तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 83

Maahi

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 83

भाग 83

" मी असे सहजासहजी माफ नाही करणार तुला "... अर्जुन 

" चूक माझी आहे तर ती भोगायची माझी तयारी आहे ".... माही 

" बघ बरं ?".... अर्जुन 

" हो , तुम्ही म्हणाल ते सगळं करेल… ".... माही 

" काहीही ?"... अर्जुन 

" हो, ही मिठी जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे , या मिठीत राहायला काही पण करू शकते ".... माही 

" ठीक आहे , सगळ्यांसमोर प्रपोज करायचं"... अर्जुन 

" बास येवढेच …. चला खाली , आता करते ".... माही

" अह …. इथे नाही ".... अर्जुन 

" मग कुठे ? ".... माही 

" आपली ओळख , आपल्या नात्याची सुरुवात ऑफिस मधून झाली , तर तिथे , सगळ्यांसमोर ".... अर्जुन 

" What? ".... माही डोळे मोठे करत शॉक लागल्यासारखे त्याच्या कडे बघत होती. 

" Yess baby ".... अर्जुन गालात हसत होता . 

" तुम्ही पागल झालात ?"..माही 

" जे पण समजायचे ते समज ".... अर्जुन 

" तुम्ही असे नाही करू शकत "... माही 

" मी काही करू शकतो "... अर्जुन 

" खडूस ".... माही 

अर्जुन मिश्कीलपणे हसत होता 

" वाट बघतोय तुझ्या प्रपोजची "... अर्जुन 

" Dracula …."... माही 

" Love you Baby".... अर्जुन 

" आलात ना परत आपल्या असली रूपात "... माही 

" मी असाच होतो ….."... अर्जुन हसत होता … त्याला हसतांना बघून माही आणखी इरिटेट होत होती. 

" मी हे नाही करणार ".... माही 

" का ? घाबरली ? आता तर मोठमोठ्या गोष्टी करत होती …. तुमच्या मिठीत राहण्यासाठी काहीही करू शकते अँड ब्लाह ब्लाह ब्लाह…. "... अर्जून 

" मी घाबरत नाही ".... माही

" ओह रिअली ?".... अर्जून 

" हो , मी माही अर्जुन पटवर्धन आहे , आणि माही अर्जुन पटवर्धन कोणाला घाबरत नाही "..... माही 

तिचे बोलणे ऐकून अर्जुन गालातच हसला…. 

" तुम्हाला हसायला येत आहे ? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ?".... माही

" No ".... त्याने नकारार्थी मान हलवली. 

" हे बघा , तुम्हाला स्वतःलाच आवडात नाही असे सगळ्यांसमोर व्यक्त होणे … तुम्ही असे नाही आहात ".... माही 

" हो… नव्हतो असा … पण आता बरच काही बदलले आहे माही , सो मला आता आवडते सगळं "..... अर्जून 

" सगळ्यांसमोर तुमची बायको , तुंच्यास्मैर खाली गुडघ्यांवर बसलेली , चालेल तुम्हाला ?".... माही 

" चालेल काय पळेल ".... अर्जून 

ते ऐकून माहीच्या कपाळावर आठ्या पडल्या… ती केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघत होती . 

" बघ , जमत नसेल तर सोड … तू सगळ्यांसमोर प्रपोज करशील तरच माझं प्रेम वाढेल असे काही नाही …. हा फक्त येवढच की बोलायच्या आधी शंभरदा विचार करावा… आणि जे बोलतो तसे वागता सुद्धा यायला हवे … आपल्या शब्दांचे मोल आपणच जपावे ..".... अर्जुन 

अर्जूनचे उत्तरं ऐकून माहीच्या चेहऱ्यावर टेन्शन आल्यासारखे दिसत होते आणि स्वतःतच काही विचारात हरवली होती .. आणि त्याला तिच्याकडे बघून खूप गम्मत वाटत होती …. तो तिच्याजवळ जात तिच्या कंबरेतून आपला एक हात घालत त्याने तिला स्वतःकडे खेचले… आणि तिला काही कळायच्या आतच तिच्या गालावर किस केले…..

