Login

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 86

अर्जून

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 86

भाग 86

सुट्टीचा दिवस होता , आणि लग्नाची तयारी सुद्धा करायची होती त्यामुळे सगळे घरीच होते. माही आणि मीरा सुद्धा तिथे शांतीसदन मध्ये आल्या होत्या. त्या आल्या आणि लग्नाची कामं राहिली दूर , सगळ्यांची नुसती धमाल मस्ती सुरू होती. लग्ना आधीचे जोडपं म्हटले की सगळे त्यांची मस्करी करायचा एक चान्स सोडत नाहीत , मग इथे तर सगळे अतरंगी भरले होते , त्यात आशुतोष अवलाई आणि त्याचा फेवरेट अर्जुन , अर्जुनला सतावने त्याचे भयंकर म्हणजे भयंकरच आवडीचे काम , तो एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही . अर्जुन चिडायचा पण माहीच्या नावने चिडवणे तो आता एन्जॉय करू लागला होता , आणि त्यामुळे अधून मधून तो लाजत सुद्धा होता , आणि त्याचं असे लाजणे बघून घरचे शॉक व्हायचे. 

अशीच सगळ्यांची मस्ती सुरू होती. मीराला काही हवे होते म्हणून ती किचन मध्ये गेली , तिथे नलिनी होती … मीरा चा तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न सुरू होता , पण नलिनी मात्र तिला इग्नोर करत होती . अर्जुन इकडे जरी सगळ्यांसोबत बसला होता तरी त्याचं लक्ष मिरा कडे सुद्धा होते . आई मीराला इग्नोर करते आहे हे त्याला आवडले नाही , आणि तो आईसोबत बोलायला म्हणून उठत तिकडे जात होताच की माहीने त्याचा हाताला धरून त्याला तिथेच थांबवले … 

" लेट मी गो , आई मीरा ला इग्नोर करते आहे "... अर्जून 

" नको , त्यांचं त्या दोघी बघतील ".... माही 

" मीरा लहान आहे , तिच्या बालमनावर परिणाम होईल अशाने ".... अर्जून 

" लहान आहे ती , लगेच विसरून जात असतात लहान मुलं , काही नाही होणार … मुळात असल्या गोष्टी लहान मुलांना कळत सुद्धा नाही … आणि आई ला वेळ द्या , त्यांना तिला स्वीकारणे कठीणच आहे . एखादं दत्तक घेतलेले मुल सुद्धा या मोठ्या पिढीला स्विकरण कठीण असते , मग मीरा तर ….".... बोलता बोलता माही चूप झाली . 

" तेच म्हणतोय , आई ला समजवायला हवे "... अर्जुन 

" Sir , जबरदस्ती नातं नाही थोपू शकत , जबरदस्ती केली तर नात्यातील गोडवा निघून जाईल … मनानं स्वीकारू द्या त्यांना … आणि बघा मीराला सांभाळायला घरातील बाकी लोकं आहेतच ( मीराला नलिनी इग्नोर करतेय बघून आजींनी तिला आपल्या कुशीत उचलून घेतले होते , श्रिया आणि आजी तिच्या सोबत खूप गप्पा मारत हसत खेळत होत्या ) , एकाचं चुकलं तर दुसरा सांभाळून घेतो , हीच तर खासियत असते परिवाराची ".... माही अर्जुन ला समजावत मीरा कडे इशारा करत बोलली. 

" आई ला पण कळायला हवे …..".... अर्जून 

" या खडूसला मीरा आपले बाबा बनवू शकली तर त्या तर आई आहे , आजी बनायला वेळ नाही लागणार ".... माही त्याची मस्करी करत बोलली . 

" व्हॉट ?…. खडूस ?".... अर्जून माहीकडे बघत बोलला… त्याचा परत चिडका चेहरा झाला . तो बघून माही ला हसू आले होते , पण तिने ते ओठतच दाबून धरले होते . 

