Login

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 855

माही

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 85

भाग 85

" माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल काय ? , म्हातारे झाल्यावर मी सहारा देईल , कधीच हात सोडणार नाही , हात पकडून ठेवेल जिथे पण जायचं असेल तिकडे . म्हातारं झाल्यावर दात पण नसणार तर नीट बोलता येणार नाही, तर तुमचं व्हॉट व्हॉट पण मीच बोलेल , तुमची आवडती कारल्याची भाजी तुम्हाला खाता नाही येणार तर मी कारल्याचा ज्यूस सुद्धा करून देईल ".... माही 

" No ! हे काय बोलते आहे ?".... अर्जुनचा आवाज आला . 

" खडूस … एकतर मुलगा मुली ला प्रपोज करत असतो ते पण सगळ्यांसमोर , पण नाही.. हे तर जगा वेगळे प्राणी आहे.. माही तू विसरलीच कशी ! काय बोलू आता , यांना मराठी समजत पण नाही आहे , इतकं चांगलं प्रपोज केले तरी कळेना , इंग्लिश मध्ये बोलावं लागले काय ? इंग्रज गेलेत पण यांना सोडून गेले …. मागे किती छान मी माझी प्रपोज करण्याची आयडिया सांगितली होती , दिवस सोबत घालवायचा , टेकडीवर जायचं , हातात हात घेऊन बसायचं , भविष्याचा गोष्टी करायच्या ,भविष्याचा, लग्नाच्या , मुलाच्या ".... त्याचं नो ऐकून आता माही आपल्याच तालात बडबडत होती .. 

" हो , मग वाघोबाच्या पोटातच हनीमून सुद्धा करूया ! "..... अर्जूनचा आवाज आला. 

" व्हॉट ? तुम्ही हे काय बोलत आहात ? ते पण सगळ्यासमोर ? तुम्ही खरंच पागल झाला आहात ".... माही 

" Oh really ?".... अर्जून बोलला आणि सगळे लाइट्स लागले. पुढले दृश्य बघून माही अवाक् झाली … 

पूर्ण हॉल रिकामा होता , अर्जुन एकटा हॉल च्या मधोमध हात पॉकेट मध्ये असा उभा माहीकडे बघत होता … 

" हां !! , सगळे कुठे गेले ? ".... माही आपले दोन्ही हात गालांवर ठेवत डोळे फाडून , आ फाडून ती बघत होती… 

अर्जुन ने सगळे बाहेर गेले असे डोळ्यांनीच इशाराने सांगितले. 

" पण का ? मी सांगितले होते सगळ्यांना मला बोलायचं आहे , त्यांना समजले नाही का मी काय बोलते आहे ते ? सगळे असे कसे करू शकतात? मी बोलत होते ना , आता परत सगळ्यांना आणावे लागेल पकडून ".... माही बडबडत अर्जुन जवळ आली . 

" किती हिंमत करून बोलत होते , आता एकदम सगळ्यांसमोर बोलायचं तर थोडा वेळ तर लागेल ना ? सोपी काम थोडी होते , ड्रॅक्युला … ड्रॅक्युला ला प्रपोज करायचे होते , ते पण त्यांच्याच ऑफिस मध्ये , त्यांचाच स्टाफ समोर, असे काहीही बोलून कसे चालणार होते , हे सगळे असे कसे जाऊ शकतात ? माझी सगळी मेहनत वाया गेली ना , आता परत सगळं नव्याने प्लॅन करावं लागेल " … माही अर्जुन कडे बघत बोलत होती , तिच्या चेहऱ्यावर क्युटवाले टेन्शन दिसत होते … अर्जुन मात्र चुपचाप बोलतांना बदलणारे तिचे चेहऱ्यावरील भाव टिपत होता , बोलतांना होणारी तिच्या नाजूक ओठांची हालचाल , डोळ्यांची उघडझाप , अधूनमधून त्रास देणाऱ्या तिच्या केसांच्या बटा ज्या ती बोलताबोलाता मागे सारत होती , आणि वैतागलेला तिचा गोड चेहरा , ते बघून अर्जुनच्या ओठांवर गोड हसू उमललेले होते आणि तिची बडबड ऐकत होता . 