" Super sweet "..... अर्जुन 

" हां ?".... माही एक हात त्याच गालावर ठेवत (जिथे अर्जुन ने किस केले होते ) डोळे विस्फारून त्याचाकडे बघत होती .. 

" खूप गोड आहेस ".... म्हणत त्याने परत तिच्या दुसऱ्या किस केले …. आणि हसतच तिच्या दूर होत स्विमिंग पूल च्या बाहेर उडी घेतली … 

" बघ मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तू ठरव "..... मिश्कीलपणे हसत त्याने तिला हात दिला आणि तिला सुद्धा स्विमिंग पूल बाहेर काढले…. माही मात्र अजूनही त्याने किस केलेल्या भावनेतून बाहेर नव्हती आली … ती त्याचाकडेच एकटक बघत होती…

" I know I am handsome and ….."..... 

" And ?".... माही 

" And super hot …. जेवढ बघायचं तेवढ बघ , पण नंतर …. आधी चेंज करून घे … पाण्याची अलर्जी तुला पण आहे "...... अर्जुन 

" हां ….. खूपच बोलायला लागलात तुम्ही ".... माही

" संगत चा असर… Go now and change the cloths ".... अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला अंजलीच्या रूम पर्यंत सोडले …. आणि हसतच मागे फिरत आपल्या रूम मध्ये आला..

" फारच आगाऊ झालेत सर ….".... माही बडबड करत अंजलीच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला गेली. 

घरातील सगळे मेंबर खाली आनंद व्यक्त करत होते … खूप दिवसांनी घर खळखळून हसत होते … सगळेच आता पुढे काय करायचं याचा प्लॅन करत बसले होते … तिकडे आशुतोष ची स्वयंपाक घरात लुडबुड सुरू होती… अनन्या तर त्याचे काही ऐकणारी नव्हती… माही जी नेहमी त्याची फर्माईश पूर्ण करायची ती सुद्धा अर्जूनसोबत बिजी होती… त्याने पिंकी ला च पदार्थांची लिस्ट देत भंडावून सोडले होते … 

माही स्वतःच आवरून खाली जायला निघाली …. माही खाली जातच होती की तिला अर्जुनच्या रूम मधून व्हीसलिंगचा आवाज आला … ते ऐकून तिला त्याला बघायचा मोह झाला , आणि तिने त्याचा रूम मध्ये डोकावून बघितले … तर तो स्वतःलाच आरसा मध्ये बघत , व्हीसल करत तयारी करत होता … 

" अर्जुना , किती ती तुझी रूपे ...तुझ्या प्रत्येक रूपाचा मोह होतो …"...... त्याला बघून माहीच्या ओठांवर गोड हसू पसरले … 

" This is not allowed , sweetheart … now you have to pay tax "..... अर्जून 

" टॅक्स ?".... माही 

" Yess baby …. Come inside ".... अर्जून 

" Baby ….. इयू … कसं वाटतेय ते .. 

सोनिया madam म्हणत होत्या , तर किती चिडत होते तुम्ही …. आणि आता तुम्ही सुरू झाले ?".... माही 

"ह्मम, आता कळला त्या शब्दा मागचा खोल अर्थ … don't waste the time , come here and pay the tax first ".... अर्जुन 

" टॅक्स कशासाठी ?'.... माही 

" इथे उभी काय करत होती ?".... अर्जुन 

" टॅक्स , परक्यासाठी, परक्या ठिकाणी जायला द्यायचा असतो , ही रूम पण माझी , तुम्ही पण माझे …. टॅक्स गेला उडत ".... माही 

" Oh really …. तुला नाही सोडणार ".... अर्जुन

" हा …. पहिले पकडून तर दाखवा ".... माही त्याला ठेंगा दाखवत तिथून पळाली. 

