तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 80

अर्जुन माही

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 80

भाग 80

देवेशचा अंत झाला होता , माहीच्या आयुष्यातल्या एका वाईट , जीवघेण्या पर्वाचा अंत झाला होता. आयुष्यात वाईट , असह्य असे काही घडले की व्यक्ती तुटून पडतो आणि मग चुकीचे पाऊल उचलतो. पण हीच खरी वेळ असते स्वतःला सांभाळता येण्याची… माही तुटली होती पण तिने हार नव्हती मानली… लढत होती स्वतः शी , जगाशी आणि शेवटी ती जिंकलीच ….. तिला अर्जुन मिळाला होता …. जेवढे दुःख , त्रास समाजाने दिला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने अर्जूनचे तिच्यावर प्रेम होते … त्याची तिला साथ होती …. 

देवेश चा the end झाला होता, काही छोटी छोटी लीगल कामं राहिली होती … ती वकील पूर्ण करत होते. 

शांतीसदन मध्ये घरातील वातावरण सुद्धा आता निवळत होते … सगळे पुर्ववत होत होते. अनन्या , आकाश , अंजली, आशुतोष , आजी , मामा यांचे माही बद्दल पण मत चांगले झाले होते, म्हणजे चांगलेच होते , पण झालेल्या गोष्टी मुळे जे काही थोडेफार रागावले होते , तो राग सुद्धा आता गेला होता. श्रिया पण नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती, पण अजूनही आधीसारखी ती झाली नव्हती. मामी तर आधीपासूनच कुरकुरी होती…. पण त्यातही तिने अर्जुन चे आभार मानले होते , त्याच्या मुळे श्रियाचे आयुष्य खराब होण्यापासून वाचले होते, काही अघटीत घडण्यापासून वाचले होते, त्यामुळे अर्जुनच्या आनंदासाठी ती माही ला स्वीकारायला तयार होती. नलिनीचाच थोडा विरोध सुरू होता… पण घरातील सगळेजण अर्जुन सोडून नलीनीला आपापल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करत होते. 

********

अर्जुन आपल्या केबिन मध्ये बसला बाहेर बसलेल्या माहीकडे बघत होता. तिला बघून त्याला हसू सुद्धा येत होते. . माही डुलक्या घेत काम करत होती, शेवटी तीच्याच्याने राहवले नाही आणि तिचा डोळा लागला आणि जोरदारपणे तिचे डोकं खाली टेबलवर पडले…. तिचा धक्का लागला आणि बाजूला असलेला ग्लासमधले पाणी बाजूच्या डेस्कवर उडाले , तिथले काही पेपर भिजले आणि ग्लास खाली पडून फुटला…त्या आवाजाने माही खडबडून जागी झाली आणि घातलेला गोंधळ बघू लागली. तेव्हढ्यात तिच्या डेस्क वरील फोन वाजला. 

" माही , come to my cabin ".... 

" हो ….."... माहीने फोन बोलून ठेवला.. 

" बोंबला आता …. सर पण रागावतील …. माही , हीच जागा मिळाली होती तुला झोपायला ? माहिती आहे ना सरांना कामाच्या ठिकाणी कामचुकारपणा नाही चालत….तरी तू इथे झोपा काढतेय , त्यात तेवढा गोंधळ घातला …. ही मिरा पण त्रास देते , झोपू नाही देत नीट ….".... माही बडबड करत अर्जूनच्या केबिन पुढे उभी होती. 

" Mahi , come in "..... अर्जुन 

अर्जूनचा आवाज आला तसे ती आत आतमध्ये गेली आणि त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. 

" काय चाललं आहे ? कामाच्या वेळी तुम्ही झोपा काढत आहेत ?".... अर्जुन 

" आजकाल तर हे मला इग्नोर करत होते , समोरून गेले तरी यांना मी दिसत नव्हते , आज इथे केबिन मध्ये बोलावले…..माही आता हा खडूस तुला सोडायचा नाही".... माही अर्जूनकडे बघत मनातच बोलत होती. 

