Jan 27, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 84

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 84

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 84

 

 

भाग 84

 

घरात सगळ्यांच्या मनावरील मळभ दूर झाले होते , प्रत्येक नात्याने , व्यक्तीने पुरेपूर वेळ घेऊन स्वतःसाठी , घरासाठी योग्य ते निर्णय घेतले होते . घरात सगळ्यांच्या मनासारखं होत होते . या सगळ्यात जास्त खुश होती ती लहानगी मीरा , आई बाबा दोघंही मिळाल्याचा आनंद , एकत्र सोबत राहण्याचा आनंद , की तिला तिचा हक्काचा परिवार मिळाला होता … काय, किती कळत असावे त्या निरागस पिल्लुला ? … पण ती खूप खुश होती . 

 

सगळे खुश होते पण माही मॅडम मात्र टेन्शन मध्ये होत्या … अर्जुन ला प्रपोज करायचय असते तर लगेच झाले असते पण सगळ्यां समोर ते पण ऑफिस मध्ये … तिच्यासाठी खूप अवघड होऊन बसले होते . त्यात अर्जुन तिला अधूनमधून मेसेज करून अजून आठवण करून देत होता … आयुष्यात हा आलेला नवीन मोड एकअर्जुन खूप आनंदाने एन्जॉय करत होता … प्रेमाच्या नावाने चिडणारा .. चिडका , खडूस , ज्याला हसू सुद्धा येत नव्हते , हसला तरी असे वाटायचे उधारीवर हसत आहे … तो अर्जुन प्रत्येक क्षण आता जगू लागला होता … स्वतःतच हसू लागला होता … आणि माहीला छेडण्याचा एक पण मोका सोडत नव्हता. 

 

 

 ………………………

 

माही ऑफिस मध्ये आली आणि पार्किंग मध्ये ती तिची स्कूटर पार्क करत मागे फिरली की तिला अर्जुन दिसला. तो त्याचा कार ला टेकून , डोळ्यांवर काळा गॉगल , ओठांवर तिरकस स्माईल , आपले हात पॉकेट मध्ये घालून उभा तिच्याकडे बघत होता … 

 

" बापरे , हे खडूस कसलं गोड दिसत आहे , त्यात तो काळा चष्मा त्यांचं खडूस लूक पण झाकत आहे ".... माही मनातच बोलत आपल्या डोक्यावरील हेल्मेट काढायचा प्रयत्न करत होती , पण ते निघत नव्हते… निघणार कसे , तिचं सगळं लक्ष अर्जुनमध्ये होते …. अर्जुन तिची सुरू असलेले धडपड बघत उभा होता …. तिला बघून आता त्याचा ओठांवर खट्याळ स्माईल आले … आणि त्याने तिथूनच माहीला फ्लायिंग किस दिले …… झालं , ते बघून माही तर पुरतीच बावरली …. आधीच हेल्मेट निघत नव्हते , आता तिच्या हातातील बॅग सुद्धा खाली पडली ….ते बघून अर्जुन हसतच तिच्याजवळ गेला … 

 

" आधी हे काढावं लागते , स्वीटहार्ट "..... अर्जुन तिच्या हेल्मेटचे बकल काढत तिचे हेल्मेट बाजूला काढत बोलला. माही तर त्याला डोळे मोठे करून बघत होती .. 

 

" तुम्ही , इथे काय करत आहात ? आणि हे काय , तुम्ही आता काय करत होते ? "... माही

 

" काय करत होतो ?".... अर्जुन भोळेपणाचा आव आणत तिच्याकडे मिश्कीलपणे बघत होता.  

 

" हेच , तिथे कार जवळ उभे होते तेव्हा ".... माही 

 

" काय ? "..... अर्जुन  

 

" तेच ".... माही 

 

" म्हणजे ?".... अर्जून 

 

" खडूस ….".... माही 

 

ते ऐकून अर्जुनला हसू आले… त्याने परत ओठांनीच तिला किस करण्यासारखी अँक्शन केली ...

 

" हेच … हेच … या आधी पण हेच केले होते तुम्ही … तुम्ही इथे हे असे कसे करू शकता ?"... माझी 

 

" माझं ऑफिस आहे , मी कुठेही काहीही करू शकतो , कोणाची हिम्मत मला काही बोलायची ?"...... अर्जुन 

 

" You are impossible !"..... माही 

 

" Ha ha ha ha , I know ….. but good progress हा माही , I am impressed ".... अर्जून 

 

" तुमच्या सोबत बोलून काहीच फायदा नाही ".... माही आपली बॅग सांभाळत पुढे जायला निघाली . 