" पण मी ऑलरेडी तुम्हाला प्रपोज केले आहे , जेव्हा सगळे होते तेव्हाच , आता मी परत नाही करणार हा !".... माही परत प्रपोज करू लागावे म्हणून बोलली.

" अह , तू बोलायच्या आधीच सगळे बाहेर गेले होते , कोणीच काही नाही ऐकले ".... अर्जुन मिश्कीलपणे हसत तिच्याकडे बघत बोलला. 

" काय ?".... माही 

" ह्मम , मीच सगळ्यांना बाहेर जायला सांगितले आहे " .. अर्जुन 

" काय ? तुम्ही … तुम्ही असे केले आहे ? तुम्ही असे कसे करू शकता ? किती मुश्किलीने मी प्रपोज करत होते , त्यात तुम्ही पण किती त्रास देत होते , तुम्ही असे कसे करू शकता ? ".... माही अर्जुनला त्याच्या छातीवर मारू लागली . 

" आऊच !! किती जाडी झालीस , लागते आहे "..... अर्जुनाने खूप जोऱ्याचे लागल्यासारखे नाटक केले.

" मी जाडी काय ? "... माहीने आणखी जोराने मारायला सुरुवात केली . 

" इकडे नको , या साईड ला मार .."... अर्जुन तिला उजव्या साइडला मारायचा इशारा करत बोलला. 

" का ? "... माही 

" इकडे हार्ट आहे , आणि त्यात तू , तुलाच मार बसतोय ".... परत त्याने तिची मस्करी करत तिरकस हसत बोलला. 

त्याचं बोलणं ऐकून तिला रडावं की हसावं कळत नव्हते , पण त्याचा तो चेहरा बघून तिला हसायला सुद्धा आले… 

" तुम्ही खूप आगाऊ आहात "..... अर्जुनला मारायचं थांबत तिने त्याचा भोवती आपले हात घट्ट केले आणि त्याला बिलगली. आणि जशी ती त्याला बिलगली वरतून फुलांचा वर्षाव सुरू झाला… हळुवारपणे त्या दोघांवर फुलांची बरसात होत होती …. आधी तर ते सगळं बघून माही पूर्णच शॉक झाली होती , पण अर्जुनच्या ओठांवरील हसू बघून ती समजायचे ते समजली होती …. आणि ते सगळं बघून खूप हुरळून गेली होती … आपले दोन्ही हात पसरावत वरती फुलांकडे चेहरा करत , डोळे बंद करून सगळं फील करत होती. आणि अर्जुन तिला होणारा आनंद फील करत होता , तिला इतके खुश बघून अर्जुन सुद्धा मनोमन खूप खुश झाला होता . 

" Love you Sweetheart ! ".... अर्जुन तिच्या तिच्या केसांमध्ये अडकलेले एक फुल हातात घेत बोलला. 

" चाफा !! "..... माही त्याचा हातातील फुलाकडे बघून अक्षरशः लहान मुलासारखी आनंदली.

" हो , मला माहिती तुझे फेवरेट फ्लॉवर आहे हे "... अर्जुन 

" हो !".... परत तिला काहीतरी आठवले...

" ते ठीक आहे , पण लग्न कराल ना माझ्यासोबत ?"..... माही बिचारा चेहरा करत बोलली. 

तिचा तो निरागसपणा बघून त्याला हसू आले , होकारार्थी मान हलवत , एका हाताने तिच्या पुढे आलेले केसं तिच्या कानामागे सारत तिच्या कानावर हातातले फुल अडकवले … 

त्याने केलेला तो फुलांचा वर्षाव , त्याचा तिला झालेला तो रेशमी स्पर्श ….त्याचा लग्नासाठी आलेला होकार …. तिला आता स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटत होता , तिचा आनंद इतका मोठा होता की तिला आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागले होते … क्षणाचाही विलंब न करता तिने त्याच्या गळ्या भोवती आपले हात गुंफले , टाचा उंचावून त्याला कळायच्या आताच त्याचा उजव्या गालावर एक छोटंसं गोड किस केले आणि त्याला घट्ट मिठी मारली … 

अनपेक्षितपणे अचानक तीनेने दिलेले हे गिफ्ट त्याला खूप भावले , ओठ आणखीच रुंदावले , तिच्या डोक्यावर किस करत तिला आपल्या हृदयाच्या अगदी जवळ आपल्या मिठीत सामावून घेतले. 

