तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 88

माही

  तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 88

भाग 88

डेकोरेशन चं काम करता करता माहीचे लक्ष पुढे गेले … 

" आई , बाबा "..... माही डोळे विस्फारून पुढे बघत होती . माही दारात उभी काही करत होती की अचानक तिचं लक्ष पुढे गेले , आणि तिला तिचे आई, बाबा , मंजू , मनीष आतमध्ये येताना दिसले. तिला तर काहीच कळत नव्हते , हे लोकं इथे कसे काय ? आयुष्यातल्या सगळ्या सुंदर आणि महत्वाच्या कार्याच्या वेळेस त्यांना इथे बघून आनंदी व्हावे , की त्यांनी जे केले ते आठवून दुख्खी व्हावे , बऱ्याच अश्या समिश्र भावनांची तिच्या मनात गर्दी झाली होती. इतक्या दिवसांनी बघून तिच्या डोळ्यात अश्रूही आले होते … हातात असलेल्या फुलांच्या माळा आपोआप गळून खाली पडल्या होत्या . काय करावे तिला कळत नव्हते… शेवटी तिने आपल्या मनाचा कौल घेतला आणि आई बाबांच्या दिशेने जाऊ लागली, ती जशी पुढे जाणार तेवढयात अर्जून ने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला आणि तिला पुढे जाण्यासाठी रोखले. तिने अश्रूपूर्ण आर्जवी डोळ्यांनी अर्जूनकडे बघितले , त्याचा डोळ्यात प्रचंड राग दिसत होता … नकारार्थी डोकं हलवत त्याने तिला त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून खुणावले. 

" आई बाबा आहेत ते …. ".... माहीचा आवाज जड झाला होता, तिच्या डोळ्यातील अश्रू गालांवर ओघळले होते …. 

" Sir ?".... माहीचा भाऊ मनीष पुढे आला . 

अर्जुनने एकदा खूप रागाने त्याचाकडे बघितले आणि परत माही कडे बघितले , तसा तो जागीच स्तब्ध उभा राहीला . 

" Really ?".... अर्जुन माही वर नजर रोखत बोलला. माहीला त्याचा डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता , रागाने त्याचे डोळे लाल झाले होते, त्याचे ते रूप बघून माही ला पुढे बोलल्या जात नव्हते . 

" जावई बापू ! "..... माहीची आई पुढे आली. तसा अर्जुनने त्यांच्या कडे न बघताच तिथेच थांबा असा हात दाखवला. 

" तुम्ही इथून जाऊ शकता !".... अर्जूनच्या आवाजात जरब होती , तो माहीकडे बघत बोलत होता . 

येव्हणा घरात सगळ्यांना बाहेर काय सुरू आहे हे कळले होते , तसे एक एक करत सगळे तिथे येऊन जमा झाले होते . अंजली ची आई छाया सुद्धा तिथे आली होती. माही च्या आईला तिथे आलेले बघून त्यांना आनंद झाला होता , भेटायला पुढे जायचं विचार केलाच होता की अर्जूनचे ते रूप बघून त्या जागीच थांबल्या होत्या. माही ची आई खूप आशेने सगळ्यांकडे बघत होत्या की घरातील कोणीतरी अर्जून ला समजवेल , पण अर्जूनचे ते रूप बघून कोणाचीच मध्ये बोलायची हिम्मत झाली नव्हती.

" Sir , त्यांनी जन्म ……"... माही बोलतच होती की तेवढयात तिचे वडील पुढे आले. 

" जावई बापू , आम्ही माफी मागायला आलो आहोत "...... माहीचे वडील 

" I hate these words ".... अर्जुन जवळजवळ ओरडलाच होता . त्याचा आवाजाने एकच शांतता सगळीकडे पसरली … 

" आम्हाला माहिती आमची खूप मोठी चूक झाली , परत असे होणार नाही , शेवटी आमची मुलगी आहे ती !".... माहीचे वडील .