" हाय …. पण किती गोड दिसत आहेत आज हे …. माही किती दिवस झाले असे जवळून , मनसोक्त सरांना बघायला सुद्धा होत नाही … मी नलिनी काकीचे प्रॉमिस नाही तोडले हा , ते तर तो ग्लास तुटला , मी काही नाही केले….पण बरं झाले तो ग्लास फुटला… मला इथे येता आले "..... माहीची मनातच बडबड सुरू होती..ती त्याला बघण्यातच गुंग झाली होती.  

" झालं बघून ?" …. अर्जुन 

" हां ? "..... माही अर्जुनाच्या आवाजाने भानावर आली… 

" काय गोंधळ घालून ठेवला आहे बाहेर ? तुमच्या घरचं ऑफिस नाही आहे "..... अर्जुन 

" माझ्या नवऱ्याचं आहे ….".... माही हळूच पुटपुटली … आणि तिला स्वतःशीच हसू आले.. 

अर्जुनला ते ऐकून हसू आले… पण त्याने कंट्रोल करत न ऐकल्या सारखे केले… 

" व्हॉट?".... अर्जुन 

" हां ….. काही नाही …. सॉरी ते चुकून डुलकी आली …. पण ...पण आता परत असे करणार नाही….. "..... माही

" नुकसान झाले आहे , त्याचं काय ?".... अर्जुन 

" ग्लास चे पैसे माझ्या पगारातून कट करून घ्या "..... माही 

" What rubbish ?... महत्वाच्या दोन फाईल्स पाण्याने ओल्या झाल्यात …. ".... अर्जुन 

माही कसानुसा चेहरा करत त्याचाकडे बघत होती. 

" नुकसान खूप केले आहे तुम्ही…. पनिशमेंट तर मिळेलच "... अर्जुन 

" मी त्या फाईल्स परत बनवते ….".... माही 

" नाही , बेजबाबदारपणे वागता , काहीतरी मोठी पनिशमेंट द्यावी लागेल ".... अर्जुन 

" हां…?".... माही डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती… 

" यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झाले …. माही हे तर होणारच होते ना …. तूच तर दूर झाली , त्यांनी तर किती समजावण्याचा प्रयत्न केला होता ….हेच तर होणारच होते … पण मग आता काय करतील हे ? यांच्यातला ड्रॅक्युला जागा झाला, पहीलेचे खडूस सर परत आले... "..... माही परत गपपणे त्याला बघत उभी होती. 

" ऑफिस वेळेत एकतर झोपा काढता नाहीतर बडबड करत दुसऱ्यांना डिस्टर्ब करता … तिथे काउच वर बसायचं … एकदम गप्प ".... अर्जुन 

" हां ?".... माही

" I know , तुमच्या साठी कठीण आहे , काही न करता , स्पेशली काही न बोलता तुम्ही गप्प नाहीच बसू शकत …. तर तिथे चुपचाप बसायचं ""..... अर्जुन सोफ्याकडे इशारा करत बोलला. माही डोकं हलवत गपचुपपणे तिकडे जाऊन बसली… 

ती बऱ्याच दिवसांनी अशी समोर बसली होती , त्यामुळे अर्जुनला पण खूप मोकळं वाटत होते… आज त्याला सुद्धा मनापासून काम करायची इच्छा झाली होती… तो मन लावून लॅपटॉप मध्ये काम करत होता , अधून मधून माहीकडे बघत होता … 

माही आपल्या ओढणी च्या एका काठासोबत खेळत रूम भर आपली नजर फिरवत होती…. अर्जूनचे लक्ष नसले की त्याला बघत होती… 

" फार वाईट आहात तुम्ही … तुम्ही असे समोर असणार .. आणि मी गप्प बसायचं … कसं जमायचं ".... मनातच बोलत तिची चुळबूळ सुरू होती. 

