Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 82

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 82

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 82

 

भाग 82

 

 

" आजी खूप थकलोय ग आता , अख्ख्या जगाला मुठ्ठीत घेऊ शकतो , पण या आपल्याच नात्यांत , या भावनिक खेळात हरलोय मी ….. आता परत हरणे मला झेपणार नाही …. "..... अर्जुन बोलत तर सगळ्यांना उद्देशून होता पण तो बघत मात्र माहीच्या डोळयात होता …. माहीला आता त्याचे सगळे बोलणे असह्य झाले होते …. तिचं हृदय खूप दुखायला लागले होते …. अश्रू अनावर झाले होते …. त्याला होणाऱ्या वेदना ती स्वतः अनुभवत होती …. कशाचाही विचार न करता पळत जात तिने अर्जुनला मिठी मारली …. त्याला आणखी आणखी घट्ट पकडू लागली … 

 

नेहमीप्रमाणे नकळतपणे त्याचे हात तिच्या पाठीवर , तिच्या डोक्यावरून फिरत होते … ती त्याचा कुशीत रडत होती…. 

 

त्या दोघांना बघून बाकी सगळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी जमायला लागले होते …. त्या दोघांची हालत, त्यांचं प्रेम बघून श्रियाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले होते …. माहीवर असलेला राग ती कधीच विसरली होती …. 

 

" Calm down …. I am always with you ….. love you sweetheart ".... अर्जुनने तिच्या डोक्यावर किस केले …. तिला स्वतःच्या कुशीतून दूर केले आणि झपझप पावले टाकत आपल्या रूममध्ये निघून गेला… माही मात्र भरल्या डोळ्यांनी त्याचाकडे बघत उभी होती . बाकी सगळे सुद्धा त्याच्याकडे बघत स्तब्ध उभे होते. तो जे काही बोलला होता ते सगळंच खरं आणि बरोबर बोलला होता , त्यामुळे कोणाजवळही त्याला उत्तर द्यायला काहीच नव्हते. … त्यामुळे सगळेच चूप उभे होते.  

 

 

" खूप त्रास होतो आहे ना ?"... आशुतोष माही जवळ आला … 

 

" असं कसं सर मला स्वतः पासून दूर करू शकतात ? ते पण सगळ्यांसमोर ? ".... माही

 

" तू पण तर हेच केले होते , आठवते ? त्याला पण असाच त्रास झाला होता तेव्हा, त्याला पण असेच तुझ्यासारखे असह्य झाले होते ,सगळ्यांसमोर त्याने तुझा हात हातात घेतला होता , तू सोडला होता , राईट? ".... आशुतोष 

 

 

" पण मी आपल्या परिवारासाठी ….".... 

 

" तू बायको आहेस ना त्याची …. पेपर वर का होईना , पण लग्न झालंय तुमचं , तुम्ही दोघं नवरा बायको आहात , आणि आता नात्यातील कुठले पण निर्णय एकट्याने घेऊन चालणार नाही , मग तो कितीही मोठा प्रश्न असू देत , कुठल्याही नात्याचा प्रश्न असू देत , पारिवारिक विषय असू देत , लग्नानंतर नवरा बायको म्हणजे दोन वेगळे लोकं नसतात , ते एक असतात , एक चुकीचं पाऊल दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करून जाते ….. कुठलाही मोठा प्रॉब्लेम असू देत , निर्णय दोघांनी मिळूनच घ्यायला हवे …. आणि का म्हणून इतर पारिवारिक नाते निभावताना नवरा बायकोच्या नात्याचा बळी द्यायचा ? नेहमी असेच होते घरात , मोठ्यांचा मान राखायचा म्हणून , नाते निभावयाचे म्हणून नवरा बायको एकमेकांना गृहीत धरतात , एकमेकांनाच दुखावतात , तिसऱ्या व्यक्तीमुळे आपले नाते खराब करतात? कुठल्याच तिसऱ्या व्यक्तीला मग तो कोणीही असू शकतो , आई ,बहीणभाऊ , मित्र की आणखी कोणी , आपल्या नात्यात येऊ द्यायचं नसते . तो खूप दुखावला गेला आहे , सहजा सहजी नाही ऐकणार तो …. तो किती हट्टी आहे हे तर वेगळे तुम्हाला सांगायलाच नको ".... आशुतोष 