" फार लवकर आठवली तुम्हाला तुमची मुलगी ? आणि ज्याला तुम्ही चूक म्हणत आहे , ती चूक नाही खूप मोठा गुन्हा आहे . तुम्ही तर बाप होता , ते जाऊ द्या बापाच्या आधी पण एक पुरुष होता ना , पुरुष कसे असतात तुम्हाला माहिती नाही ? आपल्या आजूबाजूला कशा वृत्तीची माणसं वावरतात तुम्हाला माहिती नाही ? त्या सतरा वर्षाच्या लहान मुलीला , जिला बाहेरच्या जगाबद्दल काहीच माहिती नाही , तुम्ही त्या निरपराध , निरागस कोवळ्या जिवाला , काय म्हणालात तुमची मुलगी , तीला या राक्षसी दुनियेत , जिथे ते वाटच बघत असतात शरीराचे लचके तोडायला तिथे एकटे सोडले ? माहिती आहेत ना कसले सांड फिरत असतात इथे ? परत काही वाईट घडले असते तर ? बाप म्हणे , अरे जेव्हा बापपण निभावता येत नाही तर जन्मच कशाला देता ? जन्म देऊन उपकार कशाला करता आमच्यावर ? "...... अर्जूनचा राग अनावर झाला होता , त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये चीड ,राग तर होतच पण खूप वेदना सुद्धा होत्या… तिथले सगळेच त्या भावना अनुभवू शकत होते . 

माहीच्या वडिलांना तिथे बघून अर्जुनला खूप राग आला होता . माही पहिल्यांदा त्याला नाशिक च्या रस्त्यांवर पळताना ज्या अवस्थेत भेटली होती , तिच्या चेहऱ्यावरची ती भीती , तिचं घाबरून थरथरणारे शरीर , तिच्या डोळ्यातील त्या मरणप्राय वेदना ज्या त्याने बघतील्या होत्या , तिला आपल्या हातात घेतल्यावर अनुभवल्या होत्या ते सगळं त्याला माहीच्या परिवाराला इथे बघून डोळ्यांसमोर परत जश्याच्या तश्या आल्या होत्या . ' जर आपण योग्य वेळी तिथे पोहचलो नसतो तर …. ' विचार त्याच्या डोक्यात कडाडला आणि भीतीने त्याच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले होते , त्याच्या माथ्यावर घामाचे बिंदू जमायला लागले होते . परत ते त्याला आठवायचे नव्हते , पण काही काही लोकं डोळ्यांपुढे आले की जुन्या त्या वेदना परत जश्याच्या तश्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात , कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी आयुष्यात जेव्हा मरण पुढे दिसत होते , ते कधीच विसरल्या जात नाही , आणि मग त्या रीलेटेड लोकं पुढे आले की परत त्या आठवतात… 

माहीला सुद्धा त्याचा भावना कळत होत्या , आणि आई वडिलांच्या डोळ्यात सुद्धा पच्छाताप दिसत होता … ती अशृपूर्ण आर्जवी नजरेने अर्जूनकडे बघत होती … आणि शेवटी तिच्या डोळ्यातील अश्रू त्याला बघावल्या नाही गेले आणि त्याने रोखून धरलेला तिचा हात सोडला … नी पालटत तिच्या वडिलांजवळ आला .. 

" माहीच्या डोळ्यात एक सुद्धा पाण्याचा थेंब दिसला तर मी कोणालाच सोडणार नाही , बरबाद करून ठेवेल , मग कुठलीच नाती किंवा कोणीच मला अडवू शकणार नाही ! ".... अर्जुन माहीच्या वडिलांच्या डोळ्यांना डोळे भिडवत बोलला आणि छायाच्या ( अंजलीची आई ) पुढे येत हात जोडून उभा राहिला . नम्रतेने आपली मान झुकवून thank you बोलून तिथून झपाझप पावले टाकत वरती निघून गेला. 