फुलांचा वर्षाव थांबला तसे माही भानावर आली , आणि तिला काहीतरी आठवले … 

" सगळ्यांना बाहेर का हाकलले ?"... माही 

" हाकलले नाही , पाठवले ".... अर्जुन 

" तुमचं हाकलने आणि पाठवणे दोन्ही सेमच असतं ".... माही 

" ते मॅजिकल वर्ड्स जे तू बोलले नाही पण मी ऐकले , ते फक्त माझ्या साठी होते , तर फक्त मी च ऐकायला हवे … आणि हे फक्त आपल्या दोघांमधले होतं , तिसरा कशाला हवा त्यासाठी ? ".... अर्जून 

" हां !! "... माही परत शॉक होत त्याचाकडे बघत होती … त्याला हसू आले… 

" सगळ्यांसमोर प्रपोज करण्याचा हट्ट का केला मग तुम्ही ? मला सतावण्यात मजा येते ना तुम्हाला ?".... माही 

" तू चिडली की फारच गोड दिसते … आणि सगळ्यांसमोर च म्हणशील तर मला बघायचं होतं जे तू बोलते ते खरंच करते काय , मला बघायचं होतं तू स्वतःसाठी , स्वतःच्या आवडीनिवडी साठी , स्वतःच्या प्रेमासाठी सगळ्यांसमोर बोलू शकते काय ? न घाबरता सगळं कबूल करू शकते काय ? माझ्यासाठी माझ्या बाजूने , सगळ्यांसमोर माझा हात पकडू शकते काय ? म्हणून , बाकी मला तू बरोबर च ओळखले आहे , सगळ्यांसमोर मला नाहीच आवडत असे "... अर्जून 

" काय ? परीक्षा घेत होता माझी ? आणि तुम्ही मला नकार का दिला माझ्या नातवंडांचे आबा बनायला ?".... माही 

" असं प्रपोज कोण करतं ? ".... अर्जून 

" किती भारी वाले प्रपोज केले , मी तुम्हाला आपलं पूर्ण फ्युचर दाखवले , मी तर तुम्हाला म्हातारं झालेले , दात नसलेले पण इमॅजिन करून घेतले होते , किती क्यूट दिसत होते तुम्ही , सगळं वाया गेले ना ?".... माही 

ते ऐकून अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला .. 

" Maahi , you are seriously impossible , तुझा मेंदू देवाने उलटा फिक्स केलाय "... अर्जुन 

" नकार का दिला ते सांगा ?"... माही 

" तू मोठी होणार नाहीस , इफेक्ट लहान होत चालली आहे तू , आणि मी एकटा म्हातारा होऊ काय ? बकवास डील होती ".... अर्जून 

" डील ? "..... माही 

" I want you in every birth !" … अर्जुन 

" बाप्पा वाचव , मला वेड लागेल आता यांना असे बघून !! फारच बदमाश झाले आहात तुम्ही , खूप सतावत असता मला "... माही

" तू किती त्रास दिला आहेस मला , हे तर काहीच नाही त्यापुढे …. सगळं वसूल करणार आहो मी … so be ready ".... अर्जून 

" ठेंगा !"... माही 

" हा हा हा , आता हे सगळं work नाही करणार "... अर्जुन 

" ते फुलं आपोआप कसे पडायला लागले ?"... माही 

" कॅमेरा लागला आहे , आकाश ला सांगितले होते तू माझ्या मिठीत येशील तेव्हाच फुलांचा वर्षाव करायचा "... अर्जुन 