 

" बरोबर बोलतोय आशुतोष , तुम्ही दोघांनी खूप दुखावले आहे त्याला . माही , तुझं वागणं बरोबर असते , पण आधी म्हणजे तुमचे लग्न नसते झाले असते तर … आणि नलिनी तुझं पण खूप चुकले आहे , तुझा हक्क आहे तुझ्या मुलावर , त्याचं चांगलं चिंतनाचे , पण त्यांचं लग्न झालंय हे कळल्यावर सुद्धा तू त्या दोघांना दूर करू बघत होती , त्यांच्या वैवाहिक जीवनाचे निर्णय घेण्याचा हक्क सर्वस्वी फक्त त्या दोघांचा होता , त्यात आपण कोणी काय त्यात आई वडिलांना सुद्धा बोलण्याचा हक्क नाही आहे आणि तू हे खूप चुकीचं करत होती. त्या दिवशी तू इतकी चिडली होती , काय काय बोलत होती की आम्हाला कोणालाच बोलता आले नाही … "... आजी 

 

" हो आजी , तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात … एक छोटी गोष्ट किती मोठी केली… खरंच गरज होती काय याची ? बाहेरचं विश्व वेगळे आहे , खंबीरपणे लढू शकतो माणूस … पण घरात … आपल्या लक्षात पण येत नाही , आपल्या इगो पुढे , आपल्या इच्छेपुढे आपल्याला आपल्याचं व्यक्तीचा आनंद दिसू नये? सुख दिसू नये ? खरंच ते सामाजिक सो called स्टेटस जपणे इतकं महत्त्वाचं होऊन जाते की आपल्या घरातीलच नाती त्याला बळी पडावित? आपल्या व्यक्तीच्या सुखापुढे , लोकं काय म्हणतील हे महत्वाचं वाटावं ? अन् कोण हा समाज , जो नेहमीच दुसऱ्यांच्या चुका शोधत त्याला हिणवायला तयार असतो , येतो का मग तो कठीण प्रसंगी मदतीला? … नाही ना … मग तरीही त्यांच्या साठी आपल्या व्यक्तीला दुखावे ? 

 

आई , किती छोटी गोष्ट होती , थोडं शांत राहून , बसून , समजून घेत सोडवता आली असती …. जेव्हा आपण मोठं म्हणतो ना, तेव्हा समजदारीने वागण्याची जबाबदारी आपली आधी असते , पण खरंच जेव्हा गरज असते तेव्हाच मोठे समजदारीने वागत नाहीत , आणि लहान समजून घेत नाही असा आरोप करतात… अर्जुन काही 17-18 वर्षाचा कॉलेजला जाणारा मुलगा नव्हता जो आपल्या आयुष्याचे चुकीचे निर्णय घेईल … जो स्वबळावर बिजनेसचे येवढे मोठे साम्राज्य उभे करू शकतो , एकट्याने जग बघितले आहे , त्याला माणसाची ओळख नसावी? आणि दुसरं तो समजदारीच्या वयात प्रेमात पडला , ज्याचा विश्वास नव्हता या प्रेमावर तो प्रेमात पडला , आणि अशी मुलं जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा ते त्यावर जीव ओवाळून टाकतात, प्रेम म्हणजे टाइमपास नसतो या मुलांसाठी ….त्यामुळे माही त्याचा जवळ नसती तरी त्याने आयुष्यभर तिची वाट बघितली असती, तो आयुष्यभर एकटा राहिला असता …. तुम्ही तुमच्या मुलाला ओळखू नाही शकलात पण या सहा सात वर्षात मी माझ्या साळ्याला ओळखायला लागलो आहे , कदाचित मी पण पुरुष आहो म्हणून त्याला समजून घेऊ शकलो …आधीच लहान वयात तो मोठा झाला , सगळी जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली , वडील नसल्याचा त्रास त्यालाही झाला असणारच ना ? तोही रडला असेलच ना? पण आईला दुःख होऊ नये म्हणून त्याने कितीतरी त्याच्या भावना स्वतः मध्ये दाबून धरल्या असतील … कधी झाला आहे तो मोकळा कोणापुढे? तो असा चिडका , रागीट का झाला असेल , कधी विचार केला ? लहानपणी तो खूप हसरा मस्तीखोर होता ना , मग आता असा का झाला ? कोणीच नाही ना विचार केला ? "... आशुतोष 

