
भाग ७
अर्जुन ची मीटिंग चांगली झाली होती...शो मुळे जी डील झाली नव्हती ती आज फायनल झाली होती...तो आनंदातच घरी आला होता...
आई देवळात जायची तयारी करत होती....
खुश दिसतोय....आई
हो डील फायनल झाली आज...खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा.... इंटरनॅशनल स्तरावर आता बिझनेस ला खूप प्रॉफिट होईल नी बिझनेस वर्ल्ड मध्ये वेगळीच ओळख निर्माण होईल..अर्जुन....
तू कुठे बाहेर निघाली होती....अर्जुन
हो बर झालं तू आला... मला देवळात जायचं. होत.
तुला माहिती ना मला नको वाटते..ड्रायव्हर ला घेऊन जा ..अर्जुन
ममता गेलीय बाहेर....नाही तर ड्रायव्हर ला नेले असते... चल सोबत.. तुझ्यासाठी पण छान दिवस आहे .....आई
हो नाही करता करता ..दोघे देवळात गेले..आई पुढे गेली... अर्जुन जवळच झाडाच्या कठड्यावर जाऊन बसला..
माही जॉब भेटल्यामुळे खुश होती, बाप्पाचे आभार मानायला ती देवळात आली होती... परत जातांना तिला अर्जुन दिसला..तो मोबाईल मध्ये काहीतरी करत बसला होता ..
माही त्याला बघून थबकली थोडी...तिला त्या दिवशी चा प्रसंग आठवला....काहीपण असला तरी चूक आपली पण होती, आपल्यामुळे त्याचा शो खराब झाला होता...असा विचार आला तिच्या मनात...त्या दिवशी आपण माफी नाही मागितली... आता दिसला आहे माफी मागून घेऊ असा विचार आला तिच्या डोक्यात.......ती पुढे जाणार तर तिला त्याचे शब्द आठवले.."परत येऊ नकोस पुढे "..ती परत थांबली....केलेल्या चुकीची माफी मागायलाच हवी.. चल माही..नाही नको नको..परत ओरडला तर... नाही ओरडणार..इथे इतकी लोक आहेत...सुरक्षित जागा आहे ...तिच्या मनात असे खूप गोष्टी येत होत्या..
माही तशी बोलकी चुळबुळी होती...पण काही प्रसंगामुळे तिला कधी कधी भीती वाटायची...आपल्यामुळे कोणाला त्रास झालेला तिला आवडायचं नाही...
चला माही बेटा...माफी तर मागूनच घेऊन पुढचं पुढे बघू मनाशी ठरवत ती अर्जुन जवळ येऊन उभी राहिली...
तो मोबाईल मध्येच घुसला होता...त्याच लक्ष नव्हते माही कडे..
त्याच लक्ष वळवण्यासाठी उगाच काही तरी बोलायचं म्हणून माही बोलली
बाप्पा सोबत पण कट्टी काय ....
त्याने मान वर केली.. नी ताडकन उठून उभा राहिला..
तू......
हो.., माही
तू इथे काय करतेय.....अर्जुन रागाने बोलला
देवळात कुणी पण येऊ शकते.... आतमध्ये पण जाऊ शकते ....अशी इथे बाहेर नाही बसत मी बाप्पांच्या दारात येऊन...... त्याचं तिरसट प्रश्न बघून तिने पण उत्तर दिले ....
what....हा तर जा ना , मला का सांगतेय.... मी म्हणालो होतो ना माझ्या समोर येऊ नको ते ... आणि मी इथे बसेल नाहीतर अजून कुठे... तुझा काय प्रॉब्लेम आहे .... आणि तशी पण तुमच्या सारखी लोक येतात आणि बाप्पांजवळ मागत बसता.... कष्ट करायला नको. सगळं आयात हवं असते.... नी तुझ्यासारख्या मुलींना मी चांगला ओळखून आहे .. .अर्जुन
मी तर माफी मागायला आले होते .. मला वाटलं माझ्यामुळे तुमचा शो खराब झाला...पण तुम्ही तर आपलं वेगळच सुरू केले...... तुम्ही तर देवाला पण नाही सोडलं... इतका यश मिळालं तर बाप्पांना धन्यवाद तरी करायचा.... माही
मी hardwork केले... जे आहे ते सगळं माझ्या मेहनतीचं फळ आहे ... देवाचं काय त्यात....आणि तू का मला सांगतेय मी काय करायचं काय नाही ते .... माझं मीच ठरवत असतो... आणि आता जा इथून... इरिटेत होतंय मला....अर्जुन थोडा ओरडत बोलतो
तुमचं घर नाहीये हे ...... मी पण चुकीच्या माणसाजवळ माफी मागायला आली म्हणत वळायला गेली तर तिचा पाय ट्विस्ट झाला.. आ s s ... ती थोडी कळवळली... नी पडणार तेवढयात अर्जुन ने तिला कंबरेमध्ये हाथ घालून पकडलं...तिने पण तोल सावरायासाठी त्याच्या शर्ट ची कॉलर घट्ट पकडली...नी त्याच्या कडे बघायला लागली...