 " काय , तिकडे कॅमेरा मध्ये आकाश sir बघत होते ? मग मी तुम्हाला किस केले ते पण बघितले असेल त्यांनी ? शी तुम्ही खूपच खराब आहात ".... माही परत त्याला मारायला लागली .. अर्जुनने आता तिच्या मनगटाला पकडून स्वतःकडे ओढत तिच्या कंबरे मधून हात घालत आपल्या एका हाताने तिला घट्ट पकडून ठेवले , आणि दुसऱ्या हाताने पँट च्या खिशात असलेला एक छोटासा रिमोट काढत त्यातली एक बटन दाबली , तसे परत फुलांचा रिमझिम पाऊस सुरू झाला … परत बटन प्रेस केली तर फुल खाली यायची थांबली , मग परत बटन प्रेस केली तर परत मऊशार फुलं खाली माही आणि त्यांच्या अंगावर येऊ लागली . आता माहीला सगळच कळले होते , स्वतःच्या मूर्खपणावर तिला हसू येत होते …. आता मात्र ती लाजून खाली बघत होती … 

" बुद्धूराम !"... म्हणत अर्जुन ने तिला आपल्या कुशीत घेतले. 

" ये इकडे , काही तरी दाखवतो ".... म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि पुढे चेअर वर नेऊन बसवले आणि प्रोजेक्टर च्या स्लाईड शो सुरू केला… त्यावर आधी माही आणि अर्जूनचे फोटो सुरू झाले … 

" हे काय ?"... माही 

" बघ , कळेलच ".... अर्जुन 

" हां , मी अशी दिसते काय ?" … आता कार्टून सारखे ड्रॉइंग केलेले फोटो यायला लागले … स्वतःचा कार्टून केलेले फोटो बघून ती डोळे मोठे करत अर्जूनकडे बघत बोलली.

 " आता कार्टून असं नाही दिसणार तर कसे दिसणार ! मी ड्रॉ केले आहे ".... तो हसतच बोलला. 

" काय ? असं ?" …. माही 

" यार मी काय आर्टिस्ट नाही तुमच्या त्या नंदिनी सारखा , आपला तोडका मोडका प्रयत्न केलाय "..... अर्जुन बोलतच होता की माही स्क्रीन कडे बघत खळखळून हसत होती … माही ला भेटल्या पासून सगळे जे कॉमेडी क्षण होते ते त्याने लहान मुलासारखे भयंकर बालिशपणे काढलेले होते , माहीचा सगळं वेंधळेपणा , जास्तीत ती खाली पडली असायची ते पिक्चर होते … ते सगळं बघून तिला खूप हसू येते होते … आणि आता एक एक फोटो आला की तेव्हाची तिची अर्जुन सोबत झालेली फाईट तिला आठवत होती , आणि मग ती तेव्हा अर्जुन अर्जुन कसा वागत होता त्याची नक्कल करून दाखवत होती . ते सगळं बघत तिची काँटिण्यु बडबड सुरु होती . बोलता बोलता हळू हळू ती अर्जुन जवळ सरकत तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. 

आता स्क्रीन वर अर्जुनने तिचे तिच्या नकळत काढलेले फोटो येऊ लागले होते . आकाश च्या लग्नाच्या शॉपिंग चे जिथे माही अगदी माधुरी दीक्षित सारखे हाव भाव करत होती ते , आकाश च्या लग्नात मेहंदी लावताना , रंगीबिरंगी बांगड्या भरतांना आणि त्या सोबत खेळताना असे बरेच फोटो होते . खूप अप्रतिम असे ते सगळे फोटो काढल्या गेले होते … तिचे निरागस डोळे , तिचं निखळ हसू , तिचा झुमका , तिच्या बांगड्या … मनमोहक असे ते सौंदर्य फोटो मध्ये टिपल्या गेले होते .. माही अक्षरशः शुद्ध हरपून ते बघत होती … ते बघता बघता ती कधी अर्जुनच्या मांडीवर जाऊन बसली तिला सुद्धा कळले नाही … 