 

आशुतोष बोलतच होता की माही तिथून पळत अर्जूनच्या रुमकडे निघाली … सगळे फक्त तिच्याकडे बघत होते .. 

 

"तो खरच थकला आहे , त्याला गरज होती प्रेमाची "... आशुतोष 

 

 

" हो , मी बघितले आहे , भाई जेव्हा पण माही सोबत राहतो , खूप खुश राहतो … हसत असतो , मला नेहमीच लहानपणीचा , आधीचा भाई आठवतो… जेव्हा त्याला कळले नव्हते तो माहीवर प्रेम करतोय , तेव्हा मी सुद्धा त्याला म्हणालो होतो … माही सोबत तो त्याचं बालपण जगतो ".... आशुतोष बोलत होता की आकाश मध्ये बोलला. 

 

 

" हो right …. मी पण बघितले आहे , माही आसपास असली की अर्जुन वेगळाच असायचा , बालिश वागायचा "..... अनन्या 

 

" प्रेम आम्ही पण देत होतो, जाऊ दे तसे पण मी स्वीकारले आहे माहीला ".... नलिनी 

 

" आई , आई मुलाचं नातं ,प्रेम वेगळं आदरयुक्त प्रेम असते , बहीण भावाचे वेगळे असते … आणि प्रेयसीचे , नवरा बायकोचे प्रेम वेगळे असते …. हे असे नाते असते जिथे तो आपलं मन मोकळं करू शकतो ,मनसोक्त रडू शकतो , दुःख वाटू शकतो … प्रत्येक नात्याची एक सीमा असते , त्यापरिने तो वागत असतो.. त्यामुळे आई , बहीण , बायको यात कम्परिझन करूच नये …नाहीतर परत नाती चुर्गळायला लागतील "... आशुतोष  

 

" खूप छान सांगितले आशुतोष … आम्ही येवढे मोठे पण नाही समजू शकलो या गोष्टी ".... मामा 

 

" मामा , अनाथ होतो ना , नात्यांचे महत्त्व माहिती मला , आणि म्हणूनच मला माही कुठेच चुकीची नाही वाटली … अर्जुनला त्याचा परिवार दुरावू नये म्हणून ती जात होती , होप अर्जुन पण लवकरच समजेल … तो जास्त ताणनार नाही त्याचं आणि माहीचे नाते … "... आशुतोष 

 

सगळे झालेल्या प्रकरणावर विचारविनिमय करत बसले होते , माही मात्र अर्जुन जवळ पळत वरती त्याचा रूममध्ये आली होती. 

अर्जुन रूम मध्ये नव्हता … तिने इकडे तिकडे बघितले तर तो बाहेर पूल साईड कडे त्याच्या झाडांच्या जवळ कुंड्यांमध्ये काहीतरी करत बसला होता.. 

 

अर्जुन जास्त भडकायला नको , माही एकटी पडायला नको म्हणून बाकीचे पण वरती आले होते , पण त्या दोघांना तिथे पूल साइडला बघून ते तिकडे दूरच थांबले . 