" भाई , खडूस तरी बेटर आहे …. ती तुला ड्रॅक्युला पण म्हणते , पहिल्या दिवशी तुझा रूम मधला तुझा फोटो बघितला होता तर ती ड्रॅक्युला म्हणून किंचाळली होती , अन् ड्रॅक्युला चे बिळ .. काय काय बोलत होती "....... अनन्याने आगीत तेल ओतले … 

" हो , आणि झगडू पण , त्या दिवशी ऑफिस मध्ये म्हणत होती ".... आकाश 

" कसं आहे ना , तुमच्या भावाने खूप कष्ट घेऊन आपली एक खास इमेज बनवली आहे …. सोपी नसते बरं असे अजिबात , लूक बघा त्याचे ".... आशुतोष माही ला टाळी देत बोलला. अर्जुनचा तर चेहरा बघण्यासारखा झाला होता … 

" खरंय खरंय ….. पण असेच भारी गोड दिसतात ते ".... माही अर्जुन कडे बघत भुवया उंचावत बोलली …. तिचं ते बोलणं ऐकून अर्जुनाच्या ओठांवर क्युटशी स्मायल पसरली. 

थोडीफार मस्ती झाल्यावर सगळे जेवायला बसले …. पण अर्जुन मात्र जेवत नव्हता , त्याचं सारखं सारखं लक्ष किचन कडे जात होते.  

" माही ला आताच काय किचन मध्ये जाऊन काम करायची गरज आहे?"... अर्जून स्वतःशीच विचार करत होता. .

" कारल्याची भाजी बनत आहे ".... आशुतोष अर्जुनचं सारखं लक्ष किचन कडे असलेले बघून बोलला. 

" काय ?".... अर्जुन न समजल्यासारखा बघत होता ...

" कारल्याचा ज्यूस बनायची वेळ यायची आहे अजून , तोपर्यंत कारल्याची भाजी एन्जॉय कर मीरा च्या मुलांचा आबा ".... आशुतोष 

" हां?"....अर्जुन तर डोळे मोठे करत आशुतोष कडे बघत होता … 

" वाघोबा च्या पोटात honeymoon … जबरी प्लॅन आहे हा अर्जुन ".... अनन्या 

" अरे तुझा भाऊच जबरी आहे , त्यात तुझी भावजयी महा जबरी ….. जबरी प्लॅन च असणार !" … आशुतोष 

ते ऐकून अर्जुन ने डोक्यावर हात मारून घेतला .." माही !" 

" Yess Mahi ".... अनन्या 

" माही , काय करू तुझं ? तिथे सगळ्यांसमोर बोलतांना त त प प होत होती , आणि इकडे सगळं घरभर करून ठेवले आहे !".... अर्जून सगळ्यांकडे बिचाऱ्या नजरेने बघत मनातच बोलत होता … त्याचा तो बिचारा चेहरा बघून आता मात्र कोणालाच हसू कंट्रोल नाही झाले आणि सगळे जोर जोराने हसायला लागले … 

आता सगळे त्याला हनिमून ला कुठे जाणार इत्यादी विषय घेऊन चिडवू लागले होते … अशीच हसण्यात खिदळण्यात जेवणं आटोपली. 

" बरं माही , मी आलोच चेंज करून , मग निघुया "..... अर्जून

माहीने होकारार्थी मान हलवली ….

" कुठे ?".... अनन्या 

" शॉपिंग ".... अर्जुन 

" लग्नासाठी …."... माही 

" माही ची ".... अर्जुन 

" व्हॉट ? व्हॉट? व्हॉट ? ".... सगळे सीरियल सारखे तीन तीन दा हावभाव करत होते … 

" बापरे , लोकं प्रेमात इतके बदलतात ?".... अनन्या 

" फुलांचा वर्षाव करतात ".... आशुतोष 

" ते पण चाफा lच्या फुलांचा ".... श्रिया 

" How romantic …. हाय ".... अनन्या 

" पेंटिंग करतात "... आकाश 

" Baby , बच्चा , शोना पण म्हणतात ".... अनन्या 

" नाही नाही , ते काय होते , ते आकाश च्या लग्नात …. काय बरं ते "..... आशुतोष आठवायचे नाटक करत होता .. 