" माही आणि माहीची पागलपंती …. खरंच खूप मिस केली होती … "... अर्जुन स्वतःशीच हसत तिच्या मागे येत रूमच्या बाहेर पडला.. माही पुढे पुढे अर्जुन तिच्या मागे मागे जात होता… चालता चालता माही श्रियाच्या रूमजवळ थबकली. अर्जुन पण तिच्याजवळ येऊन थांबला… आतमध्ये श्रिया एकटीच कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती… तिला तसे बघून माहीला खूप वाईट वाटले … 

" मी जाऊ आत तिच्यासोबत बोलायला?"... माहीने नजरेनेच खुणावत अर्जुन ला विचारले.. त्याने होकारार्थी मान हलवली. 

" श्रिया …."... माहीने दार नॉक केले आणि आतमध्ये गेली… 

" श्रिया , मला मा…... फ..."..... माही बोलतच होती की माही ला बघून श्रिया आपल्या जागेवरून उठली आणि पळतच येत माही ला बिलगली …. आणि रडू लागली. 

" माही , सॉरी …. माझ्यामुळे …."...

" हे बघ , तू आधी शांत हो ….आणि तुझ्यामुळे काहीच झालं नाही आहे …. ".... माही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होती. त्या दोघींना त्यांचं बोलू द्यावे विचार करत अर्जुन तिथून खाली चालला आला…..

" आधीच तू त्रासात होता , अर्जुन दादा , मी त्याच्यावर अविश्वास दाखवला… तो हॉस्पिटल मध्ये माझ्यामुळेच त्याची ही हालत झाली …".... श्रिया , श्रिया ला स्वतःची चूक कळली होती.. तिने माहीचे सुद्धा खूप मन दुखावले होते … त्यामुळे पण तिचेच मन तिला खात होते .. सगळ्यात असूनही नसल्यासारखी होती.

" आता सर ठीक आहेत … आणि तू स्वतः ला जबाबदार नको समजू , उलट तुझ्यामुळे एका गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली… तू नसतीस तर कदाचित तो लवकर सापडला सुद्धा नसता… ".... माही

" पण हो हे खरे आहे … तू आपल्याच भावावर अविश्वास दाखवला… हीच खूप मोठी चूक करतो आपण… प्रेमात कधी कधी इतकं आंधळं होऊन जातो की काय बरोबर आणि काय चूक … आपल्याला कळतच नाही … पण श्रिया जे होते चांगल्यासाठी च होतं…काही वाईट व्हायच्या आत आपण सावरलो , हो ना .. "... माही 

श्रिया ने होकारार्थी मान हलवली. 

"आणि देवावर विश्वास ठेव …ही इज हॅविंग मोर बेटर प्लॅन फॉर as ".... माही 

" इंग्लिश बोलायला लागली …".... श्रिया तिचे शेवटचे वाक्य ऐकून खुदकन हसली होती. 

" तुझ्या दादा चा असर होणारच ना ?"... माही सुद्धा हसायला लागली. 

" दादा खूप छान आहे ना माही…. त्याचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे …. या काही महिन्यात खूप एकटा होता ग … एकदा तर मी सुद्धा बघितले आहे त्याचा डोळ्यातले पाणी… मला बघून त्याने लपवले होते … पण त्याला खूप त्रास होत होता … त्याचा त्रास मला कळत होता …".... श्रिया 

" खूप थकली ना श्रिया तू ? जरा मोकळी हो … स्वतःला असे किती दिवस कोंडून घेशील . ?"... माही 

" माही , इथे माझा दम घुटतो आहे …. कुठेही गेले की त्याच आठवणी आहेत … मला बाहेर पडायचं इथून , पण घरी कोणी ऐकणार नाही ".... श्रिया 