 

माहीने आपले डोळे पुसले आणि ती त्याचा जवळ गेली … ती तिथे गेली तरी त्याने नजर वर करून तिला बघितले नाही .तिने बांगड्या वाजवल्या , पैजण वाजवले तरी त्याने तिच्याकडे बघितले नाही . ती तिथेच त्याचा बाजूला बसली , तिने पण एक कुंडी आपल्याकडे केली, त्याच्या कुंड्यांना हात लावलेला सुद्धा त्याला चालत नसायचे, हे तिला माहिती होते , त्यामुळे आता तरी तो आपल्याकडे बघेल या आशेने तिने ती कुंडी घेतली होती , तरी त्याने तिच्याकडे बघितले नव्हते … आता ती त्याच्याकडे बघत त्यात माती भरत होती आणि पाणी टाकत सगळं चिखलगाळ करू लागली… स्वतःचे हात , स्वतःचा अवतार सगळंच तिने मातीने भरवला होता .. येवढं सगळं करूनही तो जराही तिच्याकडे बघत नव्हता …. शेवटी तिने लास्ट वॉर करायचं ठरवलं… तिने बाजूला ठेवलेले रोप घेतले आणि त्या चिखल झालेल्या कुंडीत लावायला गेली … 

 

" Wait !".... अर्जुन थोड्या कडक आवाजात बोलला… तरी माहिने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि आपलं रोप लावायला घेतले… 

 

" ते लागणार आहे का त्यात ? ".... अर्जुन 

 

" का नाही लागणार ? ".... माही 

 

" तुला कळते तरी काय कसे लावायचे असतात रोपं".... अर्जुन 

 

" मला जेवढं कळते , जेवढं मी अनुभवले आहे , बघितले आहे , तेवढे करतेय मी ".... माही 

 

" काहीच नाही येत तुला ".... अर्जुन 

 

" नसेल येत , पण मग कोणी शिकवायचे ना … शिकवले असते , समजावून सांगितले असते ,तर कळले असतेच ना ?".... माही कुंडीच्या चिखलात फदकफदक हात मारत बोलत होती…त्यामुळे त्या चिखलाचे थेंब तिच्यावर उडत होते , एखादं दुसरं अर्जूनवर सुद्धा उडत होते. 

 

" समजावून सांगितले असतेच , पण त्यासाठी प्रॉब्लेम काय आहे , ते सांगायला हवे असते ".... अर्जुन , " wait , आधी ते चिखलात खेळणं बंद कर "... अर्जुन 

 

" ज्याला आधीच सगळं माहिती असते , जास्तीचं सुद्धा माहिती असते , त्याला वेगळे काय सांगणार आहे … नाही तेव्हा जबरदस्ती करता येते , समजावून सांगताना नाही करता आली ?".... माही परत चिखलात तसाच हात मारत होती..  

 

" I said stop ! सगळा घाणपणा करते आहे … Meera is more intelligent than you ! ".... अर्जुनने मातीत खेळणारा तिचा हात पकडला.

 

" I know "... माही त्याला आपली बत्तीशी दाखवत बोलली. 

 

अर्जुन तिथून उठून जाऊ लागला. 

 

" सॉरी "..... 

 

माहीचा केविलवाणा आवाज आला तसा तो मागे फिरला , तर माही दोन्ही कान पकडून , पपी फेस करून उभी होती . तिला तसे बघून तसाच तो क्षणात पिघळला होता … तो तिला एकटक बघू लागला…. 