 

" माहीया वे आजा माही …. माहीया वे आजा ".... अर्जून गाणं गुणगुणयला लागला . ते ऐकून माहीला हसू येत होते … " अगदीच एखादं लहान मूल प्रेमात पडते , तसेच करत आहेत हे …"... ती मनाशीच बोलत मागे फिरली आणि त्याचा जवळ आली .. 

 

" हे ऑफिस माझं पण आहे … ना ना ना ना माझंच आहे आणि हे टॉप वर आणण्यासाठी माझ्या नवऱ्याने खूप मेहनत घेतली आहे तर मला हे असं सगळं चालणार नाही ऑफिस मध्ये , मी खपवून घेणार नाही हा "..... माही अर्जुन पुढे एक बोट दाखवत बोलली .

 

" Oh , seriously ? " …. त्याने आपल्या बोटात तिचा बोट फसवला …. 

 

" हो …. "... माही त्याचा बोटातून आपला बोट सोडवायचा प्रयत्न करत होती … पण तो सुद्धा सोडायला अजिबात तयार नव्हता… आणि बोलता बोलता त्यांचे दोन दोन शब्द वाढत होते. 

 

" झगडू ".... माही 

 

" हा हा हा हा …. Again one more name ".... अर्जून हसायला लागला. 

 

" सर ….".... माही हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती

 

" अर्जून ".... अर्जून

 

" सर "..... 

 

" अर्जून "..

 

" सर "... 

 

" अर्जून "... 

 

" ओह , मिस्टर रॉय …. येस प्लिज ".... माही अर्जूनच्या मागे बघत बोलली 

 

" बकवास अँड ओल्ड ट्रिक , मी तुला जाऊ देणार नाही "..... अर्जून 

 

" As you wish ".... माही 

 

" मिस्टर पटवर्धन , गूड मॉर्निंग ".... मिस्टर रॉय तिथे येत बोलले… त्यांचा आवाज ऐकून अर्जुन ने झटकन माही चा हात सोडला . 

 

" बोलती बंद "... माही ने हसतच त्याला एक डोळा मारला … तसा तो थोडा बावरला. 

 

 

" Ohh Good morning Mr Rai …. मिस माही , मेहता ग्रुप ची फाईल घेऊन या केबिन मध्ये … ".... अर्जून स्वतः ला सावरत बोलला. 

 

तरी माही त्याला बघत हसत होती. 

 

" Now go ".... अर्जून 

 

" Are you sure sir ? , म्हणजे मी जाऊ शकते ?"... सर या शब्दावर जोर देत ती बोलली.

 

" Yes please "..... अर्जुन 

तशी माही तिथून पळाली…. 

 

अर्जुन मिस्टर रॉय सोबत बोलत उभा होता ...

 

मागे वळून वळून बघत माही पुढे जात होती .दूर जाऊन तिने अर्जुनला फ्लायिंग किस केले … अर्जुन मिस्टर रॉय सोबत बोलता बोलता तिच्याकडे बघत होता … जसे तिने फ्लायिंग किस केले अर्जून ला खूप लाजल्या सारखे झाले , त्याचे गाल लाजून गाल झाले , आणि लाजरे गुजरे हसू त्याचा ओठांवर पसरले … कुठून हा रॉय मध्ये आला असे त्याला वाटत होते.. 

 

 

माही आपल्या जागेवर जाऊन बसली आणि कामात गुंग झाली . पण अर्जूनचे मात्र चित्त थाऱ्यावर नव्हते , त्याचे कुठल्याच कामात मन लागत नव्हते. त्याने त्याचे मॅक्सीमम काम आकाशाकडे च पाठवले होते .तो आपल्या केबिन मध्ये बसला समोर दिसणाऱ्या माहीकडे बघत होता . 