" माझी मीटिंग आहे … मी बाहेर चाललो आहे.. पण तुम्ही इथून बिलकुल हलायचे नाही , कॅमेरा दिसतो आहे …"... अर्जुनने केबिन मधल्या एका कॉर्नर कडे बोट दाखवला…. " मला सगळं कळते …. सो इथून हलयाचे नाही ".... अर्जुनने माहीला इंस्त्ट्रक्शन्स दिल्या आणि केबिन च्या बाहेर चालला गेला… 

माहीच्या चेहऱ्यावरूनच ती अर्जुनला खूप थकलेली वाटली होती , तिच्या डोळ्यांवरून कळत होते रात्री नीट झोप नाही होत आहे ते….बाहेर तिला नीट झोपता येत नव्हते म्हणून त्याने पनिशमेंटचा बहाणा करत तिला इथे शांत बसवले होते … पण तो तिथे असेल तर ती झोपणार नाही म्हणून मीटिंगचा बहाणा करत तो बाहेर निघून आला होता. बसल्या बसल्या माही बोर झाली आणि आपोआपच तिचा डोळा लागला ..

अर्जुन थोड्या वेळाने केबिनमध्ये आला तर ती शांतपणे बसल्या बसल्याच पोटाजवळ पाय घेऊन गाढ झोपेत होती .. अर्जुन ने केबिन चा AC थोडा कमी केला… त्याचा कोट तिच्या अंगावर पांघरला… तशी झोपेतच ती गोड हसली….तिच्या केसातुन हात फिरवन्याचा त्याला मोह झाला .. पण तिची झोप मोड होऊ नये म्हणून त्याने आपला मोह आवरता घेतला , तिच्या पुढे आपल्या गुडघ्यांवर खाली बसत बऱ्याच वेळ तिला बघत होता. 

थोड्या वेळाने माहीला जाग आली … तिची छान शांत झोप झाली होती … तिला बरेच फ्रेश वाटत होते …. आळोखे पिळोखे देत ती उठली…

" हे तर सरांचं…."... तिने तिच्यावर पांघरलेला कोट बघितला आणि एकदम तिला आठवले ती अर्जुन च्या केबिन मध्ये आहे …. ती जागेवरून ताडकन उभी राहत अर्जुन च्या टेबल जवळ आलम… 

" ते … ते…. सॉरी…. मला बोर झालं तर झोप लागली …. ".. माही 

" " ह्मम ".... अर्जुन लॅपटॉप मध्येच बघत बोलला.

" खरंच सॉरी …."..... माही 

" बस , चहा घे ".... अर्जुन 

" हां?".... माही 

" बस "..... त्याने डोळ्यांनीच चहाच्या कप कडे इशारा केला … माही तिथे बसली आणि तिने चहाचा कप हातात घेतला… 

" आज मी मिराला घरी घेऊन जातो आहे ".... अर्जुन 

" नाही ….. म्हणजे…. का ?"..... माही

" She is my daughter … , आणि मी विचारत नाही आहो , सांगत आहो ".... अर्जुन 

" नाही …. म्हणजे ती रात्री त्रास देते …तुमची नीट झोप होणार नाही...म्हणून ".... माही 

" माझी काळजी करायची गरज नाही, माझं मी बघून घेईल "..... अर्जुन तिच्यावर नजर रोखत बोलला. अर्जूनचा सुर ऐकून माहीने चुपचाप होकारार्थी मान हलवली. 

बरीच संध्याकाळ झाली होती… उशीर सुद्धा झाला होता .. … पूर्ण ऑफिस रिकामे झाले होते ..माही झोपली होती म्हणून त्याने तिला उठवले नव्हते. अर्जुन ने माहीला घरी सोडले आणि मिराला पिकप केले…

*****

अर्जुन मीराला घरी घेऊन आला… हसत खेळत उड्या मारतच अर्जुन आणि मिराची घरात एन्ट्री झाली… दोघानाही असे हसतांना बघून घरात सगळ्यांना बरे वाटले…. मीरा घरभर खेळत पळत होती… आणि अर्जुन तिच्या मागे मागे … मिरा रुही आणि बाकीच्यांसोबत चांगलाच धिंगाणा घालत होती .. रुहीला पण मस्ती करायला कंपनी मिळाली होती.. अर्जुन सुद्धा बऱ्याच वेळ खाली संगळ्यांसोबत बसला होता. 