" म्हणजे ?"... माही 

" मी विचार करतेय की पुढे शिकावं , भारताबाहेर जावं … पण आकाश दादा नाही म्हणाला ".... श्रिया 

" तू खूप मोठी व्हावे , आम्हाला सगळ्यांना वाटते …. हे सगळं इतकं वाईट घडले आहे ना श्रिया , की तुला एकटे सोडायला घाबरत आहेत , तुझी काळजी वाटते म्हणून नाही म्हणाले असतील "..... माही 

" माही , अगं म्हणूनच मला इथून दूर जायचं , आणि माझ्या वर विश्वास ठेव , मी सगळ्यांना त्रास होईल असे काहीच वागणार नाही …. आयुष्याने खूप मोठा धडा शिकवला आहे ".... श्रिया 

" पण …."....

" मला कळते तुम्हाला कशाची काळजी वाटते , की मी एकट्यात स्वतःचं काही वाईट तर नाही करणार…. खरं सांगते झाले होते थोडे डिप्रेस्ड … पण तुझी ही जी जीवघेणी लढाई बघते आहे ना … न हरता , न खचता , न तुटता तू इतक्या भयानक परिस्थितीचा सामना केला आहेस …तू कदाचित चुकीचा मार्ग निवडू शकली असती , तुझी परिस्थिती इतकी वाईट होती की तू आजकाल हरलेले , डिप्रेस्ड झालेले लोकं उचलतात ( suicide) … तुझ्यापासून च शिकले , आयुष्यापेक्षा काहीच महत्वाचे नसते, आयुष्य खूप सुंदर आहे …. जिवावर बेतनाऱ्या प्रासंगाचा खंबीरपणे सामना करायचा ..लढायचे , जगायचे … हसत जगायचं… तर मी आता खंबीर आहे , माझी नका काळजी करू , मी स्वतःला सावरू शकते ".... श्रिया 

" येह बात , आणि मी तुला म्हणाले होते ना … देवाकडे आपल्यासाठी खूप सुपर प्लॅन्स असतात …. आपण स्वप्न पण नाही बघू शकत इतके सुंदर असतात ते … ".... माही

" म्हणजे ?".... श्रिया 

" तुझा दादा , अर्जून ….".... बोलतांना माहीच्या डोळ्यात चांदण्या चमकत होत्या . आणि श्रिया तिचा तो आनंद बघत होती 

" बघ , इतका सुंदर जीवनसाथी मला मिळाला आहे … म्हणजे ते राजकुमारीची गोष्ट , पांढऱ्या घोड्यावरून येणारा राजकुमार … स्वप्नातच असतात ना ….आम्हा लोकांना तर अशी स्वप्न सुद्धा नव्हती येत …. पण ते सत्यात उतरले आहे बघ … तुझा दादा म्हणजे आमच्या सारख्या लोकांच्या आवाक्याच्या बाहेर … मी कधी विचार सुद्धा नव्हता केला… पण देवाचे प्लॅन्स , आपल्यासाठी खूप सुंदर असतात , आपण केलेल्या प्लॅन्स पेक्षा पण …".... माहि खूप उत्साहाने सांगत होती .. 

" खरंय … अर्जुन दादा सारखा कोणी दुसरा नाही… अगदी राजकुमार च आहे तो , आणि मुख्य म्हणजे किती प्रेम करतो तो तुझ्यावर , एखाद्या पिल्लू परी सारख जपतो तो ".... श्रिया 

" हो ना … मग बघ देवाचा तुझ्यासाठी पण खूप अवेसॉम् प्लॅन आहे ".... माही 

" असं होईल ? ".... श्रिया 

" हो… नक्की… तुझ्या दादांची तू राजकुमारी आहेस…. देव आणि तुझा पूर्ण परिवार आहे तुझ्यासोबत "..... माही .

" हो , ते आहेच… I am the luckiest one … having super loving family ".... श्रिया आनंदाने बोलली. 