 

" माझं इथे लक्ष उडवून ही कशी काय बिनधास्त राहू शकते ? मिस्टर पटवर्धन असेच सुरू राहिले तर तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही पूर्णपणे कामातून जाल ".... " ना दूर , ना जवळ … हे काय अजब अवस्था झाली आहे ? … पण छान आहे , नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे , काहीतरी असे जे हवेसे वाटते आहे "..... " Oh अर्जुन , मजनू टाईप विचार करायला लागला तू तर …. खरंच चांगल्या चांगल्या लोकांना वेडं बनवते हे प्रेम ….. "..... माहीला बघत अर्जुन स्वतःशीच हसत होता . 

 

ऑफिस मध्ये अर्जुन माहीला सतावण्याचा एक पण चान्स सोडत नव्हता , आणि तिला प्रपोज बद्दल आठवण करून देण्याचे पण विसरत नव्हता. माही पण त्याला आपल्या परीने उत्तर द्यायची , पण कधी कधी तो असा वागायचा की तिची सुद्धा बोलती बंद व्हायची. 

 

एक मीटिंग आटोपून अर्जुन आणि आकाश बोलत बोलत अर्जूनच्या केबिन कडे येत होते . समोरून माही काही फाईल्स घेऊन स्वतःशीच बोलत येत होती . माहीचे लक्ष अर्जूनकडे गेले तसे त्याने हसतच तिच्याकडे बघून एक डोळा मारला … माही तर त्याला बघून शॉक झाली , त्याच्याकडे बघत पुढे जाऊन राजू ( पिऊन ) ला. धडकली . काहीतरी फुटण्याचा आवाज झाला ….

 

" माही !!"..... आकाश 

 

" हा हा हा हा , तीच आहे "..... अर्जून , दोघंही मागे वळून बघितले तर राजूच्या हातातला ट्रे खाली पडला होता . 

 

" Mahi , are you okay ?" … आकाश , आकाशने राजूला डोळ्यांनी खुणावले तसे तो तिथून चालला गेला. अर्जुन पण तिथे आला . 

 

" हो ".... माही खाली पडलेले पेपर उचलत होती. 

 

" माही , ठीक आहेस ? अशी कुठे बघून चालत होती ?" ...आकाश तिला मदत करत बोलत होता. अर्जुन मात्र तिला बघून हसत होता. 

 

" हे … हे सगळं यांच्यामुळे झालंय ! ".... माही अर्जुन कडे इशारा करत बोलली 

 

" व्हॉट ?".... अर्जुन काही न कळल्याचे नाटक करत शॉक लागल्यासारखे हावभाव करत बोलला. 

 

" त्याने काय केले ? तो तर माझ्यासोबत बोलत होता ".... आकाश 

 

" Yess , मी काय केले ? ".... अर्जुन भोळा भाबडा चेहरा करत बोलला. 

 

" यांनी ना…. ते ….."... ती बोलणार तेव्हड्यात तिचं आकाश कडे लक्ष गेले ..आणि तिला बोलायला अवघडल्या सारखे वाटले आणि ती चूप झाली . 

 

" Yes please ? ".... अर्जून

 

" काही नाही …. ".... माही , पेपर फाईल मध्ये नीट करत बोलली. 

 

" तेच तर … उगाच माझं नाव मध्ये घालायचं … आकाश तुला काय नवीन आहे काय हे … ही आहेच अशी धांदरट , बावळट ".... अर्जुन परत तिची मस्करी करत होता … परत त्याने तिला फ्लायिंग किस केले . अर्जुन कोणालाच घाबरत नाही आणि आकाश पुढे पण असा करतोय बघून तिचे डोळे मोठे झाले.. शॉक होत ती त्याला बघत होती. 

 

 

 

" आकाश सर , तुमचे भाऊ ना , पागल झाले आहेत … सकाळपासून अजीब अजीब हरकती करत आहेत … ".... माही 

 

" सकाळ पासून ? बापरे ,काय केले याने ?"... आकाश ओठात हसू दाबत बोलला. त्याला पण आता त्या दोघांमध्ये सुरू असलेले , अर्जुन तिला त्रास देतोय ते कळले होते. 

 

" हा , सांग माही , मी काय केले ? ते काय आहे ना आकाश , तिने सगळ्यांपुढे प्रपोज करायचं प्रॉमिस केले आणि आता तिला ते जमत नाहीये , म्हणून उगाच माझ्यावर काय काय आळ आणते आहे , मला त्रास देते आहे " … अर्जून बिचारा चेहेरा करत बोलला. 

