म्हणून खुणावले , तिचे ते इशारे बघून तो ब्लश झाला .
" आँखो ही आँखो मे इशारा होगाया
बैठे बैठे जिने का सहारा मिल गया !" … आपला आशुतोष जो दोघांवर एकदम दुर्बीण लावून च बसला होता , तो माही जवळ येत गाऊ लागला , तसे माहीने लाजून मान खाली घातली.
सगळी धमाल मस्ती सुरू होती , अधून मधून खाण्याचे काय काय येत होते. मधुर संगीत सुरू होते , लहान मुलं आपल्याच तालात नाचत होते.
माहीच्या हातांची मेहेंदी आटोपली होती. आता पायांची मेहेंदी सुरू होणार होती. मेहेंदी वाली मेहेंदी काढणारच की अर्जून तिच्या बाजूला माही पुढे आपल्या गुढग्यावर येवून बसला आणि त्याने मेहेंदी वाली पुढे हात केला आणि मेहंदीचा कोन देण्यासाठी इशारा केला.. हॉल मध्ये असलेले सगळे आश्चर्यचकित होत त्याचाकडे बघत होते, माही तर भलतीच शॉक झाली होती , ती शॉक लागल्यासारखी डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती. आशुतोष ने लगेच फोटोग्राफर ला इशारा केला, एक पण बेस्ट क्षण सुटायला नको म्हणून त्याने आपला मोबाईल चा कॅमेरा काढला आणि उडी मारतच त्यांच्या जवळ येऊन बसला. त्याने मेहेंदी वाली ला इशारा केला , तसे मेहेंदीवाली ने अर्जूनच्या हातात मेहेंदी कोन दिला आणि ती बाजूला झाली.
अर्जून ने एका हातात मेहेंदी चा कोन पकडला , आणि दुसरा हात पुढे करत , माहीला हातावर पाय ठेव म्हणून इशारा केला. माही ने आजूबाजूला बघितले , सगळे त्या दोघांकडे च खूप कौतुकाने बघत होते . माहीने नकारार्थी मान हलवली , तिला खूप अवघडल्या सारखे झाले होते.
" It's my right ! Please " , अर्जून ने त्याचा हात पुढे केला.
( काल रात्री मस्ती करतांना माही बोलून गेली होती की तिच्या पायावर अर्जून ने काढलेली मेहंदी सगळ्यात बेस्ट आणि तिची फेवरेट होती , तेच लक्षात ठेऊन तो तिथे आला होता , लग्नातली प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीची असावी हाच काय त्याचा हट्ट होता )
माहीने तिचा पाय त्याच्या हातावर ठेवला …. तश्या आशुतोष गँग ने टाळ्या वाजवल्या , त्यांना बघून बाकीचे पण त्यात शामिल झाले. ते सगळं बघून तिला लाजल्या सारखं झाले , आणि तिचा आनंद अर्जुनसाठी किती स्पेशल आहे हे पण दिसत होते , तिला ती दुनियेतली सगळ्यात भाग्यशाली मुलगी वाटली होती, अगदी एखाद्या राजकन्या प्रमाणे अर्जुन ने तिला ट्रीट केले होते. अर्जून ने तिचा नाजूक पाय आपल्या गुडघ्यावर ठेवला आणि खूप मन लावून तिच्या पायावर सिंपल सुंदर असे डिझाईन काढले .
" मला पण काढायची अर्जून कडून !" , पळत पळत येत माहीच्या बाजूला बसत बोलली. आणि तिने आपले दोन्ही पाय अर्जून पुढे धरले.
" मला माऊ पेक्षा पण सुंदर काढून हवी आहे !" , मीरा ने फर्मान सोडला.
" जळकुकडी !" , माही पुटपुटली , ते ऐकून सगळे हसायला लागले.
" Tough competition आहे बाबा ! पुरवा हट्ट आपल्या छोट्या राणी सरकारचे " , आशुतोष
अर्जून मीरा कडे बघून गोड हसला आणि तिच्या पुढे अगदी खाली बसला , त्याने तिचे छोटे छोटे दोन्ही पाय आपल्या हातात घेतले त्यांचावर किस केले , ते बघून मिरा खुदकन हसली, त्याने तिचे पाय आपल्या मांडीवर ठेवले, आणि त्यावर त्याला जितकी जास्त सुंदर मेहेंदी काढता येत होती तेवढी सुंदर तो मिराच्या पायावर काढत होता . बाप लेकीच्या नात्याचा तो सोहळा इतका अद्भुत होता की , तिथल्या प्रत्येकाचा डोळ्यात दोन थेंब देऊन गेला होता . ते बघून माहीच्या वडिलांना स्वतःच्या बापत्वाची किंमत मात्र कळली होती , जन्म दिल्यानेच बाप होत नसतो हे सुद्धा कळले होते. कुठे आपण आपल्या छोट्या इज्जती साठी आपल्या जन्म दिलेल्या मुलीला एकटे सोडले आणि हा एक बाप ज्याने जन्म दिला नसून सुद्धा आपल्या मुलीसाठी स्वतःची एवढी मोठी इज्जत पणाला लावली होती, अर्जुन आणि मिरा ला बघून आता त्यांना स्वतःचीच लाज वाटली होती , ते स्वतःच्याच नजरेत उतरले होते.
******
क्रमशः