माहीने पळतच जात आपल्या आईला मिठी मारली . सगळ्यांनी माहीची माफी मागितली .. एक दिवस अर्जुन मनीष काम करत होता त्या ऑफीस मध्ये काही मीटिंग साठी आला असताना , मनीष ला त्याला भेटुन माही बद्दल विचारायचे होते , तो तिथे जवळ गेलाच होता की त्याने अर्जुनने मनीष आणि मंजू साठी जे सगळं केले होते ते समजले होते, मनीष अर्जुनला भेटायला जातच होता की त्याला पिउन ने आतमध्ये सोडले नव्हते , अर्जुनला महत्वाचं काही काम आले होते आणि तो तिथून निघून गेला होता . मनीष कडून माहीच्या परिवाराला हे सगळं कळले होते ,त्यांना त्यांची चूक उमगली होती आणि ते लगेचच तिच्याकडे माफी मागायला आले होते . सगळ्यांनी हात जोडून तिची माफी मागितली . 

" माही !"..... नलिनी माहीच्या खांद्यावर हात ठेवत अर्जूनच्या रूम कडे बघत डोळ्यांनीच अर्जुनला बघ म्हणून इशारा केला. 

" माही , जा बाळा , मी बघते इथे सगळं , काळजी नको करू ".... छाया 

" बाबा , ते तसे नाही , ते थोडे रागात म्हणून , पण तुम्ही काळजी नका करू , मी समजावते सरांना !"..... माही आपल्या वडिलांना बोलली

" सगळं बरोबरच तर बोलले ते , देवाकडे तरी आता कुठल्या तोंडाने जाऊ ? स्वतःशी नजर सुद्धा मिळवायची हिंमत नाही आता . आणि राग जर असा असेल तर असा रागीट जावई प्रत्येक बापाला मिळू देत ! त्यांच्या रागात सुद्धा प्रेम होते , माझ्या पोरीची काळजी होती . नशीब लागते असा जावई भेटायला , मागच्या जन्मीचे पुण्य च म्हणावं लागेल जे इतका चांगला जावई भेटला. देवा जवळ हीच प्रार्थना की माझ्या सारखा बाप कोणत्याच मुलीला देऊ नको , पण जावई बापुंसारखा नवरा प्रत्येक मुलीला भेटू दे . !".... माहीचे वडील 

" जा , त्यांचं बघ त्यांना , आणि त्यांचा मनाने घे , आमची काळजी नको करू!".... माहीची आई 

तसे माही पळतच आतमध्ये वरती जायला निघाली . 

छाया ने घरात सगळ्यांसोबत माहीच्या परिवाराची ओळख करून दिली . आजी , नलीनीची सुद्धा त्यांच्यावर थोडी नाराजगी होतीच , पण लग्नघर आणि माहीचे आईवडील , म्हणून त्या शांत होत्या. छाया त्यांना आऊट हाऊस मध्ये घेऊन आली आणि तिथेच त्यांची राहण्याची सोय केली . 

माही वरती अर्जूनच्या रूम मध्ये आली . अर्जुन खिडकीजवळ वरती आकाशात चंद्राकडे बघत उभा होता . तिला माहिती होते नक्कीच अर्जुन खूप रागात असतील . माहीने मुद्दाम दार नॉक केले . अर्जुन ने काहीच रिप्लाय दिला नाही . माही ने परत दार नॉक केले , तरी त्याचा काहीच रिप्लाय नाही . माही आता दारा जवळ उभी तबला वाजवावा तशी दारावर बेसुरपणे काँटीन्यू दार ठोकत होती. 

" Shut up Mahi !" …. अर्जून तसाच पाठमोरा थोड्या जोरात बोलला . 

" येस ! ".... माहीने एका हाताची मुठी करत yes वाली स्टाईल केली , आणि पळतच जात त्याचा मागूनच त्याला मिठी मारली.  