 

" हां ? "... माही डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती . " मी त्रास देते आहे ? हे सकाळपासून माझ्या सोबत झगडा करत आहेत … झगडू कुठले "... माही 

 

" मी काय वाद केला ? ".... अर्जून 

 

" नाही तर काय , सकाळपासून कोण खोड्या काढत आहे ? "... माही 

 

" Ohh , really ? Okay , तू जसे म्हणशील तसे , मी खोड्या केल्या तर ,मीच … तुझ्या खुशी साठी काही पण "... अर्जून तिच्याकडे बघत मिश्कीलपणे हसत होता , त्याचं ते हसू मधून सुद्धा चिडवने बघून माहीला इरीटेट होत होती… 

 

" आकाश सर , यांना समजावून ठेवा हं , नाहीतर मी ना ... "..... माही 

 

" नाहीतर काय …?" … अर्जून 

 

" नाहीतर मी …. नाहीतर ….. ".... माही अडखळत होती

 

" काहीच करायची हिंमत नाही आहे ".... अर्जून 

 

" खडूस ".... माही

 

" I know sweetheart " … अर्जुन 

 

माही ने अर्जुनला एक खुन्नस वाला लूक दिला आणि पाय आपटत तिथून निघून गेली..

 

तिला चिडून जातांना बघून अर्जुन आणि आकाश हसायला लागले. 

 

" काय रे भाई तू पण … का उगाच खोड्या काढतोय तिच्या ?".... आकाश 

 

" हा हा हा …. आजकाल भयंकर चीडायला लागली आहे "..... अर्जून 

 

" ह्मम , संगत चा असर ".... आकाश 

 

अर्जुन ने त्याचाकडे भूवयी उंचावत बघितले , आणि हसायला लागला. दोघंही काही डिस्कस करत पुढे निघून गेले. 

 

माही बडबड करत आपल्या जागेवर येऊन बसली . तिच्या फाईल मधले सगळे पेपर वरखाली झाले होते . ती ते अरेंज करत होती , पण डोक्यात तर अर्जुन होता , तिचं एकपण काम ठीक होत नव्हते …

 

" समजतात काय स्वतःला ? मला काय करता येत नाही की काय ? माही , आता त्यांना करूनच दाखव , त्याशिवाय ते ऐकणार नाही "... स्वत:शीच बडबड करत ती अर्जूनच्या केबिन पुढे येऊन उभी राहिली ..

 

" माही , तू इथे आली तर , पण करणार काय ? सगळ्या ऑफिस पुढे कसे काय प्रपोज करणार?

सगळे माझ्याकडे किती अजब नजरेने बघतील , बॉस ची बायको म्हणून माझ्याशी मैत्री तोडली तर ? माझ्यासोबत बोलणं कमी केले तर ? नाही नाही असे कसे होणार ? मी मैत्रीण आहे त्यांची , ते नाही तोडणार … पण प्रपोज नाही केले तर हा ड्रॅक्युला मात्र खूप त्रास देईल … शी बाबा , काय करू काही कळत नाही आहे "... माही एकटीच बडबडत होती. अर्जुन तिला बघत बसला होता … त्याला खूप हसू येत होते. 

 

" मिस माही , आतमध्ये या "... अर्जून 

त्याचा आवाजाने ती आपल्या तंद्रीतून बाहेर आली , आणि दार उघडून आतमध्ये गेली. 

 

" बोला ...काय ?"... अर्जून 

 

" मी … मी तुम्हाला प्रपोज करणार … ते पण उद्याच ".... माही

 

" ओह , ग्रेट !"... अर्जुन 

 

" मी खरंच करणार आहे "... माही 

 

" Yeah , go ahead ! ".... अर्जून 

 

" उद्या जे प्रेझेंटेशन , मीटिंग आहे , ते संपल्यावर मी तुम्हाला तिथेच सगळ्यांपुढे प्रपोज करेल ".... माही 

 

" Good ".... अर्जून 

 

" यांना तर काहीच वाटत नाहीये , थांबवत पण नाही आहे ".... माही मनातच विचार करत होती. 

 

" मी खोटं बोलत नाहीये "... माही 

 

" I believe in you ".... अर्जून 

 

" Now , wait and watch ".... माही 

 

" Yeah baby , I am waiting".... अर्जून 

 

" Baby ? …. तूम्ही ना माझ्या डोक्यात जायला लागलात "... माही 

 

" आणि तू माझ्या दिलात "... अर्जून 

 

" दिलात ?".... माही कसातरी चेहरा करत त्याचाकडे बघत होती . 