 

" मला माहिती आहे मी खुप चुकली आहे , मी गृहीत धरले तुम्हाला मी खूप दुखावले आहे तुम्हाला , माझा निर्णय चुकीचा पण असू शकतो …. पण आई बाबा हवे असतात ना जीवनात ? असते ना गरज त्यांची ? भीती वाटते तेव्हा आईबाबाची मिठी हवी असते ना? कितीही स्ट्राँग असलो तरी बाबाच्याच छत्राखाली खूप सुरक्षित वाटते ना ? खचलो , तुटलो असलो की आईबाबंचाच आधार लागतो ना ? त्यांची पाठीवर थाप लागते ना ? … " .. माही बोलत होती मला माहिती हे सगळं , त्यांची साथ नसली की किती त्रास होतो ते …. मी ज्या त्रासातून गेले होते , त्यातून तुम्हाला कशी जाऊ देणार होती ? माझं चुकलं , हे आपलं आयुष्य होते , मी एकटीने निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता माझा , पण मी काय करू, जे बघितले , जे अनुभवले त्यातूनच मी निर्णय घेतला होता …. आले होते तुमच्या जवळ , फक्त तुमचीच बनायला , तुमच्या नावाचं मंगळसूत्र पण घातले आहे … तुमचंच बनून जायचं होते …. विश्वास तर पूर्ण होता आणि आहे माझा तुमच्यावर , माझं आणि नलिनी काकीचे बोलणे तुम्ही ऐकले म्हणालात ना , मग त्यात ऐकले नव्हते काय, मी म्हणाले होते त्यांना , मी कुठेही असले तरी सर मला शोधून काढतील … तुमच्या वर असलेला माझा विश्वासाच हे बोलला होता ना ? जसे त्या रोपाला सगळं प्रमाणात लागते , तसेच नात्यांमध्ये पण balance लागतो ना ? लग्न म्हणजे फक्त तुमचं माझं नव्हते ना? … मला जेवढं कळलं तसे वागले मी … तुम्हाला तर कळते ना , मग तरीही तुम्ही मला दूर केले स्वतःपासून ? मी सगळ्यांसमोर तुमच्या जवळ आले होते तुमच्या मिठीत , तरी तुम्ही मला दूर केले तुमच्यापासून ? तुम्हाला मी नको असेल , पण मला तुम्ही हवे आहात , तुम्ही मला फक्त माझे व्हायला हवे आहात… मला तुमचं हे क्यूट नाक हवे आहे , … मला त्यावर किस पण करायचं आहे ".... म्हणत ती त्याला मिठी मारायची म्हणून हात पुढे करत त्याचा जवळ जाऊ लागली… 

 

" no…. "... अर्जुन 

 

तरी ती त्याच्या जवळ जात होती… 

 

" माझ्या जवळ येऊ नकोस ".... अर्जुन

 

ती परत पाऊल पुढे टाकत त्याच्या जवळ जात होती… " ते मातिभरले चीखलभरले हात दूर कर माझ्या …. "....ती त्याला हात लावणार की तो तिच्यापासून दूर पळाला.

 

" तुम्ही माझे आहात, मी कसेही हात लावणार तुम्हाला …. तुम्ही मला रोखू नाही शकत … हा माझा हक्क आहे , बायको आहे मी तुमची ".... माही ओरडत त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळायला लागली 

 

 

" आता बरे आठवत आहे , नवरा अँड ऑल , त्या दिवशी हात सोडला तू माझा "... अर्जुन 

 

" मग त्या आधी वरती मी आले होते तुमच्या जवळ तर तुम्हाला लग्न आठवत होते, झालं होते आपलं लग्न , मंगळसूत्र घालून झाले होते , तर तुम्हाला वैदिक पद्धत , मंत्र आठवत होते … तेव्हा का नाही घेतले जवळ ? ".... माही 

 

 

" तूच म्हणाली होती , पेपरच्या लग्नाला मानत नाही … मग तुझ्या पद्धतीने लग्न करावे आणि नंतर तुला जवळ घेणार होतो …. पण नाही तुला तर त्यागाची मूर्ती बनायचे होते ".... अर्जुन 

 

" सॉरी म्हणाले ना , आता आणखी किती खडूस्पणा करणार आहात ? आता आले ना जवळ ? आता छोटीशी गोष्ट किती ताननार आहात तुम्ही ? मला म्हणत होते ताणत आहेस… आता तुम्ही काय वेगळं करत आहात?"... माही