" मेरा बेबी , मेरा शोना "..... अंजली हळू आवाजात पुटपुटली .. 

" Yess yess "..... आणि सगळे ते गाणं म्हणू लागले … आणि दोघांच्या भोवती फिरत त्यांना चीडवू लागले … 

" मेरा बेबी , मेरा शोना , मेरा बच्चा , मेरा जानू 

मेरा बेबी , मेरा शोना , मेरा बच्चा , मेरा जानू 

मेरे बाबू ने खाना खाया , मेरे बाबू ने खाना खाया "

अर्जुन ला ते गाणं ऐकून खूप हसू आले होते , अर्जुनला आकाश च्या लग्नात या गाण्यावर त्याला चिडवनारी माही आठवत होती …. 

ते सगळं बघून तर माहीला आता खूप लाजल्या सारखे होत होते , कुठे लपू कुठे नको असे व्हायला झाले होते , पण या लोकांचे बोलणे काय थांबत नव्हते , शेवटी न रहावुन ती अर्जुन जवळ जात त्याला बिलगत आपला चेहरा त्याचा शर्ट मध्ये लपवला , अर्जुन ने सुद्धा एका हाताने तिला आपल्या कुशीत लपवून घेतले … बाकीच्यांनी सुद्धा त्या दोघांना जाऊन मिठी मारली …. सगळ्यांनी मिळून ग्रुप हग केला होता … 

" बस घर असेच हसरे खेळते असू दे , आणखी काय नको ".... त्या सगळ्यांना असे एक बघून आजी देवाला आठवत हात जोडत म्हणाली आणि देवाचा धन्यवाद सुद्धा करत होती . 

********

अर्जुन ने एका भव्य अशा डिझायनर शॉप पुढे कार थांबवली … दोघंही आतमध्ये गेले … माही तर आतमधले सगळं बघून शॉक झाली होती , इतकं भारी ते शहरातले सगळ्यात बेस्ट शोरुम होते … माही कौतुकाने सगळं न्याहाळत होती . डिस्टर्ब नको व्हायला म्हणून अर्जुनने सगळा ब्रायडल सेक्शन बुक केला होता , त्यामुळे इतर कोणी तिथे नव्हते, माही ला मनसोक्त तिच्या आवडी प्रमाणे बघता यावे हाच त्याचा हेतू होता. तिथला स्टाफ माहीच्या आव भगत मध्ये लागला होता … ते तिला घागरा , गाऊन , डिझायनर ब्रायडल ड्रेस , साडी दाखवत होते … पण माही ची नजर मात्र काहीतरी वेगळं शोधत होते ...

" मी माझ्या आवडीचे घेऊ ? ".... माही अर्जूनकडे बघत बोलली

अर्जुन ने होकारार्थी मान हलवली … माहीने एका ठिकाणी बोट दाखवत त्यांना लाल रंगाचा शालू मागितला … 

" Mam , तो खूप सिंपल आहे ".... स्टाफ

अर्जुन ने इशारा केला तसे त्यांनी तो शालू तिच्या पुढ्यात ठेवला…. तो खूप सिंपल पण खूप सुंदर , मऊसूत सिल्की चुटुक लाल रंगाची साडी होती … माही एकटक त्या साडी कडे बघत होती , त्यावरून हात फिरवत होती … आणि अचानक तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमायला लागले … आणि शेवटी काही अश्रू तिच्या गालांवर ओघळलेच . अर्जुनाचे पूर्ण लक्ष तिच्याकडे होते … त्याने एक इशारा केला आणि एका क्षणात सगळा स्टाफ तिथून गायब झाला.. 

अर्जुनने तिच्या हनुवटीला पकडत स्वतःकडे तिला वळवले … " काय झालं ? " … तो तिचे डोळे पुसत बोलला.  