मीराला जेऊ घालने… रात्री ती झोपत नव्हती म्हणून तिला खांद्यावर घेत गोष्ट सांगत फिरवत फिरवत झोपवने …. नलिनी हे सगळं बघत होती. 

अर्जुन आणि मिरा ची सकाळ पण लवकरच झाली… आज अर्जुनने त्याचा जॉगिंगला जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला होता … दोघांनी मिळून कविता म्हणत ब्रश आटोपला… मीराला क्यूटसा ट्रॅकिंग सूट घालून दिला… दोघंही खाली लॉन मध्ये वॉक करत होते .. मिराच्या बोबड्या गप्पा सुरू होत्या ….अर्जुन पण तिला हसून उत्तरं देत होता… ती उकडून तिकडे पळत होती आणि अर्जुन तिला पकडत होता …. 

वरती बाल्कनी मधून नलिनी या दोघांना बघत उभी होती.

" नलिनी , बघ अर्जुन …. किती खुश दिसतोय ? येवढ्या दिवसात मी त्याला घरात असे आनंदी नाही बघितले आहे…. काल रात्री पण बऱ्याच दिवसांनी छान व्यवस्थित जेवला…. तुला नाही वाटत आहे काही फरक ?"..... मामा 

" यावेळी मी सुद्धा यांच्याशी सहमत आहे…. आपला आधीचा अर्जुन परत हवा घरात …. बघा ना ताई , काल पासून घरात किती रौनक वाटते आहे…. नाहीतर घरात एवढी सुखं असून सुद्धा , घर आनंदी नाही वाटत आहे ".... मामी 

मामा मामी दोघांनीही नलिनीच्या डोक्यात खूप सारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं सोडली...आणि तिथून निघून आले… 

" Thank you , आज पहिल्यांदा तू मला साथ दिली ".... मामा 

" मला पण नाही आवडत त्या भिकारी मुली … ".... मामी

" अं ?"...मामा 

" पण मुलं खुश तर घर आनंदी राहते , मला अर्जुनला असे त्रासात नाही बघवत आहे … अर्जूनच्या सुखासाठी मी असे कितीही भिकारी घरात सहन करू शकते … ".... मामी थोडी भाऊक झाली. 

" ममता…. खरंच आज खूप छान बोलली … धन्यवाद ग ….".... मामा 

" बरं बरं , याचा अर्थ हा नाही होत की मला त्या पोरी आवडल्या आहेत…. मी तशीच वागणार जशी आधी वागत होती".... मामी

ममताच्या बोलण्यावर मामा हसायला लागला… दोघंही हसत हसत तिथून निघून आले…त्यांचं बोलणं नलिनीच्या कानावर पडले….जे नलीनीला विचार करायला भाग पाडत होते. 

अर्जुन आणि मिरा बाहेर मस्ती आटोपून घरात आले…. आता मिराचा स्विमिंग पूल मध्ये खेळण्याचा हट्ट सुरू झाला… अर्जुनने पण मान्य केला ..तसेही आज रविवार कशाचीच घाई नव्हती …. अर्जुनने तिला कंबरेत स्विमिंग फ्लोटिंग ट्युब घातली आणि दोघंही स्विमिंग पूल मध्ये उतरले ….. मिरा पाण्यावर हात काय मारायची , अर्जुन वर पाणी काय उडवायची …. दोघांचीही खूप मस्ती सुरू होती … त्यांना बघून रुही आणि आशुतोष सुद्धा स्विमिंग पूल मध्ये जॉईन झाले….मग आकाश आणि अनन्या सुद्धा….आशुतोष ने श्रिया ला सुद्धा स्विमिंग पूल मध्ये ओढले .. आधी ती तयार नव्हती पण त्याने थोडा फोर्स केला तर ती पण उतरली… सगळ्यांची एकत्र धमाल सुरू झाली…. सगळेच मनसोक्त गोंधळ घालत होते… 

आशुतोष , रुही अनन्या एकत्र मस्ती करत होते .. मिरा त्यांना बघत होती .. 