 

दोघंही पूलच्या भोवती पळत होते , अर्जुन समोर , माही त्याचा मागे ….आणि ओरडत बोलत होते… 

 

त्या दोघांना असे बघून घराच्यांनी डोक्यावर हात मारला , त्यांना असे भांडताना बघून सगळ्यांना हसू येत होते…  

 

 

" तुझा काय भरवसा , परत सोडून गेली तर?".... अर्जुन 

 

" नाही सोडून जाणार ".... माही

 

" कसा विश्वास ठेवायचा ?".... अर्जुन 

 

" हवे ते पेपर साइन करून घ्या …. म्हणाल तर कोऱ्या कागदांवर सही करून देते … तुमच्या परवानगी शिवाय मारणार सुद्धा नाही ".... माही 

 

मरणार शब्द ऐकून अर्जूनचे पाय तिथेच थांबले , ते ऐकून त्याला वाईट वाटले …. माही मात्र आपल्याच तालात पळत होती आणि त्याला जाऊन धडकली…. अचानकपणे टक्कर लागल्यामुळे दोघांचाही तोल गेला आणि दोघंही स्विमिंग पूल मध्ये पडले … 

 

" वाचवा … वाचवा …. "... माही ओरडू लागली.. 

 

तिला ओरडताना बघून अंजली तिला पकडायला म्हणून जात होती ...तर आकाश ने तिचा हात पकडला …" ती एकटी नाही आहे , भाई आहे "

तशी अंजली मागे आली.. 

 

अर्जुनने तिला पकडत नीट उभे केले … दोघंही ओलेचिंब झाले होते …. कंबरेच्यावर पाण्यात उभे होते … एकमेकांना बघत होते …. 

 

" एकदाच माफ करा … एकदाच … नाही शिकले तुमच्याशिवाय जगायला , कसं जगू तुमच्याशिवाय सांगा ना ?…. तुम्ही नसाल तर मी म…."....

माही बोलतच होती की अर्जुनने जाऊन तिला टाईट मिठी मारली … तिने पण त्याच्या भोवती आपले हात घट्ट केले… 

 

" I hate these words…. परत असे कधी बोलू नको ".... अर्जुनने पटापट तिच्या कपाळावर , नंतर गालांवर किस केले… 

 

" आम्ही लग्नासाठी मुहूर्त बघतो ….. तोपर्यंत चालू देत तुमचं "..... आशुतोष ओरडला..

 

आशुतोषचा आवाज ऐकला तेव्हा अर्जुन माहीचे लक्ष तिकडे गेले तर सगळेच उभे…. सगळ्यांना बघून माहीला तर लाजल्यासारखे झाले आणि ती अर्जूनच्या मिठीतुन दुर झाली .. 

 

" नको नको , त्याचा जवळच रहा बाई , त्याचा दूर जाशील तर परत चिडायचा तो आमच्यावर ".... अनन्या 

तसे सगळे खळखळून हसायला लागले … 

 

अनन्याचे ऐकून तर माही लाजेने पाणी पाणी झाली … तिचे ओठ रुंदावले होते , ती मान खाली घालून बघत होती… अर्जुनाच्या पण ओठांवर हसू उमलले होते … 

 

" रोमान्स आटोपला की या खाली…. गरमा गरम चहा प्यायला …. नाही म्हणजे पाण्यातला ,स्विमिंग पूल मधला रोमान्स आहे , नंतर थंडी वाजेल ,म्हणून म्हणालो , चहा तयार ठेवतो ".... आशुतोष 

 

ते ऐकून तर आता माहीला खूपच जास्त लाजयाला झाले होते , तिने लगेच अर्जुनच्या हाताला पकडत त्याच्या मागे आपला चेहरा लपवला… 

 

" असेच खुश रहा ".... आजी बोलल्या आणि त्यांनी सगळ्यांना तिथून चालण्याचा इशारा केला… सगळे एक एक करत तिथून निघाले… 