" बाप म्हणजे काय असते कळत नाही यांना , आपल्याच मुलांना सांभाळता येत नाही , तर जन्मच कशाला देतात ? माझा so called बाबा स्वतःच्या अय्याशी साठी आम्हाला सोडून गेला , आणि तुझे वडील त्यांच्या इज्जती साठी स्वतःच्या मुलीला घराबाहेर काढतात. आणि नंतर येऊन माफी मागतात . सॉरी बोलून आणखी आमच्या जखमांवर मीठ चोळतात ... सेल्फिश बास्टर्ड !! अशा जन्मदात्यांपेक्षा ते नसलेलेच बरे ".... अर्जून 

" मी दोन बाबा बघितले आहे , जे खूप ऑसम आहेत एकदम देवतुल्य बाबा , त्या दोघांनी बाबा ची एक नवीन परिभाषा निर्माण केली . स्त्रीला तर मातृत्वाचे जन्मतः वरदानच असते , एका स्त्री ला यशोदा बनने कदाचित कठीण नाही , पण एखाद्या पुरुषाला बाप बनणे सोपी नाही , ते पण एका मुलीचा , पर मुलीचा , तरुण मुलीचा …. प्रत्येक पुरुष बाप नाही बनू शकत आणि मुलगी सुद्धा डोळे मिटून त्याच्यावर विश्वास नाही ठेऊ शकत . आणि ते सुपर पॉवर पुरुष आहेत एक माझे बाबा म्हणजे अंजली ताईचे बाबा आणि एक मीराचा बाबा , ज्यांचे मजबूत छत्र आमच्या डोक्यावर आहे . मी आणि मीरा तर या बाबतीत खूप लकी आहोत , आम्हाला जगातले सगळ्यात बेस्ट बाबा भेटले , बाप्पा बिग वाले thank you हा !".... माही तशीच त्याला त्याला मागून मिठीत पकडून बोलत होती . पण अर्जुन मात्र काहीच बोलत नव्हता . 

" Sir , जे होतं ना ते चांगल्यासाठीच होते . "..... माही बोलतच होती की अर्जुन झटकन मागे फिरला ..." Shhhsshh ! फालतू बकवास करू नको ! तुला गंमत वाटते आहे हे सगळं ? "... अर्जुन 

" Sir , जन्म तर दिला आहे ना त्यांनी मला , या सुंदर जगात आणले …. त्यांच्यामुळेच तर तुम्ही मला भेटलात , वाईटातून पण चांगलं घडत असते sir …. सकारात्मक गोष्टी बघायचा प्रयत्न करा . "..... माही 

" माही , मी खरंच आता तुझी बकवास ऐकण्याचा मूड मध्ये नाही आहो !"... अर्जून 

" Sir , त्यांनी जर मला घरा बाहेर नसते काढले तर मी नाशिक ला नसते आले , नाशिकला नसते आले तर आत्याबाई च्या घरी नसते आले … आत्याबईंच्या घरी नसते आले तर मी जॉब शोधायला घराबाहेर नसते पडले , घराबाहेर नसते पडले तर तुमचा फॅशन शो खराब नसता झाला आणि मी तुमच्या मिठीत नसते ना ! तिथेच गावात राहिले असते तर एखादा तोंडात पान , ढेरीवाल्या , चमेलीचे तेल लावलेल्या चंपक सोबत माझं लग्न झाले असते , तर मग हा ड्रॅक्युला मला कसा भेटला असता बरं ? हा म्हणजे थोडा , नाही थोडा नाही जास्तच हा सुपर हँडसम खडूस कसा भेटला असता ? " …. ते सगळं ऐकून त्याला हसू आले… 

" आपल्याला आयुष्यात आनंदाने पुढे जायचे असेल तर जुन्या गोष्टींचं ओझं मनावर नको ना , काकी तुमच्या आई ने सुद्धा तुमच्या वडिलांना माफ केले होते ,माफ केल्याने आपण लहान नाही बनत , उलट मोकळ्या मनाने आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो , मनावर कशाचाच ओझं राहत नाही . माझ्या आई वडिलांनी जे केले आहे ते त्यांच्यापाशी , आता आपण खूप खुश आहोत हे महत्त्वाचे आहे , नाही का ? आणि मला आता माझ्या नवीन आयुष्यात पदार्पण करताना मागे काहीच दुःख ठेवायचं नाही , "..... माही