" हो ना …..चल मग आता खाली … असं एकटं एकटं नाही राहायचं …. तुझ्या ओठांवरील हसू बघायला सगळे आतुरले आहेत ".... श्रिया 

" माही , तू एकदा अर्जुन दादा ला माझ्या शिक्षणाबद्दल बोलशील? , मला बाहेर जायचं आहे त्या बद्दल ?".... श्रिया

" हो …. आणि तू बोलली तर सरांना जास्त आवडेल ".... माही 

" ठीक आहे …. तू दादा ला सर का म्हणते ग … अर्जुन का नाही म्हणत…? किती गोड नाव आहे"... श्रिया 

" ते ऑफिस मध्ये … सवय झाली तशी … तसे मी बऱ्याच नावाने हाक मारते त्यांना…. गोड? ड्रॅक्युला संचारला आहे त्यांच्यात….भारी त्रास देतात बाबा ते ".... माही

गप्पा करत करत त्या खाली यायला निघाल्या. 

इकडे अर्जुन खाली तर आला होता …. पण त्याचे सगळे लक्ष वरती माहीच्या येण्याचा वाटेला लागले होते .., त्याचं कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते , तो उगाच सगळ्यांमध्ये बसला होता … 

" इंतेहा होगयई इंतजार की

आई ना कुछ खबर मेरे यार की "...... आशुतोष अर्जूनच्या बाजूला येऊन बसला आणि जरा मोठ्याने गाणे म्हणू लागला… 

" What ?" ….. अर्जुन दचकला..

" बघू दे ना रे …. तुला नाही बघायचं तुझ्या बायको कडे तर काय त्यानं पण नाही बघावं काय ? "...... अनन्या 

अर्जुन कसा तरी चेहरा करता तिच्याकडे बघत होता ….. 

" हो हो बघून घे रे ….. नंतर नाय दिसणार असे रूप "..... आशुतोष

" म्हणायचं काय तुला ?".... अनन्या

"कुठं काय ...मी म्हणत प्रेयसीच्या रुपात या मुली खूप गोड दिसतात …. ".... आशुतोष 

" बायकोच्या रुपात आल्या की चंडिका , काली … काय काय दर्शन घडते मग ".... आशुतोष अर्जून च्या कानात बोलला … अर्जून ला ते ऐकून हसू आले …. 

" तू ना …. नाही सुधारणार ".... अनन्याने आशुतोष च्या पाठीत जोरदार एक ठेऊन दिली …

" See …. म्हणालो होतो , प्रॅक्टिकल पण दिसलेच …. जे बोलायचं ना ते पण आताच बोलून घे … नंतर बोलायला पण चान्स नाही देत या बायका ".... आशुतोष बिचारा चेहरा करत बोलला. 

" भाई , वहिनी …".... आकाश 

" व्हॉट ?".... अर्जुन 

" बहारो फुल बरसाओ , मेरा मेहबूब आया है …

मेरा मेहबूब आया है …..".... परत आशुतोषचा सुर लागला… 

माही , श्रिया गप्पा करत खाली येत होत्या … दोघींच्या पण चेहऱ्यावर खूप आनंदी भाव होते … माहीचा तर चेहरा अगदी गुलाबी गुलाबी दिसत होता … तिच्या ओठांवरील हसू , आणि तिच्या डोळ्यांतील चमकणारे चांदणे …. ती किती खुश आहे हे सांगून जात होते … थोड्या वेळ पूर्वीची माही आणि आताची माही , जमीन आसमानाचा फरक दिसत होता … अर्जुन तर तिला बघण्यात हँग झाला होता …. श्रिया सुद्धा बऱ्याच दिवसांनी इतकी मनसोक्त हसतांना दिसली , तिला बघून बाकी घरच्यांना पण बरं वाटले …  

नात्यांचं कसे असते … जेव्हा एक फॅमिली म्हणतो तेव्हा प्रत्येकाचं आयुष्य एकमेकांवर अवलंबून असते… एक जरी दुःखी असला तर बाकीच्यांचा ओठावरील हसू गायब होते … हीच तर सुंदरता असते नात्यांची … ही सुंदरता कायम टिकवता येते , फक्त थोडं समजून घेतले तर …. 