" अर्जुन , माऊ ला पण घेऊन ये , मला तिच्यासोबत खेळायचे"..... मीरा 

अर्जुन जवळ काही उत्तर नव्हते….. आशुतोषने मिराला जवळ घेतले… 

" मीरा , माऊ ला तर यायला उशीर लागेल… पण माझ्याकडे एक आयडिया आहे …".... आशुतोषने आपला फोन आणला आणि माहीला व्हिडिओ कॉल लावला… 

" माऊ sssss ….."..... मीरा समोर फोनमध्ये माहीला बघून खूप खुश झाली… माही पण तिला आणि सगळ्यांना मस्ती करतांना बघून खुश झाली. सगळे माही आशुतोष, मिरा , आकाश सगळेच माही सोबत बोलत होते …. अर्जुन मात्र मिरा जवळ शांत उभा होता. 

" माऊ , मी आणि अर्जुन तुला खूप मिस करतो आहे …. तू लवकर ये " '.... मीराने त्याच्या पुढे हात पसरले .. अर्जुनने तिला आपल्या कुशीत उचलून घेतले…. 

" अर्जुन , तू पण माऊला मिस करतो आहे ना ? सांग तिला , म्हणजे ती लवकर येईल , मग मी पण रुही दीदी सारखी माझ्या आई बाबा सोबत खेळेल "..... मीरा

अर्जुनने फक्त होकारार्थी मान हलवली .. 

" मीरा , तू खेळ आता …. मला थोडं काम आहेत ".... माहीचे मन खूप भरून आले होते , बोलतच माहीने फोन कट केला .. तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी तरळले होतेच .. 

आंघोळ वैगरे आटोपून अर्जुन मस्ती करत मिराची तयारी करून देत होता. त्यांचा हसण्या खिडळण्याचा आवाज बाहेर येत होता …. आज अर्जूनची रूम सुद्धा खूप बोलकी वाटत होती. नलिनी तिथून जात होती की त्या दोघांच्या आवाजाने तिथे थांबत आतमध्ये चाललेला गोंधळ बघत होती… 

अर्जुनला मिराची तयारी काही काही नीट करता येत नव्हती… मीरा त्याला बघून खुदुखुदू हसत होती आणि माही तिला कशी तयार करून देते ते सांगत होती. अर्जुन ह्मम ह्मम करत तिचं ऐकत तिची तयारी करून देत होता…

" अर्जुन , दोन वेण्या ".... मीरा

" स्वीटहार्ट , हे बघ जे येते आहे ते करू दे आता .. दोन वेणी शिकेल , मग करून देईल तुझी हेअर स्टाईल …"... अर्जुन 

" नो… आता ….."..... मीरा हट्ट करायला लागली. 

" पूर्ण तुझ्या माऊ सारखी आहेस , हट्टी "...अर्जुन 

" हीहीही …. माऊ तर म्हणते अर्जुन सारखी आहे "..... मीरा दात दाखवत हसत होती. 

" एक सिक्रेट सांगू काय ? ".... मीरा ने त्याला आपल्याकडे यायला सांगितले.

" हो"... अर्जुन 

" तू सांगणार नाही ना माऊ ला ? तिने मला सांगायचं नाही म्हणून सांगितले ".... मीरा

" नाही सांगणार ".... अर्जुन 

" तुला माहिती , ती ना रात्री मला कुशीत घेऊन झोपते तर कधी कधी मला अर्जुन म्हणते …. ती बुलक्कड आहे …. विसरून जाते … ".... मीरा परत दात दाखवत होती … तिच्या हसण्यावर तो पण कसाबसा हसला.. 

" अर्जुन …".... मीरा 

" ह्मम ….".. अर्जुन तिच्या वेण्या घालायचा प्रयत्न करत बोलत होता. 