 

" In heart "... अर्जून 

 

" बाय ".... माही परत पाय आपटत बाहेर जायला वळली 

 

" उद्याचं पक्क आहे ना ? , की घाबरशिल ?".... अर्जून 

 

" माही कशाला घाबरत नाही "... माही , आपल्या जागेवर जाऊन बसली. 

 

आज पूर्ण दिवस त्याने तिला सतावण्यात घालवला होता .

 बोलून तर आलो ,पण काय करू , कसे करू .. माहीच्या मात्र डोक्यात तेच सुरू होते . 

……………………….

 

घरी मोठ्यांनी मिळून महाराजांकडून लग्नाची तारीख पक्की केली होती . त्याप्रमाणे सगळे कामाला लागले होते . 

 

…………………

 

 

ऑफिस मध्ये कॉन्फरन्स हॉल मध्ये एक मीटिंग होती .. त्यात माहीचे सुद्धा प्रेझेंटेशन होते . त्या नंतर च सगळ्यांसमोर बोलायचं तिने ठरवले होते. घरून निघतांना सगळ्यांनी माहीला बेस्ट ऑफ लक दिले , सगळ्यांचे असे वागणे बघून तिचे आणखीच टेन्शन वाढले होते. ती कशीबशी ऑफिस का पोहचली होती. 

 

मीटिंग साठी अर्जुन आणि आकाश हॉल कडे जायला निघाले, बाजूने जातांना माही दिसली … 

 

" All the best !".... अर्जुन 

 

" माही , जास्ती बोलू नको , नाहीतर हे बोलायचे थांबणार नाही , फोकस कर आपल्या प्लॅनिंग वर, निघ इथून पटकन ".... माही मनाशीच बोलली आणि एक बॉक्स टाईप स्मायल देत तिथून निसटली. 

 

" हिला काय झालं ? मी तर प्रेझेंटेशन साठी बोललो होतो ".... अर्जून 

 

" भाई , टेन्शन … ".... आकाश 

 

" कशाच? प्रेझेंटेशन तर ती आता खूप छान देते ".... अर्जुन 

 

" भाई , प्रपोज … ती तुला आज प्रपोज करणार आहे ".... आकाश 

 

" Ohh , yes yes … आपलं प्लॅनिंग झाले आहे ?"... अर्जुन 

 

" All set! ".... आकाश 

 

" Good ! Let's go then "... अर्जुन 

 

वर्षातून दोनदा अशी मीटिंग व्हायची , सगळा स्टाफ कॉन्फरन्स हॉल मध्ये जमायचा . प्रत्येक डिपार्टमेंट ची प्रोग्रेस , नवीन प्रोजेक्ट्स इत्यादी सर्व प्रेझेंटेशन दिल्या जात होते. या meeting बहुतेक सगळेच उपस्थिती असायचे , त्यामुळे सगळं स्टाफ असणार होता .. हेच झाल्यावर माही अर्जुन ला प्रपोज करणार होती. 

 

अर्जुन सगळ्यात पुढे बसला होता , बाकी सगळं स्टाफ मागे होता . अर्जुन चे थोडे बोलणे झाल्यावर तो आपल्या जागेवर येऊन बसला. आता एक एक प्रेझेंटेशन सुरू होते . सगळे व्यवस्थितपणे माहिती सांगत होते, अर्जुन सुद्धा बरीच प्रश्न विचारत होता . त्याचा आवाजानेच सगळे एकदम घाबरून जात होते त्यात त्याचे भयंकर कठीण प्रश्न , वातावरण एकदम सीरियस होते . अर्जुनला असे एकदम खडूस बॉसवाल्या रुपात बघून तर माहीच्या पण पोटात गुडगुड व्हायला लागले, तिचं प्रेझेंटेशन नंतर प्रपोजल , तिला चांगलंच घाम फुटला होता. 