" माझं त्यांच्यासोबत काहीच नातं नसेल!"... अर्जुन 

" ओके ".... माही 

" आपल्या लग्नात त्यांना थांबू देऊया ?"... माही 

" ह्मम !".... अर्जून 

" येह ! हीप हीप हुर्रे ".... माही अक्षरशः नाचायला लागली होती , दोन बोटं तोडत घालत विसल वाजवत होती . नाचता नाचता माहिने हळूच अर्जून च्या गालावर किस केले …. आणि त्याच्या कुशीत जात त्याला पकडून घट्ट बिलगली . 

" येह ! हिप हिप हूर्रे !".... आशुतोष आणि बाकी मंडळी त्यांच्या रूम मध्ये आले. आशुतोष एक प्लेट चम्मच घेऊन ड्रम वाजवल्या सारखा कर्कश्श आवाज करत होता , आणि अनन्या , आकाश , श्रिया नाचत होते , सिट्या मारत होते. 

" तुझा भाऊ अगदीच शोभतात जे आशुतोष , कर्कश्श वाजवता !"... अर्जुन 

" हम कुंभ के मेले मे बिछडे हूये भाई बेहन है , जो पटवर्धन साब की कृपासे मिल पाये है ! ओ धन्यवाद जी साले साब जी ! ये धतर धतर धतर धतर ! ".... परत आशुतोष जोरजोराने वाजवायला लागला. 

" सगळी पागलभरती माझ्याच घरात ".... अर्जुन त्यांच्याकडे कसेतरी नजरेने बघत होता. 

बाहेर दारात उभे मनीष आणि मंजू हे सगळं बघत होते , आणि या सगळ्यांची मस्ती बघून त्यांना खूप हसू येत होते . 

" अरे , तुम्ही या आत ".... अनन्या 

मंजूने नकारार्थी मान हलवली. ती घाबरून अर्जूनकडे बघत होती. 

" अरे डरणेका नही , अपने साले का च घर है ! ये धतर धतर धतर धतर !"...... आशुतोष , तसे अनन्या ने मंजू चा हात पकडत तिला आतमध्ये आणले , तिच्या पाठोपाठ मनीष सुद्धा आतमध्ये आला. 

" ओके , सो ऑल सेट ना ?".... आशुतोष 

माही ने होकारार्थी मान हलवली. 

" कोई गीले शिकवे नही ?"... आशुतोष 

माही ने नकारार्थी मान हलवली . 

" चला , तयारी ला लागा रे पलटण ! ये धतर धतर धतर धतर !".... आशुतोष प्लेट वाजवत 

" Yeh !".... सगळे एकसाथ ओरडले. 

" कशाच्या तयारी ला ?"... अर्जुन 

" ही पोरी साजूक तुपातली , हिला भवऱ्याचा लागलाय नाद !".... सगळे भयंकर सुरात गाणे म्हणून या दोघांभोवती नाचू लागले .

" म्हणजे ?"... अर्जून 

" हळदीची ! उद्या हळद !"... अनन्या

" इस्का GK बढाव यार कोई ! " …. आशुतोष 

" काय दादू , किती फेमस गाणं आहे ते हळदीचे ".... श्रिया 

" टाइम पास "... अर्जुन 

" आता करायची तेवढी झप्पी टप्पी करून घ्या , उद्यापासून लग्नापर्यंत नो hugging shughing "..... आशुतोष 

" व्हॉट ?".... अर्जून 

" मी पण असेच म्हणालो होतो , कोणी ऐकले नव्हते माझे … अब हम बदला लेंगे !"... आशुतोष 

" ही पोरी साजूक तुपातली , हिला भवऱ्याचा लागलाय नाद ! ".... सगळे आनंदाने ओरडत होते . 

********

क्रमशः 

🎭 Series Post

View all