" अर्जुन , तू चल ना तिकडे घरी , माझ्या सोबत आणि माऊ सोबत रहा ना… तू म्हणाला होता ना आपण सोबत राहू "..... मीरा 

" ह्मम ".... अर्जुन

" ती नुसता काय ह्मम ह्मम करतो आहे… "... मीरा 

" मला माहिती तू आमच्या सोबत का राहत नाही ".... मीरा 

" काय ?".... अर्जुन 

" आजीला मी आणि माऊ आवडत नाही म्हणून तू मला आणि माऊला इथे घेऊन येत नाही आहे ना ?"..... मीरा 

" हे कोणी सांगितले ?".... अर्जुन 

"ते आत्याआजी माऊला म्हणत होती "..... मीरा 

" मीरा किती स्वीट आहे , सगळ्यांची आवडती … माझी तर खूप फेवरेट".... अर्जुन 

" आणि माऊ ?".... मीरा 

" ती तर लाईफ आहे …. ".... अर्जुन 

" काय ?"...... मीराने क्यूटसा वाकडा चेहरा केला. ते बघून त्याला हसू आले…. माही पण अशीच करते…

" तुला माहिती ती ऑफिस मध्ये गोंधळ घालत असते...तुझी माऊ पागल आहे ना थोडीशी… ".... अर्जुन 

" हो …… गडबड करत असते नुसती… आणि मला म्हणते गडबड करते ".... मीरा आपले दोन्ही हात तोंडावर ठेऊन खीखी हसत होती. 

" तो ऑलरेडी बाबा झाला आहे …. जन्मालाच घातल्याने बाबा होतो , हे मोडून काढलं आहे त्याने …. माहीच्या दूर राहिलही कदाचित , पण तो मिरा पासून कधीच दूर होणार नाही … आता तो बाबा झाला आहे ते पण एका मुलीचा , या बाप लेकीला कसे दूर करशील?….".... आजी नलिनीला म्हणाली. आणि तिथून निघून गेली. नलीनीने एकदा त्या दोघांकडे बघितले आणि त्या त्यांच्या रूमकडे निघाल्या. 

" चलो done…. आता नेक्स्ट काय ?".... अर्जुन 

" भूक "..... मिरा

" ओके … लेट्स गो ".... त्याने तिला टेबल वरून खाली उतरवले , तिने अर्जुनचा हात पकडला आणि उड्या मारतच खाली जाऊ लागली. 

किचन मध्ये पण मिराची धमाल सुरू होती… तिला जाम पोळी च ती पण अर्जुन च्या हातची च खायची होती… ती त्याला जाम पोळी कशी बनवायची ते शिकवत होती...आणि ती जसे जसे सांगत होती तसे तसे तो फॉलो करत होता.. 

" हा हा हा …. सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारा अर्जुन पटवर्धन आज एका चिमुकल्या बोटांवर नाचतोय …… मिरा एक नंबर "..... आशुतोष तिथे येत अर्जूनची मस्करी करत होता. 

" वाह भाई ….. चक्क.. किचन मध्ये तू…? साधं पाणी पण घ्यायला येत नाही तू..ते पण तुला तुझ्या रूम मध्ये लागते….".... आकाश 

" तू बाबा झालास की कळेल तुला …"... आजी आकाशची मस्करी करत होती. 

आज घरात छान खेळीमेळीचे वातावरण होते…. 

मीरा रुही आणि बाकी मंडळी सोबत खेळत होती… अर्जुन त्याचा रूम मध्ये थोडं काय काम करत होता… वारंवार त्याचा डोक्यात मिराचे बोलणे येत होते… " आजीला मी आणि माऊ आवडत नाही ".... ते ऐकून त्याला खूप वाईट वाटले होते …. त्याने परत एकदा नलिनी सोबत बोलायचं ठरवले…. आणि तो नलिनी च्या रूम मध्ये गेला… 

" आई ……".... अर्जुन 

" अर्जुन …..".... त्याचा तोंडून आई ऐकून तिला खूप गहिवरून आले…. आज त्याने स्वतःहून तिला हाक दिली होती… कितीतरी दिवसांनी..

" ये ये …. बोल बाळा ".... आई 

 " आई , मला बोलायचं तुझ्यासोबत , मी ज्या विषयावर बोलणार आहे , मला माहिती तुला नाही आवडणार… पण तरीही ऐकून घे "... अर्जुन तिच्याजवळ जाऊन बसला , तिचा उजवा हात आपल्या हातात घेतला…. 