सगळ्यात शेवटी माहीला प्रेझेंटेशन द्यायचे होते . माही आपल्या जागेवरून उठून पुढे आली … आणि आपले प्रेझेंटेशन सादर करत होती . बोलता बोलता तिचे लक्ष अर्जूनकडे गेले तर त्याने तिला गोड अशी स्मायल दिली … त्याला तसे बघून तिची भीती कुठल्या कुठे पळाली. तिचे प्रेझेंटेशन खूप उत्तम झाले . बाकीचे तिला प्रश्न विचारत होते , तिने सगळ्यांना समाधानकारक उत्तर दिले. तेवढयात तिचे लक्ष अर्जूनकडे गेले , त्याने हसतच तिला परत एक डोळा मारला , झालं , माहीचं परत सगळं गडबडले… आता ती त त प प करू लागली … कशीबशी तिने सगळे उत्तर संपवली आणि तिथेच उभी राहिली . 

 

" मिस माही , तुम्हाला परत काही बोलायचं आहे? ".... एक कलिग 

 

" हां?".... माही अर्जूनकडे बघत होती . अर्जुन तर मस्त रिलॅक्स हो चेअरला टेकून बसला तिला बघत होता. तो तिला असे बघत होता की तिचं कशात लक्षच लागत नव्हतं.

 

" माही , अजिबात सरांकडे बघू नको , फक्त आपल्या कामावर लक्ष ठेव "...ती स्वतःशीच काहीतरी ठरवत होती. 

 

" तुम्हाला काही बोलायचं आहे काय ? नाही म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन आटोपले आहे "... कलिग 

 

" हां , हो , मला काहीतरी सांगायचं आहे ...सगळ्यांना , नाही सगळ्यांना म्हणजे अर्जून सरांना, म्हणजे खूप महत्वाचं आहे "..... माही 

 

" Okay , please continue "... तो कलिग 

 

" Yes ".... अर्जून 

 

" ते मला … ते ".... माही बोलतच होती की अर्जुन ने परत तिला तिथूनच एक फ्लायिंग किस केले , आता माही पुरतीच बावरली . तिला काय बोलावं काहीच सुचत नव्हते. ती बोलायला पुढे जायची , तर अर्जुन असे काही करायचा की तिला पुढे बोलल्या जात नव्हते. आकाशला तिची परिस्थिती कळत होती , तो उठून तिच्याजवळ गेला… 

 

" माही , काय झालं ?"... आकाश 

 

" Sir , Arjun sir खूप त्रास देत आहेत , बोलूच देत नाही आहेत पुढे ".... माही केविलवाणी बोलली. ते ऐकून आकाश ला हसू आले , पण त्याने ते कंट्रोल केले ..

 

" माही , एक आयडिया आहे ".... आकाश

 

" काय ? सगळ्या आयडिया या तुमच्या खडूस भावा पुढे फिक्या पडतात ".... माही 

 

" हा ते तर आहे , पण तरी बघ , काम करेल ".. आकाश

 

" बोला , या ड्रॅक्युलाला वश मध्ये तर करावेच लागेल, फारच फुत्कारतोय आजकाल ".... माही 

 

ते ऐकून आकाशला हसू आले...

" लाईट बंद कर , मग बोल , म्हणजे अर्जुन दिसणार नाही , आणि तुला डिस्टर्ब होणार नाही , तू आरामात बोलू शकते "... आकाश 

 

" अरे वाह सर , तुम्ही हुशार झालात ! ".... माही 

 

" काय ? "... आकाश

 

" काही नाही , जोक होता "... माही खी खी करत बोलली. 

 

" Very funny !"... आकाश 

 

" बरं , धन्यवाद , तुम्ही खूप छान आयडिया दिली , आता बघते कसे किस करणार ते ".... माही आपल्याच तालात बोलून गेली. 

 

" काय ? … काय म्हणाली तू ? काय करत होता तो ?".... आकाश

 

" अ …. काही नाही , त्रास कसे देतात , बघतेच , असे म्हणत होती, बरं मी करते आता , तुम्ही जा , बसा ".... माही , " माही , सर बावळट काही उगाच म्हणत नाही तुला , डोकं टाळ्यावर नसतेच तुझं … सतत आपल्या तालात असते "... माही स्वतःशीच बडबड करत तिने राजू ला सगळ्या लाइट्स बंद करायला लावल्या आणि प्रोजेक्टर वर एक ऑसम सा अर्जुनचा फोटो झळकला. 

 

" लवकर बोला मिस माही , तुमच्या मुळे सगळेच खोळंबले आहेत. ".... अंधारातून एक आवाज आला. 