" मी इतकी सुंदर आहे ? ".... माही अर्जुनच्या गळ्यात हात टाकत त्याचाकडे बघत बोलली . त्याने होकारार्थी मान हलवली … त्याचा होकार बघून तिच्या ओठांवर गोड असे हसू उमलले, आपोआप तिचे गाल लाल व्हायला लागले … तेवढयात तिचे लक्ष परत स्क्रीन वर गेले तर आता थोड्या वेळ पूर्वी तिने अर्जुनच्या गालावर किस केले होते तो फोटो आला होता… ते बघून आतापर्यंत सुरू असणारी तिची बडबड एकदम बंद झाली , आता तिला खूप लाजल्यासारखे झाले , तिचा चेहरा ब्लश करत होता , डोळ्यात लाजेची किनार पसरली , हृदयाची धडधड वाढली . तिला तिच्या त्या गोड भावना असह्य झाल्या आणि तीन गरकन वळत अर्जुनच्या शर्टाच्या कॉलरला पकडत त्याच्या मानेजवळ आपला चेहरा लपवला …. तिचं असं जवळ असणे त्याला बेधुंद करत होते , तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते , तिच्या ओढणीचा मऊशार स्पर्श त्याच्या हाताला होत होता … त्याची माही , फक्त त्याची माही त्याचा जवळ होती… आणि न राहवून तो पण तिच्याकडे आकर्षित होत होता … त्याने तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला …. त्याच्या डोळ्यातील प्रेमळ चमक बघून तिला कळले होते तो पुढे काय करणार आहे , आणि त्यासाठी मुक संमती दाखवत तिने आपले डोळे बंद करून घेतले , तो हळू हळू तिच्या ओठां जवळ जात होता …तेवढयात माहीला काही आठवले आणि तिने झटकन डोळे उघडले..

" तुमचा मोबाईल द्या ! ".... माही झटकन बोलली. 

" व्हॉट ?".... अर्जून  

" मोबाईल ?"... माही हात पुढे करत बोलली . 

" का ?".... अर्जुन 

" तुम्ही परत फोटो काढला तर ?".... माही 

" Seriously Mahi ? तू येवढ्या साठी रोमान्स , माझा किस स्पॉइल केला ? अँटीक आहेस तू … अनन्या ताई बरोबर म्हणते , कसं होणार आहे माझं ?... कठीण आहे ".... वैतागलेल्या चेहऱ्याने त्याने त्याचा मोबाईल तिच्या हातावर ठेवला .. 

" या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होता … आता तुम्ही प्रत्येक जन्मासाठी माझ्यासोबत फसले आहात … सो नो चांस ".... माही 

" ह्मम ! देव पुढल्या जन्मात बुद्धी वाटत असेल , प्लीज तेव्हा तरी झोपू नको , नीट लक्ष दे ".... अर्जून मस्करी करत बोलला.

" काय ? तुम्ही परत सुरू झाला ? मी सोडणार नाही तुम्हाला आता "... ती त्याला मारायला पुढे आली , तसा तो तिथून पुढे पळाला … " नको सोडुस , पण at least next बर्थ मध्ये डोकं असलेली माही मिळू देत ".... अर्जुन

बऱ्याच वेळ दोघांचा गोंधळ घालून झाला … 

***********

माही आपल्याच आनंदात आपल्या डेस्क वर जाऊन बसली . तिचं आता अजिबात कामात मन लागत नव्हते. आकाश दिसला की तिला भारीच लाजल्यासारखे व्हायचे … तो पण हसुन चालला जायचा. ऑफिस संपायची वेळ होत आली होती की तेवढयात अर्जुन सगळं स्टाफ असतो तिथे आला. त्याला तिथे आलेले बघून सगळे आपापल्या जागी उभे राहिले. 

" Good evening guys !"... अर्जून एकदम रुबाबात उभा बोलला. 

" खूप महत्वाचं सांगायचं आहे !"... अर्जून 

सगळे त्याचाकडे बघत होते … की आता अर्जुन परत काय बॉम्ब टाकणार आहे … माही सुद्धा त्याचाकडे बघत उभी होती … 

" मिस माही , प्लीज कम धीस साईड "... अर्जून 

अर्जुनचे ऐकून माही त्याचा जवळ जाऊन उभी राहिली ..' आतापर्यंत तर सगळं ठीक होतं , आता अचानक काय झाले… काय महत्वाचं बोलायचं असेल?' ती विचार करत होती. 