पाय ट्विस्ट झाल्यामुळे तिला थोड दुखल होत त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं होत..
तो तिच्या कडे बघत होता..तिच्या डोळ्यात हरवला होता , तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याचा राग पण थोडा कमी झाला होता....
का हिच्या डोळ्यात बघितले की मला वेगळेच फिलिंग येतात... काही कळत नाहीये....
सोडा मला... माहीच्या आवाजाने तो भानावर आला...
तिला नीट उभ करत त्याने त्याचा हाथ काढून घेतला...
चालायला गेली तशी ती थोडी कळवली... ती पडेल म्हणून परत त्याने तिला पकडले....
सोडा मला माझी मी काळजी घेऊ शकते...माही
हो ते दिसतच आहे.... ..चालता येईना ....त्याने तिला कठड्यावर बसवले ....
नी खाली बसून तिचा पाय बघणार की तिने पाय आतमध्ये केला..
मी बघू काय .....अर्जुन
नको... माही
तुला चालायला नाही जमणार.. बघू दे मला...अर्जुन
मला तुमची मदत नकोय... माझी मी बघेल... तुम्ही दुनियेतला शेवटचे जरी असाल तरी मी तुमची मदत घेणार नाही .... माही तोंड वाकडं करत बोलली..
त्याला आता थोड हसू आलं...
ते नंतर च नंतर बघू.....आता मला बघू.. मी तुझ्या पायाला हाथ लावतोय म्हणत तो तिचा पाय तपासत होता... ह्म्म इथला गोटा थोडा सरकला आहे ... थोड दुखेल पण चालता येईल बर वाटेल...म्हणत त्याने पाय फिरवला... जोर्याची कळ निघाली...माही विव्हळली... घाबरून तिने त्याच्या खांद्यावर शर्ट पकडून ठेवला होता नि डोळे मिटले होते .....तिच्या कलावळल्याने त्याचा पण हृदयात थोड धस्स झालं...
तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे तो बघत बसला...
झालं ...अर्जुन खांद्यावर तिने पकडून ठेवलेला हाठाकडे तो बघत होता...
माही ने एक डोळा उघडून बघितले... मग तो बघतोय त्या दिशेने बघितले... खाडकन दोन्ही डोळे उघडून हाथ बाजूला करून ती उभी राहिली..
त...ते मी मुद्दाम... अडखळत माही बोलत होती
इट्स ओके... चालून बघ आता... अर्जुन
अजब च प्राणी आहे हा.... मघाशी ओरडत काय होता... आता मदत काय करतोय ... माही मनातच त्याच्या कडे बघत विचार करत होती...
तिला तसं बघतांना बघून...
what.... अर्जुन
क...काही नाही.... गोंधळातच पळाली.... भेटू नका पुढे...ओरडत गेली.....
अजब च आहे ही... मघाशी म्हणे माफी मागायला आली... नी आता साधं thank you पण नाही म्हणाली....नी काय ते.... भेटू नका पुढे ...... इम्पॉसिबल.. मान हलवत तो मनात बोलला
तो परत मोबाईल घेऊन तिथेच कठड्यावर बसला आई ची वाट बघत...
पळतच येऊन तिने चमेली स्टार्ट केली नि धूम निघाली... घरी आली..
घरी येऊन सगळ्यांना तिने प्रसाद दिला.. नी नोकरी मिळाल्याच सांगितले...उद्यापासून जायचं आहे ... नी साईड बाय साईड ला ड्रेस डिझायनिंग च पण काम करायचं आहे तिने सांगितले.... सगळे खूप खुश झाले...
ड्रेस डिझायनिंग मध्ये आई आता ताई मदत करणार होते तिला ... तर तिला हायस वाटले... नाहीतर सगळं अडजस्त करायचं तिला टेन्शन आले होते... पण आता सगळ्यांच्या मदतीने बराच काम हलकं होणार होते.
आज आनंदात तिचा दिवस गेला होता... थोड्यावेळ अंगणात मीरा नी ताई सोबत मस्ती करून ते झोपायला आत गेले. उद्या माही ला ऑफिस ला जायचं होत..
अर्जुन पण खुश होता.. त्याची पण डिल छान झाली होती..
*******
क्रमशः