" आई , मी माही बद्दल बोलायला आलो आहे … माझा कधीच प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता… आणि मला या गोष्टीचा भानगडीत पडायचे सुद्धा नव्हते.. हे का बरे माहिती .. कारण तू… तुला मी नेहमीच दुख्खात बघितले होते , मिस्टर पटवर्धन साठी झुरतांना बघितले होते , त्यांची वाट बघताना बघितले होते … त्यांच्यासाठी तुझ्या डोळ्यात अश्रू होते … तुला रडतांना बघणं माझ्यासाठी खूप जीवघेणे असायचं , त्यात मी तुझ्यासाठी काही करू शकत नव्हतो , हा त्रास व्हायचा मला … खूप हेल्पलेस वाटत होते … पण आता कळत आहे प्रेम असेच असते… स्वतःचा त्रास स्वतःलाच सहन करावा लागतो , यात कोणी सोबती नसतो. तुला आजी , मामा यांनी त्यांना विसरून पुढे जायला सांगितले , दुसरं लग्न करायला सांगितले.. पण तू नाही ऐकले … कारण तुझं खरंच खूप प्रेम होते त्यांच्यावर , किंवा माझ्यासाठी पण तू दुसरे लग्न करण्याचा विचार नसेल केला.. मग आई आता तू स्वतःला माझ्या जागेवर ठेऊन बघ… माही माझी बायको आहे , त्याही पेक्षा महत्वाचं माझं तिच्यावर खूप प्रेम आहे , मला खूप त्रास होतो आहे तिच्यापासून दूर राहायला… ती खूप स्ट्राँग आहे ,तिने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची आपली माणसं सुटली आहे, तिने आता स्वतःला सवयच करून घेतलीय , एकट्याने जगायची …पण मी नाही तिच्या एवढा स्ट्राँग… आणि मिरा , ती माझी मुलगी आहे , जसं तू माझ्यासाठी तुझ्या आयुष्यात पुढे नाही जाऊ शकली, मी पण मीरा शिवाय माझ्या लाईफ चा विचार सुद्धा नाही करू शकत. 

आई , वाईट नको वाटून घेऊ , पण एक बोलतो , तू त्या व्यक्ती वर प्रेम केले , त्याची वाट बघत होती जो तुला सोडून , तुझ्या प्रेमाला सोडून गेला, त्याने कधीच तुझ्यावर प्रेम केले नाही…. ती व्यक्तीच चांगली नव्हती, तरी सुद्धा तुला ती व्यक्ती हवी होती ….मी खऱ्या व्यक्ती वर प्रेम केलंय , तिचा पण माझ्यावर तेवढाच जीव आहे , तरी मला शिक्षा का ?? 

 माही , ती चांगली व्यक्ती आहे , pure soul आहे…. ती चुकीची नाही , तिच्यासोबत खूप वाईट घडलं आहे पण याचा अर्थ हा नाही की ती वाईट आहे. लाइफचा काहीच भरवसा नाही , कधी काय घडेल … माहीचा काय दोष होता ? मुलगी आहे म्हणून? तिचं मुलगी असण्याची इतकी मोठी शिक्षा तिला मिळावी काय ? 

आई , कितीतरी बायका- मुलींसाठी तू स्वतः त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे , कारण तुला एकटेपणाचा त्रास , दुःख कळते , म्हणून तू त्या एकट्या पडलेल्या बायकांसाठी तू आश्रम बनवले… त्यांना सहारा देत त्यांना त्यांच्या पायावर उभे करायला मदत करते .. तू एक स्त्री म्हणून त्यांची दुःख समजून घेतले…. मग माहीच्या बाबतीत तू का समजून घेत नाही आहे ?माझी आई हे सोडून एकदा तिच्याकडे एक स्त्री म्हणून बघायचा प्रयत्न कर… आपण बाहेर मोठमोठाले सामाजिक उपदेश देतो , समाजात असे बदल व्हायला हवे वगैरे…. पण मग आपल्यावर ते सिद्ध करण्याची वेळ आली तर आपण मागे का हटतो ?