" Meet my life … Mahi , we are getting married soon ! ".... अर्जुन 

ते ऐकून सगळेच खूप आश्चर्य चकित झाले …. माही सुद्धा पुरतीच गोंधळली होती , सगळ्यांप्रमाणे तिच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्का होता .. अर्जुन सगळ्यांसमोर असे काही बोलेल तिला अपेक्षित नव्हते . तिला तर मान वर करून सगळ्यांकडे बघणं कठीण झालं होते .. माही तर अर्जुन ला खाऊ की गिळू नजरेने बघत होती . 

" Congratulate नाही करणार काय ? "... सगळे शुद्ध हरपल्या सारखे अर्जुन कडे बघतांना बघून अर्जुन हसत बोलला. तसे सगळे भानावर आले आणि अर्जुन हसतोय बघून त्यांना पण थोडं रिलॅक्स वाटले. 

" Offcourse sir , many many congratulations Sir ! "... Staff एकापाठून एक बोलत होते . 

" Thanks a lot everyone …. Now get back to your work ".... हसतच त्याने माही कडे बघितले आणि तो आपल्या केबिन कडे जायला वळला. 

तो जसा वळला सगळ्यांनी माही भोवती घोळका केला , नी हे कसं झाले वैगरे तिला प्रश्न विचारू लागले … त्यांचा गलका ऐकून ऐकून मागे फिरला … 

" Remember , ती माझी बायको आहे ! ".... अर्जुन चा आवाज आला तसे सगळे शांत झाले … माहीकडे बघत एक डोळा मारत तो हसतच आपल्या केबिन मध्ये निघून आला. 

माहीच्या मैत्रिणी तिला प्रश्न विचारुन हैराण करत होत्या , तिला अर्जुनाच्या नावाने चिडवत होत्या … माही तर लाजून पार पाणी पाणी झाली होती. 

********

माही अर्जुनाच्या केबिन मध्ये आली ..

" तुम्ही , असं , अचानक , सगळ्यांसमोर …. कसं बोलू शकता ?".... माही 

" ऑलरेडी बोलून झालंय ".... अर्जुन 

" पण का ?"... माही 

" चुकीच्या पद्धतीने माहिती पडण्यापेक्षा , योग्य वेळी सांगितलेले बरं असते माही . मला काही फरक पडत नाही कशाचा , पण तुझे फ्रेंड्स आहेत ते , तुला खूप फरक पडतो , म्हणून … तुला कोणी चुकीचं बोलू नये म्हणून … चांगलं वाईट काहीही झाले तरी आपल्याकडे दोष आधी मुलीलाच दिला जातो , आपल्या रिलेशन बद्दल चांगले बोलणारे असतील तसे वाईट बोलणारे पण आहेच ...म्हणून … कळलं काय मावशी बाई !".... अर्जून ब्लेजर काढत , स्लीवस च्या बाह्य वर फोल्ड करत बोलत होता …. त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आताच माही परत त्याला बिलगली होती . त्याचा सुद्धा लक्षात आले ती आता भावूक झालेली आहे … त्याने पण तिला आपल्या जवळ घेत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. 

********

फायनली प्रपोज करून झाले होते , दोघांचे लग्न ठरले होते . दोन्ही घरामध्ये लग्नाची तयारी सुरू झाली होती . 

अर्जुन आणि माहीचे लग्न होत आहे ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली . बिजनेस वर्ल्ड मध्ये सुद्धा अर्जुनच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या. अशातच ही बातमी माही चा भाऊ मनीष याच्या पर्यंत पोहचायला वेळ नाही लागला. ते ऐकून मनीष सुद्धा खूप खुश झाला होता . माही सोबत भेटायची त्याला खूप इच्छा होत होती पण माही कुठे राहते त्याला माहिती नव्हते , आणि घरी त्याचे वडील अर्जुन आणि माही सोबत जे वागळे होते त्यामुळे अर्जुनला भेटायची, त्याचा सोबत बोलायची त्याची हिम्मत होत नव्हती. त्याने माहीच्या लग्नाची बातमी मंजू ला सांगितले , पण ती ते ऐकून काही इतकी खुश झाली नव्हती . वरतून तिच्याच बद्दल उलट सुलट काही काही बोलत होती. ते ऐकून बोलून काही फायदा नाही मनीष ला कळले होते . 

********** 

क्रमशः