 

" हो , तर मला सांगायचं होते की … की …. म्हणजे मला तुम्हाला बोलायचं होते , नाही म्हणजे अर्जुन सर ….".... माही अडखळत होती

 

" माही , अर्जुन सर काय …? पुढे बोल , नाहीतर आता तेच चिडतील ".... प्रिया माहीची मैत्रीण , तिचा आवाज आला. 

 

" हो हो , म्हणजे नाही चिडतील कदाचित , पण नाही बोलली तर चिडतील कदाचित …. म्हणजे सरांनी मला इथे जॉब दिला , तर मी त्यांना भेटली होती तेव्हा ….नाही तेव्हा नाही , मी त्यांना आधी भेटली होती तेव्हा ".... माहीचे त त प प सुरू होते .. 

 

" When ? Where ? What ? Speak up fast , come to the point "... अर्जूनचा एक कराराला आवाज आला , ते ऐकून आता ती चांगलीच धांदरली .. 

 

" ते मी आणि सर … म्हणजे I …. म्हणजे तुम्हाला "..... माही बोलतच होती की तिचा फोन वाजला , त्यावर आशुतोष चे नाव झळकत होते… 

 

" Sir , सॉरी , पण खूप महत्वाचा फोन आहे , प्लिज पाच मिनिट द्या ".... माही , आशुतोष चे नाव बघून काहीतरी महत्वाचं असेल असे तिला वाटले होते. 

 

" Okay !" …. अर्जून 

 

माही फोन उचलत बोलत बाहेर गेली . 

 

जवळपास 10 ते 15 मिनिटांनी ती आतमध्ये आली … 

 

" सॉरी , थोडा उशीर झाला "... माही

 

" It's okay "... 

 

" मला सरांना विचारायचं होते की त्यांना माझ्या मीराच्या , आणि मीराच्या बहीण भाऊ चंगू मंगु , यांच्या मुलांचे आबा बनायला आवडेल काय ? " … माही 

 

" What ?" … 

 

" माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल काय ? , म्हातारे झाल्यावर मी सहारा देईल , कधीच हात सोडणार नाही , हात पकडून ठेवेल जिथे पण जायचं असेल तिकडे . म्हातारं झाल्यावर दात पण नसणार तर नीट बोलता येणार नाही तर तुमचं व्हॉट व्हॉट पण मीच बोलेल , तुमची आवडती कारल्याची भाजी तुम्हाला खाता नाही येणार तर मी कारल्याचा ज्यूस सुद्धा करून देईल ".... माही 

 

" No ! हे काय बोलते आहे ?".... अर्जुनचा आवाज आला . 

 

" खडूस … एकतर मुलगा मुली ला प्रपोज करत असतो ते पण सगळ्यांसमोर , पण नाही हे तर जगा वेगळे प्राणी आहे , माही तू विसरलीच कशी , काय बोलू आता , यांना मराठी समजत पण नाही आहे , इतकं चांगलं प्रपोज केले तरी कळेना , इंग्लिश मध्ये बोलावं लागले काय ? इंग्रज गेलेत पण यांना सोडून गेले …. मागे किती छान मी माझी प्रपोज करण्याची आयडिया सांगितली होती , दिवस सोबत घालवायचा , टेकडीवर जायचं , हातात हात घेऊन बसायचं , भविष्याचा गोष्टी करायच्या ,भविष्याचा, लग्नाच्या , मुलाच्या ".... त्याचं नो ऐकून आता माही आपल्याच तालात बडबडत होती .. 

 

" हो , मग वाघोबाच्या पोटातच हनीमून सुद्धा करूया "..... अर्जूनचा आवाज आला. 

 

" व्हॉट ? तुम्ही हे काय बोलत आहात ? ते पण सगळ्यासमोर ? तुम्ही खरंच पागल झाला आहात ".... माही 

 

" Oh really ?".... अर्जून बोलला आणि सगळे लाइट्स लागले. पुढले दृश्य बघून माही अवाक् झाली … डोळे फाडून , आ फाडून ती बघत होती… 

 

******

 

क्रमशः 

 

 

नमस्कार मित्रांनो 

 

भाग पोस्ट करायला उशीर झाला त्यासाठी क्षमस्व , काही कारणांमुळे लवकर लिहिता नाही आले , तुम्ही मला समजून घेतले , तुमच्या शुभेच्छा , काळजी , प्रेम सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद ! पुढील भाग आता लवकरात लवकर येतील . Thank you ! 

 

 

*********

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️