आई , चांगल्या कामाची , चांगल्या बदलाव करण्याची सुरुवात आपल्या पासून व्हायला हवी … असे नाही वाटत तुला … ? का हट्ट की दुसऱ्याने सुधारावे , समाजात दुसऱ्याने बदल घडवावा… आपण का नाही ? " ….. अर्जुन नलिनी ला समजावण्याचा प्रयत्न करत होता , नलिनी चूप एकदम त्याचाकडे बघत होती. 

" सॉरी जास्ती बोललो असेल …. माहिती नाही तुला पटते आहे की नाही …. तू आई आहेस आणि मी एक बाप , त्यामुळे आपल्या मुलांचे हित च आपण बघू … तू काही पण घे निर्णय , मी तुला कधीच दोष देणार नाही … फक्त एवढे सांगेल , मी आयुष्यभर एकटा राहील , पण दुसरी कुठलीच मुलगी माझी बायको म्हणून मी स्वीकारणार नाही … " नवरा म्हणून मी फक्त माहीचा" ," बाबा " मी मिराचा , आणि " मुलगा तुझा " "..... अर्जुन येवढे बोलून निघून गेला… 

अर्जुन बाहेर गेला आणि आतापर्यंत डोळ्यात रोखून धरलेले पाणी अश्रून बनून तिच्या गालांवरून ओघळले… 

********

संध्याकाळी माही , आत्याबाई , छाया शांती सदन मध्ये आले … त्यांना असे अचानक घरी बघून सगळेच आश्चर्यचकित झाले … नलीनीने सगळ्यांना खाली हॉल मध्ये यायला सांगितले…. अर्जुन सुद्धा माहीला तिथे बघून आश्चर्यचकित झाला होता… मीरा आनंदाने माहीच्या गळ्यात पडली…  

" मला सगळ्यांसोबत महत्वाचं बोलायचं आहे ".... नलिनी 

सगळे चुपचाप नलीनिकडे बघत होते … 

" माही , बाळा इकडे ये …."... नलिनी 

" बाळा " शब्द आणि नालिनीचा मृदू प्रेमळ आवाज ऐकून सगळ्यांनाच समजायचे ते समजले … 

नलिनीच्या तोंडून बाळा शब्द ऐकून , माहीला खूप गहिवरून आले …. तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले… भरल्या डोळ्यांनी ती अर्जूनकडे बघत होती…..अर्जुनच्या पण हृदयात थोडे दुखल्या सारखे झाले , एक वेगळंच दुखलं होते , आनंद होता की दुःख त्याला कळत नव्हते … तो पण तिच्याकडे बघत उभा होता .. आणि सगळे या दोघांकडे बघत होते , त्यांच्या डोळ्यात सगळ्यांनाच खूप वेदना दिसत होत्या . 

" माही ….. माझ्या अर्जुनची बायको आणि माझ्या मिराची आई होशील ?".... नलिनी 

ते ऐकले आणि दोघांनीही डोळे मिटून घेतले…. दोघांच्याही डोळ्यांतून त्यांच्या वेदना अश्रू वाटे बाहेर पडल्या… बाकी सगळ्यांना ते ऐकून खूप आनंद झाला… 

" तुमचं लग्न झाले आहे , पण, हे पण काय लग्न झाले , ना सप्तपदी , ना मोठ्यांचे आशीर्वाद … काहीच नाही …. परत लग्न करशील?'.... नलिनी 

माही होकारार्थी मान हलवत होतीच की अर्जुन ने नकार दिला… 

" मला मान्य नाही …. मला माही सोबत लग्न करायचं नाही …. "..... अर्जुन निर्विकारपणे बोलला… , अर्जुनने आपले डोळे पुसले आणि तो आपल्या रूमकडे जायला निघाला… 

सगळे अर्जुनचे निर्णय ऐकून शॉक झाले …. माही ला तर त्याचा शब्दांवर विश्वास बसत नव्हता.

***********

क्रमशः 

काय सुरू आहे अर्जुनाच्या मनात ?

🎭 Series Post

View all