 

आशुतोष ने पण त्यांच्यावर दोन चार पंच मारले आणि तो पण आनंदाने उड्या मारत तिथून पळाला… 

 

सगळे गेले याची खात्री करून अर्जुनाने माहीच्या हाताला धरून आपल्या पुढे आणले…. पण तिला इतकं लाजयाला झाले होते की त्याच्याकडे बघणे सुद्धा तिला कठीण झाले होते …. तिला तसे लाजातांना बघून त्याला हसू आले .. त्याने लगेच तिला परत आपल्या मिठीत घेतले… आणि आता ही मिठी जी होती ती कधीच सुटणारी नव्हती …. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती … खूप दिवसांचा दुरावा जो होता .. त्याला पण तिचे हार्ट बिट्स स्पष्ट जाणवत होते … ती नॉर्मल होत पर्यंत तो तिला प्रेमाने तिच्या डोक्यावरून ,पाठीवरून हात फिरवत तिला गोंजारत होता. 

 

 

" मी असे सहजासहजी माफ नाही करणार तुला "... अर्जुन 

 

" चूक माझी आहे तर ती भोगायची माझी तयारी आहे ".... माही 

 

" बघ बरं ?".... अर्जुन 

 

" हो , तुम्ही म्हणाल ते सगळं करेल… ".... माही 

 

" काहीही ?"... अर्जुन 

 

" हो, ही मिठी जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे , या मिठीत राहायला काही पण करू शकते ".... माही 

 

" ठीक आहे , सगळ्यांसमोर प्रपोज करायचं"... अर्जुन 

 

" बास येवढेच …. चला खाली , आता करते ".... माही

 

" अह …. इथे नाही ".... अर्जुन 

 

" मग कुठे ? ".... माही 

 

" आपली ओळख , आपल्या नात्याची सुरुवात ऑफिस मधून झाली , तर तिथे , सगळ्यांसमोर ".... अर्जुन 

 

" What? ".... माही डोळे मोठे करत शॉक लागल्यासारखे त्याच्या कडे बघत होती. 

 

" Yess baby ".... अर्जुन गालात हसत होता . 

 

" तुम्ही पागल झालात ?"..माही 

 

" जे पण समजायचे ते समज ".... अर्जुन 

 

" तुम्ही असे नाही करू शकत "... माही 

 

" मी काही करू शकतो "... अर्जुन 

 

" खडूस ".... माही 

 

अर्जुन मिश्कीलपणे हसत होता 

 

" वाट बघतोय तुझ्या प्रपोजची "... अर्जुन 

 

" Dracula …."... माही 

 

" Love you Baby".... अर्जुन 

 

" आलात ना परत आपल्या असली रूपात "... माही 

 

" मी असाच होतो ….."... अर्जुन हसत होता … त्याला हसतांना बघून माही आणखी इरिटेट होत होती. 

 

*********

 

क्रमशः 

 

 

*********

 

हॅलो फ्रेंड्स… 

 

तर फायनली माही अर्जुन एक झालेत. मूळ कथा पूर्ण होत झाली आहे … शेवटचे दोन भाग उरलेत…

 

तुम्हाला त्यांचं लग्न बघायला आवडेल काय? आवडेल तर सांगा … थोडे भाग वाढवते ( त्यांची जो आधीची fight होती, जे सगळे मिस करत आहेत, ती पण टाकेल) …. यासाठी विचारते आहे कारण मग परत उगाच तानत आहे वाटेल , किंवा काय तेच ते लग्नाचे कार्यक्रम वगैरे …. बोर होतात…. तर कळवा तुमची आवड… मला पण आवडेल तुमची आवड जपायला …. 

 

Likes , comments साठी big thank you ❤️

 

सगळ्या कॉमेंट्स वाचत असते , पण कधी कधी reply नाही करणं होत त्यासाठी क्षमस्व..

Thanks a lot ❤️

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️