माही खाली आली आणि बस आशुतोष आणि बाकी मंडळींना मस्करी करण्याचा चेव आला…. परत त्यांनी अर्जुन आणि माहीला टार्गेट केले… माही तर लाजूनच आई ( छाया ) च्या गळ्यात जाऊन पडली .. 

" खुश ?".... छाया

माहीने होकारार्थी मान हलवली … 

" मी पण काय दुश्मन नाही तुझी … ".... आत्याबाईंनी तिला जवळ घेण्यासाठी हात पुढे करत खुणावले… तसे माही त्यांच्या कुशीत गेली .. 

" अशीच खूप खुश रहा आणि सगळ्यांना खुश ठेव "... आत्याबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवत तिच्या कपाळावर किस केले. 

" छोटे छोटे भाईय्यो के बडे भैय्या … आज बने है किसी के सैय्या …"... अनन्या श्रिया आशुतोष एकसाथ , त्या दोघांना चिडवू लागले … 

" मी किचन मध्ये बघते .."... लाजतच माही किचन कडे जायला वळली.. 

" ओ मॅडम , कुठे चालल्या … आता कुठे आमची वहिनीसाहेब हाती लागली आहे , तुम्हालाच बघायचं आहे सगळं , आता आधी आम्हाला तुम्हाला बघून घेऊ द्या "..... अनन्या ने तिच्या हाताला पकडत ओढले आणि अर्जूनचा बाजूला बसायला ढकलले… माही अक्षरशः अर्जूनच्या बाजूला अगदी त्याचा अंगावर आल्यासरखीच झाली होती.. थोडी नीट सावरून ती त्याचा जवळ बसली… सगळ्यांच्या नजरा तिच्यावर , त्यात अर्जूनची पण नजर तिच्यावर खिळली होती …. तिला तर लाजल्याहून लाजल्यासारख होत होते … तिची नजर खाली आणि ओठात दाबून ठेवलेले हसू…. तिने अर्जूनच्या हाताला पकडले आणि त्याच्या खांद्यामागे स्वतःचा चेहरा लपवू लागली . 

" ओSSSहो , आमच्या वहिनी साहेब कसल्या गोड लाजत आहेत , अर्जूनचं काही खरं नाही रे बाबा ".... अनन्या चिडवू लागली.

ते सगळं ऐकून अर्जुन सुद्धा त्याचा स्वभावाच्या विरुद्ध जात भयंकर लाजला होता … ते क्षण च तसे होते … अगदी मनात कैद करून ठेवण्यासारखे … आकाश ने आपला मोबाईल काढला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याचे भाव आपल्या मोबाईल मध्ये कैद केले ….. " वाईट वेळ नेहमी साठी नसते , वाईट वेळ जाऊन आनंद दायक काळ येतो , याचेच साक्षीदार होते हे क्षण. 

आशुतोष ने सगळं माहीच्या आवडीचे पदार्थ पिंकी कडून बनवून घेतले होते … चहा , जिलेबी … भजी …. अर्जून तर काही खाण्याची हाऊस नव्हती …. माही च होती खवय्यी . 

खाता खाता सगळे लग्न कधी करायचं , कसे करायचचे याची चर्चा करत होते …. सगळ्यांनाच काय करू आणि काय नको असे झाले होते . माही पण सगळ्यांच्या हो मध्ये हो करत होती. 

" एक मिनिट , मला काही बोलायचं आहे …"... अर्जुन 

" हो बोल ".... आजी 

" माझी इच्छा आहे की माहीने कसं लग्न हवे आहे ते तिने ठरवावं … ".... अर्जुन 

" नाही नाही , तुम्ही सगळे जसं म्हणाल तसच ".... माही अर्जूनकडे बघत सगळ्यांच्या मनाचं होऊ दे असे खुणावत होती. 