" आमच्या गावात लग्न व्हायचे तर नवरी अशीच साडी म्हणजे शालू नेसतात , लहानपणा पासून खूप आवड होती अशी नवरी बनायची , साडी , दागिने घालून मिरावायाचं … सुंदर सुंदर दिसायचे …. लग्न म्हणजे काय नव्हते कळत , पण तरीही हे स्वप्न बघितले होते मी …."... माही भाऊक होत बोलत होती.

" भविष्याचे खूप सुंदर स्वप्न रंगवले होते मी , पण ती एक वाईट घटना घडली आणि सगळच संपल होतं . आता माझं कधीच लग्न होणार नाही , मी कधीच नवरी बनणार नाही , हा लाल शालू माझ्या नशिबातच नाही असे वाटत होते . जेव्हा पण , टीव्ही मध्ये सुद्धा एखादी नव वधू बघितली की वाईट पण वाटायचे आणि राग सुद्धा यायचा , का आपण असे भविष्य रंगवले , आपल्या हातात नसणारी स्वप्न रंगवली , माझ्या डोळ्यांपुढे माझी स्वप्न तुटताना बघून खूप वेदना होत होत्या … ".... माही रडत रडत बोलत होती 

" Shssss … नाही , आता परत मागे वळून पहायचं नाही , आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत ".... अर्जुन तिला आपल्या कुशीत घट्ट पकडत बोलला. 

" सगळ्यांजवळ अर्जुन असला तर किती चांगले होईल ना …. "... माही त्याच्या कुशीतून बाहेर येत त्याच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेत त्याचा डोळ्यात बघत बोलली … तो प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता .. 

" माझ्या सारख्या प्रत्येक मुलीला अर्जुन मिळाला तर किती चांगले होईल , इथे कुठल्याच मुलीचं स्वप्न तुटणार नाही , कुठलीच मुलगी वेदनेत राहणार नाही , दुःखी राहणार नाही , त्यांचं आयुष्य अपूर्ण राहणार नाही … प्रत्येकी जवळ तुमच्या सारखा अर्जुन असायला हवा सर , तुमच्या सारखा अर्जुन हवा …. पण माझ्या सारखं प्रत्येकीचे नशीब चांगले नसते , बाप्पा ने माझं भाग्य खूप चांगलं लिहलंय , मला आनंदाने जगण्याला एक चान्स दिला …. "... माही ने एक मोठा श्वास घेतला… " सर , मी काही मागू तुम्हाला ? द्याल मला ?".. माही 

" माही , सगळंच तुझं आहे , तुला परमिशन घ्यायची काहीच गरज नाही ".... अर्जुन 

" Sir , माझ्या सारख्या खूप मुली आहेत आपल्या समाजात , घरदार सुटलेल्या , नराधमांनी पीडित असलेल्या …. न्याय व्यवस्था पण काही खास काम नाही करत , आणि करत असली तरी खूप किचकट आहे , सगळी प्रक्रिया खूप मनस्तपदायी आहे , यात परिवार पण तुटतो , ती मुलगी पण , मग एकतर केस मागे घेते नाहीतर आपला जीव तरी सोडते , आणि सगळे केले तर परिवार तरी साथ सोडतो … आणि न्याय जरी मिळाला तरी तिचं पूर्ववत आयुष्य तर तिला परत नाही मिळत ना, समाज तिच्याकडे आधीसारखा नाही बघत , त्याची तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला असतो , तिची स्वप्न तर सगळी तुटून पडतात , तिचं आयुष्य तर उध्वस्त होते , घरावर परिवारावर पण ती ओझं होते , तिच्यामुळे बाकी घर पण उध्वस्थ होतं , बाकीच्यांची आयुष्य पण पणाला लागतात … अशातच ती एकटी पडते .. एकटीने या समाजात स्वतःसाठी लढणे खूप कठीण आहे , कितीही खंबीर होऊन उभ राहण्याचा प्रयत्न केला तरी हा समाज राहू देत नाही , एकटीने आनंदाने जगणं कठीण होते , साथीची गरज असतेच , प्रेमानं समजून घेण्याची गरज असते …. मला माझ्या सारख्या मुलींसाठी अर्जुन बनायचं आहे , मला त्यांची साथ द्यायची आहे , मला त्यांना त्यांच्या पायावर मानाने उभ राहण्यासाठी मदत करायची आहे , त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे , भंगलेले आयुष्य परत आनंदाने जगण्यासाठी मदत करायची आहे … मला त्याचं साथीदार व्हायचं आहे … थोडक्यात मला त्यांचा अर्जून व्हायचं आहे … तुम्ही द्याल माझी साथ ?".... माही 

तिचा एक एक शब्द त्याला टोचत होता …. त्याला कुठेतरी आपल्या समाजाचा राग सुद्धा येत होता , माणसाने माणसासारखे का जगू नये… का पुरातन काळापासून तिच्यासाठी फक्त संघर्षच लिहिला गेला आहे …. 

अर्जुनने होकारार्थी मान हलवली … 

" Sir , आपण साध्या पद्धतीने घरगुती लग्न करू …. नको हा येवढा करोडोंचा खर्च . आपण हे पैसे माझ्यासारख्या मुलींच्या पुनर्वसन साठी वापरू ".... माही 

" माही , डोन्ट वरी , आपण ते सगळं करू , आणि हे पण करू , पैशांची काळजी नको करू …लग्नाचं तुझं हे सुद्धा एक स्वप्न आहे ".... अर्जून 

" Sir , लग्नाचा अर्थ नव्हता कळत तेव्हा याचं कौतुक वाटत होते… आता त्याची गरज नाही वाटत , साथीदार महत्वाचा आहे , आयुष्यभर सुखदुःखात असणारी साथ महत्वाची आहे , ते तर मला मिळाले आहेच … आणि तसे पण आपले लग्न झाले आहेच , आता फक्त दाखवण्यासाठीच करतोय …. आणि तसे पण जे माझ्या संकट काळी सोबत नव्हते , त्यांना लग्नात बोलावायचे तरी का , जो दुख्खात नाही तो सुखात पण नकोय …. जे आपल्या सोबत होते , तेच हवे आहे मला लग्नात , आपले लोकं , फक्त आपले लोकं "..... 

" आणि हे लग्नात खर्च होणारे पैसे कितीतरी आयुष्य उभे करतील आहे , ते असे वाया नको घालवायला ….. तसे पण कितीही चांगले लग्न करा , बोलणारे बोलतातच जेवण बरोबर नव्हते , शेवट पर्यंत टोमणे मारतात ".... माही 

ते ऐकून अर्जून ला हसू आले … " असे काही नसते … "....

" मेरे भोले बाबू , असच असते … काही लोकं चुका शोधायलाच येत असतात …. तुम्ही ऑफिस मध्ये बसले असता… तुम्हाला जगाचं नॉलेज नाही आहे ".... माही त्याचं नाक आपल्या बोटांच्या चिमटीत पकडत बोलली.  

आता तर ते ऐकून तो खळखळून हसायला लागला … 

" आपण आपल्या घरी शांतीसदन मध्ये लग्न करूया आणि सगळं डेकोरेशन मी करेल , चालेल ".... माही 

" Yess baby ".... त्याने तिच्या डोक्यावर किस करत आपल्या मिठीत घेतले … 

" माही कथेची हिरोईन तर तू आहेस …. उगाच मला हिरो बनवून ठेवलंय तू …. मी तर फक्त तुला साथ देतोय … पण घाबरून न जाता , खचून न जाता तू उठून उभी राहिली , हेच तर महत्वाचं असते … स्वतःची साथ दिली तरच जगाची साथ मिळत असते , हे तू करून दाखवले आहे …. किती समजदार आहेस , पण मुद्दाम काही कळत नसल्यासारखी दाखवते , सगळं दुःख एकटी पुरते मर्यादित करून कार्टून सारखी वागते , सगळ्यांना हसवत असते …. अश्रूंची किंमत माहिती आहे तुला … ".... अर्जुन मनातच बोलत ,तिला परत परत आपल्या मिठीत घट्ट पकडून घेत होता …. 

" Love you "..... तिला किती प्रेम करू… असे त्याला झाले होते ..