" मला माहिती आहे ' लग्न ' हे खूप मोठं कदाचित एकुलते एक स्वप्न होते तुझे … तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हायला हवीत माही , आणि लग्न एकदाच होते , तर तुझ्या आवडीने नको व्हायला ? आणि मी असताना तर तुझी एक एक इच्छा पूर्ण व्हायलाच हवी "..... अर्जुन हळूवारपणे माहीला बोलला. त्याचा बोलण्याने परत माहीचे डोळे पाणावले … आणि ओठांवर हसू उमलले ..

" माही , बाळा , अर्जुन बरोबर बोलतोय … ".... आजी 

" हो हो , अर्जून सगळं पूर्ण कर बाबा , नाहीतर थोडंसं सुद्धा राहिले ना आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतील ".... आशुतोष परत मध्ये उचकटला , आणि एकच हशा पिकला. मोठे लोकं आपल्या गप्पांमध्ये रमले तर बाकीच्यांचा आपला गोंधळ सुरू होता. 

" अर्जून ….. "..... मीरा आवाज देत पळतच येत अर्जुनच्या मांडीवर जाऊन बसली … त्याने पण तिला आपल्या कुशीत नीट बसवून घेतले..

" बोला प्रिन्सेस ".... अर्जुन 

" अर्जून , आशू मामा म्हणाला आता तू , मी आणि माऊ सोबत राहू , एकाच घरी ? ".... मीरा 

" Yess sweetheart "..... अर्जून 

" खरंच ?"..... मीरा, तिचे डोळे आनंदाने चमकत होते …  

" का ग मनी माऊ , माझ्यावर विश्वास नव्हता तुला , जे आली आपल्या अर्जुन जवळ … ".... अशीतोष

" मनी माऊ नाही , मी मिरा आहे ".... मीरा 

" मनी माऊ थोडी म्हणालो मी …. मिनी माऊ … म्हणजे तुझ्या या माऊ चं छोटे वर्जन "..... आशुतोष

" नाही …. मी मिनी अर्जुन आहे …. मी अर्जुन सारखी आहे ….ही माऊ खूप बुलक्कड आहे , हो ना अर्जून? ".... मीरा 

" हां ?'.... माही मोठे डोळे करत अर्जुन आणि तिच्याकडे बघत होती. ते बघून सगळेच हसायला लागले. 

" हो बेबी , आता आपण सोबत असणार आहोत "... अर्जुन 

" येह ….."... मीराने अर्जुनच्या गालावर किस केले आणि खाली उतरून आनंदाने उड्या मारू लागली. 

" वाह वाह …. पहिल्यांदा असे लग्न होणार ज्यात बाप लेक घोडीवर बसून म्हणतील ' दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे "..... आशुतोष 

" अर्जुन पटवर्धन आहे बाबा तो …. त्याचं कामच जागा वेगळे ".... अनन्या 

" एका अटीवर …. जर मी ठेवलेली अट माही ने पूर्ण केली तर …. ".... अर्जुनने माहीला बघून एक डोळा मारला आणि गालातच हसला …

" व्हॉट? व्हॉट ? व्हॉट ? ".... एकता कपूरच्या सीरियल सारखे सगळे डोळे मोठे करत रिॲक्ट करत होते…  

" तिला माहिती आहे ".... अर्जुन 

" हा गोडुला परत ड्रॅक्युला झाला ".... माही कसल्याशा चेहऱ्याने अर्जूनकडे बघत होती .. 

******

क्रमशः 

******

पुढे बघुया माहीचे आईवडील तिला स्वीकारतील काय ? 

अर्जुन माहीचे लग्न …

*******

माही खरंच सगळ्यांपुढे अर्जुनला प्रपोज करेल काय ? 

🎭 Series Post

View all